Niyati - 22 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 22

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 22






भाग 22



"आपण बोलून काय उपयोग ...??"

अशा हिशोबाचे व्यक्ती सावधपणे बोलत होते .....
कोणी कसाही बोलला तरी गावात थोरामोठ्यांच्या बंगल्याच्या दारात एक लगीन धडाक्याने साजरे होणार आहे ....








आणि या समारंभात .....ते दोन...चार दिवस उभ्या गावाची चंगळ राहणार आहे या कल्पनेतले सुख मात्र प्रत्येकालाच हवेहवे असे होते .....







पण तिकडे मोहित.....

तो घरात अभ्यास करत राहत असल्यामुळे त्याचे बाहेर काही तेवढे येणे जाणे नव्हते... त्यामुळे त्याच्या कानावर कोणतीही गोष्ट पडली नव्हती. 







जरी तो बाहेर कामानिमित्त गेलाही तरी बाबाराव यांच्या परिवाराबद्दल बोलणे हे उघडपणे होत नव्हते कारण
..........त्या नावाचा धाकच  एवढा होता की चुकून आपल्या तोंडून असं तसं काही निघायचं आणि 
आपला मूडदा चार दिवसांनी कुठेतरी लटकत दिसायचा या भीतीने कोणीही त्यांच्या परिवाराविषयी राजरोसपणे चर्चा करत नव्हते....









पण घरात कवडू आणि पार्वती यांची चर्चा होत असताना त्याच्या कानावर आले याबाबत....
तो कसातरी रात्र होत पर्यंत वाट पाहत राहिला. कारण तो तिला भेटायला तर जाऊ शकत नव्हता किंवा तीही येऊ शकत नव्हती.







त्याला रात्रीच्या दहाच्या सुमारास किंवा त्यानंतर 
.....फोन करणे शक्य होते मायराला म्हणून....
तो कासाविस होऊन त्या वेळेची वाट पाहत बसला.




.

साडेदहा अकराच्या सुमारास मायराच्या झोपायच्या रूममध्ये फोनने गुरगुर केले....
तसे मायराने सावध होऊन सर्वप्रथम दाराला आतून कडी लावली आणि मग गादी खाली असलेल्या फोनला घेऊन कानाला लावला....







फोन दोघेही कानाला लावून होते पण बोलत कोणीही नव्हते.
दोघांनाही एकमेकाची मनस्थिती समजत होती पण आता पर्याय नव्हता. अचानक मोहितला मायराचा हूंदका ऐकायला आला...






मायराचा हुंदका ऐकायला येताच मोहित गडबडला कारण त्याला ही अपेक्षा नव्हती. मायरा किती कणखर आणि कठोर आहे त्याला माहिती होते...
हळवं होणं तर त्याच्या स्वभावात होतं...पण आज ती हळवी झालेली बघून त्यालाही कसेसे झाले....






मायराच्या रडण्याचा आवाज तर येत नव्हता त्याला माहीत होते की तिला किती किती भरून येत असेल...??
त्याला फोनवर तिचा चढलेला श्वास ही जाणवत होता.






मोहित हळूच म्हणाला ...
" शू ss शू sss मायू.....हळवी होऊ नकोस.....
काहीच झालं नाही अजून निव्वळ लग्न तर जोडलं आहे... काही होणार नाही.... हिम्मत ठेव.... 
तूच तर माझी हिम्मत आहे.
तू जर अशी खचलीस तर कसं व्हायचं आपलं...??"







त्याच्या बोलण्यावर मायरा निव्वळ " हूं हूं " करत होती.






तोच बोलत राहिला फोनवर तिच्यासोबत आणि ती ऐकत राहिली त्यादिवशी....... तिच्याने बोलले जात नव्हते अजिबात....
रात्री उशिरा कधीतरी दोघेही आपापल्या विचारात असताना झोपी गेले.

......











गावातल्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या.

तशा त्या दर पाच वर्षांनी जाहीर व्हायच्या पण 
या गावांमध्ये निवडणुका प्रकारच चालू देत नव्हते येथील ही  असलेली सामाजिक परिस्थिती....
आणि मग शेवटी एकंदर न्यायनिवाडा म्हटल्यापेक्षा ज्यांचं वजन गावात जास्त आहे त्यांचा निर्णय चालायचा.







