mukta vhayachay mala bhag 8 in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग ८

Featured Books
Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग ८

मुक्त व्हायचंय मला भाग ८वामागील भागावरून पुढे…मालती घरात हिंडू फिरू लागते. मावशी आणि मालती यांच्यात जमलेली गट्टी रघूवीरच्या लक्षात येऊ नये म्हणून रघूवीर घरी आल्यावर दोघी एकमेकींशी बोलत नाहीत. मावशींना मालती जवळ राहावंसं वाटत असतं पण मालती आता घरात हिंडू फिरू लागली म्हणजे आता ती ऑफीसमध्ये जाईल म्हणजे आपला इथला मुक्काम संपला हे मावशींच्या लक्षात येत़.तसं त्या उदास राहू लागतात.मालतीच्या हे लक्षात येतं तसं ती विचारते"मावशी काय झालं? बरं वाटत नाही का?" "बरं आहे." मावशी"मग एवढ्या उदास का असता?""काही नाही " मावशीअसं म्हणून मावशी घाईने स्वयंपाकघरात जातात.त्यांना आपल्या डोळ्यात येणारे पाणी मिरचीला दिसू नये असं वाटतं.मालतीच्या मनात शंका असतेच म्हणून तीही मावशींच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात जाते."खरं सांगा काय झालं? " मालतीमावशी फ्रीजमधून भाजी काढण्याच्या निमित्ताने खाली वाटतात आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात.हे मालती बघते.मावशी भाजी काढून फ्रीज बंद करून उभ्या राहतात.मालती त्यांचा दंड पकडून आपल्याकडे त्यांचं तोंड वळवते आणि विचारते"मावशी तुमच्या डोळ्यात पाणी?" असं म्हणून आपल्या हाताने हळूच त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसते."कशाला मला एवढा जीव लावलात. आता तुम्ही ऑफिसमध्ये जायला लागलात की  मला रघूवीर गावी सोडून देईल." मावशी"असं नाही होणार. तुम्ही काळजी करु नका." मालती"आज नाही पण काही दिवसांनी तर मला जावंच लागेल."मावशी"मी बघते काहीतरी करते.तुमच्या सहवासात मलापण खूप शांत आणि आनंद मिळतो." मालती"गावी गेले की तुमच्या आठवणींचे मोती माझ्या मनात रोज जगण्याची नवी उमेद दाखवतील." मावशी"मावशी किती सुंदर बोलता तुम्ही. इतकं छान बोलायला माणसाला तेव्हाच येतं जेव्हा त्याच्या मनावर खूप छान वैचारिक संस्कार झालेले असतात. मावशी इतके दिवस बोलला नाहीत आज सांगा तुम्ही शाळेत गेला होता? " मालती"छे ग मला कोण शाळेत पाठवणार. माझी सावत्र भावंड शिकायला जायची.मलापण वाटायचं.पण शाळेत जायला नाही मिळालं.शाळेत गेले असते तर घरचं काम कोणी केलं असतं.माझ्या  लहान बहीणीचा माझ्यावर खूप जीव होता. ती मला शिकवायची." मावशी"त्या दोघांचा अभ्यास होईपर्यंत मी घरातील सगळी कामं आटोपायचे. मग ती मला शिकावायची. हळूहळू मला सगळं लिहीता वाचता यायला लागलं." मावशी"तुमची आई रागवायची नाही?" मालती"माझी लहान बहीण आईची खूप लाडकी होती. एकदा मला आई अभ्यासावरून रागावली तर पठ्ठी जे रागावून बसली की जेवायचं नाव घेईना. मग काय आईचं मन विरघळलं. तिने  अभ्यास करायला परवानगी दिली पण घरातली सगळी कामं आटोपली तरच." मावशी"वा! तुमची बहीण हुशार होती.छान युक्ती केली तिने."मालती"हो.ती अभ्यासातही हुशार होती. तिच्यामुळे मला खूप छान पुस्तकं वाचायला मिळाली." मावशी"इतकं छान बोलता तुम्ही लिहायचा प्रयत्न केला कधी?" मालती"छोटं छोटं काहीतरी लिहायचे. नंतर तेही बंद झालं कारण माझं लग्न झालं. मग सगळंच संपलं" उदास स्वरात मावशी म्हणाल्या."