Swatantra - 1 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | स्वातंत्र्य - भाग 1

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 70

    નિતુ માટે જન્મેલ નવીનનું નાનકડું આકર્ષણ દિવસેને દિવસે પ્રબળ...

  • દાદા ભિષ્મ

    પૌરાણિક દ્રષ્ટાંત કથા –                      પિતામહ ભીષ્મની...

  • અધુરો પ્રેમ

    જિગ્નાસુ ખુબ જ સરળ અને શાંત છોકરી.... પરીવાર મા વડિલ અને નાન...

  • વહુના આંસુ

    સવીતા રસોડામાં રસોઈ કરતી હોય છે,  ત્યાં જ છાંયા બહેન જોરથી ચ...

  • ભાગવત રહસ્ય - 164

    ભાગવત રહસ્ય-૧૬૪   પિતાજી નામદેવને કહે છે- કે “સવારે વહેલા જા...

Categories
Share

स्वातंत्र्य - भाग 1

शिवराम, संपत, रामा, तिमा अन् सोमा व शंकर असे ते मित्र. त्याईचीबी दाट मैत्री होती. एकप्रकारे लोखंडाचे तुकडे होतीन. परंतु त्याईच्या मैत्रीचे तुकडे होणार नाई अशी त्याईची बालपणीची मैत्री होती. ते सगळेच बालपणात एकाच शाळेत जात होते. त्यातच शिक्षणाचं महत्व असल्यानं त्या सप्प्याईच्या मायबापाईनं त्याईले शाळेत टाकलं होतं. मात्र संप्यावर बाबासाहेबाईच्या ईचाराचा प्रभाव पडला अन् तो शिकत गेला व लयच मोठा झाला होता. त्यातच राम्याबी थोडासा कमीच शिकला होता.  शिवराम थोडा जास्त शिकला होता तं सोमा सात वर्ग. तिमा शिकला होता दोन वर्ग. सोम्यानं आपल्या बापाचाच धंदा पकडला होता तं राम्यानंबी आपल्या बिरादरीतलाच धंदा पकडला होता. ते दोघंबी बक्कळ पैसा कमवत होते व आज स्वातंत्र्यानंतर त्याईच्या घरी मोठमोठ्या ईमारती होत्या. परंतु त्याईचा ईकास? ईकास शुन्य होता. ते पैशानं समोर गेले होते. परंतु ईज्जत? जे ईज्जत शिवराम व संप्याले मिळत होती. त्यामुळंच सोम्यानं व राम्यानं संप्याले व शिवऱ्याले समाजबांधनीत मदत केली होती. ज्यातून समाज परीवर्तन झालं होतं.      

शंकरबी काई जास्त शिकला नाई. त्यानं आपल्या बापाची शेती सांभाळली होती. तो सुखीच होता. कारण त्यानं आजपर्यंत तरी भेदभावाचे चटके अनुभवले नोयते. असं जरी असलं तरी मात्र भविष्यातबी तो आपली मैत्री टिकवून होता.         

तिमा त्याईचाच एक मित्र. तो भोई समाजाचा होता. शिवराम अन् संप्या त्याले येळोयेळी मार्गदर्शन करत. परंतु तो काई एक आयकत नोयता व त्याले समाजसुधारणेशीन काई घेणंदेणं नसल्यानं त्यानं समाजसुधारणेस कोणताच हातभार लावला नोयता.            

ते सर्व शाळेतील मित्र. त्याईच्यावर भारतीय स्वातंत्र्याचा प्रभाव पडला होता. तेबी लहानपणी ईचार करत होते का आपणबी मोठे झाल्यावर समाजसुधारणा करु  देश स्वातंत्र्य करण्यासाठी मदत करु. तसं लहानपणापासूनच त्याईच्याच स्वातंत्र्याचं बाळकडू रुजत चाललं होतं.            

ते मित्र जन्माले येण्यापुर्वी देश पारतंत्र्यात होता व देशात जातीजातीत भेदभाव होता. शिवाय अंधश्रद्धा अशा होत्या का पाषाणरुपी दगडाच्या देवासमोर लोकं कोंबड्याबकऱ्याईचा बळी चढवत. कोणी नवश म्हणून तं कोणी परंपरा हाये म्हणून. ज्याईचा कोणताच दोष नसायचा. तो बळी सोम्याचे वंशज घेत. त्यानंतर तो बळी चढवल्यावर राम्याचे वंशज त्याईचं चामडं नेत असे व त्या चामड्यावर प्रक्रिया करुन चामड्याले परीपक्व बनवत. त्यानंतर शिवऱ्याचे वंशज त्या चामड्यापासून वाजवण्याची साधनं बनवत. या सर्व कामात संप्याचे वंशज त्या सर्वाईले मदत करत असत. तशीच एक मेहतर जात होती. ते जात ह्या सर्व चामड्याईच्या वस्तू दूर नेवून फेकत असे.            

संप्या व शिवऱ्याचा जन्म झाला व ते जवा शिकाले लागले. तवा त्याईले वाटत असे का आपल्याच जातीनं हे कामं का करावीत? त्याईनं दुसरे धंदे का करु नये. तसे ते मित्र असल्यानं त्याईची बालपणात बिरादरीत चर्चा चालायची व ठराचं का आपण मोठे झाल्यावर नक्कीच जातीप्रथा, भेदभाव, कोंबडे, बकरे कापणं बंद कराचं. तसंच पाषाणरुपी देवबी पुजणं बंद कराचं. जो देव प्राण्याईचा नवश म्हणून बळी घेते.         

सोम्या सातच वर्ग शिकला होता. त्यानंतर तो आपल्या बापाच्या धंद्यात रमला होता. त्याच्या बापाचा मटन कापाचा धंदा होता व त्याले समाजसुधारणेशीन काई घेणं देणं नोयतं. आपला पोट व आपला परीवार यातच तो गुरफटला होता. त्यातच त्याले त्याचेवर ज्या धर्मानं आजपर्यंत अत्याचार केला होता. तोच धर्म त्याले आवडत होता. परंतु जसजसा काळ गेला व परीवर्तन झालं. तसा तोबी बदलला होता नव्हे तं त्यानं आपली अख्खी बिरादरीच बदलवून टाकली होती.            

राम्या चांभार जातीतला होता. त्याले वाटत होतं का धर्म बदलवण्याऐवजी माणसाईनं आपले ईचार बदलवले तं लयच चांगलं होईन. धर्म बदलवण्याऐवजी माणसाईनं आपले ईचार बदलवावेत. त्याचे ते ईचार लयच चांगले होते. परंतु त्यात एक मर्यादा होती. ते मर्यादा म्हणजे धर्माचे नियम. माणसाईनं आपले ईचार कितीबी बदलवले तरी धर्माचे नियम काई बदलणार नोयते. म्हणूनच बाबासाहेबाईनं आपला धर्मच बदलवून टाकला होता. कारण त्याच नियमानं आजपर्यंत धर्माले बंदीस्त करुन ठेवलं होतं. ज्यातून कित्येकाईचे बळी गेले होते.            

राम्या कमी जरी शिकला असला तरी त्याची ईचार करण्याची बुद्धी लयच ईलक्षण होती. त्यातच चांगलं वाईट याचीबी त्याले जाण होती. आपला समाज कसा पुळं जाऊ शकन याचा तोबी ईचार करायचा. परंतु ते त्याचे ईचार करणे जरी बरोबर असले तरी तो सोतालेच बदलवू शकत नोयता तं तो का आपल्या समाजाले बदलवन अन् तो का इतर समाजालेबी ज्ञान सांगन. अशी त्याची अवस्था होती. तसं संप्याचं नोयतं. अन् सोम्याले यातलं काईच कळत नोयतं व तो आपली जात कशी वर जाईन याचाबी ईचार करत नोयता.            

