Swatantra - 2 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | स्वातंत्र्य - भाग 2

Featured Books
Categories
Share

स्वातंत्र्य - भाग 2

स्वातंत्र्य भाग दोन 

           तो स्वातंत्र्याचा इचार. तो इचार करता करता त्याईचं बालपण कवा संपलं व ते कवा मोठे झाले. ते त्याईले कळलंच नाई. मंग सुरु झाला खरा संघर्ष. स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी परिस्थिती अशी होती का त्या प्रत्येकाईले वाटत होतं, आपण खरंच स्वतंत्र्य झालोत काय? त्याच एका ईचारानं त्या सर्व मित्राईनं पुन्हा एक स्वातंत्र्याची लढाई लढली होती. जी लढणं अति आवश्यक बाब बनली होती. 
            तो सामाजिक परीवर्तन करण्याचा तो काळ. त्या काळात त्याईच्यासमोर बऱ्याच अडचणी आल्या. परंतु त्या अडचणींचा बाऊ न करता ते मित्र सामाजिक परीवर्तन करण्यासाठी लढत रायले अविरतपणे. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं होतं. जातीभेद उच्चाटन झालं होतं. अन् समूळ नष्ट झाली होती जात. आज ते पाहाले मात्र ते जीवंत नोयते.
           ते चार मित्र. त्या मित्राईले भेदभाव स्पष्ट जाणवत होता. तसं त्याईले वाटत होतं का पुर्वी भेदभाव नसन. त्याबाबत ते कधी कधी ईचार करत बसायचे. त्यातच त्याईले वाटायचं का भेदभाव दूर जर करायचा असन तं आपल्याले जातीप्रथाच बंद करा लागते. जातीप्रथा जर बंद करायची असन तं आपल्याले शिका लागते. परंतु आतं शिकन कोण? 
          राम्या अन् सोम्याले जसं वाटत होतं शिक्सनाचं महत्व. तसं महत्व संप्या अन् शिवऱ्यालेबी वाटत होतं. परंतु राम्या अन् सोम्या शिकले नोयते. सिर्फ संप्या शिकत होता. अन् शिकत होता शिवऱ्याबी. त्याले जसं वाटत होतं शिक्सनाचं महत्व. तसंच जातीप्रथेचं उच्चाटन झाल्याशिवाय हा भेदभाव दूर होणार नाई असंबी शिवऱ्यालेबी वाटत होतं. तसं त्याले वाटत होतं का हा भेदभाव दूर करता येईन. जातीप्रथेचंबी उच्चाटन करता येईन. परंतु त्यासाठी ते जात कशी निर्माण झाली याचा इतिहास माईत करा लागन. तसा जातीप्रथेचा इतिहास माईत करण्यासाठी एक दिवस तो ईचार करतच बसला होता. कारण त्याले त्याच्या जळापर्यंत पोहचायचं होतं. त्याशिवाय जातीप्रथेचं समुळ रुपात उच्चाटन होणार नोयतं. तो ईचारच करत होता. तोच तसे त्याले ईचार आले.
           संगीत हे करमणुकीचं साधन हाये. संगीत जर जीवनात नसन तं घोळ निर्माण होवू शकते. संगीत नसन तं संपुर्ण आयुष्य कंटाळवाणं जात असते. आयुष्यात निरसता अन् मलिनता येत असते. त्यामुळंच जीवनात संगीत महत्वपुर्ण बाब हाये.
          पुर्वी जवा माणसं माकडरुपात होती. तवाही संगीत उपलब्धच होतं. ते माकड प्राणी ईशिष्ट असा आवाज करुन आनंद मिळवत असत. त्याचं कारण होतं. त्याईले वाटणारी भीती. ज्यावेळेस त्याईले भीती वाटायची. त्यावेळेस ते ईशिष्ट असा आवाज काढत असत. त्याले ध्वनी अर्थात स्वर म्हणून नाव मिळालं. ते त्या प्राण्याईसाठी एक प्रकारचं संगीतच होतं. पुळं त्यात तालबद्धता आली. वादन आलं अन् गायनबी आलं. त्याच गोष्टीचा ईकास होवून त्यात पुढीलकाळात नृत्याचाबी समावेश झाला. याचाच अर्थ असा का नादयुक्त गायन, वादन अन् नृत्य याईच्या तिहेरी संगमाले संगीत असं म्हणलं गेलं. 
         संगीत आयकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाले चांगले मानसिक स्वास्थ प्रदान करते. संगीत या शब्दाचा अर्थ ईग्रह करुन सांगतल्यास सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत अन् त म्हणजे ताल होय. तसंच संगीत कला हे सर्व कलामध्ये मोठी कला हाये. 
         संगीतचे फायदेबी भरपूर हायेत. अलिकडे प्रयोगांती सिद्ध झाले हाये का झाडाले जर चांगलं संगीत आयकवलं गेलं तं पिकाईचीबी जोमानं वाढ होते. निव्वळ वाढच होत नसून पिकबी जोरदार येत असतेत. याचाच अर्थ असा का संगीतानं आपलेच नाई तं झाडाचेबी आरोग्य चांगले रायते. 
         संगीतमधून आपण आपल्या भावना व्यक्त करु शकतो. जवा संगीतातले शब्द आपल्याले समजतेत, तवा आपण आनंदीत होतो. जर ते संगीत आनंदीपणाचं वाजत असन तं. अन् जवा आपण दुखात असतो, तवा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजते. जवा ते संगीत दुःखाचं असन तं. यावरुन संगीताचे कितीबी अर्थ असले तरी दोन सर्वसाधारण अर्थ काढता येतेत. ते म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सादर होणारे संगीत व आनंदाच्या समयी सादर होणारे संगीत. 
        संगीत हे ईश्वरानं देलेली एक देणगीच हाये. आपल्या मनातल्या भावना ह्या कदाचीत संगीतानंच व्यक्त होऊ शकतेत. संगीतानं आयुष्याले प्रेरणा मिळत असते. एकांतात सोताचं करमणूक करण्याचं महत्वपुर्ण साधन म्हणजे संगीत होय. संगीत हे माणसाईची ओळख निर्माण करुन देते. म्हणजेच माणसाईची ओळख निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.
          म्हणलं जातं का संगीतकलेचा सामयेदात समावेश हाये. त्या येदात संगीताचे महत्व वर्णित हाये. हे बरोबर असलं तरी मुळात संगीत कसं निर्माण झालं असन, याबाबत अजुनबी संभ्रम अन् गुढताच हाये. तसं पायल्यास माकड रुपात जवा माणूस होता, तवा तो झाडावरच राहायचा अन् झाडावर असतांनी एखादा प्राणी त्याले जमीनीवर दिसल्यास तो आवाज करायचा. हेच त्याचं संगीत होतं. पुळं हाच माकड जमीनीवर आला. अन् तो माणसाईच्या रुपात वावरु लागला. त्यायेळेसबी त्याले त्या भीतीदायक प्राण्याईनं सोडलं नाई. त्यायेळेस त्याले भीती वाटायची व तो त्या प्राण्याईले पळवण्यासाठी आता आवाज करीत नसे, तं तो काईतरी वाजवायचा. यातूनच संगीतात वादनाचा जन्म झाला. जमीनीवर आलेल्या माणसाईनं सुरुवातीले असे प्राणी दिसताच दगडावर दगड आपटले. हेच त्याईचं वाद्य. त्यानंतर त्याईनं त्या वाद्यात संशोधन केलं. वाद्याचा ईकासबी केला. अर्थात झाडाच्या बासऱ्या, हाडाच्या बासऱ्या, पानाच्या सिट्या तयार केल्या. अन् ते तो वाजवू लागला. तसे या बासऱ्यातून ईशिष्ट प्रकारचे आवाज निघायचे. ज्यातून न आयकलेले ते येगळेच आवाज हिंस्र प्राण्याईनं आयकले का मंग ते पळून जायचे. त्यानंतर या बासऱ्यांचाबी ईकास केला. अन् त्या बासऱ्या प्रगत होत जावून त्यात आज दिसते तसा हळूहळू बदल झाला. हा झाला बासरी वादनाचा इतिहास. चर्मवाद्याचंही तसंच हाये. माणसाईनं जशी बासरी बनवली. तसंच चर्मवाद्यबी. माणसाईनं सुरुवातीले चामड्याचा वापर केला. त्यायेळेस काठीवर सुकत असलेलं चामडं पायलं. ते हवेनं हालायचं व त्यात चामड्याचे घर्षण व्हायचे व हलकासा आवाज यायचा. त्यानंतर त्याईनं ते चामडं खाली काढून त्याले काठीनं वाजवून पायलं. त्याले त्यातून येगळाच आवाज आयकाले मिळाला. तेच पयलं चर्मवाद्य. त्यात तद्नंतर बराच बदल झाला. अन् त्या चर्मवाद्याचे बरेच प्रकार अस्तित्वात आलेत. आज त्या प्रकारात ढोलक, डफली, डमरु, पेटी, तबला, ढोल, खंजीरी, ड्रम असे बरेच प्रकार अस्तित्त्वात हायेत. 
          स्वराबाबत सांगायचं झाल्यास आधी प्राण्याईची जी भीती वाटायची व त्या प्राण्याईले पळवण्यासाठी भीतीतून जो प्राण्याईनं आवाज काढणे सुरु केले होते. त्यातून स्वर जन्मास आला. पुढं त्यातबी संशोधन झालं व त्या स्वराले गती मिळाली. अशी गती देण्यासाठी, ते गती कोणाले द्यावी याचा ईचार झाला व शब्द अस्तित्वात आले. ते शब्द म्हणजेच कविता होय. सुरुवातीले कविता ह्या गद्यातच असायच्या. त्या कवितांचे शब्द हे अलंकारीक नोयतेच. त्यात यमक, रुपक, इत्यादी अलंकार वापरलेले नसायचे. त्यात नंतर संशोधन झालं व त्यामध्ये अलंकारीक शब्द शिरवले गेले. आज त्याच कवितेत अनेक प्रकार आलेले असून गजल, अष्टाक्षरी, षडोक्षरी असे अनेक प्रकार आले हायेत. नृत्याबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी ज्या स्वरानं गाणं निर्माण झालं. त्यात वाद्य शिरवली गेली. अन् त्यातच त्या माणसाईनं आपले हातपाय हालवण्यास सुरुवात केली. ते त्यायेळचं पयलं नृत्य. आज नृत्यातबी बरेच प्रकार आले हायेत.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास कालच्या घडीले ज्या संगीताचा जन्म झाला. त्यात स्वर, वाद्य, शब्द व नृत्य याईचा समावेश होता व तो स्वर, ते वाद्य, ते शब्द व ते नृत्य अतिशय चांगले असायचे. त्यात बिभत्सपणा नसायचाच. त्या लोकाईनं संगीताले विशेष स्थान देलं होतं. परंतु आताच्या काळात संगीतात हा बिभत्सपणा शिरला हाये. ज्यातून आज शब्द वेडेवाकडे लिहिले जात हायेत. नृत्यबी अगदी अंगप्रदर्शन करुन अर्थात तोकडे कपडे घालून केले जात हायेत. वाद्यबी व्यवस्थित वाजवले जात नाईत. अन् स्वरबी आयकावेसे वाटत नाई, असाच ऐकावा लागत हाये. एकदंरीत सांगायचं झाल्यास काल मनोरंजन व भीती नष्ट करण्यासाठी निर्माण झालेलं संगीत, आज तेच संगीत आयकतांनी मनोरंजन व भीती पळविणे यासाठी वापरलं जात नाई तं त्यातून लोकाईले त्रास कसा होईन यासाठी वापरलं जात हाये. आजच्या संगीताचा आवाज कितीतरी प्रमाणात कानाले कानठिळ्या बसाव्यात असा हाये. शिवाय स्थळ, काळ, वेळ अशीबी पद्धत आज पाळली जात नाई. गणेशोत्सवात बिभत्स गाणी लावली जात हायेत. भक्तीगीतं दूर गेली हायेत कितीतरी. त्यातच गणपतीजवळ अंगप्रदर्शनाचे नृत्य सादर होतेत. ज्यातून ते हिंस्र प्राणी दूर पळालेत अन् आपलेच मानवप्राणी आपले लचके तोडाले लागलेत. जे प्राणी असल्या आपल्या तोकड्या कपड्यातून उत्सवप्रसंगी नृत्य केल्यानं आपल्यावर मोहीत होतेत व आपल्यावरच बलात्कार करतेत. हे वास्तविक चित्र हाये. ज्याईची कल्पनाबी करता येत नाई.
         विशेष म्हणजे कायले पायजे असं संगीत का ज्यातून आपलाच जीव जाईन? कायले पायजे असलं नृत्य का ज्यातून आपल्यावरच बलात्कार होईन. अन् कायले पायजे तो मोठा संगीताचा आवाज का ज्यातून म्हाताऱ्या आपल्याच मातापित्याईले ह्रृदयईकाराचा झटका येईन व ते मरण पावतीन? परंतु ही शोकांतिकाच हाये व आपल्याले त्रास देण्याचा खेळ हाये. अर्थातच असलं संगीत बंदच व्हाले पायजे. 
         महत्वपुर्ण बाब हे का काल ज्या दृष्टीकोनातून संगीत निर्माण झालं. त्या दृष्टीकोनातून संगीताले जपाले पायजे. त्याचा वापर चांगल्यापद्धतीनं कराले पायजे. जेणेकरुन संगीताचं महत्व वाढन व संगीत सर्वांईले हवेहवेसे वाटन हे तेवढंच खरं.
            शिवरामच्या मनातला तोच ईचार. तो ईचार बरोबरच होता. कारण आताच्या संगीतातून म्हाताऱ्या मंडळीले नक्कीच ह्रृदयाचा झटका येत असे. तसाच आजच्या संगीत व नृत्यातून जीवबी जात असे अन् बलात्कारबी होत असे.
