mukta vhayachay mala - 7 in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग ७

Featured Books
  • दिल से दिल तक- 1

    दिल से दिल तक: शादीशुदा आभा के प्यार का क्या था अंजाम (Part-...

  • बैरी पिया.... - 41

    अब तक : संयम उसकी ओर घुमा और उसे गले लगाते हुए बोला " मेरा इ...

  • अग्निपरीक्षा!

    अग्निपरीक्षा !             कुछ ही दिन पहले वह मुझे नर्सिंग ह...

  • My Devil Hubby Rebirth Love - 42

    रूही वाशरूम में अइने के सामने खड़ी अपने गले के निशान को देख...

  • द्वारावती - 62

    62चार वर्ष का समय व्यतीत हो गया। प्रत्येक दिवस गुल ने इन चार...

Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग ७

मुक्त व्हायचंय मला भाग ७वामागील भागावरून पुढे…मालती घरी येते. ती खूप अशक्त झालेली असते. मालतीला घरात शिरताच एक वृद्ध बाई दिसतात. तिला प्रन पडतो या कोण?रघूवीर सांगतो." मालती या आमच्या गावच्या मावशी आहेत. तुझी तब्येत ठीक होईपर्यंत त्या इथेच राहतील." रतिच्या मदतीला म्हणून रघूवीर त्याच्या गावच्या  मावशींना आणतो आणि त्यांची ओळख करून देतो.मावशी मालतीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकतात आणि हलकसं हसतात. मालतीपणमावशींकडे पाहून हसते.मालतीचे चालताना पाय लटपटतात तर नवरा म्हणून काळजीपोटी रघूवीर मालतीला धरत नाही. शेवटी मावशी मालतीला पकडून हळूहळू चालवत आत नेतात.यावेळी मालती आणि मावशी दोघींच्याही मनात येतं ' हा माणूस कोणत्या मातीचा बनला आहे. कुणास ठाउक!' हळूहळू मावशी मालतीला आतल्या खोलीत घेऊन जाते आणि तिला पलंगावर बसवते." पाणी हवं का?" मावशी मालतीला विचारतात." हो.थोडसं." मालती म्हणते.मावशी मालतीसाठी  पाणी आणते.पाणी पिऊन झाल्यावर मावशी मालतीला हळूच पलंगावर झोपवतात. मालती एवढ्यानेच दमते."दमला असाल. झोपा आता." मावशी मालतीच्या पायावर पांघरुण टाकत बोलल्या. न राहवून मावशींनी हळूच मालतीच्या डोक्यावरून हात फिरवला. आश्चर्याने मालतीने मावशीकडे बघीतलं तसं त्या नजर चुकवून घाईघाईने खोलीबाहेर गेल्या.***सुरवातीला मावशी मालतीशी बेतासबात बोलत असतात  मग त्यांना मालतीचा स्वभाव कळतो मग दोघींमध्ये मैत्री होते." मावशी तुम्ही आलात म्हणून मला खूप आधार झाला." मालती म्हणाली." हो. मलापण खूप छान वाटलं रघूवीरची बायको इतकी छान आहे बघून." मावशी" काय म्हणालात?" मालतीने चमकून विचारलं.मालतीने असं विचारल्यावर मावशी एकदम गप झाल्या." मावशी तुम्ही नक्की कोण आहात?" मालती मावशींच्या जवळ येऊन विचारते.बराच वेळ मावशी काहीच बोलत नाही.मग हळूच म्हणतात." चुकून तोंडातून निघालं पण साहेबांना काही सांगू नका." मावशी एकदम घाबरून बोलल्या." कोण साहेब?" मालतीने विचारलं" तुमचे मिस्टर." मावशींनी उत्तर दिलं." माझे मिस्टर रघूवीर तुमचा कोण आहे?" मालती विचारते.