भाग - ८
.
.
.
.
अर्जुन त्याच्या केबिन मध्ये बसून काम करत होता.....
आज तो लवकरच बँकेत आला होता.....तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा नॉक केला....
अर्जुन >> कम इन प्लिज...
तो लॅपटॉप मध्ये काम करत म्हणाला.......
सावी >> हाय अर्जुन सर..गुड मॉर्निंग!!😃
ती त्याच्याकडे हसत पाहून म्हणाली......
अर्जुन >> हा आवाज तर.....??
अर्जुन सावीकडे पाहत म्हणाला....
आज अर्जुन सावीकडे पाहतच बसला....
आज सावीने सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता...केस मोकळी सोडली होती....चेहऱ्यावर थोडासा मेकअप, लाला रंगाची लिपस्टिक...
अहाहा! काय दिसत होती ती....
हीं नवीनच सावी त्याला आज दिसली....चेहऱ्यावर हसू, आनंद, कसलाच तणाव नाही....जणू नव्याने आज ती जन्मली...
आज वेगळीच सावी त्याला दिसली....कदाचित हीच पूर्वीची सावी असावी.....!!
सावी >> सरsss कुठे हरवलात??
अर्जुन >> अअअ प स प पेडणेकर तुम्ही? असं? आज?
तो प्रश्नार्थी नजरेने पाहत म्हणाला......
सावी >> खरतर याच श्रेय तुम्हाला जात...तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण परिवाराने जी साथ दिली आहे मला...आज्जी आणि काकू मुळे माझ्या मनातलं सगळं दुःख हलक झालं....कित्येक वर्ष मनात ठेवलेला....दुःख तसेच राहील पण आज हलक झालं...आता मी मुक्त झाले...पूर्वीची सावी आज परत आली.... 😃
अर्जुन >> Wow That's great...पेडणेकर तुमच्यासाठी खूप खुश आहे मी...असच आनंदी रहा...
सावी >> हो चला...आता कामाला लागूयात...😃
अर्जुन आणि सावी जोमात कामाला लागतात.....सावी फाईल्स घेऊन तिच्या डेस्क वर जाते....अर्जुनच आज लक्ष तिच्याकडेच जातं होतं...
नकळतच यो तिच्याकडे ओढला जातं होता....
केबिनच्या काचेतून प्रत्येक क्षणाला अर्जुनची नजर सावी वर जातं होती...
तुला पाहता आज हीं....
हासते या मनी चांदणे..
बहरून प्रीत ये अशी......
गाली पडे खळी जशी...
साथ तुझी मला हवी जीवनी......❤️🌿🌎
अर्जुन >> बापरे!! काय सुंदर दिसतायत पेडणेकर आज....तस त्यांचं रूप कमालीच आहेच...रोजच गोड, सुंदर दिसतात त्या....पण आज काय तरीच भयानक दिसत आहेत.....देवा! नजरच हटेना माझी तर...मलाच कळत नाही आहे की मी आजवर इतक्या सुंदर मुली पहिल्या....माझ्या फ्रेंड्स सर्कल मध्ये सुद्धा सुंदर मुली आहेत....पण का कुणास ठाऊक पेडणेकर यांना पाहूनच का मी असा हरवून जातो....??? आकर्षण आहे ना हे? हूं पण त्यांच्याच बद्दल का वाटतय हे आकर्षण?
(अर्जुन मनातच विचार करत होता......)
.
.
.
.
.
.
संध्याकाळी काम आवरून सगळे आपापल्या घरी जाऊ लागले.....
अर्जुन सुद्धा त्याच आवरून निघत होता....केबिन बाहेर येताच त्याला सावी दिसली....ती अजून गेली नव्हती....
अर्जुन >> मिस पेडणेकर? तुम्ही अजून गेला नाहीत?
(प्रश्नार्थी नजरेने विचारत......)
सावी >> नाही सर...तुमची वाट पाहत होते...
अर्जुन >> माझी वाट पाहत होतात? पण का?
