Amrapali in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | आम्रपाली

Featured Books
Categories
Share

आम्रपाली

मनोगत आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय व मनापासून आनंद होत आहे. आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली हे एक त्यागाचं प्रतिक आहे. तिनं केलेला जीवनातील त्याग हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आम्रपाली या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास मी एवढंच सांगेन की आम्रपाली ही माझी महत्वपुर्ण पुस्तक. ह्या पुस्तकाला मी देत असलेला नव्यान्नववा क्रम. तो या पुस्तकाचा क्रम नसून या पुस्तकाला शंभरावा क्रम देण्याचा माझा मानस होता. कारण माझी याच विषयावरील वेदना नावाची पहिली कादंबरी आहे. म्हणूनच शंभरावीही कादंबरी याच विषयाची व्हावी असं वाटत होतं. म्हणूनच मी माझ्या शंभराव्या पुस्तकासाठी हा विषय ठरवूनच ठेवला होता. शिवाय या पुस्तकाला तो क्रम मी खास करुन राखून ठेवली होती. संयोग असा की या पुस्तकाचा विषय गणिका आहे व माझ्या पहिल्या कादंबरीचाही विषय गणिकाच होता. म्हणूनच या पुस्तकाला मला शंभरावा क्रम द्यायचा होता. परंतु त्याबद्दल मी माझ्या मित्रांशी संवाद साधला असता ते म्हणाले, "लोकं एखाद्याचं शंभरावर संस्करण जास्त अभ्यासतात. त्यामुळं तसा विषय नकोच. त्यामुळंच या पुस्तकाला मी नव्यान्नववा क्रम दिला. दुसरा संयोग असा की वेदना हे २००४ व आम्रपाली २०२४ चं संस्करण. तब्बल वीस वर्षात एवढं लेखन करणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. त्याबद्दल मी माझी स्तुती करीत नाही. कारण तो अहंकार असेल माझ्यासाठी. परंतु याबाबत एक सांगावेसे वाटते की मलाही वाटत होतं की आपण विपूल लेखन करावं. निदान शंभर तरी पुस्तकं आपल्याकडून घडावीत. म्हणूनच सातत्यानं लिहिलं. दिवसरात्र लिहिलीत पुस्तकं. त्यातच कधीकधी घरी वाद व्हायचे. घरचे म्हणायचे की ही पुस्तकं लिहून काय फायदा? काही पैसे मिळणार आहेत का? कोण हुंगतंय तुमच्या पुस्तकाला? कधी त्यातून भांडणंही व्हायची. परंतु एक सांगावेसे वाटते की मी त्या सर्व गोष्टीवर मात केली. ज्यातून माझे आतापर्यंत नव्यान्नव पुस्तकं साकार झाले. पुस्तके लिहिणं, ही एक लिहिण्याची नशाच असते. ती नशाच दारुपेक्षाही महाभयंकर असते. परंतु ती दारुसारखी नसते. चांगली नशाच असते. लोकांनी ती पुस्तकं लिहावीत म्हणजे झालं. कदाचीत माझी शंभरवीही पुस्तक बनेल. बनणारच असं मी म्हणत नाही. कारण काळ सांगेन. आम्रपाली या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली एक गणिका होती त्या काळातील. तिला समाजानं गणिका बनवलं जाणूनबुजून आणि जबरदस्तीनं. त्याचं कारण होतं तिचं सुंदर दिसणं. तसं पाहिल्यास वैशाली हे गणराज्य होतं त्या काळातील. म्हणूनच ती नगरवधू. आम्रपाली अस्तित्वात येण्यापुर्वी त्या काळात राजेशाही होती व ते राजे त्यांच्या राज्यात जी एखादी सुंदर मुलगी दिसली आणि तिच्यावर मन आलंच तर तिची ते जातपात पाहात नसत. तिच्याशी विवाह करुन तिला आपली पटराणी करीत असत. काही राजे त्यांना आपली रखेल अर्थात दासी बनवून जनानखान्यात ठेवत. अशा कितीतरी राजाला पत्न्या असायच्या, दास्या व रखेलही की ज्या जनानखान्यात पडलेल्या असायच्या. त्यांचा उपभोग राजा एखाद्यावेळेसच घेत असे. परंतु आम्रपाली ज्या काळात झाली. त्या काळात राजेशाही गेली होती व सोळा महाजनपदं अस्तित्वात आली होती की ज्या महाजनपदात राजाची मर्जी चालत नसे. राजाला देव संबोधलं जात नसे. कोणताही निर्णय हा एकटा राजा घेत नसे तर त्याच्या सोबतीला मंत्रीमंडळ असे. जे मंत्रीमंडळ राजाला कोणत्याही बाबतीत सल्ला देत. मग तो निर्णय त्या राज्याच्या हिताचा असो की नसो. महत्वपुर्ण बाब ही की पुर्वी राजेशाही होती व राज्यातील एखादी सुंदर कन्या असेल तर तिच्याशी राजा हाच सर्वेसर्वा असल्यानं त्यानं विवाह केला तरी चालायचा किंवा तिला त्यानं रखेलचं जीवन दिलं तरी चालायचं. कारण त्याचीच संपुर्ण राज्यभर उर्मी चालायची. परंतु जेव्हा गणराज्य आलं आणि महाजनपदं निर्माण झाली. तेव्हा लोकांचं राज्य आलं होतं. त्या काळात तरी निदान ही प्रथा बंद करायला हवी होती. परंतु तसं घडलंच नाही. उलट राज्यात जर एखादी सुंदर कन्या असेल तर तिचा कसा उपभोग घेता येईल. यासाठी एक नवीन पद निर्माण करण्यात आलं. ते पद होतं नगरवधू पद. ज्या पदातून राजाला त्या सुंदर मुलीशी विवाह करावा लागत नसे वा आपली रखेल बनवावी लागत नसे तर त्या रखेलच्या पदाला राजमान्यता देण्यात आली होती. अन् त्यात आणखी एक बदल करण्यात आला होता. तो म्हणजे पुर्वी राजेशाहीच्या काळात या राज्यातील मुलीच्या देहाचा उपभोग फक्त राजाला घेता येत असे. परंतु या गणराज्यात त्याच राज्यातील सुंदर कन्येच्या देहाचा उपभोग केवळ राजाच नाही तर त्याचं सगळं मंत्रीमंडळ घेत असे. ते नगरवधूपद हे सन्मानाचं असायचं. कारण त्याला राजमान्यता असायची. परंतु त्या पदाच्या आड जे कार्य घडत असे. ते धिक्कारलेलं कार्य असायचं. त्या कार्याला काही लोकं आजही धिक्कारलेलंच कार्य समजतात. मलाही, माझ्याही मनात तेच खललं व मी ही पुस्तक लिहिली. अशा बऱ्याचशा स्रिया अशा बऱ्याचशा तद्नंतरच्या महाजनपदात झाल्यात की ज्यांना जाणूनबुजून, जबरदस्तीनं छळलं गेलं. वेश्या बनवलं गेलं. ज्याला सुंदर नाव दिलं गेलं, नगरवधू. नगरवधू ही एक गणिकाच होती. त्यातच तिला ते कार्य एखाद्या सौंदर्यवान स्रिला आवडत नसतांनाही ते पद सन्माननीय असल्यानं तिनं ते पद स्विकार केलं. त्यानंतर त्या पदाच्या आड होत असलेलं कार्य लपवलं गेलं. बदनामी होते आपली आणि राज्याची म्हणून. परंतु त्यातून ज्या स्रिया नगरवधू पद घेत असत. त्यांच्यावर काय बेतत होतं, याची कल्पनाही न केलेली बरी. आम्रपाली ही त्यातीलच एक भोगिणी. तिला माहीत नव्हतं की नगरवधू पदाच्या आड कोणतं कार्य चालतं. जेव्हा तिनं नगरवधू पद घेतलं आणि जेव्हा तिला त्या पदाच्या आड होत असलेलं कार्य कळलं. तेव्हा तिला त्या पदाचा तिरस्कारच वाटायला लागला होता. परंतु आता वेळ निघून गेली होती. त्यानंतर सर्वांनी तिच्या देहाचा उपभोग घेतला. तिला छळलं नव्हे तर तिची लक्तरं तोडली. त्यात आम्रपालीनं तिला तो त्रास सहन होत नसतांनाही तिनं तो त्रास सहन केला. त्यात तिला कधी त्या राजाच्या मुलासोबत तर कधी त्या राजाच्या नातवासोबत सहवास करावा लागला होता. ही एक प्रकारची शोकांतिकाच होती. परंतु काय करणार. ते प्रारब्ध होतं. आम्रपालीनं नाईलाजास्तव ते सगळं सहन केलं व ती भोगत राहिली. त्यानंतर ती कधीकधी विचार करायची, त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल यावर. त्यातच तिनं एका बौद्ध भिख्खूची परीक्षा घेतली. तो बौद्ध भिख्खूही तिच्या परीक्षेत पास झाला व तिनं तद्नंतर बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व आपला उद्धार करुन घेतला. जर तो भिख्खू तिला मिळाला नसता तर आजही आम्रपाली इतर नगरवधूंसारखी वैशालीच्या धुळीत सामावली असती. तिला कोणीच ओळखलं नसतं हे सांगण्यासारखंच आहे. माझी ही आम्रपाली नावाची पुस्तक अतिशय महत्वपुर्ण असून आपण ती वाचावी व आवडल्यास मला एक फोन अवश्य करावा. जेणेकरुन मला ही पुस्तक लिहिल्याचं सार्थक वाटेल. धन्यवाद आपला नम्र अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०आम्रपाली भाग एक (कादंबरी) अंकुश शिंगाडे तो काळ अतिशय धामधुमीचा काळ होता. त्या काळात राजेशाही होती. ज्या राजेशाहीत राजांचंच चालत होतं. राजाला लोकं देव म्हणत व राजाच्या विरोधात कोणीही जात नसत. राजाचं एक विशिष्ट असं मंत्रीमंडळ असायचं. त्या मंत्रिमंडळाचा निर्णय काही राजे घेत असत वा स्विकार करीत असत. काहींना ते निर्णय स्विकार नसायचे. ते राजे हुकूमशाहीचे द्योतक असत. राजे हे दोन प्रकारचे असायचे. एक निरंकुश सत्ताधीश. ज्यात राजा एके राजा व राजाचाच हुकूम हा वटहुकूम असायचा. त्या राज्यात राजांचीच मर्जी चालायची व त्या राज्यात इतरांची मर्जी चालत नसायची. एखाद्या संकटसमयी तो राजा मग त्याच्या मनाला वाटेल असे निर्णय घ्यायचा. मग ते निर्णय चुको अगर न चुको. ते निर्णय चुकलेच तर राजा संकटात पडत असे. राजा हाच सर्वसत्ताधीश असायचा. त्याला देव समजलं जाई. तो एकटाच प्रजेवर अत्याचार करायचा. त्यातच त्याचं जे कोणी ऐकत नसत. राजा त्याची हत्या करुन टाकत असे. आम्रपाली ही लहान होती. तेव्हाही ती सुंदरच होती. परंतु ती त्यावेळेस पाहिजे त्या प्रमाणात सुंदर नव्हती. ती लहान होती तेव्हा कोणाचंही तिच्याकडं लक्षही गेलं नाही. परंतु जशीजशी ती लहानाची मोठी होत गेली. तशी ती अधिकच सुंदर दिसायला लागली होती. आम्रपालीचा जन्म हा निश्चीत केव्हा झाला, ते काही माहीत नाही. तसंच तिला कोणं जन्माला घातलं, तेही काही माहीत नाही. परंतु तिचा जन्म झाला व तिला अक्षरशः फेकून देण्यात आलं त्या वनात. ज्या वनात आंब्याची आमराई होती. कदाचीत त्या काळातही जातीभेद असल्यानं व आंतरजातीय विवाह होत नसल्यानं कोण्यातरी चांडाळणीनं तिला जन्म तर दिला असेल परंतु आपलं पाप वर येवू नये. म्हणून तिला फेकून दिलं असेल. तो राजेशाहीचा काळ व त्या काळात अनैतिक कृत्य केल्यास मिळणारी शिक्षा. ती शिक्षा काही आजच्यासारखी नव्हतीच. त्या काळात कोणत्याही व्यक्तीनं अनैतिक कर्म केल्यास कोणताही राजा न्याय करतांना सरळ मृत्यूदंडच द्यायचा. तसं पाहिल्यास त्या काळात प्रेमाला कोणत्याही स्वरुपाचा वाव नव्हताच. तो काळ व त्या काळात लोकसंख्याही कमी प्रमाणात होती. गाव होतं व गावाचीही लोकसंख्या जेमतेमच असायची. त्यातच प्रेमाला बंधन होतं. प्रेम जर झालं आणि असं आढळून आलं तर गावपंचायत बसायची. ज्यात पाठीवर कोडे मारले जात. ज्यामुळं शरीर रक्तबंबाळ व्हायचं. वळ यायचे, दुखणं भरायचं व ते दुखणं कितीतरी दिवस पुरायचं. काही काही ठिकाणी प्रेम आढळून आल्यास वाळीतही टाकलं जात असे, तेही संपुर्ण बिरादरीला. काही काही ठिकाणी सरळ मृत्युदंड. तसे गावातील कायदेही महाभयंकर स्वरुपाचे होते. प्रेम हे जातीतल्याच तरुणासोबत होत असे असं नाही तर ते प्रेम इतरही जातीच्या मुलासोबत व्हायचं. शिवाय असं प्रेम झालंच आणि तसं आढळून आल्यास पुरुषसत्ताक पद्धती असल्यानं पुरुषांना जबाबदार धरलं जात नसे तर जबाबदार धरलं जात असे स्रियांना. जरी स्रियांचा दोष त्यात नसला तरी. मात्र पुरुषच स्रियांना फुस्स लावत असत. असंच प्रेम होतं व नाईलाजानं आपल्याला वाळीत टाकलं जातं व समाजाचा रोष सहन करावा लागतो म्हणून लोकं आपल्या मुलीचा विवाह अगदी बालवयातच लावून देत. त्याचं कारण होतं कुटूंबाची होणारी बदनामी. कुटूंबाची बदनामी होते म्हणून ती मंडळी बालविवाहच नाही तर एखादी स्री गरोदर असली तर तिच्या पोटालाच कुंकू लावून देत. मुलगी जर झाली तर आम्ही तिचा आपली स्नुषा म्हणून स्विकार करु. त्यानंतर त्या मुलीचा विवाह होताच तिच्यावर बारीक नजर ठेवली जात असे. परंतु असंही जरी झालं तरी प्रेम होत नव्हतं असं नाही. कितीही कडक बंधनं असली तरी प्रेम व्हायचंच. प्रेमाला जरी बंधन असलं तरी त्या काळातही लोकांचं प्रेम करणं बंद नव्हतं. लोकं प्रेम करतच असत. असेच गावातील प्रेमी युगल. ते युगल वयात येताच प्रेम करायचे नव्हे तर त्यांच्यातही प्रेम व्हायचंच, जरी वाळीत टाकण्यासारख्या गोष्टी होत असल्या तरी. अशातच समजा एखाद्या मायबापाची मुलगी पळून गेलीच तर तिनं नाक कापले असं समजलं जाई व ती आपल्यासाठी मरण पावली असे समजून तिची तेरवी, चौदावी वा तिसरा दिवस तिच्या जीवंतपणीच केलं जाई. त्यानंतर त्या मुलीच्या कार्यकक्षा संपत व ती मुलगी पुन्हा कधी परत कुटूंबात येत नसे. ती मुलगी लागस विहीरीत जीव देवून आत्महत्या करीत असे. परंतु परत येत नसे कुटूंबाचा आधार घ्यायला. शिवाय एखादी मुलगी अशी पळून गेलीच तर काही मायबाप आपल्याला तोंड दाखवायला जागाच राहिली नाही. असा अर्थ घेवून तेही खुशाल आत्महत्याच करीत असत. तो प्राचीन काळ व त्या काळात असलेला स्रियांचा दुय्यम दर्जा. स्री ही उपभोग्य वस्तू आहे असंच मानलं जायचं. शिवाय प्रेमाला बंधन होतं. तरीही प्रेम करणारे लोकं होतेच. ते लपूनछपून प्रेम करीत असत. परंतु त्या काळात ते लपूनछपून प्रेम जरी असलं तरी त्या प्रेमातून काही समस्या उभ्या राहात. ज्या समस्या होत्या गर्भपात न होणं वा गर्भपात करता न येणं. शिवाय अशा प्रेमातून समजा एखाद्या स्रिला गर्भपात राहिलाच तर ती आपला गर्भपात करु शकत नसे खुल्यामनाने. त्याची औषधही घराघरात माहीत नव्हती ना त्या काळात तंत्रज्ञानाची आधुनिक काळात जशी आहेत, तशी साधनं उपलब्ध नव्हती. शिवाय अशी स्री एखाद्या घरी आढळून आल्यास तिला कुलथा वा डायन समजलं जाई व अशा डायन समाजात नसाव्यात वा असं कोणीही करु नये म्हणून तिला मारुन टाकलं जाई विना अपराधानं. तो अपराध नसतांना अपराधच समजला जात असे. गर्भपात हा गुन्हाच होता त्या काळात. मग ती राजकन्या का असेना. गर्भपातावरही त्याही काळात उपाय होताच. तो उपाय एखादा मांत्रीक करीत असे. परंतु त्यात तो गुन्हा धरला जात असल्यानं त्या स्रिची समाजात बदनामी होत असे व त्यातच विटंबनाही. कधीकधी एखाद्यावेळेस एखाद्या स्रिचा हाही अपराध क्षम्य होत असे, जर ती स्री एखाद्या राजाची कन्या असेल तर..... शिवाय त्या काळात ती मुलगी गरोदर आहे, हे आजच्यासारखी तंत्रज्ञान साधनं उपलब्ध नसल्यानं लवकर कळत नसे व गर्भपात होत नसल्यानं तिला नाईलाजानं त्या बाळासकट आत्महत्या करावी लागत असे वा एखाद्या बंद खोलीत बाळ विकसनाचे नऊही महिने राहून बाळाला जन्माला घालावे लागत असे. ज्यात बाळ जन्मानंतर ते बाळ मारुन फेकलं जाई वा त्या बाळाला बंद पेटीत ठेवून ते नदीप्रवाहात सोडून दिलं जाई. गर्भपात हा त्या काळात गुन्हाच होता समाजानं ठरवून दिलेला. आजही तो गुन्हाच आहे. काल प्रेमाला बंधन होतं व कालच्यासारखं बंधन असलेलं प्रेम आजही कोणत्याच मुलीला खुलेपणानं करता येत नाही. ते प्रेम अनैतिक स्वरुपाचं मानलं जातं, जरी आज समाजसुधारणा झाली असली तरी. आजही काही काही ठिकाणी अशा प्रेमातून मुलीच्या आत्महत्याच झालेल्या दिसतात तर काही काही ठिकाणी तिचाया आईवडीलांच्या होत असलेल्या वा घडूनायेत असलेल्या आत्महत्याच आढळून येत असतात. महत्वपुर्ण सांगायचं झाल्यास आजही कालसारखी प्रेमाला बंदी असल्यानं मुलांमुलींनी वयात आल्यावर प्रेम करु नये काय? तर त्याच उत्तर नाही असंच देता येईल. त्याचं कारण आहे आज समाजाचं प्रेमाबाबतीत असलेलं बंधन. काल जसं युवक युवतीचं वयात आल्यावर प्रेम व्हायचं. मग तो गर्भ पडायचा नाही. शिवाय पुरुष असलेला मुलगा हा तिला अकाली सोडून द्यायचा. तिला प्रसंगी साथ द्यायचा नाही व मदतही करायचा नाही. कधीकधी तर तिला जंगलात नेवून तिचीच हत्याही करायचा, आपली बदनामी होवू नये म्हणून. कधी तो सोडून गेल्यास तिलाच असे भोग भोगावे लागायचे. समाजाचा तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन हा तिरस्काराचाच असायचा. ज्यातून आयुष्यभर एका कुलथेचं जीवन जगावं लागायचं. कधी मायबाप तर कधी तिचे मृत्यू. म्हणूनच त्या काळात प्रत्येक मायबाप आपल्या मुलीला तशा स्वरुपाचे पाऊल टाकूच देत नसत. ते प्रेम टाकायची मनाई होती. कारण त्यांना समजत असे प्रेमाचा अंत व प्रेम केल्यावर आपली दुर्दशा काय होते ती. आज समाजसुधारणा झाली व अत्याधुनिक गर्भपात करण्याची साधनं आलीत. गर्भपाताबाबत निरनिराळ्या औषधीदेखील आल्या. त्यानुसार आज प्रेमही खुल्यास्वरुपानं व्हायला लागले आहेत. परंतु काळ बदलला आहे का? तर त्याचंही उत्तर नाही असंच येईल. कारण आजही काळ बदलला नाही व आजही कोणाच्याही मुलीला एक स्री म्हणून खुल्यामनानं प्रेमही करता येत नाही. त्याचं कारण कालसारखंच आहे. काल जशी प्रत्येक मायबापाच्या मनात वा प्रत्येक स्त्रिच्या मनात भीती होती की मी एखाद्या मुलावर प्रेम केल्यास मला आत्महत्या करावी लागेल, माझ्या आईवडिलाला आत्महत्या करावी लागेल. माझे आईवडीलाला समाज वाळीत टाकेल. मला समाज कुलथा ठरवेल. तीच परिस्थिती आजही आहे. आज समाजसुधारणा झाली आहे व मुली खुल्यामनानं प्रेमही करु शकतात. त्यानंतर त्या मुलीचं काय होतं? हे कोणालाच माहीत नाही. असे प्रेम झाल्यानंतर जे अनैतिक स्वरुपाचे संबंध घडून येतात. त्यातून गरोदर पण येतं व गर्भपात न झाल्यानं मुलींना मुलं चक्कं कालसारखीच सोडून जातात. जरी कायद्याची त्यावर नजर असली तरी कायदाही काहीच करु शकत नाही. कायदा म्हणतो की हे कृत्य करीत असतांना मला विचारलं काय? त्यातून तिच्या आत्महत्याच घडतात कधीकधी मुलं मदत करीत नसल्यानं. कधीकधी प्रेम झाल्यावर ही मुलं त्याच आपल्या प्रेमीकेवर सामुहीक बलात्कार घडवून आणतात नमस्कार पैसे कमवतात. वेदना मात्र एक स्री असल्यानं तिलाच. कधीकधी ही मुलं आपल्याच प्रेमिकेला एखाद्या वेश्यालयात विकून टाकतात. त्यावेळेस ते विचार करीत नाहीत की या मुलीनं आपल्यासाठी आपल्या मायबापालाही सोडलं. कधी यातून काही समजदार मुलं विवाह करतात. हे विवाह कधी आंतरजातीय तर कधी आंतरधर्मीय स्वरुपाचे असतात. परंतु असा विवाह केल्यानंतर तो मुलगा काय करतो? त्या मुलीचं जीवन कसं होतं? याचा विचार कधीच केल्या जात नाही. हे तपासूनच पाहिलं जात नाही. मात्र ज्या मुलीचे असे विवाह होतात किंवा जी मुलगी असा विवाह करते व वेदना भोगते. तीच मुलगी पुढं सांगते की बाबारे आता तरी सावधान व्हा. विवाहासारखा तरी निर्णय आपल्या मायबापाच्या मर्जीनंच घ्या. कारण अशा मुलीला विवाह केल्यानंतर ती मुलं त्याच मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतात व आपण एकाच ठिकाणी बसून ऐषआराम भोगत आपलं संपुर्ण आयुष्य काढत असतात. ते दारुही पीत असतात व त्याचेही पैसे त्या स्रीकडूनच वसूल करीत असतात. बिचाऱ्या मुलीला त्या गोष्टीचा एवढा त्रास होतो आणि पश्चातापही की तिला वाटते आपण असा विवाह केला नसता तर अगदी बरं झालं असतं परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कधीकधी काही मुलं ही आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलीला चक्कं विकून टाकतात वेश्यालयात. आपल्या विनाकारणची मागं कटकट लागू नये म्हणून. हे विशेषतः घडत असतं आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलांत. ही वास्तविकता आहे. आज समाजाला या गोष्टी सांगितल्याच जात नाही. आजच्या समाजाला माहीतच आहेत या गोष्टी. शिवाय हेही माहीत आहे की आज जरी समाजसुधारणा झाली असली तरी काळ बदलला नाही व मानसिकताही बदलली नाही. ती मानसिकता तशीच आहे. म्हणूनच तेच मायबाप आपल्या मुलीला बालपणापासूनच असे संस्कार देतात की त्यांनी कुणावरही प्रेम करु नये. असे प्रेम जर केले गेले तर त्याचे परिणाम गंभीर होतात. हेच सांगत असतात पदोपदी आपल्या मुलीला परंतु त्या गोष्टी प्रत्येकच वयात येणारी मुलगी ऐकेल तेव्हा ना. प्रत्येक मुलगी त्या गोष्टी ऐकत नाही. ज्यातून आजच्या काळात गुन्हे घडतात व दररोज वर्तमानपत्रात लिहून येतं की अमुक ठिकाणी सामुहीक बलात्कार झाला. अमूक ठिकाणी अनैतिक संबंधातून कत्तल झाली. महत्वपुर्ण बाब ही की आज जरी समाजसुधारणा झाली असली तरी कोणीही प्रेम करु नये वा प्रेम करुन विवाह करु नये. कारण काळ बदललेला नाही. काळाचं परीवर्तन नक्कीच झालं. परंतु त्यात सुधारणा होण्याऐवजी अधोगती झाली व त्यानुसार आज त्याचे स्वरुप महाभयंकर, विनाशक बनलं. ते असं विनाशक बनलं की ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. हे तेवढंच खरं. आम्रपाली ही देखील अशाच प्रेमातून निष्पन्न झालेला एक भाग आहे असं निश्चीतच म्हणता येईल. तिची जी कोणी आई असेल, जिनं तिला जन्म दिला असेल, तिनं समाजाच्या भीतीनं तिला आंब्याच्या झाडात सोडलं असेल. त्यामागं तिच्यापासून तिला सुटकारा मिळणार होता व ती मोकळी सुटणार होती. ती मोकळी सुटलीही कारण तिला ते बाळ सोडतांना माहीत होतं की त्या भयाण जंगलात त्या आमराईत सहजासहजी कोणताच व्यक्ती एकटा जावू शकणार नाही. त्या बाळाला कोणी हिंस्र प्राणी खावून फस्त करेल. परंतु आम्रपालीचं नशीब हे काही फुटकं नव्हतं. ती गावातील एका गरीब व्यक्तीला सापडली व त्यानं तिला राजाला भेट दिलं व सांगीतलं की महाराज, मला हे बाळ आपल्याच राज्याच्या आमराईत सापडलेलं असून मी गरीब असल्यानं ह्या बाळाचं संगोपन करु शकत नाही. तेव्हा या बाळाचा आपण स्विकार करावा. त्याचं संगोपन करावं वा कुणाला ते बाळ दत्तक द्यावं. आम्रपालीचा जन्म साधारणतः इस पुर्व सहाशे ते पाचशेव्या शतकातील समजला जातो. तिला जन्म देणारे माता पिता हे अविवाहित प्रेमाचे साक्षीदार आहेत. समाजात असलेल्या भयाचा तिच्या आईवडीलांवर परिणाम झाला व त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिचा त्याग केला. तद्नंतर ते तिला विसरुन गेले. कारण त्या काळातील समाजघटक हा अशा स्रियांना कुलथा म्हणून संबोधत असत. आम्रपालीला त्या काळातील सामंत असलेल्या माली महानामन या गृहस्थानं पाहिलं. त्याला कोणतीही संतान नव्हती. म्हणूनच त्यानं तिला स्वतःच वाढविण्याचं ठरवलं. माली महानामननं आंब्याच्या आमराईत आम्रपालीला पाहताच त्यानं त्या बाळाला उचललं व त्यानं घरी आणलं. तसं,त्यानं आपल्या पत्नीला त्या बाळाबद्दल सांगीतलं. तेव्हा पत्नी म्हणाली, "आपण एक सामंत आहात व हे बाळ आपल्याला सापडलं आहे. तेव्हा आपण या बाळाला राजाकडे सुपुर्द करावं. नाहीतर राजाला ही गोष्ट माहीत झाली की तो राजा आपले शिरच्छेद करुन टाकेल." "अगं आपल्याला पुत्र नाहीत आणि तू हे बाळ राजाला दे म्हणतेस. " "परंतु हे बाळ जर आपण राजाच्या सुपुर्द केलं नाही तर आपला शिरच्छेद होणार नाही का?" माली महानामनच्या पत्नीचे ते शब्द. त्यावर माली महानामननं बराच विचार केला व तो आपल्या पत्नीला म्हणाला, "वेडी झाली की काय तू? अगं मी जर या सापडलेल्या बाळाबद्दल राजाला सांगीतलं ना. तर राजा काय करणार माहीत आहे?" "काय करणार आहे राजा? उलट आपणच त्यांना हे बाळ दत्तक म्हणून मागून घेवू." माली महानामन हा वैशालीचा सामंत होता व त्याला वैशाली नगरीचे कायदे माहीत होते. वैशाली नगरीचा कायदा होता की अशी मुलं जर सापडली तर अशा मुलांना कुलथेची मुलं समजून त्यांची हत्या केली जात असे. त्यातच आम्रपालीला जसं त्या आंब्याच्या आमराईत माली महानामननं पाहिलं. त्यानं तिला उचललं. तसं त्याला आठवलं की वैशालीच्या राजाला जेव्हा या मुलीबद्दल माहीत होईल. तेव्हा राजा या मुलीला जीवंत ठेवणार नाही. मग त्याला तसं वाटताच त्यानं वैशाली नगर सोडायचा निर्णय घेतला होता. हे त्याला आठवताच तो आपल्या पत्नीला म्हणाला, "अगं, जर हे बाळ राजाला माहीत झालं की हे बाळ आपलं नाही. आपल्याला सापडलेलं आहे तर ते या बाळाला एका कुलथेचं बाळ समजून याची हत्या करतील. त्याचं पाप आपल्याला लागेल." "परंतु काळानंतर उद्या एखाद्या दिवशी राजाला ही गोष्ट माहीत झाली तर?" "तोच तं विचार करतोय. जर तसं माहीत झालं तर राजा आपण हे लपविल्याबद्दल आपल्याला शिक्षा म्हणून देहदंड देईल. त्यापेक्षा आपण हे नगरच सोडायचं. दूर