कारभार नीट चालत नव्हता. सरकारी प्रेशर येत होतं.
पण आता यावर्षी गोष्ट वेगळी होती.
यावेळी बाबाराव  यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचे ठरविले होते. त्यांना तर वाटत होते की ते बिनविरोध निवडून येतील.
कारण त्यांच्या विरोधात जाण्याची कुणात धमक नव्हती.







आज पर्यंत या गावांमध्ये...
निवडणुकीमध्ये जी चुरस व्हायला पाहिजे ती या गावात कधीच झाली नाही.....
जी रणधुमाळी व्हायला पाहिजे ती कधीच माजली नाही.... कारण निवडणुका होऊ दिला जात नव्हत्या.





पण आता गावातील सर्वांना वाटत होते की यावेळी स्वतः बाबाराव  निवडणुकीला उभे आहेत तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून कोणीच नसणार ....एकमेव तेच उभे राहतील.





पण हे काय झालं...!!  दुसरा गट कसा तयार झाला उभे राहायला निवडणुकीला यावेळी आता...??

दुसऱ्या गटाचा पुढारी एक तरुण आहे... एवढंच बाबाराव यांना कळले.






त्यांचा संताप होऊ लागला की आपल्या विरोधात 
कोणाची हिम्मत झाली निवडणुकीला उभे राहण्याची... अद्याप त्यांना त्याचे नाव कळले नव्हते तर त्यांनी 
आपल्या कारभारी रामला बोलावणे पाठवले.






बोलावणे येताच राम हजर झाला....
आणि त्यांची जे विशेष खोली आहे चर्चा करण्याची तिथे दोघेही गेले.






रामने त्यांना माहिती दिली....
रामच्या तोंडून माहिती ऐकून बाबारावच्या अंगाची
लाही लाही होऊ लागली....






त्यांना दुसऱ्या गटाच्या पुढार्‍याचे नाव कळले होते...
आणि तो तरुण होता नानाजी यांचा सुपुत्र... 
......सुंदर.
....


सध्या सुंदर तोऱ्यात असायचा त्याला कारण म्हणजे हातात पैसा बक्कळ आणि बाबाराव  यांच्या मुलीशी जुळलेले लग्न....





तसे पाहता त्याचे फार काही शिक्षण नव्हते. तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता एवढेच.






नानाजी  यांचा विचार असा होता की आता
बाबाराव  यांच्या मुली सोबत त्याचे लग्न जोडलेले आहे तर त्याची ओळख आता वाया गेलेला तरुण नसून काहीतरी चांगले करणारा व्हावे यासाठी त्यांनी गावात काहीतरी विधायक कार्य उभे करावे त्याने आणि पंचक्रोशीत आपल्या 
नावाचा लौकिक वाढवावा अशी त्यांची तळमळीने 
इच्छा होती.





नानाजी  यांना हेही वाटत होते की असे विधायक काम करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा सहकारी संस्था ही चांगली माध्यमे आहेत.
म्हणूनच या संस्थांमध्ये प्रवेश करून गाव विकासाच्या वाटा पुढे चालवत राहण्याच्या कार्यात सुंदर चा आतापासून सिंहाचा वाटा असावा असे त्यांनी मनोमन ठरविले होते आणि त्या दृष्टीने पावले उचलली.







यामुळे एक असा फायदा झाला नानाजी  यांना की आता गावातील लोकांचे लक्ष केवळ बाबाराव  यांच्याकडे न राहता सुंदर नानाजी  यांच्याकडेही जाऊ लागले होते.


.........






सर्व ऐकून आणि सुंदरचे वाढू लागलेले गावातले वजन बाबाराव यांना अजिबात पटले नाही.

कितीही म्हटलं तरी सुंदर निवडणुकीमध्ये उभे राहिल्यामुळे त्याच्याकडे काही ना काही मते तरी 
जाणारच होती....
विचार करून करून बाबाराव यांना पिसाळल्यागत वाटू लागले होते आता...








खूपच बिथरल्यागंत झाले होते ते आता..... त्यांचे एकही काम बरोबर होत नव्हते. सगळे उलटे फासे पडत होते.
ते करायला एक जात होते आणि होतं दुसरंच काहीतरी होतं.







