१. हे लग्न होऊ शकत नाही
🌹🌹
अमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते.
रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता .
ती आपल्या रूपसौंदर्याकडे जातीने लक्ष देऊन
जास्तीत जास्त सुंदर दिसायचा आणि राहायचा प्रयत्न करत राहायची.
तिचे वडील दीनबंधू हे सुद्धा कॉस्मेटिक चा व्यवसाय करायचे.
जिथे पण जाईल तिथे स्वतःचा माहोल तयार करण्यात
ती नेहमी यशस्वी व्हायची.
एक दिवस ती आपल्या वडिलांसोबत एका विशेष पार्टीमध्ये गेली.
तिथे तिची ओळख सौम्य , मितभाषी , इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्या
मलिक पाशा ... पेंटिंग्स चा बादशहा सोबत झाली.
आणि तिला पाहून मलिक पाशा तिच्यावर फुल लट्टू झाला.
दुसऱ्याच दिवशी मलिक पाशा -द फेमस पेंटर
आहे तो रागिणीच्या घरी तिच्या वडिलांना भेटायला
येऊन रागिनी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.
एवढी फेमस व्यक्ती ....आणि एवढा श्रीमंत
त्याच्याकडून लग्नाचा प्रस्ताव आल्यामुळे रागिणीचे कुटुंब आणि स्वतः रागिनी तिला खूप आनंद झाला... घरचे सगळेही आनंदी झाले आणि फेमस होण्याची स्वप्न पाहू लागले.
मलिक पाशाचे दिनबंधुनी योग्य ते आदरातिथ्य केले. थोड्यावेळाने जेव्हा मलिक पाशा घरी जाण्यास उभा झाला त्यावेळी रागिणीचे बाबा ....दिनबंधू...
दीनबंधू त्याला म्हणाले.....
"तुम्ही जो लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय त्यामुळे आम्ही खूप दुविधेमध्ये आहोत . तसं .....मी एक प्रश्न विचारू का?"
मलिक पाशा...." जी ...विचारा."
" तुम्हाला रागिनी मध्ये असे काय दिसले की तुम्ही तिच्यासोबत ताबडतोब लग्न करण्याची इच्छा व्यक्त करीत आहात आणि वयामध्ये सुद्धा ती आपल्यापेक्षा
खूपच छोटी आहे ",.....दीनबंधू यांनी थोडे संकोचून विचारले.
" वयाची गोष्ट सोडा.... आता असे वयाचा फरक आजकाल विचारात घेत नाही .ही सर्वसाधारण गोष्ट आहे. आणि हो.... मी रागिनीमध्ये हे सर्व पाहिले जे एम .एफ. हुसेन यांनी कदाचित माधुरी दीक्षित मध्ये पाहिले होते.
आणि तुमचा व्यवसाय कॉस्मेटिक्स चा आहे .
तेव्हा सौंदर्याची परिभाषा सुद्धा तुम्हाला माहीत असेल."
असे म्हणून मलिक पाशा दोन्ही हात जोडून उभा राहिला आणि बोलला ...
." आता मला आज्ञा द्या, नमस्कार!"
मलिक पाशा तर घरी निघून गेला परंतु रागिणीच्या घरचे सर्व विचार करू लागले. खूप वेळ विचार करूनही रागिणीच्या आई-वडिलांना काय करावे.... कसं करावे.... काही समजत नव्हते.
ऍक्च्युली हा प्रस्ताव खूपच आकर्षक होता . त्यामुळे पुष्कळ वेळ पर्यंत रागिनीचे कुटुंबीय आपसात चर्चा करत राहिले.
याच्यात कोणतीच शंका नव्हती की मलिक पाशा सोबत रागिनी सुद्धा नाव कमवेल.... तिची सुद्धा प्रसिद्धी होईल.... तिचंही एक व्यक्तित्व उभारून येईल...
