Kshama - 3 in Marathi Crime Stories by Harshad Molishree books and stories PDF | क्षमा - 3

Featured Books
Categories
Share

क्षमा - 3

"आई .... बाबा आणि तू का सारखं भांडण का करता.... तू नको ओरडूस ना बाबा वर, बाबा sorry बोलले ना तुला"..... बोलताना क्षमाची बोबडी वळत होती भीती मुळे

"ससाह्ह्ह्हह्ह क्षमा..... काय नाय बाळा तू लक्ष देऊ नकोस"..... विना क्षमाला समजवत बोलली

"मला बाबांन कडे जायचं आहे"..... क्षमा आग्रह ने बोलली विनाला

"नाही बिलकुल नाही.... बाबा बिबा काय नाही, मी बोलली ना तुला कि हे तुझे बाबा नाहीयेत, ना त्यांचा जवळ जायचं ना त्याच्या कुठल्या प्रश्नाचा उत्तर देयाचा.... समजलं"

"नाही ते माझे बाबा नाहीयेत, मला माझा बाबा कडे जायचं आहे"..... क्षमा रडत रडत बोलली

"क्षमा.... क्षमा एैक माझं मी तुला सांगितलं होतं ना हे सगळं एक दुस्वप्न आहे...... डोळे बंद कर तुला घाबरायची गरज नाहीये लवकरच बाबा येतील आणि आपल्याला घेऊन जातील या वाईट परिस्तिथी आणि या स्वप्न पासून लांब"......

विना असं म्हणत क्षमाच्या डोक्यावर हाथ फिरवत तिला झोपवायला लागली..... क्षमा ने घट डोळे झाकून घेतले आणि विना बेडरूम ची लाईट बंद करून बाहेर आली... तर बघते तर काय नमन समोरच थांबला होता......

"विना.... हे जे काय मी ऐकलं ते खरं आहे.... म्हणजे हे सगळं".....

विना ने तिकडून नजर लपवत जायचं प्रयत्न केला पण... नमन ने तिचा हाथ पकडून तिला थांबवलं..... विना ने लांब श्वास घेतलं. परस्तिती पासून पडून जाण्या ऐवजी या वेळीस विना ने ठरवलं कि नमन सोबत स्पष्ट बोलून घ्यावं.....

"बघ..... मी तुला जे काय आहे ते सगळं सांगते बस तू समजून घे, हे एक ना एक दिवस होणारच होतं शेवटी आपल्या नात्याची शूरवात तू खोट्या शब्दानं मध्ये मला फसवून केली होती"....

"त्या दिवशी जेव्हा मला पहिल्यांदा कळलं आणि आपलं भांडण झाला.... मी स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.... सावरायचा प्रयत्न केला पण मला नाही जमलं"

"मला वेळ हवा होता पण.... तू माझ्यासोबत थांबण्याचा ऐवजी मला अश्या परिस्थिती मध्ये एकटीला सोडून तुझा कामासाठी निघून गेला..... तू गेल्या नंतर मी खूप एकटी पडली, माझ्या मनातलं ऐकण्यासाठी किंवा समजण्यासाठी कोण नव्हतं.... बऱ्याचदा मी प्रयत्न केला आई सोबत बोलायचं पण नही जमलं मला".....

"हळू हळू माझ्या मनाची ताण वाढायला लागली... मी नैराश्य ग्रस्त होतं गेली.... विना रडायला लागली"....

नमन शांतपणे सगळं ऐकत होता...

"प्रत्येक वेळीस तू तुझा कामाला जास्त महत्व दिलं, पहिले मला वाटायचं कि ठीक आहे काम आहे तुझा पण ज्या वेळीस मला सगळ्यात जास्त गरज होती तुझी त्या वेळीस पण तू नव्हता माझा कडे"....

"जेव्हा मला काहीच रस्ता सुचला नही तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून मी एक मनुचिकित्सक कडे गेली"....

"विहान"....

हे ऐकताच नमन च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..... परंतु तो तरी स्तिर उभा रहायला

"मी माझ्या मनातलं सगळं विहानला सांगितलं त्याने सुरवातला मला काही औषधं दिली.... ज्या मुळे मला चांगली झोप यायला लागली. आम्ही असच ३ ते ४ वेळा.... भेटलो पण या ४ भेटी मध्ये तो माझ्या इतकं जवळ कधी आला... मला कळलंच नाही, माझ्या कडून चूक झाली क्षमा पोटी राहिली"......

"जेव्हा विहानला मी हे सांगितलं त्याने या नात्याला नकार दिला, तेव्हा मला कळलं की त्याच लग्न झालेलं आहे.... त्याला ३ वर्षची मुलगी आहे, जीवनात दुसरं इतकं मोठं दगा भेटल्या नंतर मी माझं आयुष संपवणार होती"........

"पण मला हे बाळ ठेवायचं होतं.... मी ठरवलं होतं की तुला सगळं खरं सांगून टाकेन, पण ६ महिन्या नंतर जेव्हा तू माझ्या समोर आला.... मी विचार केला की जर मी तुझा पासून लांब झाली तर माझ्या बाळाला बापाचा नाव बापाचं प्रेम नाही मिळणार"....

