Anubandh Bandhanache - 16 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 16

The Author
Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 37

    "ડેડી  તમે મુંબઇમા ચાલવાનુ બિલકુલ બંધ કરી દીધેલુ છે.ઘરથ...

  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 16

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १६ )

* प्रेम आणि अंजली दोघेही एकमेकांकडे फक्त पहात होते. प्रेमच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती. जे काही घडलं ते खुप वेगळं होतं आणि खुप छान वाटत होतं तिच्या मिठीत. त्याला असं शांत पाहून अंजली बोलली...*

अंजली : कळलं आता तुला,...
मी का असं बोलत होते ते...
काय फील करत होतास तू...? 
प्रेम.....आपण आता मैत्रीच्या खुप पुढे आलो आहोत. आणि मित्र तर आपण आहोतच आणि नेहमीच असणार.
 पण आता आपल्यात हे नवीन नातं निर्माण झालं आहे, त्यामुळे साहजिकच फिलिंग बदलल्या आहेत. 😊

प्रेम : अंजली...या सर्व गोष्टी काही क्षणासाठी खुप छान वाटतायत, पण मला पुन्हा पुन्हा असच वाटतं की, आपण खुप घाई करतोय. आणि बाकी सर्व गोष्टींचा विचार डोक्यात येतोय.

* अंजली प्रेमचे दोन्ही हात हातात पकडून बोलते. *

अंजली : हे बघ प्रेम... असं नाही की, माझ्या डोक्यात हे विचार येत नाहीत, खुप येतात, 
पुढे काय होईल,,,, कसं होईल,,,, 
आपण कायमचे एकत्र येऊ शकु की नाही,
 हे सर्व खुप कठीण आहे, हे मला पण माहीत आहे. 
पण तुझा चेहरा समोर आला की, त्याच क्षणी मी हे सर्व विसरून जाते. मला नाही माहित पुढे काय होणार आहे ते... पण आता तु फक्त माझा आहेस, एवढच मला माहीत आहे.
मी खुप स्वप्न पाहिलेत अरे तुझ्यासोबत, आता ती मला प्रत्यक्षात खरी करायची आहेत. असच तुझ्या हातात हात देऊन तुझ्या डोळ्यात पाहून खुप काही बोलायचं आहे, आज जसं मिठीत घेतलंस तो अनमोल क्षण पुन्हा पुन्हा जगायचा आहे तुझ्यासोबत...🧑‍🤝‍🧑🥰 बाईकवर तुला घट्ट मिठी मारून दुर कुठेतरी लाँग ड्राईव्ह ला जायचं आहे, तुझ्यासोबत...🏍️🥰
खुप खुप प्रेम करायचं आहे तुझ्यावर...😍😘

* प्रेम तिचं बोलणं ऐकून थोडा भाऊक होतो, आणि जवळ घेत तिच्या कपाळावर किस करतो. आणि बोलतो...*

प्रेम : आय लव्ह यू... मेरी जान...😘

*अंजली थोडी लाजते आणि पुन्हा त्याला मिठी मारते. थोडा वेळ दोघेही तसेच एकमेकांच्या मिठीत राहतात.*

प्रेम : अंजली... मला पण असच खुप काही वाटतं ग... पण...😔

अंजली : बस्.... आता हे पण बिन काही नकोय मला...कळलं. आपण फक्त आत्ताचा विचार करू, पुढे जे होईल तो आपल्या नशिबाचा भाग असेल. आता आपण एकत्र आहोत ना... मग हे क्षण मला वाया जाऊन द्यायचे नाहीत. ओके....

प्रेम : हो... कळलं... पण मला एक प्रॉमिस करशील...?😊

अंजली : बोल... काय प्रॉमिस देऊ...😊

प्रेम : तु बोलतेस ते सर्व मला मान्य आहे, पण मी बोललो तसं... कमीत कमी तुझी दहावीची परिक्षा होईपर्यंत तरी आपण.....

* अंजली प्रेमला मधेच थांबवत बोलते. *

अंजली : हे बघ प्रेम... मी तुला पुन्हा बोलतेय, की या सर्व गोष्टींचा मी माझ्या स्टडी वर कसलाही इफेक्ट होऊन देणार नाही. हे प्रॉमिस मी देते तुला. पण तु बोलतोय तसं मला खरच नाही जमणार...
 तु समोर आलास की, मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकणार. आत्तापर्यंत तेच केलं... पण सॉरी...🙏 यापुढे ते नाही होणार माझ्याकडून...😊
 हा... तु तुला हवं तर मित्र म्हणुन राहु शकतोस का...?
 मग तु तसं रहाण्याचा प्रयत्न कर... मला काहीच प्रॉब्लेम नाही. 😊

प्रेम : हो... का... असं असतं का...?😊

अंजली : हा... तुलाच तर असं राहायचं आहे ना... मग तु रहा मित्र बनुन... मी राहीन तुझी प्रेमिका बनुन...चालेल...😊 यापुढे आपण असच भेटू....👍😀