प्रत्येक घरी तिची एक वेगळी ओळख निर्माण होईल. एवढेच नाही तर दीनबंधूंना हेही समजत होते की त्यांची सुद्धा व्हॅल्यू समाजात वाढेल . मालिक पाशामुळे एक विशेष आदर सन्मान ...याच्यात वाढ होईल आणि अगदी काही न करता सर्व कुटुंबाला मिळेल .
जीवनभर प्रयत्न केले तरी जे मिळणार नव्हते ते जर मलिक पाशा सोबत रागिनीने लग्न केले तर या कुटुंबाला आणि रागिनीला मिळणार होते .
दीनबंधू आणि त्यांच्या पत्नी रमय्या दोघेही मनातून द्विधा अवस्थेमध्ये होते.
रमय्या यांनी रागिनीला जवळ बोलून प्रेमाने विचारले
" बेटा रागिनी , तुझे काय म्हणणं आहे?"
रागिनीने संकोचून उत्तर दिले
" मी काय सांगू ? ममा ...मला काही चांगलं वाटत नाहीये हे."
रमय्या म्हणाल्या....
" बेटा , अमन सोबत तुझे लग्न जरी जुळलेले असले तरीसुद्धा मलिक पाशाचा प्रस्ताव सुद्धा आपण एकाएकी नाकारू शकत नाही."
दीनबंधू .....
" तुझ्यावर कोणताही दबाव नाही आहे.
जे तुझ्या मनात आहे ते साफ साफ आम्हाला न घाबरता सांग."
रागिनी स्वतः मलिक पाशाच्या प्रस्तावावर मनातल्या मनात खुश होऊन स्वप्नामध्ये फेमस मॉडेल
आणि श्रीमंत तसेच प्रसिद्धी च्या दुनियेत उंच
उडू लागली होती.
प्रसिद्धी सोबत पूर्ण दुनिया फिरायला मिळेल
ही तिच्या मनात लालसा निर्माण झाली होती.
या सर्व गोष्टी समोर ......मनातील भावना ज्या अमन बद्दल होत्या त्या गळून गेल्या होत्या.
आता ती हा विचार करत होती की माणसाने भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही तर त्याने प्रॅक्टिकल राहावे लागते.
त्यामुळे आता तिने ....
" मला काय माहित नाही .तुम्हाला जे ठीक
वाटते ते करा."
असे म्हणून त्या प्रकरणातून आपले हात झटकून टाकले.
एवढ्यात रागिणीच्या फोनची रिंग वाजली.
रागिनीने जसा फोन उचलला तसे रमय्याने इशाऱ्याने
रागिणीला टोकले. रागिनीने मोबाईल वर हात ठेवला जेणेकरून रमयाचे बोलणे पलीकडे ऐकू जाऊ नये.
" हे बघ बेटा , मलिक पाशाच्या विषयी अमनला काहीही सांगू नको आणि असं सुद्धा सांग की तू काही दिवसांसाठी आजीकडे गावाला चालली आहे."
" पण मम्मा फोन तर आजीकडे पण येईल"...
रागिनीने रमय्याला सांगितले.
रमय्या....
" आम्ही सांगून देऊ की तू फोन येथेच विसरून गेली आहे. अमन चे फोन तू उचलू नकोस सध्या तरी.
हे बघ , सध्या आपल्याला खूप साऱ्या विषयावर विचार करायचा आहे. म्हणून थोडे दिवस अमनला फोन करू नकोस किंवा त्याच्याशी बोलू नकोस."
जर रमय्या यांनी तिला टोकलं नसतं तर रागिनी अमन सोबत मलिक पाशा विषयी सविस्तर चर्चा करणार होती.
आता तिला वाटले की ममा.... जे म्हणत आहे ते कदाचित बरोबरच आहे आणि म्हणून फोनवर अमन सोबत तिने इकडची तिकडची खूप सारी गोष्टी केल्या
आणि आजीच्या घरी जाणार आहे असा बहाणा करून फोन बंद केला .