सावी >> अअअ actually मला तुम्हाला ट्रीट द्यावीशी वाटतेय....म्हणूंन मी थांबले...
अर्जुन >> ट्रीट मला का?
सावी >> अहो सहजच..चालेल ना?
अर्जुन >> हो हरकत नाही..कुठे जायचं पण...?
सावी >> जाता जाता बोलूयात का?
अर्जुन >> हो चला....
या बसा....
(कारचा दरवाजा ओपन करत.....)
सावी >> आहा नाही...आज तुमच्या कार ने नाही....आज आपण माझ्या ऍक्टिव्हा वरून जाणार आहोत....
अर्जुन >> त तुमच्या? का असं?
सावी >> अहो अर्जुन सर...कधीतरी नॉर्मल जगून बघा की..मज्जा येते....
अर्जुन >> बरं चालेल पण माझी कार?
सावी >> आज इकडेच असुदे..उद्या सकाळी येताना मी तुम्हाला पीक करते...चालेल
अर्जुन >> हो चालेल..
सावी >> चला तर मग....
बसलात का नीट?
अर्जुन >> हो....जरा विचित्र वाटतय कारण आज पहिल्यांदा मुलीच्या मागे बसलोय स्कुटी वर 😂
सावी >> चला तर मग...
(स्कुटी स्टार्ट करत....)
सावी आणि अर्जुन रस्त्यात गप्पा मारतचं जातात.....
सावी अर्जुन सोबत त्यांच्या परिसरातील एका जवळच्या ठिकाणी अर्जुनला घेऊन जाते.....
ती जागा अर्जुनला माहित नव्हती.....
सगळीकडे हिरवी गार झाड, फुले, सरळ लांब रस्ता....
शांतता आणि संध्याकाळचा SunSet चा विव्ह...!!
अर्जुन सगळीकडे एकटक पाहू लागला....
त्याला खूप प्रसन्न वाटत होतं इकडे येऊन...
सावी ने स्कुटी थांबवली.....दोघेही खाली उतरले आणि हिरव्या गार गवता वर बसले....🌿
सावी >> मग सर कशी वाटली जागा....
अर्जुन >> पेडणेकर अहो अप्रतिम, काय भारी जागा आहे....निसर्ग तर इतक्या जवळून पाहतोय मी...अविश्वानीय आहे की आपल्या शहरात अशी जागा आहे...
सावी >> का नसावीत? असे बरेच ठिकाण आहेत फक्त आपल्याला नाही माहिती.....आपल्या इकडे जर माथेरान सारखं ठिकाण असू शकतो नेरळ ला....तर हीं जागा काय चीज आहे....
अर्जुन >> खरं आहे....नाव काय या जागेच??
सावी >> मला काही आयडिया नाही...नाव आटा आठवेना...इकडे माझे बाबा आम्हाला घेऊन यायचे....मला आणि पिंकी ला लहानपणा पासून निसर्ग हिरवी झाडे याचा भारी वेड.... सहसा इकडेच यायचो....
अर्जुन >> अच्छा!! चला मग...सुरु करूया तुमची छोटी ट्रीट...
सावी >> नक्कीच...चला या इकडे....
हे आहे इकडचं फेमस हॉटेल...सर इकडची पाव भाजी काय सुरेख मिलते...अप्रतिम... चालेल ना?
अर्जुन >> हो चालेल की पाव भाजी...
सावी >> ओके..या बसा...
अअअ दादा....ऐका ना....दोन स्पेशल पाव भाजी...पाव गरम.... ओके...
अर्जुन >> तुम्ही इकडे सर्वांना ओळखता का
सावी >> आहेत तशा ओळखी...
बरं मग...गप्पा चालू ठेउयात आपल्या...
अर्जुन >> अअअअ तुम्ही मगाशी येताना कॉलेजच काही बोलत होतात ना?
सावी >> हो..मला तुम्हाला विचारायचं होतं की सर तुमची कुणी गर्लफ्रेंड होती का कधी? किंवा कुणावर प्रेम?
