Rahashy - 4 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | रहस्य - 4

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

रहस्य - 4

सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ पर्यंत गिरला पोचले, पोचत पोचत खूप उशीर झालं होतं म्हणून ते लोक जवळच्याच एका हॉटेल मध्ये थांबले....

सकाळ होताच हरी सोनूला घेऊन वनविभागाच्या ऑफिस मध्ये चॉकशी साठी गेला....

"काय झालं हरी काय कळलं का"...??? सोनू

"नाही यार, काय कळत नाहीये"..... हरी

"का काय झालं".... सोनू

"हे लोक तर बोलतायेत की गायत्री नावाची मुलगी कोणाचं इथं काम करत नाहीये, अशी कोण मुलगी मुंबई वरून इथं आलीच नाहीये"... हरी

"काय, हे कसं शक्य आहे.... तू नीट विचारलं ना".... सोनू

"अरे हो नीट विचारलं मी, पण नाहीच म्हणतायेत ते लोक".... हरी

"हरी आता काय करायचं"....सोनू

"काय माहित".... हरी

"चल बघूया पुढे काय न काय सुचेल.... तो पर्यंत फिरुया ये"... हरी

हरी सोनूला घेऊन फिरायला लागला वनात, वेगवेगळ्या पशु पक्षी, जनावरांना बघून सोनूला मज्जा वाटत होती, हरी प्रत्येक जाणवरांचे फोटो काडत होता, दोघ पण खूप आनंद घेत होते....

गिरवन गुजरातचा एक आरक्षित वन आहे प्राण्यांच्या,जे Asiatic Lions साठी खूप सुप्रसिद्ध आहे....

संध्याकाळ झाली दोघे हॉटेलला परत जात होते, तेव्हाच हरी मधीच थांबला...

"काय झालं, थांबलास का"....??? सोनू

"काय नाय चल, चालत रहा... आणि मी जे बोलतोय ते गपचूप ऐक आणि मागे फिरून बघून नकोस".... हरी

"हा... पण झालं काय"... सोनू

"सोनू मी सकाळपासून बघतोय, वनविभागात च्या ऑफिस मधून आलो तेव्हापासून हा माणूस आपला पाठलाग करतोय... नाय नाय..पाटी नको बघुस".... हरी

सोनू मागे वळतच होती तितक्यात हरीने तिला थांबवलं....

"पण हा आहे कोण".... सोनू

"अरे बाई मला काय माहीत.... पण हा नक्की आपलाच पाठलाग करतोय, वनात पण जेव्हा आपण फिरत होतो तेव्हा पण, हा आपल्या मागे मागे फिरत होता".... हरी

हरी सोनू ला जस तस घेऊन हॉटेल वर पोचला आणि त्याने सुखाचा स्वाश घेतला.... रूम मध्ये पोचताच हरी ने खिडकीतून लपून बघितलं तो माणूस हॉटेल च्या खालीच थांबला होता.....

"बघ सोनू तो अजून खालीच थांबला आहे".... हरी

"हो हरी... आता काय करायचं".... सोनू

"हा ना नक्की साहिलचा माणूस असेल, त्याने ह्याला सांगितलं असेल आपला पाठलाग करायला"..… हरी

"नाही हरी... हा साहिल चा माणूस नाहीये".... स्वरा

"ऐऐऐऐ.... काय बाई तू पण घाबरवते".... हरी अचानक स्वराला बघून घाबरला.....

"आधी सांग तू दिवसभर होतीस कुठे"... हरी

"तू स्वरा सोबत बोलतोय".... सोनू

"हो.... ही बघ दिवसभर नंतर हिला एक रात्रच भेटते मला घाबरवण्यासाठी".... हरी

"हरी मी दिवसभर तुझ्यासोबतच होती, जेव्हा तू वनविभागात गेला तेव्हा, तू वनात फिरत होता तेव्हाही"... स्वरा

"बघ स्वरा इथं काय तरी गडबड आहे, मी विचारलं ऑफिस मध्ये तुझी बहीण इथं आलीच नाहीये".... हरी

"नाही हरी माझी बहिण इथं आली होती मला माहित आहे आणि ती इतःच जंगलात कुठे तरी आहे".... स्वरा

"कसं शक्य आहे, मग हे वनविभाग वाले काय खोटं बोलतायेत का"....???