           शिवरामले जवा भेदभाव आठवला. तवा त्याले त्या भेदभावासोबत आलेल्या इतर काई गोष्टीबी आठवल्या होत्या. ज्या भेदभावाले पोषक होत्या. त्यातच त्याले वाटत होतं का माणसाईनं संगीत हे केवळ आपल्या मनोरंजनासाठी निर्माण केलं नाई तं ते आपल्याले धोका असणारे प्राणी पळवण्यासाठी निर्माण केलं. परंतु समाजातल्या काई स्वार्थपीडीत माणसाईनं त्या संगीतातून अन् नृत्यातून पुळं आपली पोळी भाजली होती. म्हणून त्याले वाटत होतं का लोकाईनं आपली पोळी भाजून नये म्हणजे झालं?
            हा तमाम हिंदुस्थान व या हिंदुस्थानात त्या काळात गुण्यागोविंदाने राहात असलेली प्रजा. गावात कोणताच ईटाळ नोयता. सर्व मंडळी कोणत्याबी प्रकारची कुरकूर न करता अगदी एकोप्यानं राहात असत. परंतु त्या गावाले कोणाची तरी दृष्ट नजर लागली व गावातली अखंडता अन् एकता तुटली. जवा अखंड हिंदुस्थानात असलेल्या इतर राजेरजवाड्यावर ईदेशी आक्रमणकाऱ्याईनं आक्रमणं केलीत तं त्याईनं राजासह इतर समाजाले गुलाम बनवलं.
           तत्कालीन काळात अखंड हिंदुस्थानात बारा बलुतेदार पद्धती होती. ज्यात बरीचशी मंडळी गावातली कामं गावातच उरकवत असत. त्यातच गावात असलेली ही मंडळी गावाचा राज्यकारभार करीत असत. ज्यात राजा वा गावप्रमुख कोणत्याबी जातीच्या शुरवीर व्यक्तीले बनवलं जात असे. जो गावाचे रक्षण करु शकत असे. 
          गावात जशा कुणबी, तेली वा इतर जाती होत्या. तशाच चांभार, मांग, खाटक, मेहतर व गोंड, गोवारी याबी जाती होत्या. गावातल्या बारा बलुतेदारांपैकी कुणबी हे अन्न पिकविण्याचं काम करत. अर्थातच गहू व तांदूळ पिकवत असत. माळी भाजीपाला पिकवत असत. ते तेवढे शुरवीर नोयतेच. बाकीच्या तत्सम जाती गावात इतर कामं करत नोयते. तेबी शुरवीर नोयतेच. परंतु चांभार, मांग, मेहतर व खाटक तसेच गोंड गोवारी या शुरवीर जाती होत्या. त्या गावाचं रक्षण करत. तसेच गावप्रमुखही याच जातीमधून बनायचे वा राजेबी याच जातीमधून कोणी एक बनाचे. जे गावाचं रक्षण करायचे. तसं पायल्यास संगीताची निर्मीती झाल्यापासून मांग लोकं संगीत वाजवून हिंस्र प्राण्यांपासून गावाचं रक्षण करत असत. 
           त्यायेळेस गावाले लगतच भरपूर जंगल होतं व त्या जंगलात हिंस्र प्राणी राहात. ते कधीकधी गावात येत व गावातले गुरं ढोरं नेत. जे नेवू नये म्हणून सातत्यानं महार, मांग, चांभार, खाटक, गोड, गोवारी हे सक्त पहारा देत व त्याईले हुसकावून लावत. पुढं लोकसंख्या वाढली व गावाची शयरं झाली. तसं राज्यबी. ज्या राज्याचा राजा हा कधी चांभार तं कधी इतर समाजातला असायचा. ज्याले आज आपण अस्पृश्य वा आदिवासी संबोधतो. 
           राजपद हे अतिशय जबाबदारीचं पद असायचं. ते पद मुख्यतः चांभार हे जात स्विकारायची. त्यानंतर इतर साऱ्या सुरक्षेच्या व्यवस्था या महार, मांग, खाटक व मेहतरांकडे असायच्या. जसे किल्लेदार पद. कोतवाल पद. राज्यात जवा यज्ञ व्हायचे. त्यात पशुबळी खाटक समाज द्यायचा. 
           हाच मुळचा शुरवीर असलेला समाज. ज्याले आज अस्पृश्य म्हणलं जातं. तो अस्पृश्य झालाच कसा व त्याईले अस्पृश्य का ठरवलं गेलं? हा एक संभ्रमाचा प्रश्न हाये. लोकं त्याले येगयेगळी कारणं सांगतेत. परंतु त्याचं एक येगळच अन् महत्वपुर्ण कारण हाये. ते म्हणजे त्याईच्यात असलेलं शौर्य. तत्कालीन काळात हिंदुस्थानात आलेल्या ईदेशी आक्रमणकाऱ्याईनं येथील राजांवर आक्रमण केलं. त्यात ते जिंकले व ईजय मिळवताच त्याईच्या सेनेवरबी ईजय मिळवला व त्याईले गुलाम केलं. ज्यात राजासोबतच लढणाऱ्या सैनिकाईलेबी गुलाम केलं. ज्या सैनिकात मांग, महार, चांभार व खाटक या अनुसूचीत जाती व आदिवासीसारख्या अनुसूचीत जमातीबी होत्या. अशा ईदेशी आक्रमणकाऱ्याईनं शुरवीर असलेल्या या जातीतील सैनिकाईले व येथील राजाईले गुलाम बनवताच त्याईच्या कर्तबगारीनुसार सैन्यात मानाच्या जागा देल्या नाईत. कारण या अस्पृश्य जाती ह्या जशा शुरवीर होत्या. तशाच त्या अतिशय इमानदारबी. त्या इमानदार असल्यानं त्याईनं ईदेशी आक्रमणकारी राजाचं मांडलिकत्व पत्करलं नाई. काईनं मरण पत्करलं. त्यानंतर ईदेशी आक्रमणकारी अशा लोकाईवर अत्याचार करत असत. त्याईले जबरदस्तीनं कोणत्याबी जनावरांचं मांस चारत असत. शिवाय घरातली कोणतीबी हलक्या दर्जाची कामं कराले लावत असत. हा अत्याचारच होता. जे मांस काई लोकाईले आवडत नसे. तशीच ती हलक्या दर्जाची कामं बी काई लोकाईले आवडत नसत. ज्यातून काई लोकं पळून जंगलात गेले. ते अज्ञात स्वरुपात रायले. त्याईनं आपली ओळख दाखवली नाई. तेच आदिवासी हायेत का जे मुळचे शुरवीर होते. तसंच काई लोकाईनं जंगलात पळून जाणं पत्करलं नाई तं त्याईनं ती हिन दर्जाची कामं करणं पत्करलीत. मंग मांगाईनं तागापासून दोरखंड बनवणं, झाडू बनवणं नव्हे तं बाळंतपणं करणं पत्करलं. बाळंतपणात ईटाळ माणणाऱ्या आणि मरणातबी ईटाळ माणणाऱ्या लोकाईच्या सोबत राहून वाजा वाजवणं. त्याईच्या ईटाळलेल्या वस्तू स्विकारणं. शिवाय सुर्यग्रहण व चंद्रग्रहणात त्याईची सावली अन्नावर पडल्यानं अन्न विषारी झालं असे समजणारा समाज वा कपड्यावर त्याचा परिणाम झाला असे समजणारा समाज मांगाईले अन्न व कपड्याचं दान देत असे. तेबी त्याईनं स्विकारणं सुरु केलं. कारण त्या ईदेशी आक्रमणकाराईच्या गुलामीत ना अन्न मिळायचं, ना कपडे. मग ते स्विकारणारच. 
         चांभाराईनं चामड्यांचं काम करणं सुरु केलं. ते चपला शिवायचे. शिवाय ईदेशी आक्रमणकर्त्या लोकाईच्या घरची गाय मरण पावल्यास ते गाय ओढत नेवून फेकण्याचेबी काम चांभार करत असे. जो एक प्रकारचा शुरवीर समाज होता. तसा खाटक समाज हा पुर्वी यज्ञात पशुबळी द्यायचा. ते हिन दर्जाचं काम नोयतं पुर्वी. परंतु ईदेशी आक्रमणकाराईच्या गुलामीच्या काळात या समाजानं मांस कापण्याचा व्यवसाय पत्करला. तेबी हिन दर्जाचं काम म्हणून गणल्या गेलं. तं मेहतर नावाच्या शुरवीर जातीनं त्या ईदेशी आक्रमणकाराईच्या राज्यातील मैला साफ करण्याचे काम करणे सुरु केले. त्यानंतर उरलेला महार समाज, जो एक प्रकारचा शुरवीरच होता. त्या समाजाले जाणूनबुजून हिन समजून आपली इतर प्रकारची कामं करुन घेतली. जी सेवेचीच होती. त्या सेवा करवून घेत असतांनी ईटाळ होत नसे. परंतु हिन दर्जाची कामं करतांनी शरम नोयती तथाकथीत समाजाले तं त्यात एक स्वाभिमान होता.
         आज तोच कालचा स्वाभिमानी आणि इमानदार असलेला व राजा किंवा राजपदं भोगलेला समाज. त्या समाजानं काल ईदेशी आक्रमणकारी लोकाईच्या काळात गुलाम होवून यातना भोगल्यात. परंतु धीर सोडला नाई. त्याचं कारण होतं त्या बिरादरीतील लोकाईचं ईचार करणं. वाटत होतं का आपल्याबी पिढीसाठी स्वातंत्र्याचा काळ येईन व त्याईलेबी सन्मानानं जगता येईन. 
        आज तो काळ आला हाये. परंतु चांभार, मांग, मेहतर नव्हे तं खाटक यासारख्या तत्सम अस्पृश्य जातीले सन्मानानं जगता येत हाये का? तं त्याचं उत्तर नाई असंच येतं. शिवाय कालच्या ईदेशी आक्रमणकारी समाजाईनं काल जरी अत्याचार केले असले या मुळ स्वरुपात राजपद भोगलेल्या व आज गणल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजावर. परंतु तो समाज आज सुधारला हाये. तो या समाजावर अत्याचार करत नाई. मंग अत्याचार कोण करते? अत्याचार तो समाज करत हाये. ज्या समाजाले काल ईदेशी आक्रमणकर्त्या राज्याईच्या राजेशाहीत काई घेणं देणं नोयतं. जो समाज फक्त त्याईच्या हो ले हो मिरवत होता. जो त्या लोकाईशीन गोडगोड बोलत होता. म्हणत होता का आपण राज्य करा. आम्हाले काई घेणं देणं नाई. हं, आम्ही जेबी कमवतो. ते काल येथे राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याईले देत होतो. आज तुम्हाले देणार. फक्त तुम्ही आमचं रक्षण करा म्हणजे झालं. याचाच अर्थ असा का आज जो समाज अस्पृश्य, आदिवासी याईच्यावर अत्याचार करते. त्याच समाजानं काल ईदेशी आक्रमणकारी राजेशाहीले पोषलं. त्याईलेबी इथं रायण्यास खतपाणी घातलं. आपली पोळी भाजून घेतली. ज्याईले अतिशय मतलबी लोकं म्हणता येईन. त्याईले गतकाळातील ज्याबी राजाईनं त्याईचं हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण केलं. त्याईच्याबाबतीत काई घेणं देणं नोयतं. त्यानंतर ईदेशी आक्रमणकारी लोकाईच्या हस्ते ते गुलाम झाले व त्याईच्यावर अनन्वीत अत्याचार झाले. त्याचंबी त्याईले काही घेणंदेणं नोयतं. अन् आजबी त्याईले काई घेणंदेणं नाई. ते काल जसे वागले. तसेच आज वागाले पाहात हायेत. शिवाय आजच्या काळात ह्याच आदिवासी लोकाईनं वा अस्पृश्याईनं वर यावा यासाठी ज्या लाभाच्या आरक्षणरुपी सवलती मिळत हायेत. त्या सवलतीचा ते ईरोध करीत हायेत. थोडासाबी त्याईले ईचार नाई का काल याच आदिवासी बांधवाईनं व अस्पृश्य बांधवाईनं आपल्या बिरादरीतील लोकाईचं हिंस्र श्वापदापासून रक्षण केलं व तसंच रक्षण करता करता ईदेशी आक्रमण झालं. ज्यात ते गुलाम झाले व त्याईच्यावर अत्याचार झाला. ते आमचेच बांधव हायेत का ज्याईनं अनन्वीत यातना भोगल्या. आज त्याईले जे मिळत हाये. त्याबद्दल आपल्याले आनंद व्हाले पायजे. परंतु आज तसं चित्रच दिसत नाई. केवळ त्यावरबी जळफळाट होत हाये. 
          महत्वपुर्ण बाब हे का काल गावात जे बलुतेदार व अनुतेदार तयार झालेत. ते गावाच्या भल्यासाठीच होते. त्यापैकी काई जाती या गावाचे संरक्षण करत होत्या सर्व प्रकारच्या गोष्टींपासून. मंग त्यात ईदेशी आक्रमणाचाबी समावेश हाये. आता आपण निर्माण केलेल्या त्याच बांधवाईलेबी ईदेशी आक्रमणकारी लोकाईनं गुलाम केलं. यात मुळच्या गोंड, गोवारी, चांभार, मांग, खाटक, मेहतर वा इतर तत्सम जातीईची चूक नोयती. त्याईचा ईरोध करणं हे आपली चूक होती. तरीबी त्याईले मदत न करता तथाकथीत लोकाईनं ईदेशी व इथं स्थिरावलेल्या लोकाईले मदत केली. हा स्वार्थ होता. तरीबी गुलाम झालेल्या इतर समाजानं त्याईच्या वागण्यावरबी त्याईले काईबी म्हणलं नाई. कोणतेच ताशेरे ओढले नाई. मात्र आज म्हणण्याची गरज हाये. कारण आज समाज स्वतंत्र झाला असून कोणत्याबी ईदेशी शक्तीचे आज ते गुलाम रायलेले नाई. तवा काल अस्पृश्य व आदिवासी समजणाऱ्या आजच्या या लोकाईले सोताचे उत्थान करण्यासाठी ज्याबी सोयीसवलती मिळत हायेत. त्यावर कुरकूर करण्याची गरज नसावी. अन् कुरकूर करुबी नये. शिवाय त्याईले मदतच करावी. जसं गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी त्याईले आपल्याच बिरादरीनं काल निर्माण केलं व अनुतेदारात अन् बलुतेदारात त्या जातीचा समावेश केला. तसा आज आपला देश स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण अनुतेदार व बलुतेदार याईच्यातीलच या जातीच्या सामाजिक उत्थानासाठी सर्वतोपरी मदत करावी. बळ द्यावं. कुरकूर करु नये. तसंच आपली पोळी भाजू नये. कारण आज आपण ईदेशी आक्रमणकारी लोकाईचे गुलाम नाई. 
