Niyati - 23 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 23

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 23









भाग 23



आणि म्हणूनच ते मोहितला नाकारत होते आणि त्यांनी मनोमन हेही स्वीकारले होते की रक्त जरी त्याचे ब्राह्मणाचे असले तरी लहानपणापासून तो कवडू साठेचा मुलगा म्हणून ओळखले जात होता आणि त्यांची एक जात सोडली तर मोहित एक चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा अगदी त्यांच्या मायराला शोभेल असाच मुलगा आहे...


बाबाराव यांनी झोपाळ्याचा मंद झोका थांबवला आणि वळून पाहत विचारले ...." कोण....??"


"मी..."






"कोण पाहिजे तुला... पोरी...??"

पुढे येऊन उभी राहिलेली मुलगी ही आपल्या गावातली नक्कीच नाही हे बाबाराव यांनी व्यवस्थित ओळखले होते.
तिला पूर्वी कधीही कुठेही पाहिले नव्हते.
ही अनोळखी पोर का आली असावी आपल्याकडे...??? अशा विचारांमध्ये बाबाराव थोडा वेळ गप्प बसले एकटक पाहत तिच्याकडे.






तिही बाबाराव यांना भेटायला आली तर होती पण घाबरून काही बोलत नव्हती आणि तिला शब्दंही सुचत नव्हते कारण बाबाराव तिच्याकडे एकटक बघत होते.


बाबाराव यांनी विचारलेला प्रश्न.... त्या प्रश्नाचे उत्तर अजूनही तिने दिले नव्हते पण तिचा चेहरा मात्र आता खूप काही बोलू लागला होता. 







बाबाराव यांनी लवकरच ताडले की या अनोळखी पोरीच्या अंतकरणात काहीतरी शिजतंय....
खदखद  करतंय. पण ते बाहेर पडूही पाहतय... 
आणि ते एकदम असं बाहेर पडूही शकत नाहीये. 
चेहरा अगदी तिचा व्याकुळ झाला होता.
चेहऱ्यावर फक्त आणि फक्त वेदना दिसत होत्या.









नाही म्हटलं तरी ती पोरगी जवळपास मायराच्या वयाच्या एक-दोन वर्ष मागे पुढे असेल... 
बाबाराव कितीही कठोर असले तरी ते पूर्वीपासूनच मुलींच्या बाबतीत मात्र हळवे होते पण ते चेहऱ्यावरून कधीच जाणवू देत नव्हते... 
चेहऱ्यावर निव्वळ निव्वळ कठोरपणाच राहायचा... आपल्या मनाचा हळवेपणा ते वंशजाच्या इज्जतीसाठी दाबून टाकायचे....










बऱ्याच वेळापासून ही आलेली मुलगी काही बोलत नाही. निव्वळ पाहते आहे ....वेदना दिसत आहेत ...तरीही बोलू शकत नाही ...मग त्यांच्या लक्षात आले की ती अजूनही पायरीवरच उभी आहे...






बाबाराव म्हणाले.....
"ये ....वर ये ..पोरी...."
त्यांनी असं म्हटल्यानंतर ती पोर एक पायरीवर चढली. मग पुन्हा विचार केला आणि जड पायाने कष्ट उचलून आणखी एक पायरीवर चढली व तशीच बाजूच्या खांबाला पाठवून उभी राहिली. 


आता ती बाबाराव यांच्याकडे बघत नव्हती तर तिची नजर आता पायाच्या अंगठ्याकडे गेली होती.







बाबाराव......
"सांग आता .....कोण पाहिजे तुला...???"


या प्रश्नाला आताही ती उत्तर देण्याच्या ऐवजी डोळ्याला पदर लावून मुसमुसू लागली.
आता मात्र बाबाराव यांना रहावले नाही. 
ते ताडकन उभे राहिले झोपाळ्यावरून.... 
आणि तिच्याशी काही क्रोधित होऊन बोलणार तर बंगल्याच्या गेट कडून त्याच वेळी लीला आणि मायरा दोघीही आल्या.... मंदिरातून....








