Love Fight Friendship in Marathi Short Stories by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | प्रेम भांडण मैत्री...

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

प्रेम भांडण मैत्री...

नेहमी हसत असणारी माया आज उदास होती . मला दिसत होत काहीतरी आहे जे ती लपविण्याचा प्रयत्न करत होती . मी तिच्याकडे गेल्या अर्धा तास एकटक पाहत होते तरी तिला त्याचा अंदाज ही नव्हता . थोड्या वेळात तिचे डोळे भरून आलेले दिसले . मला आता राहवेना, मी पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तितक्यात माया अनावर होऊन रडू लागली . जणू काही ती माझीच वाट पाहत होती . ती काही व्यक्त करण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि मी तिला काही विचारण्याच्या ... जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे ती मला मिठी मारून रडत होती आणि त्यामध्ये सुद्धा ती स्वतः सोबत च बोलत होती , मला थोड ऐकू येत होत पण ते स्पष्ट नव्हत. मी तिच्या पाठीवरून हात फिरवून समजावत होते .. शांत हो ..शांत हो , सगळ ठीक होईल अस समजावत होते पण ती नाही होणार असं बोलून अजून रडू लागली . खूप प्रयत्न करून मी माया ला शांत केलं , तिला पाणी दिलं. माया आता शांत झाली होती . मी सुद्धा तिला आणखी काही त्रास नको म्हणून तिला दुसऱ्या विषयामध्ये अडकवण्याचा विचार करत होते .  तितक्यात माया च समोरून म्हणाली , एक स्त्री एकटी राहू शकते का ?मी एकदम गोंधळून गेले, हिला काय उत्तर अपेक्षित आहे आणि नक्की माझ्या उत्तराने सगळ ठीक होणार आहे की सगळ बिघडणार आहे या विचाराने मी शांत झाले . मी तिचा प्रश्न टाळत, माया ..वीर कसा आहे ? तो खूप मस्ती करत असेल ना आता  ! अस बोलून मी नवीन विषयाला सुरुवात करत होते . ती म्हणाली , वीर मला सोडून राहू शकतो का ? तिने दुसरा प्रश्न माझ्या समोर ठेवला .. आता विषय बदलण्यात काही अर्थ नाही हे कळल होतं...मी पुढे बोलले, माया ...माया सगळ ठिक आहे ना ? तू .. वीर ... राजीव ?? सगळे ???माया कठोर स्वरमध्ये म्हणाली ...नाही ...नाही ..नाही.... काहीच ठीक नाही विधी ...काहीच ठीक नाही ... सगळ विस्कटल आहे ..कुणाची तरी नजर लागली आम्हाला ...हे ऐकताच , मी शांत झाले ...आणि अस्वस्थ सुद्धा !!माया , तू मला सगळ व्यवस्थित आणि शांत होऊन सांग , अजून काहीच नाही झालं , सगळ नीट होणार , तू अस हारून जाऊ नकोस ... मी तीला समजावत होते . माया ने दोन मिनिटे डोळे बंद केले आणि शांत बसली . मी तिला फक्त बघत होते . थोड्या वेळात माया स्वतःहून मला म्हणाली , मला काही कळत नाही , माझं खरचं काही चुकतंय का ग विधी ? सगळे मला चुकीचं समजतात की मीच चुकीची आहे ? तु मला खरं सांग , मला वाईट वाटेल असं विचार नको करू! मी म्हणाले , हे बघ माया , नक्की काय झालं आहे , ते मला आधी व्यवस्थित सांग, मी खरंच सांगेल पण मला आधी विषय जाणून घ्यायच आहे .