मावशी काही बोलल्या नाहीत.मावशी बोला. काय खरं आहे?" रघूवीर माझा मुलगा आहे.". मावशी"मग इतके दिवस तुम्ही कुठे होतात?" मालती"मी आमच्या गावात होते." मावशी"कुठे आहे हे गाव?" मालती"नागपूर जवळ छोटंसं गाव आहे." मावशी"आमच्या लग्नाला तुम्ही का आला नाहीत?" मारुतीने विचारलं"मला यायचं नाही म्हणून रघूवीर ने सांगीतलं होतं." मावशी म्हणाल्या."का ?" मालतीने आश्चर्याने विचारलं."त्याला लाज वाटते मला आई म्हणायला." मावशींनी उत्तर दिलं."रघूवीरला तुम्हाला आई म्हणायला लाज वाटते?" मारुतीने आश्चर्याने मावशींना विचारलं."हो." मावशी दु:खी स्वरात म्हणाल्या."पण का?" मालतीने पुन्हा तोच प्रश्न मावशींना विचारला."त्याच्या वडलांनाही लाज वाटायची माझी. ते मला कुठेच घेऊन जायचे नाहीत. मला कळत नाही माझी  काय चूक आहे? आपल्या वडिलांचं वागणं बघून रघूवीरपण तसाच वागायला लागला." मावशी बोलल्या.मालतीने मावशींना हात धरून पलंगावर बसवले."मावशी तुम्ही खूप चांगल्या आहात. मला तुमच्या बद्दल खूप वाटतं. मग रघूवीर आणि त्याच्या वडिलांना का लाज वाटायची?" मालतीने विचारलं."तेच आजपर्यंत मला कळलेलं नाही.पण एक सांगू?" मावशींनी विचारलं." सांगा नं." मालती"मला तुमच्या घरी नेहमीसाठी राह्यला आवडेल." मावशींनी आपल्या मनातील इच्छा मालतीला बोलून दाखवली."मलापण तुम्ही राह्यलात तर खूप आनंद होईल." मालती म्हणाली."तुम्ही ऑफिसला जायला लागल्या की मग रघूवीर मला गावी सोडून देईल." मावशींच्या स्वर दु:खाने भिजला होता."तुम्ही मला अहो जाहो का करताय.मला मालती म्हणा.सून आहे मी तुमची." मालती मावशींना म्हणाली."तेच बरं आहे. रघूवीर समोर चुकून तुम्हाला नावाने हाक मारलं तर पंचाईत येईल.आता नाही का चुकून तुमच्यासमोर रघूवीर म्हणाले." मावशी उत्तरेला.रघूवीर चिडला की काय करू शकतो याची कल्पना मालतीला आली होती. आपल्या हट्टापायी या माऊलीला रघूवीरची बोलणी आणि मार नको मिळायला."काय झालं तुम्ही गप्प का?" मावशींनी मालतीला विचारलं."मावशी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.तुम्ही मला तुम्हीच म्हणा. रघूवीरचा राग मला माहिती आहे." मालती.तेवढ्यात फोन वाजतो.मावशी फोन घेतात."मालतीच्या माहेरुन फोन आला होता का?"रघूवीरने अगदी कोरड्या स्वरात विचारलं."नाही." मावशी म्हणाल्या."खरं सांगा?" रघूवीरने  पुन्हा आवाज चढवून विचारलं."खरच सांगतेय." मावशी घाबरत म्हणाल्या."तिच्या माहेरच्या लोकांचा फोन आला तरी मालतीला द्यायचा नाही. माझा राग तुम्हाला माहिती आहे." रघूवीर धमकीच्या स्वरात म्हणाला."नाही देणार." मावशी म्हणाल्या."ठेवा फोन." रघूवीरफोन ठेऊन मावशी वळल्या.रघूवीरचा फोन होता. मावशी म्हणाल्या."तुम्ही न सांगता मला कळलं." मालती म्हणाली."रघूवीर घरी नसताना तुम्हाला मी आई म्हणू??" मालतीने अचानक मावशींना विचारलं."