भाग 29
इकडे रूम मध्ये आल्यानंतर
मोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि दाराला कडी घातली.....
तसा मोहित दचकला आणि....
म्हणाला.....
"ए बाई.... हे काय करते आहेस तू. ??? ....दरवाजा उघड... बंद करू नकोस..."
मायरा दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून उभी राहिलेली त्याच्याकडे पाहत.....
तिच्या नजरे कडे बघूनच तो समजला होता की ती चिडलेली आहे.... त्यालाही त्याची चुकी लक्षात आली आता....भीतीने मनात त्याने आवंढा गिळून गप्प राहून तिच्याकडे पाहू लागला...
तिने रागाने दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याला म्हणाली...
"तू मला बाबांसमोर..... आपल्या लग्नासाठी नकार द्यावे असे वाटत आहे म्हणालास...!!"
मायराच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून....
मोहित....
"अगं ...तसं नाही म्हणायचं होतं मला.... मी.."
त्याची भीतीने बोबडी वळली होती...
ती एक एक पाऊल समोर येत होती तसा तो एक एक पाऊल मागे जात होता.
मायरा.....
"काय म्हणायचं होतं मग तूला..??...हां...बोल..."
मागे मागे चालत तो आता तिच्या बेडला टेकला...
तसे तिने त्याला छातीवर प्रेस करून मागे ढकलून टाकले.
तसा तो बेडवर उताणा पडला......
मऊसर बेडवर उताणा पडल्यावर... त्याला खूप खूप मस्त वाटले... आराम करताना स्वर्गसुख काय असते ती भावना त्या बेडवर त्याला प्रत्यक्षात समजली....
आजपर्यंत तो खाली किंवा खाटेवरंच झोपलेला होता...
जास्तीत जास्त तो खाली चटई अंथरून त्यावरंच झोपलेला ....
.....तोच काळ जास्तीत जास्त होता...
शिक्षण घेताना मामाकडेही तो... हक्काने पण कोणतीच गोष्ट मागू शकला नव्हता.... त्याला वारंवार वाटायचे की आपण तर यांच्याकडे शिक्षणासाठी आहोत... आपला कोणताही हक्क नाही..... येथे दोन टाईमचे जेवण आणि राहायला मिळते... तर त्याची परतफेड म्हणून तो रोज मामासोबत जे बाकीचे रोजीची माणसे काम करतात तेच तोही पूर्ण दिवसभराचे काम करून द्यायचा एका व्यक्तीचं.
दोन क्षण त्याने सुखाने डोळे मिटून घेतले.... तसाच पडून राहिला... तर त्याला आपल्या कमरेवर भार जाणवला. डोळे खोलून पाहताच नजरेसमोर त्याला मायरा दिसली.
ती त्याच्या कमरेवर जास्त भार न देता दोन्ही बाजूने पाय टाकून बसली होती...
मोहित.....
"ए बाई ......काय करते ?? .....ऊठ गं...."
असे म्हणत तो उठू पाहू लागला... तर तिने पुन्हा त्याच्या खांद्याला हात प्रेस करून त्याला तसेच पकडून धरले.
मायरा....
"तुला सांगते मोहित.... आता अजिबात माघार घ्यायची नाही तू... माघार घेतली ना तर बघ...हा.. मला आता सहन होणार नाही.."
ती दात खाऊन तर बोलत होती पण नेत्रांमध्येही पाणी भरून आले.
कधीही डोळ्यांमध्ये पाणी न भरू देणारी....
आज तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचे मन हेलावले....
तसे ती बोलता बोलता त्याने तिला कमरेत पकडून बेडवर पाडले....
आणि तिच्याकडे वळून तिच्या नेत्रांमधील अश्रू पुसले.
आणि हळूच तिला म्हणाला.....
" मायू... तू काही विचार करू नकोस.... मला तू हवी आहेस अशीच नेहमी जवळ... आणि मी माघारी घेणार नाही.. फक्त हे डावपेच.. जरा मला समजायला जड जातय थोडंसं."
मायरा....
"मोहित... मी परिश्रम करण्यासाठी तयार आहे.... तुला शिक्षणासाठी तर काही चिंता करण्याची गरज नाही... जे घर खर्चासाठी लागेल आणि आपल्या खर्चासाठी..... त्याच्यासाठी मी खूप खूप कष्ट करेन... माझी आहे रे तयारी सगळे करण्यासाठी.."
मोहित.....
"हम्म... माहित आहे मला... आणि शक्य तेवढी मीही तुला मदत करेल..."
असे म्हणून मोहित ने पुढे सरकून तिच्या माथ्यावर ओठ टेकवले....
