"शह्ह्हह्ह काही नाही क्षमा... अस विचार कर कि हे स्वप्न आहे, प्रत्येक सकाळ एक नवीन शूरवात
असते... घाबरू नकोस मी आहे तुझा सोबत"......
"हे जग एक सुंदर स्वप्न आहे, डोळे बंद करून आनंदाने जगायचं".......
"पण जर स्वप्न आवडलं नही तर"..... क्षमा ने तिच्या आईला अर्थात विनाला प्रश्न केला
"तर मग तो स्वप्न मोडून पुन्हा नव्याने स्वप्न बघायचं... आपलं नवीन जग त्यात घडवायचं"....
क्षमा.....
खिईईईईक च्या आवाजाने हळूच gate उघडून तो.... आत शिरला, घराच्या दारा जवळ येऊन त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि मग.... कोटच्या आतल्या खिशातून एक चावी काढली आणि दार उघडला....
घरात अगदी घाण वास पसरला होता.... घरातला सामान असत व्यस्त पडला होता, हळू हळू तो विनाच्या बेडरूम जवळ गेला.....
बेडरूमचा दार उघडाच होता आणि नेमकं वसाचा प्रमाण खूप वाढला. त्याने पॅंटीच्या खिश्यातून रुमाल काढला आणि नाकाला झाकला....
हळूच तो बेडरूम मध्ये शिरला.... त्याने समोर पहिला कि विना भिंतीला टेकून बसली आहे खाली मान टाकून, अगदीच भयावय द्रिष्य होता.... त्या माणसाचा कपाळाला घाम फुटला. तो वास नेमकं विना च्या मृत देहाचा होता.....
एक क्षण तो तसाच तिकडं थांबला पण दुसऱ्याच क्षणी त्याला क्षमा आठवली.... आणि तो रूम मधून लगेच बाहेर धडपडत आला..... क्षमाम्म्म्म्म्म्मआआआआआ...... तो ओरडला
*********
सहा महिन्या पूर्वी.....
नमन दोन महिन्या नन्तर आज घरी आला होता, नमन merchant navy मध्ये कामाला होता त्यामुळे तो अगदीच चार चार - पाच पाच महिने बाहेर असायचा. पण नेमकं या वेळीस तो विनाला आणि क्षमाला surprise देण्या करिता लवकर आला त्यांना ना कळवता.....
पण नेमकं तोच आश्चर्य चकित झाला जेव्हा त्याने बघितलं कि घर बंद आहे, त्याने त्याचा कॉट च्या आतल्या खिशात तुन चावी काढली आणि घरात शिरला....
"कुठे तरी बाहेर गेलेत दोघी वाटतं,येऊ दे चांगलाच suprise प्लॅन केलाय तू... नमन, दोघी बघ किती खुश होतील. नमन स्वतःशीच बोलत होता"........
तो आता त्याचा बेडरूम मध्ये गेला.... आणि तास भार वाट पहिला नंतर वैतागून तो अंघोळीला गेला, अंघोळ करून त्याने स्वतः साठी नास्ता बनवला आणि त्याने नास्ता केला, तेव्हाच त्याची नजर समोर घड्याळावर पडली.......
"साडे बारा झाले अजून नाही आले. क्षमाच्या शाळेला पण सुट्टी आहे, नेमकं गेले कुठे, आजी कळे तर नही ना"..... नमन खूप चिंतीत होता तेच खूप जास्त विचार करत होता.....
"अरे नको ना यार नको..... मी चांगला suprise प्लॅन केला आहे, काय करू कॉल करू का...... उम्म्म्म्म आईला फोन लावतो".
नमन ने शेवटी त्याचा सासूला फोन केला.... पण कोणी फोन उचलला नाही, नमन ने परत फोन केला, शेवटी चार वेळा त्याने थांबून थांबून फोन केला तेव्हा.... त्याचा सासूने कॉल उचचला...
"हॅलो.... आई मी नमन बोलतोय.... अअअअअअ ऐका विनीला सांगू नका मी फोन केला आहे suprise आहे त्यांचा साठी फक्त त्यांना लवकर घरी पाठवा".
"उम्म्म..... ते ठीक आहे पण बेटा, विना इथं नाही आली... मी फोन करून विचारू का तिला कुठे आहे असं".......
"नहीये तिथं".... नमन स्वतःशी बोलला
"हॅलो... हा काय नाय अअअअ तुम्ही राहूद्या मी बघतो. ठीक आहे आई काळजी घ्या".... म्हणत नमन ने फोन ठेवला.
नमन विचार करायला लागला... कि नेमकं गेले कुठे असतील पण मग त्याने विचार केला काय नही संध्याकाळ पर्यंत येतील...
नमन आता आतुरतेने वाट पाहू लागला..... पण दुपार ची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ ची रात्र.... पण विनाचा काय अता पता नही....
शेवटी कंटाळून नमन ने विनाला फोन केला पण तिचा फोन out of coverage दाखवत होता.... नमन सारखा कॉल करत होता पण फोन लागत नव्हता शेवटी १५ ते २० फोन लावल्या नंतर सुद्धा फोन जेव्हा connect नाही झाला तेव्हा थकून त्यांनी फोन एका बाजूला सोफ्यावर टाकून दिला.
नमन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तसही तो खूप दमला होता आणि त्याला आरामाची गरज होती....
"सकाळी फोनच्या आवाजा मुळे... नमनला जाग आली, बघितलं तर विनाचा फोन होता
हॅलो.... नमन, काय झाला एवढे फोन केलेस तू, सगळं ठीक ना.... अरे काय माहित या फोन ला काय झाला आहे range नव्हती अजिबात"........
