Niyati - 30 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 30

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

नियती - भाग 30







भाग 30



मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला....
"मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग मला... कारण दिवस कमी राहिले... मी आई-बाबांशी बोलून घेतो या विषयावर... तुही तुझ्या बाबांशी वगैरे बोलून घे..."





त्यावर तिने केवळ हुंकार दिला....
  त्या विषयासंबंधीत चर्चा करून झाल्यानंतर त्याच मार्गाने मोहित परतला...





आणि घरी पोहोचला तर.......
दुरून त्याला घराच्या अंगणात त्याचा मामा आणि मामी दिसली.   मामा आणि मामी खाटेवर बसून होते.
आई त्यांच्यासमोर पाटावर खाली बसून होती.. आणि बाबा दरवाजाजवळ एका स्टूलवर बसलेले पाहिले....




तो दूरूनच विचार करू लागला की काय झाले असेल...?? कारण त्याला त्याची आई पदराने अश्रू पुसतांना दिसली...
तो मंद पावले टाकू लागला....
तेवढ्यात त्याच्या बाबांना तो दिसला तसा त्यांनी कोणाचे लक्ष नसताना "सध्या तू इथून जा "असा इशारा केला.





तो बारकाईने बघू लागला ....खरंच ...बाबा आपल्याला इशारा करतायेत का....???
तर कवडू यांनी पुन्हा इशारा केला... तसा तो इशारा लक्षात येऊन मोहित पाठमोरा वळला.... आणि ओढ्याच्या दिशेने निघाला.......





वेळ संध्याकाळची होती... सूर्य शांत होऊ लागला होता.. तो आपला मस्त तांबूस रंग घेऊन क्षितिजा खाली सरकू लागला होता....





ओढ्याच्या काठावर दगडावर बसून तो तेथील संध्याकाळच्या रम्य वातावरणाचे निरीक्षण करू लागला.
सभोवतालचे वातावरण शांत असल्यामुळे ओढ्याचा खळखळ आवाज एखाद्या संगीताप्रमाणे भासत होता....

त्याची नजर गेली होती समोरच्या लांबच लांब टेकड्यांच्या माथ्यावर.... 






मोहितचे एक मन त्यावेळी चिडीने आणि क्रोधाने पेटून होते.. बाबारावांच्या....
डोंगर माथ्यावर जे शिव मंदिर आहे....??? तेथे अजून आम्हा लोकांसारख्यांना प्रवेश नाही.... आणि... निवडणुकीसाठी मी मूर्ख प्रचार करतोय त्यांचा...
आम्हा लोकांच्या आधारावरच तर निवडून येणार आहेत.
गावच्या उद्धारासाठी निवडणूक जिंकून येण्यासाठी बोलत आहेत... योजनाही तशा चांगल्याच आहेत....
पण मग....
आम्हाला असे वेगळे ठेवणे ...मंदिरापासून दूर ठेवणे....
हे... मोडीत काढले पाहिजे.....???
कारण गावाचा उद्धार जरी झाला... याच्यात आमचा उद्धार कुठे आहे....???? आमचा उद्धार म्हणजे गावाचा उद्धार नाही का...???
येथील गावकऱ्यांमध्ये जी दरी आहे ....ती दरी गावाच्या उद्धाराच्या ...... कक्षेत येतच नसावी काय...???





आपण कितीही शिकलो सवरलो तरी या भाबड्या देव भोळ्या लोकांच्या भावना दुखावू शकत नाही याची जाणीव त्याला झाली. फार मोठी भिंत उभी आहे असे भासू लागले त्याला ..... सध्या तरी ही भिंत फोडण्याचे सामर्थ्य.....  ही दरी मिटवण्याचे सामर्थ्य ...त्याच्यात नव्हते...
आपल्याला यासाठी वेळ द्यावा लागेल... पण काही काळानंतर मात्र ही भिंत नक्कीच तोडायची...ती ताकद आपण आणायची आहे याचा त्याने निर्धार केला....






विचारांच्या तंद्रीत कितीतरी वेळ तो तसाच बसून होता. काळाकुट्ट अंधार सर्वीकडे आता पसरला. आता तो उठला तेव्हा शरीर जड झाल्यासारखे वाटले..... धडपणे पाऊल टाकण्याची शक्तीच त्याच्यात उरली नव्हती. ठणकत असलेले डोके अधिकच चढले होते.