खोटं बोलून तिला खूपच वाईट वाटत होते परंतु तिची पण मजबुरी होती तिला सुद्धा विचार करायला वेळ हवा होता म्हणून ती अशी वागली होती.
इकडे अलीकडे अमनला रागिनीचे वागणे विचित्र
वाटत होते.
त्याला काही समजत नव्हतं ती का अशी वागत आहे.
नंतर त्याने पुन्हा फोन केला तर रागिनीचा फोन बंद येत होता.
अमन विचार करू लागला अचानक रागिनी
अशी का वागत आहे..अमन ने रागिनी सोबत एकमेकांना चांगले ओळखण्यासाठी वेळ घालविण्याचे ठरवले होते पण मध्येच रागिनी आजीकडे गेल्यामुळे त्याचा मूड खराब झाला होता . त्याला पुढचे 24 तास त्याला 24 वर्षा सारखे वाटत होते.
इकडे .....
दिनबंधू आणि रमय्या आपसात चर्चा करून तर्क वितर्क काढत होते पण कोणत्याही निर्णयावर पोहोचले नव्हते.
मलिक पाशा चा लग्नाचा प्रस्ताव आला .
तेव्हापासून रागिनी ला व्यवस्थित झोप लागत नव्हती.
ती फक्त बेडवर इकडून तिकडे इकडून तिकडे
वळवळ करत रहायची आणि.....
भविष्याच्या सुंदर स्वप्न पाहत होती.
स्वप्न पाहत असताना तिला एकही वेळा हा विचार येत नव्हता की मलिक पाशा कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षे तिच्या पेक्षा मोठा आहे.
सकाळी नाश्ता नंतर दीनबंधू स्वतःच्या रूममध्ये विचार करत बसले होते . रमय्या खुर्चीवर बसून त्यांना एक टक निहाळत होती कारण कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय ती घेत नव्हती दीनबंधू घ्यायचे.
दीनबंधू यांनी अचानक रमया यांना सांगितले ,
" मी पूर्ण विचार केला आहे .आपण काय निर्णय घ्यायचा तो?"
रमय्या ने त्यांना विचारले ....
" कोणता निर्णय घेतलाय तुम्ही?"
"हे लग्न होऊ शकत नाही" निर्णय घेतलाय मी."'
"मग मलिक पाशा यांना काय सांगाल.....???"
" मूर्ख आहेस का तू ? जे काही सांगायचं आहे ते अमनला सांगायचे . त्याच्याशी लग्न आपण तोडायचे .आता रागिनीला समजवायचं काम तुझे आहे."
रमय्या विचार करत म्हणाल्या , " मला हे माहीतच होतं."
रागिनी...." नाही मम्मी.... नाही..... मलाच हे पटत नाही आहे."
रागिनी जरी मॉडेलिंग चे स्वप्न पाहत असेल, फेमस , श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असेल तरी मलिक पाशा सोबत लग्न म्हटल्याबरोबर तिला काहीतरी विचित्र वाटले होते.
रमय्या....
"मग आम्हाला चांगले वाटत आहे का?
बेटा ,समजण्याचा प्रयत्न कर .हे स्थळ आपण होऊन आपल्याकडे चालत आलेले आहे आणि अमनला
मलिक पाशासारखं बनायला कितीतरी जन्म घ्यावी लागतील."
अमनचे बरेच वेळा फोन येत होते पण
रागिनीचा फोन बंद होता .तो.... त्याला समजत
नव्हते काय करावे?
आणि रागिनी लाही समजत नाही काय करावे.
तिही सुद्धा द्विदा अवस्थेत मध्ये होती.
दोन दिवसानंतर मलिक पाशा यांचा फोन आला,...
"मी तुम्हाला अडचणीमध्ये आणले आहे .
परंतु तुमचा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेल .
तुम्ही तो सांगू शकता."
मलिक पाशाच्या शालिनतेवर दीनबंधू प्रसन्न झाले.