संप्याले आपल्या समाजाबद्दल व इतर समाजाबद्दल, त्याईचं वागणं पाहून अतिशय चीड यायची. कारण त्याचा समाज जरी सुधरला असला तरी त्यातलेच काईजण आजबी देवादिकात रमले होते. ते बायेर बाबासाहेब दाखवायचे अन् आतमंधी देवादिकांच्या मुर्त्या ठेवायचे. लपूनचोरुन त्याच देवादिकाईची पुजा करायचे. ज्या देवादिकाईच्या कल्पना आर्यानं आपल्या स्वार्थासाठी आणल्या होत्या. ज्या कल्पनाईतून त्याईनं आजपर्यंत या देशावर राज्य केलं होतं. समाजात स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव निर्माण करुन त्याईनं समाजाची दोन गटात ईभागणी केली होती. त्याईनं माणसाचा नव्हे तं प्राण्याईचाबी जन्म कानातून, पायातून, मुखातून, हातातून, पोटातून, नाकातून झालेला सांगतला होता. जो आजच्या सुधारणावादी लोकाईले पटत नोयता. त्यातच आजचा संप्या. तो लयच शिकला असल्यानं त्यालेबी पटत नोयता. तसाच तो लोकाईले सांगत असे का सृष्टी काई एका माणसाच्या पोटातून, नाकातून, पायातून, तोंडातून, कानातून, हातातून जन्म घेवून निर्माण झाली नाई तं आधी हे पृथ्वी, आगीचा एक गोळा होता. कालांतरानं तो थंड झाला. ज्यावर हवेचा परिणाम झाला. पुळं या पृथ्वीवर पाणी तयार झालं व त्याच पाण्यात पहिला जीव निर्माण झाला. तो जीव बायेर आला. तो जमीनीवर राहू लागला. तो संरक्षणासाठी झाडावर राहू लागला. कालांतरानं त्यानं ईचार केला का आपण जर जमीनीवर जावून रायलो तं. तसा ईचार करताच तो जमीनीवर आला व जमीनीवर निवास करु लागला.      

************************************************         

ते सर्व मित्र जन्माले आले. त्यातले दोघं शिकले. त्याईनं समाजाले दोनचार गोष्टी सांगतल्या व समाजाले सुधरवलं होतं. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं होतं.              

शिवरामच्या मनात एक खंत होती. आरक्षण हाये. पण आपल्याले ना सरकारी नवकरी भेटली. ना आपल्याले शिक्सनबी घेता आलं. मंग हे आरक्षण आपल्या कोणत्या कामाचं? आपली सप्पी बिरादरी अशीच वाया गेली. आपल्यावर त्याईनं मजा मारली. सोताची शोभा वाढवली त्याईनं. अन् आपल्याले हातात धतूरा देला.         

शिवरामची ते खंत. त्याले काई आज स्वस्थ बसू देत नोयती. कारण नियतीनं त्याच्या जीवनात तसंच घडवलं होतं. शिवराम आज त्याच खंतेनं दारु बी प्याले लागला होता.            

गावाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं. झाड तसं डेरेदार होतं व त्याच झाडात शिवराम आयुष्याचं गणित सोडवत बसला होता. तसं त्याले त्याचं बालपण आठवलं.            

ते त्याचं बालपण. सोम्या, संप्या अन् राम्या हे तिघंबी त्याचे मित्र. त्याईच्या जाती येगयेगळ्या होत्या. राम्या चांभार होता तं सोम्या खाटक अन् संप्या महार. डॉ. बाबासाहेबांच्या कृरपेनं संप्या सुधरुन गेला होता. परंतु राम्या, सोम्या अन् शिवऱ्या अर्थात शिवराम अजुनबी सुधरले नोयते.            

गावात एक शाळाबी होती. त्या शाळेत ते चारबी जण जात असत. आज संप्या त्याईच्यापासून लयच दूर दूर राहायचा. परंतु त्यायेळेस तो जवळ असायचा. खेळायचा अन् बागडायचाबी. त्याच्यात असा एकाएकी बदल का झाला? ते आज शिवरामले समजत नोयतं.          

भारत नुकताच स्वतंत्र्य झाला होता. निर्वासीताचाबी प्रश्न मिटला होता. संविधानबी बनलं होतं. परंतु ते काई सोम्या, राम्याले समजत नोयतं, शिवऱ्यालेबी समजत नोयतं. मात्र जवा बाईनं कानाले हात पुरवून वर्गामंधी घेतलं, अन् ते शाळेत जावाले लागले. तवा समजाले लागलं का आतं भारत स्वतंत्र्य झाला. अन् भेदभाव मिटला. परंतु त्यापुर्वी भेदभावाचे अतितीव्र चटके त्याईले भोगा लागले होते.            

तो ग्रामीण भाग लय चांगला होता. गावामंधी एकोपाबी होता. परंतु तसं पाहिल्यास मांग, खाटक, चांभार महार याईची घरं गावाच्या भोवताली होती. ते लोकं गावाचं रक्षण करत असत न बोलता चालता. हे गावचे लोकं अति महत्वाचे असाचे व त्याईची वस्ती गावाच्या बाहेरच असाची. कधीकाळी जंगलातल्या प्राण्याईचे आक्रमण झालेच तं त्याईच्यावर होईन. जंगलातले प्राणी आधी त्याईलेच खाईन. आपण सुरक्षीत राहू ही त्याईची भावना. म्हणूनच हा त्याईचा प्रताप. गावाच्या बाहेर त्याईची वस्ती ठेवणं. स्वातंत्र्य मिळेपर्यंत अगदी तसाच प्रकार चालत होता. तसं डॉ. बाबासाहेब सर्वाईले सांगत फिरत का आततरी बाबांनो सुधरा. तुमी सुधरले नाई तं तुमचा कार्यभाग बुडन. परंतु त्याईचं कोण आयकते. उलट डॉ. बाबासाहेबाच्या इरोधात इलेक्शनमंधी त्याईच्याच समाजाचा माणूस उभा होता. आज शिवरामले ते सर्व समजत होतं.          शिवराम हा जातीनं मांग होता. वर्षानुवर्ष अंधारात खितपत पडलेला त्याईचा समाज. त्याईले देश स्वतंत्र झाला तरी काईच मिळालं नाई. देश स्वतंत्र्य झाला, तो केवळ धनिकांसाठीच. त्याईलेच एसीचे बंगले भेटले होते. अन् काराबी त्याईच्याच ढुंगणाखाली लागल्या होत्या. गरीब मातर मेहनतच करत होता.         

राहाचंबी घर तनातुणाचंच होतं. त्यावर मोठी आलिशान इमारत आजवर उभी रायली नोयती. त्या झोपड्या असायच्या. पँटाले ठिगळ लावतो तशा. सतरा भोकं पडलेली असाची छताले. ज्यातून पावसाळा आलाच तं पाणी खाली गळायचं. मंग सारं अंथरुणच जीवावर उठायचं. त्या ओल्याकंच अंथरुणाले सोबती बनवून झोपायचे ते लोकं. ज्यात शिवरामच्या बापाचाबी समावेश होता.         

शिवरामले आठवत होता तो काळ. भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वीचा. येतचे नेते म्हणत होते का भारत स्वतंत्र्य झाल्यावर आपून सुधरुन. परतेकालेच स्वातंत्र्योत्सव साजरा करता येईन. परतेकालेच स्वातंत्र्याचा लाभ भेटन. अन् परतेकचजण तरक्कीबी करन. परंतु काय, आज शिवरामसकट साऱ्या बिरादरीतील लोकाईले बोडकं भेटलं होतं. दोनचार लोकं जर सोडली तं कोणाच्याच घरी दिव्यालेबी तेल भेटत नोयतं. एवळं विश्वकोटीचं दारिद्र्य त्याईच्या घरी होतं.          