अर्जुन >> अअअ हा गर्लफ्रेंड होती....बारावी पासून....सेकेंड इयर पर्यंत... 🙂
सावी >> ब्रेकअप का झालं मग?
अर्जुन >> सहसा कोणाला माहिती नाही हे...माझ्या फ्रेंड्स ना वैगेरा...पण तुम्हाला सांगतोच...
मी बारावीत असताना तिला पाहिलं आणि प्रेम झालं....प्रेम होतं की आकर्षण की अजून काही? मला तर अंदाज नाही.....तेव्हा इतकं काही कळत नाही ना...तिचं नाव नाजुका होतं....
सावी >> काय नाजुका 😂😂😂
अर्जुन >> हो 😂यावर मी हीं आधी खूप हसायचो....अजूनही येत हसायला...😂
वेटर >> सर मॅम ऑर्डर.....
सावी >> थँक्यू दादा....
बरं चला आता खात खात सांगा...
अर्जुन >> हूं... तर नाजुका ला मी पाहिलं आणि मला प्रेम झालं....तिला मी प्रपोज हीं केला तिने होकार दिला....मलाच नव्हतं कळत की इतक्या सोप्या पद्धतीने कशी काय हो म्हणाली.....पण म्हणाली ती 😂
मग काय....आमचं लपून भेटणं, बोलण सुरु झालं....
सेकेंड इयर चे लास्ट सेमिस्टर जस्ट संपले टेन्शन फ्री होऊन आलो.....तेव्हाच नाजुका दुसऱ्या एका मुलांसोबत नको ते चाळे करत होती....
तस त्या मुलाला मी आधी हीं पाहिलं होतं, त्यांच्यासोबत हीं सिगरेट पीत होती....मी तिला तेव्हाच समजवल रोखलं....ऐकण्याच तिने बहुतेक नाटक केलं.....
सावी >> मग 🤨
अर्जुन >> पुन्हा त्यांच्यासोबत ती रंगे हात मला सापडली.....मग काय भांडण तंटा....आणि मग ब्रेकअप....तेव्हा कुठे प्रेम कळत होतं आणि नेमक असं झालं.....त्रास झाला बराच....पण मी सावरलो....सेकेंड इयर ला चांगले टक्के मिळाले..
मग जोमाने कामाला लागलो....तेव्हापासून कुणा मुलीवर नजर नाही की सबंध नाही....
सावी >> अच्छा असं होय...बरच झालं तीच खरं रूप तुमच्या समोर लवकर आलं ते...उशिराने आलं असता तर जास्त त्रास झाला असता....
अर्जुन >> खरं आहे...बरं मग तुमचा कुणी? बॉयफ्रेंड?
सावी >> नाही सर...खरच नाही....बाबांनी कधी हे सगळं शिकवलं नाही.....आणि परिस्थिती मुळे फक्त अभ्यासाकडे लक्ष दिल मी....प्रपोज तर खूप यायचे...... पण मी नाकारले...आता मात्र ज्याच्यावर प्रेम करेन, विश्वास असेल अशाच माणसाशी लग्न करणार....
अर्जुन >> बरं झालं आधी नकार दिले होतेत तुम्ही ते....
सावी >> Hahahahahaa😂
अर्जुन >> नाही म्हणजे, त्रास होतो ना म्हणून बोललो... 😂
सावी >> हो हो..😂
अर्जुन >> खरच पेडणेकर...मी असच बोलो 😂
सावी >> समजलं हो मला...आणि अर्जुन सर तुम्ही मला पेडणेकर असं आडनावाने नका बोलवू....सावी म्हणा...
अर्जुन >> चालेल...सावी...
सावी >> हा...😂
अर्जुन >> बोला मग.... बाकी पावभाजी एक नंबर हा...
सावी >> हो ना बघा म्हंटल होतं ना मी....बरं आ आ अर्जुन सर...मला सांगा ना तुमच्या वडिलांच्या बद्दल आणखी काही....
अर्जुन >> म्हणजे??
सावी >> अहो म्हणजे, काहीतरी सांगा तुमच्या आणि परिवाराबद्दल...म्हणजे तुमची हरकत नसेल तर..