त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये गावामध्ये प्रतिस्पर्धी नको होता... कुठल्याही परिस्थितीत त्यांना सुंदर निवडणूक लढवणे नकोच होते...





.....


नानाजी  आणि सुंदर  दोघेही आनंदाच्या कैफात होते...
एखाद्या जंगलात जाऊन शिकार मारून आलेला शिकारी जसा तोऱ्यात मिरवतो तसंच हे दोघेही स्वतःला गावात मिरवत होते.





दोघांचेही समाधान मात्र वेगवेगळे करण्यासाठी होते. दोघांनीही शिकारंच तर केली होती.
नानाजी  यांनी बाबारावची आणि सुंदर  याने मायराची. 



पंधरा दिवसांमध्ये साखरपुडा ठरला होता.
पंधरा दिवसानंतर मायरा सारखी 'करोडो मध्ये एक"
अशी देखणी पोरगी सुंदर  याची होणारी बायको असणार........ हे शिक्कामोर्तब होणार होते.







आणि इकडे निवडणुकीच्या बाबतीतही त्यांना दोघांनाही आपला जम बसू लागतोय असे वाटू लागले होते.






आणि सुंदर  हा बाबाराव  यांचा होणारा जावई असल्यामुळे धाकंही वाटत नव्हता आता त्यांना दोघांना.
......


सात दिवस असेच गेले आणि आठव्या दिवशी बाबाराव  यांच्या बंगल्यामध्ये एक खेडवळ तरुणी आली.






वॉचमनने आतमध्ये निरोप दिला...
सुरुवातीला तर तिला त्याने धूडकावून लावले होते पण तरीही ती बाबाराव  आणि मायरा  या दोघांना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीसाठी भेटायचे आहे.
अशी ती वारंवार सांगत असल्यामुळे आतमध्ये फोन करून त्याने विचारले.....







प्रयत्न करूनही ती तरुणी परत जात नाही .....
म्हणून...... 
"चला भेटून दोन शब्द बोलून घेऊ ".....
असा विचार करून बाबाराव यांनी आत पाठवण्यास सांगितले.


वेळ संध्याकाळची होती. बंगल्याचे एका साईडने झोपाळ्यावर  बसून बाबाराव मंद मंद झोके घेत होते. .......एकटेच होते.





मायरा आणि लीला दोघीही मंदिरात गेल्या होत्या.

डोक्यात विचारांची गर्दी होती.



आठ दिवसांनी होणाऱ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कुणाकुणाला बोलवायचे व जेवनात काय काय ठेवायचे याचा बेत विचारविनिमय करून करावा....??
की काय करावे ....???.....
सर्व विचारांची डोक्यात त्यांच्या भेळ झाली होती.






त्यांना आता मनोमन काहीतरी व्हावे आणि सुंदरला आपल्या मुलीच्या आणि आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून द्यावे असे वाटू लागले होते.

त्यावरच ते विचार करत होते पण डोके काम करणे बंद झाले होते.





त्यांचा हा सध्याचा होणारा भावी जावई सुंदर  यांच्यासंबंधी..... काही वाईट बातम्या आडपडद्याने कानावर आल्या होत्या.
त्यामधून काही धागेदोरे हातात लागतात का....??......
याचाही त्यांचा विचार सुरू होता.







खरं पाहता मायरा त्यांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांचा तिच्यावर अतोनात जीव होता ...फारच लाडाची होती ती पण त्याहीपेक्षा त्यांचा खानदानीच्या इज्जतीवर जास्त जीव होता..








आणि म्हणूनच ते मोहितला नाकारत होते आणि त्यांनी मनोमन हेही स्वीकारले होते की रक्त जरी त्याचे  नसले तरी लहानपणापासून तो कवडूचा मुलगा म्हणून ओळखले जात होता आणि त्यांची ही एक गोष्ट सोडली तर मोहित एक चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा अगदी त्यांच्या मायराला शोभेल असाच मुलगा आहे...






बाबाराव यांनी झोपाळ्याचा मंद झोका थांबवला आणि वळून पाहत विचारले ...." कोण....??"




🌹🌹🌹🌹🌹