म्हणा की.मला खूप आनंद होईल." मावशी आनंदाने म्हणाल्या.आई अशी हाक मारत मालतीने लगेच मावशींना मिठी मारली. दोघींमधलं अंतर मिटवणारा तो सोहळा होता. मावशी आपणहून मालतीला मला 'आई' म्हण असं म्हणू शकत नव्हत्या पण मालतीने त्या माऊलीची प्रेमाची भूक ओळखली. नव-याने, मुलाने मावशींना झिडकारलं. पुन्हा तोच अनुभव घ्यायला मावशी कचरत होत्या. मालतीने त्यांचं मन ओळखून त्यांची इच्छा पूर्ण केली.मावशींचे  डोळे अविरत अश्रू पाझरत होते तर मालतीचे  डोळे समाधानाचे  अश्रू मिरवत होते.केवढा विलक्षण संगम होता हा.***रघूवीर संध्याकाळी घरी आल्यावर संशयास्पद नजरेने मावशीकडे आणि मालती कडे बघत होता. रघूवीरची घरी यायची वेळ झाली तशी मावशी स्वयंपाकघरात गेल्या.मालती डोळे मिटून अंथरुणावर पडून होती.मनातला आनंद चेह-यावर दिसू नये म्हणून मावशी आटोकाट प्रयत्न करत होत्या.मालतीला कसं वाटतंय वगैरे विचारण्याचा संवेदनशील मन रघूवीरकडे नव्हतंच. ऑफीस मधून येऊन वेळ झाला तरी चहा आला नाही म्हणून संशयाने त्याने मावशींना विचारलं" काय कामाचा कंटाळा आला आहे का तुम्हाला?" रूक्ष आवाजात रघूवीरने मावशींना विचारलं." नाही." म्हणत थरथरत्या हाताने मावशींनी रघूवीरला चहा दिला."एवढा वेळ का लागला चहा करायला?" रघूवीरने विचारलं पण मावशी काहीच बोलल्या नाही. घाबरून चूप बसल्या." काय विचारलं मी? ऐकायला येत नाही का?" रघूवीरने आवाज चढवला तश्या त्या अजून घाबरल्या. आतून  मालतीने ओरडून सांगीतलं" अहो माझे पाय दुखत होते म्हणून मावशी माझे पाय चेपत होत्या म्हणून त्यांना चहा करायला उशीर झाला." हे ऐकून मावशींनी मालतीचे मनातल्या मनात आभार मानले." हे सांगायला तुमचं तोंड शिकवलं होतं का?" रघूवीरने विचारलं.मावशी काहीच बोलल्या नाही." जा स्वयंपाक करा." रघूवीर ओरडून बोलला." हो." म्हणत घाबरत मावशी स्वयंपाकघरात गेल्या.स्वतःच्या जन्मदात्री वर रघूवीर इतक्या कठोरपणे कसा ओरडू शकतोस याचं उत्तर मालतीला मिळालं नाही.***दिवसेंदिवस मावशी आणि मालती यांच्यात घट्ट भावबंध निर्माण होत चालले असतात. रघूवीर विषयीची तिडीक मालतीच्या मनात वाढत चाललेली असते.मालती एका सुसंस्कृत घरात वाढलेली मुलगी असते. त्यामुळे आईचा अपमान करणं, तिच्या अंगावर ओरडणं हे मालतीच्या मनाला पटतच नव्हतं. रघूवीर असा माणूस आहे की त्याच्यापुढे डोकं आपटूनही उपयोग होणार नाही हे मालतीला चांगलं माहिती असल्याने ती गप्प असते.मावशींवर जेंव्हा जेंव्हा रघूवीर आवाज चढवायचा तेव्हा तेव्हा मालतीच्या मनात वेदनेची कळ उठायची आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यात पाणी यायच पण तरीही ती गप्प असायची.मावशींना त्रास होऊ नये म्हणून मालती नाईलाजाने गप्प असायची.

______________________________

क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य