************************************************         

तो १९४२ चा काळ. एक नेता शिवरामच्या घरी आला. तवा तो लहानच होता. तो नेता शिवरामच्या बापासकट सर्वाईले म्हणाला,         

"तुमाले घाबराची गरज नाई. आतं स्वातंत्र्य भेटन. अन् स्वातंत्र्य भेटल्यावर तुमचीबी बिरादरी सुधरन."           

असं त्या नेत्याचं बोलणं. त्यावर अतिशय आनंदावलेला शिवरामचा बाप त्या नेत्याले म्हणाला होता.          

"आतं आमाले का करा लागन जी?"           

शिवरामच्या बापाचा तो बाळबोध प्रश्न. तसा तो नेता म्हणाला,            

"आतं चलेजावची चळवळ सुरु हायती. तवा तुमी बी त्यात हात धुवून घ्या."           

"हात धुवून? याचा मतलब?"           

ते बोलणं न कळलेला शिवरामचा बाप त्या नेत्याईले म्हणाला.           

"अरे, माह्य म्हणणं हाये का तुमी चलेजावच्या स्वातंत्र्य लढाईत सामील व्हा. मंगच चांगले दिस येतीन का नाई."           

ते त्या नेत्याईचं बोलणं. त्यावर शिवरामचा बाप खुश झाला. तशी त्याले स्वातंत्र्याची आवड होतीच. ते पाहून शिवरामचा बाप खुश झाला होता. अन् तोबी चलेजाव म्हणत स्वातंत्र्याच्या लढाईत घुसला होता.          तो चलेजावचा काळ बेहद दुखावदायकच होता. बड्याबड्या नेत्याईनं सांगतलं होतं का आमाले इंग्रज सरकार पकडणार हाये. अन् जेलात टाकणार हाये. परंतु तुमी घाबराल नोको. स्वातंत्र्यासाठी लढत रायजा. संपुर्ण देश जर पेटला ना स्वातंत्र्य लहरीनं. तं त्या इंग्रजाचीबी कोणाले तुरुंगात टाकाची हिंमत होणार नाई. मग तसंच घडलं. सारे नेते पकडले इंग्रजाईनं. चलेजावची क्रांती होताच. तरीबी देश घाबरला नाई. येथला परतेक माणूस लढत होता इंग्रजांशीन. तो तारा कापत होता इलेक्ट्रीच्या. इंग्रजाईच्या मालमत्तेची नाशधूस करत होता. तसाच तो इंग्रजाईनं आणलेल्या गाड्याईचीबी नाशधूस करत होता. तसे इंग्रज लोकं महाभयंकर संतापले होते. मंग त्याईनं नेत्याईले सोडलं. अन् बाकीच्याच सामान्य लोकाईले डांबून ठेवलं कारागृहात.              

शिवराम जवा लहान होता. तवा त्याचा एक मोठा भाऊबी इंग्रजाईसोबत लढाईसाठी तयार झाला होता. जवा एक नेता त्याईच्या घरी येवून गेला. त्याचा बाप बी लढाईसाठी तयार झाला होता. वाटत होतं का स्वातंत्र्य येईन. अन् पोटभर अन्न भेटन. डोक्यावर छत बी भेटन. आंगाले कपडा भेटन. तसे स्वप्नच दाखवले होते नेत्याईनं. परंतु ते सर्व आज फोल ठरले होते.          

आपून स्वतंत्र झाल्यावर गरीबी दूर करुन म्हणणारे ते नेते. त्या नेत्याईचंच भारत स्वतंत्र्य झाल्यावर काईबी चाललं नाई तं ते का दुसऱ्याईची गरीबी दूर करतीन. गरीबी काई चमच्याईची दूर झाली होती. ज्याईनं चलेजावच्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजाईची मिरासदारी केली होती.           

चलेजावचा तो स्वातंत्र्यलढा. त्या लढ्यात लोकाईनं खंब्याच्या तारा तोडल्या होत्या. एवढंच केलं नोयतं लोकाईनं तं त्याईनं इंग्रजाईले सळो का पळो करुन सोडलं होतं. काईनं इंग्रजी अधिकाऱ्याईलेचं गोळ्या झाडून मारलं होतं. त्यामुळंच इंग्रज लोकबी खवळले होते. मंग का पायता, त्याईनंबी जशास तसं परतूत्तर द्यायचं ठरवलं होतं. ते मागावरच असायचे लोकाईच्या.          

चलेजावची क्रांती मोठी हिंसेची घटना होती. त्या घटनेत इंग्रज लोकं ज्याईचा गुन्हा नसन, त्याईलेबी घरातून ओढू ओढू काढून चांगला मार देत होते. एवळंच नाई तं त्याईचे हातपाय बांधून त्याईचा कडेलोट करत होते ते. एवळे निर्दयी बनले होते. कारण त्याईचे लोकं मारल्यानं ते संतापले होते.         

संपूर्ण बिरादऱ्याच्या बिरादऱ्या रस्त्यावर आल्या होत्या. त्याचं कारण होतं आस. भारतीय नेत्यानं बिरादरीतील लोकांईमंधी जावून लोण पेरले होते का भारत स्वतंत्र्य झाला का मंग पाहा सगळं सुखी होईन. तसं बिरादरीतल्या लोकांईलेबी वाटत होतं.          

शिवरामच्या बापाचं नाव म्हादबा होतं. म्हादबानं आपल्या बालपणापासून अनुभवले होते जातीचे दुःख. ते जात, त्याईले अगदी बालपणापासूनच छळत होती. गावकुसाबाहेर त्याईची वस्ती असायची. त्याईले गावात येवू देत नसत. ना त्याईले जीवनावश्यक वस्तूबी मिळू देत असत. सुर्योदयाच्या अकरा वाजतानंतर गावात यायची अनुमती त्याईले होती अन् सुर्यास्त झाला तं गावात जायचीबी मनाई होती. चांगलं सुग्रास अन्न त्याईच्या नशिबी नोयतं.          

म्हायबा लहान होता, तवा त्यालेबी चांगलं सुग्रास अन्न खावंसं वाटत असे. परंतु त्याले लाज वाटत असे गावात जायची. तसं पायल्यास एखाद्या घरी काजकाम झालंच तं म्हादबाचा बाप एक हांडकं घेवून गावात जात असे. अन् त्या काजकाम झालेल्या घरी कुत्रं जसं शेपूट हालवत दाराशी उभा रायते. तसा तो राहात असे. ज्यात केवळ म्हादबाचा बापच नाय तं गावातले इतर जातीचेबी लोकं राहात. मंग ज्याईच्या घरी काजकाम झालं. त्याईच्या घरी एवळं अन्न शिल्लक राहात नोयतं का तो सर्वाईले देईन. मंग काईले अन्न भेटत होतं तं काईले तसंच वापस या लागत असे. काई जाती अगदी हुशारच होत्या. त्या जातीले माईत होतं का उद्या अन्न भेटन नाई. म्हणूनच ते रातच्यालेच उकिरड्यावर फेकलेल्या उष्ट्या पत्राळी चाटाले जात असत. एवळं दयनीय जीवन त्याईचं होतं.            

आंगात घालाच्याबी कपड्याची गंमतच होती. आंगात घालाचे कपडे भेटतच नसत. लहान लहान पोरं मिशा येईपर्यंत नागडीच हिंडायची. मंग त्याईले ओठावर मिशा आल्या का मंग लाज लागायची. त्यानंतर त्याईचा बाप त्याईले आपलं उपरणं देत असे. जे उपरणं ते फक्त ढुंगण झाकण्यासाठी वापरत. बाकीचा भाग मातर उघडाच राहात असे. बायाची गत तं येगळीच होती. बायाईचेबी कपडे फाटकेच असायचे. त्याईच्या कपड्याईलेबी भरपूर भोकं पडलेली असायची. परंतु त्याबी लई शायण्या होत्या. अशी भोकं असली तं त्या त्याईले दाभणनं शिवून शिवून ठिगळं लावू लावू घालत. तसं पायल्यास एखाद्या गावच्या उच्चवर्णियाईच्या घरी काम केलंच तं ते बाई एखादं लुगडं द्यायची. त्या लुगड्याचे चार तुकडे करुन फक्त आंग झाकन एवळंच ते कापड वापरा लागत असे.         