रघूवीरच्या बाबांना आवडायचं नाही का?" मालती"नाही. माझं लग्न झाल्यावर माझं आयुष्य बदललं. हे ऑफीसमध्ये गेल्यावर सगळं काम आटोपून घरी येणारा पेपर रोज वाचत होते त्यामुळे जगातील सगळ्या बातम्या कळायच्या.पेपरमध्ये येणारे छान लेख वाचून मला आनंद मिळायचा. दुसरा आनंद तुमच्या सहवासात मिळतो तो आता संपणार." मावशीमावशी पदराने डोळे पुसू लागतात. मालती त्यांना मिठी मारते. बराच वेळाने मावशी म्हणतात"रघूवीर येईल चहा करायचा आहे." असं म्हणत चहा करायला लागतात."मावशी तुम्ही काळजी करू नका." मालतीमावशी हो म्हणत हलकसं हसतात.***संध्याकाळी रघूवीर घरी आल्यावर चहा घेतल्यावर मालतीला  विचारतो"ऑफीसमध्ये कधीपासून जाते आहे?""पुढच्या आठवड्यापासून जाईन." मालती"ठीक आहे या शनिवारी मावशीला गावी पोचवून देतो." रघूवीररघूवीरचे हे शब्द कानी पडताच मावशींच्या हातातून गंज खाली पडतो.त्याचा आवाज ऐकून रघूवीर ओरडून विचारतो"काय झालं घरात भूकंप व्हायला?"मावशी काहीच उत्तर देत नाही. मालती समजून जाते गंज खाली पडण्यामागचं कारण."अहो मी जरी पुढल्या आठवड्यात ऑफीसमध्ये जायला लागले तरी लगेच मावशींना गावी नेऊन सोडू नका.""का?" रघूवीर"काही दिवस ऑफीस आणि घरातील कामं मला नाही जमणार कारण अजून थकवा आहे." मालती"जसं जमेल तसं कर " रघूवीर कोरड्या आवाजात म्हणाला."मी करीन पण तुम्हाला सगळं वेळेवर मिळालं नाही तर तुम्हीच खूप चिडाल." मालतीमालती हिम्मत करून बोलते."शिवाय रात्रीची तुमची गरज भागणार नाही कारण तेवढी ताकद माझ्यात नाही." मालतीमालतीचं आधीचं वाक्यं रघूवीरने शांतपणे ऐकून घेतल्यामुळे मालती धाडस करून हे बोलली. रघूवीर विचारात पडला. शेवटी म्हणाला"तू सांग कधी मावशीला गावी सोडायचं तसं सोडीन."रघूवीरचं हे वाक्य कानी पडताच मावशी आणि मालती दोघींना हायसं वाटलं.***त्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाक करताना मावशीं खूप आनंदात होत्या.त्यामुळे स्वयंपाक खूप छान झाला होता. हे मालतीने हळूच मावशींच्या कानात सांगीतलं.मावशी हसल्या.रात्री दोघी रघूवीरसमोर वेगवेगळ्या जेवायला बसायच्या.सकाळी मात्र दोघींची छान अंगतपंगत असायची कारण रघूवीर ऑफीसमध्ये गेलेला असायचा.त्या रात्री जेवण झाल्यावर मालतीने मावशींना हाक मारली मावशी आल्या"मला हाक मारली?" मावशी"हो. मावशी माझ्या पायाला आणि कंबरेला तेल चोळून देता?" मालती"हो.देते." मावशीदोघी मालतीच्या खोलीत जातात. मालती खोलीचं दार लावते.रघूवीरला त्यात काही वेगळं वाटत नाही. खोलीचं दार लावल्यावर मालती मावशींना मिठी मारते. दोघीही खूप आनंदात असतात कारण मावशींचा मुक्काम आणखी काही दिवस वाढवून घेण्यात मातीला यश मिळालं असतं.कितीतरी वेळ त्या एकमेकींच्या मिठीत असतात. थोड्यावेळाने मावशी म्हणतात दाखवण्या पुरतं तरी तेल चोळून देते.मालती हसत हो म्हणते."मावशी ऊद्या हे ऑफीसमध्ये गेले की आपण दोघी हा आनंद साजरा करू." मालती"हो नक्की.पण काय करायचं?" मावशी"आपल्या दोघींच्या आवडीचा स्वयंपाक करू. तुम्ही शीरा करा तोंड गोड करायला." मालती"हो केळी आहेत दोन. ती घालून सत्यनारायणाला करतो तसा शीरा करीन." मावशी"मला खूप आवडतो तो शीरा." मालतीआनंदाच्या थुई थुई कारंज्याखाली या दोन चिमण्या मस्त भिजत होत्या,हसत होत्या. या एका क्षणाने त्या दोघींमध्ये आणखी घट्ट बंद निर्माण झाले. त्याचं समाधान दोघींच्या चेह-यावर दिसत होतं.

_____________________________


क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य.