प्रेम : अच्छा... बघ हा...प्रॉमिस...👍

अंजली : हो... चालेल मला, पण पुन्हा विचार कर... मी तुझी प्रेमिका आहे, मी काहीही करू शकते, पण तु फक्त मित्र आहेस. हे लक्षात ठेव. 😊

प्रेम : हो... राहील लक्षात मला, तेवढं कंट्रोल आहे माझं स्वतःवरती...😊

अंजली : हो... का... मग तर बघावच लागेल, किती दिवस कंट्रोल करू शकतो तु स्वतःला...😊
प्रेम : ठिक आहे ना... बघच तु...😊

अंजली : हो... बघनारच आहे तुला....😍

प्रेम : दुसरी गोष्ट... असं स्कूल मधुन क्लास चुकवून भेटायचं नाही.

अंजली : आ...🤔 मग काय घरी येणार आहेस मला भेटायला...😊 मला चालेल.🥰

प्रेम : अच्छा... घरी... मॉम चे काय...? तिला काय सांगशील...?😊

अंजली : अरे तु त्याचं टेन्शन घेऊच नको, कारण, तसंही मॉमला तु आवडतोस, माझ्या इतर फ्रेंड्स पेक्षा तुझ्याशी ती खुप छान बोलते....😊 हा... पण घरी आल्यावर तीच गप्पा मारत बसेल तुझ्याशी, मला बोलूनच देणार नाही. 

प्रेम : हो...का... ठिक आहे ना मग, मी समोर तर असेल ना तुझ्या...😊

अंजली : हा...चालेल तसंही...मी दिवस रात्र तुला पहात बसू शकते...😍

प्रेम : अच्छा... हे जरा जास्त होत नाही का...😊

अंजली : आजिबात नाही...खरच बोलतेय मी...😍

प्रेम : बरं ओके.....चला आता निघुया आपण, खुप वेळ झालाय. स्कूल सुटले. मॉम वाट पाहत राहील घरी...😊

अंजली : अरे... आत्ताच तर आलो ना आपण... लगेच कसा वेळ निघुन गेला तुझ्यासोबत, कळलं सुध्दा नाही.😊 थोडा वेळ थांबू ना अजुन... प्लिज...🙏

प्रेम : नाही... आजिबात नाही...🤨

अंजली : काय रे प्रेम...फक्त पाच मिनिट...😔

प्रेम : त्या पाच मिनिटांनी काय होणार आहे.🤔

अंजली : खुप काही होऊ शकतं, पण काय करणार, तु फक्त मित्र आहेस ना...😏

प्रेम : अच्छा... बरं चल आत्ता नाही मित्र,आत्ता मी तुझा प्रियकर आहे असं समज...😊 

अंजली : ओय...,🤨 समज म्हणजे...🤔

प्रेम : अरे म्हणजे तसं नाही...😊

अंजली : मग कसं...😏

प्रेम : तुझ्याजवळ पाच मिनिट आहेत, आणि तुझ्यासमोर तुझा प्रेम आहे... आता बोल...काय करशील पाच मिनिटात...😊

* अंजली प्रेमला परत मिठी मारते, प्रेम पण तिला अलगद मिठीत घेतो. दोघे काहीच बोलत नाहीत. तसेच राहतात थोडा वेळ. मग प्रेम तिला हळुच मिठीतुन बाजुला करतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. मग प्रेम बोलतो.*

प्रेम : चला...पाच मिनिट झाली.... आता निघायचं...😊

अंजली : नाही अजुन...अर्धा मिनिट बाकी आहे.😊

प्रेम : अच्छा... मग अर्धा मिनिट काय करणार...😊

अंजली : मी सांगते ते... तु डोळे बंद कर...
प्रेम : का... कशाला....🤔

अंजली : सरप्राइज आहे, तु कर ना पटकन... उशीर होतोय.😊

प्रेम : बरं ओके...करतो....😌

* प्रेम त्याचे डोळे बंद करतो, तसे अंजली खुप धाडस करून त्याला जवळ घेते. त्याच्या कमरेवरती दोन्ही हात ठेऊन, थोड्या पायाच्या टाचा उंच करते. स्वतःचे पण डोळे मिटते, आणि अलगद त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवते. आणि काही वेळ तशीच थांबुन राहते.
 थोड्या वेळाने प्रेम तिला हळुच थोडा दुर करतो, आणि तिच्याकडे पाहतो.
अजुन तिने डोळे उघडले नव्हते. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. कारण हा तिच्या आयुष्यात हा पहिला सुखद अनुभव होता. आजवर टीव्ही वर फिल्म मधे फक्त पाहिलं होतं तिने, ते आज प्रत्यक्षात अनुभवलं होतं. 
प्रेम तिला आवाज देतो तसं ती डोळे उघडते आणि लाजेने खाली मान घालते. तिच्या हनुवटीला बोटाने वरती करत प्रेम तिला बोलतो.