अर्जुन >> हो नक्कीच...विचारा ना....
सावी >> तुमच्या आई आणि वडिलांच लव्ह मॅरेज की अरेंज?
अर्जुन >> अअअ त्यांचं लव्ह अरेंज दोन्ही..असं म्हणायला हवं.... 😂
सावी >> ते कस...
अर्जुन >> माझे बाबा ग्रेट फौजी अविनाश कुलकर्णी जेव्हा आर्मी मध्ये भरती झालेले....त्यांनी लग्न करायच नाही असं ठरवलं होतं....कारण त्यांना वाटायचं आज न उद्या काही झालंच तर माझ्या मागे का कुणी एकटं राहावं.....तो तळतळाटचं कशाला....
सावी >> अय्या मग???? 🥺
अर्जुन >> मग माझे बाबा जेव्हा सुट्टया साठी गावी आलेले....तेव्हाच त्यांना गावागावात बोलवलं जायचं सत्कार करायला.....कारण माझ्या बाबांनी तेव्हा मोठ्या युद्धात लढा दिला होता......असेच एकदा ते आईच्या गावी गेले......त्यांच्या आई वडिलांसोबत......म्हणजे आज्जी आजोबा सोबत....
सावी >> मग?? 😃
अर्जुन >> माझ्या बाबांनी त्या सत्कारात एका मुलीला पाहिलं.......जी एका मोठ्या थाली मध्ये हार घेऊन स्टेजवर उभी होती......दोन वेण्या बांधलेली.....गोरी गोरी.....टपोरे डोळे असणारी....मग काय माझ्या बाबांची विकेट तिकडेच गेली......ती मुलगी माझी आई..... 😂
सावी >> ओह किती गोड!! ❤️ मग पुढे??
अर्जुन >> माझे बाबा स्टेजवर आले....सत्कारात त्यांनी एक हीं नजर दुसरीकडे नाही वळवली पूर्ण वेळ नजर आईवर होती......माझ्या आईला ते कळलं असावं....म्हणून जस हार मंत्र्यांनी घेतला तस तिने स्टेज वरून पळ काढली....नंतर माझ्या आज्जी आजोबानी बऱ्याच मुली दाखवल्या......माझ्या बाबांनी नेहमी नकार दिला.....माझे बाबा रोज आईला एक नजर बघता यावं म्हणून नदी काठी, कधी मंदिरात, कधी आईच्या कॉलेजत जायचे....लांबूनच पाहून खुश व्हायचे...
सावी >> किती गोड ❤️ असा मुलगा हवा...🥰🥹मग पुढे सांगा??
अर्जुन >> माझ्या आईची एकदा कॉलेजात असणाऱ्या मुलाने छेड काढली....माझ्या बाबांनी त्याला खूप मारलं आणि पोलिसांच्या हवाली केलं....तेव्हा माझे बाबा आईच्या नजरेत आले....आई आणि बाबा एकमेकांवर प्रेम करत होते पण बोलत नव्हते.....आज्जी आजोबांना बाबांनी हिंम्मत करून सांगितलं......आणि मग आज्जी आजोबामुळे आई बाबा चं लग्न झालं.... 😂
सावी >> वाव!!❤️
खूप सुंदर क्षण असतील त्यांचे....खूप मिस करत असतील ना त्या बाबा ना. तुमच्या....
अर्जुन >> खूप करते....आम्ही पण करतो... आई बाबांच्या लग्नाच्या दोन महिन्यातच गेले युद्धावर....पाच सहा महिन्यांनी परत आले....माझा जन्म झाला तेव्हा हीं आलेले....बऱ्याच वर्षानी अप्पू झाला....पण अप्पूच्या वेळी नव्हते ते....त्यांना फक्त बातमी माहित होती....बाबा म्हणायचे की यावेळी त्यांना मुलगी हवी आहे....मुलगी झाली तर भारती नाव ठेवणार असं....पण अप्पू झाला....हीं बातमी त्यांना कळवली पत्रातून....त्यांनी उत्तरं हीं दिल....उत्तरात अपूर्व असं नाव ठेवा म्हणाले.....तेव्हा मी आठ - नऊ वर्षांचा होतो...अप्पू ला बघायला येणार होते.....पण एका युद्धात शत्रू सैन्यात सापडले आणि शत्रू सैन्यानी खूप हाल करून त्याला मारलं....पण शेवटच्या क्षणी सुद्धा जी माहिती हवी होती ती देऊनच ते...... 🥺
(रडत म्हणाला....)