मकानाची तं गैरसोयच होती त्याईच्या जीवनात. मकान तणातुणाचं तं होतंच. शिवाय रानातल्या गवतानं छावलेलं असायचं. ज्यातून जोराचा पाऊस आलाच तं गळायचं. त्यामुळं पावसाळा आवडतच नोयता या बिरादरीले.          

बोलायचीबी उजागीरीच नोयती बिरादरीतील लोकाईले. ते एखाद्या उच्चवर्णीय माणसाईशी काही अभद्र बोललेच तं त्याईले मोठा इटाळ झोंबत असे. त्यावेळेस गावात राडा होत असे.         

लोकं इंग्रजाईचे गुलाम होते. परंतु हे बिरादरी गावच्याच सोताले उच्च समजणाऱ्या माणसाईची गुलाम होती. ते म्हणतीन तेच पुर्वदिशा असंच त्याईचं वागणं होतं. ना पाणी पेण्याची सोय होती, ना त्याईच्या शेतात जावाची. समजा वावरात कामावर बाई लागलीच तं काम करण्यापुरतीच त्याईची लाडीगोडी असायची. त्यातबी त्याईचे भांडे, पाणी प्याचं पातेलं येगळंच असाचं.         

शिवरामची माय सुलोचना. ती त्याबी काळात भलं मोठं काम करत होती. ते तं जीव वाचवाचा काम करत होती. तिले पंचक्रोशीतून बोलावणं यायचं. त्याईले आडनाव जरी असलं तरी लोकं त्याईले बोलवतानी त्याईच्या जातीचाच उद्धार करत. म्हणत का सुलोचना मांगीनले बोलावून आण. अन् लोकाईनं तशी जात काळून आवाज देलाच तं वाटायचं मरु द्यावं त्याईले. परंतु त्याईचा जीव वाचवाले जावू नये. परंतु दुसऱ्या ठिकाणी इचार यायचा का त्या बिचाऱ्या माणसानं का बिघडवलं. त्याचा जीव वाचवाच लागन.          

शिवरामच्या आईले पोटदुखी समजत असे. ते गावच्या बायाईची बाळंतपण करत असे. त्याईचं बाळंतपण करतांनी त्याईले धक्काबी लागत नोयता. तिच्या हाताले लई गुण होता. त्याच गुणाईच्या भरवशावर ती पंचक्रोशीतून प्रसिद्ध झाली होती. गावात असलेल्या मांगणीईले तेवळी किंमत नोयती. परंतु सुलोचनाले दूरदुरुन लोकं बोलवाले येत. मंग सुलोचना सांगत असे, केवळ हात अन् पोट पाहूनशान का, किती दिवस झाले अन् कवा बाळंतपण होईन. तिनं म्हणलेली तारीख हे पक्की असायची. कारण त्याच तारखेले बाळंतपण होत असे.         

सुलोचनानं कितीतरी गरोदर बायाईचा जीव वाचोला होता. त्या बदल्यात तिले काई धान्य भेटत असे. जे धान्य देतानं कोणी कंजूसपणा करुन धान्य देत. मातर कोणी दिलदार बी होता. परंतु असे बाळंतपण जास्त होत नोयते गावात. त्यामुळं सतत उपासमारीचा सामना करावा लागत असे.         

सुलोचनाचा नवरा म्हादबा उन्हाळ्यात लग्नामंधी वाजा वाजवाचा काम करत असे. तशी गावात जास्त लग्नबी होत नोयती. त्यातच गावात एकटाच काई मांग जातीतला म्हादबाच नोयता का त्यालेच लग्नामंधी वाजा वाजवाचं आवतन भेटन. इतरबी बरीच मंडळी होती का त्याईले लग्नामंधी वाजा वाजवाची संधी भेटत असे. त्यामुळंच तेबी काम जास्त मिळत नोयतं. शिवाय अशी लगनसराई गावात किंवा आजुबाजूच्या गावात उन्हाळ्यातच असायची. मंग इचार यायचा बाकीच्या दिवसाईचा. हिवाळा, उन्हाळा कसा काळायचा याचा मातर प्रश्न पडायचा. मंग म्हादबा रानात जायचा तो बी भेतभेतच. कारण रानामंधी जंगली प्राणीबी असायचे. ते एखादा माणूस एकटा दिसला रे दिसला का, त्याले खावून फस्त करत. तरीबी पोटासाठी म्हादबा रानात जायचा अन् सिंदीच्या झाडाच्या पानोऱ्या आणायचा. त्या वाळवायचा अन् त्यातून तो सुबक झाडू तयार करायचा. तो गावात घरोघरी द्यायचा. ज्यातून धान्य मिळताच घरी चूल पेटायची. ज्यातून म्हादबाच्या घरची सारी लेकरं जेवत असत. पावसाळ्यात मातर सतत उपासमारच असायची. ना सिंदीच्या झाडाच्या पानोऱ्या आणता यायच्या. ना त्या वाळवता यायच्या, ना त्याईच्यापासून झाडू बी बनवता यायचा. मंग पावसाळा आला अन् अशी उपासाची येळ आलीच तं सुलोचना आपली लेकरं उपाशी राहू नये म्हणून रानातली कोणतीबी भाजी आणायची. अन् त्या भाजीले उकळायची. त्या भाजीत थोडं तिखट मीठ टाकायची. अन् ते भाजी जशीच्या तशीच आपल्या लेकराईले खायले द्यायची. मंग उरली सुरली भाजी सुलोचना व म्हादबा खायचे. कधीकधी पोराईलेबी उपाशीच झोपवावं लागत असे. परंतु जवा भुकेनं ते मुलं रडायची. तवा इचार यायचा का कवा संपन हे दिस अन् कवा उगवन तो सुर्य आपल्या घरी पोटभर अन्न देणारा.            सुलोचनाले आठवत होते तिचे ते जगणे. त्या जगण्यावर तिले अतीव वेदना होत असत. परंतु त्या वेदना ते कोणाले सांगूबी शकत नोयती. मनोमन वाटायचं का स्वातंत्र्य यावं आपल्यालेबी. अन् या अंधारलेल्या आयुष्यातून मुक्ती मिळावी.       

************************************************           

दिवसभराच्या थकव्यातून वैतागलेले ते. कधी कधी जनावरांसारखे भाजीच खावून जगणारे ते. कधीकधी उकिरड्यावरच्या पत्राळी चाटणारे ते. त्याईचा समाजात असलेला इटाळ. तो इटाळ मातर बाळंतपणात होत नोयता.           

शिवराम लहान होता. तवाबी इटाळ पाचवीलेच पुजला होता. तो आपले सोबती राम्या, संप्या आन् सोम्यासोबत राहात होता. तशी त्याईची मैत्री घट्ट होती. गावच्या शाळेत नाव टाकलं तवा ते चारबी जण अगदी एकोप्यानं राहात असत. त्याचं कारणबी इटाळच होतं.         