आता माया एका जागी स्थिर झाली , पुढे तिची कथा मांडू लागली ... ( वीर म्हणजे मायाचा मुलगा जो आता 3 वर्षाचा आहे आणि राजीव म्हणजे माया चा नवरा . राजीव आणि माया ने प्रेमविवाह केला होता . काल लग्नाला चार वर्ष झाले होते आणि लग्नाचा वाढदिवस होता )मंद स्वरामधे माया म्हणाली , लग्नाचा वाढदिवस होता काल पण मी कस विसरले ? काहीच कळल नाही ग विधी ! हा ! थोड ऑफिस मध्ये कामाचं भार जास्त आहे . स्वतः ला वेळ नाही देता येत , कोणता दिवस , वार, तारीख काही कळत नाही ..सकाळी उठते , नेहमी सारखं आवरते, वीर आणि राजीव ला उठवते , त्यांच्या सर्व वस्तू त्यांच्या समोर मांडून ठेवते .. त्यानंतर मीना ( कामवाली )येते मग मी निघते . मला पूर्ण दिवस वीर आणि राजीव ला विचारपूस करण्यासाठी वेळ नाही मिळत... हा कधी कधी मी लवकर दुपारचं जेवण संपवून वीर साठी मीनाला फोन करते .राजीवला मी ऑफिस मधून निघल्या नंतर फोन करते ते पण माझ्या घाई मध्ये , पुरेसे बोलण होत नव्हतं कधी ! पण राजीव मला समजून घेतोय अस वाटायचं मला . घरी गेल्यानंतर वीर खूप कमीदा जागा असायचा , बऱ्याच दिवस तर झोपलेला असतो . मला खूप वाईट वाटत की मी त्याला वेळ देऊ शकत नाही एक आई म्हणून ...पण खूपदा मी स्वतः ला समजावत असते कि हे सर्व त्याच्यासाठीच तर करते . वीर जेंव्हा जेव्हा जागा असायचा , माझ्या सोबत खेळायचा , तो रोज रोज काहितरी नवीन शिकतोय हे बघून खूप छान वाटायचं . वीर ला लवकर झोपवून मी राजीव ला कसा वेळ देऊ याचा विचार करायची ! बऱ्याचदा तर मी खूप अस्वस्थ होते, रडते, खूप एकट वाटत ..राजीव काही ना काही कारणं सांगून उशिरापर्यंत बाहेर थांबतो , मी वाट बघत असते त्याची !  पण थकलेली असते ग मी पण !  काही वेळपर्यंत जागी राहते , कधी झोप लागते  , माझ मला कळत नाही ग आणि हा आल्यावर मला उठवत सुद्धा नाही . मला कधी कधी खूप बरं वाटत की हा मला समजून घेतो याचं , पण जेव्हा हे समजत हा , कामासाठी नाहीतर फक्त त्याला बाहेर राहण्यासाठी जास्त आवडत म्हणून बाहेर हा फिरतो , खूप वाईट वाटत मला .. मी खूप विचार करते ग, प्रत्येकाचा ! पण आज राजीव काल पासून जे वागतोय..त्याने मला धक्का बसला आहे .ज्याच्यावर विश्वास ठेवून मी आज नवनवीन स्वप्न पाहते, ज्याचा आधार माझ्यासाठी , माझ्या जगण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे , त्याला माझ्या पासून दूर व्हायचं आहे विधी ! पुन्हा हुंडके देऊन माया रडु लागली . हे सगळ ऐकताना मला सुद्धा भरून आलं होत , मी फक्त माया साठी शांत होती . माया च ऐकून तिला वाईट तर वाटत होतच पण तिला तिची दया जास्त येत होती .आता मी मायाला फक्तं आधार देत होती काही समजावत नव्हती . माया पुढे बोलू लागली, राजीव ला मी आता आवडत नाही , तो मला वेळ देण्यासाठी टाळतो , कधी अस वाटत हा फक्त वीर घरामध्ये आहे म्हणून घरामध्ये येतो . मला खूप गोष्टींची कल्पना आधीच येते , पण या वेळेस मी सगळ काही कळून न समजल्यासारख करत होते . राजीव ला माझ्या सोबत काही बोलायचं नसेल , त्याला काही वाटल नसेल , त्याने माझ्या बद्दल थोड ही विचार केलं नसेल का ? तो इतकं वैतागला होता की तो मला घटस्फोट घेऊया अस बोलला आणि निघून गेला . मला काहीच समजत नव्हत ! तो वैतागून गेला की माझी अवस्था पाहू शकत नाही म्हणून निघून गेला ? हा मला सोडून गेला तर मी कशी राहू ? आणि माझा वीर ... काय करू मी विधी ? मला वेड लागेल आत्ता ...