Niyati - 21 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 21

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 21



भाग -21



बाबाराव......

"अगं पोरी.. इथे...ते फक्त पाहायला येत आहेत.... पाहुणे म्हणून .... म्हणून आणि पाहायला आले म्हणजे लग्न जुळलं असं होत नाही ना ...!!! ...येऊ दे.... बघू दे..,. आपण संबंध वाढवू.... आपल्या निवडणुकीला योग्य होईल .....असे संबंधांमुळे निवडणूक लढण्यासाठी आणखी प्रबलन  मिळते आणि मतांची वाढ होते आणखी भरपूर..... समजले काय गं..?? त्यासाठी येऊ दे त्यांना...मगची मग पाहू."



असे म्हणून त्यांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला..




पण त्यावर ती.... शेवटी चूप राहिली.

.......


त्यादिवशी बाबारावांच्या बंगल्यामध्ये सकाळपासूनच मोठी धामधूम होती....



मुलाकडची मंडळी गावातली होती तरी एका शेल्यावर राहणारी होती आणि ती मंडळी सर्व दुपारी येणार होती.





पण त्यांच्या आगत स्वागतामध्ये कुठेही आणि काहीही कमी पडायला नको म्हणून बाबाराव प्रत्येक बाबतीत काळजी घेत होते. इव्हन त्यांनी रामलाही चांगलेच बजावले होते.





रामसुद्धा जातीने ...भरभरून सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत होता......




मुलगी पाहायला लोकं येणार .....मंडळी येणार म्हणजेच तीन ते चार फोर व्हीलर तर नक्कीच येणार...!!
असा बाबाराव यांचा विश्वास होता.





त्यांच्या गावात मुलगी पाहायला यायचे म्हणजे 
स्वतः मुलगा आणि त्यांच्या घरातील लोकं ....शेजारचीही काही लोकं ....नातेवाईकांची माणसे .....अधिक एक दोन तरी मुलाचे खास मित्र..... असा मोठाच परिवार येणार 
.....यामध्ये बाबाराव यांची शंका बिल्कुल नव्हती आणि रामलाही तसेच वाटत होते......






आज मुलगी पाहायला जायचं आहे म्हणजे मायराला पाहायला जायचं आहे तर साखरपुड्याचा दिवस  ठरवूनच परत यायचे ....अशा अपेक्षा आणि आवेश घेऊनच सुंदर गाडी बसला होता...





पाच फोर व्हीलर गाड्या घेऊन राजेशाही थाटात सुंदर आणि नानाजी शेलार घरून निघाले होते बाबारावांच्या बंगल्यावर येण्यासाठी..... आणि बाबाराव यांच्या घरी केव्हा त्यांच्या गाड्या पोहोचल्या त्यांनाही समजले नाही.






सुंदर... एवढेच नव्हे तर नानाजी शेलार सुद्धा ..
आपल्याच मनोराज्यात धूंद होते.
दोघांच्याही मनाला पंख फुटले होते..



दोघेही आपल्या मनात भविष्याविषयी कल्पना बांधण्यात गुंतून गेले...





सुंदरच्या मनात तर केवळ आणि केवळ मायरा आठवत होती... मंदिराच्या पायऱ्यांवर दिसली होती ती ....तशी .....तशीच आठवत होती.
ती तिची मूर्ती अजूनही त्याच्या मनात पक्की साठवलेली होती.

पाचही फोरविलर सडके वरचा धुरोळा उडवत गाड्यांची चाके गरगरत येत होती... आणि त्या सर्व गाड्या बाबाराव कुलकर्णी यांच्या बंगल्यासमोर येऊन थांबल्या.







गाड्यांचा ताफा थांबताच... बंगल्यामध्ये त्यांचा आवाज पोहोचला आणि इकडून वॉचमननेही फोन करून बंगल्यात कळवले की पाहुणे आलेले आहेत....






लगबगीने राम बाहेर आला... गेटवरून तो सन्मानाने सगळ्यांना आत घेऊन आला...
बंगल्यामध्ये सर्वत्र करत गडबड उडाली..






मायराही...... तिचीही धांदल उडाली होती ....
काय करावे ...?? काय नाही....?? सुचत नव्हते तिला.. तिची पाहुण्यांसमोर जायची अजिबात इच्छा नव्हती पण आता ती काहीही करू शकत नव्हती....तिला सर्वांसमोर नटून थटून जावेच लागणार होते....





बंगल्याच्या दरवाज्यात बाबाराव आले.. आणि त्यांनी सर्व मुलांकडे मंडळींचे स्वागत केले.... त्यांचा राम राम स्वीकारून नानाजी शेलार यांची छाती ताठ झाली.. छाती ताठ करूनच कडकपणे अगदी वाड्यात पाय टाकला त्यांनी.





