निकिता राजे चिटणीस
पात्र रचना
1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
3. निकीता चटणीस नितीन ची बायको
4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
13. कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
14. रघुवीर अविनाशचा ड्रायव्हर
15. पंडित नितीन चा ड्रायव्हर
16. वाटवे मॅडम चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager
17. अंजिकर सर चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer
18. साखळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
19. पांडे सर चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer
20. बबन चपराशी
21. साटोरे बबन चे वडील.
22. चोरघडे सर चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer
23. वाघूळकर सर चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ
24. चिंतामण चिटणीस अविनाश चिटणीसांचा भाऊ
25. विमल चिंतामण चिटणीसांची बायको
26. निखिल चिंतामण चिटणीसांचा मुलगा
27. शशांक दामले चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.
28. पाटील पोलिस इंस्पेक्टर
29. परब सब इंस्पेक्टर
30. गवळी कॉन्स्टेबल
31. मळेकर पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )
32. देसाई आर्किटेक्ट
33. सारंग काँट्रॅक्टर
भाग ३३
भाग ३२ वरून पुढे वाचा .........
इंस्पेक्टर मळेकर
“बघ. असं काय झालं की न बोलता त्यांच्याकडून तू पार्सल घेतलं? कोण होता तो. तुला नक्कीच माहिती आहे. बऱ्या बोलाने बोल. सोमनाथ इथेच आहे.”
“खरं सांगतो साहेब मी त्याला ओळखत नाही. त्यांनीच मला विचारलं की माझं नाव बबन साटोरे आहे का? मी मान डोलावली. मग तो म्हणाला शशिकला चिटणीस बाईंना द्यायचं पार्सल त्याच्या जवळ आहे, आणि ते त्यांनी मला दिलं. मग तो पुढच्या फाट्यावर उतरून गेला. त्याच्या जवळ माझा फोटो होता साहेब. त्यावरूनच त्यांनी मला ओळखलं.” – बबन.
“तू रायपूर ला आला आहेस आणि जगदलपूरला जायला याच बस मध्ये चढणार आहेस हे त्याला कसं कळलं ?”
“मला कसं माहीत असणार साहेब?” – बबन.
या प्रवासात तुझा शशिकलाबाईंशी संपर्क होता ?
“हो साहेब रोज सकाळ ,संध्याकाळी त्यांना दिवस भरातली माहिती द्यावी लागायची.”- बबन.
“म्हणजे तू जगदलपुरला जाणाऱ्या कोणच्या बस मध्ये चढणार आहेस हे त्यांना माहीत होतं.”
“होय साहेब. आदल्याच दिवशी मी रिजर्वेशन केलं होतं आणि तसं त्यांना कळवलं होतं.” – बबन.
“पण तुलाच का पाठवलं, कोरियर नि का नाही मागवलं ?
...........
“त्या ते कोरियर ने पण मागवु शकत होत्या. तुला का पाठवलं ?”
“माहीत नाही. साहेब आम्ही नोकर माणसं, सांगितलेलं काम करायचं एवढंच माहिती.” – बबन.
“काय होतं त्या पार्सल मध्ये?”
“नाही माहीत साहेब.” – बबन.
“तू जगदलपूरला जातो आहेस हे अविनाश सरांना माहीत होत?”
“काही कल्पना नाही साहेब, मॅडमनी मला सुट्टी घ्यायला लावली होती.” – बबन.
“सुट्टीवरून आल्यावर तू सांगितलस?”
“नाही साहेब.” – बबन.
“का?”
“आईची तब्येत खराब आहे म्हणून धुळ्याला जायचं आहे, अस सांगून सुट्टी घे, साहेबांना काही सांगू नकोस असं मॅडमनी बजावून सांगितलं होतं.” – बबन.
“पण ज्यांच्याकडे तू वर्षानुवर्ष नोकरी केली, त्यांना अंधारात ठेऊन तुला काम करायला सांगितलं जातं यात तुला काही संशयास्पद वाटलं नाही?”
.......
“गप्प बसू नकोस. बोल, तुला या सर्व प्रकारात काही विचित्र वाटलं नाही?”
“वाटलं होतं पण मी कोणाला विचारलं नाही. मोठ्या लोकांची काम वेगळीच असतात असा विचार करून गप्प बसलो.” – बबन.
“त्या पार्सल मध्ये काय होतं हे तुला खरंच माहीत नाही?”
“नाही” – बबन.
“ज्यांनी पार्सल दिलं त्याला किती पैसे दिलेस?”
“एक लाख रुपये.” – बबन.
“कॅश?”
“हो.” – बबन.
“एवढे पैसे कोणी दिले?”
“मॅडमनी.” – बबन.
“म्हणजे कोणी? राधाबाई की शशिकलाबाई?”