प्रेम : हे काय होतं...😊

अंजली : ( थोडी लाजतच ) मी तुझ्यासोबत पाहिलेल्या स्वप्नातील एक सत्य. जे आज प्रत्यक्षात अनुभवलं. 😊 आय लव्ह यू प्रेम. 😘

* एवढं बोलुन पुन्हा ती प्रेम ला मिठी मारते.*

प्रेम : बरं आता निघायचं का... नाहीतर मॉम तुला शोधत इकडे येतील. 😊

अंजली : काहीही काय...😊 बरं चल निघुया.

* बाहेर येऊन ते ऑटो पकडतात. ऑटो मधे पण अंजली प्रेम चा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन त्याला घट्ट बिलगुन बसलेली असते. दोघेही काहीच बोलत नाहीत. फक्त अधून मधुन एकमेकांकडे पाहून हसत असतात.
 थोड्या वेळात अंजलीच्या घराजवळ ते पोचतात. इच्छा नसतानाही ती त्याचा हात सोडुन खाली उतरते. प्रेम तिला लवकर घरी जा असं सांगतो. आणि ऑटो तिथून निघते.
 अंजली त्या ऑटो कडेच पहात राहते, जोपर्यंत ती दिसेनाशी होत नाही तोपर्यंत.
 नंतर ती घरी येते. आज जरा जास्तच उशीर झालेला असतो त्यामुळे मॉम विचारतात, त्यांना मैत्रिणीकडे गेली होती असं सांगून ती फ्रेश व्हायला जाते.

आज पुन्हा तो अविस्मरणीय दिवस दोघांच्याही आयुष्यात आला होता. आणि खुप काही गोड क्षण देऊन गेला होता. 
अंजली आत्ता खरं तिच्या स्वप्नातलं आयुष्य जगत होती. तिच्या स्वप्नातील राजकुमार आता प्रत्यक्षात तिच्या जवळ होता. जणू तिचं आयुष्यच बदलून गेलं होतं. आणि या बदलामुळे ती पण प्रेम सोबत खुप खुश होती. 

दोघांच्याही आयुष्याला आता एक वेगळे वळण लागले होते. मैत्रीच्या गप्पांच आता प्रेमात रूपांतर झालं होतं.

आता त्यांच्या अधुन मधुन भेटी व्हायला लागल्या होत्या. प्रेम ने कितीही जरी ठरवलं तरी, फक्त मित्र बनुन राहणं आता शक्य नव्हते. त्यालाही आता तिची ओढ लागली होती. त्यामुळे ते दोघे अजुनच जवळ येत चालले होते.

 अंजलीचे आठवीचे वर्ष संपले. ती चांगल्या मार्कने पासही झाली. प्रेम ने पण तिचे मनभरून कौतुक केले. आता ती नववीच्या वर्गात शिकत होती. 
सर्व काही ठिक आणि छान चालले होते. प्रेम अधुन मधून तिच्या घरी पण यायचा. तिच्या मॉम सोबत त्याची चांगलीच गट्टी जमली होती. ते दोघे खुप गप्पा मारायचे. हे पाहून अंजलीला पण खुप छान वाटायचं. 

एक दिवस प्रेम अंजलीला तिच्या स्कूल जवळच भेटतो तेव्हा अंजली तिच्या बेस्ट फ्रेंड ची ओळख करून देते. ती मुलगी म्हणजे मेघना शिंदे. मेघना चे वडील पोलीस अधिकारी होते. जवळच रहात असल्यामुळे अंजलीच्या डॅड आणि त्यांची चांगली ओळख होती. दोघी लहानपापासूनच एकत्र होत्या त्यामुळे दोघी एकमेकींना खुप चांगल्या प्रकारे समजुन घेत होत्या. म्हणुनच आज तिने पहिल्यांदा प्रेम आणि तिची ओळख करून दिली होती.
 तिचा मेघनावर खुप विश्वास होता. ती घरी वगैरे काही सांगणार नाही याची तिने प्रेम ला खात्री करून दिली होती. 

प्रेम मात्र अंजली बद्दल अजुन कोणालाही सांगायला तयार नव्हता. माहीत नाही का...? पण त्याला कसलीतरी भीती वाटायची. म्हणुन त्याने त्याच्या कोणत्याही मित्राला तिच्याबद्दल कधीच काही सांगितले नाही.

 अंजली खुप वेळा ही गोष्ट त्याला बोलुन दाखवायची. पण प्रेम एवढच बोलायचा... अजुन त्या गोष्टीला वेळ आहे. मग अंजली पण, ठिक आहे मी वाट पाहीन त्या दिवसाची. असं बोलुन तो विषय सोडुन द्यायची. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️