नानाजी शेलार यांच्या पाठोपाठ सुंदर हा सुद्धा मिशांना पिळ भरत... आत मध्ये रुबाबात आला. बंगल्यात आल्यानंतर त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती.




मायरा कुठून कानाकोपऱ्यातून ...कुठून तरी दिसते काय?? तिला पाहता यावे यासाठी त्याची तडफड होत होती.
तर ...त्याच्या लक्षात आले की माजघरातील दारावर सोडलेल्या एका ठेवणीतल्या पडद्याआड नाजूक कुजबुज वाढली होती....




.......





पाहता पाहता दुपार टळून गेली. बाबाराव यांच्या घरी वातावरण आनंदाचे तरंगत होते.




आता संध्याकाळ  झाली आणि शेलारांकडील सर्व मंडळी कुलकर्णींच्या बंगल्यातून बाहेर पडली ती हसत हसतच.
सुंदर तर वाऱ्यावर तरंगत होता... त्याचे सर्वांग मोरपिसाप्रमाणे फुलत होते... त्याच्यातला मोर थुई थुई नाचू लागला होता.... त्याला तर काय करू आणि काय नाही असे झाले होते अगदी.....






त्याला फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटत होते की आज त्याला मायरासोबत एकांतात वेळ घालवता आला नाही
किंवा तिच्यासोबत दोन शब्द बोलताही आले नाही....
निदान त्यामुळे.... जवळून पाहता तरी आले असते हे 
त्याला एक टोचणी लागल्यासारखी वाटत राहिली.






शेलार आणि कुलकर्णी यांची सोयरीक जमली होती.





वधू कडचे आणि वरांकडचे सगळेच खुश दिसत होते.
आणि मायरा....??




तिचा आनंद... तिची खुशी - नाखुशी .....त्यावेळी कुणालाही तिला हा प्रश्न विचारावे वाटलाच नाही...





एका क्षणाला पाहणीचा कार्यक्रम होता त्यावेळी मायराने ...खालच्या नजरेनेच ओझरते पाहिले सुंदर कडे.





तेव्हा ती चक्रावल्यासारखे झाली.... विचारांचा डोंगर उठला... डोकं जड झाल्यागत वाटत होतं... 




मायरा विचार करून......
"या भरदार शरीराच्या पण विचित्र गड्याला यापूर्वी कुठेतरी पाहिले आहे.... कुठं... कुठं.... कुठेतरी.... 
नेमके कुठे पाहिले आहे आठवत का नाही मला..???"




त्याला नजरेसमोर पाहिले.... न पाहिले .....मायराला शंकर-पार्वती चे मंदिर आठवू लागले..... सारखेच डोळ्यासमोर येत होते मंदिर.. मंदिरातली शंकराची पिंड आठवत होती... 
बाहेरचा नंदी  आठवत डोळ्यासमोर सारखा येत होता.. 
ती जशी जशी जास्तीत जास्त आठवू लागली... तसेच तिच्या डोळ्यांमध्ये ....मंदिराच्या त्या उंच उंच पायऱ्या हळूहळू सरकू लागल्या आणि मग त्यापैकी एका पायरीवर तो दिसला....




प्रसाद मागताना....
"होय...तो....तोच.... आपल्या मित्रांच्या खांद्यावर हात टाकून उभा होता... आणि मी दिसताच माझ्या समोर येऊन मला प्रसाद  मागू लागला होता. याला प्रसाद दिल्यानंतर याने आपल्या मित्रांना इशाऱ्याने प्रसाद घ्यायला सांगितले होते..... त्याला प्रसाद देताना आपल्याला विचित्र काहीतरी वेगळे वाटू लागले होते. आणि आपण झरझर प्रसाद देऊन निघून गेलो."

.
.
.
.
.
.
......त्याचे नाव तिला सुंदर आहे हे आजच कळले.


ती पायरी...मायराला आठवली..
ती पायरी.... त्या एका पायरीवर क्षण मात्र दोघेही उभे होते आणि त्यांची तोंडे एकमेकांसमोर होते.... प्रसाद देते वेळी आणि घेते वेळी...
आणि आता तोच आज समोर आला होता...
तेव्हाही दोघांची तोंडे एकमेकांसमोरच होती आणि आताही पहाण्याच्या कार्यक्रमावेळी दोघांचेही चेहरे एकमेकांसमोर होते....

.....

मायरा सध्या मनातून घाबरलेली होती.