दहा-पंधरा मिनिटे दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला आणि मोहित परत गेला.
.........
निवडणुकीची जिकडेतिकडे धामधूम सुरू झाली.
अजून पर्यंत सुंदरचा अता पता नव्हता.....
मोहितने आपला अभ्यास सांभाळून फावल्या वेळात त्यांच्या एरियामध्ये फिरून सगळीकडे बाबाराव यांच्या विषयी त्यांच्या मनात असलेल्या .....गावातला उद्धार कसा करणार आहेत त्या कार्याविषयी..... प्रचार केला...
सर्वांनाच तळमळीने आपल्या गावाचा लौकिक वाढवावा
....येथे विविध तर्हेच्या चांगल्या सुख सुविधा याव्या... यासाठी समजदार तसेच वजनदार व्यक्ती निवडून येणे कसे गरजेचे आहे हे सर्वांना त्याने पटवून दिले.
काळ पुढे पुढे चालला आहे... आपला गाव अजूनही अविकसित आहे.... त्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी गावविकासाच्या वाटा चालत राहाव्या लागेल.... आणि त्यासाठी आपल्याला बाबाराव यांना निवडून आणावं लागेल असे त्याने गावातल्या तरुण मंडळींना.... म्हाताऱ्या मंडळींना... सर्वोतपरिने पटवून दिले.... आणि गावातील सर्वांचा निव्वळ पाठिंबाच नव्हे तर सर्व परीने सगळे मदत करू लागले निवडणुकीसाठी...
आज पर्यंत इतक्या वेळ निवडणुक येत होत्या... पण गावकरी आणि येथील हे राजकारणी निवडणूक होऊ देत नव्हते. पण आता स्वतः बाबाराव याच्यात सहभाग घेत आहे म्हटल्यावर कोणीही विरोध केला नाही.
दुसऱ्या गटाचा जो लीडर नेमलेला होता गावातला तोच आता गायब होता... त्यामुळे विरोधात कोणीही उभे राहणारे नव्हते आता बाबाराव यांच्या....
सर्वांना आता कळून चुकले होते की बिनविरोध बाबाराव कुलकर्णी हेच एकमेव उभे आहेत निवडणुकीत आणि तेच एकमेव निवडून येणार आहेत....
दिवस जसे जसे पुढे जात होते.... सर्वांच्या मनात धाकधूक होती.......
मोहितच्या मनात....
बाबाराव काही डाव तर खेळत नाहीत....???
मायराच्या मनात....
निवडणुका जवळ येत आहेत... मग त्याचा रिझल्ट दोन दिवसांनीच लागेल...?? आपलं आयुष्य ही त्याच दिवशी सुरू होणार आहे... सगळं व्यवस्थित होऊ दे रे देवा....!!
कवडूच्या मनात....
पोराच्या मनात जे आहे ते झालं तरी पावलं.... सगळं सरळ सूद व्हावं.
बाबाराव यांच्या मनात....
मोहित म्हणण्यानुसार तर सर्व बरोबर करतोय.... माझी मायरा खरंच त्याच्यासाठी कष्ट करू शकेल काय.....???
तसे गावातल्या बऱ्याचशा लोकांनी मोहितला....
प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहा निवडणुकीस हे सुचवले...
मोहित ने हसत नकार देऊन त्या पदासाठी बाबाराव योग्य आहेत हे पटवून दिले...
मायराही राम सोबत गावातील काही भाग ज्या भागाकडे
बाबाराव आपली घोडेस्वारी करायचे.... त्या एरियात ती तेथे प्रचार करायला जायची.... गावातल्या त्या भागातले लोकही.... मायरा शहरातून शिकून आलेली असल्यामुळे तेथील स्त्रिया आणि तरुण मुली यांना तिच्याबद्दल उत्सुकता होती... त्या आवर्जून तिच्या प्रचार कार्यामध्ये मदत करत होत्या....
बाबाराव यांनी चार दोन सभापण घेतल्या. आणि त्यामध्ये त्यांनी गावाचा विकास कसा करायचा आहे त्याची प्लॅनिंग गावकऱ्यांसमोर मांडली.... लोकही त्यांचं ऐकून प्रभावित झाले..
या सर्व गोष्टी होत असताना मायरा आणि बाबाराव यांच्या कानावर ही सुद्धा गोष्ट आली होती की लोकांचा एक कल
मोहित हा प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीत उभा राहावा यासाठी आहे.... पण त्यांना हे ही कळले की त्याने नकार दिला... आणि बाबाराव कसे योग्य आहेत ते पटवून सांगितले....