बाबाराव यांनी आता त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी दोघींनाही विचारले.....
"ही काय भानगड आहे ???कोण आहे ही पोरगी..??? तुम्ही तरी हिला ओळखता का....??"



पण त्यांच्याही ती ओळखीची नव्हती.



बाबाराव यांनी मग दोघींनाही सांगितले.....
" की ही आली तेव्हापासून अशीच उभी आहे आणि मुसमुसत आहे... आत मध्ये घेऊन जा आणि बोलतं करायला नेमकं काय झालं किंवा काय पाहिजे...???"



मायरा आणि मायराच्या आई लीलातिला आत मध्ये घेऊन गेल्या... मायराच्या आईने ...लीला यांनी तिला समजावून सांगत  बोलकी केले....
......






ती सांगू लागली....


ती  मीरा....
या गावापासून जवळपास सात ते आठ किलोमीटरवर असलेलं पिंपळगाव येथील मोहनराव भाकरे यांची मुलगी.
मोहनराव आता जिवंत नव्हते. घरात फक्त आई.
दोन भाऊ त्यातला एक मुंबईला कंपनीत होता आणि दुसरा भाऊ वेगळा राहिला होता आपल्या बायकोच्या गावी...
मीरा वयात आली होती.
(मायरा पेक्षा दोन ते तीन वर्षां मोठी आहे.. असेल..
नव्हे आता तिने सांगितल्यावर लक्षात आले सर्वांच्या.)










मिराची आई तिच्या लग्नाचे बघत होती. पण जमून येत नव्हते. मीरा दिसायला वर्णाने सावळी पण अंगाने टंच भरलेली. तेव्हा गावातल्या सर्व पोरांच्या वाईट नजरा तिच्यावर पडत होत्या. आपल्या पोरीला कसे सुरक्षित ठेवावे हे तिच्या आईला काळजीचा विषय होता.
मिराचे शरीर दिवसेंदिवस उफाड्याचे दिसू लागले होते.



एकदा त्यांच्या गावामध्ये देवीची जत्रा होती.
आसपासच्या अनेक गावांची हौशी माणसे देवीच्या जत्रेसाठी पिंपळगावला आली होती.
त्याच जत्रेला आपल्या मित्रांसोबत  हौसमौज करायला सुंदरही आला होता.
त्यावेळी सुंदर चा रुबाब काय तो वर्णावा....???
गावातले संपूर्ण रस्ते गर्दीने फुलले होते आणि त्या गर्दीतच सुंदर आणि त्याचे मित्र जत्रेतील दुकानांमध्ये खिदळत फिरत होते.









नंतर कोणत्यातरी मित्राच्या घरची त्यांनी बैलगाडी आणली होती आणि या गर्दीत त्यांची गाडी सुसाट धावत होती.
गाडीमध्ये बसलेले त्याचे मित्र ओरडत होते...... लोकांना बाजूला हटण्याचा इशारा करत होते.... आणि लोकंही त्या बैलगाडीला घाबरून बाजूला सरकत आणि तिला जायला जागा देत होते...
आणि मग एकाएकी काय झाले....???











मिरा त्या बैलगाडीच्या आडवी आली. तिचे  लक्ष नव्हते अजिबात गाडीकडे. ती तिच्या आईबरोबर देवळात आलेली होती देवीच्या दर्शनाला... आतापर्यंतच्या आयुष्यात नीट नाकासमोर चालणारी मीरा आता ही 
सरळ चालत होती.







तिच्या कानावर आरडाओरडा पडला आणि ती बावरली ....घाबरली आणि सरळ वाट सोडून बाजूने जाऊ लागली तर बरोबर गाडीच्या आडवी आली आणि त्यामुळे धक्का लागून ती पडली.








बैलगाडी चालवणाऱ्याने कासरा खेचून गाडीला ब्रेक दिला आणि त्यामुळे मीरा वाचली असे म्हणावे लागेल. फक्त हाताचा कोपराच फुटला होता पण भडभड रक्त त्यातून येत होते.... आपोआप तिच्या तोंडून "आई गं..." निघाले.



सुंदर खाली उतरला आणि मीरा कडे गेला. आजपर्यंत त्याने कुणाचीही कधीही माफी मागितली नव्हती. स्वतः चूक केली असेल तरीही अगदी... पण आता मात्र त्याच्या तोंडात माफीचे स्वर शब्द आपोआप आले...