विधी ने मायाच्या डोक्याला हात लावला आणि थोड मायाला डोकं शांत ठेव म्हणून समजावत होती .माया च डोकं थोड गरम झालं होत .तितक्यात वीर च्या रडण्याचा आवाज आला , माया वीर साठी तुला स्वतःला सावरायचं आहे हे लक्षात ठेव. वीर उठला आहे आता तुला जवळ घेऊन काही तरी खाण्यासाठी दे मग आपण नंतर बोलूया .. अस म्हणून विधी स्वयंपाक घरामध्ये गेली .मला खर तर मायाच वाईट वाटल होत पण राजीव सोबत आता बोलायचं अस विधी ने ठरवलं !तिला आता दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या होत्या . ती बेडरुम मध्ये गेली आणि माया ला म्हणाली , तुला हवं तितकं इथे रहा तुझ हक्काचं घर समजून आणि वीर ची मी मावशी आहे विसरू नकोस . मायाला आधार हवं होत , तिने ठरवलं होत किती काही झालं तर आई बाबा ना त्रास नाही द्यायचा . आता मी जे बोलली त्यावरून तिने आता माझ्याकडे राहायचं असं ठरवलं .थोड्या वेळात मी मायाला आराम कर तू पण अस सांगितले !  काही महत्वाचं काम आहे असं सांगून मी घराबाहेर पडले . खर तर ते महत्वाचं काम माया ला कळून नव्हत द्यायचं !मी राजीव ला भेटण्यासाठी निघाली होती . राजीव ला आपण, ' भेटूया का ' अस विचारून बघुया का ? राजीव नक्की कुठे आहे काही माहीत नाही ? असे विचार करत करत मी राजीव च्या ऑफिस मध्ये पोहचली. तिने रिसेप्शन ला चौकशी केली , ' राजीव आहे का ?' अशी ! तेव्हा मला समजल राजीव एक महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे . थोडा वेळ वाट बघूया अस बोलून मी थांबायचं ठरवलं ! माझी नजर पूर्ण ऑफिसभर फिरत होती . प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना न्याहाळत होती . संशयाने की उत्सुकतेने हे मला ही माहीत नव्हतं.काही वेळातच मला राजीव समोर दिसला . राजीव मी कोणताही विलंब न करता आवाज दिला ,' विधी तू इकडे ? ' मी गोंधळून गेली , या गोष्टीची मला कल्पना च नव्हती की राजीव ही आपल्याला काही विचारू शकतो . राजीव पुढे म्हणाला , विधी ये ना आतमध्ये बसु या ! मला काही सुचत नव्हतं... त्यामध्येच राजीव च्या मागे मागे गेली . त्याने खाण्यासाठी काही तरी मागवले. नंतर मला बोलतो , मॅडम, आता तरी सांगणार का ? इकडे कशा आलात ? आता मी थोड स्पष्ट बोलायचं आणि विचारायचं ठरवलं ! मी म्हणाली , ' काय करणार, माझ्या मैत्रिणीने आणि भावाने पराक्रम असे केलेत तर यावं लागलं , हे ऐकताच राजीव च्या चेहऱ्याचा रंग बदलला . तो म्हणाला या विषयावर आपण नको बोलायला ... ते सोडून काही असेल तर बोलूया . पण इतक्यात शांत राहणार ती विधी काय !