            शिवऱ्याईले समाजाच्या वागण्यावर तसाच ईचार यायचा. त्याले वाटत होतं का आपला मांग समाज सुधारणेच्या कोसो दूर हाये. त्याईचा ईकास व्हावा. तोबी सुधारणेच्या कक्षेत यावा. आपल्या मांग समाजानंबी ईकासाच्या क्षेत्रात यावं. परंतु समाज आजबी ईकासाच्या क्षेत्रात येत नोयता. तो कालचंच तुणतुणं हालवत होता. लोकांईसमोर दोनचार पैशासाठी भीक मांगत होता अन् सोताच्या जातीची बेज्जती करत होता. त्यामुळंच शिवऱ्या ईचार करत होता त्या मांग जातीचा. जे जात तशी वागत होती. 
            अलिकडे चित्र दिसतं का मांग येगयेगळ्या नावानं संबोधल्या जाते. हा समाज रस्त्यावर भीक मागतांनी दिसते. एकदा कुणाच्या तरी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमात शिवऱ्या सहभागी असतांनी एक व्यक्ती त्याच्याच जवळच उभ्या असलेल्या माणसाले म्हणाला, "साहेब आपण मले बोजारा देला नाई." त्याचं ते बोलणं. त्यावर इतर उभी असलेली माणसं हसाले लागली होती. तवा त्याले मात्र आश्चर्य वाटत होतं. त्याची ती आर्जव. ते काही शिवऱ्याले समजली नाई. त्यानंतर कळलं का तो पुळचा माणूस कदाचीत शिक्षीत वाटत असल्यानं त्याच्या समाजाच्या माणसानं दारुसाठी त्याच्याकडं पैसे मागीतले होते बोजारा म्हणून. जरी आयोजकानं त्याच्याशीन ठरलेले पैसे देले असले तरी. हे माह्या समाजात अशी पैसे मांगण्याची रीत का? असा प्रश्न शिवऱ्यासमोर उभा झाला होता. तो ईचार करत होता व ईचारातून त्याले समजलं का तो पैसे मांगत होता. कारण त्याले असलेलं दारुचं व्यसन. त्या दारुच्या व्यसनातून त्याईले मिळत असलेला पैसा पुरत नोयता. म्हणूनच हे मांगण्याची रीत. हे एक प्रकारची शोकांतिकाच होती. 
           मांग किंवा मातंग समाज. या समाजाले येगयेगळी नावं हायेत. कुठं त्याईले गारुडी देखील म्हणतेत तं कुठं त्याईले मादिंग, दानखनी, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारोडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे इत्यादी. कुठं त्याईले दुसरंच काई. कुठं त्या समाजाले आजबी हिन दर्जाची वागणूक मिळत असते. कुठं या जातीच्या व्यक्तीचा हशा पिकवला जाते. कधी म्हणलं जाते का मांग भलतीच गोष्ट सांग. असा विपर्यास केला जाते. कारण त्याईचं वागणं. ते वागणं हशा पिकविणारं असतं. ज्याप्रमाणे तांदळात खडे असतेत नं. तसेच दोनचार खडे याबी समाजात असतेत. जे दारुसाठी अगदी लाचार होवून इतर समाजांपुळं दोन चार रुपये मांगत असतेत. जे भीक नसते. परंतु वाईट सवय असते. ते सवय इतरबी समाजाले असतेच. परंतु त्या त्याईच्या वाईट सवयीनं ते सोतालेच नाई तं आपल्याच समाजातल्या इतर स्वाभिमानी लोकाईलेबी बदनाम करीत असतेत.     
         मांग एक शुरवीर जात. कालची आणि आजचीबी. या जातीच्या भरवशावर गतकाळातील राजे महाराजाईनं फारच मजा मारलेली दिसून येते. परंतु बदल्यात या जातीले काईबी देलेलं नाई. या जातीचा ऐतिहासिक काळ पायता असं आढळून येते का पुर्वीच्या काळी या जातीलेबी चौक्या रक्षणाचं काम देलं जायचं. त्यातच किल्ल्यातल्या देव्यांचं पुजेचं साहित्य याईच्या हातानंच बोलावलं जात असायचं. त्याचं कारण होतं त्याईच्यातील गुण. कोणाकडून कोणती वस्तू कशी काढून घ्यायची याचं ज्ञान त्याईले होतं. तो गुण आजबी हाये त्याईच्यात. हा समाज कोणत्याबी बाबतीत लज्जा बाळगत नाई. शिवाय कोणतीबी वस्तू कोणाकडून मांगत असतांनी हा समाज साम, दाम, दंड व भेदाचा वापर करत असे अन् काढून आणतच असे. आता दाम हे तत्व मांगं पडलेले हाये. याच कारणावरुन त्याईले मांग हे नाव पडले असावे. हे नाकारता येत नाई. पुळं हेच नाव चालत आले असावे. 
          बाळंतपण..... ज्या बाळंतपणाले ईटाळ मानल्या जात होता. ते बाळंतपणं, मांग घरची बाई करत असे नव्हे तं पोट जगविण्यासाठी करावीच लागत असे मजबुरीनं. शिवाय बाळंतपण झालं का मांग पुरुष व्यक्ती त्या व्यक्तीच्या घरी जावून वाजा वाजवत असे. जरी ईटाळ होत असला तरी. हे पोटासाठीच होतं आणि अगदी मजबुरीनंबी. चंद्रग्रहण व सुर्यग्रहणात निषीद्ध झालेले कपडे अंगावर ग्रहण केले का आयुष्याले ग्रहण लागतं, असे मानणारा समाज मांगाईले ते कपडे दान देत असे. तसंच अन्नाचंबी दान देत असे. तवा ते दान निषीद्ध हाये हे माईत असूनबी मांग समाज आनंदानं स्विकारु लागला होता. त्याचंबी कारण होतं त्याईची मजबुरी. पुळं मेलेल्या माणसांचा ईटाळ होत असतो हे माईत असूनबी त्यातूनबी त्यात हा समाज आनंदानं वाजा वाजवू लागला त्याईच्या घरातल्या मरणसमयी. तिथंबी त्याईची मजबुरीच होती. अन् घरची इडापीडा जावी म्हणून मांगाईले इथलेच ईदेशी आक्रमणकारी वस्त्र व अन्नाचं दान देत. तेबी हा समाज आनंदानं स्विकारत होता व त्याईच्या इडापीडा अंगावर झेलत होता. त्याचंबी कारण होतं मजबुरी. त्या अंधश्रद्धा मांग समुदायालेबी माईत होत्या. परंतु सर्वात मोठी मजबुरी होती पोट जगवणं. पोटासमोर सारं काही तुच्छ होतं. 
         आज मात्र चित्र बदललं हाये. कारण भारत स्वतंत्र्य झाला हाये. सर्वाईले संविधानाने समान अधिकार देले हायेत. त्यानुसार जीवन तेबी अर्थपुर्ण जगण्याचा अधिकार मिळालेला हाये. ज्यात मांगाईचाबी समावेश हाये. ज्यातून मांगाईचीही बिरादरी सुधारली हाये. त्याईचीबी मुलं ही शिक्सण शिकू लागली हायेत. परंतु किती? तं ते प्रमाण अत्यल्प हाये.
          मांग लोकाईचे मुख्य व्यवसाय केवळ झाडू वा टोपल्याच बनवणं नाई तं वाजा वाजविणंबी हाये व ते एक कला हाये. परंतु ते कला त्याईची तारक नाई तं ते कला त्याईले मारक ठरलेली हाये. असे वेळोवेळी दिसून येत हाये.
          मांग समुदायाजवळ जी कला हाये. त्याची तुलनाच करता येत नाई. परंतु त्यानुसार त्यांची नोंद ग्रीनीच बुकात होत नाई. कारण त्या कलेचा त्याईले सुत्रबद्ध अभ्यास नाई. म्हणूनच ज्या समाजाजवळ मांग समाजाची कला हाये व ज्याईच्यात त्या कलेचा सुत्रबद्ध अभ्यास हाये. त्या समाजातल्या व्यक्तींची ग्रीनीच बुकात नोंद होत हाये. त्याचं कारण हाये सुत्रबद्धता. 
         आज हा समाज सुधारणेच्या कक्षेत हाये. चांगला भरजरी पोशाख घालून हा समाज वावरतो हाये. चांगलं सुग्रास अन्न आज खातो हाये. सगळं काही व्यवस्थीत हाये. परंतु तरीबी त्याईले इतर समाज हीनच लेखते. त्याचं कारण हाये. या समाजाचं वागणं. ते वागणं लक्षात घेण्यासारखं हाये. त्यात जर थोडा बदल झाला का बस समाज सुधारला असं नक्कीच म्हणता येईन. ते वागणं हाये. त्याईच्यात असलेलं दारु पिण्याचं व्यसन. शिवाय आपल्या लेकराईले जास्त न शिकवणं. इतर सुधारीत समाजातील लोकाईपेक्षा या समाजातील लोकं हे आपल्या मुलाईले जास्त शिकवीत नाईत. तसं पायल्यास आपली कला ही मंडळी आपल्या मुलांईले लहानपणापासूनच शिकवतेत. तशी कला शिकणं काही वाईट नाई. परंतु त्या कलेतून या समाजातल्या बऱ्याच मुलाईचं लहानपणापासूनच अभ्यासातून लक्ष उडते व व्यवसायाकडं लागते. ते जास्त शिकत नाईत व व्यवसाय करु लागतेत. त्यानंतर अशा व्यवसायातून पैसा आला का व्यसन जडतेत व हा समाज व्यसनाधीन बनते. मंग पुढील पुर्ण आयुष्य व्यसनातच जात असते. हे तेवढंच खरं.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास आज संविधान हाये. शिकाले संधी हाये. त्यानुसार आपल्या सोताचे उत्थान करण्याचीबी संधी हाये. काल आपण नाई शिकलो. कारण आपली बिरादरी गुलाम होती. आज तसं नाई व आज आपण गुलाम नाई. तवा मांग वा मातंग समाजानंबी जास्त शिकावं. संविधानाचा लाभ घ्यावा. त्याईले असलेल्या ईकासाच्या संधीचा लाभ घ्यावा. जेणेकरुन त्यातून त्याईचाच ईकास होईन व कोणी त्याईचेवरबी कोणत्याबी स्वरुपाचे ताशेरे ओढणार नाईत वा त्याईले कोणीबी कमी लेखणार नाई यात शंका नाई.
              शिवऱ्याचा एक दोस्त होता शंकर. शंकर हा उच्चवर्णीय होता. तो शाळेतला मित्र होता. त्याले शिवऱ्याची जिद्द आवडत होती. तसा तो सुरुवातीले त्याचा मित्र बनला नाई. त्याचं कारण होतं घरचं बाळकडू. उच्च वर्णियाईले घरातून जे बाळकडू मिळाचं ते ईषारी असाचं. त्यातच ते लोकं हिन हायेत. घाणेरडे रायतेत. त्याईच्यासोबत राहायचं नाई. त्याईचा स्पर्श होवू द्यायचा नाई. नायतं ईटाळ होते. मंग आपल्याले आंग धुवा लागते. तवाच ईटाळ जाते. या सर्व्या गोष्टी शिकवल्या जात होत्या घरातूनच. शंकरच्याबी आईनं त्या गोष्टी त्याले शिकवल्या होत्या. परंतु एक दिवस प्रसंग घडला. 
            ईटाळाचा तो ईंचू सगळ्याईले चावत होता. अशातच शिवऱ्या शिकत होता त्या शाळेत काई अस्पृश्य पोराईनं एक योजना बनवली. आपून उच्च वर्णियाईले धडा शिकवायचा. मंग ते योजना. त्यातच ते अंमलात आणायची ठरवताच ते गोष्ट शिवऱ्याले माईत झाली व त्यानं ते योजना हद्दपार केली. नायतं दोनचार तरी उच्चवर्णीय लोकांईच्या पोराईचे शाळेतच मुदडे पडले असते. तशी ते गोष्ट शंकरले माईत होताच तो त्या दिवसापासून शिवऱ्याचा दोस्त बनला होता. 
            शंकरले वाटत होतं का त्याही वर्गानं सावधान व्हावं? जातीवरुन भांडण करु नये. जात हे माणसाईनं बनवली. तेबी आपल्या स्वार्थासाठी. तसं पायता त्या वर्गात येगयेगळ्या जातीधर्माचे लोकं होतेच. 
            शंकरले जे वाटत होतं. तेच राम्यालेबी वाटत होतं. राम्या चांभार होता. तसा त्याले त्याच्या जातीचा अभिमान होता. त्यालेबी जातीवरुन होत असलेली भांडणं आवडत नोयती. 
            जातीवरुन भांडण. अलिकडील काळात नेहमी जातीवरुन भांडण होत असतं. हा अमूक जातीचा. तो अमूक जातीचा. असा वाद होतो. त्याची जात हलकी व माह्यी जात उच्च असंबी मानलं जातं. शिवाय जातीच्या उत्पत्तीवरुनही बरेच वाद हायेत. कोणी म्हणतेत का जवा गाव ईकसीत झालं. तवा बारा बलुतेदाराईची व अठरा अनुतेदाराईची उत्पत्ती झाली. ह्याच जाती ठरल्या. याचाच अर्थ असा का त्यापुर्वी जाती नसाव्यात. परंतु असे ना अनुतेदार व बलुतेदाराईपुर्वीही काई जाती अस्तित्वात आल्या होत्या. जाती बनविण्यापुर्वी व गावंबी ईकसीत होण्यापुर्वी. त्याचा इतिहास समजून घेणे गरजेचे हाये. 