शिवरामले आठवत होता त्याचा मित्र राम्या आन् राम्याचा बापबी. राम्याचा बापबी चांभार जातीचा होता. त्याची बी वस्ती गावाच्या बायेरच होती. तसं त्याले चामडं लागतच होतं. कारण त्या चामड्यापासून तो चपला, वार्त्या बनवत असे व गावच्या लोकाईची गरज भागवत असे. जवा जिवती यायची. तवा त्याचा बाप दिटूल्या बनवायचा व तो त्या दिटूल्या अख्ख्या गावाले वाटायचा. ज्यातून त्यालेबी धान्य मिळत असे. कधी डाळ वरणाचं साहित्य. कधी सणासुदीले त्याचा बी बाप लोकाईले जेवन मांगाले जायचा. कधी लग्नामंधीबी जेवन मांगाले जायचा. तवा जेवणातले आमलेले पदार्थबी पोटाच्या भुकेसमोर चवदार लागायचे.           जनावरं काई नेहमीच मरत नसत. ते एखाद्या येळेसच मरत. ज्यातून जनावरांचं चामडं मिळणं मुश्किल जात असे. तवा मातर प्रश्न पडायचा. पोट भागवावं कसं? तसा इचार करताच राम्याच्या बापाले आठवायचा मांग समाज. तसा तो इचार करायचा. मांगांचं ठीक हाये. वर्षभर कोणी ना कोणी मरतच रायतेत. तवा त्याईले वाजे वाजवासाठी गिऱ्हाईक भेटतेतच. शिवाय वर्षभर बाळंतपणाची कामं चालतेत. ज्यातून बाळतपण करुन दोन पैसे गाठीले भेटतेतच. शिवाय वर्षभर अशी मंडळी सिंदीच्या झाडापासून झाडू बनवून वा बांबूच्या झाडापासून टोपल्या बनवून इकतेत. तवाबी त्याईले धान्य भेटतेच. अन् लग्नामधून बी ते पैसा कमवतेतच. पण आपण? आपल्याले जनावरं मेल्याशिवाय काईच पर्याय नाई. मंग उपासमारी. आमाले वर्षभरच उपासमारीत जगा लागते. वर्षभरच पोटाले चिमटा देवून रात्र काढा लागते. तसं आमच्या पोरालेबी.           शिवरामले जसा राम्या आठवला. तसाच राम्याचा बापबी आठवला होता. ज्यातून त्याले आपलीच बिरादरी सुखी असल्याची जाणीव होत होती. परंतु तेही त्याले वाटत होतं का जेथं आपलीच बिरादरी दुःखी हाये. आपलीच उपासमार होते, तेथं त्याईची बिरादरी कशी जगत असन.          

शिवरामले पडलेला प्रश्न. तसं ताणतणावात असलेलं दारिद्र्य. त्या दारिद्यातून थिजून निघालेला त्या शिवरामचा समाज. तसा त्याले आठवला त्याचाच मित्र सोम्या. जो एक खाटक समाजाचं प्रतिनिधीत्व करत होता.           सोम्या मातर खरोखरच सुखी होता. कारण त्याईची कधीच उपासमार होत नोयती. त्याईचं काम होतं कोंबडं, बकरं कापणं. ते ती कामं वर्षभर करायचे.          

तो ग्रामीण भाग. त्या ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस बाजार भरायचा. ज्या दिवशी लोकाईले मांस खाण्यात जास्त रुची असायची. त्यातच महिन्यात आठवडे चार यायचे.  ज्या दिवशी बकरे कापले जात. अन् त्या बकऱ्याईचं मांस इकण्यातून भरपूर पैसे व धान्य त्याईले मिळायचं.  त्यामुळंच ते रग्गड होते.          

शिवरामचा तिसरा मित्र होता संप्या. त्याईचा असा विशेष धंदा नोयता. त्या धंद्याचा असर कामावर होत नोयता.  संप्याच्या वडीलाच्या उपासमारीवर कोणताच उपाय नोयता. त्याईच्या घरी तं नेयमीच उपासमारी असायची. त्याईची गुजराण ही उच्चवर्णीयाईच्या दयेवरच अवलंबून होती. ही मंडळी नित्यनेमानं लग्नसमारंभात उष्ट्याच पत्रावळी चाटण्यात जात असत. परंतु पावसाळ्यात त्याईच्याजवळ उदरनिर्वाहाचं साधन नसायचं. त्यामुळं ही मंडळी जे प्राणी उन्हाळ्यात मरायचे. त्या प्राण्याईचे मांस ही मंडळी आणत व त्या मांसाले वाळवून त्याले मीठ व तिखट लावून वाळवत व तेच मांस पावसाळ्यात खात असत. कारण त्याईच्या पाशी पोट भरण्यासाठी कोणताच उपाय नोयता.           

डॉ. बाबासाहेब त्या काळात लय शिकले होते. त्याईनं सर्व बिरादरीतील या गरीब लोकाईचा अभ्यास केला होता. ते आपल्या समाजाले त्या काळात एकत्र या म्हणून सांगत होते. त्यासाठी त्याईनं त्याईले एकत्र करुन चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या चवदार तळ्याची केसबी ते भांडले होते. अन् जिकलेबी होते. त्या लोकाईले त्या काळात बाबासाहेबाईनं म्हणलेलं आवडत होतं. कारण आतापर्यंत त्याईनं दारिद्र्य शोषलं होतं. परंतु त्यात काई असेबी होते का त्याईले बाबासाहेबाचं म्हणणं पटत नोयतं. ते इरोधच करत होते. अशातच चलेजावचा तो सत्याग्रह आला.          

चलेजावचा तो सत्याग्रह. त्या सत्याग्रहातून नेत्याईनं केलेलं भाकीत. ते भाकीत होतं अस्तित्वाचं. ज्या अस्तित्वाची आस नेत्याईनं लोकाईले देली होती. परंतु ते केवळ इंग्रजाईशी लढण्यासाठी होतं.            

शिवऱ्या शिकत होता त्या काळात त्याईच्यासाठी इंग्रजाईनं उभारलेली शाळा. त्याच्या बापालेबी वाटत होतं का आपला पोरगा शिकावा. तो बाबासाहेबासारखा समोर जावा. तसा त्याच्या बापाचा इचार रास्त होता.           आज शिवऱ्या शिकत होता ते शाळा. ज्या शाळेतून शिवऱ्याले अतिशय त्रास होतच होता. परंतु त्याची शाळेत होत असलेली हेळसांड. त्यामुळंच त्याले शाळा शिकावाशी वाटत नोयती. अशातच शिवऱ्यानं अन् बाकीच्या लोकाईनं काई दिवस आपआपल्या शाळा सोडून देल्या होत्या.            

चलेजावच्या स्वातंत्र्यलढ्यातून उत्साहाची आस संबंध बिरादरीत निर्माण झाली होती. वाटत होतं संपुर्ण बिरादरीले का आपला भारत स्वतंत्र्य झाल्यावर आपलूयाले चांगले दिवस येतीन. म्हणूनच ते लढत होते आपल्या हक्काची लढाई. ज्यात शिवऱ्याच्या बापासकट संपुर्ण माणसं लढत होती.       

************************************************         

स्वातंत्र्यापुर्वी गावाईचा कारभार हा एकाच माणसाच्या हातात असायचा. पुर्वी दळणवळणाची साधन कमी असल्याने गाव स्वयंपूर्ण करण्यावाचून गत्यंतरच नोयते. त्यातूनच बलुतेदार अन् अलुतेदार निर्माण झालेत.            