जे काही मनात प्रश्न होते ते सुद्धा मिटले .
शेवटी एवढ्या दुनियेत जगात एवढं नाव कमावणे हे काही साधी गोष्ट नव्हे.
दीनबंधू बोलू लागले पण त्यांना शब्द सुचत नव्हते ते म्हणाले ...
" खरं सांगायचं म्हणजे आम्ही हा विचार केला आहे......."
मलिक पाशाने मध्येच म्हटले ..."आता तुम्ही काहीच सांगू नका .तुम्ही मला एक परवानगी द्या...."
दीनबंधू यांनी आश्चर्य व्यक्त केले ...
" परवानगी ?...आणि माझी...ती कशासाठी...."
" मी तुमच्या परवानगीने आज रागिणीला सोबत घेऊन जाऊ शकतो काय? आज आम्ही दिवसभर प्रदर्शन आणि स्टुडिओ फिरून येऊ आणि लंच सुद्धा तिकडेच करू.....", मलिक पाशा म्हणाला.
दीनबंधू बोलले..." एक मिनिट, मी रमयाला तिच्या आईला विचारून घेतो."
रमय्या यांनी नकार दिला तेव्हा
दिनबंधू यांनी कुजबुजून सांगितले ," काय होते जाऊ दिले तर रागिनी.... रागिनीला पण निर्णय घ्यायला सोपे होईल. जवळून समजायला ....समजून घ्यायला तिला मिळेल."
मग रमय्या शांत बसलेल्या होत्या म्हणजे याचा अर्थ असा होता की त्यांची मौन स्वीकृती होती.
दीनबंधू...." ठीक आहे , मलिक पाशाजी."
" धन्यवाद, मी कार पाठवत आहे ",मलिक पाशा यांनी म्हटले आणि त्याने फोन बंद केला.
रागिनी ला मलिक पाशा त्याच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तो जिथे जाईल तिथे लोकांची त्यांच्या अवतीभवती गर्दी होत होती विशेषतः मुली चिपकत होत्या.
त्यांना भेटून ऑटोग्राफ घ्यायच्या हे सगळं पाहून रागिनीला खूप चांगलं वाटत होतं .
ती स्वतःला अचानक खूप नशीबवान समजत होती. पण तिला द्वेष ईर्षा वाटत नव्हती.
त्याच्या हॉटेलमध्ये थाई डिश फेमस होती ती त्यांनी मागविली.
रागिनी ...
"तुम्हाला कसे माहित झाले की मला थाई डिश आवडत"
मलिक पाशा ..."जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते , मी तिच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवतो."
मलिक पाशा ...
" मेनू कार्ड पाहून रागिनीला विचारतो ? आणखी काय घेशील?"
रागिनी हसून हलक्या स्वरात सांगितले ,...
"जेव्हा आता तुम्हाला सगळं माहीतच आहे तर हे सुद्धा माहित असेल की मला काय आवडते?"
मलिक पाशा ...
" जर हे एक चॅलेंज आहे ते मी स्वीकारतो."
मलिक पाशाने रागिणीच्या आवडीची सर्व डिशेस मागविल्या.
रागिनी म्हणाली,
" तुम्ही खूप फेमस आहात .जिथे पण जाता तिथे तुमच्या अवतीभवती मुली दिसतात."
परंतु मलिक पाशाने काही उत्तर दिले नाही .तो जेवणामध्ये व्यस्त होता.
जेवण उरकल्यानंतर......,
मलिक पाशा ...."चालायचे?"
रागिनी ...."कुठे?"
मलिक पाशा ...."अगोदर आपण माझ्या पेंटिंगची प्रदर्शनी पाहायला जाऊ. मग त्यानंतर स्टुडिओ पहायला जाऊ."
एवढ्या फोन आला.
मलिक पाशा याने काहीतरी फोनवर बोलणे केले बोलून झाल्यावर तो रागिनीकडे आला आणि म्हणाला,
...."तू माझ्यासाठी खूप लकी आहेस."
