Rahashy - 1 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | रहस्य - 1

Featured Books
Categories
Share

रहस्य - 1




स्वप्न बघितले नाही तर ते पूर्ण कशे होतील, पण स्वप्न बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते आहे झोप.....

आज परत ३:०० वाजून गेले पण हरी ला झोप नाही लागली, अस म्हणतात की माणूस प्रेमात पडला की त्याला झोप लागत नाही, किंवा तो काय विचार करत असेल तर त्याला झोप लागत नाही, पण हरीचं अस काही नव्हतं, हा त्याची बायको माहेरी गेली होती पण, त्याने तिला स्वतःच हट्ट करून पाठवलं होतं, त्याला कुठल्या वस्तू चा दुःख पण नाही मग नेमकं त्याला झोप का नाही लागत....

झोप न लागण्याच्या मागे एक कारण हे पण आहे की रात्री एक आधी आत्मा आपल्याला बघत असेल किंवा कोण तरी आपल्याला स्वप्नयात बघत असेल म्हणूनही झोप लागत नाही....

हरी च्या हेच्यात दोन्ही होतं, त्याची बायको माहेरी जाऊन पण त्याला झोपूडेत नव्हती कारण की ती हरीला तिच्या स्ववण्यात पाहत होती, तेच एक आत्मा पण हरीला दोन दिवसा पासून सारखं बघत होती रात्रीच्या वेळेत...

हरी बेडवरून उठला आणि बाल्कनी मध्ये गेला....

"भेंडी झोप का लागत नाही आहे यार".....

हरी ने सिगरेट पेटवली आणि सिगरेट पिता पिता तो बाल्कनी मध्ये थांबून खाली बघत होता, त्याच्या बाल्कनीतुन त्याने पाहिलं, रस्त्यावर एकही गाडी नाही पूर्ण सुम साम, असणार तरी कशी रात्रीचे ३ वाजून गेले होते, पण तेव्हाच समोरून एक गाडी आली आणि त्याच्या बिल्डिंग च्या इथं येऊन थांबली.....

काही क्षण नंतर गाडीचा दार उघडला पण गाडीत कोण बसलं नाही, नाही कोण उतरलं हरीला काय कळलं नाही, तो विचार करत होता तितक्यात गाडी चालू झाली आणि पुढे जाऊन गाडीचा accident झाला, गाडी रस्त्याच्या मध्ये असलेल्या divider ला लागून पलटली.......

हे बघून हरी ने पटकन सिगरेट फेकली आणि खाली गेला, पण खाली जाऊन बघितलं तर काहीच नव्हतं सगळं एक दम ठीक ठाक होतं, हे बघून हरी आश्चर्यचकित झाला, की आताच तर मी बघितलं होतं की गाडी पलटली....

हरी परत बिल्डिंग च्या आत आला आणि त्याने चोकीदार ला उठवलं....

"काका, ओ वॉचमन काका"..... चोकीदार झोपेतून उठला

"हा..... साहेब बोला की "

"आता इथं एक गाडी पलटली ना, तुम्ही आवाज नाही का ऐकला कुठे गेली ती गाडी".....

"गाडी कुठे काय, इथं तर काही नाहीये"..... वॉचमन ने उठून पाहिलं

"अच्छा तुम्ही ४०२ मध्ये रहायला आले तेच ना"....

"हो बरोबर, पण मी बघितलं गाडी पलटली, मी माझ्या डोळ्याने पाहिलं".....

पाहिलं असेल तुमच्या आधी पण इथं जो कोण रहायचा त्याच्या सोबत पण असच होत होतं, म्हणून तो घर सोडून गेला आणि आता तुम्ही आले, देवा तूच कर काय तरी, सर काही नाहीये जावा झोपा जाऊन".....

हरी ला हे ऐकून खूप विचित्र वाटलं पण हरी वॉचमन ला काही बोलला नाही आणि परत घरी आला....

बेडरूम मध्ये येताच त्याने पाहिलं की रूम मध्ये सगळं विस्कटलेलं, उशी खाली पडली होती, चादर पण बेड वरून कोणी खेचून काढायचं प्रयत्न केलं अशी दिसत होती.....

"हे कसं झालं".... हरी ने आधी सगळं नीट केलं, मग त्याने परत सिगरेट पेटवली आणि बोलला

"भेंडी काय प्रकार आहे हा, काय होतंय हे सगळं, हरी असं म्हणत परत बाल्कनी मध्ये गेला, तेव्हा त्याने पाहिलं की तीच गाडी बिल्डिंग च्या गॅट समोर थांबली होती".....

हे बघून हरीला भीती वाटायला लागली, त्याचे हाथ थर थरायला लागले, हरी ने पुढे काहीच विचार केला नाही आणि तो बेडवर जाऊन झोपला चादर ओढून, पण भीती मुळे त्याला झोप लागत नव्हती, हरी नुसता थर थरत होता भीती मूळे

तेव्हाच हरी ला एका मुलीचं हसण्याचा आवाज आला, हरी आवाज ऐकून घाबरला पण तरी हिम्मत करून उठला आणि बघण्यासाठी बाहेरच्या खोलीत आला...

