Marathi language classic? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | मराठी भाषा अभिजातच?

Featured Books
  • My Wife is Student ? - 10

    स्वाति को हैरान होते हुए देख .. अदित्य पूरी तरह सुकून फील कर...

  • बैरी पिया.... - 40

    शिविका हाथों को सिर पर रखे और आंखें बंद किए जोरों से चीख दी...

  • हॉस्टल लव

    अध्याय 1: पहली मुलाकात हॉस्टल का पहला दिन हमेशा खास होता है।...

  • My Devil Hubby Rebirth Love - 41

    अब आगे रूद्र मेरी दूसरी शर्त यह है कि तुम मुझे 5 मिनट किस कर...

  • सच्चा प्यार

    सच्चा प्यार"रमेश, मुझे लगता नहीं है कि मेरे परिवार वाले हमार...

Categories
Share

मराठी भाषा अभिजातच?

मराठी भाषा ही अभिजातच?         *आज आपल्याला हिंदी, इंग्रजी, जपानी, चीनी अशा वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात असलेल्या दिसत आहेत. इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे. कारण तिचा प्रसार व प्रचार झाला आहे. ते लोकं ज्या ज्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांनी आपआपलं भाषेचं एक पिल्लू सोडलं. तीच इंग्रजी भाषा होय. तसं पाहिल्यास मराठी भाषा इतर भाषेसारखी लोप होवू नये. म्हणूनच तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय हे सत्य नाकारता येत नाही. कारण काल अस्तित्वात असलेल्या बऱ्याच भाषा आज बोलल्या जात नाहीत व त्या लोप पावलेल्या आहेत.*           मराठी भाषा. ३ ऑक्टोबर २०२४, या वर्ष्याच्या नवरात्राचा पहिलाच दिवस. या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या नव्हे तर संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी महत्वाचा दिवस. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला.            मराठी भाषा....... त्या भाषेला समृद्ध असा इतिहास आहे. म्हणतात की ही भाषा आद्यकवी मुकूंदराज यांच्या काळापासून अस्तित्वात आली. परंतु हे जरी खरं असलं तरी या भाषेचा इतिहास हा त्याहीपुर्वी कितीतरी वर्षापासून अस्तित्वात होती हेही नाकारता येत नाही. त्यासाठी या भाषेच्या मूळ अंतरंगात शिरणे आवश्यक आहे.           मराठी भाषेची उत्पत्ती वर्णित करतांना एक नक्कीच सांगावेसे वाटेल की ज्यावेळेस माणूस झाडावर राहात होता. त्यावेळेस त्याची भाषा ही खुणेची होती. परंतु ज्यावेळेस तो झाडावरुन खाली जमीनीवर आला. तेव्हा त्यानं संपर्कासाठी खुणा व हावभाव सोडून भाषा वापरली. ती भाषा कोणती होती हे नक्की सांगता येत नाही. परंतु तो ज्या ज्या प्रदेशात रमला. त्याठिकाणची वेगळी अशी भाषा बनली. तीच भाषा पुढे चालू लागली होती. जी वेगळी बोलीभाषा नव्हती तर त्या भाषेत बऱ्याच भाषेचे शब्द मिश्रीत स्वरुपात होते. जसे प्राकृत, संस्कृत, तमिळ वा इतर भाषेत आजही इतर भाषेचे शब्द सापडतात. याचाच अर्थ सर्व भाषा ह्या मिश्रीत स्वरुपात होत्या.           मराठी भाषेचा उगम सांगतांना म्हणतात की इस पुर्व १११० मध्ये आद्यकवी मुकूंदराजने विवेकसिंधू हा आद्य ग्रंथ लिहिला. तेव्हा ती भाषा अस्तित्वात आली. त्यांनाच मराठी भाषेचा जनक म्हटलं जातं. परंतु त्याहीपुर्वी श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मुर्तीखाली शके इस ९०५ मध्ये चामुण्डराय करविले ही मराठीत लिहिलेली ओळ पाहून वाटते की मुकूंदराज स्वामींच्या काळापुर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होती. तसंच त्याहीपुर्वी सन इस ५०० ते सातशे मध्ये सप्तशती नावाचा ग्रंथ हा मराठीतूनच अस्तित्वात आला. ज्यात सातशे कवितांचा समावेश आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील राज्यकर्त्यांचं वर्णन दिसते  त्याहीपुर्वी इस पुर्व २३० ते इस २३० या काळात इथे राज्य करणाऱ्या सातवाहन राजांच्या काळात मराठी भाषा बोलली जात होती असंही म्हटलं जातं. अन् त्याहीपुर्वी इस पुर्वच्या सनात म्हणजेच सन २०७ मध्ये ब्राम्हीलिपीतील काही शिलालेख हे मराठी भाषेतच आढळतात. हेही तेवढंच खरं आहे. अन् त्याहीपुर्वी संस्कृत असो की प्राकृत असो, अपभ्रंश असो की पैशाची असो, महाराष्ट्री असो की पाली असो, अर्धमागधी असो की मागधी असो, या सर्व भाषेत मराठीचे शब्द सापडतात. जे शब्द मराठीच्या अस्तित्वाचे पुरावे देतात. जसे, पाली. या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात. बऱ्याच शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात. जसे पालीतील तृण, प्रावृष, पीडन, गूड मराठीत तिण, पाऊस, पिळणे, गूळपाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुसऱ्या भाषेत नाही. 'ळ' हा वैदिक भाषेत आहे, तेथूनच तो दक्षिण भारतीय भाषांत गेला. मराठी आणि गुजराती याही भाषांत ळ आहे.            भारतात आत्ताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. तामिळ २००४ संस्कृत २००५, कन्नड २००८, तेलुगु २००८, मल्याळम २०१३ व ओडिया २०१४ आणि आता मराठी या सातव्या भाषेला अभिजात दर्जा मिळालाय.          भाषेला अभिजात दर्जा मिळतो. जर त्या भाषेला ऐतिहासिक परंपरा असेल तर. तसं पाहिल्यास या भाषेला ऐतिहासिक दर्जा आहे. ते यात निर्माण झालेल्या झालेल्या ऐतिहासिक ग्रथांवरुन. सन ५०० ते ७०० व्या शतकातील निर्माण झालेला सप्तशती, सन १११० चा विवेकसिंधू, सन १२७८ चा म्हाईभटांचा लिळाचरीत्र, या साहित्यावरुन मराठी भाषेचा समृद्ध असा दर्जा दिसतो.           तो प्राचीन काळ व त्या काळात मराठी भाषेचे स्वरुप त्यावेळेस थोडे वेगळे होते व मराठी भाषा स्वतंत्र नव्हती. तो प्राचीन काळ व त्या काळात प्रामुख्याने संस्कृत, प्राकृत, अर्धमागधी, मागधी, पाली, पैशाची, महाराष्ट्री, अपभ्रंश अशा भाषा अस्तित्वात होत्या. मराठी नव्हती. म्हणूनच मराठीचा उगम इतिहासकारांनी तद्नंतर दाखवला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आधी मराठी भाषा बोलली जात नव्हती.           काही लोकं म्हणतात की मराठी भाषा ही वरील सर्व भाषांमधून आली. परंतु ते जरी खरं असलं तरी इतरही बऱ्याच भाषा त्याच भाषेतून आल्या आहेत हे नाकारुन चालणार नाही. मराठीबद्दल सांगतांना हेच सांगावेसे वाटेल की ही मराठी भाषा ही आधीपासूनच अस्तित्वात आली. ज्यावेळेस माकडरुपातील मानव झाडावरुन खाली आला व त्याच्या तोंडून भाषेचा उगम झाला. मग ती मिश्रीत का असेना, तिचं अस्तित्व होतंच.          विशेष म्हणजे मराठी भाषा आजची नसून ही मराठी भाषा कितीतरी शतकाच्या पुर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यातच सर्व भाषा संपल्या असल्या वा संपल्यात गोळा असल्या तरी मराठी भाषा ही आपलं अस्तित्व टिकवून आहे. तिचा लोप होवू देवू नये किंवा त्या भाषेला कोणीही दुय्यम समजू नये. व्यतिरिक्त प्रयत्न करावा लागेल तिच्यात जास्तीत जास्त ग्रंथसंपदा निर्माण करावी की जेणेकरून तिचं अस्तित्व अनादीकालपर्यंत टिकून राहिल नव्हे तर तिच्या चिरकाल टिकणाऱ्या अस्तिवाचे आपणही भागीदार बनावे हे तेवढंच खरं.            

                      अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०