सावी >> अर्जुन सर....सावरा स्वतः ला...🥺
(हातात हात घेऊन....)
अर्जुन >> ह्म्म्म, खूप आठवण येते बाबांची..मला थोडं तरी प्रेम मिळालं पण अप्पू ने तर पाहिलं हीं नाही त्यांना....आणि नाही त्यांनी पाहिलं अप्पू ला...
सावी >> किती कठीण आयुष्य आहे ना सैनिकांच.....बापरे म्हणजे आपण मरणार हीं भावना सगळ्यांनाच असते, त्याची भीती हीं असते पण सैनिकांना माहित असूनही ते मागे नाही हटत.....आणि खरच मला ऐकूनच एवढा अभिमान वाटतोय तुमच्या वडिलांचा आणि आईंचा....खरच.....आईनी सुद्धा ते प्रेम अजून जपलंय....कस आहे आपला प्रियकर गेला म्हणून जीव देणाऱ्या / देणारे खूप प्रेमी युगलं पहिले....पण जीव देण मार्ग नसतो.....तर जिवंत राहून प्रेम सिद्ध करणं जपण खूप कठीण असते आणि महत्वाचे हीं.....Proud on Your Father!! 🥺
(अर्जुनाच्या हातावर हात ठेवत म्हणाली...)
.
.
.
रात्री अर्जुन ने सावी ला घरी सोडल.....
त्याचा मूड अजूनही खराब होता...बऱ्याच वेळानंतर तो एवढा रडला होता.....म्हणून त्याचे डोळे हीं लाल पडले होते आणि थोडे सुजले होते....
सावी ला मनात अर्जुनची खूप काळजी वाटली....
सावी >> थँक्यू सर...ड्रॉप केल्या बद्दल..
अर्जुन >> हो तुमचे पण आभार मानतो मी आजचा दिवस खरच चांगला होता ते हीं तुमच्यामुळे...
सावी >> ओके...मग फ्रेंडज?
(हात पुढे करत..)
अर्जुन >> Sure!! Why Not.....
(हात मिळवताना...)
सावी >> हूं मग या फ्रेंडज काही तरी ऐकाल का?
अर्जुन >> बोला ना सावी..
सावी >> सांगते...दोन मिनिट थांबाल फक्त...मी आलेच.....
अर्जुन >> ओके...
सावी पळत घरी गेली.....
अर्जुन गाणी ऐकत कार मध्ये बसून तिची वाट पाहू लागला.....
काही मिनिटातच सावी आली....तिच्या हातात रोझ वॉटर ची बॉटल होती...आणि छोटीशी आइस बॅग होती....
सावी ने दरवाजा खोलला आणि कार मध्ये बसलली....
सावी >> हे घ्या....
अर्जुन >> सावी, रोझ वॉटर.आइस बॅग का?
सावी >> डोळे बघा लाल आणि सुजलेत...हे गुलाब पाणी जरासं डोळ्या खाली लावते म्हणजे जळजळ होते ती कमी होईल.....आणि आइस बॅग ने जरासं शेकवा थोडी सूज कमी होईल असं मला वाटतं...
अर्जुन >> याची गरज नाही सावी....
सावी >> शुईईईईई शांत बसा आता..मला करू दे...जरा डोळे बंद करा....
सावी अर्जुनाच्या जवळ जाते.....आइस बॅग हळूच डोळ्या खाली लावते......अर्जुन ला डोळे बंद करायला सांगते आणि डोळ्यावर हळूच ठेवते...