"म्हणून मी तुला खोटं बोलली की मी डॉक्टर्स च्या सलेने IVF ने मी हे".... विना ने लांब स्वाश घेतलं

"पण मी गरोदर आहे हे ऐकून तू सगळं विसरलास.... तू सगळं स्वीकारलं".

"बघता बघता वेळ निघून गेला.... क्षमा झाली क्षमा आल्या नंतर माझं आयुष पूर्ण पणे बदल मी खूप खुश होती.... पण अजूनही तू तसाच होता, तू मला आणि क्षमाला सोडून तुझा कामाचा मागे धावत बसला".....

"पण तरी मी सगळं विसरून नवण्याने शूरवात केली... पण जेव्हा क्षमा २ वर्षाची होती एक दिवस विहान आला.... एका अपघातात त्याची बायको आणि मुलगी, त्याने माझी माफी मागितली तो मला आणि क्षमाला स्वीकारायला तयार होता पण या वेळीस मी नकार दिला"......

"तो रोज यायचा क्षमा सोबत खेळायचं... त्याने खरं अर्थाने क्षमाला बापाचं प्रेम दिलं या मला संभाडलं.... मी विचार खूप वेळा विचार केला की तुला खरं सांगते पण नाही सांगू शकले"....

नमन विनाला अडवत मधीच बोलला

"ते.... Uncle, टीचर, क्षमाचा teddy मित्र.... क्षमा ने स्वप्न्यात असं बघितलं असेल ते सगळं स्वप्न नसून खरं होतं..... विहान" नमन बोलला.....

खाली माका टाकत विना हो बोलली.....

"मग तब्बल आठ वर्ष.... माझ्या मागे हे सगळं चालू होतं, क्षमा माझी मुलगी आहे मी त्याचा बाबा आहे...... विना का इतके वर्ष थांबली जायचं होता ना तेव्हाच, नसतं थांबवलं मी"....

"गेले असते मी.... पण क्षमा ने कधीच विहानला स्वीकारलं नाही.... काही वर्षा नंतर मी माझा राग विसरून त्याला स्वीकारलं, पण तीने नाही.... मी खूप वेळा घर सोडून जायचं प्रयत्न केलं पण ती सतत रडायची बाबा बाबा.... तुझा मुळे तुला तर तिची काहीच पडली नव्हती"....

"अरे पोरगी आहे ती माझी मूर्ख बाई.... पडली आहे मला तिची, कामावर सतत तुझा तिचा फोटो बघत बसायचो मी.... कधी घरी येतो हेच असायचा माझ्या मनात..... माझी चूक आहे चुकलं समजून मी तुला कुठल्याच गोष्टी साठी कधी नकार नाही दिलं..... का मेहनत करतोय मी का कमावतो तुझा साठी आपल्या चांगल्या आयुष्यासाठी"....

"पैशान पेक्षा वेळ महत्वचा असतो"..... विना मधीच ओरडून बोलली

"वेळ.... काय वेळ हवं होतं तुला.... त्या प्रकारणा नंतर एक दिवस एक दिवस आठवतं तुला की माझ्या सोबत बसली.... प्रेमाने बोली, नेहमी कामाचं तेवढं बोलीस तेच.... क्षमा समोर चांगलं रहाण्याचं नाटक केलंस तू".....

"मला वाटलं होता की सगळं सुरळीत चालला आहे पण नाही..... मधीच तू चांगली तर मधीच माझ्यासोबत भांडायची.... मला कळलंच नाही की तुला हवं काय आहे नेमकं.... माझ्या कडे घरी असताना २-३ महिन्यात क्षमा सोबत तुझं सोबत घडलेलं आठवणीच्या आधारे जगत होतो मी"....

"मला नेहमी वाटायचं की मी क्षमा पासून लांब रहातो म्हणून ती शांत असते..... काळजी वाटायची मला तिची.... पण तीच आज असं असण्याचं कारण तू आहेस..... तू आहेस स्वप्न स्वप्न करून तू हे सगळं तिच्या मनात टाकलस.... एक लक्षात ठेव काय झाला काय घडल मला नाही माहित पण क्षमा..... माझी मुलगी आहे ऐकलं क्षमा माझी मुलगी आहे"..... नमन अगदी रागात ओरडून बोलला.....

क्षमा हे सगळं तिच्या बेडरूम मध्ये दाराच्या मागून ऐकत होती.... आणि रडत होती, ती बेडवर गेली आणि डोळे पुसत बोलायला लागली.... "बाबा मला या स्वप्न्यातून बाहेर घेऊन जावा"....

**********

तो माणूस.... जेव्हा घरात क्षमाला शोधत होता सिडिंवर त्याला अजून एक मृतदेह दिसलं.... एका माणसाचं मृतदेह.... त्याच्या पाटीवर बरेच घाव होते..... जे की सुकून सडले होते देहाचा इतकं वास पसरलं होतं.... की त्या माणसाने तिथंच उलटी केली हे सगळं खूप भयावर होतं

ओकत ओकत तो.... जोर जोरात ओरडत होता.... क्षमाम्म्म्मम्मम क्षमा.....

To Be Continued.......