Kshama - 2 in Marathi Crime Stories by Harshad Molishree books and stories PDF | क्षमा - 2

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

क्षमा - 2

"खोल किती ती दरी
उतरल्या शिवाय कळणार नाही
प्रेम तसं माझं तुझासाठी
शब्दात तुला समजणार नाही"......

"तू ना तुझ्या अश्याच चिकण्या चुपड्या बोलण्यात मला फसवलंय"... विना

"लग्न करशील".....?????? नमन

विना एक दम शांत झाली..... एक क्षणा साठी ती नमनला बघतच बसली.

"तू sure आहेस ना..... तू खरंच लग्नासाठी विचारतोय मला"...... विना च्या चेहऱ्यावर आनंदा सोबत प्रश्नाचे भाव उभारले होते.

"हो मी sure आहे..... अगदी sure"..... नमन अगदी आनंदी होऊन बोलला

"हो हो हो".... विना ने हो म्हणत नमनला मिठी घेतलं.....

********

विना आणि नमन खूप खुश होते, नमन च्या मागे फुडें कोण नव्हतं लहान असतानाच त्याचे आई बाबा एका दुर्घटना मध्ये वैकुंठ वाशी झाले..... विनाच्या आईला नमन आणि विना बदल आधी पासून माहित होतं आणि ह्यात त्यांची परवानगी घेऊन लवकरच दोघांनी कोर्ट marriage करून घेतलं, सगळं चांगलं चालू होतं.

नमन merchant navy मध्ये होता त्यामुळे तो तब्बल ६ महिने कामावर तर २ ते ३ महिने घरी असायचा.... ह्या मुळे विना खूप एकटी पडली लग्न होऊन २ महिन्या नंतरच नमन ६ म्हनिया साठी गेला.....

मधी मधी तो कामातून वेळ काडून फोन करायचा.....

नमन जेव्हा ६ महिन्या नंतर परत आला... तेव्हा विना आणि नमन ने baby plan करायचं ठरवलं.... दोघे ही खूप खुश होते, त्यांचा जीवनाची एक नवीन शूरवात होणार होती, पण खूप प्रयत्न केल्या नंतर एक दिवस.....

******

विना आणि नमन डॉक्टर समोर बसले होते आणि डॉक्टर ने दोघांची रिपोर्ट्स त्यांना नीट समजवून सांगितलं

विना चे सगळे रिपोर्ट्स चांगले होते तेच डॉक्टर म्हणाले कि..... नमन चे रिपोर्टस

"तुम्हाला एक genetic disorder आहे ज्यामुळे तुम्हाला मुलं नही होऊ शकत"..... डॉक्टर

हे ऐकून विनाला मोठा धक्का बसला, ती हे सहन नही करू शकली आणि काही न बोलताच ती तिकडून उठून निघून गेली......

नमन ही डॉक्टर ला sorry म्हणत..... विनाच्या मागे आला......

विना गाडीत येऊन बसली, खूप प्रयत्न करून सुद्धा ती स्वतःला नही सावरू शकली आणि रडायला लागली.....

तेव्हाच नमन आला, त्याने गाडीचा दार उघडला आणि विनाला जवळ घेतलं तिला सावरलं शांत केलं.....

"नाही असं कसं शक्य आहे.... विज्ञान येवडा विकसित झाला आहे काय तरी असेल आपण डॉक्टर शी बोलूया.... मी ऐकलं serogacy mother, IVF खूप काय असतं".....

विनाची अशी हालत बघून नमन फार दुःखी होता तेच तो पश्चात्ताप च्या अग्नी मध्ये जळत होता.... शेवटी तो अचानक बेधडक होऊन विनाला बोलला

"मला.... माहीत होतं हे"..... नमन हे बोलून एका क्षणा साठी शांत झाला

"हो मला माहित होता, पण मला वाटला नंतर काही तरी करता येईल, मला भीती होती कि तू मला सोडून जाशील म्हणून"...... हे बोलताना नमन अगदी मान खाली वाकून बोलत होता

विना हे ऐकून गाडीतून उतरून बाहेर निघून गेली..... नमन तिच्या मागे आला पण ती थोडं पूढे चालून एक रिक्षा मध्ये बसून निघून गेली.....

नमन कंटाळून घरी आला..... विना घरीच होती....

"विना कुठे निघून गेली होतीस तू.... तू ठीक आहेस ना किती फोन केले तुझा आईकडे पण जाऊन आलो.... मला किती काळजी वाटत होती तुझी".....

विना एक दम शांत उभी होती

नमन थोडा शांत झाला त्याने दीर्घ स्वाश घेतलं आणि बोलला.... "मला माहित आहे तुला वाईट वाटला पण, खरंच sorry.... माफ कर मला".

"नही..... मी नाही माफ करणार तुला..... तूला माहित असून सुद्धा तू माझ्या भावनांसोबत खेळलास, खेळ केलंस तू माझ्या प्रेमाचा"..... विना अगदी रडत बोलली

"विनी असं नाहीये अग ऐक तर माझं"..... नमन विनाच्या जवळ जातं होता पण विना ने लगेच त्याचा हाथ झटकला....

"लांब रहा मला हाथ नाही लावायचं लांब रहा"...... म्हणत विना बेडरूम मध्ये निघून गेली......

बघता बघता नमन च्या सुट्टी चे २ महिने निघून गेले..... ह्या दोन महिन्यात विना आणि नमनच नात्यात खूप उतार चढाव आले.... विना हे गोस्ट accept करायला अजिबात तयार नव्हती कि नमनला माहित असून सुद्धा, नमन ने तिला तिला सांगितलं नही तिला दगा दिला ती त्याचा सोबत सतत भांडायला लागली..... गेले २ महिन्या मध्ये एक दिवस असा नाही गेला कि विना नमन सोबत भांडली नही सतत टोमणे राग चिडचिड टोमणा..... तेच नमन ने खूप प्रयत्न केलं माफी मांगितली रडला तिच्या समोर पण विनाचा राग शांत नाही झाला......

आज नमन ६ महिन्यासाठी बाहेर जात होता.... पण आजही विना नमन सोबत बोलली नाही ना ती बेडरूम च्या बाहेर आली....

नमन ने एका कागदावर लिहलं.....

"दुखतंय मन आतून जळतंय
कळतंय मला ही कारण मन माझं ही घुसमटतंय
पश्चात्ताप च्या अगणित हळ हळ जळतंय
कळतंय चुकलं माझं,मन आतून ले खचतंय"......

"विनंती आहे तुला, मी माझी चूक स्वीकार करतो जमलं तर मला माफ कर".......

येवढ लिहून नमन निघून गेला.....

To be continued...........