ना जुळले सुर कधीचे , ना शब्द जुळले !
ओठा वरती गाणे तुझे नाचत आले!!
सूर जुळले , शब्द ही जुळले !
काव्य मनी मी आज लिहिले!!
हळवे मन हे वेडे मन झाले!
तुझ्या प्रेमासाठी आसुसलेले!!
आम्ही दोघे छोट्या छोट्या गोष्टी मधे एकमेकां सोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणतात की डोळ्यांमध्ये लपलेले भाव शब्दांमधे यायला वेळ लागत नाही पण हा खूपच वेळ घेतो असं नाही का वाटत. कदाचित मलाच ते करावं लागेल असे वाटत होत.
असच बघत असताना केव्हा केव्हा गाणं गुणगुणत असत. केंव्हा समोर आला की
" शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणा रे, मोहना रे, ऐकना रे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती प्रीतीची हीच ना रीती? "
खरंच खूप गोड गीत आहे. मनाची व्यथा खूप छान मांडलेली आहे. आगदी कडाक उन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसा माझ्या जीवनात तो येत होता, खूप दिवसांची लागलेली तहान भागवण्यासाठी जणू तो आला होता. आगदी मन हरपून जात होत
खरंच प्रेम असं असत का ? मी ऐकलं होत " प्रेम म्हणजे
प्रेम असत, तुमचा आमचं सेम असत. प्रेम करावं भिल्ला सारखं , अस बराच काही पण त्या प्रेमाला वाचा कशी येईल हे मात्र कस विसरू कुणाला.
" माझ्या प्रीत पाखरा जाणुनी घे जरा
मनाच्या तळाशी दे मज आसरा!
लागली ओढ तुझ्या सावलीची
आहे आस तुझ्या शीतल मिठीची!!""""""
मनात खूप काही चालू होत. माझ्या मनात सुद्धा खूप प्रश्न पडत होते. कदाचित खूप घाई होते का, थोडा थोडा विचार करून मी आता थोडी वेडी झाली असं वाटायला लागले. कामावर पुर्ण वेळ आगदी मस्त जात होता. खर तर हे फक्त एक तर्फी आहे का ? असं मधेच का माझ्या मनात येत,
पण त्याला सुद्धा मी आवडत आहे ना?
मग तो तसा बोलत का नाही! आवडते तर सांग ना? मी असच माझ्याशी बोलून गेली. तो नेहमी माझ्या कडे बघून फक्त एक smail 😊 करून निघून जातो काम असेल तर बोलतो. मी अगदी विचारात पडते........ यारर.......
खर तर मी त्याचा प्रेमात एवढी वेडी का झाले, या मगच पण एक खूप मोठं कारण आहे. खरंच खूप खूप धन्यवाद त्या दिवसाला! मी तो दिवस केव्हाच विसरू नाही शकत. ही गोष्ट मला राहून राहून सांगावीशी वाटते.
मी नेहमी प्रमाणे आपल्या कामावर आली.
सकाळी साहेब येऊन काम सांगून गेले. साहेब म्हणजेच माहीत आहेत ना कोण. विसरून कसं जमेल. हा तर मी झालं काम करत होते. मी पहिल्यांदाच कोणत्या कंपनी मधे काम करत होती. तस पहिली तर पहिल्यांदाच कॉलेज नंतर घरा बाहेर पडले होते. त्यामुळे माझी बिनधास्त वागण्याची सवय मी सवयी प्रमाणे कामावर येत होती.
असच काम चालू होत. मी आगदी बिनधास्त काम करत होती.
अचानक त्यांनी येऊन मला म्हटलं '' मयारा काम करतांना ओढणी सारखी बांधून काम करायला पाहिजे ती कमरेला नाही बांधायची."
खरतर मला पहिल्यांदा खूप राग आला. पण जेव्हा मी आजुन बाजूला पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आल की खर आहे. मी ओढणी व्यवस्थित करून काम करत राहिले. मात्र मझ मन तो त्या शब्दा बरोबर सोबत घेऊन गेला. त्याचा नजरेत मला काळजी दिसत होती. वेगळाच आहे तो, खरं तर होत बोलू शकला नसता. पण त्यांना ते नाही आवडलं. पण मला मात्र ते खूप आवडले.
,.......यारर ........ तस मला कोणी अस बोलेल अस वाटल नव्हत. मला केव्हाच ओढणी घ्याची सवय नव्हती. सोबत असाची पण ती घेत नव्हती.
मी घरी गेल्यावर आगदी तोच विचार करत राहिले. कसा आहे ना. " " """" मयारा ओढणी व्यवस्थित घे? मी पुन्हा पुन्हा तेच बडबडत होती.
केंव्हा हसू यायचं तरी केव्हा लाज ! कसं आहे ना काय बोलावं तेच समजत नाही. कोणाशी बोलावं का? " नको नको..... झोप येत नाही मग काय करणार. रात्री कशी काढली तेच समजत नाही. झोप नाहीतर उद्या सुट्टी घ्यावी लागणार. आणि दर्शन नाही होणार महाराजांचं. हा ना महाराज आमचे.... 🥰☺️☺️☺️☺️ आगदी गोड हसू आलं ओठांवर. झोप मयारा झोप आता. आस बोलून झोपून गेले.
""""" शब्दांतूनी घेतला हा भेद भावनांचा!
होऊनी धुंद वारा फिरतो मनाचा!!""""""""
आगदी दिवाशेन दिवस मला तो वेगळा जाणवत होता. पण मी त्याला आवडते का हा प्रश्न मला आजूनही आहे.
""नजरसे नजर तो मिळती है!
देखते है दिल से दिल कभी मिळता है!! ""
🥰🥰🥰🥰🥰