Rahashy - 3 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | रहस्य - 3

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

Categories
Share

रहस्य - 3

स्वरा सोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तो झोपायचं प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत नव्हती, इथं सोनू गार झोपेत होती....

"बघा इथं नवरा कुठे आहे काय करतोय, बाईला काहीच पडली नाहीये मस्त झोपली आहे"..... हरी

विचार करता करता हरी झोपी गेला, सकाळी अलार्म वाजला पण हरीला खूप झोप येत होती म्हणून त्याने अलार्म बंद केला आणि परत झोपला तेव्हाच....

"अहो जायचं नाहीये का... ऑफस ला".... सोनू

हरी ने काय उत्तर दिलं नाही, तो झोपून होता, सोनू आता आली...
"काय ऐकटाय की नाही"... म्हणत सोनू ने हरीच्या डोक्यावर हाथ ठेवला
अरे हरीचं डोकं खूप तापलं आहे, अंग पण गरम आहे, नको असुदेत झोपदेत... सोनू अस म्हणत हरी साठी चहा ठेवायला गेली, तिने हरीला उठवलं नाही, पण सोनू काय परत आली नाही...

दुपारचे १२ वाजले तेव्हा जाऊन हरीला जाग आली, हरी उठून सोनूला हाक मारत होता पण सोनू काय आली नाही, शेवटी हरी कंटाळून बाहेर आला, बाहेर येताच त्याने पाहिलं की सोनू समोर खुडचिवर बसली होती तिला रसिने बांधला होतं आणि तिच्या तोंडाला ही पट्टी बांधली होती....
सोनूच्या बाजूला २ माणसं हातात बंदूक घेऊन थांबले होते आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस दुसरीकडे मान करून थांबला होता....

हरी हे सगळं बघून टेन्शन मध्ये पडला, पण त्याला खात्री झाली की हे नेमकं साहिल चे लोक असतील, जस स्वरा ने सांगितलं ह्यांनी कॅमेरे मध्ये मला बघितलं असेल तिच्या सोबत बोलताना....

"हे सगळं काय आहे, कोण आहे तुम्ही लोक".... हरी
हरीचा आवाज ऐकताच तो माणूस मागे फिरला....

"साहिल.... हे काय आहे तुम्ही अस माझ्या बायकोला बांधून का ठेवलं आहे".... हरी

साहिल हरीच्या जवळ आला आणि त्याला मोबाईल मध्ये एक विडिओ दाखवली, विडिओ मध्ये हरी एकटाच बडबड करत होता, अस दिसत होतं.…

"बघ मी मुद्यावर येतो.... नक्षा कुठे आहे".... साहिल

सोनूला काहीच कळत नव्हतं की नेमकं हे सगळं काय चालय....

"नक्षा म्हणजे, कसला नक्षा".... हरी

"बघ मला सगळं माहीत आहे, गपचूप नक्षा देऊन टाक नाही तर तुझी बायको".... साहिल

हरी विचार करू लागला की काय करावं

"बघ तू खूप साधा माणूस आहे, ह्या सगळ्या भानगडीत नको पडूस, चल पटापट तो नक्षा मला देऊन टाक"..... साहिल

हरी ने सोनू कडे पाहिलं आणि मग बोलला... "ठीक आहे देतो मी देतो"...

हरी पटकन टेबल घेऊन माळ्यावर चडला आणि त्याने तो पत्र आणि नक्षा शोधून काढला, हरी मनातल्या मनात विचार करत होता की जर त्याने नक्षा साहिल ला देऊन टाकला तर स्वरा त्याच्या जीव घेईल पण तरी, हरी पटकन खाली उतरला आणि त्याने नक्षा साहिल च्या हातात दिला....

नक्षा पाहताच साहिल बोलला...

"अरे काय ही काय पद्धत आहे, कोणाच्या बायकोला अस बांधून ठेवता का.... सोडा तिला सोडा"…..

साहिल च्या लोकांनी लगेच सोनूला सोडलं, सोनू उठून पटकन हरीला येऊन चिपकली....

"सॉरी, बघ माझी तुझ्यासोबत काही दुश्मनी नाहीये पण जर हे तू पोलीस ला वगैरे सांगितलं तर मग..... ठीक आहे जातो मी"... साहिल

साहिल त्याच्या लोकांना घेऊन तिथून निघून गेला, हरी आणि सोनू ने सुखाचा स्वाश घेतला.... साहिल जसाच गेला सोनू हरी समोर रागाने बघायला लागली....