मलिक पाशा ...
"आत्ताच मी मॅनेजर सोबत फोनवर बोललो .आज माझ्या सर्व पेंटिंग्स विकल्या गेल्या."
रागिनी..." काँग्रॅच्युलेशन्स."
असे म्हणून रागिनीने मलिक पाशा सोबत हात मिळवला.
तेव्हा रागिणीला वेगळे काहीतरी वाटले. तिला त्याच्यासोबत हात मिळवणे आवडले नाही.
ती विचार करू लागली. अमन सोबत असताना त्याच्यासोबत आपल्याला खूप छान वाटते. त्याने हात पकडल्यावर किंवा मी त्याचा हात पकडल्यावर तो पकडून राहावा असा वाटतो.
कदाचित आपण अमनला अगोदर पासून ओळखतो ...तो नेहमी परिचयाचा आहे म्हणून असेल.
आणि तीने मनातील विचार झटकून टाकले.
मलिक पाशा स्मित करून म्हणाला....
" रागिनी , आज मी तुझ्यासोबत आलो. आणि पेंटिंग्स प्रदर्शनी मधील पूर्ण पेंटिंग्स विकल्या गेल्या हे पहिल्यांदाच असे घडले आहे... तेव्हा आपण असे करू, आता आपण माझ्या स्टुडिओमध्ये जाऊ .चालेल ना तुला."
मलिक पाशाच्या स्टुडिओमध्ये गेल्यावर रागिनीला थोडे विचित्र वाटायला लागले. येथे आत मध्ये गेल्यावर काही अर्धवट पेंटिंग्स होत्या. त्यातील बरेचसे पेंटिंग्स नग्न मुलींच्या दिसत होत्या.
तिने तसे कधी बघितले नव्हते त्यामुळे विचित्र भीतीने तिला आतून थरथर वाटायला लागले.
स्टुडिओमध्ये मलिक पाशाचे काही स्टुडंट्स त्यांच्या कॅनवास वर पेंटिंग्स करत होते. आणि त्यांच्यासमोर काही मुली अगदीच कपडे न घातलेल्या ...खुर्चीवर तर कुणी स्टूलवर ....पोज देऊन बसलेल्या होत्या.
हे सर्व दृश्य बघून तिला अंतर्मनातून फार घाबरल्यासारखे होत होते. तिच्या तळहातांना घाम फुटला होता.
पुढे जात मलिक पाशाने एका
सोफ्याकडे बोट दाखवले..
" तू खूप सुंदर दिसतेस.मला तुझे सौंदर्य खूप आवडले.
मला तुझे नैसर्गिक सौंदर्य कॅन्वास वर उतरवायचे आहे.
तुझी पेंटिंग बनवायची आहे. प्लीज तुझे कपडे काढ आणि या सोफ्यावर बस."
हे एकूण रागिनी सुन्न झाली .
ती स्वप्न तर पाहत नाहीये.
तिने पटकन स्वतःच्या हाताला चिमटा घेऊन बघितला
हाताला चिमटा घेतल्याने खांद्यापर्यंत कळ गेली .
नाही .....नाही .....ती असे करू शकत नाही .
अगोदरच भ्यालेली ती ..... मलिक पाशाने असे म्हटल्यावर आणखी भीतीने गारद झाली.
तिचे ओठ थरथरायला लागले...
तिचा भीतीने गारद झालेल्या चेहरा बघून मलिक पाशा आणखी आनंदीत झाला.
मलिक पाशा...
"Wow! What expressions! What a beauty!"
रागिनी ला तो एकदम विकृत वाटला.
त्यावेळी त्याचा चेहरा एखाद्या विकृत माणसासारखा विचित्र दिसत होता.
मलिक पाशा तिच्याजवळ येऊ लागला.
आणि म्हणाला...
" घाबरू नकोस. पहिली वेळ मुलींना संकोच वाटतो .
ये इकडे, मी तुला मदत करतो ."