गावात काई तंटेबी होत. त्यात फौजदारी अन् दिवाणी खटल्यांचा न्यायनिवाडा गावातल्या गोतसभेत होत असे. ह्या सभेत कोण असावे याचे नियम होते. पाटील, पोलीस पाटील, कुलकर्णी, मिरासदारांपैकी महाजन, बलुतेदारांचे प्रतिनिधी अन् महार असे लोक गोतसभेत पंच म्हणून असत. या सभेत महार असण्याचे कारण त्याले सर्व जमिनीच्या हद्दींची माहिती असे. कारण तोच कोतवाल असे व तोच जमीनीच्या नोंदीबी घेत असे. त्याच्यावर राजाचा बी ईश्वास असायचा. त्यामुळं जमिनीच्या वादात महाराच्या साक्षीले खूप महत्व असे. गावामंधी गोतसभा किंवा गावपंचायत याचप्रमाणे जातपंचायत सुद्धा असे. त्यात त्या त्या जातीचे प्रश्न सोडवले जात. अन् त्याईच्यात इतर जातीले मज्जाव असे. या जातपंचायती इतक्या प्रबळ होत्या का शिवरायाच्या काळात कोकणातल्या एका भंडारी समाजात मोठा वाद निर्माण झाला होता.  तवा त्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराजाईनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यायेळी ‘आम्ही आमचा वाद सोडवू, तुम्ही त्यात लक्ष घालू नये‘, असे सांगण्यात आले होते शिवरायाले. याचप्रमाणे गावात धर्मसभा सुद्धा असे. ज्यात धार्मिक प्रश्न सोडविले जात असत. वरील सर्व व्यवस्थेतून गावाचा कारभार अन् व्यवहार स्वयंपूर्ण रीतीने चालायचा. म्हणून त्याले ‘गावगाडा” म्हणत. ही सर्व व्यवस्था जशी गावातल्या स्थानिक असलेल्या लोकाईची होती. तशीच गावात ठराविक काळात अनेक फिरस्ते लोकाईच्या वर्दळीची पण होती. त्याईची सुद्धा गावं, त्यातली घरे ठरलेली होती. त्याईचा गावात येण्याचा काळ ठरलेला असे. त्यातील काई लोकाईची माईती हाये.१) घिसाठी : नांगराचा फाळ, कुऱ्हाडी वगैरे लोखंडी वस्तू बनविणारे अन् जुन्या अवजाराले धार लावणारे, २) बेलदार : दगड फोडणारे अन् घरासाठी चौकोनी दगड बनविणारे, ३) वडार : विहीर, तळी यासाठी जमीन खोदणारे, ४) लमाण  वंजारी : धान्य, मीठ इत्यादी वस्तूंची ने आण करणारे, ५) वैदू : औषध विकणारे, ६) कुडमुडे ज्योशी : भविष्य सांगणारे, ७) कैकाडी : टोपल्या बनविणारे.           करमणूक करणारेबी काई फिरस्ते होते. जसे. १) गारोडी २) माकडवाले ३) नंदीबैलवाले उर्फ निरमल ४) दरवेशी(अस्वल) ५) चित्रकथी ६) बहुरूपी ७) कोल्हाटी डोंबारी ८) वासुदेव           

काई भिक्षा मांडणारेबी फिरस्ते होते.            

१) भोप्ये (खंडोबाचे) २) भगत ३) भुत्ये (देवीचे) ४) आराधी ५) वाघ्या-मुरली ६) पोतराज ७) कानफाटे(नागपंथी) ८) उदासी ९) अघोरी १०) गोसावी ११) जोगती किंवा जोगिणी १२) बैरागी १३) साधू १४) फकीर           अशी लोकाईची यादी. हे यादी खूप मोठी हाये.  परंतु एक गोष्ट लक्षात ठेवाले पायजे का हे फिरस्ते सुद्धा गावगाड्याचे घटक असायचे. अशा या साचेबंद गावाचा शासनाशीन संबंध म्हणजे शेतीचा कर देणं अन् जमिनीची मालकी वारसांच्या नावावर चढवणं यापुरताच मर्यादित होता. या कामासाठी गावात पाटील अन् कुलकर्णी नेमलेले असत. प्रांत (जिल्हा) स्तरावर देशपांडे (कोकणात खोत) व देशकुलकर्णी असत. परगणा स्तरावरती देशमुख असत. हे सर्व पद वंशपरंपरागत होती. म्हणूनच त्या पदावरुन आडनावे तयार झालीत. गावाचा कारभार रोखी ऐवजी बटईवर चाले. या एकसुरी साचेबंद रीतीने चालणाऱ्या गावगाड्याईचा दुष्परिणाम असा झाला का, माणसाईची दृष्टी गावापुरती मर्यादित झाली अन् लोकं संकुचित झाले. शासन देशीयांचे असो वा परकीयांचे असो, माह्या जीवनात काईच फरक पडणार नसल तं मले त्याबाबत काय करायचे हाये? मंग राजा अन् सुलतान कोणी का असेना. अशी भावना प्रबळ झाली. परकीय सत्तेविरुद्ध उठाव वा बंड न होण्याचे गावगाडा हे महत्वाचे कारण हाये. त्यामुळंच हिंदुस्थान शेकडो वर्षे पारतंत्र्यात रायला. त्यात या गावागाड्याचा मोठा वाटा हाये.           

वंशपरंपरागत बलुत्याईच्या व्यवस्थेमुळे कल्पकतेले वावच उरला नाई. शेतकऱ्याईच्या उत्पन्नातला ठराविक हिस्सा वा वाटा मले परंपरेने मिळणारच असल तं मी जास्त अन् चांगलं काम करण्याची गरजच काय? हेबी भावना मोठी झाली. आज सुरक्षीत सरकारी नोकरवर्गाची जी मानसिकता हाये. तेच त्यावेळी अलुते, बलुते याईची होती.  त्यामुळं जाती व्यवस्था नोको इतकी घट्ट झाली. गावगाड्यामुळे माणसाले आपले कर्तृत्व दाखविण्यास वावच मिळेना, त्याईचा परिणाम म्हणून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण, वाईट परंपराईले चिकटून रायणे, स्वतंत्र विचार न करणे हा आपल्या भारतीयाईचा स्वभावच बनला. मुस्लिम राजवटीत अत्याचार वाढू लागले, सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेती करणे कठीण झाले, जीविताची शाश्वती उरली नाई.  तवा कुठं माणसं गावापलीकडचा इचार करु लागली अन् छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होऊ लागली. परंतु यासाठी महाराष्ट्राले ३५० वर्षे वाट पाहावी लागली.           

गावगाडा पद्धती इंग्रजाईच्या राजवटीत सुद्धा चालत होती. परंतु त्याले आतं उतरती कळा लागली होती. इंग्रजाईनं गावाचे जंगल अन् पाणवठे यावरती असलेले अधिकार काढून टाकले. महसूल (revenue) गोळा करण्यासाठी पगारी नोकरं ठेवले. न्यायव्यवस्थेत अन् शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. ज्याईचा परिणाम हा झाला का स्वातंत्र्यानंतर गावगाडा संपूर्णपणे मोडून पडला.         

एक योद्धा किंवा सेनानी अशी जात हाये का जे  जात भारतीय उपखंडात आढळते, प्रामुख्याने आधुनिक काळातला भारत, पाकिस्तान अन् नेपाळ. खाटक हे प्रामुख्याने नवी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अन् हिमाचल प्रदेश येथे हायेत. भारतात, खाटक हिंदू, मुस्लिम अन् शिख धर्माशीन संबंधीत हायेत. खाटकाईमध्ये मुख्य सूर्यवंशी खाटक अन् सोनकर खाटक या दोन गटांमध्ये इभागणी हाये. सोनकर हे खाटक नसून आजकाल ते खाटक उपाधी वापरतेत. दोन्ही गट सोताले ते खात असलेले अन्न अन् त्याईच्या सांस्कृतिक पद्धतींच्या संदर्भात एकमेकांपासून येगळे मानतेत. खाटकाईले सोनकरांशी संबंध बनवून खाणे आवडत नाई. त्याईले एकमेकाईशीन संबंध टाळणे देखील आवडते. सूर्यवंशी खाटकं राजपूताईशीन त्याईच्या पूर्वजाईशी संबंध असल्याचा दावा करतेत.            

मांग समाज हा मुळचा क्षत्रीय रांगडा, आक्रमक तरीबी प्रामाणिक तसाच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. या समाजाचा मुळ पुरुष हा जाम ऋषी जलजंबु मानल्या जाते, या समाजात गुरुपरंपरा असून मांग ऋषी श्री मांगवीर बाबा, महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत हाये. त्यामुळंच शिवाजी महाराजाईच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काई ठिकाणी किल्लेदाराईची जबाबदारीबी मांग समाजाकडे होती. त्या काळात मांगाईच्या शौर्याची काई उदाहरणं सापडतेत. त्यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराले भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे ईश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत याचा उल्लेख आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळातबी इंग्रजाईनं मांग, रामोशी अशा आक्रमक जातीले गुन्हेगार ठरवले. त्याईले गावाईतून तडीपार केले, त्याईच्यावर खोटे आरोप ठेवले. तवा मांगाईनं इंग्रजांच्या ईरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मांग समाजातल्या लहुजी राघोजी साळवे याईनं आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालवणे, लाठ्या-काठ्या चालवणे याईचे प्रशिक्षण द्याले सुरवात केली होती. त्याईनं अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार केले होते.         

