Nishabd swash - 9 in Marathi Love Stories by satish vishe books and stories PDF | निशब्द श्र्वास - 9

Featured Books
Categories
Share

निशब्द श्र्वास - 9

काल पडलेलं स्वप्न आज प्रत्यकषदर्शींनी व्हावं म्हणजे एक चमत्कारच ना! तिच्या सहवासाच्या प्रत्येक क्षण फक्त समोर असणं. म्हणजेच त्या माणसाची आसलेली ओढ नाही का?
         दोन दिवस सुट्टी नंतर आज ऑफिस ला आलो होतो. आगदी गेट वराच मयारा आगदी मूर्ती कारणे बनवलेली " जणू एक लावण्यावती माझ्या समोर उभी आहे असं वाटलं." मन आगदी कासावीस होऊन गेले.
  तसा आजचा दिवस जरा वेगळाच होता. आगदी फुलपाखराला सुगंधी फुलांची बहरलेली बाग मिळावी आणि त्याने स्वच्छंदी फिरावं अस माझं मन बागडत होत. जरा स्मित हास्य देऊन मी ऑफिस मद्ये गेलो. आज मीटिंग मधे मुळीच लक्ष लागत नव्हते. कसा वेळ जातो असं झालं होत. आगदी feeling crezy hai bhaya मन आतून आवाज देत होत. केव्हा केव्हा मधेच चेहऱ्यावर गोड smail येत होती.😊
       कसा तरी वेळ काढून मी कॅबिन मधे आलो. येताना मयारा रस्त्यात उभी होती. तिचा कडे पाहत मी पुढे निघून गेलो. का कुणास ठाऊक मी विसरलो तर नाही ना काही अस वाटत होत. खरच आगदी आज वेगळीच feeling hoti yarr. नेहमी सारखं नाही. मी पुढे चालत होतो तर एक आवाज आला. सर आज special दिवस आहे. आज कोणाला प्रपोज केलं तर कोणी नाही बोलणारच नाही. असा एक मुलाने बाजूला येऊन म्हटलं." हो का " अस बोलून मी पुढे गेलो. पाहतो तर आज १२-१२-१२ माझे डोळे जरा मोठे झाले. yarr खरंच आज खूप special दिवस आहे. 
        मी पुंन्हा बाहेर जाऊन पाहिलं १२ वाजायला काही मिनिट बाकी होते. थोडा विचार करून मी हळूच त्या मुलाच्या शेजारी गेली. खरच खूप स्पेशल दिवस आहे. तेवढ्यात मायरा बाजूला येऊन उभी होती तिला काही तरी काम होत. पण मी याचाशी बोलत होतो तेव्हा ती शांत उभी होती आगदी मूर्ती बनून. त्या मुलाने पुन्हा मला विचारलं "सर आज मस्त दिवस आहे." मी " हा पण आपण ज्याला आवडतो त्याला सांगायची गरज नसते. " तो " अस कस सांगावं लागतं सर! आम्ही गप्पा मारत होतो. मी मायरा कडे बघून " घड्याळ कडे बघून मायरा सांगायची गरज आहे का अस बोलून मी तिला smail kel " नाही ना." मायरा ची ती smail mala khup काही सांगून गेलो. जणू मनाच्या हिंदोळ्यावर घेऊन गेली. माहित आहे तेव्हा १२ -१२-१२-१२ म्हणजे date १२- month १२- year १२- time १२ and १२ minutes. असा झाला प्रपोज सगल्यांन समोर परंतु भावना मात्र दोघं मधेच राहिल्या.
   " गुंतल्या भावनांनी वेद मनाचा घेतला.
शब्दरुपी भावनांचा डोळ्यांतून कल्लोळ हा मजला. "
आगदी वाळवंटात भटकणाऱ्या माणसाला आचानक थंड वाऱ्याची झुळूक यावी. उन्हाने न्हाऊन निघालेल्या आंगला थंड हवेची झुळूक लागल्यावर जशी felling येते तशी आगदी मनाला वेड लाऊन गेली.
जरा लाजत मायरा निघून गेली. मी आगदी स्वप्नात ! मी मलाच एक चिमटा काढला. खरच हे स्वप्न नाही ना? 
  " मनी दाटला भाव तुझा हा डोळ्यांतून वाहिला, स्वप्नातल्या त्या परीचा देही मंदिर रचिला!!""
खूप दिवस जो खेळ चालू होता तो मात्र आज आगदी घट्टा बंधनात होता. प्रेम म्हणजे काय असतं. कसं होत. केव्हा होत. का होत. असे खूप प्रश्न केव्हा मनाला विचाला तर मन काय उत्तर देणार काय ठाऊक, 
 म्हणतात " आपण जो पर्यंत प्रेमाचं आस्वाद घेत नाही तो पर्यंत त्याची चव समजत नाही. कुणी सांगून काही समजणार नाही". कारण
"प्रेम म्हणजे एक feeling मनाची !
प्रेम म्हणजे आस दुसऱ्याच्या मनाची!
प्रेम म्हणजे ओढ दुसऱ्या देहाची!"

खूप कवींनी लिहिलेलं आहे प्रेमा बद्दल, परंतु प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं बर का! प्रेमाचा गुलकंद जर चाखायचा असेल तर एकदा तरी प्रेमात पडावं."""" प्रेम करता करता आपण तिचा साठी तिने आपल्या साठी मात्र झुरावं! """
"जसं शब्दांची ओढ असली की काव्य बनते!
तसच कुणाची ओढ असेल तर प्रेम बनते!!"

खरंच कोणचा मनाचा वेध घ्यायचा म्हणजे आकाशाला गवसणी घालण्या सारखाच आहे. दिवस भरात मायरा मात्र आगदी हवेत गिर्त्या घालत होती. मधेच हसत होती जणू वेड लगाय. खूप दिवसांची तिची प्रतीक्षा संपली होती. 

"जरा मनाच्या हिंदोळ्यावर 
                          येऊनी सजना भेट रे!
पाहुनी तुजला प्रीत मनाची
                            ओठी गुंजले गीत रे!!
शब्दांच्या या गाठी भेटी 
                          दिसते डोळ्यांतले भाव रे!
सोड तू आता रीत जगाची
                             दे मजला तू प्रीत रे!!
सप्तसुरांची लाटे वरती 
                             वाहुनी जाऊ आज रे!
तुझ्या मिठीची ओढ लागली 
                         आंगी रंगले रंग रे!!