अर्जुन डोळे बंद करूनही सावी ला फील करू शकत होता...
तिच्या पर्फ्यूम चा स्मेल त्याला वेड लावत होता....
मग सावी त्याच्या डोळ्या खाली जरासं गुलाब पाणी लावते.....
अर्जुन एकटक सावीकडेच बघत राहतो,तिच्या डोळ्यातली माया, काळजी....
तिचे ते ओठ....बस्स तिथेच तो थांबला....तो हरवला......!!!
सावी >> झालंssss 😃
(ती जरा ओरडतच म्हणाली....)
अर्जुन >> माझं हीं......(तुम्हाला बघून👀🌝...मनात म्हणाला...)
सावी >> आता तुम्हाला त्रास नाही होणार....
अर्जुन >> मला होतोय....
सावी >> आता कळलय ना तुम्हाला मग हेच करा जेव्हा त्रास होईल...
अर्जुन >> हो कळलं आहे...... 👀
सावी >> काय बोलताय सर..चला आता सावकाश घरी जा....
अर्जुन >> अअअ हो हो...
बाय!!!
.
.
.
.
भागीरथी >> आला का ग अर्जुन?
संगीता >> नाही हो आई..आज कुठे राहिला कुणास ठाऊक...
भाऊसाहेब >> येईल ग बायांनो... जरा हा फोटो बघा....मला हीं मुलगी चांगली वाटतेय...
भागीरथी >> हो छान आहे पण नाक जरा छोटंसं आहे वेगळंच वाटतय.... नको नको....
हीं पहा कशी वाटते.....?
(फोटो दाखवत.....)
भाऊसाहेब >> आहे चांगलीच पोर....पण जराशी चकणी पाहतेय असं वाटतय....नको नको हीं...
अपूर्व >> आई हीं बग कशी वाटते?
संगीता >> ईईईईईई काय अप्पू एवढे छोटे कपडे घालणारी मुलगी सून म्हणून आणू का आम्ही....
अपूर्व >> अरे मग...असुदे ना हॉट आहे हीं...
भागीरथी >> एsss
अपूर्व >> नाही म्हणजे मस्त आहे....
संगीता >>> कोणत्याही मुलीचा फोटो नको दाखवूस.....
अपूर्व >> यात काय आई....
भागीरथी >> तुम्ही पण माझ्या निवडीच्या मुलीमध्ये काही ना काही अवगुण काढ.....
भाऊसाहेब >> तू पण तर काढतेस....
इकडे या चौघांची भांडण चालू होती.....
तेवढ्यात, अर्जुन आला....
अर्जुनला पाहताच सगळे शांत बसले.....
अर्जुन मात्र हरवल्या हरवल्या सारखा होता.....
संगीता >> आलास का बाळा?
भागीरथी >> काय रे काय झालं...? असं शांत का? आणि हा एकटाच का हसतोय 🤨
अपूर्व >> एक मिनिट.
हा गुलाब पाणीच स्मेल का येतोय दादा कडून....
(त्याच्या जवळ जाऊन )
संगीता >> पार्लर मध्ये जाऊन आला असेल तुमच्या त्या मेन्स चा....
अपूर्व >> आई ग तिकडे काय रोझ वॉटर वापरतात का?
भाऊसाहेब >> रोझ वॉटर शक्यतो मुली वापरतात आणि तेव्हाच लावतात जेव्हा जळजळ होते....
याला नेमक झालंय काय?
संगीता >> बाबा डोळा लाल दिसतोय...
ए अर्जुना काय झालं डोळ्याला?
अर्जुन >> प्रेम.....!!😍
(हळूच बोलताना )
भाऊसाहेब >> काय झालं तुला अर्जुन?
अर्जुन >> प्रेम..... ❤️
भागीरथी >> काय बोलतोय हा?
अर्जुन >> प्रेम? 💝
अर्जुन अजूनही सावीच्या विचारात हरवला होता.....
त्याच्या मनात गाणं वाजत होतं.....
सावीचा चेहरा नजरे समोर येत होता.......