त्याने एक नजर समोरच्या टेकड्यांकडे टाकली... पण आता तिकडे अंधारामुळे काहीही दिसत नव्हते. आता तो घराच्या वाटेने निघाला........ पण जीव तहानेने व्याकुळ झाल्यासारखा वाटला... असाच परत फिरला... ओढ्याच्या दिशेने.... आणि जिथे स्वच्छ निर्मळ पाणी होते तेथे जनावरासारखे तोंड लावून तो पाणी भरपूर प्याला.
हातपाय तोंड धुतले. गार पाण्याने त्याला हायसे वाटले.
ताजातवाना झाला तो आता... 




भरभर पावले टाकत घराजवळ आला... आता घर.... शांत वाटत होते...
आत मध्ये आला तर पार्वती चुलीवर भात ठेवत होती.
त्याचे बाबा त्याला कुठेही  दिसले नाही...
तसा तो निवांतपणे चटई न टाकता गार फरशीवर पडला...
कित्येक दिवसाचा शिण कमी झाला असे त्याला वाटले. डोळे केव्हा हळूहळू बंद होऊ लागली ...त्याचेही त्याला भान उरले नाही...

.......





इकडे सायंकाळी मायरा..... आबासाहेब झोक्यावर शांतपणे बसून विचार करत झोके घेत होते... त्यांच्याकडे आली...

चाहूल लागताच बाबाराव यांनी मायराला पाहून स्वतःजवळ झोक्यावर जागा करून दिली.....





जवळपास पाच मिनिटे दोघेही आपापल्या विचारात बसून होते... तेवढ्यात शेरू... बाबाराव यांच्या शेजारी उभा राहून... भुंकू लागला....
तसे दोघेही तंद्रीतून बाहेर आले....




मायराला विचारायचे होते......
की मोहितच्या दिल्लीतल्या ऍडमिशनचे कुठपर्यंत काम झाले....???
पण तिच्या ओठातून शब्द फुटत नव्हते... बाबाराव तिच्या मनातली गोष्ट जाणत होते... पण ती बोलत नाही हे बघून तेच म्हणाले....
" दिल्लीत माझा माणूस पाठवलेला आहे...
त्याने चौकशी करून ऍडमिशन प्रोसेस सुरू केलेली आहे. चिंता करू नकोस.... मला यावेळी कोणताही घातपात करायचा नाही... माझ्या हाताने चांगलेच काम व्हावे असाच मी प्रयत्न करणार आहे.... तू तुझी तयारी ठेव कष्ट करण्याची आता.... घरी एक पडली काडी उचलली नाहीस कधी.... एकाएकी तुझ्यावर कष्टाचा पहाड राहणार आहे... झेपेल का तुझ्याने  सर्व...???"





त्यांचं ते डिवचल्यागत बोलणं... मायराच्या जिव्हारी लागत होते....  तिने बाबाराव यांच्या चेहऱ्याकडे बघितले होते आता,.... ते बोलत असताना तर तिला ते कुत्सित हसताना दिसले....





त्यांचे बोलून झाले आणि ते मायराच्या प्रतिसादाचा विचार न करता उठून आतमध्ये घरात गेले.....




खरंतर मायराला याविषयी तर बोलायचं होतंच.. पण तिला धवलविषयी सुद्धा सांगायचं होतं.
पण तो विषय काढण्याचा तिला बाबाराव यांनी चान्सच दिला नव्हता.




लीला ह्या मायरासोबत बोलत नव्हत्या.... फक्त जेवढे विचारले तेवढेच उत्तर द्यायचा... जास्तीत जास्त त्यांनी मौनव्रत धारण केलेलं होतं...
अंगात उत्साह नसल्यासारख्या वागत होत्या... पण आताच थोड्यावेळापूर्वी त्यांना उद्या धवल येणार आहे
हे कळले तर उत्साहाने त्याच्या स्वागताची तयारी करू लागल्या....


........





इकडे रात्री नऊ-साडेनऊच्या दरम्यान कवडूने .... मोहित ला उठवले... कसाबसा मोहित उठला..... तर अजूनही त्याला अंग जड वाटत होते... बहुतेक ...एवढे दिवस आराम न करता.... अभ्यास आणि केलेला प्रचार हे कारण असावे असे वाटून गेले..... पार्वतीने आज छान त्याच्या आवडीचा... झिंग्यांचा रस्सा आणि भात केलेला....  मस्त पोट भरून जेवण करण्याची इच्छा घरात दरवळणाऱ्या सुगंधाने त्याला झाली.....




झिंग्यांचा घास खाता खाता हळूच त्याने... कवडू ला विचारले.....
"बाबा.... झिंगे आणायला कधी गेला होता तुम्ही....???"




कवडू....
"दुपारी गेलो होतो...."