राहायला जायचं. म्हणजे राजालाही या बाळाची भनक लागणार नाही." महानामन बोलून गेला खरा परंतु ती गोष्ट त्याच्या पत्नीला पटली होती व त्यांनी त्या बाळाला घेवून वैशाली नावाचं नगर सोडलं व वैशाली नगरीतच एका लहानशा गावी ते अधिवास करु लागले. ज्याचं नाव अंबाला होतं. ते गृहस्थ अंबाल्याला येताच त्यांनी तिचं नामकरण करण्याचं सुचवलं. त्यातच ती आंब्याच्या झाडात सापडल्यानं तिचं नावही अंबा ठेवावं असं काहींकडून सुचवलं गेलं. काहींनी अमरा हे नाव ठेवायचं सुचवलं. तर काहींनी पल्लवी ठेवायचं सुचवलं तर काहींनी पाली. त्यानंतर तशीच नावं ठेवण्यात आली. परंतु कालांतरानं अशी वेगवेगळी तिची नावं असण्यापेक्षा दोन्ही नावाला जोडून तिचे वडील तिला आम्रपाली म्हणू लागले. जे ना नंतर प्रचलीत झालं. आम्रपाली ही जेव्हा लहानशीच होती. तेव्हा ती आपल्या सवंगड्यासोबत वेगवेगळे खेळ खेळत असे. तसा तिच्या बालपणीच तिला एक मित्रही मिळाला होता. ज्याचं नाव होतं. पुष्पक कुमार. तो तिच्या बालपणातील मित्र. त्याचेसोबत खेळतांना तिला फार मजा यायची. त्यातच त्याच लहानपणी पतीपत्नीचे खेळ खेळतांनाही आम्रपालीला मदत करीत असे. आम्रपाली लहानपणी भित्री होती व ती भित्री जरी असली तरी तिला पुष्पक कुमार थोडा धीर, देत असे. तिची काळजी घेत असे. ज्यामुळं पुष्पक कुमार तिला आवडायला लागला होता लहानपणापासूनच. मग पुष्पक कुमारवर तिचं प्रेम कसं जडलं व बालपण कसं संपलं हे काही तिला समजलंही नाही. ***************************** ते अंबाला गाव व त्या गावात आम्रपाली लहानाची मोठी होवू लागली होती ती आपल्या आईला घरकामात मदत करु लागली होती. तशीच ती आपल्या वडीलाच्याही कामात मदत करीत असे. आम्रपाली लहान होती तेव्हापासूनच पुष्पक कुमार तिचा मित्र बनला होता. आता ती तरुण झाली होती व पुष्पक कुमार तिचा मोठेपणीही मित्र म्हणूनच वावरत होता. आम्रपाली सुंदर होती व तिला नृत्यही चांगलं करता येत होतं. तिला आवडत होता पुष्पक कुमार. ज्याला नृत्य करता येत होतं. त्यातच वाटत होतं की आपला विवाह हा पुढील काळात पुष्पक कुमारशीच व्हावा. तशी ती स्वप्न रंगवतच असे कधीकधी, आपल्या मनामध्ये. तसे स्वप्न रंगवतांना तिला अगदी हेवा वाटत होता. आम्रपाली जेव्हा लहान होती. तेव्हा तिला मैत्रीणी भरपूर होत्या. परंतु तिला मित्र एकच होता. ती त्याचेवरच प्रेम करु लागली होती. तशी ती तरुण होताच ती अधिकच सुंदर दिसत असल्यानं तिच्यावर कित्येक तरुण फिदा होत असत. त्यातच तिला फक्त पाहण्यासाठीच तिच्यासमोर कित्येक तरुणांची रांग लागत असे. परंतु ती त्या तरुणांना चाहात नव्हती. चाहात होती ती आपल्या मित्राला. ज्याचं नाव पुष्पक कुमार होतं. मात्र आम्रपालीच्या सौंदर्याची चर्चा ही परीसरात दुमदुमली होती. तशी ती त्या राज्याच्या राजा मनुदेव यांच्याही कानावर गेलीच होती. तोही तिला चाहायला लागला होता. मनूदेव हा वैशालीचा राजा होता. जसे इतर बरेच तरुण आम्रपालीला चाहायला लागले होते. तसं मनुदेवलाही आम्रपाली आवडायला लागली होती. वाटत होतं की त्याला आम्रपाली केव्हा केव्हा मिळते आणि केव्हा केव्हा नाही. त्याच गोष्टीची चिंता त्याला सतावायला लागली होती. त्याच गोष्टीची चिंता त्याला सतावत असतांना त्यानं तिची माहिती काढली व माहितीनुसार त्याला कळलं की आम्रपाली ही एका पुष्पक कुमार नावाच्या मुलावर प्रेम करते. मग काय, त्यानं एक योजना बनवली. ते वैशाली राजधानी व त्या राजधानीचं ते वज्जी राज्य नव्हे तर ते गणराज्यच होतं. त्या गणराज्यात लिच्छवी वंशाचे लोकं राहात होते. तसे इस पुर्व सहाशे ते पाचशेव्या शतकात सोळा गणराज्ये अस्तित्वात आली होती. ज्यात राजाला व मंत्रीमंडळाला प्रतिनिधी समजून राज्य चालवलं जात असे. शिवाय त्या गणराज्यासाठी सोई सवलती पुरविण्यात येत असत. राजा हा देवच असण्याची व तसं मानण्याची संकल्पना नष्ट झाली होती. आता लोकं राजाला देव समजत नसत व राजा म्हणेल, तीच पुर्वदिशा न मानता जनता म्हणेल ती पुर्वदिशा मानण्यात येत असे. त्या सोळा गणराज्यात काही लोकप्रिय महाजनपद अंग, मगध, काशी, कोसल, वज्जि, मल्ल, चेदि, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सुरसेन, अस्माक, अवंती, गांधार आणि कंबोज यांचा समावेश होतो. त्यात लिच्छिवी, मल्ल, शाक्य, वज्जि हे विशेष महत्वाचे गणराज्य होते. पुर्वी या हिंदुस्थानात राजा असायचा व राजा हा तुकड्यातुकड्यांचा प्रमुख असायचा. ज्यांच्यावर परकीय टोळ्या यायच्या आत सतत हमले करुन निघून जायच्या. जेव्हा असे हमले होत. त्यावेळेस प्रजेची हानी व धुळधानी होत असे. कारण त्या परकीय लोकांच्या आक्रमणाला एकट्याच राजाला तोंड द्यावं लागत असे. त्याला इतर आजुबाजूचे कोणतेच राजे मदत करीत नसत. हे सर्व राजांना माहीत झालं. त्यानंतर सर्व राजांपैकी काही राजांनी एकत्र येवून यावर विचार विमर्श केला व एक गणराज्य स्थापन केलं. ज्यात अनेक राज्ये एकत्र आली व ठरलं की असे जर आक्रमण झालेच तर कोणी वाट पाहात बसायचं नाही. आपण एकमेकांना मदत करायची. तसंच आपण जर एकत्र राहिलो वा लढलो तर कोणत्याही परकीय टोळ्या आपल्यावर सहजासहजी आक्रमण करणार नाहीत. हे हिंदुस्थानात निर्माण झालेले सोळा राजे व त्या सोळा राज्यातील लोकं एकत्र येवून एक गणराज्य स्थापन झालं. परंतु ते राजे गणराज्यात जरी समाविष्ट झाले असले तरी त्यांचे विचार स्वतंत्र्य होते. हं, काही नियम होते की जे सर्वांना मानावे लागत असत. त्याव्यतिरिक्त निर्णय घेणे वा राज्य चालविणे, राज्यकारभार करणे, कर वसूल करणे, पर्यायानं सांगायचं झाल्यास गणराज्याची संकल्पना एखाद्यावेळेस कोणत्याही स्वरुपाचं संकट निर्माण झाल्यास त्यासाठी होती. बाकी राज्यकारभार किंवा इतर कोणत्याही बाबतीत कोणतेही राज्य वा राजे एकमेकांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ करीत नसत. शिवाय आता जरी जे राज्य त्या गणराज्य व्यवस्थेत सहभागी झाले होते, त्यांना आता नवीन नाव देण्यात आलं होतं. ते नाव होतं महाजनपद. प्रत्येक महाजनपदाची राजधानी वेगवेगळी होती. त्यातच सर्व राज्याचा स्वतंत्र्य कारभार हा त्या त्या महाजनपदानुसार चालत असे. महाजनपद याचा अर्थ होता राज्य. ते राज्य महाजनपद या नावानं ओळखलं जाई. महाजनपद म्हणजे एक राज्य होतं व त्याचीही एक राजधानी होती. परंतु अशी अनेक महाजनपदे एकत्र आली होती होती व त्यांनी सर्व मिळून एकच गणराज्य बनवलं होतं. ज्याची सर्व मिळून एकच राजधानी होती वैशाली. जी वैशाली वज्जी या गणराज्याचीही राजधानी होती. समजा एखाद्यावेळेस एखाद्या संकटावर विचारविमर्श करायचा असल्यास सर्व राज्ये वैशालीला येत व त्याच वैशाली राजधानीत त्या राजांची व त्याचसोबत येणाऱ्या सर्व सामंतांची आरास केली जायची. त्या आवभगतमध्ये जेवनासोबतच काही स्रियांचा नृत्याचा कार्यक्रम व्हायचा. त्या राजांना कंटाळवाणं वाटू नये म्हणून. शिवाय त्या त्या राज्यांच्या व्याभिचारासाठी ही महिला आपलं नृत्य सादर करीत असे. तिच्या जोडीला काही आणखी स्रिया असत. परंतु जी महत्वपुर्ण असे. तिला नगरवधू म्हणत. ही नगरवधू अतिशय सुंदर असे. आज आपला भारत संघराज्य स्वरुपाचा आहे व या संघराज्यात इतर काही बरेच राज्य जोडलेले आहेत. त्यातच त्या त्या राज्यात अनेक राज्य समाविष्ट झालेले आहेत. त्या राज्यावर काही संकट आल्यास केंद्र त्यांना मदत करते. शिवाय प्रत्येक राज्याची राजधानी एक नाही. ती वेगवेगळी आहे. मात्र संघराज्याची राजधानी फक्त एक आहे. तीच संकल्पना त्याकाळातही होती. मात्र आजच्या गणराज्याची वा संघराज्याची जेव्हा सभा संसदभवनात होते. तेव्हा सगळ्या राज्यातील काही विशेष मंडळी जात असतात. त्यांचं मनोरंजन करायला नगरवधू नाही की जी त्या राज्यांच्या प्रतिनीधींचं मनोरंजन करेल.तेवढाच एक फरक आहे. आम्रपाली अशीच एक नगरवधू. तिचं प्रेम होतं पुष्पक कुमारवर व तिनं आपल्या मनात स्वप्न रंगवली होती की आपण आपला पती म्हणून पुष्पक कुमारची निवड करावी व आपण त्याचेशीच विवाहबद्ध व्हावं. परंतु ते काही नियतीला मंजूर नव्हतं व नियतीनं आपलं कालचक्र फिरवलं. त्यानंतर जे घडलं. त्याचा विरोध खुद्द आम्रपालीही करु शकली नाही. आम्रपाली दिसायला सुंदर होती. ती सडपातळ होती. उंचपुरी होती. गोरा रंग होता. तिला पाहताच कोणताही व्यक्ती मोहीत होवून जायचा व तिचं त्याला वेड लागायचं. तेच वेड इतर बर्‍याच तरुणांना लागलं होतं. ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ती होती. तसं पुष्पक कुमारला तिचं वेड नव्हतं. परंतु पुष्पक कुमार तिला आवडायचा. पुष्पक कुमार तिच्यावर प्रेम करु लागला होता व त्याची चर्चा कधीकधी घरातही होत असे. त्यातच पुष्पक कुमार तिचा जे पाल्य वडील होते महानामन. त्यांनाही आवडू लागला होता. तसा पुष्पक कुमार देखील उंच आणि सडपातळ असून तिला शोभणाराच होता. त्यातच महानामनला वाटत होतं की आपली मुलगी उपवर होताच आपण तिचा विवाह पुष्पक कुमारशी करावा. तोही आपल्या मुलीसारखेच तिच्या विवाहाचे तेही पुष्पक कुमारशी विवाह करण्याचे स्वप्न पाहातच होता. परंतु अशातच माशी शिंकली. काळ हळूहळू ओसरत चालला होता. पुष्पक कुमारचे तिला भेटणे व तिचे त्याला भेटणे आता सुरु झाले होते. कालप्रवाहाच्या अग्नीत जळत होते ते. प्रेमाचीही अंगार दोघांमध्ये लागलीच होती. तरुण होताच ते काही दिवस लपून चोरुन भेटत असत एकमेकांना. समाजाला ती गोष्ट माहीत होवू नये म्हणून. परंतु आता तिच्या वडीलाची स्विकृती मिळताच ती पुष्पक कुमारशी आता चोरुनलपून नाही तर उघडपणे भेटू लागली होती. ***************************** आम्रपालीला आठवत होता तिच्या आयुष्याचा काळ. जेव्हा आम्रपाली जेव्हा वीस वर्षाची झाली होती. तेव्हा घरात विवाहाचं वातावरण निर्माण झालं होतं. घरी तिच्या विवासाची चर्चा सुरु झाली होती. तोच तिनं आपल्या पाल्यपित्याला प्रश्न केला. तो प्रश्न हिंमतीचा होता. तिनं म्हटलं होतं, "पिताश्री, माझी इच्छा पुष्पक कुमारशी विवाह करण्याची आहे. मला पुष्पक कुमार आवडतो व त्याच्याच घरी मी सुखी राहू शकेल." ते तिचं बोलणं. त्यावर तिचे वडील महानामन म्हणाले, "नाही बेटा, आपण त्याच्याहीपेक्षा चांगला राजकुमार पाहू तुझ्यासाठी. तू सुंदर आहेस. तुझ्याशी विवाह करायला शेकडो मुलांची मागणी घालतात. आपण तुझ्यासाठी एखादा राजबिंडा पाहू." ते वडीलाचं उत्तर. त्यावर आम्रपाली म्हणाली, "नाही पिताश्री. महालात काही सुख नसतंच अन् प्रेमही नसतंच महालात. राजाला अनेक पत्नी असतात. तो काही एखाद्या पत्नीची इच्छापुर्ती करु शकत नाही. राजा हा एखाद्यावेळेसच भेटण्यासाठी येतो आपल्या पत्नीला. मग जनानखान्यात सोडून देतो. मी एखाद्या राजकुमाराशी विवाह करुन सुखी राहूच शकणार नाही. तेव्हा मी पुष्पक कुमारशीच विवाह करणार." मुलीचा तो महानामनजवळ विवाहाचा हट्ट. ती मानायलाच तयार नव्हती. म्हणूनच की काय, पुष्पक कुमारशी विवाह करण्याचा तिनं घाट घातल्यानं शेवटी महानामनला आपल्या मुलीच्या बोलण्यावर परवानगी द्यावी लागली व त्यानं तशी परवानगी दिली. आम्रपालीचा पुष्पक कुमारशी विवाह होणार आहे. ही चर्चा परीसरात दुमदुमली होती. तशी ती सुंदर आहे, याचीही चर्चा अंबाला गावाव्यतिरीक्त परीसरात दुमदुमली होती. एखादं फुल फुलावं व त्याचा सुगंध परीसरात दरवळावा तसं तिच्या जीवनाचं होवून गेलं होतं. सर्व वर्ग, ज्यात वृद्ध लोकंही आम्रपालीला पसंत करायला लागले होते. त्यातच त्याच आम्रपालीची चर्चा वज्जी गणराज्याचा राजा मनुदेवपर्यंत पोहोचली. मग काय, त्यानं एक योजना बनवली व तसा प्रस्ताव त्यानं आम्रपालीकडे पाठवला. प्रस्ताव होता की आम्रपालीला नगरवधू बनविण्यात येत आहे. याचाच अर्थ असा की आम्रपालीला वैशाली नगराचं जनकल्याणीपद सोपविण्यात येत आहे. तिनं त्या प्रस्तावाला स्विकृती द्यावी. राजा मनुदेव हा लिच्छवीचा सम्राट होता. लिच्छवीची राजधानी वैशाली होती. अर्थात आम्रपाली वज्जी गणराज्याची जनपदकल्याणी बनणार होती. जनपदकल्याणी अर्थात तिला कोणत्याही पुरुषाशी विवाह करताच येणार नाही आयुष्यभर. जनपदकल्याणी अर्थात असं पद होतं की तिला राज्यात सर्व सुविधा प्राप्त होत असत तिच्या आधीन सर्व राजे रजवाडे असायचे. सामंत वा सर्व प्रजाजन तिचा आदर करायचे. तिला मानसन्मान द्यायचे. तिची पोहोच मोठमोठ्या इतर राज्यातील राजांसोबत वा मोठमोठ्या उच्चविद्याविभूषित राजांसोबत वा अधिकाऱ्यांसोबत असायची. तिचा शब्द कोणीच कोणत्याही परिस्थितीत टाळू शकायचे नाहीत. परंतु ते जरी खरं असलं तरी त्यात एक फार मोठी कुटनीती होती. जनकल्याणीपद हे जरी सन्मानाचं असलं तरी आणि तिला जरी आयुष्यभर विवाह करता येत नसला तरी तिच्यावर अत्याचार होत असत. तिच्या नृत्याचा तर आनंद घेता येत असे. शिवाय तिच्याशी जोर जबरदस्ती करुन तिच्याशी प्रणयक्रिडाही करता येत असे. ती प्रणयक्रिडा करण्याचा अधिकार हा पदप्राप्त व्यक्ती, राजा, सामंत आणि श्रीमंत असणारे व्यक्ती घेत असत. याचा सरळ सरळ अर्थ होता की तिला राजमान्यता देवून नगरातील सरकारनं नियुक्त केलेली वेश्या बनवणं. ज्याला जेव्हा जेव्हा वाटेल, तेव्हा त्यांना तिच्या शरीराचा उपभोग घेता येईल. जनकल्याणीपदावर अशी स्री नियुक्त होत असे, जी सुंदर असे. जिला गायनकला येत असे. जिला नृत्य करता येत असे. जिच्याच सर्वच बाबी परीपुर्ण असायच्या. जनकल्याणीपद हे त्या स्रिच्या मनानुसार मिळत असे. काही स्रियांना वा मायबापांना ते पद सन्मानाचं वाटत असे. म्हणूनच ते सहर्ष त्या पदाचा स्विकार करीत असत. ते वैशाली नगर. त्या नगरातील श्रीमंत मुलं, राजकुमारं, वा इतर सर्व सामंतांची मुलं बिघडू नयेत. म्हणूनच जनकल्याणीचं पद सरकारनं निर्माण केलं होतं. त्याला राजमान्यताही दिली होती. त्यात त्यांचा स्वार्थ होताच. परंतु तो स्वार्थ दिसत नव्हता कोणाला. मायबापही आपल्या मुलीला सन्मान प्राप्त होते, म्हणून तिला वेश्यापणाच्या आगीत ढकलून देत असत आपल्या लाडक्या मुलीला. जे तिला अगदी बालवयात कळत नसे. परंतु जसजसे दिवस जात. तसतसं जनकल्याणीपद प्राप्त करणाऱ्या महिलेला जनकल्याणीपद का असतं, ते सारं कळायचं. ते अंबाला गाव व त्या गावातून एकदा आम्रपाली आणि तिच्या काही मैत्रीणी, सोबतच पुष्पक कुमार वैशालीला गेले होते. ज्या वैशालीत एकदा फाल्गुन महिन्यात एका यात्रेचं आयोजन केलं होतं. तसं पाहिल्यास दरवर्षी फाल्गुन मासात वैशालीला दिव्य मेल्याचं आयोजन केलं जात असे. यावर्षीही तिथं असंच आयोजन केल्या गेलं होतं व यावर्षी आम्रपाली व तिच्या मैत्रीणी पुष्पक कुमारसोबत गेले होते. तो वैशालीत तो उत्सव असायचा नमस्कार त्याच उत्सवात जनकल्याणीपदाबाबत निवडणूकही व्हायची. त्यातच त्या निवडणूकीत अनेक तरुणी भाग घ्यायच्या कारण ते पद सन्मानाचं असायचं. ज्यात नृत्य देखील सादर केलं जायचं. ते नृत्य आवडल्यास लोकं तिला जनकल्याणीपदाच्या लायक समजून तिची नियुक्ती करुन तिला त्या शिखरावर बसवत असत. आम्रपाली जशी वैशाली नगरात आपल्या मैत्रीणीसोबत गेली. तसा तिनंही त्या स्पर्धेत भाग घेतला व आपलं नृत्य सादर केलं. तिला त्यावेळेस फक्त नृत्य करायचं होतं. कारण तिला नृत्यकला अवगत होती. तिला हेही माहीत नव्हतं की तिचं नृत्य लोकांना आवडताच लोकं तिला जनकल्याणी पदावर विराजमान करतील. परंतु त्याचं झालं असं की तिनं जे नृत्य केलं. त्या नृत्यानं सर्वांना मोहीत करुन टाकलं. लोकं मदहोश झाले होते. त्यातच लोकांना तिचे हरणीसारखे डोळे, तिची हरिणीसारखी चाल, तिचं सुडौल यौवन आणि ते थिरकणं या साऱ्या गोष्टी लोकांना आवडल्या. ज्यातून जेव्हा निकाल लागला. तेव्हा तीच जनकल्याणी पदासाठी नियुक्त केली गेली. आम्रपालीला मिळालेलं जनकल्याणीपद. त्यातच ती त्या जनकल्याणीपदावर कार्य करु लागली होती. ती नृत्य करु लागली होती. दरम्यान आपल्या नृत्यानं दरबारातील मंत्रीगणांना व राजा मनुदेवलाही मंत्रमुग्ध करीत होती. आम्रपाली राजनर्तिका बनली होती. ती सर्वांना आपल्या नृत्यानं मंत्रमुग्धही करीत होती. तसा काळ निघून जात होता व त्या दरम्यान काही मंत्रीगणातील मंडळी तिच्या शरीराचा भोग घेवू पाहात होते. परंतु ती एक स्वाभिमानी स्री होती की तिनं आपल्या अंगाला त्या दरम्यानच्या काळात हातही लावू दिला नव्हता. ज्यात मनुदेवाचाही समावेश होता. जो लिच्छवीचा राजा होता. ते एक गणराज्य होतं व गणराज्य असल्यानं मनुदेव राजा जरी असला तरी तो तिच्या शरीराला हात लावू शकत नव्हता ना तिचा उपभोग त्याला घेता येवू शकत होता. त्यानं तिचं कौमार्य भंग करण्यासाठी कितीतरी वेळेस प्रयत्न केला होता. परंतु त्याला अपयश आलं होतं. शेवटी त्यानं विचार केला. आपण तिला असं फसवावं की ती त्यातून बाहेर निघूच शकणार नाही. शिवाय तिला नाईलाजानं का होईना, कौमार्य भंगसाठी तयारच व्हावं लागेल. शेवटी त्यानं एक योजना तयार केली. ती मनुदेवाची योजना. योजनेनुसार त्यानं आधी तिची गुप्त माहिती काढली व जाणून घेतलं की तिचं प्रेम एका तरुणावर आहे जो तिचा बालपणीचा मित्र आहे. तिचं,त्याचेवर निरतिशय प्रेम असून दोघंही विवाहबद्ध होणार होते. परंतु ती राजनर्तकी बनल्यानं ती बंधनात अडकली आहे. परंतु प्रेम काही कमी झालेलं नाही. शिवाय त्या दोघांचं प्रेम जरी असलं तरी तिचं कौमार्य भंग झालेलं नाही. मनुदेवाला मिळालेली आम्रपालीची माहिती. त्या माहितीनं तो प्रभावित झाला. त्यानंतर त्याला वाटलं की जर आपण तिचा प्रेमी असलेल्या पुष्पक कुमारला बंदी बनवलं व त्याबद्दल आम्रपालीला सांगून आपण तिचं कौमार्य भंग करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला तर...... वा मला कौमार्य भंग करु दे, नाहीतर तुझ्या प्रेमाची हत्या करणार अशी तिला धमकी दिली तर..... तर कदाचित आपण आपल्या योजनेत यशस्वी होवू शकू. राजा मनुदेव व त्याचा तो अघोरी विचार. तो त्याचा विचार त्याच्या मनातच राहिला नाही तर तो विचार कुविचारात बदलला व त्यानं सर्वप्रथम आम्रपालीचा प्रेमी पुष्पक कुमारला बंदी बनवलं, त्याचा कोणताच गुन्हा नसतांनाही. मग त्यानं तिला नृत्य करण्यासाठी आपल्या राजभवनात बोलावलं. ज्यात नृत्यसभेचं आयोजन केलं होतं व ज्यात अनेक मंत्रीगणांचा समावेश होता. ती योजना मनुदेवानं आखली, आम्रपालीला शंका येवू नये म्हणून. मग आम्रपालीनं नृत्य केलं. आम्रपालीचं नृत्य संपलंच होतं व ती तेथून निघणारच होती. तशी तिच्यावर मनुदेवाची नजर पडली. तिचं ते अमोल सौंदर्य पाहून आधीच कल्पनेनं विव्हळत असलेला मनुदेव तिला वास्तविक अवस्थेत पाहून तिच्या सौंदर्यानं घायाळ झाला. तसा विचार करु लागला. आज तर काही का असेना. आपण हिचं कौमार्य भंग करायचंच. मग काहीही होवो. तो तसा विचारच करीत होता. तोच काही वेळानं आम्रपाली आपल्या कक्षात पोहोचली. ती कक्षात होतीच व त्या कक्षात तिच्या काही मैत्रीणीही होत्या. तोच त्या कक्षेत राजा मनुदेव पोहोचला. त्यानंतर तिच्या मैत्रीणीला त्यानं आदेश दिला आणि म्हणाला की त्याला तिच्याशी काही गुपचूप वार्तालाप करायची आहे. त्यासाठी त्यांनी तो कक्ष सोडून बाहेर जावं. मनुदेव राजा होता व त्या राजाचा हुकूम हा वटहुकूमच होता. तो पाळणं अतिशय आवश्यक होतं. तशा त्या बाहेर पडल्या. राजा मनुदेव कक्षात पोहोचला होता अचानकपणे. तशी त्या कक्षात आम्रपाली एकटीच होती शेळीसारखी. एकाद्या हिंस्र भेडीयाच्या मधात एकच शेळी जशी सापडते तशी. तशी ती लाचारच होती आणि तेवढीच असहाय्यही. तोच तिनं मनुदेवाला पाहिलं व ती घाबरली कारण आता तिच्या कक्षात कोणीच नव्हतं व ती असहाय्य होती. परंतु तेवढीच हिंमत बांधून तिनं आपला स्वाभिमान जागवला होता. काहीही झालं तरी त्या मनुदेवाचा मनसुबा काही साध्य होवू द्यायचा नाही. शेवटी तसा विचार करुन ती जरी घाबरली असली मनुदेवाला. तरी ती शांत होती व चेहर्‍यावर कोणत्याही स्वरुपाचं भय येवू दिलं नाही वा दिसू दिलं नाही. त्या आम्रपालीच्या मैत्रीणी कक्षाबाहेर पडताच राजा मनुदेव आम्रपालीला म्हणाला, "आम्रपाली, आज मी तुझं कौमार्य भंग करण्यासाठीच आलो आहे. बोल तुझं यावर मत काय?" आधीच घाबरलेली आम्रपाली. त्यातच इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता थेट प्रश्न फेकलेला तो मनुदेव. त्याची ती पिशाच्च वृत्ती. त्यातच त्यानं विचारलेला तो पिशाच्चासारखा प्रश्न. संकट आलं होतं. आता त्यावर काय उत्तर द्यावं ते तिला सुचत नव्हतं. कारण आज ती त्याच मनुदेवाच्या जाळ्यात अडकली होती. आम्रपालीसमोर धिप्पाड देहाचा तो मनुदेव. त्यातच त्यानं म्हटलेले शब्द. त्यावर संयम राखत ती म्हणाली, "कौमार्य आणि माझं! ही काय खेळगंमत आहे काय? आपण हे शब्द कसे बोललात? आपल्याला हे शब्द शोभत नाहीत. आपण राजे आहात व प्रजेचं रक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे." "आम्रपाली, तू मला ज्ञानाच्या गोष्टी पाजू नकोस. तू एक नगरवधू आहेस आणि नगरवधूचं कर्तव्य काय असतं ते तू जाणतेसच. लक्षात घे नगरवधू ही एक गणिकाच असते. अन् गणिकेचं काम असतं आपल्याजवळ येणाऱ्या सर्व लोकांची हौस भागवणं. मग ती शारीरिक भोगाची इच्छा का असेना." "असं जर आहे तर सावधान माझं कौमार्य भंग करण्याचा प्रयत्न केला तर. मी नगरवधू बनली फक्त राजनर्तिका म्हणून. मी अजुनही गणिका बनली नाही आणा बनणारही नाही की कोणीही ऐरागैरा येवून माझ्या शिलत्वाचं हरण करुन जाईल. मग आपल्यासारखे राजे का असेना. मी मरणं पसंत करेल. परंतु आपल्यासारख्याचा सहवास पसंत करणार नाही." आम्रपाली त्वेषानं बोलली. तसं तिनं तिच्या कमरेला असलेलं कट्ट्यार उपसलं. प्राचीनकाळी स्वसंरक्षण म्हणून स्रिया आणि पुरुषही कमरेला तलवार वा एखादी लहानशी कट्ट्यार ठेवत असत. ती कट्ट्यार आम्रपालीच्या कमरेलाही होती. तिनं तीच कट्ट्यार उपसली होती व तशी कट्ट्यार उपसताच मनुदेव तिला म्हणाला, "खुशाल घे आपला जीव आणि आम्ही तुझ्याबरोबर त्याचाही जीव घेणार." "त्याचा, अर्थात!" मनुदेवनं त्याचा शब्द वापरुन तिला बुचकळ्यात टाकलं होतं. तो नेमका कोण? असा प्रश्न तिला पडला होता. तसा प्रश्न तिला पडताच तिला विस्मयता वाटणारच. तशी विस्मयता वाटताच तिनं प्रश्न केला. तसं,त्यानं तिला उत्तर दिलं. "अर्थात तो तुझा प्रेमी." "कोण प्रेमी?" "पुष्पक कुमार. तो प्रेम करते ना त्याचेवर?" "नाही तर." "मला सगळं माहीत आहे आणि हेही लक्षात घे की आम्ही याक्षणी त्याला इथं कैद केलंय." "म्हणजे?" "आम्ही कैद केलंय त्याला. आम्हाला माहीत होतं की तू त्याची पाळलेली मांजर असून तू सहजासहजी आमच्या हातात लागणार नाही. म्हणूनच आम्ही त्याला कैद केलं." "परंतु मी सहजासहजी तुमच्या हातात येणार नाही आणि काय करणार आहात त्याचं?" "आम्ही त्याची हत्याच करुन टाकू. जर मला तुझं कौमार्य भंग करता आलं नाही तर......." ते मनुदेवाचे शब्द. परंतु त्या शब्दावर तिचा विश्वास नव्हता. तशी ती म्हणाली, "मला नाही वाटत की तुम्ही त्याला कैद केलं असेल?" "पाहायचं आहे तुला?" "होय, मी त्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास तरी कसा ठेवणार?" "ठीक आहे. तुझ्या अविश्वासाची पुर्ती होईल आणि तेही याक्षणी." मनुदेवानं ते शब्द फेकले. तशी त्यानं तिला त्याच्या ताब्यात असलेल्या पुष्पक कुमारची पुष्टी करण्यासाठी तिला बंदिगृहात नेलं व दाखवलं की त्यानं पुष्पक कुमारला बंदी केलं आहे. तशी पुष्पक कुमार तिच्याकडे दयेची भीक मागत होता. ते पाहून तिला त्याची दया आली व ती त्याचेजवळ गेली. म्हणाली, "चिंता करु नकोस. मी तुला वाचवणार. मी तुला तुरुंगाच्या बाहेर काढणार." ते तिचे शब्द. तशी झटक्यात पलटून ती मनुदेव जिथं उभा होता. तिथं आली. त्याला कन्वतेनं ती म्हणाली, "ठीक आहे. मान्य आहे तुमचा प्रस्ताव. परंतु आधी पुष्पक कुमारची सुटका." ते तिचेच शब्द. त्यावर विचार करीत मनुदेव म्हणाला, "नाही, तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा. मी त्याला सोडलं आणि तू पळून गेली तर? आधी कौमार्यभंग. मगच तुझ्या प्रेमाची सुटका." "मी नगरवधू आहे. राजनर्तिका. मी तुमच्यासारखी नाही. हे वचन आहे माझं. मी कधीच पळून जाणार नाही. अन् पळूनही कशी जाणार. शेवटी मी तुमच्याच ताब्यात आहे ना. मला तुम्ही केव्हाही पकडू शकता." ते तिचे मनुदेवासोबत बोललेले शब्द. ते तिनं त्याला दिलेलं वचन. त्यावर त्या मनुदेवानं तिचं ऐकलं व तिच्याच डोळ्यासमोर त्यानं पुष्पक कुमारची सुटका केली व पुष्पक कुमार तेथून निघून गेल्यावर तो तिला म्हणाला, "मी माझं वचन पाळलं. आता तू तुझं वचन पाळ. आता तू आपल्या कौमार्य भंगसाठी तयार हो." मनुदेव बोलला. मनुदेव बोलून गेला. तसं तिनं मानेनच होकार दिला. तशी ती कक्षात गेली परंतु जाण्यापुर्वी ती मनुदेवाला म्हणाली, "तुम्ही जिंकलात. मी हारले. या आता शयनगृहात. मी तुमची वाट बघते." आम्रपाली शयनगृहात गेली होती. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात मनुदेव तिच्या कक्षात आला. त्यानं पाहिलं की आम्रपाली एका नववधूसारखी सजलेली आहे. तिनं नववधूसारखा साज परीधान केलेला आहे आणि पुर्णरुपात ती कौमार्य भंगसाठी तयार आहे. तसं दिसताच तो तिच्याजवळ गेला. तिचा हात हातात घेतला. ती मात्र निपचीत होती. विचार करीत होती आपल्या प्रारब्धाचा. ज्या प्रारब्धानं तिला एका नगराची नगरवधू बनवलं होतं नव्हे तर आज ती एका जणू गणिका जीवनाची सुरुवात करणार होती. **************************** आम्रपालीचे ते शरीर. ती वीस वर्षाची बालिका. तिची ती कौमार्य भंगता. तिच्या शरीरावर एका राक्षसासारखा मनुदेव वार करीत होता. तिच्या शिलत्वाचं हरण करीत होता नव्हे तर एखादं जनावर जसा शरीराचा फडशा पाडतो. तसा तो तिच्या शरीराची लक्तरं तोडत होता. अन् ती मात्र गुपचूप ते सगळं सहन करीत होती. आज तिचं स्वप्न भंगले होतं. कारण तो तिच्या देहाचा सौदा होता व तो सौदा मनुदेवानं केला होता. बदल्यात तिनं आपला प्रेमी पुष्पक कुमार, त्याची सुटका केली होती. आम्रपालीला आठवत होता तो कौमार्यापुर्वीचा काळ. आठवत होता तो कौमार्य भंग करणारा मनुदेव. अन् आठवत होता त्याचेवर बदला घेण्याचा तिचा निर्धार. तिला वाटत होतं त्या मनुदेवाचे बोललेले ते बोल. जर तू तुझं कौमार्य भंग करु दिलं नाही तर आम्ही तुझ्याच प्रियकराला कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या आरोपात अडकवू व त्याला थेट मृत्युदंड देवू. त्यातच तिला आठवत होता, तिनं केलेला तो विचार. तो विचार होता जर गणसभेत तिनं पुष्पक कुमारवर आपलं प्रेम आहे हे सांगीतलं तर वा त्यावर मनुदेवाच्या कपटाबद्दल जरी सांगीतलं तरही गणसभा आपलं ऐकून घेणार नाही व आपल्यालाच मृत्युदंड देईल. असाही मृत्यु आणि तसाही मृत्यु. शिवाय ती हेही त्या गणतंत्र्य सभेत सांगू शकत नव्हती मनुदेवाबद्दल की तो तिचं कौमार्य भंग करणार आहे. ते उत्तर त्यात बसतच नव्हतं. कारण एका नगरवधूचं कर्तव्यच होतं की राजा, सामंतगण वा श्रीमंत यांच्या कोणत्याही इच्छा पुर्ण करणे. त्यात कौमार्य भंग हा मुद्दाही बसत होता. शिवाय तिचं प्रेम पुष्पक कुमारवर आहे, हे गणतंत्र्य सभेला माहीत झाल्यास ती सभा तिचं वा पुष्पक कुमारचं काहीही न ऐकता दोघांनाही मृत्युदंड देवू शकणार होती. त्यामुळं ती पेचातच फसली होती. कारण तिला योग्य मार्ग सापडला नव्हता व सापडतही नव्हता. शेवटी तिनं हार मानली. गण म्हणजे समूह. साधारणतः राजाशिवाय चालविल्या जाणाऱ्या किंवा स्थूल अर्थाने जनमानसानुसार वा लोकनियंत्रणाखाली असणाऱ्या शासनपध्दतीस गणराज्य म्हणतात. प्राचीन हिंदुस्थानामधील गणराज्यांला लोकसत्ताक राज्य म्हणतात. येथे गणराज्य व लोकसत्ताक राज्य या दोन्हीही संज्ञा समान अर्थी म्हणून वापरल्या आहेत. कारण ते लोकांचे राज्य होते. म्हणून ते राज्य लोकसत्ताक. अन् ते गण अर्थात प्रतिनिधींद्वारे चालवले जात होते. म्हणून गणराज्य. ज्याला आज लोकशाहीचे राज्य म्हणतात. राज्यातील सार्वभौम सत्ता ही वंशपरंपरागत राजांऐवजी लोकांत अधिष्ठित असावी, अशी यामागील कल्पना होती. तेव्हा राजेपदाचा अभाव व जनतेच्या सहभागावर अथवा संमतीवर आधारलेले शासन, या दोन्ही अर्थांनी ही संकल्पना मांडली गेली. तथापि प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानातील अयुबखानाचा एकाधिकार, रशियातील स्टालिनची हुकूमशाही राजवट किंवा वंशभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिकेतील राज्य यांचेही वर्णन गणराज्य असेच करण्यात येते. तेव्हा विविध शासन पद्धतींची तुलनात्मक वैशिष्ट्ये लक्षात येण्याच्या दृष्टीने या संकल्पनेची उपयुक्तता कमी झाली आहे, हे उघड आहे. राज्यांचे वर्गीकरण तेथील सत्ताधाऱ्यांच्या संख्येवरून राजेशाही, उमरावशाही व लोकशाही असे केले आहे. लोकशाहीतील सत्तेचा उपयोग लोकहितार्थ केला जावा व नागरिकांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी व्हावे, असे एक लेखक महाशय म्हणतात. प्राचीन ग्रीसमधील अथेन्ससारख्या नगरराज्यांची शासनव्यवस्था लोकसत्ताक पद्धतीची होती. राज्यात महत्त्वाचे निर्णय सर्व नागरिकांच्या सभेत घेतले जात. त्याचप्रमाणे हे निर्णय अंमलात आणणारी समिती व राज्याचे अधिकारी हे लोकांकडूनच निवडले जात. न्यायनिवाडासुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत. परंतु या गणराज्यातील बहुसंख्य प्रजा ही गुलामांची असे. अथेन्समध्ये ३,००० पुरुष नागरिक तर १,३५,००० गुलाम होते. नागरी हक्कांपासून यांना वंचित ठेवण्यात येई. जरी सर्व नागरिकांना प्रमुख अधिकारी किंवा समितीचे सभासद म्हणून निवडून येण्याचा अधिकार असला, तरी प्रत्यक्षात काही वरिष्ठ वर्गातूनच हे लोक निवडले जात. ऑगस्टसचे साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी प्राचीन रोममध्येसुद्धा लोकसत्ताक राज्यपद्धतीच होती. मात्र शासन एक लोकप्रातिनिधिक संस्था असली तरी प्रत्यक्षात काही कुलांतील लोकच पिढ्यान् पिढ्या या अधिकारावर निवडून येत असत. अंतर्गत सत्तास्पर्धा आणि बाह्य आक्रमण यांमुळे ग्रीक व रोमन गणराज्ये कालांतराने अस्तंगत झाली आणि त्यांच्या जागी साम्राज्ये स्थापन झाली. परंतु भारतात त्याच गणराज्याचा कित्ता गिरवला गेला व महाजनपद आणि गणराज्य व्यवस्था अस्तित्वात आली. पौर्वात्य देशांत आणि विशेषतः पुर्वी हिंदुस्थानात लोकसत्ताक परंपरा वा गणराज्य पद्धतीच नव्हती, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु प्राचीन काळी हिंदुस्थानात सुद्धा राजेविरहित राज्ये होती, याचे पुरावे बौद्ध व जैन साहित्य, तसेच हिंदुस्थानात आलेल्या लेखकांनी लिहून ठेवलेली वर्णने, ऐतरेय ब्राह्मण साहित्य, महाभारत, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्याचे अर्थशास्त्र  इ. साहित्यांत यासंबंधीचे अनेक उल्लेख सापडतात. शिवाय या गणराज्यांच्या अनेक मुद्राही आता मिळाल्या आहेत. संघ किंवा गण या संज्ञांनी ही गणराज्ये ओळखली जात. यांतील बहुतांश गणराज्ये आजचे उत्तर बिहार, सिंधू नदीचे खोरे व वायव्य प्रांत या भागात होते. वेदोत्तर काळापासून जवळजवळ गुप्त काळापर्यंत त्यांचे अस्तित्व असावे. व्यक्तिप्रतिष्ठा किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना आजच्या लोकसत्ताक राज्यपद्धतीत अभिप्रेत आहे. तसेच व्यक्तीच्या मूलभूत समानतेची कल्पनाही यात अभिप्रेत आहे. प्राचीन भारतीय गणराज्यांत या दोन्ही गोष्टींचा प्रामुख्याने अभावच होता. चातुर्वर्ण्य, त्यांतील क्षत्रियांचे व काही क्षत्रिय कुलांचे श्रेष्ठत्व, त्यांचा स्वतःच्या वंशाबद्दलचा अहंकार या सर्व लोकसत्ताक राज्याच्या कल्पनेस बाधक गोष्टी होत्या. केवळ शासनपद्धतीचा एक प्रकार या अर्थानेच त्यांना गणराज्य म्हणावयाचे. परंतु प्राचीन ग्रीक व रोमन गणराज्यांतही अशीच परिस्थिती होती. अगदी एकोणिसाव्या शतकातसुद्धा अमेरिकन प्रजासत्ताक राज्यात बहुसंख्य निग्रो लोक गुलाम होते व त्यांना मताधिकार नव्हता. इंग्लंडमध्येदेखील विसाव्या शतकापर्यंत बऱ्याच नागरिकांना मताधिकार दिल्या गेला नव्हता. वैदिक कालात राज्यातील प्रमुख अधिकारी व ज्येष्ठ कुलप्रमुख यांच्याकडून राजा निवडला जात असे. कालांतराने या अधिकाऱ्यांच्या व राजाच्या सहकाऱ्यांच्या तुलनेने राजाचे अधिकार वाढले व राजेशाही वंशपरंपरागत झाली. परंतु काही ठिकाणी कुलप्रमुखांचा अधिकार राज्यपद्धतीचा स्थायीभाव झाला व त्यांतून त्यांचे गणराज्यात रूपांतर झाले असावे. कौटिल्याने अर्थशास्त्रात दोन प्रकारच्या संघाचा उल्लेख केला आहे. वार्ताशस्त्रोपजीवीसंघ व राजशब्दोपजीवीसंघ. वृक, दामणि, यौधेय हे पहिल्या प्रकारचे तर भद्र, वृजी, अंधक-वृष्णी इ. दुसऱ्या प्रकारचे संघ होत. पहिल्या प्रकारच्या संघात सर्व नागरिक लढाऊ असत. दुसऱ्यातील संघमुख्य नागरिकांस राजा ही उपाधी लावण्यात येई. अंधक-वृष्णी गणराज्यात अधिकार वासुदेव आणि उग्रसेन या दोन राजांना दिला होता. बौद्ध साहित्यात उल्लेखिलेली शाक्य, कोलिय, लिच्छवी, विदेह, मल्ल, मोरिय इ. गणराज्येही याच काळात असावीत. शाक्य गणराज्यात ५०० नागरिकांची सभा व निर्वाचित राजा होता, तर वृजी हे आठ राज्यांचे संघराज्य होते. त्यांत ७,७०७ राजांकडे सत्ता होती. अध्यक्ष, सेनापती वगैरे अधिकारी त्यातूनच निवडले जात. त्रिगर्तषष्ठ, पंचगण, सप्तगण हीसुद्धा अशा प्रकारची संघराज्ये होती. कठ गणराज्याने अलेक्झांडरशी लढा दिला. यौधेयच्या सामर्थ्यामुळे अलेक्झांडरच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. क्षुद्रक, मालव आणि शिबी ही गणराज्ये अलेक्झांडरच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी संघटित झाली होती. नंतर अलेक्झांडरशी तह करण्यासाठी त्यांनी आपल्या शंभर पुढाऱ्यांना सर्वाधिकार सुपूर्द करून पाठविले होते. यांशिवाय पटल, अंबष्ठ, भागल इ. गणराज्येही या काळातच अस्तित्वात होती.  मौर्यकाल ते इ. स. ३५० पर्यंतच्या काळात यौधेय गणराज्य अस्तित्वात असावे. सम्राट अशोकाच्या शिलालेखात योन, कांबोज, राष्ट्रिक, गांधार, पेत्तनिक, अपरान्त इ. गणराज्यांचा उल्लेख सापडतो. अर्थशास्त्रात कुरू, पांचाल, मल्लक, वृज्विक, लिच्छवी, मद्रक, कुकुर इ. गणराज्यांचे निर्देश आहेत.कात्यायनाने गणाची व्याख्या कुलसमूह अशी केली आहे, त्यावरुन सत्ता कुलांवर आधारलेली होती. परंतु वृष्णी गणराज्यात कुलप्रमुखाशिवाय भाऊ, मुले सर्वच सभेस हजर राहत. शाक्य गणराज्यात वयोवृद्ध व तरुण सर्वच सभासद असत. मात्र सर्व वर्णांच्या लोकांना राज्याधिकार होता असे दिसत नाही. प्रामुख्याने सत्ता क्षत्रियांकडेच असे. सार्वभौम सत्ता ही फक्त राज्य संस्थापक कुलांतच असावी. त्यांना राजन्य ही उपाधी लावण्यात येई. इतर क्षत्रियांना राजन हे नामाभिधान लावण्यात येई. उदा., शाक्य गणराज्यात या सत्ताधारी कुळातील लोक राजधानीत राहात व स्वतःस राजा म्हणवीत. अंधक-वृष्णी गणराज्यात श्वाफलक, चैत्रक, वासुदेव आणि शिबी यांचे वंशजच राजन्यक होते. यौधेयांसारख्या मोठ्या गणराज्यात सत्ता मोठ्या मध्यवर्ती सभेकडे असे. यौधेय गणराज्यात ५,००० तर लिच्छवी गणराज्यात ७,७०० सभासद होते. या कुलांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याने प्रतिनिधी निवडण्याचा प्रश्नच नव्हता. काही गणराज्यांत मात्र सर्वच क्षत्रिय राजकीय अधिकारांत सहभागी होते. त्यांना राजकगण असे संबोधिले जाई. इतर काही गणराज्यांत क्षत्रिय व वैश्य वर्णीयही सत्तास्थानी होते. याशिवाय राज्यकारभारासाठी कार्यकारी मंडळेही असत. मल्ल गणराज्यात चारजणांचे, लिच्छवीत नऊजणांचे, तर लिच्छवि-विदेह संघराज्यात अठराजणांची कार्यकारी मंडळे होती. अधिकाऱ्यांची नियुक्ती सभेकडून होत असे. क्षुद्रक गणात अलेक्झांडरशी वाटाघाटी करण्याचा अधिकार १५० दूतांना दिला होता. महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, गुप्तता राखण्यासाठी, सभेत न करता त्यासंबंधीचे निर्णय कार्यकारी मंडळाने घ्यावेत, असा सल्ला महाभारतात दिला आहे. परंतु गौतम बुद्धाने स्थापिलेल्या बौद्ध संघाची कार्यपद्धती त्या काळच्या गणराज्याच्या सभेच्या कार्यप्रणालीच्या धर्तीवर आधारलेली आहे. यावरून सभेची कार्यपद्धती गुंतागुंतीची आणि पुढारलेली होती असे दिसते. सभेसाठी सभासदांची किमान गणसंख्या आवश्यक असे. गणपूरक नावाचा अधिकारी यासाठी नेमलेला असे. सभेच्या अध्यक्षास संघमुख्य म्हणत. प्रस्ताव कोणत्याही सभासदाकडून मांडण्यात येई व मग त्यावर चर्चा होई. ठरावावर मतदानही घेण्यात येई. मतदान गुप्तपद्धतीने अथवा उघडपणे घेण्यात येई. याचाच अर्थ त्याही काळात प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय अप्रत्यक्ष लोकशाही पद्धती अस्तित्वात होती. मतदान पद्धतीत मतपत्रिकांना शलाका ही संज्ञा असे आणि त्या मतपत्रिका शलाकाग्राहक नावाचा अधिकारी गोळा करीत असे. उघड मतदानात ठरावाच्या विरोधी असणारेच बोलत. निर्णय बहुमताने घेण्यात येई.राजकीय महत्त्वाचे विषय सभेत चर्चिले जात. उदा. जेव्हा शाक्यांच्या राजधानीस कोसल राजाने वेढा घातला, तेव्हा युद्धासंबंधीचा निर्णय सभेतच घेतला गेला. शासनातील कार्यकारी अधिकारी, सेनापती सभेकडून निवडले जात. अधिकाऱ्यांवर सभेचे नियंत्रण असे. महाभारतात श्रीकृष्ण स्वतः सभेचा दास झाल्याची तक्रार करतो. अर्थशास्त्रात द्रव्याचा अपहार करणाऱ्यास अधिकारावरून काढले जावे व शिक्षा करण्यात यावी, असे आहे. ही सभा व या सभेच्या सर्व कार्यपद्धती लोकशाही परंपरेस अनुरूप होत्या, असे म्हणता येणार नाही. कोणती मतपद्धती वापरली जावी व सभेचा निर्णय काय झाला, या गोष्टी सभापती ठरवी. सभेने बहुमताने घेतलेला निर्णय जर धर्मविघातक आहे असे त्यास वाटले, तर झालेले मतदान बाद करण्याचा अधिकार त्यास असे. तीनदा मतदान घेऊनही जर निर्णय धर्मबाह्य आहे असे वाटले, तर तो दिवसच अशुभ आहे असे ठरवून दुसऱ्या दिवशी फक्त धर्मास अनुसरून बोलणाऱ्यांचेच मतदान घेण्यात येई. शलाकाग्राहक व सभापतीस दिलेल्या या अधिकारामुळे कधीकधी गुप्त मतदान अर्थशून्य ठरण्याची शक्यता असे. महाभारतातील शांतिपर्वात गणराज्याच्या शासनपद्धतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. त्यावरून गणराज्यात पक्ष वा गट होते असे दिसते. व्दंव्द (दोन पक्ष), व्युत्क्रमण तसेच वर्ग्य, गृह्य, पक्ष वगैरे शब्द त्यांना अनुलक्षून वापरले जात. पक्ष त्यांच्या नेत्यांवरून ओळखला जाई. उदा. अक्रूरपक्ष, वासुदेववर्ग्य. मात्र गटबाजी, वंशकलह व सत्तास्पर्धेतून निर्माण होणारा संघर्ष यांमुळे गणराज्ये बलहीन होत. आम्रपाली त्याबद्दल विचार करीत होती. ती नगरवधू बनली होती, तेव्हा तिला माहीत नव्हतं की नगरवधू हिला एका गणिकेसारखंही काम करावं लागतं. परंतु जेव्हा तिची अब्रु मनुदेवानं लुटली व तिचं कौमार्य भंग केलं. तेव्हा तिला माहीत झालं होतं की एका नगरवधूल गणिकेचंही काम करावं लागतं. तेव्हा तिची अक्कल तिला दोष देत होती की तू कशाला वैशालीला आली होती आणि कशाला तू स्पर्धेत भाग घेतला होता. आता तिला पश्चाताप येत होता जनकल्याणीपदाचा. अन् तेवढाच पश्चाताप येत होता तिला त्या नगराची नगरवधू बनण्याचाही. ती विचार करीत होती. "भीष्माने गणराज्यांना बाहेरील आक्रमणापेक्षा अंतर्गत दुहीचा धोका जास्त गंभीर आहे, असा इशारा दिला आहे. कौटिल्याने गणराज्यांत दुहीची बीजे कशी पेरावीत व त्यांना कसे जिंकावे, याबद्दल राजास सल्ला दिला आहे. दूत व हेराकरवी या भेदनीतीचा वापर कसा करता येईल, यासंबंधी त्याने अर्थशास्त्रात चर्चा केली आहे. संघप्रमुखांत फूट पाडून किंवा त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात संशय उत्पन्न करून किंवा त्यांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून गणराज्य दुर्बल होते व जिंकता येते. एरवी संघराज्यात लोकांची पिळवणूक होत नसल्यामुळे ती कठीण असतात. हे तो मान्य करतो. गौतम बुद्धाने असे अंतर्गत कलह कसे टाळावेत व गणराज्य समर्थ करण्यासाठी कोणती पथ्ये पाळावीत हे सांगितले आहे. जोपर्यंत वृजी गणराज्यात नेहमी सभा भरविली जाते, सर्वानुमतीने निर्णय घेतले जातात, परंपरागत संकेतांचे पालन केले जाते, वयोवृद्ध व परस्त्री यांना आदराने वागविले जाते, मंदिरांचे पावित्र्य रक्षिले जाते, तोपर्यंत गणराज्यास जिंकता येणार नाही असे तो म्हणतो. तर मग माझ्यासारख्या एका अबला स्रिची अब्रु या मनुदेवानं का लुटली? का भंग केले माझे कौमार्य? एका राजानं प्रजेचं रक्षण करणं गरजेचं असतांना त्याच राजानं नगरवधू म्हणून एका स्रिचं कौमार्य भंग करावं? अब्रु लुटावी? हे एका गणराज्याला वा गणतंत्र्यव्यवस्थेला शोभण्यासारखी वस्तू आहे काय?" तो तिचा विचार. तिचा विचार रास्त होता. "हे सर्व गणराज्य जेव्हा बनली असतील, तेव्हा त्या गणराज्यात ना नगरवधू म्हणून जनकल्याणीपद असेल. ना नगरवधू वा राजनर्तिकी पद असेल. परंतु तद्नंतरच्या काळात मनुदेवसारख्याच स्रीलंपट राजांनी आपल्या स्वार्थासाठी व स्रीचा उपभोग घेण्यासाठी जनकल्याणीपद वा राजनर्तिकी पद वा नगरवधू पद जाणूनबुजून निर्माण केलं असेल. त्या काळातील चांगल्या या गुणांचा ऱ्हास झाला असावा व तेथील जीवन असुरक्षित झाले असावे." आम्रपाली आता विचार करु लागली होती. परंतु आता तिचा विचार करुन काही उपयोग नव्हता. कारण तिचं सतीत्व आज भंग पावलं होतं आचारांगसूत्रांत जैन भिक्षूंनी गणराज्यांत संचार करू नये, असा आदेश दिला आहे. दंभ, अतीव औपचारिकता, रूढिप्रियता इत्यादींची वाढ झाली व त्यांतूनच बऱ्याच गणराज्यांचा विनाश झाला. स्वतःच्या वंशाच्या गर्वाने प्रेरित होऊन शाक्य गणांनी प्रसेनजित राजाचा पुत्र विदूदभ यास फसवून एका दासीकन्येशी त्याचा विवाह केला. त्याचा सूड म्हणून त्याने शाक्य गणराज्य धुळीस मिळविले. अजातशत्रूने वैशाली गणराज्य जिंकले. इतर बरीच गणराज्ये समुद्रगुप्ताने जिंकून घेतली. काही गणराज्यांच्या अधिकाराच्या जागा वंशपरंपरागत झाल्यामुळे त्यांचे राजेशाहीत रूपांतर झाले.मध्ययुगीन काळात इटलीत नगर-गणराज्ये अस्तित्वात होती. परंतु ती सर्व नवोदित राजेशाहींना बळी पडली. सतराव्या शतकात स्कॉटलंडमध्ये जॉन नॉक्सने, अठराव्या शतकात फ्रेंच विचारवंत रूसो याने गणराज्यपद्धतीचा पुरस्कार केला. जनतेचा सार्वभौम अधिकार आणि राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा हक्क, यांवर त्यांनी भर दिला. याच संदर्भात इंग्लंडमध्ये १६४२–६० आणि फ्रान्समध्ये १७९२–९५ ही अल्पायुषी गणराज्ये अस्तित्वात आली. क्रॉमवेलच्या निधनानंतर इंग्लंडमध्ये पुन्हा स्ट्यूअर्ट राजेशाही प्रस्थापित झाली, तर फ्रान्समध्ये गणराज्याचे रूपांतर नेपोलियनच्या साम्राज्यात झाले. आधुनिक गणराज्याच्या कल्पनेस १७७६ मध्ये अमेरिकेत मूर्त स्वरूप मिळाले. तेथील स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात जनतेचा शासन आणि शासनपद्धती ठरविण्याचा अधिकार व कोणतेही शासन जनसंमतीवरच आधारलेले असावे, हे विचार अत्यंत ठामपणे मांडले आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीची वैचारिक भूमिका रूसोने तयार केली होती. प्रत्येक नागरिकाचा राज्यकारभारात सहभागी होण्याच्या हक्काचा व जनतेच्या सार्वभौम अधिकाराचा त्याने हिरीरीने पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात जरी पुनःपुन्हा फ्रान्समध्ये राजेशाही स्थापन झाली, तरी ते अनुभव इतके कटू होते, की त्यामुळे फ्रेंच लोकांना राजेशाही व लोकसत्ताक राज्यपद्धती या दोन अंत्यंतिक पर्यायांतून लोकराज्यपद्धतीचीच निवड करावी लागली. इंग्लंडमध्ये लोकप्रतिनिधींकडे रक्तपाताशिवाय राजकीय सत्तेचे हस्तांतरण झाले. अशा देशात सत्ता जरी लोकप्रतिनिधींकडे असली, तरी राजेशाहीचे नाममात्र अस्तित्व मान्य करण्यात आले. पहिल्या महायुद्धात बऱ्याच राजेशाही देशांचा पराभव झाला व लोकशाही देशांची सरशी झाली. परिणामतः अनेक पाश्चिमात्य देशांत राजेशाही उलथून पडली आणि त्यांची जागा लोकसत्ताक राज्यपद्धतीने घेतली. उदा. रशिया, जर्मनी, तुर्कस्तान इत्यादी ठिकाणी असंच घडलं. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील संघर्ष मुख्यतः राजांच्या दैवी अधिकाराविरुद्ध लोकांचा सार्वभौम अधिकार या कल्पनेचा होता. पहिल्या महायुद्धानंतर हा वाद मिटला आणि लोकाधिकार निर्विवादपणे सिद्ध झाला. कालांतराने विसाव्या शतकात खरी सत्ता लोकांच्या नावावर काही हुकूमशहांनी बळकावली. लोकसत्ताकवादाच्या अतिरेकातूनच सर्वंकषवादी हुकूमशाहींचा जन्म झाला. यामुळे आज प्रत्यक्षात राजांविरुद्ध गणराज्य ही विभागणी जाऊन त्याऐवजी हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही असे वर्गीकरण रूढ झाले आहे. आम्रपालीचं ते कौमार्य भंग. आता आम्रपाली नित्यनेमानं सदैव विचारात असायची. वाटायचं की आपण मनुदेवाचा काटा काढायचा. त्याचा बदला घ्यायचा. कारण तो मनुदेव तिची इच्छा नसतांनाही तिचा उपभोग घेतच होता. त्यातच तो आता आपल्या सामंतांनाही तिला भोगायला लावायचा. ते त्याचं तिला भोगणं धमकीतून होतं. तो नित्यनेमानं धमकी देत असे की जर,तिनं,तसं करु दिलं नाही वा त्याच्या प्रस्तावाचा स्विकार केला नाही तर तो तिचा प्रेमी पुष्पक कुमारची हत्या करेल. अशातच तो दिवस उजळला. ज्या दिवसाची ती अतिशय तिव्रतेनं वाट पाहात होती. आम्रपालीला आठवत होता तो कौमार्यापुर्वीचा काळ. आठवत होता तो कौमार्य भंग करणारा मनुदेव. अन् आठवत होता त्याचेवर बदला घेण्याचा तिचा निर्धार. तिला वाटत होतं त्या मनुदेवाचे बोललेले ते बोल. जर तू तुझं कौमार्य भंग करु दिलं नाही तर आम्ही तुझ्याच प्रियकराला कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या आरोपात अडकवू व त्याला थेट मृत्युदंड देवू. त्यातच तिला आठवत होता, तिनं केलेला तो विचार. तो विचार होता जर गणसभेत तिनं पुष्पक कुमारवर आपलं प्रेम आहे हे सांगीतलं तर वा त्यावर मनुदेवाच्या कपटाबद्दल जरी सांगीतलं तरही गणसभा आपलं ऐकून घेणार नाही व आपल्यालाच मृत्युदंड देईल. असाही मृत्यु आणि तसाही मृत्यु. शिवाय ती हेही त्या गणतंत्र्य सभेत सांगू शकत नव्हती मनुदेवाबद्दल की तो तिचं कौमार्य भंग करणार आहे. ते उत्तर त्यात बसतच नव्हतं. कारण एका नगरवधूचं कर्तव्यच होतं की राजा, सामंतगण वा श्रीमंत यांच्या कोणत्याही इच्छा पुर्ण करणे. त्यात कौमार्य भंग हा मुद्दाही बसत होता. शिवाय तिचं प्रेम पुष्पक कुमारवर आहे, हे गणतंत्र्य सभेला माहीत झाल्यास ती सभा तिचं वा पुष्पक कुमारचं काहीही न ऐकता दोघांनाही मृत्युदंड देवू शकणार होती. त्यामुळं ती पेचातच फसली होती. कारण तिला योग्य मार्ग सापडला नव्हता व सापडतही नव्हता. शेवटी तिनं हार मानली. ***************************** मनुदेवानं आम्रपालीचं कौमार्य भंग केलं होतं. त्यातच आम्रपालीच्या इच्छेविरुद्ध ते काम झालं होतं. त्यामुळंच तिच्या मनात बदल्याची भावना विकसीत होवू लागली होती. अशी भावना विकसीत होत असतांनाच तिनं ऐकलं की राजा बिंबिसार मगधवरुन वैशालीला येणार आहे. मगध हे त्या काळातील एक शक्तीशाली राज्य होतं. ज्या राज्याचा राजा बिंबिसार हा अतिशय शुरवीर सम्राट असून तो शक्तीशालीही होता. शिवाय त्यानं कित्येक राज्यांना आपल्या अधीन केले होते. महत्वाकांक्षा होती, आपल्या साम्राज्यविस्ताराची. त्यानं या साम्राज्यविस्तारासाठी अनेक राज्यातील राजकन्येशी विवाहदेखील केले होते व ती राज्य आपल्या राज्याला जोडली होती. राजा बिंबिसारच्या सेवेसाठी कित्येक दास दासी नियुक्त केल्या होत्या. जेव्हाही त्याची इच्छा कामुकतेची असायची. ताबडतोब तो नवनवीन स्रियांचा उपभोग घ्यायचा. अशातच आम्रपालीचा उपभोग घेण्याचा प्रसंग प्रसंग त्याचेसमोर आ वासून उभा राहिला. आम्रपाली ही पुष्पक कुमारवर प्रेम करीत होती व त्याचेशीच विवाह करणार होती. परंतु आता तिच्या जीवनात एक वेगळीच मोड आली. राजा मनुदेवानं तिला भोगल्यानं व तिचं कौमार्य भंग केल्यानं तिला जी चीड आली. त्यानुसार ती बिंबिसारवर प्रेम करु लागली व वाटायला लागलं की बिंबिसारशी ती केव्हा भेटते आणि केव्हा नाही. आज आम्रपाली बावीस वर्षाची झाली होती व बिंबिसार हा पन्नास वर्षाचा झाला होता. त्यातच बिंबिसार हा वैशालीला दरवर्षीच यात्रेदरम्यान येत असे. कारण त्यानं लिच्छवी राजकुमारी चेलनाशी तिनं विवाह केला होता. यावेळेस विशेष आमंत्रण दिलं गेलं होतं बिंबिसारला की त्यानं वैशालीला यावं नव्हे तर येण्याचं आमंत्रण स्विकारावं प्रसंग होता पाणी तंट्याचा. वैशाली व मगध राज्य हे गंगानदीतटावर होते. आम्रपाली नगरवधू बनताच वैशालीचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. सर्व जनपदांमध्ये आम्रपालीच्याच नावाचा डंका होता. कारण ती सुंदरतेत अद्वितीय अशाच स्वरुपाची होती. त्यातच सर्व जनपदातील लोकं वैशालीला येत व आम्रपालीच्या नृत्याचा उपभोग घेवून कृतार्थ होत. जोही आम्रपालीला एकवेळ पाहात असे. तो तिचा दिवाणा होवून जात असे. ज्यात काही जनपदातील राजेही होते की ज्यांनी तिला पाहताच तिच्यावर आपलं सर्वस्व न्योछावर केलं होतं. आम्रपाली आपल्या राज्यावर प्रेम करीत होती. ज्यात लिच्छवीची सामान्य जनता होती. तिला फक्त मनुदेवाचाच राग येत होता. ज्याच्या बदल्याचा विचार तिच्या मनात सतत घोळत असे. अशातच ती बातमी की राजा बिंबिसार मगधला येणार. आम्रपालीची मगध या शक्तीशाली जनपदातही किर्ती जावून पोहोचली होती. ते एका अमात्यामुळं. ज्याचं नाव वर्षाकार होतं. वर्षाकारानं एकदा तिचं नृत्य पाहिलं होतं वैशालीला असतांना. त्यावर तो मोहीत झाला होता आणि त्यानं तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता, तिचं शरीर भोगण्याचा. ज्या प्रस्तावास तिनं धुडकावलं होतं. त्यातच त्याच्याही मनात तिचा बदला घ्यायचं बीज निर्माण झालं व त्याला वाटायला लागलं होतं की ज्या स्रीनं त्याचा प्रस्ताव धुडकारला. तिला तो एखादे दिवशी आपल्या राजाच्या मांडीवर निजवेल. त्याच पश्चातापाच्या अग्नीत जळत होता तो. तो तशी संधीच शोधत होता. तोच एकदा त्याचसंबंधानं राजा बिंबिसारनं एक सभा बोलावली व त्यात तोच विषय मांडला व म्हणाला, "आपण इतरत्र फिरत असता. वावरत असता कधी एखाद्या ठिकाणी आपण रुपवान स्री पाहिली आहे काय? कधी आपण पाहिली असेल अशी एखादी स्री तर सांगावे. " राजा बिंबिसारनं तसं पाहिल्यास तिच्या चर्चा बऱ्याच ऐकल्या होत्या. तेव्हा तीच बाब हेरुन त्यानं आपल्या बाकी अमाप्त्यांना प्रश्न केला प्रश्नांती वर्षाकार नावाचा तोच अमाप्त्य बोलला, "महाराज, मी पाहिली आहे अशी रुपवान स्री." "कुठं पाहिली आहे?" "शेजारच्या गंगातटावरील लिच्छवी राज्यात." "ती कशी आहे?" "महाराज, तिचं वर्णन करता करता संपत नाही. ती एवढी सुंदर आहे की तिच्यासमोर इंद्राच्या अप्सरादेखील फिक्या आहेत. अशीच ती आहे. महाराज, अशी स्री शेकडो वर्षानंतर बनवली जाते. मात्र ती जनपदकल्याणी पदावर विराजमान आहे. ती आपल्याला मिळणे नाही. कदाचीत तिच्या सुंदरतेचा त्यांच्याच राज्यांना फायदा व्हावा. म्हणूनच तिची नियुक्ती त्या राज्यानं जनपदकल्याणीपदावर व नगरवधू म्हणून केलेली असेल. माहीत आहे महाराज, अनेक जनपदातील राजे रजवाड्यांनी तिच्यावर आपलं जीवन समर्पीत केलं नव्हे तर आपलं पुर्ण स्वरुपात तिच्या चरणावर धन अर्पण केलं. कदाचीत आपण कितीतरी यौवना भोगल्या असाल, परंतु अशी यौवना कदाचीत मी ठामपणे सांगेल की आपल्या आयुष्यात कधीच आली नसेल. शिवाय कितीतरी स्रिया मिळवल्या तरीही त्या स्रीची बरोबरी होणार नाही. अशी अप्सरा आपल्या भुजेची शोभा वाढविण्यासाठी अतुलनीय असेल. आपण तिला मिळविण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे झालं." वर्षाकार बोलून गेला. तोच बिंबिसार म्हणाला, "कदाचीत आपण आम्रपालीची तय गोष्ट करीत नाहीत ना?" "होय, ती आम्रपालीच आहे. सुंदर अप्सरा आहे ती." "मिही तिच्याबद्दलच ऐकलं आहे. म्हणूनच तिच्याबद्दलच मी सभेत तुमच्यासमोर विचारणा केली. मला सांगा अमाप्त्य, आपण पाहिलं का तिला?" "होय महाराज, मी प्रत्यक्षात पाहून आलोय तिला. तिचं सौंदर्य निरीक्षण करुन आलोय मी. परंतु ती राज्यनिष्ठ आहे." "राजनिष्ठ! अर्थात?" "ती आपल्या राज्याशिवाय इतर राज्याची होवूच शकत नाही." "आपण शांतीचा प्रस्ताव पाठवू. नसेल मानत तर आम्रपालीला मिळविण्यासाठी युद्ध करु." "युद्ध. युद्ध करावंच लागेल महाराज. कारण ते लिच्छवी आहेत. तेही काही कमजोर नाहीत. ते सहजासहजी देणार नाहीत आम्रपालीला. अन् आम्रपालीही सहजासहजी तुमचा स्विकार करणार नाही. तशी आपली पुरातन शत्रुताच आहे त्या वैशालीशी." "कशी?" "तुम्हाला माहीत नाही महाराणी चेलनाची कहाणी. ती कशी मिळवली ते?" "होय, चांगलं माहीत आहे. तिचे वडील तिच्या बहिणीचा विवाह माझ्याशी करीत नव्हतेच. सगळं आठवलं मला. राजकुमारी सुजेष्ठा तिच्या बहिणीचं नाव. वैशाली राज्यात सुंदरतेला कमी नाही. मी सुजेष्ठाच्या सौंदर्याची फक्त प्रशंसा ऐकली होती. तेच पाहून मी राजा चेतकजवळ आपला दूत पाठवला. त्या दुताजवळ मी तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर त्यांनी मी पाठवलेला प्रस्ताव नाकारला व म्हटलं की माझ्या मुलीचा विवाह त्याचेशी करणार नाही. मग मला राग आला. तो राग एवढा आला की मी तो शब्दात सांगू शकत नाही. तिचीही तशी इच्छा नव्हतीच. त्यानंतर मी माझ्या मंत्र्याला तिच्याकडे पाठवलं. सोबत माझं चित्रही पाठवलं. ते चित्र माझ्या मंत्र्यानं सुजेष्ठाला दाखवलं व ती मोहीत झाली त्या चित्रावर. त्यानंतर तिनं ते चित्र पाहताच व ती मोहीत होताच माझ्या मंत्र्यानं तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला व ती माझ्याशी विवाह करण्यास उत्सुक झाली. आता प्रश्न होता तिच्या वडीलाचा. ते तयार नव्हतेच. आता कसं करायचं. मी विचार केला. मग आठवलं. आपण सुरंग बनवायची व सुरंगाच्या रस्त्यानं सुजेष्ठापर्यंत पोहोचायचं. त्यानंतर सुरंग बनवलं व मी त्या सुरंगाच्या रस्त्यानं सुजेष्ठापर्यंत पोहोचलो व सुजेष्ठाला म्हटलं की आपल्या विवाहाला तुझ्या वडीलाची परवानगी नाही. तेव्हा आपण पळून जावून विवाह करायचा. त्या गोष्टीला सुजेष्ठा राजी झाली. तेवढ्यात तिथं तिची लहान बहिण आली. जिचं नाव चेलणा होतं. ती येताच तिनं पुर्ण योजना फसवली. कारण ती सुजेष्ठाच्या पळून जाण्यानं व्यथीत झाली होती. मग ठरलं, आपण चेलणाला देखील सोबत घ्यायचं. त्यानंतर दोन्ही बहिणी मगधला यायला तयार झाल्या. परंतु तिथंच माशी शिंकली. सुजेष्ठाला एका संदुकाची आठवण झाली. ज्या संदुकामध्ये तिचे अलंकार होते. ती अलंकार असलेली संदुक घ्यायला आतमध्ये गेली. तसा तिला यायला बराच वेळ लागला. शिवाय मलाही तिथं जास्त वेळ राहता येत नव्हतं. म्हणून मिही तिच्या बहिणीला म्हणजे राजकुमारी चेलनाला घेवून परत निघालो, तो थेट आपल्या राज्यात. मला नाईलाजानं सुजेष्ठाची बहिण चेलणाशी विवाह करावा लागला. परंतु मी तिच्याशी विवाह केल्यानंतर चेलणाला अंतर दिलं नाही. तिला सुखात ठेवलं व ती जैन धर्मातील असल्यानं आपला बौद्ध धर्मही सोडला व जैन बनलो. मी चेलणाला पळवून आणलं हे जेव्हा लिच्छवींना माहीत झालं. तेव्हापासून ते शत्रू बनले आहेत माझे. वाटतं की एखाद्यावेळेस युद्ध करुन वैशाली जनपदच नष्ट करुन टाकावं व आपलं साम्राज्य स्थापन करुन टाकावं. परंतु चेलणाची तशी इच्छा नाही. तिचं बंधन आहे मला. म्हणूनच वैशाली राज्य जीवंत आहे. काही काळानं कळलं की सुजेष्ठाही तिथं आली होती. त्यावेळेस तिनं पाहिलं की तिथं कोणीच नाही. त्यानंतर तिनं मला बराच आवाज दिला परंतु तो माझ्यापर्यंत न पोहोचल्यानं ती निराश झाली. तिचं संसारावरचं मन उडलं व ती साध्वी बनली." आम्रपालीला कधीकधी पश्चाताप व्हायचा. जेव्हा जेव्हा तिला तिचं पद आठवत असे. वाटत असे की हे पद मी विनाकारणच धारण केलं. तसं ते पद सातच वर्षाचं होतं. वर्षाकार बोलत होता, "महाराज, आम्रपाली एक नगरवधूच नाही तर नगरवोभिणीही आहे. तिनं नगरवोभिणी पद जरी धारण केलं असेल तरी ती अक्षययौवना आहे. कोणीही बलपुर्वक तिच्यासोबत सहवास करत शकत नाही. ती लिच्छवीचा राग करते नव्हे तर माझ्या भेटीदरम्यान तसंच आढळलं. परंतु आपल्या लोकांसोबत वाद होवू नये. म्हणूनच तिनं ते पद धारण केलेलं आहे. महाराज, अजुनही आम्रपालीचं कौमार्य भंग झालेलं नाही. शिवाय ते होण्यापुर्वी आपण जर लवकरात लवकर तिला भेटलात तर तिचं कौमार्य तुम्हालाच मिळेल. मला तर वाटते की अशी सुंदर स्री, मनमोहिनी स्री एकमात्र मगध साम्राज्याचीच शोभा होवू शकते. ती इतर साम्राज्याची शोभाच होवू शकत नाही. तिचं योग्य स्थान फक्त बिंबिसारच्या ह्रृदयाजवळ आहे यात शंका नाही." अमात्य वर्षाकारनं बिंबिसारला म्हटलं. त्यानंतर तो आपल्या आसनावर आसनस्थ झाला. वर्षाकार जे बोलून गेला. त्यानुसार बिंबिसारच्या मनात आम्रपालीबद्दल कुतूहल निर्माण झालं. आता त्याला वाटायला लागलं की आपण केव्हा केव्हा आम्रपालीला भेटतो आणि केव्हा नाही. त्याचं पौरुषत्व जागलं. तसं त्यांनी आपल्या अमात्याला पुन्हा म्हटलं, "आता पुन्हा आपण आम्रपालीच्या राज्यात जा आणि सर्वप्रकारची माहिती प्राप्त करुन आणा." वर्षाकार तसं पाहिल्यास राजा बिंबिसारचा विश्वासपात्र होता. कारण त्याचे वडील राजा बिंबिसारच्या वडीलाचे नरेश भट्टचे विश्वासपात्र होते. त्यातच वर्षाकार हा बिंबिसारचा मुख्य अमात्य होता. राजा बिंबिसार व अमात्य वर्षाकार, दोघंही एकाच वयाचे होते. वर्षाकार हा युद्ध असो की आणखी कोणते प्रसंग, त्यात तो राजा बिंबिसारच्या मदतीला नेहमीच खांद्याला खांदा लावून राहिला. तसंच त्यानं बिंबिसार पुत्र अजातशत्रूलाही राजनीती आणि युद्धकला शिकवली होती. ज्यावेळेस राजा बिंबिसारनं त्याला आम्रपालीच्या संपुर्ण माहितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं आश्वासन दिलं की लवकरच तिची संपुर्ण माहिती राजाला आणून देणार. त्यानंतर त्याच वर्षाकारानं एक दिवस आम्रपालीची जन्मापासूनची माहिती काढली व ती माहिती राजाला सांगितली. त्यानुसार राजा बिंबिसार आम्रपालीला मिळविण्यासाठी पावले टाकू लागला होता. ***************************** राजा बिंबिसारच्या दरबारात अमात्य असलेल्या वर्षाकारनं माहिती काढताच आम्रपालीबद्दल चलबिचल झालेल्या राजा बिंबिसारला आज फारच आनंद झाला होता. आज त्याच्या आनंदाला सिमाच उरली नव्हती. जेव्हा यावर्षी त्याला फाल्गुन मासातील यात्रेचं व प्रदर्शनीचं आमंत्रण आलं होतं. आता वाटत होतं की फाल्गुन मासात जेव्हा आपण वैशालीला जावू. तेव्हा आपण आम्रपालीलाही भेटू. तसं त्यानं वर्षाकाराला सांगितलं होतं व वर्षाकार म्हणाला होता, "आम्रपाली ही अद्वितीय स्री आहे व तिला मिळविण्यासाठी आपण जर युद्ध केलं आणि त्यात वैशाली जनपदाला विजय मिळू द्यावा लागला तरी चालेल. सहजासहजी स्वार्थी लिच्छवी तुम्हाला आम्रपाली सोपवणार नाहीत. आपल्याला अशी योजना आखावी लागेल की ज्या योजनेनं लिच्छवी भयभीत होतील व आम्रपालीला आपल्या सुपुर्द करतील. त्यानंतर आम्रपालीचं काय करायचं ते पाहून घेवू." आम्रपाली कशी मिळवायची? हा एक चिंतेचाच विषय होता राजा बिंबिसारसाठी. दिवसरात्र तिच्याचबद्दल विचार करीत होता तो. तिला मिळविण्यासाठी युद्ध केल्यास बाकीचे जनपद आपल्याला दोषी ठरवणार. काय करावं ते सुचत नव्हतं. युद्ध बरं. युद्धातून लवकरच आम्रपाली मिळवता येवू शकते. परंतु आपण लवकर विजयी होवू हे भविष्य आतातरी वर्तवता येत नाही. शिवाय युद्धच ते, वर्षानुवर्षे चालणार. प्रेमानं जर काही उपाय निघत असेल तर तो काढावा. राजा बिंबिसार विचारच करीत होता. तोच वर्षाकार तिथं उपस्थित झाला. त्यानं पाहिलं की राजा बिंबिसार बराच चिंतेत आहे. तसा तो समजला आणि त्यानं विचारणा केली की राजा का बरं चिंतीत आहे. त्यावर बिंबिसार म्हणाला, "काय करावे वर्षाकार. तुम्ही सांगितल्या दिवसापासून मी एकतर्फी प्रेमात पडलोय आम्रपालीच्या. आता मला बरोबर झोपही येत नाही. केव्हा केव्हा ती भेटते आणि केव्हा नाही असं होवून गेलंय माझं. काय करावं?" वर्षाकार ते ऐकून गप्प झाला. तसा थोड्याच वेळात विचार करुन तो म्हणाला, "महाराज, उपाय सापडला." "कोणता उपाय? जरा ताबडतोब सांग. मला राहावलं जात नाही." राजा बिंबिसारनं तसं म्हणताच वर्षाकार त्याला उपाय सांगू लागला. "महाराज, आपल्याला माहीतच असेल की आपण आपल्या मगधच्या सिमेतून वैशालीला पाणी देत असतो नहरातून. जर तो नहर बंद केला तर एक प्रकारचं भीषण संकट लिच्छवीसमोर निर्माण होईल. मग लिच्छवीगण आपण जे म्हणू तेच करतील. उपाय फारच चांगला आहे. साप भी मरे और लाठी भी ना तुटे." वर्षाकारानं उपाय सुचवला. तसा राजा बिंबिसारच्या चाणाक्ष बुद्धीत तो उपाय यायला वेळ लागला नाही. तसा त्यानं लवकरच आदेश दिला की ती कालव्याची रांग तोडून टाकावी तेव्हापर्यंत. जेव्हापर्यंत आपल्याला आम्रपालीच्या मिलनाची वेळ कळत नाही. राजा बिंबिसारचा तो आदेश. त्या आदेशाची पायमल्ली कोण करणार. तो आदेश निघताच लवकरच ती जलवाहिनी तोडली गेली. त्याची सुचनाही वैशालीला देण्यात आली नाही. आता वैशालीसमोर मोठं तीव्र संकट उभं राहिलं व त्यावरच उपाय काढण्यासाठी फाल्गुन मासात जो उत्सव साजरा होत असे. त्यात बोलविण्याचं आमंत्रण अमात्य गोपालतर्फे राजा बिंबिसारला आलं. ************************* कालव्याची ती रांग तुटली होती. वैशालीसमोर संकट उभं झालं होतं. ते तीव्र स्वरुपाचं संकट होतं. लिच्छवीसमोर प्रश्न उभा झाला होता. वाटत होतं की मगध सोबत युद्ध करावं व मिटवून टाकावा आपल्या नहराचा आणि पाण्याच्या संकटाचा कायमचा प्रश्न. परंतु ते शक्य नव्हतं. कारण त्या काळात मगध म्हणजे एक शक्तीशाली साम्राज्य होतं व त्यांच्याशी विनाकारण वाद घालणं म्हणजे स्वतः धुळीस मिळणं होतं. त्याची लिच्छवींना माहीती होती. त्यामुळंच की काय, त्यांनी युद्ध टाळलं. दरम्यान त्यांना निरोप पाठवला व फाल्गुन मासात राजा बिंबिसार, महाराणी चेलणा व अमात्य वर्षाकार वैशालीला आले. तो फाल्गुन मास होता व त्या फाल्गुन महिन्यात वैशालीला उत्सव होता. त्यानिमित्त आजुबाजूच्या जनपदाचे राजे मंत्रीगण वैशालीतील उत्सवाचा आनंद घेण्यासाठी वैशालीला येणार होते. त्यासाठी वैशाली नगरी सजविण्यात आली होती. ती वैशाली नगरी आज दैदीप्यमान वाटत होती. आजुबाजूला म्हशालीची आरास लावली होती. रंगावली टाकली होती तशीच आंब्याची तोरणं घरोघरी लावली होती. स्वागतासाठी प्रवेशद्वार उभे केले होते व त्या प्रवेशद्वारावर केळीचे मोठमोठे खांब लावले होते. ती रोशनाई आणि त्या रोशनाईतच राजा बिंबिसार आपली महाराणी चेलणासह रथावर आरुढ होवून वैशालीला आला. त्यानंतर त्याचं स्वागत मनुदेवानं केलं. त्याच्यासाठी नृत्य प्रतियोगितेचं आयोजन केलं. सेवेसाठी दास दासी लावल्या. त्याच्या मानापानात काहीच कमी ठेवली नाही. खाद्य व्यंजन दिले, गायन ठेवलं. सुंदर सुंदर मुली रात्रीच्या आरासासाठी प्रदान करण्यात आल्या. वाटत होतं की राजा बिंबिसार खुश झाला तर कालव्याचा प्रश्न सोडवता येईल. तसं पाहिल्यास राजा मनुदेवानं आम्रपालीची भनकही राजा बिंबिसारला लागू दिली नाही. कारण त्यांना वाटत होतं की कदाचीत आम्रपालीची भनक राजा बिंबिसारला लागताच तो तिच्यावरच मोहीत होईल. जी आपल्या नगराची शान आहे नव्हे तर आपली शान आहे. आपण तिला भोगलं असल्यानं ती आपली प्रेमिकाही आहे. मग तो आपली प्रेमिका कशी देणार त्याला. शिवाय त्यानं तोच प्रश्न त्याच्या मंत्रीगणासमोर ठेवला. तेव्हाही मंत्रीगणानं त्यावर तोच उपाय सुचवला होता. कदाचीत आम्रपालीला तो भोगूनही समस्येवर तोडगा निघाला नाही तर....... त्याच्या मंत्रीगणांचा तो प्रश्न. राजा बिंबिसारची आवभगत झाली होती. त्यातच चर्चेचा विषय आला व चर्चेदरम्यान राजा बिंबिसारसमोर तमाम लिच्छवीगणांनी एकच प्रश्न ठेवला, तो म्हणजे नहराचा. त्यावर बिंबिसारनं तो प्रश्न टाळला. तसा तो त्या प्रश्नावर मौनच बाळगून होता. काही वेळानं तो तेथून निघून गेला. त्यावर विचारलं असता वर्षाकार बोलला, "महाराज, क्षमा करा. आपल्या तीव्र मनाच्या इच्छेसाठी आपल्याला आम्रपालीला मिळवितांना मगधला वैशालीशी युद्ध करावं लागतं. हे जर आपल्याला मंजूर असेल तरच आपण आम्रपालीला मिळवू शकतो. नाही तर तिची किंचीतही आठवण काढू नका." "परंतु तिला आता विसरणं सहन होत नाही." "महाराज, हे जरी खरं असलं आणि आपलं मगध सामर्थ्यशाली असलं तरी हे लक्षात घ्या की आता वैशालीला आपण साधारण समजू नका. कारण जर आपण वैशालीला युद्धाचं आव्हान दिलं तरी ते वैशाली इतर जनपदाचा सहारा घेईल व आपल्यावर विजय मिळवेल. अन् जर आपल्याला वैशालीशी युद्धच करायचं असेल तर आपण कौशल नरेश प्रसेनजीतशी वार्तालाप करावी. युद्ध जिंकल्यावर अर्ध वैशाली आपलं व आम्रपालीही आपली. अन् अर्ध वैशाली आपण कौशलनरेश प्रसेनजीतला देवून टाकू. कारण आपण आपल्या एकट्याच्या भरवशावर वैशालीला जिंकू शकत नाही." "हो तुझं म्हणणं ठीक आहे. परंतु जर राजा प्रसेनजीतनं देवी आम्रपालीला पाहिलं आणि तिचीच मागणी केली तर युद्धविराम झाल्यावर." राजा बिंबिसारनं आपली शंका व्यक्त केली. त्यावर अमात्य म्हणाले, "तसं कधीच होणार नाही. आपण तशी संधी करण्याअगोदर राजा प्रसेनजीतशी तसं बोलून घेवू. विचारविमर्श करुन घेवू. मगच युद्धाचा निर्णय घेवू." ते अमात्य वर्षाकाराचं म्हणणं. त्यावर राजा बिंबिसारनं वर्षाकाराला आम्रपालीचं बोलणं आणि त्यानं तिला दिलेलं वचन ऐकवलं. तसा तो म्हणाला, "तर मग ठीक आहे. आपण जसं म्हणाल तसं." वर्षाकार युद्धाला जास्त भाव देत होता. कारण त्याला वाटत होतं की काल जी आम्रपाली आपल्याला तिच्या देहाची लक्तरं तोडू देत नव्हती. कदाचीत युद्ध झाल्यावर व आपला विजय आम्रपाली मगधला येईल व संधी मिळताच एखाद्या दिवशी आपण तिच्या देहाची लक्तरं तोडूच. यासाठी तो युद्धाला प्रथम स्थान देत होता व त्यासाठी राजा बिंबिसारला भडकवत होता. तसंच बिंबिसारनं तसा होकार देताच तो दुसऱ्याच दिवशी स्वतः गुप्तकट रचण्यासाठी राजा प्रसेनजीतच्या दरबारी गेला. त्यानंतर त्यानं राजा प्रसेनजीतशी सल्लामसलत केली व आपल्या राजाची इच्छा सांगीतली. इच्छेनुसार ठरलं की अर्धी वैशाली त्याची व आम्रपाली राजा बिंबिसारची. अटी तयार करण्यात आल्या. त्या अटी कबूल करण्यात आल्या. तसं पाहिल्यास प्रसेनजीतही लिच्छवीशी खार खावूनच होता. प्रसन्नजीतनं राजा बिंबिसारला मदत केली. त्याचं कारण होतं वैवाहिक संबंध. राजा बिंबिसारला राजा प्रसन्नजीतनं आपली बहिण दिली होती. व्यतिरीक्त हुंडा म्हणून काशी राज्यही बिंबिसारला दिलं होतं. त्यातच युद्ध झालं व युद्ध राजा बिंबिसार राजा प्रसन्नजीतच्या मदतीनं जिंकला. युद्ध जिंकताच ठरलेल्या अटीनुसार आम्रपाली राजा बिंबिसारला मिळाली. त्याचबरोबर अर्ध राज्यही. अर्ध्या राज्याचा स्वामी प्रसन्नजीत बनल्या गेला. त्यानंतर युद्ध समाप्त झालं. युद्ध समाप्त झालं होतं. त्यातच राजा मनुदेवही मारल्या गेला होता. तसा आम्रपालीलाही आनंद झाला होता. कारण लिच्छवीची हार झाली होती व लिच्छवीकडून तिच्या झालेल्या अपमानाचा बदला तिला घेता आला होता. त्यातच युद्ध समाप्त होताच तिला वाटत होतं की आता आपल्याला आपलं महत्व व गतवैभव राजा बिंबिसार पुन्हा मिळवून देणार. आपल्याला आपली पट्टराणी बनवणार. तशी मी सुंदर आहे व मला प्राप्त करण्यासाठीच राजा बिंबिसारनं वैशालीला धुळीस मिळवलं आहे. शिवाय आपण गर्भवती आहे व हे आपल्या पोटातील बाळ राजा बिंबिसारचंच आहे. आम्रपालीच्या मनात आता पट्टराणीपणाच्या व आपल्या मुलाला मगधचा राजा बनविण्याच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. ती तशी आपल्या मनात स्वप्न रंगवतच होती. तोच तिला माहीत झालं की राजा बिंबिसारनं तिला पट्टराणी बनविण्याचं टाळलेलं आहे. आम्रपालीच्या मनात एक आश्चर्य होतं की ज्या बिंबिसारनं तिचं वचन पाळण्यासाठी नाही तर तिला मिळविण्यासाठी एवढं मोठं युद्ध केलं. तो बिंबिसार आपल्याला पट्टराणी बनवायचं टाळत आहे. तसे विचार तिच्या मनात वारंवार येत होते व ती विचार करीत होती की भविष्यात ती त्याचा जाब बिंबिसारलाच विचारणार. सधी मिळाली तर........ ***************************** राजा बिंबिसार मनात विचार करीत होता. विचार करीत होता की आम्रपालीच्या पोटचं बाळ नेमकं कोणाचं. ते आपलंच की राजा मनुदेवाचं. कारण वर्षाकारानं आपल्याला मनुदेवानं सांगीतलेली गोष्ट सत्य असल्याचं सांगीतलं. कदाचीत यात वर्षाकार खोटं बोलतोय की आम्रपाली की मनुदेव, हेच कळत नाही मला. कदाचीत मनुदेव आज जीवंत नाही की सत्य त्यांच्या तोंडून वदवता येईल. त्याची हत्या तर आपल्या अमात्यानं केलेली आहे. परंतु मरतावेळेस तो जे बोलला, ते सत्य असेल काय? तो म्हणाला की या बिंबिसारनं आम्रपालीला शोषून त्याचं उष्ट फळ खाल्लं. वर्षाकार तर आजपर्यंत कधीच असत्य बोलला नाही माझ्याजवळ. अन् मरतांना मनुदेवही काही असत्य बोलणार नाही. तसं म्हणतात की मरतांना कोणताही व्यक्ती सत्यच बोलतोय. मग आम्रपाली असत्य बोलत असेल काय? परंतु आम्रपाली आपल्या बोलानं कबूल करते की ती तशी नाही. परंतु मनुदेव. तो काही हवेतच बोलला नसेल. म्हटलं त्यानं की आम्रपालीच्या कोकमध्ये बीज त्यानंच टाकलं. आता जेही बीज तिच्या कोकमध्ये वाढणार. ते त्याचंच असणार. वाढणार. त्याला माहीत होतं की आम्रपाली गरोदर आहे. खरंच नेमकं बीज कोणाचं? मी युद्ध तर जिंकलं आहे. परंतु मी तिला कसा स्विकारु एक पट्टराणी म्हणून. विचार केला होता की मी युद्ध करणार. तिला जिंकून महालात आणणार. तिच्याशी शाही विवाह करणार. मग सहवास अन् सारंच काही. परंतु माझी मनातील इच्छा मनातच राहिली. आम्रपाली ही माझी नाही. ती त्याचीही नाही. ती गणिका आहे, गणिका." राजा बिंबिसारच्या तोंडचे ते बोलणे. त्यातच त्याचं ते सोचणं. तो विचार त्याला तिच्यापासून तोडत होता नव्हे तर तिला त्याची पट्टराणी बनविण्यापासून रोखत होता. राजा बिंबिसारचा तो विचार. आज तो विचार त्याच्या मनात आकार घेवू लागला होता. तसं त्यानं वर्षाकारालाही सांगितलं आणि हेही सांगीतलं "मी तिला पट्टराणी तर सोड. साधं आपल्या जनानखान्यातही ठेवू इच्छीत नाही. कारण तुझ्या तोंडून मी तसं ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतं मला. असं वाटतंय की मी नाहकच लिच्छवीगणांशी युद्ध केलं. माझे होशच उडले आहेत जणू. सर्व रंगविलेली स्वप्न ध्वस्त झालीत एका शब्दात. त्या मनमोहक आठवणीही ध्वस्त झाल्यात. कदाचीत जास्त जर यावर विचार करीत राहिलो तर मी वेडाच बनेल, असंही वाटायला लागलंय मला." महाराज बिंबिसारचं ते बोलणं. त्यावर वर्षाकार विचार करु लागला. जर महाराजानं आम्रपालीला त्यातलं तर आपण आपली तिच्याबाबतीत असलेली हौस केव्हा पुर्ण करणार. आता काहीतरी करायलाच हवं. तोच विचार करुन तो म्हणाला, "महाराज, जे झालं ते जावू द्या. शिवाय जे झालं, ते आता आपण बदलवू तर शकत नाही. कृपया होश सांभाळा. विचार करा की आम्रपाली काही साधारण स्री नाही. जरी कालच्या अंधारात तिच्या हातून कळत नकळत अपराध झालाही असेल, परंतु ती तशी नाही. ती परीपाक आहे. शिवाय ती सौंदर्याची देवीही आहे. तिच्यासारखं सौंदय जगात शोधूनही कधी सापडणार नाही. तिन्ही लोकांत जरी भ्रमण केलं तरी. मोठमोठे राजे महाराजे तिच्यासमोर झुकतात. नतमस्तक होतात. अन् आज ती तुम्हाला मिळालेली आहे. ही संधी जावू देवू नका. तुम्ही तिचा त्याग करु नका. तुम्ही तिचा स्विकार करा. हे युद्ध देखील तिच्याचसाठी आणि तिला प्राप्त करण्यासाठीच केलं गेलं. खरं सांगायचं झाल्यास तिचा जर कोणी डोळे लावूनही स्विकार केला, तरीही तिच्यात चांदणी रात्रच दिसेल. डाग दिसणार नाही. शिवाय राजे प्रसनजीतला तर पश्चाताप होत आहे की त्यानं युद्धाच्या अटी कबूल करतांना कशी काय चूक केली. शिवाय राजा प्रसन्नजीत तुम्हाला सारं वैशाली देवू इच्छीते तिच्या बदल्यात आणि आपण तिला त्यागण्याच्या गोष्टी करता, फक्त एका शब्दावर. जे मनुदेवाचे शब्द खरे आहे की नाही हेही माहीत नाही." "वर्षाकार, ते तुझं सगळं बरोबर आहे. परंतु माझं मन. माझ्या मनाला कोण सांगन की आम्रपाली डागाळलेली नाही. ती एक गणिका आहे, अन् गणिका आहे, असं माझं मन हरघडी सांगत आहे. तसं पाहिल्यास मी तिचा त्यागही करु शकत नाही. कारण ती माझ्या रोमारोमात बसली आहे एखाद्या व्याधीसारखी. आजही तिचा मोहीत स्पर्श आठवतो मला. अन् आठवतो मला तो संमोहनाचा काळ. तो केलेला सहवास. परंतु मी तरी काय करु? एकीकडं तिच्याशी केलेला सहवास आठवतो आणि दुसरीकडे तिच्या हातून घडलेलं ते कृत्य आठवतं की जे कृत्य अनैतिक आहे. मी तिचा त्याग करुच शकत नाही. कारण तिचा रोमो न् रोम आठवतो मला. परंतु मी तिच्यावर असलेल्या डागानं तिला आपली पट्टराणी बनवू शकत नाही. ती गणिकाच राहील शेवटपर्यंत. या फक्त राजा बिंबिसारची. तिच्यावर कोणीच जोरजबरदस्ती करु शकणार नाही. ती कालही नृत्य करीत होती. आजही करेल. फक्त मगध साम्राज्यातील गणांसाठी नाही तर फक्त माझ्यासाठी. जिला फक्त गणिकेच्या अधिकारासह कोणताच अधिकार नसेल." राजा बिंबिसार जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानंतर त्यानं तिचा स्विकार केला. परंतु पट्टराणी म्हणून नाही तर एक राजगणिका म्हणून. आज ती दरबारात केवळ राजा बिंबिसारच्या मनोरंजनासाठी नृत्य करीत होती आणि तेवढाच पश्चातापही करीत होती. वाटत होतं की मी विनाकारणच वैशालीत आलेल्या बिंबिसारला मदत मागितली अन् मागितलं ते वचन की या लिच्छवींना धडा शिकवायचाय. ज्यासाठी येथून गेल्यावर युद्ध करा अन् लिच्छवी गणराज्य संपवा. परंतु आता तर इथं असं दिसतं की लिच्छवी गणराज्याबरोबर आपणही संपलोत. काश! मी तिथंच असते तर अगदी बरं झालं असतं. कदाचीत सात वर्षानंतर मी स्वतंत्र्य तर झाले असते. आम्रपाली मगधची राजगणिका बनली होती. आता कधीही आणि केव्हाही बिंबिसार तिच्या कक्षात यायचा व तिच्यावर जोरजबरदस्ती करुन जायचा. तेव्हा वेदना होत. वाटायचं की हेच का आपलं जीवन. लहान असतांना मायबापाचं प्रेम मिळालं नाही. महानामन नावाच्या पित्यानं आधार दिला होता. परंतु तेही प्रेम दिर्घकाळ टिकलं नाही. पुढं लिच्छवींनीही मला धोकाच दिला. त्यांनी माहीत नसतांनीही मला नगरवधू बनवून वेश्यापणाला लावलं. अन् आता या मगध नरेशानं....... त्यानंही मला पुर्णतः धुळीस मिळवलं. आम्रपालीनं ठरवलं. ठरवलं की मगध नरेशनं आपल्याला गणिका बनवलं ना. मग गणिकाच सही. आजपासून याही महाराजांला आपण प्रेम द्यायचं नाही. गणिकेसारखंच राहायचं याचेशी. तसं ठरवून ती आपले जीवन मगधमध्ये व्यथीत करु लागली. ***************************** आम्रपाली मगधला रमली होती. परंतु तिला आता वैशालीची आठवण येत असे. परंतु आता तिच्याजवळ कोणताच उपाय नव्हता. तिनं कमीतकमी आठ दहा वर्षाचा काळ मगध नरेशजवळ काढला. तेही त्याची रखेल बनून. यावेळेस तिला मगध नरेश बिंबिसारपासून पाच मुलं झालीत. मोठा मुलगा विमल कोंडान्य. तो फार प्रतिभाशाली होता. तशीच त्यानंतर चार मुलीही तिला झाल्या होत्या. ते सर्व पुत्र फक्त राजा बिंबिसारचेच होते. वर्षाकार नेहमी विचार करीत असायचा. तो विचार असायचा, आपल्याला आम्रपालीचा सहवास केव्हा मिळतो याचा. परंतु काळ ओसरत चालला होता. परंतु त्याला आम्रपालीचा सहवास प्राप्त होत नव्हता. शेवटी त्यानं ठरवलं. ठरवलं की आपल्याला तिचा सहवास प्राप्त झाला नाही तरी चालेल. परंतु आपण तिला कोणाच्यातरी स्वाधीन करायचं. त्या व्यक्तीची जेव्हा इच्छा पुर्ती होईल. तेव्हा आपल्याला समाधान वाटेल. त्याच समाधानप्राप्तीसाठी तो अशा एखाद्या गृहस्थाची वाट पाहात होता की जो तसं करेल. तोच त्याच्यासमोर दाखल झाला बिंबिसारचा नातू. जो आज वीस वर्षाचा झाला होता व आम्रपाली आता बत्तीस वर्षाची. त्याला माहीत होतं की त्याच्या आज्यानं आम्रपालीला युद्धातून जिंकून आणलं. जी एक गणिका आहे आणि गणिका ही सर्वांसाठीच असते. त्यातच तो आम्रपालीसाठी रट लावून होता. त्याचं नाव उदयन होतं. उदयन जेव्हा लहान होता. तेव्हा त्यानं आपला आजा बिंबिसार व आम्रपालीची लपूनचोरुन प्रणयक्रिडा पाहिली होती. त्यावेळेस तो लहान होता व त्याला तेवढं कळतही नव्हतं. परंतु जसजसा वेळ गेला. तसतसा त्याला तो काळ आठवू लागला व आठवू लागली ती बिंबिसारची प्रणयक्रिडा. वाटू लागलं होतं की आपल्यालाही आम्रपालीचा सहवास लाभावा व तिच्यासोबत प्रणयक्रिडा करायला मिळाली. उदयन विचार करीत होता. तसा तो त्याच काळात आपल्या आज्याला त्याबाबत म्हणत होता की त्याला आम्रपालीसोबत सहवास करु द्यावा. परंतु बिंबिसार त्याला कसं काय तिच्यासोबत सहवास करु देणार. शेवटी त्याला आठवलं की आपल्याला एकच व्यक्ती मदत करु शकते. जो बिंबिसारच्या समकालीन आहे व जो बिंबिसारचा मित्र आहे. त्याला उदयननं मदत मागितली. कारण तो नित्यनेमानं लपूनछपून बिंबिसार व आम्रपालीचा सहवास पाहात होता. त्यातच वर्षाकारनं त्याला मदत करायचं ठरवलं व त्यानुसार त्यानं एक दिवस बिंबिसारला म्हटलं की त्या मुलाला बिंबिसारनं आम्रपालीशी एक दिवस सहवास करु द्यावा. परंतु बिंबिसार काही ऐकत नव्हता. वर्षाकार एक दिवस विचार करीत होता उदयन आणि आम्रपालीच्या सहवासाबद्दल. कारण त्यांच्यात कधीच सहवास झाला नव्हता. त्यातच एक दिवस वर्षाकारानं विचार केला. विचारांती त्याला कळलं की बिंबिसार आपल्या नातवावर अतिशय प्रेम करतो. मग तो त्याच्यासाठी काहीही करु शकतो. शेवटी त्याला वाटत होतं की ज्या आम्रपालीनं त्याला आपल्या शरीराचा भोग दिला नाही. तसा जर भोग उदयनला दिला तर त्याचा बदला पुर्ण होईल. तसा विचार करुन वर्षाकारानं उदयनला सांगितलं की त्यानं आपल्या आज्याला तशी मांग करावी आणि तो जर ती मांग पुर्ण करीत नसेल तर त्यानं अन्न, पाणी त्यागावं. म्हणजेच बिंबिसार त्याची मागणी पुर्ण करेल. वर्षाकारच्या म्हणण्यानुसार उदयननं तेच केलं, जे उदयनला वर्षाकारानं सांगितलं. त्यानं सहवासासाठी अन्न, पाणी त्यागलं. तसं अन्न त्यागताच बिंबिसार वर्षाकाराला त्यावर उपाय विचारु लागला. तसा बिंबिसार वर्षाकाराच्या मनातील बोलताच वर्षाकार म्हणाला, "महाराज, उदयन आपलं शाही रक्त आहे. त्यातच त्याचा मान करणं आवश्यक आहे. त्याला आम्रपालीसोबत कमीतकमी एक रात्र तरी बक्षीस स्वरुपात त्याच्या जन्मदिवसाला प्रणय करण्यासाठी द्यावी." राजा बिंबिसारला आपल्या मित्रानं व अमात्यानं सांगितलेली गोष्ट पटली. त्यानंतर त्यानं तीच गोष्ट आम्रपालीला सांगितली व ताकीद दिली की तिनं त्याला तसं करु द्यावं. त्याला मनाई करु नये. जेणेकरुन तिच्यासोबत केलेला सहवास हा त्याच्या जन्मदिवसाचं बक्षीस ठरेल. आम्रपाली तर एक गणिका होती बिंबिसारची. तिला त्याचं बोलणं मान्यच करावं लागणार होतं आणि ते तिनं मान्यही केलंही. त्यानंतर राजा बिंबिसारच्या म्हणण्यानुसार उदयननही तिच्या देहाची लक्तरं तोडली होती अगदी अल्पवयात. ज्यावेळेस उदयन अठरा वर्षाचा होता आणि आम्रपाली अठ्ठावीस वर्षाची. आज आम्रपाली विचार करीत होती. विचार करीत होती ती तिच्या जीवनाबद्दल. त्यातच तिला ते गेलेले क्षण आठवत होते. आठवत होता तो काळ. ज्या काळात तिला ती सुंदर असतांनाही व विवाह करण्याची इच्छा असतांनाही तिला विवाह करता आला नाही. त्यातच तिला वेश्या बनावं लागलं. ज्या वेश्यापणातून सुटकारा मिळावा म्हणून तिनं बिंबिसारवर प्रेम केलं. त्यावेळेस तिला वाटत होतं की तो तिच्याशी विवाह करुन तिला पट्टराणी बनवेल व तो तिला गतवैभव प्राप्त करुन देईल. परंतु तसंही झालं नाही. तिला गतवैभव प्राप्तच झालं नाही व तिला शेवटपर्यंत गणिकाचंच जीवन व्यथीत करावं लागलं. आज तिनं आपल्या जीवनाशी ताळमेळ जुळवून घेतलं होतं. गणिका जीवन कबूल केलं होतं नव्हे तर ती वेश्येचंच काम स्वखुशीनं करीत होती. त्यात आज तिला लाजलज्जा वाटत नव्हती. परंतु आता तिच्या बदलाचा काळ होता. कारण ती वेश्या जरी परिस्थितीनं बनली असली तरी तिचा त्यात दोष नसल्यानं तिचं जीवन बदलणार होतं. आम्रपाली भाग दोन सध्याच्या बिहार राज्यात असलेलं वैशाली शहर. त्यावेळेस त्या वैशालीला विशेष असा दर्जा होता. शिवाय पहिलं गणतंत्र्य त्याच शहरात निर्माण झालं होतं. ते शहर केवळ आम्रपालीमुळं प्रसिद्ध झालं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आम्रपाली सुंदर होती व ती त्याच सौंदर्याच्या भरवशावर नगरवधू बनली नव्हे तर तिला जाणूनबुजून नगरवधू बनविण्यात आलं. आम्रपाली जेव्हा नगरवधू बनली, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की नगरवधू म्हणजे काय आणि नगरवधूचं कर्तव्य काय असतं. याची कल्पनाच नसल्यानं तिला ते पद मानसन्मानाचं वाटलं. परंतु ते पद म्हणजे एक काटेरी मुकुट आहे हे जेव्हा तिला कळलं, तेव्हा तिला तिची फसगतच झाल्यासारखी वाटली. शेवटी नाईलाजानं तिला ते सत्य स्विकारावंच लागलं. परंतु ती नित्यनेमानं उदास असायची. ती उदास असायची आपल्या पेशानं आणि दुसरं उदासीपण असायचं तिला तिच्या सौंदर्याचं. वाटायचं की आपण एवढं सुंदर आणि आपल्याला हे काम करावं लागतं. शिवाय आपल्याला प्रेमी असतांनाही आपणाला जाणूनबुजून या सौंदर्यानं नगरवधूच बनवलं. आम्रपालीला तिच्या सौंदर्याचा रागच येत असे. वाटत असे की विधात्यानं असं सौंदर्य मला का बहाल केलं असावं की त्या सौंदर्यानं माझ्या आकांक्षेची हत्या व्हावी. आज आपल्याला स्री स्वतंत्र्य दिसते. तसेच काही पुरुषही स्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करतांना दिसतात. त्याचं कारण आहे, स्रियांचा विकास. आज स्रिया हिरीरीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करतांना दिसतात. त्यातच काही स्रिया चंद्रावर गेल्या तर काही स्रिया देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपतीही. काही स्रिया अधिकारीही बनल्यात. परंतु ह्या मुठभरच स्रिया आहेत की ज्या एवढ्या समोर गेल्यात. आजही अशा बऱ्याच स्रिया आहेत की ज्यांना येथील पुरुषसत्ताक समाजानं धर्म, प्रथा, परंपरा, अंगात येणे, अंधश्रद्धा, रुढी यांच्या साखळीनं बांधून ठेवलेलं आहे. ही एक शोकांतिकाच नाही तर विचार करण्यालायक बाब आहे. नियम माणसानं बनवले. चांगलं सुव्यवस्थीत माणसाला जीवन जगता येईल यासाठी. ज्यातून माणसाला व्यवस्थीत जीवन जगता येत होतं. तशाच प्रथाही माणसानंच बनवल्या. कशासाठी? तर त्यातून माणसाची त्याला होणाऱ्या तीव्र वेदनांपासून सुटका करता येईल वा करुन घेता येईल. परंतु काही नियम माणसाचे असेही ठरले की जे स्वार्थासाठी बनविण्यात आले होते. प्रथांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सतीप्रथेचं उदाहरण पाहू. सतीप्रथा समाजात अस्तित्वात होती. ती कुप्रथाच होती. कारण ज्या स्रिचा पती मरण पावत असे. त्या स्रिला समाज जाणूनबुजून तिची इच्छा नसतांनाही तिच्या पतीच्या शरणावर जबरदस्तीनं ती जीवंत असतांनाच जाळून टाकत असत. ज्यावेळेस तिचा पती शोकमग्न असायचा. तेव्हा तिला समाज काय करणार याची जाणीव नसायची. त्यावेळेस तिला त्याच्या शरणावर जाळणं हे अघोरी कृत्य नव्हतं काय? ती जात असतांना तिला त्यावेळेस कसं वाटत असेल? याची कल्पनाही आपण करु शकत नाही. साधा एखादा विस्तवाचा चटका जरी आपल्या शरीराला लागला तरी आपली अंगार होते. तशीच अंगार तिला होत होती. सुरुवातीला सतीप्रथा बनवली. त्याचं कारण होतं आक्रमणं. प्राचीन काळात युद्ध होत असत व त्या युद्धात बहुतेक स्रियांचे पती मरण पावत असत. त्यानंतर ते जरी राज्यासाठी वा राज्य वाचविण्याचे प्रयत्न करीत असतांना मरण पावले असले तरी त्यांच्या मृत्यूनंतर समाज त्या स्रियांना चांगली वागणूक देत नव्हता. तो अशा विधवा स्रियांना सतावायचा. शिवाय जर त्या युद्धात संबंधीत जे राजे जिंकले. ते राजे वा त्या राज्यातील घटक गुलाम झालेल्या स्रियांच्या इज्जती लुटत. अशावेळेस महाभयंकर वेदना होत. त्या वेदना एक स्री दुसरीला सांगत असे व ती स्री आपआपल्या पतीला. मग सतीप्रथेचे नियम बनले की पती मृत्यूनंतर अशा वेदना वा त्रास सहन करण्याऐवजी ज्या कोणत्या स्रिला पतीच्या शरणावर सती जायचं असेल, तिनं सती जावं, अर्थात जाळून घ्यावं. याचाच अर्थ असा की आत्महत्या करावी. त्यानंतर तो नियम बनताच अशा स्रियांचे पती युद्धात मरण पावताच त्या स्रिया परराज्यांतून दास्यत्व पत्करण्याऐवजी पती शरणावर स्वतःला जाळून घेवून संभाव्य भविष्यात होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवत. पुढे ही प्रथा पाडली व त्या प्रथेत वेगळेच नियम बनले. ते नियम होते, जर पत्नी पतीच्या शरणावर सती गेली तर ती भाग्यवान आहे. आता यात भाग्याचा आणि सती जाण्याचा काही एक संबंध नव्हता. परंतु तो संबंध जोडण्यात आला व ती प्रथा कितीतरी काळापासून कितीतरी काळापर्यंत तशीच्या तशीच सुरु ठेवली. त्या भाग्याच्या नियमात काहीच बदल केला नाही वा ती प्रथा बंद करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. जेव्हा ही प्रथा एका इंग्रज अधिकाऱ्यानं बंद करण्याचा प्रयत्न केल्या गेला. तेव्हा येथील बरेचसे लोकं असे होते की ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणत होते की साहेब, आमची ती परंपरा आहे. आमच्या आड तुम्ही येवू नका. कालची सतीप्रथा इंग्रजांनी कुप्रथा ठरवून बंद केली जोरजबरदस्तीनं. सतीप्रथा आज बंद झाली. परंतु आज अशाही काही प्रथा आहेत की ज्या प्रथेला धार्मिक रंग चढवला आहे. जसे, देवी अंगात येणे ही कुप्रथाच आहे. परंतु त्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी कोणाला बोलता येत नाही. कारण धर्माचा पगडा. काही लोक फार शिकलेले आहेत. परंतु तेही अशा अंधश्रद्धा पाळतांना दिसतात. त्यांनाही वाटत असते की देवी खरोखरच अंगात येते. ते शिकलेले लोकंदेखील अडाणी असलेल्या लोकांच्या अंगात देवी वा देव आल्यास त्यांच्या भोवती राहात असतात. मग त्या अंगात येणाऱ्या माणसांच्या पाया लागणे सुरु होते. आता यात विचार करण्यालायक गोष्ट अशी की खरंच देव वा देवी अंगात येत असे काय? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. ही कल्पना जर अंगात येणारा देव आहे, असे मानल्यास समस्त कोटी त्या देवाचा संसार असतांना व त्याच देवांवर समस्त संसार अवलंबून असतांना त्या अंगात येणाऱ्या देवांना एवढा वेळ तरी कुठून मिळतो की तो त्याच माणसांच्या अंगात दहा पंधरा मिनीट असतो. तसेच ज्या स्थानावर या देव्या येतात. त्या स्थानावर येणाऱ्या देव्यांचे नावं सुद्धा त्यांना माहीत असतात. कधी कधी एकाच वेळेस दोन माणसांच्या अंगात एकच देवी येते. ती एकच देवी, तेही दोन माणसांच्या अंगात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नांवर कोणीच व्यक्ती आपल्या मेंदूवर जोर लावून विचार करीत नाहीत. त्यातच जर एखाद्यानं हळूच जावून त्या देवी असणाऱ्या माणसाला टाचणी वा पीन टोचली तर त्याला अंगारच व्हायला नको. परंतु तो हडबडून जागा होतो. मग देवी जर अंगात असते तर त्याला का बरं टाचणी वा पीन टोचल्यास वेदना व्हावी. होवूच नये वेदना. परंतु या गोष्टीवर कोणीच लक्ष केंद्रित करीत नाही आणि म्हातारे, अनुभवी, शिकलेले आणि इतर तत्सम घटक वेड्यागत अंगात येणाऱ्या देव्यांच्या माग फिरत असतात. वाटत असतं की त्या माणसांच्या अंगात खरोखरच देवी आली आहे. यावर कोणी काही बोलल्यास ती देवी बोलायच्या अगोदर आजुबाजूची माणसंच बोलत असतात. ती त्या अंगात येणाऱ्या देवीसाठी भांडण करीत असतात. जसं त्या अंगात येणाऱ्या देवीचं नाही तर तिथं गोळा असणाऱ्या भाविकांचंच नुकसान होतं. म्हणत असतात की त्या देवी अंगात येणाऱ्या झाडाची टिंगल करु नका. नाहीतर ती देवी तुम्हासह आम्हालाही शाप देईल. महत्वाचं सांगायचं झाल्यास असं का होतं? याचं उत्तर आहे धर्माचा पगडा. आपल्या धर्माचे जे नियम आहेत. त्या नियमानं जे शिकवलं. तेच आपण मानतो व पाळतोही. मग आपण कितीही शिकलो. कायदेपंडित झालो, न्यायाधीश बनलो, तरी धर्माला मानतो आणि धर्मातील अशा अंधश्रद्धा व कुप्रथाही पाळतो. त्यावर आपण सखोल विचार करीत नाही. विशेष म्हणजे काल अस्तित्वात आलेल्या प्रथा आज कितीही वाईट असल्या वा वाईट वाटत असल्या तरी आपण त्या पाळतोच. कालची मंगळ असल्यानं लवकर विवाह न झालेली गांधारी. ती जरी सौंदर्यवती असली तरी या समाजानं तिला मंगळ आहे म्हणून लवकर विवाहच करु दिला नाही व तिला एका आंधळ्याशी विवाह करावा लागला. मग मी या सौंदर्याचं काय करु, मला आंधळा पती मिळाला, म्हणून त्या अबलेनं जीवनभर डोळ्याला पट्टी बांधून आंधळं राहून संसार केला. विचार करा की ते संपुर्ण आयुष्य डोळ्याला पट्टी बांधून जगतांना तिला किती त्रास झाला असेल. तरीही ती गोष्ट लक्षात न घेता आजही आपण तिला मंगळ आहे. लग्नानंतर तिचा पती मरेल. ही भ्रामक कल्पना विचारात घेवून एखाद्या सौंदर्यवान मुलीचा विवाह होवू देत नाही. अन् ती मुलगी जेव्हा पळून जाते, तेव्हा दिसतं की तिला मंगळच नव्हता. कारण तिचा पती जीवंत असतो बराच काळपर्यंत. शिवाय जिला मंगळ आहे म्हणून जिचा विवाह होत नाही. ती मुलगी एखाद्यावेळेस पळून गेल्यास तेही आपल्याला खपत नाही. मग मुलींनी काय करावं. पळून जावूनही विवाह करु नये आणि मंगळ आहे म्हणूनही विवाह करु नये. अन् मंगळ जाईपर्यंत तारुण्य जावून ढळतं वय आलं की तिला चांगला संसारी पुरुष मिळू नये. तो पुरुष गांधारीच्या पतीसारखा आंधळा मिळावा. तो पती दारुड्या मिळावा. तो पती एखादा अपंग मिळावा व ती सुंदर असूनही व तिची अपेक्षा असूनही व तिला चांगला पती मिळत असतांनाही तिचा अपेक्षाभंग व्हावा. हे केवळ समाजाच्या कुविचारानं घडावं ही विचार करायला लावणारी बाब आहे. कालचं ठीक आहे की काल सर्वसामान्य लोकं शिकलेले नव्हते. परंतु आज तर लोकं शिकलेले आहेत ना. आजच्या लोकांना तर सारंच कळतं. चांगलं वाईट. कुप्रथा आणि चांगल्या प्रथा. तरीही आज समाज शिकूनही कालच्याच अडाणी लोकांसारखा वागतो. हे काही बरोबर नाही. काल अडाणी लोकांनी सतीप्रथा, मंगळप्रथाच नाही नरमेध, गंगाप्रवाह, कन्यावध, चरकपुजा, तृषानल यासारख्या इतरही काही बऱ्याच अघोरी प्रथा सुरु ठेवल्या होत्या. इंग्रज आले. त्यांनी त्या प्रथांचा सखोल विचार केला. म्हणूनच त्या प्रथा बंद झाल्या. नाहीतर आजही धर्माचाच वास्ता देवून लोकांनी त्या प्रथा सुरु ठेवल्या असत्या व आजही कित्येक स्रीच नाही तर कित्येक पुरुषांचेही धर्माच्या नावावर कितीतरी बळी गेले असते यात शंका नाही. कालच्या आम्रपालीचंही तसंच झालं. कालची सुंदर असलेली आम्रपाली एक स्री असल्यानं गणराज्य असूनही येथील तथाकथीत समाजानं तिला छळलं नव्हे तर तिला वेश्या बनवलं. तसं पाहिल्यास जेव्हा सुरुवातीला महाजनपदे अस्तित्वात आली. तेव्हा मंत्रीमंडळाच्या मनोरंजनासाठी एक नगरवधू पद निर्माण झालं. त्याचं कारण होतं की बिचारं मंत्रीमंडळ हे राज्यासाठी काम करतं. ते अतिशय मेहनत करतं. प्रसंगी युद्धही करतं व आपला जीव धोक्यात घालून विजय मिळवतं. असा विजय मिळविल्यावर त्याच लोकांचं मनोरंजन म्हणून नाचगाण्याचा कार्यक्रम असावा. ते नाचगाणं कोण करेल? यासाठी नगरवधू पद निर्माण करण्यात आलं. परंतु ही नगरवधू एका कुवाऱ्याच मुलीला बनवावं. तिनं आयुष्यात कधीच विवाह करु नये. ती सुंदरच असावी. ती अमूक असावी. धमूक असावी. असे काही नियम नव्हते. शिवाय हे पद जाणूनबुजून जबरदस्तीनं आपल्या स्वार्थासाठी देण्याची पद्धत नव्हती. ते पद देतांना त्या स्रिला त्या पदाची सर्वतोपरी माहिती करुन दिली जायची व ते पद त्यानंतर जेही कोणती महिला स्विकारत असे. तिला त्या पदाचे नियम माहीत असूनही ती अगदी स्वखुशीनं स्विकारत असे. परंतु कालांतरानं त्या नगरवधू पदात बदल करण्यात आला. तो बदल स्वार्थागत करण्यात आला व त्यात स्वार्थ शिरल्यानं स्वार्थागत नियम बनविण्यात आले. मग नगरवधू पद द्यायचं आहे ना. ती सुंदर असावी. ती कुवारी असावी. ती अल्पवयीन असावी. शिवाय तिनं आयुष्यभर विवाह करु नये. असे नियम लावले गेले व ज्याची बळी आम्रपालीच नाही तर अशा बऱ्याच कुवाऱ्या स्रिया बनल्या की ज्यांना येथील तथाकथीत सत्तेचं बळी बनावं लागलं व इच्छा नसतांनाही वेश्या बनून आयुष्यभर वेश्यापणाच्या वेदना सहन कराव्या लागल्या. कारण होतं त्या स्रिला विधात्यानं दिलेलं सौंदर्य. तेच सौंदर्य येथील तथाकथीत लोकांच्या डोळ्यात खुपत होतं व वासनाधिनता मनात शिरवून त्या सुंदर स्रिचे कसे लचके तोडता येतील. याचा विचार येथील तथाकथीत समाज करीत होता. विशेष सांगायचं झाल्यास येथील तथाकथीत समाजानं येथील स्रियांनाच नाही तर काही सामान्य लोकांना छळलं. धर्माच्या नावानं, काही कुप्रथा निर्माण करुन. त्या प्रथात स्वार्थ शिरवून. त्या समाजानं कुप्रथा निर्माण करुन काहींना वेश्या बनवून छळलं