"आपल्याला आता याच्यासोबत मध्ये अंतरपाट ठेवून एकमेकांच्या गळ्यात हार  घालावे लागणार की काय..??? "
असं झालं तर .....!!!!
या जाणिवेनेच तिच्या मनातून एक वेगळ्याच भीतीची शिरशीरी अंगातून गेली...




बैठकीत बाबाराव यांनी नानाजी शेलारं यांच्यासोबत बोलता बोलता सहजपणे सोयरीक जोडून घेतली होती.



एकांतातही मायराला बोलायची एकही संधी दिली नव्हती
किंवा स्वतःही तिला तिचे मत विचारले नव्हते....
हे मायराला अजिबात पटले नाही बाबाराव यांचे... मायराला त्यांनी स्वतःची निवड थोपवून दिल्यासारखी केली होती...




सध्या तरी घरातील वडीलधाऱ्यांनी पसंत केलेला मुलगा ती नापसंत आहे ....असेही म्हणू शकत नव्हती आणि घरात तिने जे ऐकले आणि पाहिले त्यावरून तिने मनातल्या मनात विचार केला...
"याच्यात पसंत करण्यासारखं तरी काय आहे..?? मला तर याच्यात पसंत करण्यासारखा एकही पॉझिटिव्ह पॉईंट दिसत नाहीये... मनात माझ्या निगेटिव्ह वाइब्ज येत आहेत. 
हे ... हे....बाबा ....तुम्ही माझ्यासोबत चांगलं केलं नाही..
मला बोलण्याची संधी न देता.... माझ्याशी बोलून .....माझी पसंती-नापसंती ....न विचारता तुम्ही परस्पर बैठकीत लग्नाचे बंधन जोडून टाकलं..."

.....

.
.
.
.
.
.
.
‌.
.

दुसऱ्या दिवशी नानाजी शेलार यांच्या पोराला बाबाराव यांनी आपली मुलगी दिली ही वार्ता फुलपाखरासारखी सगळ्या गावांमध्ये इतस्ततः संचार करू लागली आणि गावकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या...



कवडू साठे पर्यंतही ही बातमी पोहोचली... त्याला थोडंसं हायसं वाटलं... पण आपल्या स्वतःच्या पोरासाठी त्याला वाईटही वाटत होतं... त्याला माहीत होतं मोहित खरंच तिच्यावर खूप खूप प्रेम करतो....




पण बाबाराव यांचा गावांमध्ये एवढा दबदबा होता की कोणतेही त्यांच्या विरोधात पाऊल उचलणे म्हणजे स्वतःच्या जीवाचा एक प्रकारे घात करणे आहे ... स्वतःच्या परिवाराचाही आपल्या हाताने घात करणे आहे.



कोणत्या दिवशी तो व्यक्ती किंवा घरचे एक एक व्यक्ती गायब होईल आणि मुडदाच त्याचा समोर येईल... पत्ता लागत नव्हता.
मग जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे हा विचार करून तो शांत आपले काम करू लागला...




कवडूला फक्त एकच चिंता होती की जर ही बातमी मोहित पर्यंत गेली तर तो कसा प्रतिक्रिया देईल....???
त्याने काही आपलं बरं वाईट करू नये... आपले शिक्षण पूर्ण करावं आणि आयुष्यात पुढे जावं एवढंच कवडू साठेला वाटत होतं.





गावामध्ये बातमी  पसरलेली होती आता ...
....संध्याकाळचे काम करून आल्यावर झाडाच्या 
पारावर बसायचे लोकं ....
तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया...
जसे कोणी म्हणाले.... "चांगलं झालं "
कोणी म्हणाले ..."बाबाराव यांनी चांगलं केलं नाही पोरीच्या गळ्यात धोंडा बांधला.."




या सर्व प्रतिक्रिया अशा वेगवेगळ्या असल्या तरी त्या बाबारावच्या बंगल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या....
त्यांच्या दबदब्यामुळे विरुद्ध बोलणाऱ्याला जपून बोलावे लागत होते....




"आपण बोलून काय उपयोग ...??"
अशा हिशोबाचे व्यक्ती सावधपणे बोलत होते .....



कोणी कसाही बोलला तरी गावात थोरामोठ्यांच्या बंगल्याच्या दारात एक लगीन धडाक्याने साजरे होणार आहे ....


आणि या समारंभात .....ते दोन...चार दिवस उभ्या गावाची चंगळ राहणार आहे या कल्पनेतले सुख मात्र प्रत्येकालाच हवेहवे असे होते .....

पण तिकडे मोहित.....
.
.
.
.
🌹🌹🌹🌹🌹
.
.

©️✍️ D.Vaishali