               ***************************************

           राम्याले वाटत होतं का जातीतला हा भेदभाव, भेदभाव असू नये. त्याले वाटत होतं का जाती ह्या माणसाईनं आपल्या स्वार्थासाठी निर्माण केल्या. त्या कामावरुन निर्माण झाल्या. परंतु त्यात नंतर स्वार्थ आला. तसं पायल्यास त्याले डार्वीनचा उत्क्रांतीवाद माईत होता व त्याच उत्क्रांतीवादावरुन तो आपल्या जातीचा तर्क लावत होता. त्याचबरोबर जाती कवा व कशा निर्माण झाल्या असतीन याचीबी कारणं शोधत होता. 
          जाती कवा निर्माण झाल्या? या प्रश्नांचं उत्तर देतांनी असं ठामपणे म्हणता येईन का सर्वप्रथम चांभार जात या पृथ्वीवर निर्माण झाली. म्हणूनच चांभार जातीचा इतिहास सांगतांनी गाव कसं निर्माण झालं ते सांगणे क्रमप्राप्त ठरेल. 
          पुर्वी माणूस झाडावर रायचा. हे सर्वाईलेच माईत हाये व हे डार्वीनचा उत्क्रांतीवाद सांगतोच. त्यानंतर माकड रुपातील मानव पृथ्वीवर राहाले आला हेबी आपण जाणतोच. अन् जवा हा माणूस पृथ्वीतलावर राहाले आला. तवा त्यानं पायलं का आतं खाली आल्यावर गवताशिवाय त्याले खाले प्याले काईच मिळत नाई. पुर्वी जसं त्याले झाडावर असतांनी झाडाची पानं खाले मिळायची तशी. आतं ती झाडं उंच होती व त्या पानाईले हातबी पुरत नोयता. शिवाय आतं त्याले मानव अवस्थेत झाडावर जास्त चढता येत नोयतं. शिवाय अन्नबी मिळवता येत नोयतं. मंग काई दिवस त्यानं जमीनीलगत असलेले गवत खावून काढले. परंतु कालांतरानं तेबी त्याले रुचकर वाटत नोयते अन् दुसर्‍या ठिकाणी जास्त वेगानं जाताबी येत नोयतं. जसा तो माकड अवस्थेत असतांनी जात होता. तो भटकंती नक्कीच कराचा. अशातच भटकत असतांनी त्यानं एक मेलेलं जनावर पायलं. ते जनावर नुसतंच मरण पावलं होतं. त्यामुळंच त्यानं ईचार केला, आपण प्राण्याईचं मास खावून पायलं तर....... ईचारांचा अवकाश, तसा ईचार करताच त्यानं त्या प्राण्याच्या मासाचा एक तुकडा तोंडात टाकला. तो अधीक रुचकर लागला. तवापासून माणूस हा प्राण्याईचे मास खाणारा बनला. यायेळेस सुरुवातीले तो प्राण्याईचे कच्चेच मास खात असे. परंतु कालांतरानं एकदा त्या मासाचा एक तुकडा नकळत आगीमंधी पडला अन् त्यानं तो काढून खाल्ला असता त्याले तो तुकडा अधीक रुचकर लागला. तवापासून हा माकड मानव प्राण्याईचं मांस नेहमी खात असे, तेबी भाजून. 
         माकड रूपातील प्राणी जवा झाडावरुन खाली अर्थात जमीनीवर आला. त्यायेळेस तो भटकंती करत असे. त्यातच तो गवत व जमीनीलगतचा चारा खात असे. अशीच भटकंती करत असतांनी त्यानं पायलं का एके ठिकाणी एक प्राणी मरण पावलेला हाये. त्यानंतर त्यानं त्याचं मास काढलं व ते थोडं खावून पायलं. हीच पहिली चांभार जात असन. ते मास त्याले रुचकर लागलं. त्यानंतर तो त्या मेलेल्या प्राण्याईचं मास खावू लागला. परंतु ते मेलेले प्राणी त्याले दररोज सापडतच नसत, कितीबी भटकंती केली तरीबी. तवा त्यानं ठरवलं का आतं आपण प्राणी मारायचे. तवाच आपल्याले मास खाले मिळन. त्यानंतर त्यानं प्राणी माराले सुरुवात केली. परंतु त्यापुर्वी त्यानं अवजारे बनवली व हा सल्ला कोणीतरी त्याले देला व एक जात निर्माण झाली बामण. त्यानंतर त्यानं त्याच्याच सल्ल्यानुसार अवजारे बनवली व अवजारे बनविणारा व्यक्ती हा खाती ठरला व हे जात निर्माण झाली. त्यानंतर त्यानं शिकार करण्यास प्रारंभ केला. ती शिकारी अर्थात पारधी हे जात निर्माण झाली. त्यातच त्या प्राण्याईचे लहान तुकड्यात रुपांतर होवू लागले व एक नवी जात निर्माण झाली. ते खाटक जात होय. त्यानंतर माणूस स्थिरावला. तो गुफात राहू लागला. त्यातच तो गुफेजवळ स्वच्छता करु लागला. हे मेहतर जात होय. तसाच तो गुफेजवळ स्वच्छता करता करता त्यानं ठरवलं का आतं आपण एखादे घर उभारुन पाहावे. त्यानं त्यानंतर घर उभारलं. हे त्याची आणखी एक जात निर्माण झाली. ते जात होती गवंडी. त्यानंतर तो माणूस शेती करु लागला व कृषक बनला. ते त्याची जात होय कुणबी. त्यानंतर तो आपल्या शेतात भाजीपाला पिकवू लागला. हे त्याची जात होती माळी. अशाप्रकारे तद्नंतर भरपूर जाती निर्माण झाल्या. ज्या जाती माणसाले माईतही नोयत्या. कारण ती कामं होती व ती कामं कोणीबी करु शकत होता अन् कोणीबी करत असे. 
          चांभाराचा मुख्य संबंध हा चामड्याशीन येत असून जो चामड्याचं काम करन व चामड्याचं सेवनबी करन. त्याईले चांभार असं संबोधल्या जाईन. त्यावरुन सुरुवातीले प्राण्याईचे कच्चे मास सेवन करणारा माकड हा पयला चांभार ठरला असन. परंतु त्यापुर्वी त्यानं शिकार केली नोयती व ते करण्यासाठी त्याले अवजाराईची गरज पडली होती. तो अवजारे बनविणारा व्यक्ती हा वाढई वा खाती असू शकते. अशाप्रकारे येगयेगळ्या जाती निर्माण झाल्या. ज्याईले जाती कळत नोयत्या. परंतु त्या जातीची कामं कळत होती. 
          काई दिवस गेले व त्या त्या कामात काई नवी माकडमाणसं याले लागली. ज्याले ती कामं जमत नोयती. कारण सराव नोयता. त्यातच कोणीतरी सल्ला देला का ही कामं एकाच बिरादरीतील माणसाईनं कराले पायजे. त्यानंतर ठरलं का ती कामं एकाच घरची वा बिरादरीतील माणसं करतीन. तवापासून ती कामं एकाच बिरादरीतील माणसं कराले लागली होती. ज्यात सरावबी झाला व त्या कामात कौशल्य प्राप्त होवून सुबकताबी आली. त्यानंतर जाती निर्माण झाल्या ईशिष्ट ओळखीसाठी.
            काई दिवस असेच गेले व कालांतरानं समाजात असाच एक वर्ग निर्माण झाला का जो सल्लेच द्यायचा. तो काम करायचा नाई. शिवाय तो सल्ले देतांनी त्या सल्ल्याची जबरदस्ती करु लागला नव्हे तं ते सल्ले लोकांवर लादू लागला. त्यासाठी भांडणं करु लागला. त्यातच स्वयंपुर्ण असलेल्या ज्या गावात भांडणं होत नोयती. त्या गावात आज भांडणं होवू लागताच त्याईनं ठरवलं का गावात एकोपा टिकावा. म्हणूनच ते नाईलाजानं अशा वर्गाचे सल्ले वापरु लागले. तेथंच माणूसकीची हत्या झाली व माणूसकी गहाण पडली. याच सल्ले देणाऱ्या लोकाईनं पायलं का एक समाजात असाबी वर्ग हाये का जो सोता शुरवीर हाये. त्याईच्या शुरवीरतेवर ताशेरे ओढता येणं शक्य नाई. अशाच वर्गाच्या हातात राजसत्ता हाये. त्यानंतर तसा ईचार करताच या सल्ले देणाऱ्या वर्गानं ठरवलं का जो आपलं आयकन, त्याच माणसाले राजसत्तेवर बसवावं व जो आयकणार नाई, त्याले राजसत्तेवरुन काढून फेकावं. त्यातच त्याच लोकाईनं काई नियम बनवले. मंग बाकीच्या काई लोकाईले ईश्वासात घेतले. त्याईच्यात देव दानव, भूत प्रेत, भेदभाव व अंधश्रद्धा या सर्व गोष्टी भरल्या. ज्यातून आतं राजसत्तेवर असलेल्या लोकाईले बायेर जावं लागलं. परंतु काई असेबी सत्ताधीश अन् त्या राज्यातील लोकं होते का त्याईले राजसत्तेबाहेर हाकलणे कठीण जात होते. ते अशा लोकाईचे मुळात आयकतबी नसत. त्यामुळंच त्याईनं ठरवलं व योजना आखली. त्या योजनेनुसार त्याईनं बायेर राज्यातील लोकाईशी संगनमत केलं व त्या परकीय टोळीले मदत करुन त्याईच्याकडून आपल्याच लोकांवर आक्रमण करुन घेतलं व आपली पोळी शेकली. ज्यातून ते तं गुलाम झालेच झाले. ते सोताबी गुलाम झाले. मात्र अशा गुलामीच्या काळात त्याईले काईच फरक पडला नाई. फरक पडला त्या लोकाईचं न आयकणाऱ्या लोकाईले. त्या लोकाईनं गुलामगिरीच्या काळात अशी अशी कामं कराले बाध्य केलं गेलं का ज्याची कल्पनाबी आपण करु शकत नाई. याचाच अर्थ असा का पुर्वी राजसत्तेवर असलेला वर्ग आज राजसत्तेबाहेर होताच अस्पृश्य व आदिवासी म्हणून गणला जावू लागला होता. काल राजसत्तेत असतांनी त्याचेवर कोणतेच बंधन नोयते अन् आज राजसत्तेतून बायेर होताच त्याईच्यावर अशी अशी नानाविध बंधनं आली होती का त्याईचं जगणं कठीण करुन टाकलं होतं.
          ते सल्ले देणारी जात होती बामण अन् राजसत्तेवर असणाऱ्या जाती होत्या, चांभार, मांग, महार, मेहतर, खाटक, गोंड, गोवारी, गारुडी व इतर सर्व आजच्या अस्पृश्य व आदिवासी जमाती. काल या जाती जमातीले जातीची नावंच नोयती. कालांतरानं ईदेशी आक्रमण कर्त्या लोकाईनं त्याईले जातीची नावं देवून जाती निर्माण केल्या.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास जाती व जमाती ह्या जर पुर्वी नोयत्या तं आज त्याच जातीले जात म्हणून का संबोधावे? आज जातीच्या आधारावर कोणत्याबी स्वरुपाचे निकष का ठरवावे? जातीच्या आधारावर राजकारण का खेळावे अन् जातीच्याच आधारावर भेदभाव का करावा? हा अमूक हा तमूक असं म्हणून जाती आधारावर कल्लोळ का माजवावा? परंतु हे जरी बरोबर असलं तरी जात व जातीवरुन भांडण केल्याशिवाय राजकीय पोळी कशी काय शेकता येणार? त्यामुळंच आज जाती आधारावर राजकारण आढळतं व जाती आधारावर भेदभावबी. परंतु महत्वपुर्ण बाब हे का तो काळ गेला. ज्या काळात आधी राजसत्तेवर असलेल्या लोकाईले गुलाम बनवलं गेलं. त्यातच त्याईले गुलाम बनविल्यावर जास्त छळलं गेलं. आजबी छळलं जात हाये. ज्यातून त्वेष निर्माण होत हाये. हे असंच सुरु रायलं तं कधीतरी क्रांती होवू शकते. लोकं एकत्र येवू शकतेत व आजची राजसत्ता उखडून फेकल्या जावू शकते. शिवाय सत्ताधीश वर्गाच्या वागण्यावर जरबबी लावली जावू शकते. ज्यामुळंच जातीजातीवरुन राजकारण चालते. भांडणबी होत असतेत. तवा सर्व जातीनं सावधान असावं. राजसत्ताधिशाईनंबी सावधान व्हावं अन् सावधान त्याही वर्गानं व्हावं का ज्याईनं आपली सोताची आजपर्यंत पोळीच शेकलेली हाये व शेकत आलेले हायेत.
           जाती कशा निर्माण झाल्या असतील बरे? हा लोकाईचा नेहमीचा प्रश्न. तसं पायल्यास नेयमीच जाती ह्या कामावरुन पडल्या असं म्हटलं जातं. तशा पुर्वी जाती नोयत्याच. वर्ण अस्तित्वात होते. कालांतरानं एक असा व्यक्ती निर्माण झाला जणू केल्या गेला का त्यानं कामाले जातीचं स्वरुप देलं. ते आपला उल्लू सरळ व्हावा. आपल्याले काम करावं लागू नये व सुख मिळावं म्हणून. त्यानं आपली अक्कल वापरुन कामावरुन जाती तं निर्माण केल्याच. शिवाय येथल्याच माणसाले गुलाम बनवलं. कोणाले देवादिकावरुन तं कोणाले अंधश्रद्धेवरुन तं कोणाले ईदेशी आक्रमण कऱ्यांच्या हस्ते. त्यानंतर आपला डाव साधला व ते महामारी आणली. ज्यातून भेदभाव, अंधविश्वास, ईश्वासघात हे आजार पसरले. ज्याची लागवण त्या काळात जरी झाली असली तरी आजबी ते रोग संपलेले नाईत.