मांग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात. केतकीपासून केकताडापासून दोरखंड बनविणे हा मांगाईचा मूळ पारंपरीक व्यवसाय होता. याशिवाय ते  झाडू बनवणे, घराले शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे. हे देखील त्याईचे व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मांगाईचे रोजगार रूपांतरीत झाले. गावातल्या शुभप्रसंगी, मिरवणुकाईमध्ये मांगाईनं हलगी वाजवण्याची प्रथा होती. मांग म्हणजे गावाचे वाजंत्री होते. 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण होती. आज एकविसव्या शतकात या हलगीले  प्रतिष्ठा मिळाली हाये. मांग समाज त्याईचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला हाये. परंतु आजचे मांग तेवढ्या प्रमाणात सुशिक्षीत झाले नाईत. परंपरागत शेतजमीन असलेली मांग लोक आपली शेती सांभाळत हायेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यामंधी तसेच उद्योगामंधीबी मांग समाज बांधव वाटचाल करू लागला हाये. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज एकविसाव्या शतकात इतर क्षेत्रांमंधीबी आपले रांगडेपण सिद्ध करीत हाये. हे सर्व इकास डॉ. बाबासाहेब आंबेडकरामुळं शक्य झाला हाये.          

मांगाईलेबी पुर्वी अस्पृश्यच समजले जायचे. परंतु ते अस्पृश्य जरी असले तरी ते वीरच हायेत पुर्वीचे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाई. तसाच चांभार समाज. हाबी एक अस्पृश्य समाज होता.            अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तत्सम जाती. या जातीत मुख्यत्वे चर्मकार, मांग, महार व खाटक याईचा समावेश होत होता. काई ठिकाणी भोई समुदायाचाबी समावेश होते. ते सुरुवातीपासूनच शूर होते. परंतु कालपरत्वे जवा ईदेशी आक्रमण झालं. तवा राजांसह त्याईच्यासोबत लढणाऱ्या याच अस्पृश्य समाजातल्या सैनिकाईलेबी गुलाम बनविण्यात आलं. त्यानंतर त्याईले दास्य प्रदान करण्यात आलं. यात ईदेशी लोकाईले ज्याईनं ज्याईनं बोलवलं व येथील राजांविरुद्ध फितूरी केली. त्यांईनंच त्या तत्सम जातीवर ईटाळ लादला व त्याईले अस्पृश्य ठरविण्यात आलं.        

 प्राचीन काळापासून आघाडीवर असलेला चर्मकार समाज. म्हणतेत का याच समाजातून राजे रजवाडे झालेत. परंतु त्या समाजाचा अर्वाचीन काळ फारच दुःखदायक होता. त्याचं कारण होतं त्याईची राजेशाही.          दुसरा अस्पृश्य म्हणून गणल्या जाणारा समाज म्हणजे महार होय. महार समाज हाबी त्या काळात शुरवीरच होता. हा समाज शुरवीर असल्यानं त्या जातीतल्या एका वडीलधारी व्यक्तीले गावाचा प्रमुख बनवलं जाई अन् त्याले कोतवालपद बहाल केलं जाई.          

मांग किंवा मातंग समाजबी शुरवीरतेत अग्रेसर होता. तसेच ईश्वासूबी तेवढाच होता. त्या समाजाले जे डावपेच यायचे. ते इतर जातीतल्या लोकाईले जास्त जमत नसत. असे म्हटले जाते का शिवाजी महाराजाईनं याच जातीतल्या लोकाईले तिजोऱ्या सांभाळण्याचे काम सोपवलं होतं.          

खाटक समाजबी अगदी तसाच शुरवीर होता. या जातीतले लोकं वाममार्गी मंदिरात यज्ञप्रसंगी पशुबळी देण्याचे काम करायचे. या लोकाईची गणना मुळात क्षत्रीय व राजपूत मध्ये येत असे, असा इतिहास सांगतो. काई इतिहासकार लिहितेत का या जातीतले लोकं हे ब्राह्मण वंशाचे होते.          

हा सर्व समाज ईश्वासू होता तसा शुरवीरबी. तो समाज नेहमी राजाच्या बाजूनं युद्धात लढत असे व राजाईले युद्धात मदत करत असून मोठमोठे पराक्रम गाजविण्यात ते सोताले धन्य समजत असत.           समाजात असेही काही चमचे होते का त्याईले चमच हालवणं तेवढंच काम येत होतं. या अस्पृश्य लोकाईले राजेरजवाड्यांनी जवळ केलेलं बघवत नोयतं त्याईले. शिवाय अशाच चमच्याईले राजेबी आवडत नोयते व नाई आवडत होती त्याईची राजेशाही. त्याईले हवं तं फितूर म्हणता येईन. त्याईनं येथली राजेशाही संपवण्यासाठी येथली आक्रमणकारी ईदेशी लोकाईले मदत केली व येथल्या त्या सर्व अस्पृश्य लोकाईले गुलाम बनवलं. परंतु याचा अर्थ असा नाई का त्या चमच्याईले राजपद मिळालं? ईदेशी लोकाईनं त्याईलेबी गुलामच बनवलं होतं. तसंच त्याईच्यावरबी राज्य केलं होतं.            

पुर्वीचा काळ पायता या भारताले हिंदुस्थान म्हणत. अन् हा हिंदुस्थान काई संकुचीत नोयता. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रम्हदेश या सर्व मिळून बनलेला हा देश होता. त्यात अफगाणिस्तानचाबी काई भाग होता. शिवाय ब्रम्हदेशात हत्ती जास्त असून ते हत्ती लढाऊ जातीचे होते. त्या हत्तीचा वापर हा युद्धामंधी येथील राजे महाराजे करीत असत. कधीकाळी राजाईची मिरवणूक काढायची असल्यास ते हत्तीवरुनच काढली जाई.           

या समाजाचे काई असेबी राजे होते का त्याईच्यावर ईदेशी आक्रमणकर्त्या अरबाईनं कितीतरी स्वाऱ्या केल्या. ज्यातून कितीतरी स्वाऱ्यात ईदेशी आक्रमणकर्त्याईचा पराभव झाला. त्यानंतर ते पळूनबी जात असत. मंग काई दिवसानंतर ते पुन्हा सज्ज होवून येत. परत युद्ध करत. परत पुन्हा हारले का पळूनबी जात. परंतु जवा एखाद्या भारतीय राज्यकर्त्याचा पराभव होत असे. तवा मातर ते त्याले सोडत नसत. ते त्याले आपल्या देशात नेत व त्या राज्यकर्त्याईचा अनन्वीत छळबी करत असत. हे सर्व येथल्या चमच्याईच्या आग लावण्यानं होत असे.          

ईदेशी आक्रमणकर्ते पळून जात. ते कसे पळून जात अन् का जात? यामांगं बरीच कारणमीमांसा हाये. त्यातलं एक कारण म्हणजे भारतात हत्ती जास्त प्रमाणात असल्यानं भारतीय लोकं हे हत्तीवरुन लढत अन् ईदेशी लोकं हे घोड्यावरुन. त्यातच समस्या अशी निर्माण व्हायची का भारतीय राजाईचा पराभव झाला तं ते हत्तीवरुन लढत असल्यानं व हत्ती घोड्यासारखा चपळ धाव घेत नसल्यानं त्याईले पकडणं सहज शक्य व्हायचं. मात्र ईदेशी राज्यकर्ते हे घोडे वापरत व पराभव झालाच तं ते पळून जात. तसं पायल्यास घोडे चपळ असल्यानं त्याईले पळणं अगदी सोपं जात असे.          