तर काहींना सती बनवून ठार केलं तर काहींना मंगळ आहे असं सांगून कुप्रथांच्या नावानं बंदिस्त केलं. त्यातच कधी एखाद्या ठिकाणी भुस्खलन झालं वा भुकंप आला वा पूर आला तर काहींच्या अंगात येणाऱ्या देव्यांनी सांगितलं की अमूक अमूक प्रथा बंद झाल्या. म्हणूनच हे प्रकार सुरु आहेत. आजही तेच सुरु आहे. मात्र आज नगरवधू, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह ह्या प्रथा बंद झाल्या आहेत. तरीही काही कुप्रथा बंद झाल्या नाहीत. आजही देव्या अंगात येतात. कौल देतात. म्हणतात की आपण असं करीत नाही. म्हणूनच भुकंप आला. महापूर आला आणि भुस्खलन झालं. अन् त्यावर विज्ञान शिकलेले लोकं आज वैज्ञानिक काळात विश्वास ठेवतात. आज कित्येक रजस्व स्रियांचा मंदिरप्रवेश होत नाही. त्या स्वयंपाक करायलाही चालत नाहीत. विटाळ होतो आणि जेव्हा त्याच स्रीवर त्याच अवस्थेत बलात्कार केले जातात. तेव्हा ती स्री चालते. असा आमचा समाज. काल केवळ धर्माच्या नावावर अबला स्रियांना छळत होता आणि छळत असतो आजही. महत्वपुर्ण बाब ही की काल काही प्रथा बंद झाल्या. आज उरल्यासुरल्या प्रथा बंद करण्याची गरज आहे. कारण आज संविधान आहे व स्वातंत्र्यही आहे. आज समाजदेखील उच्चशिक्षित आहे व तो विज्ञान मानतो. अशा काळात आजतरी असल्या कुप्रथा बंद व्हाव्या. मंगळ आहे, म्हणून विवाह न करणं. होवू न देणं. रजस्व आहे, म्हणून स्वयंपाक सोडा, घरात वावरु न देणं. मुलगी पळून जाते म्हणून बालवयातच जाणूनबुजून, जबरदस्तीनं बालविवाह करणं, मुलगी समाजात सुरक्षीत नाही, म्हणून नरमेध, कन्यावध करणं. या भ्रूणहत्याच आहेत व स्रियांना छळणंच आहे. ह्या गोष्टी जेव्हा बंद होतील. तेव्हाच स्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र्य होईल. ती लक्ष्मी, सरस्वती अन् दुर्गा ठरेल यात शंका नाही. इथल्या पुरुषसत्ताक समाजानं मातृसत्ताक स्रीजातीला माणसासारखं वागवावं म्हणजे झालं. तो ज्यावेळेस सर्वच स्रियांना माणसासारखं वागवेल. तेव्हाच स्री संपुर्णपणे स्वतंत्र्य झाली असं म्हणता येईल. मुठभर स्रियांच्या वागण्यावरुन स्री स्वतंत्र्य झाली असं म्हणता येणार नाही. आम्रपाली विचार करीत होती. विचार करीत होती की का स्रियांच्याच नशिबी असे भोग यावेत. विधात्यानं स्रियांना सुंदर बनवावं आणि त्या सुंदरतेला पुरुष नावाच्या किड्यानं जाणूनबुजून फसवून कुरतडावं. जशी ती उंदरांची जात लागली. एवढंच नाही तर तिला फसवावं, गांधारीला फसवलं तसं. आम्रपालीला आठवत होती गांधारी. गांधार राज्यही एक गणराज्यच होतं तिच्यासारखं. त्या राज्यातील गांधारीही अनुपम अशी सौंदर्य देवीच. परंतु समाज अंधश्रद्धेनं पोखरलेला. मला तर या समाजानं वेश्याच बनवून ठेवलं आणि तिला, तिच्या पाठीमागं लावून ठेवलं की तिला मंगळ आहे. तिचा विवाह झाल्यास तिचा पती मरेल. कोण विवाह करेल मग तिच्याशी. सगळे नियम इथल्या पुरुषांनी बनविलेले. ते नियम आपल्या स्वार्थासाठी बनविलेले. अशानं तरी सौंदर्यवान महिलांच्या देहाचा उपभोग घेता येईल. गांधारीचंही तसंच झालं. गांधारी सुंदरच होती. तसं तिला मंगळ असल्यानं व आजुबाजूला तेच माहीत असल्यानं तिला कोणत्याच पुरुषानं मागणी घातली नाही. तसं पाहिल्यास गांधारी जशी सुंदर होती. तसे तिचे डोळेही सुंदर होते. मग तिला मंगळदोष असल्यानं तिच्या विवाहाला वेळ लागला. त्यानंतर जो राजकुमार तिला मागणी घालायला आला. तो राजकुमार आंधळा होता. त्यानंतर गांधारीचं मन खट्टू झालं. ती अतिशय निराश झाली. ज्याचा परिणाम हा झाला की ती विचार करु लागली. मी सुंदर, त्यापेक्षा माझे डोळे सुंदर. अशा सुंदर डोळ्याचं मी काय करु. गांधारीनं तसा विचार करुन डोळ्याला पट्टी बांधली. तिही कायमचीच. ती पट्टी मरणापर्यंत निघाली नाही. आम्रपाली विचार करु लागली, हे तथाकथीत समाज. या समाजानं आपल्या स्वार्थासाठी व कामवासनेसाठी स्रियांची व स्रियांच्या विचारांची हत्या केली आहे. तिला या पुरुष संस्कृतीनं अगदी मनमोकळेपणानं व स्वतंत्र्यपणे अनादीकालापासून वावरु दिलं नाही. मलाही अगदी उभरत्या काळात समाजानं तसंच वागवलं. मला माझं प्रेमही मिळू दिलं नाही. माझ्या प्रेमाचीच नाही तर माझ्या प्रेमीचीही हत्या केली या समाजानं. हा निव्वळ आयुष्याचा छळ. शिवाय त्या मनुदेवानं माझी अब्रू लुटली. त्यानंच माझ्या पुष्पक कुमारचा जीव घेतला. वाटत होतं की आयुष्य रंगीन आहे. या आयुष्यात आनंदाची हिरवळ आहे. परंतु नाही. अनुभवातून कळलं मला की आयुष्य हे रंगीन नाही तर रंगहीन आहे. आयुष्यात आनंदाची हिरवळ नाही तर संपुर्ण आयुष्यच दुःखदायक आहे. आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केलं होतं मी. तेही तुटलं. विफल झालं. मला प्रेम तसं पाहिलं तर मिळालंच नाही. दुसरं प्रेम केलं बिंबिसारवर. वाटत होतं की बिंबिसार मला मदत,करेल. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या मनुदेवाला वठणीवर आणेल. माझ्या वैशालीला स्वतंत्र करेल. अन् मला या सुंदर ललनेला आपली पट्टराणी बनवून मानसन्मान देईल. तसं स्वप्नच पाहिलं होतं मी. परंतु नाही. ते माझं स्वप्न वाया गेलं. कारण राजा बिंबिसारनं मला रखेल बनवलं. आयुष्यभरासाठी रखेल अन् पुढं तो मेल्यानंतर मला मगधवरुन परत माझ्या वैशालीलाच यावं लागलं. जरी अजातशत्रू माझ्यावर प्रेम करीत असला तरी. अजातशत्रू........ राजा बिंबिसारचा पुत्र. त्यानं राजपिपासू लालसेनं सत्ता आपल्या हातात घेतली. मग मी का राहू तिथं. मी आले परत वैशालीला. अन् तोही मुर्ख की तोही माझ्यावर प्रेम करु लागला होता. त्या गोष्टीसाठी व मला प्राप्त करण्यासाठी त्यानंही माझ्या वैशालीशी युद्ध केलं. माझ्या वैशालीला रक्तबंबाळ केलं. अन् ही वैशाली मुर्ख की या वैशालीनं माझं त्याचेवर प्रेम आहे असं समजून मलाच कैदेत टाकलं. राजा बिंबिसारनं माझ्यावर प्रेम केलं की नाही हे मला माहीत नाही. त्यानं मांडलिक झालेल्या वैशालीला बंधनमुक्त केलं. म्हणूनच आज मला वैशालीला राहता येत आहे. तशी आर्जव केली होती मी बिंबिसारला आणि त्यानं माझी आर्जव स्विकार केली होती. म्हणूनच आज मी वैशालीला आहे. हाय, काय रे हे प्रारब्ध. एकाच कुटूंबातील ते तिघंही जण. राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू आणि राजा उदयन. तिघांच्याही हव्यासाची शिकार व्हावं लागलं मला. राजा अजातशत्रुनं माझ्यासाठी या वैशालीशी युद्ध केलं. जे राजा बिंबिसारनं केलं. त्यानंही माझ्याचसाठी युद्ध केलं. अन् तो उदयन, बिंबिसारचा नातू. त्यानंही माझ्या देहाचा उपभोग घेतला विनाकारणच. मी रखेल होती ना बिंबिसारची. मग राजपरीवालातील कोणीही येवो, अन् कोणीही माझ्या शरीराचे लचके तोडो. आम्रपालीला तिच्या गतकाळातील जीवन आठवत होतं. गतकाळात तिला दिलेल्या वचनानुसार राजा बिंबिसारनं वैशालीवर आक्रमण केलं व वैशालीला जिंकून घेतलं. त्यानंतर त्यानं तो तिच्याजवळ आला. कारण त्याला तिचा सहवास हवा होता त्याला. त्यावेळेस ती गोष्ट त्याला माहीत व्हायची होती. जी गोष्ट राजा मनुदेव मरतावेळेस आम्रपालीजवळ बोलला होता. बोलला होता की राजा बिंबिसारानं आम्रपालीसाठी माझ्याशी युद्ध केलं. परंतु ज्या आम्रपालीला मिळविण्यासाठी त्यानं वैशालीशी युद्ध केलं. त्या वैशालीची राजगणिका आम्रपाली ही काही कुमारी नाही. तिचं कौमार्य या राजा मनुदेवानं भंग केलं आहे व त्या बिंबिसारला ती उष्ट्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. हे माहीत झालं नसल्यानं राजा बिंबिसार तिच्याजवळ येताच ती म्हणाली होती की त्यानं वैशालीला नक्कीच जिंकलं असेल, अन् तिच्या अपमानाचा बदला नक्कीच घेतला असेल. तरी त्यात वैशालीच्या प्रजेचा काही एक दोष नाही. तिची अब्रू लुटणारा राजा, ज्याचा बदला घेतला. तो मरण पावलेला आहे. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी तिला नगरवधू बनवून वेश्येपणाचं काम करायला बाधीत केलं, तेही मरण पावलेले आहेत. आता तिचा बदला पुर्ण झालेला असून त्यानं दोष नसलेल्या वैशालीला सोडून द्यावं. तसं आम्रपालीनं म्हणताच राजा बिंबिसारनं वैशालीला बंधनमुक्त केलं नमस्कार स्वतंत्रता दिली. त्यानंतर वर्षाकारनं मनुदेवानं आम्रपालीबद्दल सांगितलेली गोष्ट राजा बिंबिसारला सांगताच राजा बिंबिसार खट्टू झाला होता. वर्षाकार मनुदेवाबद्दल बोलला होता. त्यानंतर बिंबिसारचं तिच्याबद्दल मन खट्टू झालं. त्यानंतर त्यानं तिला आपली पट्टराणीही बनवलं नाही. उलट तिनं त्याला विवाहाची मागणी घालताच त्यानं तिला सांगितलं की मी तुझ्याशी विवाह करु शकत नाही. कारण तू वैशाली राज्यातील नगरवधू आहेस व तू एक वैशालीची राजनर्तिकाच नाही तर गणिका आहेस. फरक एवढाच आहे की आज मगधनं वैशालीवर विजय मिळवला. ज्यातून तुलाही मगधनं जिंकलं. त्यामुळं निदान मी जीवंत असेपर्यंत तुला वैशालीला जाता येणार नाही. तुला इथंच माझी सेवा करीत राहावं लागेल, माझ्या मला काही होईपर्यंत. काल वैशालीची नगरवधू होती. आज मगधची नगरवधू म्हणून तुला राहावं लागेल. राजा बिंबिसारनं आम्रपालीला तसं म्हणताच ती निराश झाली. तिला पश्चाताप होवू लागला. वाटत होतं की केव्हा केव्हा बिंबिसारचं बरंवाईट होतं व केव्हा केव्हा मी वैशालीला परत जाते. अशातच ते तात्कालिक कारण घडलं. अजातशत्रूनं राजा बनण्यासाठी बिंबिसारला कैदेत टाकलं. ज्यावेळेस अजातशत्रूनं त्याच्या पित्याला पदलालसेनं बंदिगृहात टाकलं. त्यानंतर आम्रपाली मगधला सोडून वैशालीला आली होती. आम्रपाली वैशालीलाच राहात होती. तेव्हा अजातशत्रूला आम्रपालीवर प्रेम झालं होतं. त्यातच त्यानं आम्रपालीला मिळविण्यासाठी आपल्या वडीलांसारखंच वैशालीवर आक्रमण केलं. ज्यातून त्याला आम्रपाली तर भेटली. परंतु तिचं प्रेम त्याला मिळालं नाही. जेव्हा वैशालीतील लोकांना कळलं की आम्रपाली ही अजातशत्रूच्या प्रेमात आहे. तेव्हा ती बंदिगृहात पडली आणि तिला सांगण्यात आलं की तो अजातशत्रू, त्यानं आपल्या पित्याची म्हणजेच राजा बिंबिसारची हत्या केली राज्य पिपासू वृत्तीनं. त्यानंतर आम्रपालीला बिंबिसार आठवायला लागला. आठवायला लागला त्याचा तो सहवास. तो सहवास तिच्या मनाविरुद्ध नव्हता तर तिच्या मनाच्या इच्छेनं होता. प्रसंगी राजा बिंबिसारनं तिचा स्विकार रखेल म्हणून केला असला तरी. आजही आठवत होते तिला राजा बिंबिसारशी केलेले प्रणयाचे प्रसंग. त्यातच तिला राग येत होता अजातशत्रूचा. त्यानंतर अजातशत्रू तिला केव्हा भेटतो आणि केव्हा ती त्याला धडा शिकवते असं तिला होवून गेले होते. कारण राजा बिंबिसार कितीही झाला तरी तिचा प्रेमीच होता. वैशालीचं युद्ध झाल्यानंतर आम्रपालीला अजातशत्रू जेव्हा भेटला. तेव्हा तो तिला म्हणाला होता, "राजा बिंबिसारनं तुला मगधची नगरवधू बनवलं येथून नेवून. पटराणी बनवलं नाही. परंतु तू माझ्यासोबत चल. मी तुला मगधची नगरवधू नाही तर तुला माझी प्रिय पटराणी बनवते." ते अजातशत्रूचं आश्वासन. परंतु तिला आता वैशाली सोडून जावंसं वाटत नव्हतं. त्याचं कारण होतं राजा बिंबिसार. त्यानंही वैशालीवर आक्रमण करुन तिला नेलं होतं मगधला पट्टराणी बनविण्यासाठीच. परंतु त्यानं तिला मगधला नेल्यावर स्वतःची पट्टराणी सोडून नगरवधू व स्वतःची रखेल बनवलं होतं. हा इतिहास होता मगधचा. म्हणूनच तिनं अजातशत्रूसोबत जायचं टाळलं. मात्र तिला अजातशत्रूनं राजा बिंबिसारची हत्या केली हे माहीत नसल्यानं तिनं अजातशत्रूवर प्रेमाचा वर्षावच केला होता. तो बंदिवास. त्या बंदिगृहात असतांना आम्रपालीला अजातशत्रू आठवत होता. केव्हा त्याला धडा शिकवतो व केव्हा नाही असं तिला होवून गेलं होतं. परंतु तशी वेळ यायची होती. त्याच क्षणाची आम्रपाली वाट पाहात होती व बंदिगृहातच ती तीळ तीळ जळत होती. ***************************** आम्रपाली वैशालीच्या बंदिगृहात होती. अजातशत्रू आपला शत्रू आहे व त्यानं आम्रपालीसाठी आपल्या वैशालीवर युद्ध थोपलं. शिवाय तरीही आम्रपालीनं अजातशत्रूला अभय दिलं म्हणून वैशाली चिडली होती. त्याच रागाची परियंती म्हणून तिला वैशालीनं बंदिगृहात टाकलं होतं. तशी ती गोष्ट लवकरच राजा अजातशत्रूच्या कानावर गेलीच होती व त्याला वैशालीचा राग आला. वाटलं की ही वैशाली. ज्या आम्रपालीनं या अजातशत्रूला अभय दिलं. त्याचं रक्षण केलं. त्याचं प्रेम जपलं. ती आलीही असती माझ्यासोबत. परंतु तिच्या वैशाली प्रेमानं ती येवू शकली नाही. ती वैशालीला आपली आई समजते. अन् त्याच वैशालीनं आम्रपालीला कैद करुन तुरुंगात टाकलं. तीच घटना. त्या घटनेनं तो व्यथीत झाला होता. त्याला भयंकर राग आला होता वैशाली गणराज्याचा. मग काय, त्यानं वैशालीवर पुन्हा एकदा हमला केला. ज्यात त्यानं वैशालीतील निरपराध माणसं कापली व आम्रपालीचा शोध घेवून त्यानं आम्रपालीला बंदिगृहातून मुक्त केलं. परंतु हे जरी अजातशत्रूनं आम्रपालीसाठी केलं असलं तरी तिला अजातशत्रूनं वैशालीला रक्तबंबाळ करणं आवडलं नाही. त्यातच तिच्या डोळ्यासमोर राजा बिंबिसारचा मृत्यू तरळू लागला. वाटू लागलं की याच अजातशत्रूनं आपला प्रेमी असलेला व आपल्याशी कित्येक वर्ष सहवास करणाऱ्या राजा बिंबिसारची हत्या केली. त्यानंतर तिनं अजातशत्रू तिच्या भेटीला येताच ती त्याला काही बाही म्हणाली व त्याला वैशालीतून हाकलून लावलं. त्यानंतर व्यथीत झालेला अजातशत्रू निराश मनानं वैशालीतून मगधला परत गेला होता व त्याचे डोळ्यात आज पश्चातापाचे अश्रू तरळू लागले होते. आम्रपाली वैशालीला आली होती व आज मगधच्या गादीवर त्याचा मुलगा अजातशत्रू राजा बनून आला होता. त्यानं तर लहानपणापासूनच आम्रपालीच्या चर्चा ऐकल्या होत्या. तो आम्रपालीच्याच समकालीन होता. तो मगधच्या राजगादीवर येताच त्याचंही त्याच्या पित्यासारखंच एकतर्फी प्रेम आम्रपालीवर जडलं होतं. शिवाय त्यानं तो लहान असतांना आम्रपालीला पाहिलं होतं. परंतु आता त्या गोष्टीला बरेच दिवस झाले होते. त्यातच त्याला आम्रपाली एवढी आवडायला लागली होती पित्यासारखी की तिला मिळविण्यासाठी तो कधीकधी कासावीस व्हायचा. आम्रपाली जशी राजा बिंबिसारवर प्रेम करीत होती. तशीच ती त्याचा मुलगा अजातशत्रूवरही प्रेम करायला लागली होती. परंतु ते आम्रपालीचं प्रेम ना अजातशत्रूला माहीत होतं ना अजातशत्रूचं प्रेम आम्रपालीला माहीत होतं. आम्रपाली पुष्कळ सुंदर होती व कोणीही एकवेळ तिला पाहिल्यास मंत्रमुग्ध होवून जात असे. अजातशत्रूही आम्रपालीवर प्रेम करु लागला होता व आम्रपाली देखील त्याचेवर प्रेम करु लागली होती. त्यातच तिला मिळविण्यासाठी अजातशत्रूनं वैशालीवर आक्रमण केलं आणि वैशालीभर तो आम्रपालीला शोधत फिरु लागला. त्यातच एक दिवस आम्रपाली अजातशत्रूला वैशालीत एका रस्त्यानं फिरतांना दिसली. तसं तिनं त्याला ओळखलं नाही. परंतु अजातशत्रूनं त्याला ओळखलं. आम्रपालीची भेट अजातशत्रूशी झाली होती. त्यानं तिला ओळख दाखवली नाही. तिला हेही माहीत नव्हतं की अजातशत्रू हा बिंबिसारचा पुत्र आहे. त्यातच तिला वैशालीवर प्रेम होतं. त्यामुळंच ती वैशालीला राहायला आली होती. ज्यावेळेस राजा अजातशत्रूनं वैशालीला जिंकलं. त्यावेळेस तिनं अजातशत्रूलाही तेच म्हटलं होतं, जे तिनं राजा बिंबिसारला गतकाळात बोलली होती. म्हटलं की मी तुझ्या प्रणयाची जशी दिवाणी आहे. तशीच वैशालीचीही दिवाणी आहे. जर तू माझ्यावर प्रेम करीत असेल तर ज्या वैशालीवर तू विजय मिळवला. त्या वैशालीला स्वतंत्र्य ठेव. तुला या वैशालीला यायला, मला भेटायला, माझ्याशी सहवास करायला नव्हे तर प्रणयक्रिडा करायला काहीही मनाई नाही. त्यानंतर अजातशत्रूला आम्रपाली तशी म्हणातच त्यानंही वडिलांसारखंच वैशालीला बंधनमुक्त केलं होतं. आम्रपालीचं वैशालीवर प्रेम होतं व तिला वैशाली अति प्रमाणात आवडत असे. त्यातच वैशालीला अनेक शत्रूंपासून वाचविण्यासाठी ती आपल्या देहाचा सौदाही करीत असे. जसा सौदा तिनं अजातशत्रूशी केला होता. आज वैशालीत ती असल्यानं वैशालीकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहात नसे. शिवाय आजही अजातशत्रू कधीकधी आम्रपालीला भेटायला येत असे. दोघांचंही प्रेम जोरात सुरु झालं होतं. मध्यंतरीचा काळ अगदी शांततेत गेला होता. आम्रपालीच्या प्रणयाचा आनंद घेण्यासाठी अजातशत्रू यायचा व प्रणयाचा आनंद घेवून झाला की तो मगधला परत जायचा. त्यानंतर ते प्रेम वैशालीच्या मंत्रीगणांना माहीत झालं व त्यांनी आम्रपालीला शिक्षा द्यावी म्हणून चक्कं आम्रपालीलाच वैशालीच्या कैदेत टाकलं. कारण त्यांना माहीत नव्हतं की तिच्याचमुळं अजातशत्रूनं वैशालीला स्वतंत्र्य ठेवलेलं आहे. फक्त त्यांना हे माहीत होतं की आम्रपाली ही आपल्या वैशालीचा जो एकमेव शत्रू आहे, त्याचेवर प्रेम करते व त्याला लपूनछपून वैशाली नगरीत येवू देते. हे माहीत होताच शेवटी तिला वैशालीच्या तुरुंगात टाकलं गेलं व तिला त्याच तुरुंगात सांगितलं गेलं की हा अजातशत्रू दुसरा तिसरा कोणी नसून राजा बिंबिसारचा हत्यारा आहे. त्याचं वर्णनही सांगितलं होतं वैशालीच्या बंदिगृहात तिला. आम्रपाली वैशालीच्या बंदिगृहात होती व ऐकत होती अजातशत्रूच्या गोष्टी. तो कसा गादीवर आला त्याचं वर्णन ऐकत होती. अजातशत्रू मगधला जात होता आम्रपाली बोलल्यानंतर. आज तो घायाळ होता त्याला झालेल्या जखमांनी. जसं त्यानं ऐकलं होतं की आम्रपालीला अजातशत्रूमुळं वैशाली गणराज्यानं तुरुंगात टाकलं. त्यामुळंच तो संतप्त झाला होता व त्यातच अतिशिघ्र युद्ध करुन त्यानं आम्रपालीला सोडवलं व तिला मगधला न्यायला तयार झाला. वारंवार विनवणी करु लागला. परंतु आम्रपालीच्या मनात जो तीव्र संताप होता, त्यानं केलेल्या बापाच्या हत्येचा आणि वैशालीतील कित्येक लोकांची निष्कारण हत्या करण्याचा. त्यामुळं आम्रपाली अजातशत्रूला बोल बोल बोलली. त्यानंतर अजातशत्रू निराश झाला व निराश मनानं त्यानं वैशाली सोडलं व तो मगधचा रस्ता चालू लागला. तेव्हा त्याच्या मनात तेच ते विचार घोळत होते. ज्या विचारानं तो घायाळ होत होता. 'मी अजातशत्र. या आजातशत्रूला आजपर्यंत कोणीच हारवलं नव्हतं, ना कोणाकडून हा पराभूत झाला होता. त्यातच मला वाटत होतं की अजातशत्रू हा कोणाकडून पराभूतच होवू शकत नाही. तसा मला अहंकारही होता व त्यामूळंच मी आपलं नाव अजातशत्रू ठेवलं होतं. तसं माझं नाव अजातशत्रू नव्हतंच. माझं नाव होतं कर्णिक. मात्र आज मला वाटतंय की आपण आज आम्रपालीकडून हरलोय. आपला पराभव झालाय. हे बाहेरचे माझे घाव परवडले. परंतु जी मनात आम्रपालीनं जखम दिली. ती काही बरी नाही. बाहेरच्या जखमा कदाचीत बसतीलही. ते घाव भरतीलही. परंतु आम्रपालीनं दिलेल्या बोलाच्या जखमा....... त्या कशा भरतील. राज्यलालसेनं मी माझ्या वडीलांना कैदेत टाकलं आणि जेव्हा मला कळलं की माझ्या वडीलाला मी कैदेत टाकण्याआधीच त्यांनी मला युवराज बनवलं होतं. तेव्हा वेळ निघून गेलेली होती. बिचारे माझे भाऊबंद. हल, विहल. मला वाटत होतं की त्यांनाच माझे वडील या मगधच्या सिंहासनावर बसवतील. परंतु तसं घडलंच नाही. मीच बसलो राजसिंहासनावर. ते माझ्या वडीलांचीच कृपा. अन् जेव्हा ते कळलं मला व माझ्या वडीलांची माफी मागायला गेलो. तेव्हा काय माहीत माझ्या वडीलानं विष प्राशन केलं होतं. कदाचीत त्यांना वाटत असेल की इतिहासात कुणाला माफ करण्याची संधी नसावी. शिवाय तशी राज्यलालसेसाठी कोणत्याही राज्यकर्त्यानं आपल्या पित्याला कैदेत टाकू नये. तशी चुकी केल्यावर व ती लक्षात आल्यावर ती चूक सुधरवता येत नाही. म्हणूनच राज्यकर्त्यानं राज्य करतांना चुकण्यापुर्वी प्रत्येक पाऊल सावधानतेनं टाकावं. म्हणूनच माझ्या वडीलानं विष प्राशन केलं असावं.' ती चूक. राज्यलालसेची ती चूक एक घोडचूकच होती की ती घोडचूक आता राजा अजातशत्रूच्या लक्षात आली होती. अन् दुसरी घोडचूक होती आम्रपालीवर प्रेम करणं. जी त्याच्या वडीलाची प्रेमिका होती अर्थात त्याच्याच आईसमान असलेली. तिही एक घोडचूकच होती. त्यामुळंच तो पश्चातापाच्याही अग्नीत जळू लागला होता. अजातशत्रू मगधला पोहोचला होता. तो मगधला राहू लागला होता. राज्यकारभारही करु लागला होता. परंतु आता वैशालीतून परतल्यावर त्याचं मन राज्यकारभारात लागत नव्हतं. ना कोणते निर्णय त्याला घेता येत होते. त्याच्या मनाची अवस्था अस्थिर झाली होती. जे त्याच्या वडीलासोबत घडलं होतं. तशीच परिस्थिती आणि मनाची अवस्था त्याच्याही मनाची झाली होती. त्यातच तो त्या मनाच्या अस्थिर अवस्थेवर मार्ग शोधू लागला होता व आठवायला लागला होता त्याला त्याच्याच वडीलाचा उतारवयाचा काळ. अजातशत्रूला आज त्याचा बाप आठवायला लागला होता. आठवत होते राजा बिंबिसारचे ते उतार वय. त्या वयात राजा बिंबिसारनं बौद्ध धम्माचा स्विकार केला होता. तोच क्षण. त्यालाही वाटलं की बौद्ध धम्मात मनाच्या शांतीचा मार्ग आहे. तो आपल्या पित्यासारखाच स्विकारायला हवा. 'बौद्ध धम्मं' तो एक शांतीचा धम्म होता व वाटत होतं की हा बौद्ध धम्मच आपल्याला शांती प्रदान करु शकतो. ज्या धम्मानं अंगलीमाल सारख्याला सुधरवलं. ज्या धम्मातून अंगूलीमालला एका दरोडेखोरापासून एक बौद्ध भिक्षू बनता आलं. कालचा हत्यारा अंगलीमाल आज अहिंसक बनला. त्याला जीवहत्या हे पाप वाटतं. त्यानं आपलं नावही बदलवलं आहे व त्यानं आपलं नाव अंगलीमालवरुन अहिंसक ठेवलेलं आहे. आपणही स्विकारावा बौद्ध धम्मं. अन् आपणही आपलं जीवन बौद्धमय बनवून निर्वाणपद प्राप्त करावं.' अजातशत्रू स्वमनात विचार करीत होता. तसे त्याच्या मनात दोन प्रकारचे विचार होते. पहिला विचार म्हणजे आपण बौद्ध धम्म स्विकारण्याचा आणि दुसरा विचार होता गौतम बुद्ध आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा देईल काय? असंच त्याला वाटत होतं. शिवाय गौतम बुद्ध आपल्याला काय म्हणतील असंही त्याला वाटत होतं. त्याचं कारण होतं. त्यानं कित्येक वेळेस त्याचाच मित्र असलेला गौतम बुद्धाचा भाऊ देवदत्त, त्याच्या मदतीने गौतम बुद्धाची कित्येक वेळेस हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो त्याचा विचार. तो विचारच करीत होता की त्याची तशी एकदा भेट रस्त्यानं चालल्या असलेल्या भिख्खूशी झाली. त्यानं त्याला विचारलं, "मी राजा अजातशत्रू. मला आपले गौतम बुद्ध आपल्या चरणापाशी जागा देतील काय?" तो अजातशत्रूचा प्रश्न. त्यावर लगेच त्या बौद्ध भिख्खूनं होकार दिला. त्यानंतर अजातशत्रूनं त्या भिख्खूला सांगितलं की मी गौतम बुद्धांना कसा कसा त्रास दिला. त्यावर तो बौद्ध भिख्खू म्हणाला, "ते गौतम बुद्ध आहेत. ते दयावान आहेत व त्यांना कोणत्याही स्वरुपाचा राग येत नाही. कोणाचाही राग येत नाही .