           चांभार समाज. म्हणतेत का चांभार हे काल देशाचे राजे होते. त्याईनं राजपद हिसकावून घेतलं नाई तं ते त्याईले देण्यात आलं होतं स्वखुशीनं असं म्हणल्यास आतिशयोक्ती होणार नाई. त्यासाठी प्राचीन काळातील इतिहास समजून घेणे गरजेचे हाये. चांभार व महार हे शुद्ध शब्द नंतर आले असावे. पुर्वी या शब्दाले माहार व चमार म्हणलं जात असावं.
          प्राचीन काळात जसा माकड झाडावरुन खाली येवून रावू लागला. तशा गरजाबी वाढल्या असतीन. त्या गरजा पुर्ण करीत असतांनी कामाची निर्मीती झाली असन. शिवाय कामाचीबी ईभागणी झाली असन. चामड्याच्या कामाशीन संबंधीत असलेल्या जाती होत्या चांभार, मांग, मेहतर, खाटक व महार. चांभाराला चमार म्हटलं जात असन. चमारचा अर्थ, च अर्थात चर्म, मा अर्थात मास व र अर्थात रक्त. हे लोकं चामड्याशी संबंधीत काम करीत असतीन व याईचा रक्त मांस व चामड्याशीन संबंध येत असन. ही मंडळी चामडे पकविण्याचे काम करीत असतीन. मांग या शब्दाचा अर्थ होता. मां अर्थात मास व ग अर्थात गलविणे म्हणजेच चांभारानं पकविलेल्या चामड्याचा उपयोग करणे. त्यानुसार मांग लोकं चामड्याचा वापर करुन ढोल, तंबोरे, खंजिरी, डफ बनवत असतीन. हे प्राण्याईले घाबरवण्यासाठी असन. महारला माहार नाव होतं. मा अर्थात मास, हा अर्थात हाड व र अर्थात रक्त. ही मंडळीबी चामड्यांशीन संबंधीत कामं करत असतीन. ज्यात मास, हाड व रक्ताशीन संबंध येत असन. जशी ते हाडापासून बासरी बनवीत असतीन. हेबी हिंस्र प्राण्याईपासून संरक्षण करण्यासाठीच असन. मेहतरचा अपभ्रंश मैहतर असेल. मै अर्थात मैला, ह अर्थात हाडं, त अर्थात तत्सम सर्व वस्तू व र अर्थात रक्ताशी संबंधीत सर्व वस्तू व या सर्वांची स्वच्छता करणे. खाटकचा शब्दावरुन अर्थ असेल खा अर्थात खांड खांड करणे म्हणजेच तुकडे करणे. अर्थात मांसाचे तुकडे करणे. टी अर्थात त्याला टिकवणे व क अर्थात कवटीचीही विल्हेवाट लावणे. त्यानंतर पोटजातीबी आल्या. त्या पोटजातीबी कामावरुनच पडल्या असतीन. 
         ही झाली चामड्याशीन संबंधीत कामं. आतं शेतीशीन संबंधीत कामावरुन कुनबी जात आली असन. कु अर्थात कृषी, न अर्थात नवनव्या स्वरुपात व बी अर्थात बिया लावणारा. माळी मा अर्थात माळवा ळी अर्थात रोपन करणारा. त्यानंतर पोटजाती आल्या. फुलमाळी अर्थात फुलाचे रोपन करणारा. शेतीशी संबंधीतच पुढे तेली जात निर्माण झाली असन. तेली अर्थात शेतीतून निघणाऱ्या धान्यावर प्रक्रिया करुन तेल काढणारा. हे नाव व हे काम बऱ्याच वर्षानंतर अस्तित्वात आलं असावं. गरजेनुसार कामं व कामाशी संबंधीत नावे आली असतीन. शिंपी देखील कृषीशी संबंधीतच असन. विणकरबी कृषीशी संबंधीत असन. धोबीबी कृषीशीच संबंधीत असन. भोईबी शेतीशीनच संबंधीत असन. तशाच काई जाती ह्या अलंकारीक कामाशी संबंधीत निर्माण करण्यात आल्या असतीन. ज्यात सोनार, दागीने बनविणे, कुंभार, मातीच्या वस्तू तयार करणे, सुतार, लाकडाच्या वस्तू तयार करणे, लोहार, लोखंडाचा शोध लागल्यानंतरची जात. लोखंडाच्या वस्तू तयार करणे. न्हावी, केस कापणे वा त्याच्या वस्तू बनविणे. गवंडी, घरे बांधणे. त्यानंतर ह्या कामावर देखरेख ठेवणारा एक घटक निर्माण झाला असन. त्यानंतर या घटकानं विचार करुन आपलीच मक्तेदारी कशी निर्माण करता येईन याचा प्रयत्न केला असन व त्यानं एक नवी व्यवस्था निर्माण केली असन. ज्याची अजिबात गरज नोयती. ती व्यवस्था असन धार्मिक विधी. अन् हे विधी करण्यासाठी त्यानं गुरव जात निर्माण केली असन. जो गुरव धार्मिक विधी करायचा. त्यानंच भाट जात निर्माण केली असन. भाट हा निरोप द्यायले जायचा. त्यानंच बनिया जात निर्माण केली असन. बनिया कोणतीबी गोष्ट त्याले तेल मीठ लावून सांगायचा का ते इतराईले पटन. अर्थात ही मंडळी वरीलप्रमाणेच कामं करत असतीन. जेणेकरुन त्याच कामावरुन त्याईले नावं देण्यात आली. ती नावं त्याईले वळखण्यासाठी देण्यात आली असन. 
         कामावरुन नावं आली असावीत जातीची. ती नावं वळख म्हणून आली असावीत. ज्यात जातीचा कुठलाबी संबंध नसन अन् भेदभावबी नसनच. परंतु तद्नंतर जाती पडल्या असाव्यात व राजवंश अस्तित्वात आले असावेत.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे आज मात्र भेदभाव हाये. तो भेदभाव काल जातीजातीत वाढला होता. आजबी देश स्वतंत्र्य झाला असला अन् संविधानबी बनलं असलं तरी थोड्याफार प्रमाणात हायेच. त्याचं कारण हाये ईदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या मनात ओतलेलं विष. अन् त्या ईदेशी आक्रमण कर्त्या लोकाईच्या मनात आपल्याच लोकाईनं बिंबविलेलं विष. आपल्याच काई लोकाईनं कामं व्यवस्थीत चालावीत म्हणून जे देखरेख ठेवण्याचं काम एका ईशिष्ट व्यक्तीले सोपवलं होतं. त्या व्यक्तीनं सोता तं आपलं काम केलंच नाई. तो देखरेखबी ठेवाले वा कामाची तपासणी कराले गेलाच नाई. परंतु कामाची तपासणी करण्यासाठी त्यानं आणखी एक व्यक्ती नियुक्त केला. ज्याले भाट नाव देलं गेलं. हा भाट लोकाईच्या कामावर लक्ष ठेवाचा. शिवाय बडबडबी करायचा. त्याच्या बडबडपणाले त्रासून लोकं त्याले काईबाई बोलत असतीन. त्याले अन् देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीलेबी. ज्यातून तो देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीले त्या लोकाईचं बोलणं सांगत येत असन. ज्यातून त्याच देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीनं एक नवा व्यक्ती नियुक्त केला व एक नवी व्यवस्था. तो म्हणजे गुरव व ते नवी व्यवस्था म्हणजे मंदीर. देव दानव, अंधश्रद्धा व भूत प्रेत. याच लोकाईले मुर्ख बनविण्यासाठी गुरव निर्माण झाला.
         तो देखरेख ठेवणारा व्यक्ती फार हुशार असन. त्याले माईत असन का हा माकडमानव हिंस्र प्राण्याईले घाबरतो. हा ईज कडाडल्यावर घाबरतो. हा अग्नीले घाबरतो. हा पाण्यालेबी घाबरतो. हा अमूक अमूक गोष्टीले घाबरतो व हा तमूक तमूक गोष्टीले घाबरतो. त्यामुळंच त्याले आणखी घाबरवावं लागन. जेणेकरुन तो आपलंच आयकन व आपल्याच बोलण्यानुसार वागन. असं मनात आणून त्यानं मंदिराची कल्पना सर्वाईसमोर मांडली व सांगतलं का त्यानं आपला फायदा होईन. ईज जास्त कडाडणार नाई. पाण्यात आपण बुडणार नाई. आगीपासून वाचता येईन. ह्या सर्व गोष्टी घडतेत. त्याचं कारण हाये, देव अन् भूत. भूतच या गोष्टी घडवून आणत असतेत. त्याचेवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याले मंदीर निर्माण कराले पायजे. त्यात देव बसवाले पायजे व त्याची पुजा अर्चना कराले पायजे.
         त्यानं मंदीर निर्मिती केली. तेथं देव बसवला. त्यानंच आपल्याच लोकाईले तेथं कामावर नियुक्त केलं. कोणाले गुरव म्हणून तं कोणाले भट म्हणून. त्यानंच आपल्याचकडून मोठ्या हुशारीनं कामं करवून घेतली. लोकाईनबी त्याचेवर ईश्वास ठेवला. त्यानंतर त्यानं त्याच मंदिरातील देवाईच्या बाबतीत आवडीनिवडी निर्माण केल्या. देवाले अमूक अमूक आवडतं. अमूक अमूक आवडत नाई. हे त्यानंच सांगतलं. त्यानंतर जे चामड्याचे काम करत होते. ती माणसं व ते चामड्याचं काम देवाले आवडत नाई. हेबी इतर लोकाईच्या मनात बिंबवलं व त्यांचा मंदिरात प्रवेश निषीद्ध असतो हेबी इतर चामड्याचं काम न करणाऱ्या लोकाईले सांगतलं. शिवाय मंदिरात देव निर्माण केला तरी ईजा कडाडतच होत्या. पावसाची भीती वाटतच होती. उन्हाळ्यात वणवे लागतच होते. तसं माणसानं पुन्हा सांगतलं का हे सगळं घडत हाये, त्याचं कारण म्हणजे मंदिरातलं चामड्याचं काम करणाऱ्याईचा प्रवेश. त्यालेच दुजोरा भाट व गुरव जातीनं देला. कारण त्याईले आयतं काम न करता अन्न मिळत होतं. ते का नाई बोलणार देखरेख ठेवणाऱ्या माणसाकडून. तशी त्याईनं पुष्टी देताच इथंच कट शिजला व चामड्याचं काम करणाऱ्या माणसाईचा मंदिरात प्रवेश निषीद्ध झाला. याचाच अर्थ असा का अशा देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीले ज्या लोकाईनं नियुक्त केलं होतं. त्याच लोकाईले त्यानं आपली अक्कल वापरुन बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्यानं हळूहळू त्या लोकाईले तोडून टाकलं अन् त्याईले तोडण्यासाठी असे असे नियम लावले. जे नियम त्याईनं न पाळल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षा होत असत. हे नियम होते त्या चामड्याचं काम करणाऱ्याईसाठी. देवाले त्याईनं चामड्याईचा ढोल बनवलेला व चामड्याईपासून बनवलेला ढोल चालत होता. मात्र तो ढोल बनवणारी जात चालत नोयती. तो त्याईचा भेदभाव होता. 
          ईशेष म्हणजे काल ज्याईनं आपण करत असलेली कामं व्यवस्थीत चालावीत म्हणून ज्याले नियुक्त केलं. त्याच माणसाईनं त्या लोकाईच्या पाठीत खंजर खुपसला. भेदभाव, देवादिक व अंधश्रद्धाचं शस्र वापरुन. आजबी तसाच भेदभाव हाये का ज्या भेदभावानं काल शासक असलेल्या लोकाईच्या जीवनातील जखमेवर मीठ चोळलं व त्याईले नेस्तनाबूत केलं. त्याईनं केलेला तो ईश्वासघातच. यावर ईचार कराले हवा होता. परंतु ईचार झाला नाई. परंतु आज तसा ईचार करण्याची गरज हाये अन् ईचारानुसार चांगलं वागण्याची गरज हाये. आपण तसा चांगला ईचार करुन चांगलं वागावं. जेणेकरुन आज त्याईलेबी समानतेनं जगता यावं. जातीभेद मिटवता यावा. तसंच समाजात सर्वाईच्या बरोबरीनं बसून सुख उपभोगता यावं यात शंका नाई.          
            चांभार समाज...... पुर्वी या समाजाले एका वंशाचं नाव होतं. जो एक राजवंश होता. ज्याचं नाव होतं चव्वर. चव्वर वंश राजा चव्वरसेनानं स्थापन केला. जो एक राजपूत राजा होता. चव्वर राजवंशाचंच नाव चांभाराईले मिळालं. या चव्वर राजवंशाईनं काश्मीर येथे राज्य केलं होतं व ते राज्य बरेच वर्ष टिकून होतं. ज्याचा संबंध बाप्पा रावलशी होता. ज्या बाप्पा रावलला चव्वरवंशातील एका राजानं आपली मुलगी देली होती. शिवाय त्यांचे राजस्थानच्या महाराणा सांगाशी चांगले संबंध असून तेथंबी काई चव्वर राजवंशाचे लोकं राहात होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा चामड्याशीन संबंधीत नोयता तं ते लोकं कपडे शिवत असत. कापड हे चामड्यासारखंच असतं. हे भावना लक्षात घेवून या चव्वर राजवंशाचे लोकं कापड शिवण्याचे कामं करत. ज्यायेळेस सिकंदर लोदीच्या काळात चांभाराचे गुरु असलेले रविदास व मुस्लीम गुरु सतना यांच्याशीन शास्रार्थ झाला. त्यायेळेस रविदासानं सतनाशीन पैज लावली होती. ते पैज होती जो शास्रार्थात हारेल. त्याले आपला धर्म बदलवावा लागन. परंतु त्यात मुस्लीम गुरु सतना हारले व त्याईनं पैजेनुसार मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला. ते पाहून सिकंदर लोदी निराश झाले व त्याईनं गुरु रविदासावर हमला केला. जो हमला परतावून लावण्यासाठी आपलाच बंधू समजत चव्वर राजवंश धावून आला होता व संत रविदासाले अभय देलं होतं. 