इश्क जैसे हैं एक आंधी...!!
इश्क हैं एक तुफान..!!
इश्क के आगे बेबस हैं...
दुनिया मै हर इलजा...!!
इश्क मै सब कुछ मुश्किल हैं, इश्क मै सब आसान..
देखो प्यारे...
ये नजरे...
हैं इश्क मै कैसे गुम....
हाय!!!
अर्जुन सरळ त्याच्या खोलीत गेला........सगळे इकडे विचार करत बसले होते......की अर्जुनला काय झालं......
.
.
.
.
सावी आणि अर्जुन मध्ये नकळतच चांगली मैत्री झाली होती.....एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करन सुरु झालं होतं......सावी अर्जुनला बाहेरच्या छोट्या गोष्टी खाऊ घालायची.......अर्जुन आणि सावीच्या जवळीक मुळे अर्जुन अजूनच नकळत तिच्यात गुंतत होता......!!
सावी - कलेक्शन पूर्णपणे होतं आहे हा सर...ते दादा खूप छान काम करतात कलेक्शनचं....
अर्जुन - अच्छा चांगल आहे की मग....सगळे कलीग्स असेच स्पोर्ट करत असले तर नक्कीच आपल्या बँकेला प्रॉफिट होईल....टार्गेट्स पूर्ण होतील...
सावी - बरं सावी, आता आपल्या बँकेच्या शाखेचा पहिला वहिला कॉल सेंटर आपण चालू करतोय...सांगितल्याप्रमाणे हायरिंग चालू केली का....आधी तर टीम लीडरस, क्वालिटी वैगेरा...बघा इंटरव्हिव्ह मीच घेईन फायनल राउंड पण फस्ट तुमच्याकडे आहे..... सर्वात उत्तम, कामसू आणि चांगले माणसं बघा......उगाच कॉल सेंटर आहे म्हणून मुलांच्या मनात भीती नको यायला...
सावी - हो हो नक्कीच सर...
अर्जुन - बरं मग आज काही खायच की नाही.... 😂
सावी - ह्म्म्म आज आपण...अप्पम खाऊयात का इकडचं फेमस?
अर्जुन - हे काय असते...
सावी - आपल्याकडे कस घावणे, आंबोली असते, तसाच साऊथ मधील हा प्रकार आहे...सकाळी खायचा खरतर, पण हरकत नाही आता हीं पाचं वाजलेत आपण खाऊ शकतो..... चटणी काय सुरेख असते त्यांची आहं!
अर्जुन - चला चला मग....
सावी - होय 😂
अर्जुन - तुमच्यामुळे ना सावी माझा कामाचा भार खरच उतरलाय बरं का.... तुम्ही ना असिस्टंट मॅनेजर व्हायला हवंय...
सावी - सर काहीही हं!
अर्जुन - माझी मैत्रीण आहात म्हणून उगाच नाही कौतुक करत मी... तुम्ही हुशार आहात, कामसू आहात म्हणून... आपल्याकडे रिकवायर्मेंट आली की तुमच नाव देणार मी तर....
सावी - काय सर तुम्ही.... 😂
अर्जुन - अम्म्म वाह वा! सावी काय भारी आहे हा अप्पम.... चटणी तर बापरे, कमालचं
सावी - माहिती होतं मला तुम्हाला आवडेल.
अअअ सर ते, तुमच्या चेहऱ्यावर...
अर्जुन - आ कुठे. इकडे.? गेलं का?
{चेहऱ्यावर हात लावताना..}
सावी - अअअ नाही अहो आता जास्त लागलं. थांबा मी....
सावी तिच्या रुमाल ने अर्जुनाच्या चेहऱ्यावर लागलेली चटणी साफ करते.....
अर्जुन तिच्याकडे एकटक बघत होता...
.
.
.
.
(सावी अर्जुनाच्या या नात्याला नजर लागेल का?)
.
.
.
.
(दोन महिन्यानंतर)
(कॉलेज मध्ये.....)