असे म्हणून मलिक पाशा रागिनी कडे येऊ लागला.
" नाही ...नाही .."
रागिनी ओरडून म्हणाली आणि अचानक तिच्यामध्ये आतून काहीतरी संचारले आणि म्हणाली ,...
" मला आता जावं लागेल . मी येथे थांबू शकत नाही."
मलिक पाशा ....
" आज पर्यंत माझी एकही मॉडेल अशी वापस गेली नाही. तू तर माझी होणारी पत्नी आहेस .तुझे तर काहीच बिघडेल नाही . माझीच संमती आहे या सर्वाला."
रागिनी निश्चय करून म्हणाली,......
" ना मी तुमची मॉडेल आहे. नाही पत्नी .तर कृपया आता मला तुम्ही जाऊ द्या."
तेवढ्यात त्यांच्या स्टुडिओमध्ये काही कामानिमित्त दोघेजण आले आणि रागिणीला बाहेर जायला चान्स मिळाला.
मलिक पाशाचे लक्ष आलेल्या व्यक्तीवर गेले तशी रागिनी तिथून पटकन सटकली.
पटापट चालत जाऊन बाहेर मेन रोडवर आली आणि आता तिच्या नेत्रांमधून अश्रू बाहेर पडले.
रस्त्यावर आल्यावर तिला लगेच ऑटो रिक्षा दिसला आणि तिने हात दाखवला ऑटो रिक्षा थांबली आणि ती बसून घरी गेली.
घरी गेल्यानंतर ती रूममध्ये जाऊन शांत बसली.
ती आल्यावर दीनबंधू आणि रमय्या यांनी तिला बरेच प्रश्न विचारले पण ती उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती.
रागिणीच्या या वागण्यावर दीनबंधू आणि रमय्या विचार करू लागले. ते बाहेर गेल्यावर रागिनीने आपली रूम आतून बंद केली आणि काहीतरी निश्चय करून निश्चिंत मनाने झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी रागिनीने घरात घोषणा केली...
हे लग्न होऊ शकत नाही.
दीनबंधू त्यावर आनंदाने म्हणाले.....
" मला माहित होते तू हाच निर्णय घेशील . अमनला समजावणे माझे काम आहे."
रागिनी.....
" पप्पा.. तुम्हाला समजलं नाही .मी मलिक पाशा सोबत लग्न करणार नाही."
दीनबंधू आश्चर्याने ,.....
" हे काय बोलत आहेस तू? असं का निर्णय घेतला तू?"
रागिनी ,......
" पप्पा ..ते मला स्टुडिओमध्ये घेऊन जाऊन अंगावरील कपड्याशिवाय बसून माझे पेंटिंग बनवायला म्हणत होते आणि हे मला मंजूर नाही. तुमची काय म्हणणे आहे यावर?"
रागिनीने दिनबंधू आणि रमय्या दोघांनाही मोकळेपणाने स्पष्ट सांगितले.
ऐकून दिनबंधू आणि रमय्या सुन्न झाले .
असे संस्कार त्यांनी त्यांच्या मुलीवर केले नव्हते.
त्यांना ही गोष्ट पटली नाही आणि ते काहीच बोलले नाही.
रूम मध्ये जातच होती तर रागिनीचा फोनची रिंग झाली. सगळीच आश्चर्याने त्या फोनकडे
पाहायला लागले मलिक पाशाचा फोन तर नव्हे...
फोन वर अमन होता .सर्वांच्या चेहऱ्यावर प्रफुल्लता आली.
रागिनी ने फोन उचलला....
अमन...."हाय."
रागिनी ,......
" काय रे ! कुठे आहेस ? इतके दिवस फोन केला नाही ? काही नाही?"
रागिनी आनंदाने बोलली आणि तिकडे अमन या खोट्या आरोपावर चकित झाला होता..
त्याला तिचा खोटा आरोपही गोड वाटला.
समाप्त..🙏
🌹🌹🌹🌹