मी इतका प्रवास करून हे ऐकण्यासाठी नाही आले , मला खर आणि सर्व स्पष्ट हवंय . तुझ खरचं माया वर प्रेम होत ? मी घाईघाईने विचारून बसले ! राजीव खुर्ची वरून उठला आणि म्हणाला , ' विधी ... होत म्हणजे ? मी अजून हि माया वर तितकंच प्रेम करतो . पण तिला कदाचित त्याची जाणीव नाही . तिला मी सोडून बाकी सर्व गोष्टी , व्यक्ती खूप महत्त्वाच्या वाटत आहेत . खूपदा अस ही वाटत हिला आपण हिच्या आयुष्यामध्ये नसलो तरी काही फरक नाही पडणार ...' तितक्यात मी त्याला थांबवलं आणि म्हणाली मग आज माझ्या घरी येऊन बघणार का कुणाला किती फरक पडतोय की नाही ते ? आणि कदाचित तू खुश आहेस, वीर आणि माया तुला सोडून गेले आहेत तर ! हे ऐकून वीर ला खुपचं जास्त वाईट वाटल , राजीव म्हणाला , मी जे अनुभवतोय ना ते कोणीच अनुभवयाला नको अस वाटत मला नेहमीच ! मी पुढे विचारू लागले ," म्हणजे नक्की काय चाललय दोघांचं ? दोघे एकमेकांनाशिवाय राहू शकत नाही मग हे का चाललय सर्व ?"राजीव म्हणाला , माझ्याकडे नाही याचं उत्तर , पण ती आता आधी सारखी नाही राहिली , ती माझं काही ऐकत नाही तिला हव ते हवं तस वागते . हा काही गोष्टी मध्ये माझं हट्ट असतो तिने माझं ऐकायला हवं पण तेव्हाच तिचा ही हट्ट असतो मी का ऐकू नेहमीच ? मला अस वाटत तिला माझ्याबद्दल प्रेम , आदर काही नाही उरल आहे ! तिला तिच्या मनासारखं राहूदे म्हणजे तिला माझा कोणताही त्रास नसेल ना ? हा राहिला प्रश्न वीर च ... तर मी त्याला कधी काहीच कमी पडू देणार नाही आणि माया साठी अस विचार ही केला तरी तिला त्याची गरज भासत नाही , तीच मनातलं ही मला कळत ! तिला वाटत हा माझा चांगला जॉब आहे मी सगळ तू करतोस ते करते मग मीच का तुझ ऐकायचं ? आणि मी सर्व गोष्टी माझ्या मी करू शकते ! ती लग्नाचा वाढदिवस ही विसरली ? मग जिथे गरज नाही तिथे मी का थांबू ?"मी हसून म्हणाली , लहान आहात का ? प्रेम म्हणजे गरज आहे का ? तिला गरज नाही हे तुला वाटत ते ही कशासाठी तर ती जॉब करते हवं ते वागते म्हणून ? लग्नाचा वाढदिवस विसरली ! का विसरली ती खूप मज्जा करते आणि त्या मध्ये तिच्या लक्षात नाही राहील अस का ? ती काय जॉब करते ? कुठे करते ? कस करते ? हे सगळ राजीव माहीत आहे का ? त्यात तिला स्वतःसाठी किती वेळ असतो , वीर साठी किती आणि मग तुझ्यासाठी किती असतो हे ही बघ ? तुला हे एकदम मनापासून वाटतंय का , की तिला तुझी गरज नाही ? तीच तुझ्यावर प्रेम नाही कोणताच आदर नाही ! याच उत्तर राजीव ने दिलं नाही . पुढे मी त्याला समजावू लागले , हे बघ राजीव, माया माझ्याकडे आल्यापासून फक्त आणि फक्त राजीव अस कस वागू शकतो ? त्याच माझ्यावर प्रेमं नाही राहील का ? मी इतकी वाईट आहे का ? वीर चे मम्मी पप्पा वेग वेगळे कसे राहणार आणि महत्वाचं राजीव मला समजून का नाही घेत हेच बडबडते , राजीव तीच डोकं खूप तापलं आहे , तिला वेड लागेल तुझ्या या घटस्फोट च्या मागणी ने !राजीव खूप शांत उभा होता ..त्याच्याकडे काहीच बोलण्यासारखं उरल नव्हत अस त्याच म्हणणं होत . मी त्याला म्हणाली चलं आता तू माझ्या घरी यायचं आहे . माया आणि तू माझ्या समोर बोलायचं आहे मला बघायच आहे नक्की कोणाला गरज नाही . राजीव च होकार नकार येण्याआधी च मी तिथून निघाली , आणि मागे वळून म्हणाली चल निघायचं आहे! राजीव ही माझ्या मागे निघाला .