“साहेब राधाबाई बद्दल का सारखे सारखे विचारता आहात? राधाबाई मॅडम कडे घरकाम करतात. त्यांचा काय संबंध आहे? त्या कुठून देणार? पैसे शशिकला मॅडमनी दिले होते.” – बबन.
“त्या जर घरकाम करतात तर त्यांच्याकडे कंपनी चे पांच टक्के शेअर्स कसे?”
“साहेब, मी छोटासा नोकर माणूस, मला कसं कळणार? मला आत्ताच समजतंय.” खरं तर बबनला प्रश्नच कळला नव्हता.
“तुला का ३० हजार देत होते? ते तरी कळतंय का?”
“साहेब ते पैसे माझ्यासाठी नव्हते. मोठे साहेब ते बाबांना देत होते.” – बबन.
“का?”
“नेमकं कारण माहीत नाही पण बाबांनी, कुठल्याशा कामामध्ये मोठ्या साहेबांची खूप मदत केली होती त्याबद्दल परतफेड म्हणून देत होते. एवढंच मला माहीत आहे.” – बबन.
“कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस?”
“खूप प्रयत्न केला साहेब, पण बाबांनी सांगितलं की हे गुपित आहे आणि ते त्यांच्या बरोबरच संपणार आहे. मग मी खोलात शिरलो नाही.” – बबन.
“विचार करून बोल शेवटची संधि आहे.”
“साहेब इतका मार खाऊन झाल्यावर मी खोटं कशाला बोलीन.” – बबन.
“नितीन ला का मारलंस?”
“काय बोलता साहेब मी का मारेन त्यांना? ते माझे अन्नदाते होते. सर्वांचे लाडके होते. देव माणूस होते ते. त्यांना मारण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मीच काय ऑफिस मधले कोणीच नाही.” – बबन.
ठीक आहे. जा तू.
गवळी, बबन च्या बोलण्यातून तुम्हाला काही कळलं का ?
“हो साहेब बबन ने विषाच पार्सल शशिकलाबाईंना आणून दिलं.”- गवळी.
“नाही गवळी एवढंच नाहीये. राधाबाईंने विष मागवलं ते जीव देण्यासाठी. मग मामा आलेत आणि सगळं ठीक झालं आणि विषाच काही कारणच उरलं नाही. आणि त्या वेळेला बबन चा जन्म पण व्हायचा होता. शशिकलाताईंनी मामाशी संबंध ठेवला होता. कदाचित हे प्लॅनिंग त्यांच्या मनात कित्येक वर्षांपासून घोळत असावं. मग बबन मोठा झाल्यावर संधि साधून त्यांनी मामाकडून विष मागवलं. कदाचित त्यासाठी भरपूर पैसे पण मोजले असतील. गवळी तुम्ही म्हणता की मामा या जगात नाहीये, तेंव्हा हा सर्व व्यवहार त्यांच्या मुला बरोबरच झाला असण्याची शक्यता आहे. आपल्याला या मुलाला ताब्यात घ्यायला लागेल.”
“म्हणजे तुमच्या अंदाजानुसार खून १०० टक्के शशिकलाबाईंनीच केला.” – गवळी.
“Correct गवळी correct.”
“मग आता ? बस्तर पोलिसांना काळवायचं?” – गवळी.
“ते तर कळवुच पण त्या आंगोदर काही गोष्टींची लिंक जुळवणं आवश्यक आहे ते काम आधी करावं लागणार आहे. शशिकलाबाइ अत्यंत हुशार आहेत त्यांच्याकडे जातांना आपल्याला पूर्ण तयारिनीशी जावं लागणार आहे. त्याशिवाय त्या बधणार नाहीत.”
“म्हणजे?”
“म्हणजे अस की आपण धुळ्याला जाऊन बबन च्या वडलांशी बोलायला पाहिजे.”
“ह्या सर्व प्रकरणात त्यांचा सक्रिय सहभाग असलाच पाहिजे अस मला वाटतंय. शशिकलाबाईनी मामाशी सरळ संपर्क ठेवला असेल अस मला वाटत नाही. मधे साटोरे असलेच पाहिजेत. तुम्ही अस करा चोरघाड्यांना फोन लावा आणि साटोऱ्ऱ्यांचा पत्ता घ्या. त्यांना माहीत असेल.”
“साहेब मिळाला पत्ता. साधारण आठ तास लागतील धुळ्याला पोचायला.” – गवळी.
“ठीक. उद्या आठ वाजताच निघू. तयारीला लागा.”
गवळी कोणाला तरी फोन लावत होते.
“हेलो साटोरे साहेब आहेत का?” – गवळी.
“..
एक मोठी ऑर्डर द्यायची आहे उद्या आपण आहात का?” – गवळी.
....
“दुपारी पांच वाजे पर्यन्त” – गवळी.
..
“ओके ठरलं तर मग उद्या पांच वाजता आम्ही येतो, ड्रॉइंग वगैरे घेऊन येतो.” – गवळींनी फोन ठेवला.