त्याने तणतणनाऱ्या मिराच्या आईची माफी मागितली. नजर मात्र मिराकडे होती...... मिराच्या भडभडणाऱ्या रक्ता बद्दल त्याने हळहळ व्यक्त केली.......नजर मात्र अजूनही मिराच्या चेहऱ्यावर होती...

जत्रा संपली आणि मग गावोगावचे लोकं आपल्या आपल्या गावी निघून गेले.... 









आता मित्रत्वाच्या नात्याने गाडीमध्ये सुंदर उलटा बसला होता आणि चेहरा पिंपळगाव कडे होता.

त्याच्या आत कुठेतरी जखम झाली होती. रक्त आतल्या आत फडफडत होतं... आणि मग त्या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी तो वारंवार पिंपळगावला येऊ लागला.









मीराला कोपराला मार लागल्यामुळे तिच्या हातात बँडेज घातले होते..... मीराच्या कोपऱ्याला बांधलेली पट्टी लवकर काही सुटली नाही. जखम सुकली होती पण त्यावर एक प्रकारचे नवनिर्माण काहीतरी झाले होते आणि ते चिघळले होते.









गावची जत्रा झाली आणि मीराच्या जखमेची चौकशी करण्याच्या निमित्ताने सुंदर ने तिच्या घराचा उंबरा ओलांडला होता.......त्याने स्वतःला अपराधी म्हणून मिरची किती काळजी पूर्वक चौकशी केली.....???
औषधाला पैसेही देऊ केले आणि मग मीराच्या आईला वाटले की खूप भला माणूस आहे... नाहीतर आपल्या गाडीचा धक्का लागला म्हणून इतक्या लांबून कशाला चौकशी करण्याच्यादृष्टीने काळजीत येते.....???











सुंदर चा "भलेपणा " इतका पक्का होता की तो 
तितक्या लांबून वरचेवर पिंपळगाव ला जाऊ लागला.
मीराच्या घरी जाऊन तिला भेटू लागला.....
या ना त्या कारणासाठी मोकळ्या हाताने पैसा खर्च करू लागला ....त्याने पैसा हे ............
त्याचे अस्त्र  म्हणून वापरले.....









आणि भोळीभाळी. .....मीरा गुंतत गेली.








इकडे सुंदर ने मिराच्या आईला कळत नकळत
डाव टाकला....
दोघाच्याही प्रेमाचे खेळ आता रंगू लागले....
प्रेमाचे डाव रंगत होते.
पण आतापर्यंत मीराने... 
मिराने मर्यादा सांभाळली होती.











तिचाही सूंदरवर आता जीव जडला तेवढाच....
ती सुंदर वर फिदा झाली होतीच .......त्याच्यावर अंत:करणापासून प्रेमही करत होतीच पण ....
त्या प्रेमात ती वाहून गेली नाही .....स्वतः मर्यादा सांभाळत होती आणि सुंदरला मर्यादा  ओलांडू देत नव्हती.










पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला....
"मिरा.... आपण लग्न करू ....माझ्या घरातल्या माणसांना हे नाही आवडलं ....तर आपण पळून जाऊन लग्न करूया ...
आयुष्यात मी लग्न करणार तर ते तुझ्याशीच ...
नाही तर जन्मभर ब्रह्मचारी राहणार ......मीरा....
तुझी माझी ताटातूट करण्याची ताकद माणसात काय ???....पण देवात सुद्धा नाही...."

वगैरे वगैरे.... झालं ....या शब्दांवर मिरा भाळली.. भूलली... आणि इथेच चुकली.






फार मोठी तिच्या हाताने चूक झाली आणि तिच्या आईला यातले काहीही माहीत नव्हते.

आणि मग मिरा नावाच्या फुलाच्या भोवती.... सुंदर नावाचा  भुंगा... गुणगूणत गुंजारव करत राहिला. आणि फुल फुलतच राहिले.





आणि मग एक दिवस.......

🌹🌹🌹🌹🌹✍️©️ D.Vaishali