नमन हळूच बोलला.... "कुठे आहेस"
"मी कुठे असणार.... घरी अजून कुठे काय नाय बसली आहे हॉल मध्ये"
हे ऐकून नमनला धक्का बसला, पण त्याने स्वतः ला सवारला... एक क्षणा साठी तो शांत झाला, मग बोलला.... "क्षमा कुठे आहे".....???
"अरे ती झोपली आहे बेडरूम मध्ये, मी उठवला नही तिला अजून"....
हे ऐकून नमन एक्दम शांत झाला..... त्याचा मनात अथांग प्रशांनाचा सागर उमटला होता, प्रचंड राग निर्माण झाला होता पण त्याने शांत रहाण्याचं ठरवलं....
नमन ने bye म्हणून फोन ठेवला आणि बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी शिमपळल... जेव्हा त्याने आरश्यात स्वतःला पहिला.... ओल्या चेहऱ्यावर वर डोळ्यातून निघणारे अश्रू स्पस्ट दिसत होते. पण त्याने स्वतःला सवारला.....
त्याच दिवशी संध्याकाळी .....
क्षमा ने दार उघडला आणि नमन समोरच बसला होता....... तेच मागून विना बोलली "नमन"
नमन ने हळूच मान वर केली आणि.... विना ला एक शांत नजरेने पाहिलं, मग क्षमाला bghitl. नमन ने क्षमाला जवळ येण्याचा इशारा केला..... क्षमा ने जसा पहिला पाऊल टाकला पूढे विना ने तिचा हाथ धरला आणि क्षमा तिथंच थांबली
नमन काहीच बोलला नही.... सोफ्यावर एक बाजूला ek फोटो पडला होता, त्याने तो हातात घेतला..... फोटो मध्ये विनाच्या मिठीत एक माणूस होता आणि फोटोच्या एका कॉर्नरला लिहलं होत..... The best moment of my life
नमनच्या तोंडातून ते शब्द ऐकताच विना सावध झाली, तिच्या कपाळा घाम फुटला, तिच्या हृदयाचे ठोके vadhle....
"नमन..... बघ मी तुला सगळं सांगते, मी तुला समजवू शकते पण आधी ऐक माझं".... विनाच्या शब्दानं मध्ये तिच्या मनातली भीत स्पष्ट दिसून येत hoti
"ऐकायला काहीच उरला नही आता"...... नमनचे डोळे पानावले , त्याचा कडे बोलायला काहीच नव्हतं ना त्याची काय इच्छा होती बोलायची.....
नमन आपल्या जागेवरून उठला..... त्याने क्षमाचा हाथ धरला आणि तिला जवळ घेऊन विचारलं,
"बेटा मला खरं सांग, बाबा ला सांगशील ना..... कुठे गेले होते तुम्ही".....??????
क्षमा काय बोलेल या आधीच विना.... "तिला नको विचारूस".....
नमन ने विना कड दुर्लक्ष केलं आणि क्षमा ला परत विचारलं..... "बाळा बाबाची शानी पोर आहेस ना तू सांग बाबाला"......
विना जोरात ओरडली.... "तिला नको विचारूस"......
विना ने क्षमा चा हाथ पकडून तिला स्वतःकडे ओडून घेतलं आणि ती तिला घेऊन तिच्या बेडरूम मध्ये जायला लागली, नमन ने मधीच तिला अडवलं आणि क्षमाचा हाथ पकडला.
"सोड माझ्या पोरीला, माझ्या मुलीला हाथ लावू नकोस"..... विना जोरात, अगदी रागात बोलली
क्षमा ह्या सगळ्यात ठसा ठसा रडत होती अन सारखं डोळे झाकात होती......
"तुला काय करायचं आहे कुठे जायचं आहे तिथं जा..... ज्याचा सोबत रहायचं आहे तिथं रहा पण मला आणि माझ्या पोरीला सोड"..... म्हणत नमन ने क्षमाला स्वतः कडे खेचला
विना ने पण अगदी रागात परत क्षमाला तिच्या कडे ओडून घेतलं, दोघे त्यांचा भांडणात आणि रागात पोरीची खेचताण करत होते
"का केलंस तू असं माझ्या सोबत काय कमी रहायली होती माझ्या प्रेमात"...... नमन रडत बोलला
पण विना ने पूर्ण पणे दुर्लक्ष केला नमनच एकही शब्द ना ऐकता.... विना क्षमाला घेऊन तिला तिच्या बेडरूम मध्ये सोडून आली....
"बोल काय ऐकायचं आहे तुला...... नाही म्हणजे बस्स झालं मी पण खूप सहन केलं, मान्य आहे मला, मी खूप खोटं बोलले तुला दगा दिला पण आता मी नाही भीत तुला ह्या जगाला..... हो माझा अफफैर चालू आहे बरं झाला तुला कळलं तसही मला नव्हतं रहायचं तुझासोबत हे नेहमीच नाटकं करून वैताग आला होता मला".....
नमन ने हे सगळं ऐकून रागात विनाला चापट मारली......
क्षमाच्या बेडरूमचा दार उघडाच होता क्षमा सगळं ऐकत होती.....
विना आणि नमन अगदीच जोर जोरात भांडायला लागले.....
क्षमा ने डोळे झाकले आणि मनातल्या मनात बोलायला लागली हे स्वप्न चांगला नाहीये बाबा उठवा मला..... बाबा बाबा.......
To be continued.........