          चामड्याचं काम करत असणारा हा चांभार नव्हे तं हा चव्वर राजवंश. या राजवंशाईच्या काई काई चांभार समुदायातील राजाईले मुस्लीम राज्यकर्त्याईनं सन १४८९ मध्ये गुलाम केलं. जवा सिकंदर लोदी हिंदुस्थानात आला. 
        सिकंदर लोदी जवा हिंदुस्थानात आला. तवा त्यानं पायलं का या हिंदुस्थानाले एवढं लुट लूट लुटलं, तरीबी हिंदुस्थान सुजलाम सुफलाम असाच हाये. त्यानंतर त्यानं त्याचा अभ्यास केला. अभ्यासांती त्याले कळलं का ही वैभवसंपन्नता चांभाराशिवाय शक्य नाई. या चांभाराईनच हिंदुस्थानले वैभवसंप्पन्न ठेवलं हाये. तवा या भारतात असणाऱ्या चांभाराईलेच नाय तं चव्वर वंशालेच नेस्तनाबूत करावं लागन. तवाच हिंदुस्थानची ताकद कमी होईन. अन् जवा हिंदुस्थानची ताकद कमी होईन, तवाच आपल्याले हिंदुस्थानात राज्य करता येईन. त्यायेळेस चांभार लोकं हे हिंदुस्थानात बहुसंख्य संख्येनं होते. 
           सिकंदर लोदीच्या मनात आलेले तसे भाव. त्यानंतर सिकंदर लोदीनं चांभार समुदायातील लहान लहान ईखुरलेल्या व शुरवीर असलेल्या बऱ्याचशा टोळ्यांवर ईजय मिळवला. त्याईची शुरविरी गंडाले गेली. ज्याचं कारण होतं फितुरी. येथीलच आपल्याच माणसाईनं, ज्याईले चांभार राजवंशियांचं अस्तित्व खपत नोयतं, त्याईनंच कुरघोडी केली व चांभारांचं राज्य व अस्तित्व संपवलं. ते गुलाम झाले. त्यानंतर सिकंदर लोदी त्याईच्यावरबी अत्याचार करु लागला. त्याईले चमार म्हणून अपमानीत करु लागला. त्याईले कोणतीबी हिन दर्जाची कामे सांगू लागला. 
          सिकंदर लोदी केवळ चांभाराईलेच प्रताडीत करत नोयता तं तो चांभारांसारख्याच असलेल्या इतर जातीलेबी जसे, महार, मांग, खाटक, मेहतर, गोंड गोवारी या सर्व तत्सम जातीलेबी प्रताडीत करु लागला होता. त्याईलेबी अपमानीत करु लागला होता. ज्यातून निर्माण झालेली कलुषता आजबी टिकून हाये. याच मुस्लीम राज्यकर्त्याच्या सहकार्यानं येथेच राहणाऱ्या आपल्याच काई फितूर लोकाईनं आपली पोळी भाजली व चांभारांचं राजकीय अस्तित्व संपवलं.
           राम्या आजपर्यंत पाहात आला होता का काई लोकं बाबासाहेबाईले मानत नाईत. ते बाबासाहेबाईची हेळसांड करतेत. त्याईच्या नावानं मर्यादा आणतेत. म्हणतेत का बाबासाहेब आमचा हाये. असं बोलून कोणीबी बाबासाहेबाईले सिमीत करण्याचा प्रयत्न करतेत. त्यामुळंच त्याले वाटत होतं का बाबासाहेबाले कोणीबी सिमीत करु नये. बाबासाहेब काई एका ईशिष्ट जाती वा बिरादरीचे नाईत. ते एका ईशिष्ट धर्माचे नाईत तं ते सर्व धर्मियाईचे हायेत अन् सर्वच जातीचेबी. ते सर्वच पृथ्वीतलावर रायणाऱ्या लोकाईचे हायेत. 
          राम्या जरी चांभार जातीचा असला, त्याचा जन्म जरी चांभार जातीत झाला असला तरी तो बाबासाहेबाले आपला मानत होता. त्यामुळं त्यालेबी चीड येत होती त्या गोष्टीची. जवा लोकं बाबासाहेबाले आमचा बाबासाहेब, बाबासाहेब आमचे. आमच्या समाजाचे. आमच्या जातीचे व आमच्या धर्माचे म्हणत. तसेच ते तसं म्हणून बाबासाहेबाले सिमीत करण्याचे प्रयत्न करत असत. ज्यातून बाबासाहेबांबद्दल इतर समाजातल्या लोकाईत आकस निर्माण होवून त्याईच्या पुतळ्याची विटंबना केली जात होती. ज्यातून इतर समाजात आपल्याच जातीबद्दल आकस निर्माण होत होता व जातीय अत्याचाराच्या घटना घडत होत्या. त्या तशा घटना घडणं बरे नाई. असं राम्याले वाटत होतं. यासाठी आधी बाबासाहेबाले समजून घेणे गरजेचे हाये, असंबी राम्याले वाटत होतं. कारण बाबासाहेब हे तलवार हायेत. ईचारांची अन् एकतेची. ज्यातून समाजातले भेदभाव, अंधश्रद्धा, कुप्रथा व चमत्कार याईचा नाईनाट होवू शकते. हेच मत राम्याचं होतं. 
           राम्या चांभार समाजातला होता व तो शिवऱ्याचा मित्र. त्याले ईचार होता त्याच्याच जातीचा. त्याले वाटत होतं का त्याची जात उच्च हाये व त्याच्या जातीतून प्राचीन काळात राजे महाराजे रायलेले हायेत. त्याचं कारण होतं चांभाराईनं केलेलं राज्य. त्यानं कुठंतरी वाचलं होतं का गतकाळात एक सम्राट चंद्रगुप्त मौर्य नावाचा जो राजा होवून गेला. ज्याच्या नातवानं बौद्ध धम्माले राजाश्रय मिळवून देला. तो राजा त्याच्याच जातीतला होता. त्यायेळेस त्याची जात सुधरली होती. परंतु तद्नंतरच्या काळात जेबी चांभाराईच्या वाट्याले आलं होतं. त्यावरुन राम्याच्या मनात ईचार होता. राम्याले तसं वाटणं साहजीकच होतं. त्याचं कारण होतं त्यांचा दुसरा इतिहास. जो सम्राट अशोकाशी संबंधीत होता.
           अस्पृश्य जाती त्या का ज्या चामड्याचं काम करत असत. ज्यात चांभार, मांग, खाटक, महार अन् इतर काई जातीचा समावेश होतो. कालप्रवाहानं गावसमुदायाचं संरक्षण करण्याचं काम या जातीले पुर्वी देलं. तरीबी बदल्यात तथाकथीत समाजानं त्याईले का देलं? या अस्पृश्य जातीनं त्या काळात अतिशय हीन दर्जांची स्पृश्य समाजाची कामं केली. बदल्यात काय मिळालं? तं त्याचं उत्तर येईन, क्लेष, अपमान व हिनता. शिवाय या सर्व जातीचा इतिहास पायता या जाती जरी आधी वैदिक धर्मातल्या असल्या तरी कालांतरानं बौद्ध धर्म या देशात पसरला. त्यायेळेस या सर्व जाती या बौद्ध झाल्या होत्या हे नाकारता येत नाई व तमाम हिंदूस्थानातील रहिवासी असलेले सर्वच लोकं हे बौद्ध झालेले होते. याचा प्रत्यय सम्राट अशोकाच्या कारकिर्दीचा अभ्यास करतांनी दिसून येते. 
           सम्राट अशोक. त्या राजाचा अभ्यास करतांनी त्याआधी धनानंदाचा अभ्यास करावा लागतो. धनानंद हा असा राजा होवून गेला का ज्यानं आर्य चाणक्य नावाच्या शिक्षकाचा अपमान केला. ज्यातून आर्य चाणक्यानं प्रतिज्ञा केली होती का मी धनानंदाला संपविल्याशिवाय शेंडीले गाठ मारणार नाई. मंग त्यानं अशा मुलाचा शोध सुरु केला. जो हुशार असन. ज्याच्यात जिद्द असन व जो आपल्या जिद्दीच्या भरवशावर धनानंदाचा नाश करु शकन. अशातच त्याले आठवलं का तो ज्या भागात शिकवते. त्या भागात एक वस्ती हाये. जी वस्ती अस्पृश्याईची हाये. त्या वस्तीकडं कोणीबी जात नाई. कारण तेथील लोकं हे घाणेरडे रायतेत. कसेबी जगतेत. मेलेल्या प्राण्याईचे मांस खावून उदरनिर्वाह करतेत. परंतु शूर हायेत. धनानंदाले सैनिक लागले तं तो त्याच वस्तीतून आणते याचीबी कल्पना आर्य चाणक्याले होती. तसा तो शोध घेत असतांनी त्याच वस्तीतून जात होता. त्यावेळेस आर्य चाणक्यानं पायलं का एक मुलगा एकटाच एका वानराच्या कळपाले हाकलत हाये व त्याच्या त्या चातुर्यबुद्धीनं सर्व वानर त्या वस्तीतून पळाले हायेत. बस त्यानं त्या मुलाची बुद्धीमत्ता हेरली व ईचार केला. आपण याले न्यावं. याले शिकवावं व यालेच तयार करावं. जो धनानंदाचा नाश करु शकेल. 
          आर्य चाणक्य त्या मुलाच्या जवळ गेले. त्याले त्याचं नाव ईचारलं. त्यानं त्याचं नाव चंद्र्या सांगतलं. त्यानंतर त्याचं घर ईचारलं व ते त्या मुलाच्या घरी गेले. त्यायेळेस चाणक्य त्याच्या मायबापाले बोलले. मले आपला मुलगा द्यावा. मी माह्या मुलगा म्हणून याचा सांभाळ करीन. मीच याले वाढवीन व मीच याले शिकवीन. त्यावर त्या मुलाचे मायबाप नकार देवू लागले. शतशः चाणक्यानं शेवटपर्यंत ईनंती केली व शेवटी म्हणाले, 
         "मी या मुलाचं भविष्य ओळखलं आहे. तुमचा हा मुलगा एक दिवस या राज्याचा राजा बनन अन् ते पवित्र कार्य मी करणार. आतं तुम्हीच ठरवा तुमच्या मुलाले राजा बनवायचे हाये का असंच गावात ठेवायचे हाये."
          बस तेच बोलणं. ते शेवटचं बोलणं. तसं नाई नाई म्हणता त्या मुलाच्या मायबापानं आपला मुलगा आर्य चाणक्याले देला व चाणक्यानं असं काई त्याले शिकवलं का त्यानं धनानंदाचा नाश केला व तो राजा बनला. हा मुलगा दुसरा तिसरा कोणीबी नसून लहानपणचा चंद्र्या होता. जो अस्पृश्य वस्तीतला होता व तोच पहिला अस्पृश्य जातीतून पहिला राजा बनला होता. त्यानं चाणक्याले नमन करुन त्यालेच राजगुरु बनवलं. त्यायेळेस चाणक्यानं हा स्पृश्य हा अस्पृश्य असा भेदभाव केला नोयता. त्यायेळेस आर्य चाणक्याला सर्व लोकं ओळखतच होते. 
         आर्य चाणक्यानं राजपदावर बसवलेला व्यक्ती एका चांभार जातीचा होता. त्यायेळेस भेदभाव व स्पृश्य अस्पृश्यता नोयती. जातीभेद तं अजिबातच नोयता. चंद्रगुप्तानं गादीवर बसताच त्यानं साम्राज्यविस्तार केला. तेच सुत्र इतरबी त्याच्या वंशजाईनं अवलंबलं. त्यानंतर त्याचाच वंशज सम्राट अशोक गादीवर बसला. त्यानंबी साम्राज्यविस्तार करण्यासाठी साम्राज्यवादी धोरण अवलंबलं. अशातच कलिंगचं युद्ध झालं. युद्धात विजय मिळाला होता. परंतु कोण कोण आपल्याकडले सैनिक मरण पावले हे पायण्यासाठी तो कलिंगच्या युद्धभूमीवर फिरु लागला. ज्यात बरेच सैनिक मरण पावले होते. काई सैनिक जीवंत होते. त्यातच काई सैनिकांचे हात तं काई सैनिकांचे पाय तुटले होते. काई सैनिक शत्रूपक्षातलेबी होते. काई सैनिकाईची मुलं व बायका त्या सैनिकांजवळ बसून विलाप करत होते. ते पाहून वाटत होतं का युद्ध करुच नये. काय मिळवतो आपण युद्ध करुन. शेवटी मरतांनी ना राज्य नेत ना काई. त्यानंतर सम्राट अशोकाच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला व त्यानं त्यावर उपाय काढला. आपण बौद्ध धम्म स्विकारायचा. ज्या धम्मात शांततेले व अहिंसेले प्राधान्य देलं हाये. 
          सम्राट अशोकानं तसं ठरवताच त्यानं बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचबरोबर दोन चार लोकं जर सोडले तं संपुर्ण हिंदुस्थान बौद्धमय करुन टाकला. ज्यात महार, मांग, खाटक चांभारच नाई तं इतर सर्वच जाती होत्या. त्यातच त्याले बौद्ध धम्म चांगला वाटत असल्यानं सोताची मुलं संघमित्रा व राहूल याईले त्या धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेत पाठवले. तेथून ते म्यानमार व इतर देशात गेले. 