वीर आणि माया शांत झोपले होते , तितक्यात दरवाजा ठोकण्याचा आवाज आला . माया एकदम दचकून उठली . पुन्हा दरवाजा ठोकण्याचा आवाज आला. मायाला वाटल आता मीच आली असेल , म्हणून ती थोडी घाई मध्ये दरवाजाकडे गेली . दरवाजा उघडताच तिला समोर माझ्यासोबत राजीव ही दिसला . मायाला काय करावं सूचॆनास झाल . तिने फक्त दरवाजा उघडला आणि वीर कडे बघून निघून गेली . राजीव ला ही कसं , काय ते काही कळत नव्हतं !मी राजीव ला आतमध्ये ये आणि बसं शांत काही विचार नको करत बसु , अस बोलून त्याला पाणी दिलं. मी मायाकडे जाऊन येते अस म्हणून आत गेली . मी  मायाला आवाज देताच , माया चिडली आणि म्हणाली तू हे का केलंस विधी ? त्याची इच्छा नाही माझ्यासोबत राहायची तू का हे करतेस ? अस जबरदस्तीने नाती नाही टिकणार ? तितक्यात राजीव म्हणाला  ," जबरदस्ती कोणासाठी ? तुझ्यासाठी की माझ्यासाठी ? " माया चिडून म्हणाली , तुझ्यासाठी ! तुला मी नकोय ! तुला फक्त एकट राहायचं ! तुला मी नको कदाचित आणि वीर ही नको असेल ? हे ऐकताच राजीव भडकला आणि म्हणाला वीर ला मध्ये नाही घ्यायचं , नाहीतर बघं ! मी पुढे गेले आणि म्हणाले शांत रहा !  दोघे ही ! शांत रहा ! तितक्यात माया खूप रडु लागली . राजीव ला ही हे माहीत होत माया किती भावनिक आहे . विधी मायाला हात लावणार तितक्यात राजीव ने मायाच्या डोक्यावरून हात फिरवला! मायाने तो रागाने बाजूला केला . राजीव ने पुन्हा हात ठेवला तितक्यात माया उठली आणि राजीव ला मिठी मारून त्याला मारू लागली ,का अस करतोयस ? का अस वागतोयस ? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय कस सांगू तुला !  अस माया रडत रडत बोलत होती!  राजीव म्हणाला , शांत हो आधी मला नाही बोलायचं तुझ्यासोबत ! मी हे सगळ बघून हसत रडत ही होती याचं प्रेम आहे की काय हे कळत नव्हत मला .. माया म्हणाली , राजीव नको ना अस करू, मला तुझ्यासोबत च राहायचं  आहे ! का अस करतोयस ? राजीव म्हणाला तुला माझी गरज नाही , तुला वेळ नाही काही लक्षात नाही ! मी तुला त्रास देतो ना ! हवं तस वागून नाही देत ! मग आता हवं तस वाग... हवं ते कर !  मी कुठे असेल अडवायला ? हे ऐकून माया त्याच्या गाळावर किस करते आणि बोलते लव्ह यू ना ..तू का समजून नाही घेत .. राजीव सुद्धा तिच्या कपाळावर किस करून म्हणतो लव्ह यू टू बेबी .. मी दोघांना हि आनंदाने घट्ट मिठी करते आणि बोलते लव्ह यू बोथ ऑफ यू ... तितक्यात वीर उठतो ते ही रडत मग राजीव वीर ला उचलून घेतो आणि मायाला ही जवळ घेतो म्हणतो मला पण तुमच्याशिवाय कोण आहे ? तुम्हीच माझं सर्वस्व आहात ना .. मी म्हणाली हो ना !  आता असलं लहान मुलांसारख भांडण करत बसु नका आणि हे घटस्फोट वगैरे तर बिलकुल नाही ... माया आणि राजीव मला खूप खूप धन्यवाद बोलतात .. आणि नेहमीच अशी आमच्यासोबत रहा असं बोलतात आणि तिघे ही हसू लागतात ...