"हो हरी.... हे लोक खोटं बोलतायेत".... स्वरा

"हरी काय बडबड करतोय मला पण तर सांग की स्वरा काय बोलते".... सोनू मधीच हरी ला बोलताना अडवत म्हणाली

"अरे गप ग बाई आधी मला तर कळू ते"... हरी चिडून बोलला सोनूला, सोनू रागात हरि समोर पाहुलागली, म्हणून हरी ने सोनू कड दुर्लक्ष केलं...

"हां म्हणजे ते खोटं बोलतायेत का.. काय स्वरा"..... हरी

"हो हरी"... स्वरा

"पण त्यांना काय गरज पडली आहे खोटं बोलायची"... हरी

"तेच तर कळत नाहीये हरी"....स्वरा

"हरी हा माणूस जो तुमचा पाठलाग करतोय तो वांविभागातला आहे, तो साहिलचा माणूस नाहीये आणि आता प्रश्न हाच आहे की तो तुमचा पाठलाग का करतोय"....?? स्वरा

हरीला पण काय कळत नव्हतं की नेमकं काय करावं, तेच स्वराला पण आता काय सुचत नव्हतं.... रात्र तशीच निघून गेली, सकाळ झाली....

सकाळी जेव्हा हरी खाली गेला तर त्याने पाहिलं की तो माणूस तिथंच बसला होता, हरी ने त्या माणसावर जास्त लक्ष दिलं नाही आणि तो परत रूम मध्ये आला.....

रूम मध्ये आल्यानंतर हरी ने सोनूला सगळं सांगितलं...... आणि काही वेळा नंतर हरी च्या रूम मध्ये दोन लोक जबरदस्ती घुसले....

"कोण आहत तुम्ही लोक".... ??? सोनू

"चूप जरा पण चुचा केली ना तर डायरेक्ट तोंडातच गोळी घालेन"..... तो माणूस बंदूक दाखवात म्हणाला

हरी आणि सोनू बंदूक बघून घाबरून एका बाजूला झाले....

"देवा.. काय चालय हे, उठ सूट कोण पण आज काल बंदूक दाखवतोय मला"... हरी तोंडातच बोलला

"क्या रे ऐ तुम लोग इधर वो जो लड़की को ढूंढने आये हो, वो कौन लगती है तुम्हारी, काय को फालतू मैं उसके नामसे मच मच कर रहे हो.... देखो सीधा बोलता हूं, पहली गाड़ी पकड़ो और सीधा वट लो इधर से"..... तो मानुस

"अस कसं वटलो...... तुला माहीत नाही आमच्यासोबत कोण आहे".... हरी

"हा... मी बंदूक बघून घाबरणार नाही, मराठा आहे मराठा काय आंडू पांडू समजली का"..... सोनू थोडं पुढे येऊन बोलली

"सोनू.... बाळा थंड घे, मी तुझ्याबदल नाही स्वरा बदल बोलतोय"..... हरी

"हरी हे काय मी पण लाडू शकते"..... सोनू

"ऐ, ऐ....ऐ, काय काय चालय.... इधर क्या नाटक चल रहा है क्या".... तो माणूस ओरडून बोलला

"लगता है ये लोग ऐसे नही मानेंगे सर"..... तो दुसरा माणूस

"हम लोग ऐसे क्या वैसे भी नही मानेंगे, माझ्या नवऱ्याला पहचानता नही तुम"... सोनू

"ऐ.... काय मला काय फसवते.... तुला लढायचं तर लढ मी नाही".... हरी

"हरी तू घाबरतोय का.... विसरलास आपल्याकडे स्वरा आहे, टेन्शन घेऊ नको.... तू बोलवं स्वराला बोलवं".... सोनू