ते राग मनात ठेवत नाहीत. ते महात्मा आहेत. आपण जरी त्यांच्याविरुद्ध कट रचले असतील आणि त्यांची हत्या करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते मनात ठेवत नाहीत. ते सढळ मनानं माफ करतात. आपण जावं त्यांच्याकडे व आपण आपला विचार त्यांच्याकडे मांडावा." त्या बौद्ध शिष्यानं केलेलं कथन. त्यावर विचार करणारा अजातशत्रू. लागलीच तो गौतमाकडे गेला. तसं त्यानं गौतमांच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्यानंतर आपली ओळख दिली व सांगितलं, "भगवन, मी तुमची हत्या करण्याचा वारंवार प्रयत्न केला. मी तसा माफीच्या लायक नाही. परंतु माझे अपराध पोटात घ्या आणि मला माफ करा. तसंच आपल्या चरणावर जागा द्या." राजा अजातशत्रू. एवढा मोठा राजा. ज्याला पराभव माहीतच नव्हता. तो राजा गौतम बुद्धाच्या चरणावर. विचार येत होता की एवढा मोठा राजा. ज्या राजानं महत्त्वाकांक्षेनं गौतम बुद्धांचा आयुष्यभर रागच केला. तो आज गौतम बुद्धाच्या चरणावर कसा? परंतु तो बौद्ध धम्म होता व त्या बौद्ध धम्मानं अहिंसेच्या हत्यारानं मोठमोठ्या सत्ताधिशांना लोळवलं होतं व लौकिकता मिळवली होती. गौतम बुद्धाच्या चरणावर अजातशत्रूनं मस्तक ठेवताच ध्यानमग्न असलेल्या सिद्धार्थांनी आपले डोळे उघडले. त्यानंतर ते म्हणाले, "आपण अजातशत्रू. आपण एक राजा. आपणं तसं वागणं साहजिकच आहे. आपण एक राजा असल्यानं राज्यकर्त्यांच्या कर्तव्याला जे जे वाटत होतं. ते ते आपण केलं. त्याबद्दल माफी मागण्याचं कारण नाही. मात्र काल जे आपण केलं, ते विसरुन नवीन मार्ग अनुसरणं व त्यानुसार वागणं न्यायोचित ठरेल. तरच आपलं जीवन बदलेल. जसं अहिंसकचं झालं. अहिंसक हा पुर्वी अंगुलीमाल होता. त्यानं दरोडेखोरी केलेली होती. परंतु त्यांनी आज स्वतःला बदलवलं व तो न्यायोचित बनला. विशेष म्हणजे हे अजातशत्रू, कोणत्याही धम्माची दिक्षा घेवून माणूस बदलत नाही. त्यासाठी हवं असतं आचरण. ते आचरण जर योग्य असेल तर माणसाचा बदलण्याची काहीही गरज नाही. वा योग्य धम्म स्वीकारण्याची वा धम्मपद प्राप्त करण्याची गरज नाही." सिद्धार्थ गौतम म्हणाले. तसं ते गौतमाच्या मुखातून ऐकताच राजा अजातशत्रूचं गर्वहरण झालं होतं. त्यानंतर त्यानं बुद्ध धम्माची दिक्षा घेवून सिद्धार्थ गौतमाच्या पुढील कार्यास हातभार लावला होता. अजातशत्रूनं बौद्ध धम्म स्विकारला होता. परंतु राजपद त्यागलं नव्हतं. तो राजपदावरच होता आपल्या पित्यासारखा. तसं पाहिल्यास त्याचा एक मुलगा होता उदयन. ज्याला त्या राजपदावरच बसण्याची इच्छा होती. जो अजातशत्रू आणि वैशालीची राजकन्या चेलन्नाचा मुलगा होता. त्याचे व वैशालीचे हस्तक आजोबा चेलक यांच्याशी चांगले संबंध होते. चेलक हा जैन धर्माचा होता. अजातशत्रूनं बौद्ध धम्म स्विकारला होता. परंतु राजपद त्यागलं नव्हतं. तो राजपदावरच होता आपल्या पित्यासारखा. तसं पाहिल्यास त्याचा एक मुलगा होता उदयन. ज्याला त्या राजपदावरच बसण्याची इच्छा होती. जो अजातशत्रू आणि वैशालीची राजकन्या चेलन्नाचा मुलगा होता. त्याचे व वैशालीचे हस्तक आजोबा चेतक यांच्याशी चांगले संबंध होते. चेतक हा जैन धर्माशी संबंधीत होता. तसं पाहिल्यास वैशालीत जैन धर्म प्रगल्भ अवस्थेत होता. त्याचं कारण होतं, वैशालीचा हस्तक चेतक याला दोन मुली होत्या. एकीचं नाव होतं त्रिशला तर दुसरीचं नाव होतं चेलन्ना. त्रिशलाचा विवाह राजा सिद्धार्थशी झाला होता व त्या दोघांच्या पोटी जन्मलेला मुलगा वर्धमान महावीर हा जैन धर्माचा चोविसावा तिर्थकर होता. चेतकची दुसरी मुलगी चेलन्ना. तिचा विवाह हा राजा बिंबिसारशी झाला होता. राजा अजातशत्रू हा राजा चेतकाचा नातूच होता. परंतु राजा चेतकाला धर्माच्या पगड्यानुसार बौद्ध धम्म आवडत नसल्यानं त्याच्या नातवानं म्हणजेच अजातशत्रूनं घेतलेला बौद्ध धम्म, तो त्याचा नातू का असेना. बरोबर वाटलं नाही. त्यामुळंच की काय, राजा चेतकानं त्याचाच एक नातू व अजातशत्रूचा मुलगा उदयन याला अजातशत्रूच्या विरोधात भडकवलं. ज्यातून अजातशत्रूच्या विरोधात उदयन कट रचू लागला होता. ***************************** अजातशत्रूनं बौद्ध धम्म स्विकारला होता. ती गोष्ट आम्रपालीला माहीत झाली. त्यातच तिला अंगुलीमालचीही गोष्ट माहीत झाली होती. तिला माहीत होतं की अंगुलीमाल पुर्वी एक दरोडेखोर होता. मात्र तो गौतम बुद्धाला शरणागत गेला होता. त्यामुळं त्याच्यात परिवर्तन झालं होतं व तो आता अहिंसक बनला होता. ज्याची चर्चा गावागावातही होता. तसं पाहिल्यास तिही दुःखीच होती. तिचा प्रेमी असलेल्या राजा बिंबिसार व त्याचाच मुलगा अजातशत्रूनं बौद्ध धम्मं स्विकारताच तिलाही बौद्ध धम्मं स्विकारावासा वाटत असे व शेवटी तिनं निश्चय केला, आपण बौद्ध धम्म स्विकारावा. परंतु सहजासहजी नाही. आपण बौद्ध धम्माचक परीक्षा पाहावी. जर तो धम्मं आपल्या पसंतीस उतरला, तरच आपण त्याचा स्विकार करावा. असं ठरवताच आम्रपाली त्याबद्दल संधी शोधू लागली. ***************************** वैशाली असं राज्य होतं की त्या वैशालीत जैन धर्माला राजाश्रय होता. त्याचं कारण होतं, ते म्हणजे जैन धर्माचे चोविसावे तिर्थकार त्रिशला व सिद्धार्थ पुत्र वर्धमान महावीर. बाकीच्या इतर धर्माला काहीएक स्थान नव्हतं. वैशाली आवडत होती आम्रपालीला. जरी वैशालीनं आम्रपालीला राजकैदेत टाकलं होतं तरीही. तरीही तिला वैशाली आवडत होती. कारण तिला वैशाली तिची मातृभुमी वाटायची. तसा बौद्ध धम्मंही आवडत नव्हताच तिला सुरुवातीला. परंतु बौद्ध धम्माची परीक्षा घेत असतांना ज्या शिष्यानं तिच्यात परीवर्तन घडवून आणलं होतं. त्यामुळंच ती बौद्ध धम्म मानायला लागली होती नव्हे तर तिनं बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती. आज आम्रपाली एक बौद्ध भिक्षुणी बनली होती. तिच्या मनात काय आलं होतं, ते तिलाच माहीत होतं. तशी ती निराश झाली होती आपल्या जीवनावर व तिला आपल्या जीवनाचा राग येत होता. वाटत होतं की हे जीवन तुच्छ आहे. तिला जगावंसं वाटत नव्हतं परंतु तिला असलेल्या लेकरासाठी ती जगत होती. तिच्या मनात कालचा मनुदेव होता, ज्याची ती आजही घृणाच करीत होती. अन् बिंबिसारही होता की ज्याचा ती रागच करीत होती. त्या दोघांनीही तिला वेश्येचं जीवन दिलं होतं. तिनं बिंबिसारवर विश्वास ठेवला होता नव्हे तर ती त्याला आपल्या हक्काचा चांगला विश्वासू मित्र मानत होती. त्यामुळंच की काय, तिनं त्याला आपल्या देहाचं सुख दिलं होतं. परंतु त्यानं काय केलं. त्यानं तर तिचा चांगलाच विश्वासघात केला होता. आम्रपालीचा तसं पाहता कोणत्याच धर्मावर विश्वास नव्हता. बौद्ध धम्माचे वारे सुरु झाले होते व गावागावामध्ये बौद्ध भिख्खू येत व भिक्षा मागून निघून जात. तसं पाहता एकदा तिनं बौद्ध धम्माची परीक्षा पाहायचं ठरवलं. आम्रपाली आज विचार करीत होती त्या स्री जीवनाबद्दल. ते स्रीजीवन. त्या स्रीजीवनात कोणीही यावं आणि आपली पोळी शेकून जावी. नवंनवं आश्वासन द्यावं व त्या नव्या आश्वासनानं स्रीजीवनाला फसवावं. हे तिला आवडणारी गोष्ट नव्हती. शिवाय तिची फसगत होताच व ती बिंबिसारकडून फसताच आता तिनं जो विचार केला होता की आता आपण वेश्येचंच जीवन जगावं. मग काहीही होवो. त्यानुसार ती वेश्येचंच जीवन जगत होती. अशातच तिनं पाहिलं की एक बौद्ध भिख्खू तिच्या घराजवळून जात आहे. जो बौद्ध भिख्खू पाहायला सुंदर होता. शिवाय उंचापुरा होता. त्याला पाहताच अचानक ती त्याच्या प्रेमात पडली व त्यानं त्याला बोलावलं. म्हटलं, "आपण माझ्याकडे पाहूणचार घ्यावा. अशी माझी इच्छा आहे. जर आपला आपला धम्म श्रेष्ठ असेल तर आपण माझ्याकडे चार महिने पाहूणचार घ्या. शिवाय या चार महिन्यात आपण जर विरक्त राहिले तरच मी तुमची दासी बनेल. नाहीतर आपल्याला माझं दास बनावं लागेल." तो बौद्ध भिख्खू आम्रपालीचं ते ऐकून अवाक झाला. तसा काही वेळ तो चूप राहिला. तसं त्याला चूप असलेलं पाहून ती म्हणाली, "काय, घाबरलात की काय, माहीत आहे मला. मी एक गणिका आहे व एका गणिकेच्या हातचा पाहूणचार काही तुम्हाला बनत नाही. मी तुमची गंमत केली असं समजा." आम्रपालीचं ते बोलणं. त्यावर विचार करीत काही वेळानं तो म्हणाला, "मी तुमच्या गणिकेपणाबद्दल मौन राहिलो नाही. तर मला माझ्या गुरुची परवानगी हवी. आमच्या गुरुचा आपणाकडे चार महिने राहण्याचा आदेश नाही. मग मी तरी कसा राहू आपणाकडे? मी माझ्या गुरुची परवानगी घेवून येतो. मग मी खुशाल आपणाकडे चार महिने राहणार. चालेल काय?" त्या बौद्ध भिख्खूच्या त्या बोलण्यावर आम्रपाली म्हणाली, "खरं बोलताय की बस?" "मी खरंच बोलतोय." "परंतु हेही सांगावं की ती एक वेश्या आहे." "हो, तेही सांगणार. मगच ठरवणार." "ठीक आहे. परंतु तुम्ही वचनाचे पक्के आहात काय?" "होय. मी वचनाचा पक्काच आहे व आमचा धम्म आम्हाला सत्य वागणं शिकवतो." "परंतु मी कसं मानू की आपण वचनाचे पक्के आहात म्हणून याचं काही प्रमाण?" "प्रमाण तरी मी काय देणार आपल्याला. हं, एवढं सांगू शकतो की आपण जे म्हणाल, ते कार्य मी याक्षणी करणार. मग तर झालं." "असं जर असेल तर आपण याक्षणी माझ्या हातचं जर जेवन आपण प्राशन केलं तर मी कदाचीत तुमच्यावर विश्वास करेल. नाहीतर मी तुमच्या धम्माला थोतांड समजेल. सांगा तयार आहात काय?" तो आम्रपालीचा प्रश्न. ती तिची उदंडता. त्यावर उत्तर देत तो बौद्ध भिख्खू म्हणाला, "वाढा, आपण जे काही वाढाल ते. मी आवडीनं खाईल." "परंतु जेवनाआधी विचार करा की हे एका वेश्येचं घरचं जेवन आहे." "चालेल मला. ही माझ्या धम्माची सत्वपरीक्षा जर आहे तर मला तुम्ही दिलेलं विषही चालेल. तेही आम्ही पचवूच." "परंतु तुमचा गुरु?" "आमचा गुरु चांगल्या कर्माला वाईट म्हणत नाही." "परंतु हे तर एका वेश्येच्या हातचं जेवन आहे ना आणि मी अपवित्र आहे ना." "कोण म्हणतंय की तुम्ही अपवित्र आहात? तुमच्या काय कपाळावर लिहिलं आहे की तुम्ही अपवित्र आहात म्हणून." "मी. मी अपवित्र नाही! अहो, सारा समाज म्हणतो की मी एक वेश्या आहे व वेश्या अपवित्र असते म्हणून. संपुर्ण समाजच मला अपवित्र समजतो. रखेलसारखं जीवन देतोय समाज मला." "समाजाला त्याचा अर्थच कळत नाही ना." "तुम्ही समाज मानताय का?" "होय आणि मानवही मानतोय. समाजापेक्षा मानव मोठाच असतो तर." "हो काय?" "होय. मी एका मानवाच्या घरचं जेवन करणार आहे. वेश्येच्या घरचं नाही." "तर मग ठीक आहे. मी जेवन बनवते. परंतु त्यात दोष जर झाला तर आपण मला दोष देवू नका." "नाही देणार." तो आम्रपालीसोबत त्या बौद्ध भिख्खूचा वार्तालाप. त्यावर आम्रपालीला त्या बौद्ध भिख्खूनं जे मार्गदर्शन केलं. त्यानं ती थोडीशी प्रभावीत झाली होती. आतापर्यंत तिला कोणीही आपलं समजणारं व असं सांगणारं कोणीही मिळालं नव्हतं. तिनं ताबडतोब त्या बौद्ध भिख्खूसाठी जेवन बनवलं व त्याला ताट वाढून चांगलं सुग्रास जेवन खावू घातलं व दक्षिणेत काही जिनसही दिलेत. ते घेवून तो भिख्खू जेव्हा तेथून परतला. तेव्हा त्याचे सखेसोबती जे वाट पाहात बसले होते. त्यांना त्या बौद्ध भिख्खूच्या वेश्येच्या घरी जेवन केल्याबद्दल आश्चर्य वाटू लागलं. त्यातील एक भिख्खू म्हणाला, "माहीत आहे भिख्खू गणांनो, देवी आम्रपालीनं मला सुग्रास जेवन तर चारलंच. शिवाय काही जिनसही दिलेत. शिवाय वर्षावासात निवास करण्यासाठी आमंत्रणही दिलं. मात्र मी तिला सांगितलं की मी गौतम बुद्धांना विचारुनच तसं निमंत्रण स्विकारेल. असं सांगितलं. त्यानंतर ते सर्व बौद्ध भिख्खू गौतम बुद्धाजवळ गेले व त्या भिख्खूची कुरघोडी करु लागले. त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले, "माणसं व्यवसायानं नीच वा उच्च होवू शकत नाही. आम्रपाली जरी एक वेश्या असली तरी तो तिचा धंदा आहे. तिचे विचार उच्च आहेत. कारण ती अतिथींचं स्वागत करते. अतिथी स्वागत हे तिच्यासाठी कर्म आहे आणि ते कर्म तिचे चांगले आहे. आपण आपले कर्म चांगले करावेत. म्हणजे आपल्याला त्याचं फळंही चांगलं मिळतं. शिवाय आपण आपले विचारही चांगलेच ठेवावे. तरच तो माणूस पदाला शोभतो. माणसाचे दुसऱ्याबद्दल असणारे विचार जर घृणीत असतील तर आपल्यात आणि तिच्यात कोणता फरक आहे. शिवाय आपला निश्चय पक्का असावा. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कठीण समयी तो ढळू देवू नये. तरच माणूस उच्च पदाला पोहोचतो. हेच बुद्ध तत्व आहे. " गौतम बुद्धानं केलेलं मार्गदर्शन. ते मार्गदर्शन सर्व त्यांच्या शिष्यांना पटलं व त्यांची बोलतीच बंद झाली. आपल्यात आणि तिच्यात कोणतातरी एक फरक आहे. असं त्यांना वाटलं व ते चूप बसले. मात्र तो बौद्ध भिख्खू पुढे म्हणाला, "महात्मा, आम्रपालीनं मला जेवनाचं आमंत्रण दिलं. तेही वर्षावासातील चार महिन्याच्या निवासाचं. मी तिचं आमंत्रण स्विकारु का? जावू का मी तिच्याकडे?" ते बौद्ध भिख्खूचं म्हणणं. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, "जा. खुशाल जा. परंतु एक गोष्ट लक्षात घे. तिथं गेल्यावर आपला निश्चय ढळू देवू नकोस आणि निश्चय ढळलाच तर परत येवून मला तोंडही दाखवायचं नाही." गौतम बुद्ध काय म्हणाले, ते त्याला कळलंच नाही. परंतु जेव्हा वर्षावासाचा आरंभ झाला. तेव्हा तोच बौद्ध भिख्खू आम्रपालीचं आमंत्रण स्विकारुन तिच्या घरी चार महिन्यासाठी राहायला गेला. ज्यात तिनं एक अट त्याच्याकडून कबूल करुन घेतली होती. ती अट होती, या चार महिन्यात कोणत्याही गोष्टीत तो बौद्ध भिख्खू चुकलाच तर तो तिचा दास बनेल आणि तो जर काहीच चुकला नाही तर ती त्याची दास बनेल. ते वर्षावासाचे चार महिने त्या बौद्ध भिख्खूसाठीच नाही तर संपुर्ण बौद्ध धम्मासाठी एक सत्वपरीक्षाच होती नव्हे तर त्या चार महिन्यानं आम्रपालीच्या जीवनात बदल घडणार होता. तो बौद्ध भिख्खू नित्यनेमानं दररोज सकाळी उठत असे व आपली दैनंदिन दिनचर्या करुन रात्रीला आरामात झोपत असे. या दरम्यानच्या काळात आम्रपालीही त्याची नित्यनेमानं सेवा करीत असे. तशी ती तो भिख्खू आपल्या कर्तव्यात चुकावा म्हणून त्याच्याजवळ जवळ राहात असे. कधी पल्लू पाडत असे खांद्यावरुन तर कधी वाकडी नजर त्याचेवर टाकत असे. कधी इशारे करीत असे कसलेतरी तर कधी वात्रट वागत असे. परंतु तो बौद्ध भिख्खूही काही कमजोर नव्हता की आपला निश्चय सोडेल. कारण ती त्याचीच नाही तर त्याचा गुरु असलेल्या गौतम बुद्धाची आणि तेवढीच बौद्ध धम्माची सत्वपरीक्षा होती. ते वर्षावासाचे चार महिने आगदी त्या बौद्ध भिख्खूचे कष्टप्रद जात होते. वाटत होतं की तो आम्रपालीच्या घरुन कधीच परत येणार नाही व बुद्धांनीही परवानगी देतांना तेच सांगीतलं होतं की निश्चयानं ढळला तर त्यांना कधीही तोंड दाखवायचं नाही. चार महिने पुरते झाले होते. ते कसे निघून गेले होते ते कळले सुद्धा नव्हते त्या बौद्ध भिख्खूला. त्यातच चार महिने संपले व तो बौद्ध भिख्खू परत जाण्यासाठी तयार झाला. तेव्हा देवी आम्रपाली त्याच्यासमोर नतमस्तक झाली. म्हणाली, "महात्मा, आपण मला क्षमा करावी. मी चुकले. मी तुम्हाला भुरळ पाडण्याचे प्रयत्न केलेत. परंतु मी हरली. आपण जिंकलात. कारण आपण आपला निश्चय ढळू दिला नाही. आपण अढळ राहिलात आपल्या निश्चयावर. मला सांगा, बुद्ध धम्मात हेच सांगितलं आहे काय?" "होय देवी. आमचा बुद्ध धम्म हेच शिकवतो." "मग मला आपण शिष्यत्व प्रदान करावं व मलाही आपल्या धम्मात घ्यावं. मला आपला धम्म पटला." "ठीक आहे तर आणि नतमस्तकच व्हायचं असेल तर माझ्या पायावर नाही. माझ्या गुरुच्या पायावर हो. हे गौतम बुद्धच माझे गुरु आहेत." आम्रपालीला ती त्या शिष्याची गोष्ट पटली. तशी तिनं त्याच शिष्याकडून बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. तशी ती त्याला म्हणाली, "तर मग मला घेवून चला तुमच्या गौतम बुद्धांना भेटायला. मला त्यांची भेट घ्यायची आहे." "ठीक आहे, चला तर." त्या बौद्ध भिख्खूनं तेथून प्रस्थान केलं. तशी आम्रपालीही त्याचे पाठीमागं निघाली. ***************************** ते बौद्ध धम्माचे अनुयायी. त्यांना वाटत होतं की तो भिख्खू, ज्यानं आम्रपालीच्या घरचं वर्षावासाचं निमंत्रण स्विकारलं. त्याचा निश्चय ढळेल व तो कधीच परत येणार नाही. परंतु तो बुद्ध भिख्खू आता परत आला होता वर्षावास संपवून व त्याच्या पाठीमागं ती स्रीही परत आली होती. जिचं नाव आम्रपाली होतं. आम्रपाली जवळ आली. तशी तिनं दिक्षा घेतलेली वाटत होती. तिच्या हातावर भिक्षापात्र होतं व तिनं दिक्षा घेतांना स्वतःचं मुंडनही केलं होतं. ती जवळ आली व ती गौतम बुद्धाच्या पायावर नतमस्तक झाली. म्हणाली, "आपण मला माफ करावं व मला आपण आपलं शिषत्व प्रदान करावं." आम्रपाली म्हणाली. तशी ती पुन्हा गौतम बुद्धांना सांगू लागली की आपण कसे काय त्या तरुण भिख्खूला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानं आपला निश्चय ढळू दिला नाही. या सर्व गोष्टींचे वर्णन तिनं बुद्धाजवळ कथन केले. गौतम बुद्धानं आम्रपालीचं ऐकलं व त्यानंतर त्यांनी आपल्या तिला सांगितलं की त्यांनी तरुण भिख्खूस आम्रपालीच्या घरी राहण्याची परवानगी दिली. कारण त्याला त्या भिख्खूच्या डोळ्यांत कसलीही कामवासना दिसली नाही. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. गौतम बुद्धानं आम्रपालीला सांगितलं होतं त्याच्या तरुण भिख्खूबद्दल. त्यातच सांगितलं होतं की बौद्ध धम्म हा काही धर्म नाही. त्या धम्माचे वेगळे असे नियम नाहीत. फक्त हा धम्म म्हणजे एक प्रकारचं आचरण आहे. ते गौतम बुद्धाचे बोल. ते बोल ऐकताच आम्रपालीचे स्वतःच्या सौंदर्याविषयीचे गर्वहरण झाले व तिला वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली. अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दानेही ते आमंत्रण स्विकारले. त्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्विकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला. बौध्द संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. त्यानंतर वयात आल्यावर तिचा मुलगा विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू बनला होता. त्यानंतर गौतम बुद्ध जेव्हा जेव्हा वैशालीला यायचे. तेव्हा तेव्हा ते आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी राहायचे. कारण तिनं पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले होते. त्यानंतर ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले होते. अशी ही महान नृत्यांगना. वैशालीची नगरवधू. तिला सुख हवं होतं अखेरचं. पुर्ण जीवनच तिनं अगदी कष्टात काढले होते. जन्मापासून तर आता म्हातारपणापर्यंत आम्रपाली दुःखात होती. लहानपणी आईवडीलांनी तिला आम्रवनात सोडून दिलं होतं. त्यातून अडतीस वर्ष विवाहाला झालेल्या महानामन नावाच्या तिच्या पाल्य पित्याला अडतीस वर्षानंतर ती त्या आम्रवनात सापडताच आपल्याला जसा शहरीकरणाचा त्रास झाला. तसा आम्रपालीला होवू नये म्हणून त्यानं तिला वैशाली शहरातून अंबाला नावाच्या गावी आणलं. त्या गावात तिच्या पुर्ण इच्छा पुरवल्या. अगदी बालवय असतांना आम्रपालीला त्यानं कोणताच त्रास होवू दिला नाही. तिला फुलासारखंच जपलं. परंतु तिचं प्रारब्धच खराब होतं की तिला नगरवधू म्हणून निवडलं गेलं. अन् ज्यावेळेस तिला नगरवधू म्हणून निवडले गेले. त्यावेळेस म्हणतात की तिचा विवाह जुळला होता. ती नगरवधू बनताच तिला तिच्या सर्व इच्छेवर व आकांक्षेवर पाणी फेरावं लागलं. मात्र नगरवधू बनताच तिनं तीन अटी ठेवल्या होत्या. त्यातील पहिली अट होती. ती म्हणजे तिच्या परवानगीशिवाय तिच्या कमऱ्याची चौकशीच होणार नाही आणि चौकशी करायची झाल्यास ती सात दिवसांनी होईल. दुसरी अट होती. राजसी रहनसहनच्या संपुर्ण सुविधा मिळणे व तिसरी अट होती. तिची सुरक्षा एखाद्या किल्ल्यासारखी व्हावी. पहिल्या अटीनुसार तिनं स्वतःची स्वतंत्रता मागून घेतली होती तर दुसऱ्याच अटीनुसार तिनं आपलं रहनसहन आणि तिसऱ्या अटीनुसार तिनं आपलं संरक्षण मागून घेतलं होतं. तसं पाहिल्यास ती सुखीच राहिली जीवनभर. शिवाय तिच्या त्या अटी मंजूर झाल्यानुसार तिला राजा बिंबिसार व अजातशत्रूसारख्या वैशाली नगराच्या प्रेमींनाही शह देता आला. परंतु जरी तिच्या त्या अटी मंजूर झाल्या असल्या आणि त्या अटीनुसार तिला अमाप सुख असलं तरी ती दुःखीच होती अंतर्मनातून. कारण तिला विवाह करुन संसार थाटायचा होता. त्यावर पाणी फेरलं गेलं होतं. तिला एकच पती बनवायचा होता. त्यावरही पाणी फेरल्या गेलं होतं. आता तिला आयुष्यभर विवाह करता आला नाही आणि नित्यनेमानं तिच्या आयुष्यात जीवनभरच वेगवेगळे अन् तेही अनेक माणसे आले की ज्यांनी तिच्या शरीराचा उपभोग घेतला. परंतु तिला पत्नी बनवू शकले नाहीत. ज्यात बिंबिसारसारखे राजे, महाराजे देखील होते. तिच्या आयुष्यात एकीकडे पन्नास वर्षाचे व तीस वर्ष फरकाचे बिंबिसारसारखे राजेही होते तर तिच्यापेक्षा बारा वर्ष लहान असलेले उदयनसारखे कोवळ्या वयाचे म्हणजेच अठरा वर्षाचे युवराज देखील होते. तेही दुःखच होतं की ते तिला छळत होतं. परंतु ते दुःख तिला छळत असतांनाही तिचे विचार उच्च होते. तिला दया यायची सामान्य लोकांची. वाटायचं की त्या सामान्य लोकांचे हाल होवू नये इतर वैशालीकडे कुदृष्टी ठेवणाऱ्या राजांकडून. म्हणूनच तिनं आपल्या देहाची लक्तरं केली. त्यातच राजा बिंबिसारकडून निर्माण झालेला पाणीप्रश्न सोडवला व शेवटपर्यंतच्या काळापर्यंत वैशालीला इतर राजांकडून अभय मिळवून दिलं दिलं. आज आम्रपालीचं वैशालीवर प्रेम असल्यानं ती मगधवरुन पुन्हा परत वैशालीला आली होती. मातृभुमीसाठी ती राबत होती. मातृभुमीनं तिच्यावर आरोप प्रत्यारोप लावले असले तरी तिला तिच्या मातृभुमीबद्दल कधीच क्रोध आला नाही. त्यातच आपल्या मातृभुमीत अमन निर्माण करण्यासाठी तिनं बौद्ध धम्म स्विकारला व वैशालीला आपल्याबरोबर स्वतंत्रताही मिळवून दिली. आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपालीच्या जन्माची नोंद दिसत नाही तशीच तिच्या मृत्यूचीही नोंद दिसत नाही. परंतु तिनं केलेल्या कर्माची नोंद दिसते. मात्र ती वैशालीतच म्हातारी झाली असेल व त्यातच ती पुढं त्याच वैशाली भुमीत मरण पावली असेल हे नाकारता येत नाही. अन् जेव्हा मरण पावली असेल, तेव्हा तिला राजसन्मानही भरपूर मिळाला असेल हेही नाकारता येत नाही. मात्र ती जरी काळाच्या ओघात मरण पावली असली तरी आजही आम्रपाली अमर आहे. ती जनलोकांच्या ह्रृदयात आहे. प्रत्येक ज्ञात अज्ञात माणसाला ती आठवत असते. त्याचं कारण म्हणजे तिचं राष्ट्रप्रेम आणि धम्मप्रेम. जे प्रेम तिनं वैशालीवर आणि बौद्ध धम्मावर केलं होतं. आज जो बौद्ध धम्म टिकून राहिला आजपर्यंत. त्याचं कारण आहे, आम्रपालीसारखीच मंडळी. ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि धम्मही जीवंत ठेवला. आज बौद्ध धम्म जीवंत राहिला त्या आम्रपालीसमोर आपले मनोबल खचू न देणाऱ्या भिख्खूमुळे की ज्यांचं मनोबल आम्रपालीसमोर खचलं नाही व ती प्रेरीत झाली बौद्ध धम्मात येण्यासाठी. अंगुलीमाल देखील एवढा मोठा दरोडेखोर आपलं दरोडेखोरपण सोडून बौद्ध धम्मात आला होता नव्हे तर बिंबिसार आणि अजातशत्रूही राजे असूनही त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला होता. त्यानंतर अशोकासारख्या बऱ्याच राजांनी बौद्ध धम्म स्विकारला व बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. ***************************** आज आम्रपाली जगात नाही. परंतु तिनं केलेलं कार्य जगात आहे. तिचं कार्य ही एक अमर गाथाच आहे. लोकं म्हणतात की ती एक गणिका होती. गणिका असणं पापच. परंतु ती जरी गणिका असली तरी तिनं बौद्ध धम्मात येवून आपल्या जीवनाचं जे सोनं बनवलं ते अगदी वाखाणण्याजोगंच आहे. तिनं बौद्ध धम्मात येवून आपले सर्व पाप आपल्या आपल्या सेवेनं पार धुवून टाकले व एक सत्कर्मी, चांगली भिक्षुणी म्हणून उत्तरकाल व्यथीत केला. त्यामुळंच तिला आजही लोक गणिका म्हणून नाही तर एक बौद्ध भिक्षुणी म्हणून ओळखतं. तिनं बौद्ध धम्म घेतल्यानंतर वैशालीचं आम्रपाली वन बुद्धांना दान दिलं, ज्यातून गौतम बुद्धांना जी सुक्ते जगाला दिली. ते ते वन असून त्या सुक्तांनाही गौतम बुद्धांनी आम्रपालीचंच नाव दिलं होतं, अंबपालिका सुक्त. आज आम्रपाली जगात नाही. काळाच्या ओघात ती केव्हाचीच या जगातून निघून गेली आहे. शिवाय तिनं एक नगरवधू नाही तर सुरुवातीला एक गणिका बनून त्या काळातील लोकांची सेवा केली आहे. आजच्या काळातील गणिकेसारखं गरीब सामान्य लोकांना छळलेलं नाही, लुटलेलं नाही. तिनं जे काही केलं, ते आपल्या मातृभुमीला वैशालीला वाचविण्यासाठीच केलं. तिनं गणिका बनून अहंकारी राजा मनुदेवाला समाप्त केलं. तिनं गणिका बनून वैशालीचा प्रखर शत्रू बिंबिसारमधील शत्रूपण नष्ट केलं. तसंच गणिका बनून तिनं राजा अजातशत्रूचं मन बदलवलं. शिवाय कितीतरी असे राजे होते की ज्यांनी वैशालीकडे कुदृष्टी टाकली होती. त्या सर्वांना आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन तिनं वैशालीशी जोडलं. त्यामुळंच ती गणिका ठरत नाही. मात्र नगरवधू नक्कीच ठरते. नगरवधू याचा अर्थ सौभाग्यरक्षणकर्ती. कारण तिनं जेही कोणतं कार्य केलं, ते एका सौभाग्यवतीला शोभणारं होतं यात काही शंका नाही. आम्रपाली एक नगरवधू होती व तिचं वैशाली नगराशी विवाह केला होता.त्यातच ती शेवटपर्यंत वैशाली नगराशी प्रामाणिक राहिली होती. जशी एक पत्नी आपल्या पतीशी शेवटपर्यंत पत्नीनिष्ठ राहते तशी...... ती धम्मालाही स्वामी मानत धम्माशीही स्वामीनिष्ठ राहिली होती. म्हणूनच आजपर्यंत तद्नंतर त्या धम्मात आलेल्या उपासकांनी त्याच आम्रपालीच्या कर्तृत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या व आजपर्यंत बौद्ध धम्म टिकवून ठेवला. त्याला बुडू दिला नाही. ते परकीय आक्रमणाकर्त्यांचे बळी ठरले. परंतु झुकून आत्मसमर्पण करुन धम्म बदलवला नाही. प्रसंगी या देशातून ते पळून गेले. परंतु धम्माला क्षतिग्रस्त होवू दिलं नाही. हेच शिकता येतं आम्रपालीच्या त्यागपुर्ण जीवनातून. त्यातच बौद्ध धम्मात झालेल्या इतरही काही महान उपासकाकडून. ज्यांच्यामुळं बौद्ध धम्माला महान ठरता आलं होतं आणि आजही तो धम्म महान आहे. आम्रपालीला अगदी कौमार्य वयात मिळालेलं नगरवधू पद. तिच्या देहाची लक्तरं करणारं ते नगरवधूपद होतं. काही लोकं म्हणतात की ते नगरवधू पद तिला वयाच्या अकराव्या वर्षातच दिलं गेलं. ती सुंदर असल्यामुळं. जे वय खेळण्याबागडण्याचं असतं व ज्या वयात खेळण्याबागडण्याशिवाय दुसरं काही सुचतही नाही. असं ते बाळबोध वय व अशा वयातील ते नगरवधूपद. त्या वयात तिनं तीन अटी मागून घेतल्या होत्या. ही विचार करण्यालायक बाब आहे. एकीकडे तिनं वैशाली नगर तिला नगरवधू पद देत असतांना आपल्यासाठी तिनं स्वातंत्र्य तसंच संरक्षण म्हणून तीन गोष्टी मागणं तर दुसरीकडे नगरवधू पदाचं कर्तव्य कोणतं असतं? नगरवधूला काय काय करावं लागतं? हे तिला माहीत नसणं. या गोष्टी पुर्णतः विसंगत आहेत. एकीकडे ज्या समाजानं आम्रपाली नावाच्या एका सुंदर कन्येच्या शरीराचा भोग घेण्यासाठी तिला जाणूनबुजून वैशाली नावाच्या साऱ्या शहराची नगरवधू बनवली नव्हे तर नगरातील उच्चभ्रू राजा, सामंत, सेठ, श्रीमंत कोणीही येवो. तिला छळावं. तिच्या देहाचा सौदा करावा. अन् तिची लक्तरं तोडावी. त्यातच स्रीजातीची अवहेलना करावी. तर दुसरीकडे आम्ही तिच्या पुर्ण अटी मंजूर केल्या असं म्हणावं, या बाबी चौकटीत बसतात का ही देखील विचार करण्यालायक गोष्ट आहे. यावर सखोल विचार केला तर असंच आढळून येतं की आम्रपालीला नगरवधू बनवून एक वेश्याच बनवलं गेलं राजवेश्या. त्यानंतर तिच्या देहाचा उपभोग सामान्य माणसांनी घेवू नये म्हणून तिला तथाकथीत समाजानं संरक्षण दिलं व तिच्या राहण्याच्या निवासासमोर सक्त पहारे बसवले. ज्या पहाऱ्यातून तिला पुष्पक कुमारला भेटता आलं नाही. एवढंच नाही तर त्याच तथाकथीत समाजानं तिच्या देहाला स्पर्श करता यावा म्हणून तिचा प्रेमी असलेल्या पुष्पक कुमारला बंदी बनवलं. अन् पुढं त्याची हत्याही. आम्रपाली महानच होती की ती या सर्व समाजाविरुद्ध लढली तद्नंतरच्या काळात. शेवटी त्रासून तिनं बौद्ध धम्म स्विकारला. कशासाठी तर ज्या समाजानं तिला त्रास दिला, वेदना दिल्या. त्या वेदनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी. आज ती महान ठरली आहे केवळ बौद्ध धम्मामुळे. बौद्ध धम्मातील सुक्तांमुळे तिला अढळपद प्राप्त झालं. जे अढळपद अबंपालिका सुक्त म्हणून ओळखलं जातं व तिचं वेदनादायी जीवनही सार्थक झाल्याचा दाखला देत असतं पदोपदी. आम्रपाली आज म्हातारी झाली होती. ती आता वैशालीच्या नगरवधू पदावर नव्हती. तिनं बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती. परंतु तिचं बौद्ध धम्माचं कार्य सुरु होतं. आता तिच्यानं फारसं उठणं बसणं होत नसे. ती दररोजचा काही वेळ आंब्याच्या आम्रपाली वनात घालवत असे. कधीकधी तिला तिथच रमणीय वाटत असे व ती तेथेच बराच कालावधीपर्यंत थांबतही असे. तशी ती थांबली की तिला आठवायचा तिनं आपल्या जीवनात घालवलेला काळ. जो तिच्या जीवनाशी निगडीत असायचा. एकदा असाच तिला तो काळ आठवला होता. ती नुकतीच वयात आली होती व त्यावेळेस वैशालीला एका मधूपर्वाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यावेळेस ती वैशालीची नुकतीच नगरवधू बनली होती. ज्यावेळेस वैशालीमध्ये मधुपर्वाचं आयोजन होत असे. तेव्हा त्याचा आनंद घ्यायला गावोगावचे लोकं, राजे महाराजे येत व त्या मधू पर्वाचा आनंद घेवून निघून जात. यावेळेसही तसंच मधुपर्वाचं आयोजन वैशालीला करण्यात आलं होतं व त्या कार्यक्रमाला एकदा कोशांबीपती संगीतज्ञ महाराज उदयन आले होते. त्यांना वीणा वाजवता येत असे व ते एक प्रकारची उत्तम वीणा वाजवत असत. त्यातच त्यांनी जादूई वीणा वाजवली व त्यावर नगरवधू असलेल्या आम्रपालीनं अवश नावाचं नृत्य केलं. त्यानंतर नगरवधू असलेली आम्रपाली वैशाली नगररामधून नगरभ्रमण करण्यासाठी निघाली. त्यावेळेस बऱ्याचशा तरुणांची भीड तिला पाहण्यासाठी लागली होती. त्यानंतर सायंकाळ झाली व सायंकाळ होताच आम्रपालीसमोर वैशाली युवराज स्वर्णसेन याने विचार करुन आम्रपालीसमोर शिकारीसाठी जाण्याचा प्रस्ताव ठेवला. कारण त्यावेळेस दिवसा शिकारी जास्त व्हायच्या. त्यामुळं बरेचसे प्राणी जंगलात लपून बसत. त्यामुळं त्यानं तसा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवताच तिनं त्याला होकार दिला. स्वर्णसेन...... वैशालीचा युवराज होता. त्यावेळेस आम्रपाली त्याच्या समवयस्क होती. ती त्याला आवडत होती. परंतु ती नगरवधू असल्यानं तो फार घाबरत असे तिच्याशी बोलायला. शिवाय आम्रपाली नगरवधू असल्यानं तिचा सन्मान करणं आवश्यक होतं. तिला जर राग आलाच तर ती आपली वैशाली गणतंत्राला करेल व वैशाली गणतंत्र आपल्याला शिक्षाही देईल. असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याची हिंमत होत नव्हती. तसा तो घाबरतच होता. परंतु ती त्याला आवडत असल्यानं तिच्याशी बोलण्याची तो संधी शोधत होता. अशातच ती त्या दिवशीची सायंकाळ उजळली व त्याच्यासमोर अचानक आम्रपाली आली. तसा तो तिच्याजवळ आला. म्हणाला, "आपण आम्रपाली आहात काय?" "होय. आपण?" "मी स्वर्णसेन. या वैशालीचा युवराज." "बोला. काय प्रयोजन आहे?" "आज मी दिवसभर पाहिलं की बऱ्याच युवकांनी तुमच्यासमोर आखेट केली." "त्याच काय एवढं. मी तरुण आहे व तेवढीच सुंदरही. मी लोकांना आवडते. म्हणून लोकं माझ्यासोबत आखेट करायला तयार होतात. त्यात काय. मला आखेट आवडते व मिही त्यांच्याबरोबर आपलं मनोरंजन करुन घेते." ते आम्रपालीचं बोलणं. त्याला उत्तर देत तो म्हणाला, "राग जर मानत नसाल तर एक बोलू का?" "बोला. काय बोलायचं आहे तर?" "माझीही इच्छा आहे आपल्यासोबत आखेट करायची. चालाल काय आखेटसाठी?" "परंतु ही संध्याताम्हणाची वेळ आहे. हिंस्र श्वापदे बाहेर पडतात. जरा जीवाला धोका असतो." "आम्रपाली. मी त्यासाठीच तर हा आखेटचा प्रस्ताव ठेवलाय आपल्यासमोर." "हो काय? तर मग ठीक आहे. आपण आखेटला जावूया. परंतु मी आम्रपाली. मला पाहण्यासाठी त्या युवकांची भीड. त्यावर काही उपाय?" आम्रपालीनं प्रश्न उपस्थित केला. स्वर्णसेन त्यावर विचार करु लागला. तसा काही वेळानं तो म्हणाला, "त्यावर उपाय आहे व सोपा उपाय आहे." "कोणता?" "आपण पुरुषी वेष धारण करायचाय." "पुरुषी वेष?" "होय, पुरुषी वेष." "त्यानं कोणता फायदा होईल?" "तुम्हाला कोणी ओळखणारच नाही आखेट करतांना." "हो का." "होय." आम्रपाली व स्वर्णसेन. दोघंही बोलके झाले होते. तशी आम्रपाली त्याच्या समवयस्कच होती. त्यामुळंच की काय, स्वर्णसेन तिला आवडायला लागला होता. तशी ती तयारही झाली होती, त्याचेसोबत जायला. त्या दोघांचं बोलणं झालं. त्यानंतर आम्रपालीनं पुरुषी वेष परीधान केला व ती घोड्यावर बसली. आता तिला कोण म्हणेल की ती आम्रपाली आहे. ती एकदम पुरुषच वाटत होती. त्यानंतर ते दोघंही आखेट करायला वनात निघून गेले. ते खोल वनात गेलेच होते, तोच त्यांच्यासमोर एक सिंह आला. एवढ्यात एक जड वस्तू आम्रपालीच्या अंगावर पडली. जणू आभाळच कोसळलं व आम्रपाली आपल्या घोड्यासह एका खोल खड्ड्यात पडली. ते पाहून आम्रपालीकडे लक्ष न देता युवराज स्वर्णसेन वैशाली नगरात परत आला. जिथं मधुपर्वाचं आयोजन केलं गेलं होतं. त्याला वाटलं होतं की आम्रपालीला खाण्यासाठी आणखी एका सिंहानं तिच्यावर झडप घातलेली आहे. त्यानंतर त्यानं वैशालीत येवून सांगितलं की आम्रपालीवर एका सिंहानं झडप घातलेली आहे. आता ती काही वाचणार नाही. त्यानं आतापर्यंत तिला खावून टाकलेलं असेल. ती घटना मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहे. आम्रपालीला सिंहानं खाल्लं हे माहीत होताच लोकांनी आम्रपालीला शोधण्यासाठी म्हशाली घेवून ते वन शोधलं. कारण सर्वांना आम्रपाली आवडत होती. परंतु त्या शोधाधंतरही लोकांना आम्रपाली मिळाली नाही. मात्र तिच्या घोड्याचं तेवढं शरीर मिळालं होतं. तेही मृतावस्थेत. मग विचार करण्यात आला की आम्रपालीलाही त्याच सिंहानं खावून टाकलेलं असेल. तेही आपल्या गुहेत नेवून. म्हणूनच तिचं शरीर आपल्याला सापडलेलं नाही. परंतु आम्रपाली मरण पावली नव्हती. ती एका खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली होती. परंतु जेव्हा ती होशात आली, तेव्हा तिनं पाहिलं की तो सिंह मरुन पडलेला आहे व एक तरुण तिथं बाजूला उभा आहे. शिवाय ती ज्यावेळेस होशात आली होती. त्यावेळेस तिच्यात एवढंही त्राण नव्हतं की ती चालत वैशालीला येवू शकेल. त्यामुळंच तिला त्याच वनात राहणं भाग होतं. तो उभे असलेला युवक. त्यानं आम्रपालीला म्हटलं की तिच्यात आता कोणत्याही स्वरुपाचं त्राण नसून तिनं आता वैशालीला परत जाण्याची इच्छा करु नये तर रात्र याच ठिकाणी घालवावी. त्या युवकाची ती इच्छा. त्यातच थकलेली आम्रपाली. तसं तिच्यात त्राण नव्हतंच की ती वैशालीला जावू शकेल. तशी ती तिथंच थांबली त्या नवयुवकासोबत. त्यानंतर तिनं त्याच नवयुवकासोबत ती रात्रही घालवली होती. दोनतीन दिवस तसेच गेले. आम्रपालीला आता थोडं बरं वाटू लागलं होतं. त्यानंतर त्या नवयुवकालाही वीणा वाजविण्याचा छंद होता. त्यानं त्या भयाण जंगलात आपल्या कुटीत वीणेचा झंकार खेचला. मग काय, त्या विणेच्या तालावर, त्या विणेचा झंकार ऐकताच आम्रपालीचे पाय थरथरायला लागले व तिनं आपलं संपुर्ण होश खोवून अवश नृत्य करायला सुरुवात केली. ज्यात नाचता नाचता तिच्या अंगावरील वस्र केव्हा सरकले, याचा तिला पत्ताही लागला नाही. आम्रपालीच्या अंगावरील कपडे तिच्या नृत्य करण्याच्या तालात सरकले व ती एक महिला आहे. हे त्या युवकाच्या लक्षात आलं. काही वेळ असाच गेला व वीणा वाजवणं युवकानं बंद केली. ती वीणा वाजवणं बंद करताच आम्रपाली होशात आली. तसं त्यानं तिला विचारलं, "देवी आपण तर एक महिला निघालात." "होय, मी महिलाच. आम्रपाली म्हणतात मला. या वैशाली नगराची नगरवधू. आपण माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद. परंतु आपण कोण आहात? आपलं नाव काय?" "आपण एक नगरवधू. तेही वैशालीची. मी माझं नाव सांगेनच तुम्हाला. परंतु आता नाही. आपण जेव्हा स्वस्थ व्हाल तेव्हा आणि आता मला माझ्या नावाबद्दल आग्रही करु नका." आम्रपालीनं ते बोल ऐकले. तशी त्या युवकानं अट टाकताच ती चूप बसली. त्यानंतर दोन चार दिवस पुरते गेले व त्या युवकाचा निरोप घेण्याची वेळ आली. तसं त्यानं तिला वैशाली नगरापर्यंत सुखरुप पोहचवूनही दिलं. परंतु त्यानं तिला आपली ओळख दिली नव्हती. तसं तिनं पुन्हा त्याला त्याचं नाव विचारलं. तेव्हा तो म्हणाला, "मी सुभद्र. त्या कुटीत राहतो. मी तुम्हाला तुम्ही स्वस्थ झाल्यावर वैशालीला सुखरुप पोहचवणार. असं आश्वासन दिलं होतं. आज ते पुर्ण केलं आहे. आता तुम्ही मला आपला निरोप द्या." त्या युवकानं आपलं नाव बदलवत सांगितलं. कारण त्याला वाटत होतं की त्याचं नाव ऐकताच ती घाबरेल. "धन्यवाद. कधीतरी याल माझ्या निवासस्थानी. याल ना." "नाही. मी तुमच्या निवासाकडे येवू शकत नाही. कारण आम्ही गरीब लोकं. आम्हाला तुमच्या वैशाली नगरीत शिरकाव नाही." तो युवक बोलून गेला. तो युवक आम्रपालीला बोलून गेला खरा. परंतु तिला मनोमन वाटत होतं. त्यानं तिच्या निवासाकडे यावं व तिथं तिच्यासोबत दोनचार क्षण तरी घालवावे. त्यानंतर तसं वाटताच ती म्हणाली, "असं जर आहे तर मी इथून परतच जात नाही. मी तुमच्यासोबतच येतेय. तुम्ही मला वाचवलं ना. मी नसते वाचले तर. हे जे जीवन मिळाले आहे. हे उधारीचे जीवन आहे. ते मिळाले नसते. आपले उपकारच झालेत माझ्यावर." "असं जर आहे तर मी येईल कधीतरी. भेटणार कधीतरी. जीवंत राहिलो तर नक्कीच भेटणार." तो युवक बोलला व आम्रपालीला तिथं सोडून आल्यापावली निघून गेला. त्यानंतर आम्रपाली वैशालीत आली. लोकांनी तिचं बरंच स्वागत केलं. कारण तिच्यावर प्रेम करणारे आज तिच्या असण्यानं आनंदीत झाले होते. मध्यंतरीचा तिचा काळ असाच गेला होता धकाधकीत. त्या धकाधकीच्या जीवनात व त्याच काळात आम्रपालीला कधीच तो नवयुवक आठवला नाही व आठवत नव्हती त्यानं तिला केलेली मदत. त्यातच या मध्यंतरीच्या काळात तिला एक नगरवधू मानून तिला बरंच छळलं होतं लोकांनी. कधी राजा मनुदेव तर कधी बिंबिसार, कधी अजातशत्रू तर कधी उदयन. कधी वैशालीतील मंत्रीगण तर कधी मगधचीही मंडळी. परंतु त्या नवयुवकानं तिच्या अंगालाही स्पर्श केला नव्हता. उलट तिचा जीव वाचवून तिला एकप्रकारे मदतच केली होती. आज आम्रपाली म्हातारी झाली होती व ती आपल्या आम्रवनातच राहात असे. त्या आम्रवनात ती भगवान गौतम बुद्धांकडून सुक्ते ऐकत असे. अशातच तिला आठवायला लागला होता तो नवयुवक. ज्यानं अगदी तरुणपणात तिचा जीव वाचवला होता. त्यानं म्हटलेले बोल आज तिच्या कानात गुंजत होते. तो युवक अंतिम समयी वैशालीला सोडून दिल्यावर म्हणाला होता की मी जर जीवंत राहिलो तर येईल तुम्हाला भेटायला. परंतु आज एवढे वर्ष झाले होते, तरी तो तिला भेटायला आला नव्हता. आज तो तिला बराच आठवत होता व ती त्याची मनोमन आठवणही करीत होती. आजही संध्याताम्हणाची वेळ होती व आम्रपाली त्याच आम्रवनात बसली होती. अशातच तिची भेट अहिंसकशी झाली. दोघांचा परीचय झाला. दोघांनी एकमेकांना आपआपली ओळख दिली. तसा अहिंसक म्हणाला, "मी गतकाळात एक दरोडेखोर होतो. मी माणसांची हत्या करीत होतो. माझ्याकडे दया माया नावाची वस्तू नव्हती. परंतु तथागतांमुळं माझं जीवन सुधारलं व मी अहिंसक बनलो. आता मला कोणत्याही गोष्टीचा कोणताच लोभ नाही. मी ब्रम्हचारीही बनलो आहे." ते अहिंसकचं बोलणं. ते बोलणं आम्रपालीनं ऐकली व म्हणाली, "मी आम्रपाली. मी एक नगरवधू होते वैशालीची. परंतु आता नाही. आता मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. कारण जेव्हापासून तथागत मला मिळाले. तेव्हा वाटलं की आपण नगरवधू आहोत. चांगला सन्मान आहे आपल्याला. परंतु तो सन्मान कसला? ज्या सन्मानात आपला देहच विकावा लागतो." "म्हणजे?" "म्हणजे मी नगरवधू जरी असले तरी एक गणिका आहे. मला वैशालीच्या नगरवधू पदावर एका वेश्येचं काम करावं लागलं." तो अहिंसक. त्याला तिनं आपलं नाव सांगताच त्याला काही आठवत नव्हतं की आपण या आम्रपालीची कधीतरी मदत केलेली होती. परंतु बोलता बोलता आम्रपाली त्याला आपल्या गतकाळात घडलेल्या आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टी उलगडून सांगू लागली. तोच तिनं ती स्वर्णसेनचीही गोष्ट सांगितली. जी अहिंसकच्या जीवनाशीही निगडीत होती. तिनं तो तिचा पुरुषी वेष, ते जंगल व त्या जंगलात राजपुत्र स्वर्णसेनसोबत आखेटसाठी जाणं, जंगलात त्या सिंहाचं तिच्यावर झालेलं आक्रमण, त्यातच स्वर्णसेनचं पळून जाणं. तद्नंतर त्या युवकाची मदत. मग तीन चार दिवसानं तिचं होशात येणं. त्यानंतर त्याचं वीणा वाजवणं. त्यातच तिचा पुरुषी नकाब उतरणं. ह्या सर्व गोष्टी तिला सांगितल्या आणि हेही सांगितलं की त्या नवयुवकाचे तिच्यावर उपकारच आहेत. त्यानं तिचा जीव तर वाचवला होता. व्यतिरीक्त तिला वैशालीला नेवून दिलं होतं, हेही तिनं सांगितलं व हेही सांगितलं की तो नवयुवक जीवंत राहिलो तर तिला परत भेटेन म्हणाला होता. परंतु तो अजुनही तिला भेटला नाही. ती आजही त्याचीच प्रतिक्षा करीत असते. वाटत असते की तो तिला भेटावा. परंतु अजुनही तो अद्यापही गवसलेला नाही. ते तिचं बोलणं. ती तिची गतकाळातील घडलेली माहिती. ती ऐकताच अचानक अहिंसकला आठवली ती. त्यानं तिला केलेली मदतही आठवली होती. तसा तो म्हणाला, "माहीत आहे, तो नवयुवक कोण?" "नाही. मला काय माहीत. तो अजुनही मला गवसला नाही ना." "तो नवयुवक मीच आहे. हा अंगुलीमाल. ज्याला काल भलेभले लोकंच नाही तर प्राणीही घाबरत होते. मी काल कित्येक लोकांना तर लुटलेलंच आहे. शिवाय बरेचसे प्राणीही मारलेले आहेत. मात्र आज सुधरलो. आता मला हिंसा अजिबातच आवडत नाही." "अहिंसक, तर ते नवयुवक तुम्ही होय. तुम्ही तर आपलं नाव सुभद्र सांगितलं होतं ना." "होय, परंतु त्याचं कारण होतं." "कारण? कोणतं कारण होतं असं?" "माझं नाव ऐकताच तुम्ही घाबरल्या असत्या. म्हणूनच मी तुम्हाला नाव सांगायचं टाळलं." अहिंसक बोलून गेला. तशी आम्रपाली विचार करु लागली की हा अहिंसक तरी बरा की गतकाळात तो दरोडेखोर असूनही त्यानं माझी सिंहाच्या तावडीतून सुटका केली. बदल्यात त्यानं मला पुरते आठ दिवस आपल्या कुटीत ठेवलं. माझं रक्षणही केलं. अन् आठवत दिवस आपल्या कुटीत ठेवूनही मला आपल्या वासनेची बळी केली नाही. अन् ते राजे आणि संबंधित वैशाली गणराज्यातील लोक आणि ते मगधाचे राजे. सर्वच बदमाश. ज्यांनी आपली हवस पुर्ण करण्यासाठी मला नगरवधू बनवलं नव्हे तर मला रखेलचं जीवन दिलं होतं. आम्रपालीला आज पश्चाताप होत होता ते गतकाळातील जीवन आठवून. ते आठवत आठवत ती आपले दुर्दैवी दिवस काढत होती आणि आता सोबतीलाही तो गतकाळातील नवयुवक होता आम्रपालीसोबत आम्रवनात. ज्यानं तिला गतकाळात मदत केली होती अंगुलीमाल बनून आणि आताही तो मदतच करीत होता अहिंसक बनून. तो तिच्या आताही बऱ्याच गोष्टी ऐकायचा व तिला आज सांत्वनही देत असायचा. ते म्हातारपण आज तिला छळत होतं. जरी तिनं बौद्ध धम्माचा स्विकार केला असला तरी. ते आजारही तिला बरेच झाले होते. सतत ती आजारीच राहात असे. जीवनात सतत धावपळ, दगदग शिवाय परपुरुषी कित्येक माणसांचा स्पर्श. यामुळं तिला आजारानं छळलं होतं. ते तरुणपण. त्या वयात कित्येक तरुणांचा नव्हे तर परपुरुषांचा स्पर्श होत असतांना तिला काहीही वाटलं नाही परंतु आज त्याचे भोग भोगावे लागत होते. जाणूनबुजून, जबरदस्तीनं का होईना, ती परपुरुषांच्या स्पर्शानं बाधीत झाली होती. आज तिला वाटत होतं की विनाकारणच ती पुष्पक कुमारसोबत वैशालीला गेली व वैशालीत गेल्यावर विनाकारणच तिनं त्या स्पर्धेत भाग घेतला. परंतु आज ते आठवून उपयोग नव्हता. तो बौद्ध धम्म. दुःखाचा मार्ग देणारा बौद्ध धम्मं. त्या धम्मानं काही कोणी अमर होणार नव्हताच. तसा काळ आला व अहिंसक, जो तिला आताही म्हातारपणात मदत करायचा. तो अचानक मरण पावला. त्यावेळेस तिला फारच वाईट वाटलं. त्यातच तिला आठवायला लागलं की आज जी काही मी जीवंत आहे. ते याच एका शख्समुळं की ज्यानं माझी एका सिंहाच्या जबड्यातून मुक्ती केली होती. तो जर नसता तर मी केव्हाचीच संपून गेले असते. आम्रपालीही आजारीच राहात असे. तिलाही आजारपण छळतच असे. वाटत असे की अहिंसक सारखा आपलाही काळ आला आहे. आपणही एक दिवस जाणारच आहो दुःखातून मोक्ष मिळवून. आम्रपाली जरी बौद्ध भिक्षुणी बनली होती तरीही. मरणाला कोणीही सोडलं नाही. जसा जन्म आहे, तसा तिलाही मृत्यू येणारच. त्यामुळं तिला हळहळ नाही तर तिच्या मुलांनाही हळहळ नको म्हणून तिनं एक दिवस आपल्या चारही मुलांना बोलावलं व सांगितलं की मी कधीतरी जाणारच आहे. माझेही निर्वाण होणारच आहे. तेव्हा हळहळ करायची नाही. दुःख वाटून घ्यायचं नाही. कारण जसा जन्म आहे, तसाच मृत्यूही आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांकडे पाहा. त्यांनी दुःखातून मानवाला मुक्त करण्यासाठी सुखाचा मार्ग शोधला. त्यांनी आपला परीवार सोडला व ते दुःखातून मुक्ती देणारा मार्ग जगाला दाखवत आहेत. आज त्यांची पत्नी व मुलंही त्यांना एकप्रकारे मदतच करीत आहेत. ती मुलंही आपल्या पित्यानं त्यांना दाखवलेला मार्ग अनुसरुन त्याचा अवलंब करुन त्यांच्या मार्गावर चालत आहेत. आम्रपाली ही पहिली महिला बौद्ध भिक्षुणी बनली होती. तसे त्यापुर्वी बरेचसे पुरुष बौद्ध भिख्खू बनले होते. महिलांना थोडीशी लाज वाटत होती. परंतु आम्रपालीचं पाहून बौद्ध धम्मात तद्नंतर अनेक स्रिया आल्या. ज्यात गौतम बुद्धाची पत्नी यशोधराचाही समावेश आहे व मातंगीचाही समावेश आहे. आम्रपालीची मुलंही आज बौद्ध भिख्खू बनली होती. तिचा मोठा मुलगा विमल कोंडान्य बौद्ध भिख्खू बनून जग भ्रमतीवर होता. त्यातच बाकीचीही तिची मुलं. तिही बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी फिरत होती. त्यातच आम्रपाली आता आजारी राहात होती. तिच्या म्हातारपणातही तिची मुलं तिच्याजवळ नव्हती. ना तिला जगायची आसही होती व तो एक दिवस उजळला. तेव्हा तिची त्या आजारपणाच प्राणज्योत मालवली. आम्रपाली मरण पावली होती. ती राखेत विसावलीही होती. त्यावेळेस भगवान गौतम बुद्ध तिच्याजवळ नव्हते. ते उपदेश द्यायला कुठेतरी गेले होते. परंतु तिच्या विसावण्याची गोष्ट त्यांना जेव्हा माहीत झाली. तेव्हा ते हरहळत होते. ते जेव्हा वैशालीला आले. तेव्हा ते अवश्य आम्रवनात गेले. त्यांनी तिथं असलेल्या त्याच आम्रवनात, जिथं जगाला सुक्ते ऐकवली होती. त्याच ठिकाणी ध्यानस्थ बसून जणू आम्रपालीला आठवलं होतं. त्यानंतर त्यांनी त्या सर्व सुक्तांना अंबपालिका सुक्त नाव तर दिलं. परंतु त्या वनालाही आम्रपाली वन नाव दिलं होतं.