साची पळतच आली.......सगळीकडे अपूर्व ला शोधू लागली......अपूर्व कॅन्टीन मध्ये बसला होता....
अपूर्वने साची ला पाहताच आवाज दिला.....
साची घाबरतच आली आणि येऊन खुर्चीवर बसली....
अपूर्व - पिंकी काय झालं ग? एवढा घाम का आलाय...पळत का आलीस?
साची - अप्पू अँप्पू....त तू त म मक....
(घाबरतच म्हणाली.....)
अपूर्व - अग घाबरलेस का? शांत हो आधी तू....शुईईईई..... पाणी घे....
साची - हूं..
अपूर्व - काय झालंय साची...?
साची - अप्पू अप्पू 😭 खूप मोठी ग गडबड झाले...माझे पिरियड्स मिस झालेत.....
अपूर्व - अच्छा अग येतील की, त्यात काय घाबरायचं....एवढं रिऍक्ट करतेस तू......😂किती लोड घेशील.....पागल.... 😂
साची - अप्पू i think I'm Pregnant 😭
अपूर्व - अअअअ क काय? अग हे काय बोलतेस पिंकी..
साची - हो दीड महिना झाला....सेफ साईड म्हणून मी. काल रात्री,आज सकाळी आणि आता चेक केलं..... पॉजिटीव्ह आलंय 🥺
अपूर्व - क क कस शक्य आहे...मी तुला गोळी दिली होती... तू खाल्ली हीं होतीस.....मग??
साची - हो...तरीही कस घडलं नाही माहिती मला..😭अप्पू....😭
अपूर्व - शुईईई शांत हो साची....
साची - आता मी काय करू? एका मुलींसाठी हीं खूप लाजिरवाणी गोष्ट आहे...बाबा आणि ताईचं काय....ताई मला सोडणार नाही 🥺सगळ्या समोर इज्जत जाईल..
अपूर्व - शुई शांत हो मी तुला सोडून नाही जाणार आहे...कधीच नाही... मी आहे ना...
साची - खरं? 🥺
अपूर्व - हो मग...
चल आपण डॉकटर कडे जाऊयात...
**********************
डॉकटर - हे बघा मुलांनो, अशी चूक तुमच्याकडून होऊच कशी शकते..अशा गोष्टी करताच का तुम्ही...
अपूर्व - डॉक्टर माफ करा.. यावर आता काय तरी मार्ग काढा..
डॉक्टर - साची खरच प्रेग्नेंट आहे.....आता तुम्हाला एकच गोष्ट करता येईल... अबोर्शन... पण हे कायद्याने गुन्हा आहे.. आणि हे माझ्याकडून नाही होणार..
साची - मॅडम प्लिज असं नका करू.. हे करताना आम्हाला पण चांगल नाही वाटतं आहे... पण आमच्याकडून चूक झाले आणि आमचं करियर सुद्धा थांबेल.... आम्ही अजून स्वतःच्या पायावर उभे नाही आहोत.मुलं कस सांभाळनार....त्याला लेकराचे सुद्धा हाल होतील...
डॉक्टर - मग या गोष्टी करताना विचार करायचा..
साची - डॉक्टर प्लिज आमची मदत करा...खूप बदनामी होईल माझी...मला जीव देण्यापासून काहीही उपाय नाही उरणार हो.... 🥺
डॉक्टर - हे बघा असं काही करू नका.. म मी तयार आहे...
अपूर्व - थँक्यू डॉक्टर..
डॉक्टर - मी तारीख लिहून देते त्याला दिवशी या. आणि हो सात दिवस ऍडमिट व्हावं लागेल तुम्हाला... तर तयारीसह या... आणि या गोळ्या घेत रहा..
साची - ठीके..
अपूर्व - थँक्यू डॉक्टर!! येतो आम्ही...
.
.
.
(क्रमश )
अपूर्व आणि साची कडून झालेल्या चुकीचा वणवा पेटवेल का अर्जुन सावी च नातं?
कमेंट करून सांगा भाग kksa होता.
~Pratiksha Wagoskar ©