हरी जसाच तिथं आलं, त्यांनी जे पाहिलं ते पाहताच त्याच्या अंगाला शहारे फुटले, भीती मुळे त्याची बोबळी वळत होती, त्याला बोलायला पण जमत नव्हतं.....

हरीच्या समोर एक मुलगी उभी होती, दिसायला अगदी सुंदर, कमरे पर्यंत येत होते तेवढे मोठे केस आणि चेहऱ्यावर साक्षात चंद्राचा तेज उजळून आला जणू, अगदी रूपाची सुंदरी अशी दिसत होती...

पण इतक्या रात्री ही पोरगी घरात कशी काय, हरी हेच विचार करत तिला हाक मारायला गेला तेव्हाच एकदम ती मुलगी बोलली....

"Sssshhhhh..... काय बोलू नको, नाय तर त्यांनी ऐकलं तर मला जावा लागेल".....

हे ऐकून हरी ची अजून टरकली, तसही त्याला काय बोलता येत नव्हतं, हरी चा घसा सुखला, घामाने पूर्ण शरीर भिजला, पण मग ती मुलगी हरीच्या जवळ आली आणि बोलली...

"घाबरतोय का....?? मी काय केलं का तुला"...???

"तू तू तू अहेसस कोणणण"..... बोलताना हरीची बोबळी वळत होती

"स्वरा, स्वरा नाव आहे माझं"....

"तू भूत आहेस, तू इथं काय करते, मला मारायला आली आहेस का"....

"हो, तुला मारायला आली आहे"...... असं बोलून स्वरा जोरात हसायला लागली

आणि हरी ची बेकार फाटली हरी पटकन बेडरूम मध्ये पळाला आणि दार बंद करून बेडवर जाऊन चादर घेऊन झोपला....

पण हळूच हरीची चादर खेचली गेली, हरी झटकन उठला, बघतोय तर स्वरा समोर थांबली होती....

"किती घाबरतो तू, जरा शांत हो".... स्वरा

"अरे काय बापाचा राज आहे का शांत हो, हे असं कोणाचाही घरी येता तुम्ही भूत लोकं, अशी थोडी सिस्टम ठेवा ना, एकतर मी घरी एकटा आहे बायको पण नाही माझी, देवा मी का पाठवलं सोनू ला माहेरी, ऐ सोनू" ...... हरी अडकत अडकत जस तसं बोलत होता....

"बघ मला तुला घाबरवायचं नाहीये, बस माझं ऐकून घे जरा, तुझा आधी पण इथं एक मुलगा रहायला आला होता, मी त्याला पण सांगायच्या प्रयत्न केलं पण तो घाबरून घर सोडून गेला"....

"बरोबर केलं त्याने, मी पण जातो घर सोडून, माझी सोनू"..... हरी रडायला लागला

"हरी शांत हो घाबरू नकोस, बस ऐक माझं"..... स्वरा रागात बोलली

हरी एकदम शांत झाला.....

"हरी बघ माळ्यावर पाणीच्या टाकी खाली ना एक पत्र आहे आणि त्या पत्र सोबत एक नक्षा आहे".....

"मग मी काय करू ".....

" हरी तो नक्षा घे आणि गुजरात ला जा, गिरनार च्या जंगलात, जर त्या नक्षा च्या मार्गावर गेलास ना तर तुला शेवटी इतके पैसे भेटेल की तुझी सात पिढी बसून खाऊ शकेल".....

हरी ने हे ऐकताच विचार केला पण तो बोलला.... "मी का जाऊ जंगलात, मला काही झालं तर आणि कोणाला माहीत तिथं खरच पैसे अहेत की नाही".....

"हरी ऐक माझा विश्वास कर, मी खरं बोलते".....

"मग स्वता जाऊन घे ना तुला तर तिकीट पण काढावी नाही लागणार, गायब होऊन पटकन जा आणि पैसे घेऊन ये जा फुर फुर".... हरी अस म्हणत तिला हकलायला लागला

"जोक मारतोय तू, गपचूप ऐकतो की मी माझ्या रुपात येऊ"..... स्वरा थोडं चिडली हरी वर

"ऐ नको नको ना ताई.... ऐ सोनू कुठे अडकलो मी"..... हरी अगदी भीती मुळे रडत म्हणाला....

"हरी हे मस्करीत नको घेऊस खरच जा तो नक्षा घेऊन, मी आहे तुझासोबत, बस जा"......

"ठीक आहे ताई जातो मी पण सकाळी, आता कृपा करून जावा पाया पडतो"....

"सकाळी उठून तो नक्षा बघ हरी"…..

"हो ताई बघतो".....

स्वरा गायब झाली आणि हरीने सुखाचा स्वाश घेतला....

"परत तर नाही ना येत, भेंडी मी स्वप्न तर नाही ना बघत"..... हरी ने स्वतःला चिमटा काढला

"आई शपथ स्वप्न नाहीये, चायला दुखलं, नक्षा गेला खड्यात, सकाळ होताच सोनू कळे जातो"... हरी मनातच बोलला आणि चादर तानुन झोपला.......

------------------------------------------------------------- To Be Continued -------------------------------------------------------------