"सोनू काय झालं, अस अस का बघते".... हरी

"काय झालं, मला बांधून इथं डोक्यावर त्याने बंदूक ठेवली होती आणि विचारतोय काय झालं".... सोनू

"हा म्हणजे काय नाय ते ना मी"..... हरी, "आता हिला काय सांगू ".... हरी मनातल्या मनात बोलत होता....

"ते ती बंद कर..... नीट सांग कसला नक्षा होता"... सोनू

"आहहहह हा सांगतो ना ओरडते कश्याला"..... "देवा रात्री ती भूत आणि सकाळी ही, जाऊ कुठे मी"..... हरी

"आता हे बडबड करणं बंद कर आणि तोंड उघडून बोल काय तरी"... सोनू

हरी ने सोनू ला सुरवातीपासून सगळं सांगितलं, साहिल बदल त्या नक्षा बदल आणि स्वरा बदल.....

"देवा....! नेहमी तू काय तरी उपद्योग करतो हरी"..... सोनू

"मी काय केलं, काल तुला बोलत होतो आवाज येतो हसण्याचं, ऐकलं कुठे तू".... हरी

"ऐऐऐ.... आईईई".... हरी एकदमच ओरडला

स्वरा सोनू च्या मागे थांबली होती, अगदी रागात ती हरी ला पाहत होती, हरी स्वराला बघून एवढा घाबरला की त्याच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता....

"काय झालं आता, गेले ते लोक आता काय ओरडतोय तू"..... सोनू

हरी बोलण्याच्या प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून आवाज निघतच नव्हता....

"हरी काय झालं बोलना".... सोनू

"स्वआआआआ.... स्वरररररा स्वरा"..... हरी ची नुसतं बोबडी वळत होती भीती मुळे

"कुठे" ..... सोनू

"तुझ्यामागे".... हे ऐकताच सोनू पटकन येऊन हरीला चिपकली पण स्वरा फक्त हरी ला दिसत होती....

"ऐ बघ मी काही नाही केलं, हिने हिने दिला नक्षा... हिला घेऊन जा".... हरी

"हरी... काय बोलतोय तू, मी नाही मला तर काय माहीत पण नाही, मला तर तू दिसत पण नाहीस, हरी हरी ने दिला नक्षा".... सोनू पण अगदी घाबरली होती

"हरी मी तुला सांगितलं होतं, पण तू ऐकलं नाहीस.... आता काय माहीत तो माझ्या बहिणीसोबत काय करेल".... स्वरा

हरी हे ऐकून शांत झाला, तो काय बोलेन त्या आधीच स्वरा गायब झाली, स्वरा ने हरी ला काहीच केलं नाही....

स्वरा गेली म्हणून हरी ने सुखाचा स्वाश घेतला... सोनू आणि हरीच्या मनात भीती घुसली होती, वेळ निघून गेला रात्र झाली.....

हरी आणि सोनू झोपले होते, पण झोप मात्र दोघांनाही लागत नव्हती.... सोनू च्या मनात सारखा स्वरा आणि गायत्री चा विचार येत होता, तिला गायत्री ची काळजी वाटत होती, साहिल नेमकं गायत्री सोबत काय करेल तू कुठे असेल काशी असेल ह्या सगळ्या विचार मुळे तिला काय झोप लागत नव्हती.... तेव्हाच सोनू ऐकूम उठली आणि हरीला बोलली....

"हरी मला वाटाय की आपण स्वरा ची मदत केली पाहिजे"..... सोनू

हे ऐकताच हरी पटकन उठला आणि बोलला.... "सोनू तू ठीक आहेस ना, आज बघितलं ना त्यांचा कडे बंदूक होती, तो नक्षा काय आहे कुठल्या जागेचा आहे काय माहीत नाही, वरतून स्वरा भूत आहे भूत, आत्मा, चुड़ैल, डायन आहे, दिसते चांगली पण भूत आहे यार ती आणि तू बोलतेस की".... ???

"हरी ऐक ना".... सोनू

"काय ऐकू, एकदा ऐकलं तुझं दोन वर्षे झाले भोगवतोय"....हरी तोंडाततच बोलला

"काय, काय बोलास तू"....सोनू

"काय नाय, मी बोललो की जरी मदत करायचं म्हटलं तरी कसं करणार नक्षा तर तो घेऊन गेला"..... हरी

"हरी स्वरा तुला बोलली होती ना की तिची बहीण गुजरात ला गिरच्या जंगलात गेली होती, मग नक्षा पण तीतलाच असेल आपण गिरच्या त्या जंगलात जाऊया म्हणजे आपल्याला काय न काय सुरावा भेटेल तिथं".... सोनू

"सोनू ते जंगल आहे, तिथं वाघ असेल आणि तसेच अनेक जाणवणार मी नाही येत"... हरी

"अरे घाबरतो कश्याला वाघ असेल तर असुदे मी पण काय वाघा पेक्षा कमी आहे का".... सोनू

"नाही तू कमी कुठे तू तर जास्त आहेस वाघा पेक्षा"..... हरी परत तोंडाचा बोलला

"काय, काय... हरी हे तू सारखं काय तोंडातल्या तोंडात बोलत असतो".... सोनू

"काय नाय darling ते तुझी तारीफ करत असतो ना मी".... हरी

"हो राहूदे माहीत आहे किती तारीफ करतो".... सोनू

"अच्छा.... नशीब".. हरी

"मग हरी जायचं ना आपण".... सोनू

"हो जाऊया जाऊया पण आता झोप, रात्र झाली आहे"..... हरी

सकाळ होताच हरीने गिरनार ला जाण्यासाठी तिकीट बुक केली आणि रात्री हरी सोनू ला घेऊन पूर्ण तयारी सोबत गिरणारला जाण्यासाठी निघाला.... ते लोक रेल गाडीत बसले आणि गाडी चालू झाली

"हरी मी खूप खुश आहे खूप म्हणजे खूप".... सोनू

"ही तर अशी खुश होत आहे जसं काय honeymoon ला जातोय".... हरी मनातच बोलला, हरी उठला जागेवरून

"कुठे जातोय हरी"... सोनू

"बाथरूम ला जातोय सोनू.... जाऊ मी".... हरी

"नाही नंतर जा, आधी माझ्यासोबत बस बघना किती मस्त वाटतंय"... सोनू

"ठीक आहे मग झाला तर झाला होऊदेत इथंच करतो"... हरी

"काय"....??? सोनू

"तेच बाथरुम"... हरी

"शिईईई.... हरी काय पण काय जा बाथरूम ला जा"... सोनू ओरडून बोलली

"काय बाई आहे, आधी प्रेमाने बोललो तर ऐकला नाही आणि आता ओरडते".... हरी अस म्हणत बाथरूम ला गेला परत येताना त्याने पाहिलं की दारावर स्वरा उभी होती... आधी तर स्वरा ला बघून हरी दचकला पण मग हिम्मत करून बोलला...

"स्वरररररा कशी आहेस, जेवलीस का'... हरी, "भूत जेवतात का"...??? हरी मनातच बोलला

"हरी thank uhh so much जे तू करतोय माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी, खरच मी तुझी आभारी राहील त्यासाठी".... स्वरा

"ते तर आहे, काय आहे की लहानपणापासूनच मी म्हणजे असाच आहे लोकांची मदत वगैरे करत असतो".... हरी

"हरी ज्या मार्गावर तू निघाला आहेस ते दिसतंय तेवढ सोपं नाहीये"..... स्वरा

"घाबरवते कश्याला यार"... हरी

"मी तुला सावध करतेय हरी पण टेन्शन घेऊ नकोस मी नेहमी तुझ्यासोबत असणार"... स्वरा

"ठीक आहे, पण नक्की रहा... काय झालं तर वाचावं बाबा आधी"... हरी

"हो तू त्याची काळजी करू नकोस".... स्वरा

गाडी वेगाने चालत होती.... रात्रचा आरसा जणू एक वेगाचा चित्र बनवत होता, चंद्र कुठे वादळाच्या आत जाऊन लपला होता, सकाळ एक नवीन संदेश घेऊन येणार होती आणि हरी साठी रहस्य ची पहिली पायरी.....

----------------------------------------------------- To Be Continued ----------------------------------------------------------------------