         सम्राट अशोकानंतर बौद्ध धम्म काई दिवस जीवंत रायला. त्यानंतर या हिंदुस्थानात तुकड्या तुकड्यात असलेल्या व ईखुरलेल्या बऱ्याच राज्याईनं बौद्ध धम्माले राजाश्रय दिला. परंतु समाजातबी असे काई लोकं होते का ज्याईले साम्राज्यईस्तारवादी धोरण आवडत होतं. अहिंसा नाई. अशातच पुष्यमित्र शृंग नावाच्या दासीच्या मुलालेबी अहिंसेचं तत्व मान्य नोयतं. त्यानं सम्राट अशोकानंतर इथं आलेल्या त्याच्या वारसाईची हत्या केली व इथलं राजपद हातात घेतलं. त्यानंतर त्यानं येथल्या बऱ्याच बौद्ध भिख्खूंची हत्या केली. त्यातच काई लोकाईनं मरण्याच्या भयाच्या भीतीनं पळ काढला. ज्यातून ते इतर देशात पळून गेले. परंतु त्याईनं आपला धर्म सोडला नाई. त्याईनं आपल्या धर्माची तत्वे इतर देशातल्या राज्याईले सांगतली. त्याईले ते पटली व बौद्ध धम्म जीवंत रायला नव्हे तं ईदेशात पसरला. 
         तमाम हिंदूस्थानातील बौद्ध झालेली जनता. इथं रायणारी सर्वच बौद्ध जनता पळून गेली नाई. ते इथंच रायली. त्यातच कोणी बौद्ध असल्यास पुष्यमित्र शृंगाचे सैनिक कापून फेकत. तो त्रास नको म्हणून येथील रहिवासी असणाऱ्या लोकांईनं नोको असतांनीबी पुष्यमित्र शृंगांचा धर्म स्विकारला. तसं पायल्यास त्या काळात जनतेचा पायजे तो धर्मच नव्हता. ज्या राज्याचं शासन. त्या राजाचा जो धर्म, तो त्या जनतेलेबी स्विकारावा लागत असे. जरी मनात इच्छा नसली तरी. अशारितीनं पुन्हा एकदा संपुर्ण समाज ढवळून निघाला व वैदिक धर्माचा अनुयायी बनला. ज्यात महार, मांग चांभारच नाई तं इतरबी बरीच मंडळी होती. पुळं याच हिंदुस्थानात मुस्लीम जवा आले. त्याईनंबी तेच केलं. त्याईनंबी आपला धर्म प्रसवला व त्यायेळेसबी बरेच लोकं मुस्लीम बनले. परंतु काई काई लोकं कट्टर होते. त्याईनं आपला आपला धर्म जीवंत ठेवला. प्रसंगी त्याईनं धर्मासाठी प्राण दिले. परंतु धर्म बदलवला नाई. तेच पाहून धर्माबाबतची आत्मीयता धर्मातीत लोकाईमंधी निर्माण झाली व सामान्य जनतेनंबी आपआपला धर्म बदलवला नाई. तो टिकवून ठेवला. काईनं पळून जावून तं काईनं अज्ञात रुपात राहून. काईनं अंतर्मनात ठेवून संधीची वाट मोकळी होईपर्यंत तो धर्म टिकवून ठेवला. महत्वपुर्ण गोष्ट हे का काल आर्यांनी काई कथीत स्वरुपाच्या पोथ्या व पुराणांच्या आधारावर, देवाईची भीती दाखवून तं काईनं कापून टाकण्याचा धाक दाखवून आपला धर्म टिकवला. काईनं पळून जावून आपला धर्म टिकवला. काईनं राजा म्हणन त्या पद्धतीनं धर्म बदलवला. तसा धर्म हा लवचीकच होता व तो कवाबी बदलवता येतच असे. तसं पायल्यास त्या काळात जनता ही पायजे त्या प्रमाणात सुशिक्षीत नोयती. ते अज्ञानी होती. परंतु आज, आज जनता ही अज्ञानी नाई. आज सुशिक्षीत हाये व ईचार कराले स्वतंत्रबी हाये. ते समाजाचा ईचार करु शकते. कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट हाये यावर. असे असतांनीबी आज धर्मपरीवर्तन. ही चिंतेचीच बाब हाये. मुळात कोणता धर्म चांगला अन् कोणता धर्म वाईट? त्या धर्माचा इतिहास काय? शिवाय तो धर्म पुर्वीच्या काळात कसा होता, कसा नाई? त्या धर्मात चमत्कार हायेत का अन् असतीन तं खरंच आज विज्ञान युग असतांनी खरंच चमत्कार होवू शकतेत का? काल पाऊस देव पाडत होता, असं जी माणसं म्हणत होती. ते खरंच सत्य हाये का? चंद्र, सुर्य खरंच देव हायेत का? त्या ठिकाणी नेमकं काय हाये? कोणत्या धर्मात भाकडकथा हायेत व कोणत्या धर्मात भाकडकथा नाईत? कोणता धर्म अंधश्रद्धा प्रसवतो व कोणता धर्म त्या अंधश्रद्धा प्रसवीत नाई? अन् आजच्या काळात कोणता धर्म आपल्या लायक हाये? या सर्व गोष्टीचा ईचार करण्यासाठी आपण लायक हाओत. आज ईज्ञानानं बरीच प्रगती केलेली असून चंद्र सुर्यावर नेमकं काय हाये हेबी ईज्ञानानं दाखवून देलं. आज पाऊस कसा पडते. ईजा कशा चमकतेत हे कोणत्याबी धर्मातून सांगण्याची गरज नाई. आज आजार हा औषधानं सुधारते. कोणताच मांत्रीक सुधरवत नाई. ना कोणता धर्मबी. आज कोणाचाच जन्मबी कोणाच्या पोटातून मुखातून होत नाई. या साऱ्या गोष्टी आपल्याले ईज्ञानानं शिकवल्या. मग काय गरज हाये आपल्याले धर्म चमत्कार करते असं मानून धर्म परीवर्तन कराची. कारण बरेचसे धर्म आज असेच चमत्कार सांगून व अंधश्रद्धा पसरवून समाजाचे धर्मपरीवर्तन करीत हायेत. शिवाय आज धर्मांध राजे नसतांनाबी अन् भीती नसतांनाबी काई लोकं हे घरात एका खोलीत येगळाच धर्म ठेवतेत व पुजापाठ करतेत अन् बाहेर येगळा धर्म ठेवतेत. तशा जातीबी. घरात एक जात असते अन् बायेर एक जात.
           ईशेष म्हणजे मी हिंदू, मी बौद्ध, मी मुस्लीम हाये. असं बोलून वा मी अमुक अमुक जातीचा हाये. असं बोलून चालणार नाई. आपण कोणीबी असान तरी चालन. परंतु एकच निर्धार ठेवावा. सत्य बोलावं. दोगली जबान ठेवू नये. तसं पायल्यास अत्याचार हा कोण्या एका समुदायातल्या धर्मानं केला नाई तं अत्याचार हा सर्वच धर्माच्या समुदायानं केला. काईनं कमी केला तं काईनं जास्त. तसा त्याईनं अत्याचार केला नाई तं आपण करवून घेतला. कारण जेवढा अत्याचार करणारा गुन्हेगार असते. तेवढाच अत्याचार सहन करणाराबी गुन्हेगार असतेच. ज्याले काई मंडळी फेक समजतेत. मात्र डॉ. बाबासाहेबाईनंच अशा समाजातल्या इतर धर्मातल्या अनैतिक गोष्टीचा धिक्कार केला. म्हणूनच आपण आज बोलतो हाओत. त्याईनं प्रत्येकच धर्माले नाई तं जातींलेबी स्वतंत्र्यता मिळवून देली. तशीच स्वतंत्र्यता प्रत्येक माणसांईलेबी मिळवून देली. 
          ईशेष म्हणजे काल डॉ. बाबासाहेब जवा संघर्ष करत होते. तवा खुद्द बाबासाहेबाले काई समाजातल्या माणसाईनबी मदत केली नाई. मनुस्मृती जवा जाळली. तवा दहन समितीचे अध्यक्षच खुद्द बापूसाहेब होते व जे एक ब्राह्मण होते व ज्याईले जाती प्रथा पटत नोयती. ना इथल्या कुप्रथा. असे अनेक उच्च जातीतले लोकं होते का त्याईनं बाबासाहेबाईच्या कार्याले मदत केली. तवाच संविधान बनलं. तसंच महाडातलं चवदार तळे प्रकरण असो वा भंडाऱ्याची पोटनिवडणूक असो, बाबासाहेबाले आपल्याच समाजानं धोके देले. हा इतिहास हाये. मात्र आता आपल्याले त्याचं काय करायचं. समाजात उगाचंच हिंदू बौद्ध असा कलह नोकोच. वाद नोकोच. आतातरी समाजानं सुधरावं व समाजात एकता निर्माण करुन एका ध्वजाखाली एकत्र यावं. जेणेकरुन डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातले राष्ट्र वा भारत निर्माण करता येईन. मात्र सत्य पचाले कठीण जाते. आपण आपले आपापसातच भांडतो. त्यामुळंच ते आपल्यावर राज करतेत. 
           आज प्रश्न पडला हाये का कधी होईल आपल्या समाजाची एकी? आज घराघरात राजकारण हाये. चार पाच नाई तं प्रत्येक घरातल्या व्यक्तीप्रमाणे पक्ष हायेत व गट बनले हायेत आपल्या समाजाचे. प्रत्येक घरात पक्ष हायेत. परंतु यावर आपण ईचार कराले पायजे का बाबासाहेबाईनं आपल्याले हेच शिकवलं काय? निदान आपल्या समाजाचा एकच पक्ष चालू द्याले पायजे. परंतु ते कामबी नीट आपल्यानं होत नाई व आपण एकतेची गोष्ट करतो. जे आजची परिस्थिती पायता शक्य नाई.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे काल मनूचा एवढा पगडा होता का बाबासाहेबाईले एकता निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यासाठी इतर समाजातल्या लोकाईची मदत घ्यावी लागली व त्याईनंबी सढळ मनानं मदत केलीबी. कारण त्यातल्याच काई लोकाईले मनुच्या कायद्यानुसार येथीलच बांधवावर होणारे अत्याचार पटत नोयते. त्याईले येथल्याच बांधवावर लादलेल्या व अंधश्रद्धेनं ओतप्रोत भरलेल्या प्रथा, ज्याईला कुप्रथा म्हणता येईन, त्या पटत नोयत्या. मात्र काल बाबासाहेबांच्या कार्याले मदत न करणारे आज गर्वानं सांगतेत का बाबासाहेब आमचे. असं म्हणत बाबासाहेबाले सिमीत करतेत. त्याचाच परिणाम असा होत हाये का इतर समाज बाबासाहेबाचा जातीच्या आधारावर द्वेष करत हाये. त्याईनं केलेलं कार्य ईसरत हाये व त्याईले दूर लोटत हाये. हे केवळ आपल्यामुळेच घडत हाये. ते काई बरोबर नाई. बाबासाहेब हे सर्वांचेच हायेत. महामानव हायेत. ते केवळ एकाच जातीचे नाईत अन् केवळ एकाच धर्माचे नाईत हे आपण लक्षात घ्याले पायजे. तसंच त्याईनं संविधान केवळ आपल्या एकट्याच्याच जातीसाठी वा धर्मासाठी निर्माण केलेलं नसून ते सर्वच जातीधर्मासाठी निर्माण केलेलं हाये. हेबी तेवढंच लक्षात घ्याले पायजे.
           राम्याले वाटत होता भेदभाव नष्ट व्हावा. जात व धर्म परीवर्तन नष्ट व्हावं. धर्माच्या नावावर भेदाभेद करु नये. या जगात कोणी स्पृश्य नाई व कोणीच अस्पृश्य नाई. तसा चांभार समाजबी. चांभार समाजानं काल जरी राजपद धारण केलं असलं तरी आज चांभार समाज सुधारणेपासून कोसो दूर होता. ज्याईची खंत राम्याले वाटत होती. कारण सत्य परिस्थिती येगळीच होती. तसा तो कधीकधी खंतबी व्यक्त करत असे. 
           आज चांभार समाज सुधारणेपासून बऱ्याच लांब हाये. त्याचं कारण हाये, त्याईची ते समज. तो समाज ते गोष्ट समजायलेच तयार नाई का कशानं आपला ईकास होईन. शिवाय आज चांभार समुदायाले हेच माईत नाई का नेमका कोणत्या समुदायानं कोणत्या समुदायावर अत्याचार केला? का अत्याचार केला? कसा अत्याचार केला? शिवाय ज्या समुदायानं कमी अत्याचार केला. त्यांचंच तुणतुणं वाजवत हा समाज फिरतो हाये. परंतु सोताचा ईकास कसा होईन याचा ईचारच करत नाई.
          राम्याले जशी चांभार समाजाची खंत वाटत असे. तसं त्याले वाटत होतं का चांभार समाजाचाबी ईकास होवू शकते. जर त्याईनं पिढीजात असलेले धंदे सोडले तर...... कारण केवळ पैसा जास्त आल्यानंच ईकास होत नसतो. ईकास दिसण्यासाठी पायजे असते शिक्सन. जे शिक्सन समाजातल्या फक्त थोडक्याच लोकाईले हाये. अन् जे शिकले, ते लोकं इतर आपल्या बांधवाईले शिकवाले मदत करत नाईत. ते त्याईले तशी मदत व्यवसायातबी करत नाईत. हं, करत असतेत थोडीशी मदत ते लहानशा टपऱ्या टाकण्यात. कारण वाटत असतं का ज्याले आपण मदत करणार. तो व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त वरच्या पातळीवर जाले नोको. तो मी ज्या स्थितीत हाये. त्याच्या थोडा खालीच राहाले हवा. याबाबतीत महाडच्या चवदार तळ्याचं एक उदाहरण व ते उदाहरण बोध घेण्यालायक हाये. 
         राम्याले आज आठवत होतं ते उदाहरण. महाडमध्ये चवदार तळ्याचं आंदोलन झालं. त्यायेळेस बाबासाहेब चांभार समाजाजवळबी गेले. म्हणाले, 
          "आपल्या महाडातच आमचं आंदोलन हाये. हे आमचं आंदोलन नसून तुमचं आंदोलन हाये. तवा आपण आम्हाले सक्रीयतेनं मदत करावी."