पार्वती पण समोर बसून जेवत होती वाढता वाढता....
जास्त करून त्यांच्या घरी भातच बनवला जायचा.
त्याला आता मनातले बोलायचे होते आपल्या आई-वडिलां जवळ.... ऐन भरात जेवण चालू असल्यावर तो काही बोलला नाही.... आता सर्वांचे जेवण होत आले होते तर विषय काढायला काय हरकत नाही हा विचार करून तो आईकडे एक नजर टाकून बोलू लागला.





मोहित....
" बाबा.... आता निवडणुका होतील लगेच.... निवडणुका झाल्याबरोबर रिझल्ट दोन दिवसांनी लागेल... रामने मला सांगितले की तो उद्या दिल्लीला जाण्याचे रिझर्वेशन करणार आहे मायराचे आणि माझे.... मला असं वाटतं की... इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी चार लोक जमवून लग्न उरकून घ्यावे.... धामधुमीमध्ये होऊन जाईल सगळं सरळ सरळ.... की कोर्ट मॅरेज करावं असं तुम्हाला वाटतं."





कवडू बोलण्याच्या पहिले पार्वती बोलल्या....
"मोहित्या.... अरे ...असं कर ....इथं चार जणांसमोर लग्न करू आणि दिल्लीले गेल्यावर... जमत असेल तर कोर्ट मॅरेज करून टाक की...."

आता तिघांची जेवणं उरकली आणि हातं धुतले... आणि तसेच बसले....
मोहितला तर आपल्या आईवर विश्वासच होत नव्हता... की त्याची आई..... तिला जेवढे समजतं.... तेवढ्यावरून सुद्धा सपोर्ट करते आहे......

कवडू.....
"ये मोहित्या...  जसं योग्य वाटते तसं कर... आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी आहो... तू आमची चिंता करू नकोस... तू फक्त शिकून सवरून मोठा हो..... आता आम्ही तर तेवढा पैसा लावू शकत नाही... लग्न करा तुम्ही दोघेही... गुण्यागोविंदाने रहा बस.... आमच्या दोघांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे."

असे म्हणत कवडूंनी पार्वतीकडे पाहिले... तर पार्वतीनेही मान हलवून दुजोरा दिला... 




तसे मोहितला रडू आवरले नाही.... त्याला असं वाटत होते की खरं पाहता आता त्यांना त्याच्या आधाराची गरज आहे तर आपण आपलं भविष्य सुधारण्यासाठी त्यांना येथे एकटेच ठेवून चाललेलो आहे....
त्याला हीच चिंता सतावत होती की आपल्या पश्चात आपले आई-वडील येथे कसे राहतील...??? 
गावातलं वातावरण कसं राहील ....काही सांगता येत नव्हते......





त्याचं असं हळवेपण पाहून पार्वती उठून जवळ गेल्या...
हात धरून त्याला उभं केलं आणि खाटेवर बसवलं...





त्याच्या केसांमधून बोटाने कुरवाळंत म्हणाल्या....
"आमची चिंता सतावते ना.. बापू आमची चिंता करू नको. आतापर्यंत आम्ही राहिलोच की.... अजून तीन ते चार वर्षे काढावे लागतील ना आम्हाले.... एवढे तीन ते चार वर्षे आम्ही कसेबसे काढू.... त्यानंतर आम्हाला 
घेऊन जा दोघांना....."




तसं मोहितने त्यांच्या कुशीत चेहरा लपवत होकारार्थी मान हलवली....

पार्वती.... (त्याचा चेहरा आपल्यापासून दूर करून हनुवटी धरून पहात त्याच्याकडे गमतीने...)....
"का रे... माया भावाच्या पोरी मधी काय कमी होती सांग...??? एवढे वर्ष तेथे राहिलास पण कशी आवडली नाही रे.,..??...."






तसा त्याचा चेहरा खोट्या रागाने लाल झाला...
आणि पार्वतीला म्हणाला...
मोहित.....
"मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल...ते दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...
तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???
तीन वर्ष थांब फक्त... तुला मी मग.... बंगल्याची राणी आणि बाबांना बंगल्याचा राजा बनवेल."
असं म्हणून मोहितने पार्वतीच्या माथ्यावर ओठ ठेवले.




......

तिकडे कुलकर्णी बंगल्यासमोर...
रात्री साडेनऊच्या दरम्यान ..... कारचा करकचून ब्रेक दाबल्यामुळे जोराने आवाज झाला.,... आणि आरामशीर बसून असलेला वॉचमन दचकून उभा झाला ....
आणि.....





🌹🌹🌹🌹🌹