"हां.... घाबरतो का मी... ऐ स्वरा, थांबा आता दाखवतो तुम्हाला.... ऐ स्वरा"..... हरी जोरजोरात स्वराला हाक मारत होता

"ऐ सोनू..... ही येत का नाहीये".... हरी

"ये लॉग ऐसें नाही सुनेगे चल भाई लेके चल इनको"..... तो माणूस

हरी स्वरा स्वरा ओरडत होता, पण स्वरा आली नाही, ते दोन्ही माणसं हरी आणि सोनूला बंदूक च्या जोरावर खाली घेऊन गेले, खाली जाऊन त्यांनी हरीला आणि सोनूला एका गाडीत बसवलं आणि त्यांचा डोळ्यांना पट्टी आणि हाथ बांधून टाकले....

"आधीच बोललो होतो... नको यायला इथं, बघ आता हे आपल्या सोबत आंधरी कोशिंबीर खेळतील"..... हरी

"मला काय माहीत की स्वरा येणार नाही".... मी तर तिला चांगली समजत होती मला काय माहीत चेटकीण निघेल ती म्हणत सोनू रडायला लागली

"तुझ्या मुळे झाला आहे हे, जरा कमी बोलली असती तर काय गेलं असतं तुझं, पण नाही जिथं chance भेटला तिथं बडबड चालू".... हरी

"तू मला ओरडतोय, मी मम्मीला सांगेल बघ आता"..... सोनू

"ऐ देवा.…. इथं जीव रहाणार की नाही स्वतःचा ते माहीत नाही आणि हिला काय बोलू सोड"...... हरी

"ऐ चुप बेठो तुम लोग.... नही तो गोली मार दुंगा".... तो माणूस

हरी आणि सोनू शांत झाले, ते लोक हरी आणि सोनूला एका गुफामध्ये घेऊन आले आणि एका कोपऱ्यात त्यांना नेऊन बसवलं.... त्यांच्या बाजूला अजून एक मुलगी बसली होती तिच्या पण डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि हाथ पण रसिने बांधलेले होते.....

हरी आणि सोनू ची बडबड ऐकून ती बोलली....

"कोण आहत तुम्ही लोक आणि भांडताय का"...

"नवरा बायको".... हरी

"ते ठीक आहे पण भांडताय का"...

"ऐ हरी ही मराठी बोलते"... सोनू

"हा.... यार, आधी तू सांग तू कोण आहेस"..... हरी

"मी गायत्री आहे आणि तुम्ही लोक"....

"हरी गायत्री"..... सोनू

"हा सोनू गायत्री"..... हरी

हरी आणि सोनू हे ऐकून खुश झाले.....

"तुम्ही ओळखता का मला".... गायत्री

"हो तुलाच वाचवण्यासाठी तर आम्ही इथं आलो".... हरी

"खरच तुम्हाला ताई ने पाठवलं ना".... गायत्री

"हो असच समजून घे".... हरी

"ताई कुठे आहे"....??? गायत्री

" तुझी ताई"... हरी तिला संगणारच होता तितक्यात सोनू मधीच बोलली....

"हा ताई पण आहे तुझी येईल ती पण"..... सोनू

"तू खोटं का बोलतेस तिला".... हरी

"गप्प तू".... सोनू

"काय तुम्ही परत भांडण सुरू केला का".... गायत्री

"नाही... नाही, अअअ.... गायत्री इथून बाहेर निघायचा काही चान्स आहे का"... हरी

"नाही माहीत मलाच या लोकांनी १० दिवसापासून इथं बांधून ठेवलं आहे"..... गायत्री

"काय तरी रस्ता असेल ना पण निघायचा"... सोनू

"नाही माहीत".... गायत्री

"ठीक आहे, आता आम्ही आलोय ना आपण काय तरी रस्ता शोधून निघुया इथून"..... हरी

----------------------------------------------------- To Be Continued ---------------------------------------------------------------------