           ते बाबासाहेबांचं बोलणं. त्यावर उत्तर देत महाडातले बरेच व्यक्ती म्हणाले, 
            "बाबासाहेब, आम्ही सधन हाओत. आम्हाले तुमच्या आंदोलनाची गरज नाई. आम्ही आमचं पाहून टाकू. तुम्ही जा. आम्ही जर तुम्हाले थोडीशीबी मदत केली वा तुमच्या आंदोलनात सक्रीयतेनं सहभागी झालो तं येथील इतरेतर समाज आम्हाले जगू देणार नाई. आमच्या आईबहिणीवर तो समाज अत्याचार करन." 
           ते त्याईचं बोलणं. तो समाज आलाच नाई बाबासाहेबाईले त्या काळात त्या आंदोलनात मदत कराले. शिवाय जातीभेदानं जरी त्याबी काळात चरणसीमा गाठली असली तरी चांभार समाजातले काई लोकं त्याबी काळात धनधान्यानं सधन होती. ती शिक्सणानं सधन नोयती. असं जरी असलं तरी भेदभावाच्या शृंखलेनं केवळ महाडातच नाई तर संपुर्ण हिंदुस्थानात भेदभाव होता. 
           आज हाच समाज सांगत हाये शहाणपण का बाबासाहेबाईच्या ईचारावर चाला. अन् प्रत्यक्षात समाजाले टपऱ्या मागाले सांगत हाये व पिढीजात धंदे कराले सांगत हाये. जे बाबासाहेबाईले अभिप्रेत नाई. बाबासाहेब सोता म्हणत होते का हे पिढीजात धंदे सोडा. त्याचं काय? केवळ पैशानं अन् धनधान्यानं समाज अग्रेसर झाला म्हणजे समाजाचा ईकास झाला असा त्याचा अर्थ होत नाई. ईकास हा सर्वतोपरी व्हाले पायजे. जेणेकरुन समाजाची एक ईशिष्ट वळख निर्माण होईन व कोणीबी समाजाकडे बोट दाखविणार नाई. हे बरोबर हाये. परंतु आज या समाजाकडे लोकं बोट दाखवतेत. ताशेरेबी ओढतेत, जरी हा समाज धनधान्यानं व पैशापाण्यानं सधन असला तरी. त्याचं कारण हाये. आजच्या काळात या समाजातल्या लोकाईवर होत असलेले अत्याचार. असे अत्याचार झाल्यास समाजातले इतर माणसं त्याले मदत करत नाईत. मंग तयार होते समस्या. ज्यातून इतर समाज त्याच गोष्टीचा फायदा घेत असतेत. आपल्या समाजाचा दुर्बलपणा पाहून. 
         महाडातबी तेच झालं. त्याईचीच त्या काळातील बिरादरीनं बाबासाहेबाले मदत केली नाई. महाडातील एक चांभार व एक ब्राह्मण व्यक्ती जर सोडला, तं कोणीच बाबासाहेबांच्या आंदोलनाले गेले नाईत. मदतबी केली नाई. कारण त्याईले माईत होतं का हा संपुर्ण इतरेतर समाज आपण आंदोलनात गेल्यास आपल्याले मारुन टाकन. आपल्या आईबहिणीवर अत्याचार करन. 
           राम्याले वाटत होतं का आज समाजानं शिकावं. मोठमोठ्या पदावर जावं. समाजाले शिकवावं. शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. केवळ टपऱ्या मागून समाजाचा ईकास बाधीत करु नये म्हणजे झालं. तवाच समाज पुळं जाईन व समाजाची उन्नती होईन यात शंका नाई. त्या समाजाचा जो गौरवशाली इतिहास हाये. तो अबाधीत राहू शकन. त्यात वाढ होवू शकन. त्यात कोरी पानं अजिबात रावू नयेत म्हणजे झालं. 
           राम्याले आपल्या समाजाची जे खंत वाटत होती. त्यात बव्हंशी सत्यता होती. कारण कालचा चांभार समाज स्वाभिमानानं जगत होता अन् आजचा चांभार समाज लाचारीनं जगत होता. तसा तो आणखी ईचार करत होता आपल्याच समाजाचा. ज्यातून त्याच्याच समाजाची नाई तं इतरबी समाजाची धुळधानी केली होती. अशी धुळधानी करण्यासाठी अशा काही प्रथा निर्माण केल्या होत्या का त्यातून साहजीकच समाजाची धुळधानी झाली होती नव्हे तं त्यातून तेवढीच अधोगतीबी. 
           माकड रुपातील मानव झाडावरुन खाली येताच त्यानं आपल्या पोटाची गरज पुर्ण करण्यासाठी कामाची निर्मिती केली व हे कामं सुकररितीनं पार पडावीत म्हणून त्यानं त्यावर एका व्यक्तीची देखरेख करण्यासाठी निवड केली. मात्र अशा व्यक्तीनं आपलाच स्वार्थ पाहात आपल्याले काईच काम करावं लागू नये. तसंच आपलं इतर लोकाईनं आयकावं. आपल्याले त्रास देवू नये. आपण त्याईले हवेहवेसे वाटावे म्हणून मंदीर कल्पना आणली. त्यातच देवाचे भय दाखवून त्यात भावार्थ भरला. व्यतिरीक्त काही अंधश्रद्धाबी भरल्या. पयली अंधश्रद्धा होती रथयात्रा. त्या व्यक्तीनं देवाच्या नावानं रथ काढण्याची प्रथा सुरु केली होती. तो रथयात्रा काढायचा व त्या रथाखाली लोकाईले झोपावयास लावत असे. जो व्यक्ती देवाचा आवडता. तोच मरण पावेल. अशी प्रथा पाडली होती. ज्यात लोकं स्वखुशीनं झोपत असत व मरत असत. ते आत्महत्याच असे. अशी ते प्रथा होती. जर तो व्यक्ती मरण पावला तं त्याले मोक्ष मिळालं. असा त्याचा अर्थ होत असे. अशा लोकाईच्या आंगावरुन तो रथ न्यायचा. त्यात जो वाचला. तो सोतालेच पापी समजायचा व त्याचेवर देवाची असीम कृपा नाई असं समजलं जायचं. तसाच जो मरण पावला तं त्याले पुण्यवान समजलं जाई. याच त्याईच्या धोरणामुळं कित्येक लोकं त्या रथयात्रेखाली झोपत व त्यातले बरेच मरतबी पावत असत. त्यातच अशा प्रकारानं त्या व्यक्तीच्या मार्गातील अनेक काटे आपोआपच दूर होत असत काईबी न करता, केवळ देवाईच्या नावावर. शिवाय त्याच मोक्षाच्या नावाखाली त्याचं नावंबी मोठं होत असे. 
         दुसरी प्रथा होती, तिबी मंदिरातलीच. एक मंदीर व त्या मंदिरातील एक विहीर. त्या विहिरीत जीव देल्यास मोक्ष मिळतो असं लोकाईचं म्हणणं. या प्रथेतबी बरेच लोकं स्वखुशीनं जीव देत. त्यातच त्या माणसाईचं कार्य अतिशय सुकर पद्धतीनं होत असे. 
           तिसरी प्रथा होती, गंगाप्रवाह. या गंगाप्रवाहात जे लोकं चामड्याचे काम करत. त्या मंडळीले तो सांगत असे का त्याईनं आपलं पहिलं अपत्य गंगेत सोडावं. म्हणजे त्यांचेवर देवाची जास्त कृपा रायते. या प्रथेत तं त्याईचा जास्तच फायदा होता. कारण चामड्याचं काम करणारे लोकं जास्तच हुशार असायचे. शिवाय शुरवीरबी. त्यातच त्याईनं पयलं अपत्य गंगेले सोडताच वा समर्पीत करताच ते सोताचं लेकरु असल्यानं दुसरं अपत्य जन्माले घालतांनी त्याईच्या स्रीवर्गाची मानसिकता ही ढासळून जात असे व दुसरं किवा तद्नंतरचं अपत्य तेवढं धष्टपुष्ट व शुरवीर जन्मास येत नोयतं. ज्यातून चामड्याचं काम करणाऱ्या सर्व लोकाईची पिढी पुढील काळात अशीच दुर्बल जन्मास येत होती. 
          चवथी प्रथा आणली होती त्यानं चरकपुजा. या प्रथेत एक चरखा राहात असे. ज्या चरख्याला लांब दोरखंडानं एका व्यक्तीला बांधलं जात असे. त्यानंतर चरखा वर लटकावून त्याले जोरात फिरवलं जात असे, त्या व्यक्तीचा जीव जाईपर्यंत. ज्यात संबंधीत व्यक्तीचा जीव गेला का तो भाग्यवान होता असे मानले जात असे. ज्यात कितीतरी कुलीन लोकं मरत असत. त्यानंतर पाचवी प्रथा त्यानं आणली होती. ते म्हणजे नरमेध. या प्रथेत अनाथ वा निर्धन असणाऱ्या व्यक्तीले जाणूनबुजून जबरदस्तीनं यज्ञात बळी म्हणून कापले जात असे. ज्यात बऱ्याच लोकाईचा समावेश असे. परंतु त्या प्रथेत देवाच्या नावानं तसा नरबळी देला जात असल्यानं कोणीबी ईरोध करत नसत.
         सहावी प्रथा होती सतीप्रथा. या प्रथेत कर्तबगार असलेल्या स्रियांचा विवाह जाणूनबुजून म्हाताऱ्या व्यक्तीशीन करुन देण्यात येई व आपला डाव साधवण्यात येई. ज्यात असा म्हातारा मनुष्य व तिचा पती मरण पावलाच तं त्याच्याच निधन पावल्यावर तिच्या पतीच्या शरणावर जाणूनबुजून जबरदस्तीनं जाळलं जात असे. ज्यातून तरुण असलेल्या कर्तबगार स्रिया आपोआपच त्या व्यक्तीच्या रस्त्यातून दूर जात असत.
         सातवी प्रथा होती कन्यावध. पयली कन्या झालीच तं तिची देवीच्या चरणावर बळी चढवण्यात येत असे. हे प्रथा चामड्याचं काम करणाऱ्या लोकाईच्याच घरात होती. त्याचं कारण होतं भय. कर्तबगार व शुरवीर अपत्य चामड्याचं काम करणाऱ्या लोकाईच्या घरात जन्माले येवू नये. कारण गंगाप्रवाह प्रथेसारखं अशा कन्यास्वरुपात पयल्या अपत्याची हत्या केल्यास ज्या स्रिचं ते अपत्य असे. त्या स्रीवर आघात होईन व ते स्री दुसरं अपत्य जन्माले घालतांनी तेवढ्या सक्षमपणानं जन्माले घालणार नाई व आपोआपच गंगाप्रवाह प्रथेसारखी दुर्बल संतती जन्मास येईन. जी त्या व्यक्तीसमोर संकट निर्माण करणार नाई. 
           आठवी प्रथा होती, महाप्रस्थान. हे प्रथा पाण्यात सोताले बुडवून घेवून वा अग्नीत सोताले जाळून घेवून मोक्ष प्राप्त करण्याची प्रथा होती. म्हणलं जात असे का देवाच्या नावानं असे केल्याने देवाच्या लवकर जवळ जाता येते. 
         नववी प्रथा होती, ती म्हणजे तृषानल. या प्रथेत लोकं गवतात वा तणसमध्ये सोता जळत असत. त्यासाठी ते आपल्या अंगाभोवती गवत वा तणस गुंडाळून आपल्या शरीराले सोताच अग्नी लावून घेत. ते तणस किवा गवत अशाप्रकारे सोताच्या शरीराले गुंडाळून घेत का ते गवत वा ती तणस, त्याले अग्नी लागल्यानंतर किंचीतबी निघून जाणार नाई. 
           दहावी प्रथा होती हरीबोल. या प्रथेत ज्याईले असाध्य रोग असायचे. त्या सर्वाईलेच पाण्यात खोल जावे लागत असे वा त्याले नावेनं नेवून सोडलं जात असे. ज्यात त्या व्यक्तीले बुचकाळ्या माराव्या लागत असत. मंग तो अर्धमरा झालाच का त्याले तेथंच सोडून देण्यात येत असे. त्यानंतर त्याचा जीव निघून गेलाच का त्याले मोक्ष प्राप्त झाला असे मानण्यात येई.
          अकरावी प्रथा होती भृगृपन्न. या प्रथेत व्यक्तीनं सोताच कड्यावरुन उडी मारावी व मृत्यूले कवटाळावं तेही देवाच्या नावावर. यात तो व्यक्ती मरण पावलाच तर मोक्ष प्राप्त होईन व तो देवाच्या लवकर जवळ जाईन. अशीबी प्रथा निर्माण केली गेली.
           बारावी प्रथा होती धरना. आपल्याच हातानं कुणाच्याबी दारासमोर चाकूनं सोताले भोपून मरण पावणं व हिंमत होत नसल्यास दुसऱ्याले भोप म्हणणं अन् तसा तो व्यक्ती करीत नसन तं त्याच व्यक्तीच्या घरासमोर थांबणं अर्थात धरना देणं. ही कृती सुद्धा देवाले समर्पीत होती.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे माकडरुपात मानव जवा पृथ्वीतलावर राहाले लागला. तवा येथल्या काई स्वार्थपीडीत काई लोकाईनं देवाददेवादिकाईच्या, आपल्यापेक्षा इतर समाज वरचढ ठरु नये, म्हणून कुप्रथा सुरु केल्या होत्या. त्याचं कारण होतं आपली मक्तेदारी निर्माण करणं. ज्या मक्तेदारीतून समाज सोताच मरत होता देवाच्या नावानं नव्हे तं सोता आत्महत्या करत होता मोक्ष मिळते म्हणून. परंतु त्यात मोक्षप्राप्ती नोयती तं स्वार्थ लपलेला होता. तसाच नवा डाव होता. ज्या डावानं साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशी अवस्था इतर लोकाईची होत होती. समाजाचीबी अगदी तशीच अवस्था होत होती. हेचपायलं होतं डॉ. बाबासाहेबाईनं. म्हणूनच त्याईनं समाजसुधारणेचा ध्यास घेतला होता व संविधान बनवून आपलाच समाज नाई तं इतरबी समाज घडवला होता. 

          ************************************************