“साहेब मला अस वाटलं, की जर ते पुण्याला आले असले तर आपली खेप फुकट जाईल म्हणून आपलं विचारून घेतलं.” – गवळी.
“वा गवळी, बरं तुमच्या लक्षात आलं. गुड.”
दुसऱ्या दिवशी साडे चार ला मळेकर आणि दळवी धुळ्याला पोहोचले. बरोबर पांच वाजता साटोरे वर्कशॉप मध्ये पोचले. साटोरे समोर आले पण पोलिसांना पाहून जरा दचकलेच. बबनला पकडल्यानंतर तसं त्यांच्या लक्षात आलच होतं, की पोलिस त्यांच्याकडे पण येऊ शकतात म्हणून. वरकरणी हसून त्यांनी मळेकरांचं स्वागत केलं.
“बोला साहेब काय करू शकतो मी तुमच्यासाठी?” – साटोरे
“विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या.”
“तुम्ही बबन ची पूर्ण जबाबदारी घ्यावी म्हणून अविनाश तुम्हाला पैसे देत होते?”
“हो साहेब.” – साटोरे
“वर्कशॉप टाकायला पण त्यांनीच दिलेत ?”
“हो साहेब.” – साटोरे.
“बबनला नोकरी देऊन सुद्धा वेगळे पैसे देत होते?”
“हो साहेब.” – साटोरे..
“का?”
“मी म्हंटलं होतं की आता जरूर नाही, पण ते म्हणाले असू दे.” – साटोरे.
“तुमचे राधाबाईंच्या मामाशी कसे संबंध होते ?”
..
“हे बघा, तुमच्या समाजातल्या स्थानाला धक्का न लावता आम्ही विचारतो आहोत. खरी खरी उत्तरं द्या नाही तर बेड्या घालून ठाण्यावर घेऊन जाऊ. मग काय होईल त्याचा विचार करा. एकदा तिथे गेल्यावर कसलीही दया माया नसते.”
“शशिकला बाईंनी सांगितलं होतं की अधून मधून त्यांच्या संपर्कात रहा.” – साटोरे.
“त्याच्यासाठी तुम्ही बस्तर मध्ये जात होता?”
“हो” – साटोरे.
“कशा साठी? संपर्क तर पत्रा द्वारे सुद्धा ठेवता आला असता. मग?”
“लिखित मध्ये काही नको अस मॅडम म्हणायच्या, म्हणून.” – साटोरे.
“नुसतं एवढंच कारण आहे?”
“पैसे पण द्यायचे असायचे.” – साटोरे.
“किती आणि केंव्हा?”
“दहा हजार रुपये सहा महिन्यातून एकदा.” – साटोरे.
“म्हणजे तुम्ही दर सहा महिन्यांनी बस्तरला जात होता.”
“हो साहेब.” – साटोरे.
“या कामाबद्दल मॅडम तुम्हाला किती पैसे द्यायच्या?”
“जाण्या येण्याचा खर्च आणि वरून वीस हजार.” – साटोरे.
“किती वर्ष हा उद्योग चालू आहे.?”
“दहा बारा वर्षांपूर्वी मॅडमनी त्यांच्याशी एक रकमी पैसे देऊन फायनल करून टाकलं त्या नंतर बस्तरला जाणं बंद झालं.” – साटोरे.
“किती पैसे दिले?”
“ते माहीत नाही साहेब. ते द्यायला बबन गेला होता.” – साटोरे.
“म्हणजे बबनला हा सगळा प्रकार माहीत होता?”
“नाही साहेब, मॅडमनी त्याला काय सांगून पाठवलं ते मला माहीत नाही. बबन सांगायला तयार नाही. मॅडमनीच सांगितलं मला की आता बस्तरला जायची जरूर नाही म्हणून.” – साटोरे.
“त्यांनी बस्तरहुन मॅडमसाठी काय आणलं.”
“साहेब, तो पैसे द्यायला गेला होता काही आणायला नाही. निदान, मला तरी माहीत नाही.” – साटोरे.
“जेंव्हा फायनल झालं तेंव्हा मामा होते?”
“नाही साहेब ते त्याच्याही बरेच आधी वारले होते. त्यांचा मुलगाच मला भेटायचा.” – साटोरे.
“आता कुठे आहे तो?”
“साहेब आता बारा वर्ष झालीत. मी ही कधी चौकशी केली नाही, त्यामुळे त्याचा
आताचा ठाव ठिकाणा मला माहीत नाही.” – साटोरे.
“आणखी काय माहीती आहे तुम्हाला ?”
“सगळं सांगून झालं साहेब. आम्ही नोकर माणसं मालक जस सांगतील तसं वागणार, पण साहेब मी आणि माझ्या पोराने काही गुन्हा केला नाहीये साहेब.” – साटोरे.
“ठीक आहे जरूर पडली तर पुन्हा येऊ.”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com