मोहितनेही कधीच निवडणूक वगैरे या गोष्टीचा विचार केला नव्हता. त्याने तर आपल्या गावातला उद्धार हा आपण काहीतरी स्वतः बनल्यानंतर मग ...
कार्य करून दाखवायचं ठरवलं होतं गावासाठी.
निवडणुका आता काही दिवसांवर आली होती.. येथे वातावरण चांगलेच तयार झाले होते आणि संघर्षाची बीज कुठेही पेरली गेली नव्हती... सर्व काही सरळ सरळ होते.
निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक दिवस....
मायराने ..... अशीच एकांतात भेट झाली असता प्रचार करताना..... त्याला तिचा जो सिक्रेट रस्ता आहे वाड्यात प्रवेश करायचा कुणालाही माहीत न होता..... तो त्याला दाखवला.
त्या दिवशी तो तसाच त्या छूप्या रस्त्याने आल्यानंतर बेडरूम मध्ये बसला.... तरीही त्याचे चित्त थार्यावर नव्हतं....
मायराने विचारणा करताच म्हणाला.....
"काही नाही गं........ आई बाबाची चिंता सतावते....???
आपलं माहित झाल्यानंतर मामा पण येऊन बोलेल दोघांना.....???
कसे सांभाळतील ते सर्व प्रकरण...??? कधी कधी वाटतं आपण काही चूक तर नाही करत आहोत...???"
तो असा विचार करत बोलत होता.... तसेच मायराही विचार करत होती आणि म्हणाली....
"मोहित.... एकदांच बाबाचं... त्यांनी अटी समोर ठेवून तरी आपला रस्ता मोकळा केलाय....??? पण आईचं काहीच समजत नाही रे...??? तब्येतीमध्ये तिच्या सुधारणा होत नाही आहे... मी दिसली की तोंड फिरवते...
आणि आता या दोन दिवसांमध्ये... धवल पण येणार आहे...???"
तिचं ऐकल्यानंतर.... मोहितचा चेहरा गंभीर झाला...
मोहित....
"तुझ्या मामाचा मुलगा ना हा...!! मागे तू त्याच्याच गावाला गेलेली ना...!!"
मायरा....
"हम्म...."असे म्हणून मान वर खाली हलवली.
मोहित....
"त्याचं काय आहे आता इथे मध्येच...???
प्रचार तर आता जवळपास संपत आला आहे... केलाय की मी प्रचार ..तुझ्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे....
आता आणखी प्रचाराची काही गरज नाहीये...."
मायरा....
" अरे ते मागे... एका स्थळाकडून मागणी आली होती बोलले ना बाबा.... ते स्थळ म्हणजे धवलचे स्थळ होय...."
त्यावर मोहित वैतागून म्हणाला....
" हे आता मध्येच कशाला..??? पण आता सगळं सॉर्ट आऊट झालं ना...... मी बोलू का बाबांशी तुझ्या....???"
त्याच्या मनात आता धवल बद्दल असूया निर्माण झाली होती. जो तो आमच्या दोघांच्या मध्ये येत आहे... असे त्याला वाटू लागले होते.
मायरा.....
"तू कशाला चिंता करतोस....??? मी आहे...."
दोन क्षण विचार करून...
मायरा पुन्हा म्हणाली.....
"मोहित.... तुझ्या लक्षात येत आहे का...?? तुला अगोदर डेरिंग नव्हती... आत्मविश्वास तुझा कमी पडत होता... पण आता बघ..... आत्मविश्वासाने बोलतोस..... डेरिंगही करतोय......."
तिने असं म्हटल्यावर तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला...
त्यावर ती.....
"हो अरे.... बाबाराव कुलकर्णी सोबत गोष्ट करणे म्हणजे डेरिंगचंच काम आहे...."
आणि खरंच त्यालाही जाणवले..... की हे निवडणूक प्रचाराचे कार्य करताना त्याच्यामध्ये बरीचशी बोलण्याची डेरिंग आली आहे..
आत्मविश्वास दुणावला आहे.... स्वतःचे मुद्दे त्याला आता व्यवस्थित मांडता येतात बोलताना...... बोलताना तो अजिबात अडथळत नाही......
मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला....
"मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग मला... कारण दिवस कमी राहिले... मी आई-बाबांशी बोलून घेतो या विषयावर... तुही तुझ्या बाबांशी वगैरे बोलून घे..."
त्यावर तिने केवळ हुंकार दिला....
त्या विषयासंबंधीत चर्चा करून झाल्यानंतर त्याच मार्गाने मोहित परतला...
आणि घरी पोहोचला तर.......
🌹🌹🌹🌹🌹