ईदेशी लोकं भारतात आक्रमण कराले येत. ते का येतेत. याचं एकमेव कारण म्हणजे भारताची असलेली प्रसिद्धी. भारत आधीपासूनच सुसंप्पन्न असलेलं राष्ट्र. या भारतातली जमीन एवढी सुपीक होती का ते जमीन सोनंच पिकवायची. याचा अर्थ असा का भारतातली जमीन ही सुगंधीत मसाल्याचं उत्पादन करायची. ज्या मसाल्यानं भाजीची चव वाढायची. ते चव इतर भागात मिळायची नाई. ते याच भारतात मिळायची. शिवाय भारतात सोनं विपूल प्रमाणात असल्यानं तेबी लुटाले ईदेशी लोकं यायचे.          

चांभार जात हे पुर्वीपासूनच शूरवीर असलेली जात. शिवाय त्याईच्या सोबतीची मंडळी म्हणजे खाटक, मांग अन् महार. ही मंडळी देखील काटकच होती. गावाचं रक्षण म्हणून गावाच्या शिवेवर उभा राहणारा महार हा शुरवीर व काटक असल्यानं त्याले कोतवालाचा दर्जा मिळाला. शिवाय गावाचं संरक्षण व्हावं. ते शत्रूपासूनच नाही तर हिंस्र श्वापदापासून. म्हणूनच ही शुरवीर माणसं लढायची. युद्धप्रसंगीबी हीच लोकं लढायची व युद्धात मोठमोठी पराक्रमं गाजवायची. त्याईले त्यात धन्यता वाटायची. हेच पायलं ईदेशी आक्रमणकर्त्याईनं. मंग काय, जवा येथल्या इतर राजे रजवाड्याईचा पराभव झाला, तवा त्याईनं राजासकट येथल्या या शुरवीर माणसालेबी गुलाम बनवलं व त्याईले अतिशय हीन दर्जाची वागणूक देणं सुरु केलं.          

सुरुवातीले ही माणसं गावालगतच राहात होती. परंतु जवा येथले राजे युद्ध हारले. तवा पराभव होताच येथल्या राजासकट गुलाम झालेल्या या लोकाईले ईदेशी आक्रमणकर्त्या लोकाईनं गावाच्या लगतच्या वस्तीत अधिवाशी म्हणून ठेवले नाई. त्याईले दूर ठेवलं. ते गावाच्या बायेर वस्ती करुन राहात असत. शिवाय त्याईच्यावर जबरदस्तीनं ईटाळबी लादल्या गेला.         

ईटाळ लादल्या गेला. ईटाळ कसा काय लादल्या गेला? याचं उत्तर येथल्या तथाकथीत चमच लोकाईनं लावलेली आग. येथल्या चमच लोकाईले वाटत होतं का हे जात अतिशय शुर असून गावात आपल्यावर भारी पडू नये. ते जर जात आपल्यावर भारी पडली तं उद्या आपलं जगणं कठीण करुन टाकल. शिवाय येथले राजेबी. मंग काय, ईटाळाचं जर बंधन त्याईच्यावर टाकलं. तं ते जात कधीच आपल्यावर भारी पडणार नाई. तसंच दुसरं महत्वपुर्ण कारण होतं, ते म्हणजे त्याईचं पोट. त्याईच्या उदरनिर्वाहाचं साधन नष्ट केलं. ज्या उदरनिर्वाहाच्या साधनातून त्याईचं पोट भरणार होतं. आता हा चालबाजपणा कोणं केला? असा प्रश्न उपस्थित होवू शकते. यासाठी शिवरायाईचा इतिहास आठवणे गरजेचे हाये.            

शिवरायाईचा इतिहास आपल्याले माईत असनच. म्हटले जाते का शिवराय हे फितूराईले कडक शिक्षा करत असत. त्याचं कारण होतं फितूरीमुळं राज्याचं होत असलेलं नुकसान. फितूर आपल्याच देशातली माणसं असायची का जी गावात राहात होती. जी राजांईरुद्ध कुरघोडी करत. जी ईदेशी लोकाईले मदत करत आपल्याच राजांईरुद्ध. ज्यातून तेच ईदेशी आक्रमणकारी यशस्वी होत. त्यानंतर तेच ईदेशी आक्रमणकारी याच फितूर माणसाईचे काई सल्लेबी आयकत असत. ज्यातून अशा शुरवीर असलेल्या चांभार, मांग, खाटक व महार लोकाईले अस्पृश्य बनवलं. ज्या अस्पृश्यतेच्या आगीतून ही शुरवीर जनता होळपळून निघत होती. अशाच फितुराईनं वा चमच लोकाईनं ईदेशी राज्यकर्त्याईच्या कानाशी लागून असे असे नियम बनवले का ज्यातून कितीतरी जीवघेण्या स्वरुपाच्या यातना अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकाईले भोगाव्या लागल्या.            

आजबी तेच परिस्थिती हाये. डॉ. बाबासाहेब आंबेडकराईनं संविधान लिहून अशा अनुसूचित जातीले अधिकार देले व आरक्षण देलं. त्याचबरोबर संरक्षणबी देलं. ज्या अधिकारांतर्गत ते त्याईच्यावर होणारा अन्याय, अत्याचार सहन करत नाईत व त्याईची तक्रार करतेत. त्यातच काई खटले न्यायालयात जातेत. परंतु सर्वच खटल्यात त्याईले न्याय मिळत नाई. त्याचं कारण हाये हाच चमचगिरीपणा. हाच चमच न्यायदान करणाऱ्या राज्यकर्त्याईच्या कानाशीन लागते अन् प्रत्यक्षात न्यायच पालटवून टाकते. त्यामुळंच काई काई खटल्यात अस्पृश्याईले न्यायच मिळत नाई. शिवाय स्थानिक पातळीवरबी अस्पृश्य सुखी नाईत. जरी आज संविधानानं त्याईले समानतेचे अधिकार देलेत तरीबी. अस्पृश्यांबाबतीत आज अशा बऱ्याच घटना घडतांनी दिसत हायेत का ज्या घटना ह्या इचार कराले भाग पाडणाऱ्या हायेत. परतेक घटना ह्या दाबल्याच जातेत कालसारख्या. आपण म्हणतो का समाज सुधारला. आरक्षणानं वर गेला. परंतु मुठभरच अस्पृश्य लोकं वर गेल्यानं सर्व अस्पृश्य सुधारले असा त्याचा अर्थ नाई. जवापर्यंत तळागाळातील अस्पृश्य बांधव सुधारणार नाई. तवापर्यंत अस्पृश्य सुधरला असे म्हणताच येणार नाई.           

महत्वाचं सांगायचं झाल्यास आजबी अस्पृश्याईवर अत्याचार होत हायेत. त्याईले अस्पृश्य म्हणून काई ठिकाणी हिणवलं जात हाये तं काई ठिकाणी त्याईच्या परीवारावर चाबकानं वार होत हायेत. काई ठिकाणी त्याईच्या मुलींवर बलात्कार. आज ईटाळ संपला असला तरी काई ठिकाणी आजबी ईटाळ गेलेला दिसत नाई. सरकारी कार्यालयातबी तो हाये अन् कार्यवाहीतबी तो हाये. काई ठिकाणी तो पदोन्नतीतूनही स्पष्ट दिसत हाये. परंतु खरं सांगायचं झाल्यास अस्पृश्य म्हणून गणली जाणारी कालची माणसं ही अस्पृश्य नोयतीच. ते वीरच होते प्राचीन काळातले. त्यामुळं आजबी त्याईले तोच दर्जा देण्याची गरज हाये. जर तसा दर्जा त्याईले आज मिळाला नाई व त्याईची पदोपदी हेळसांड होत गेली. शिवाय सतत त्याईच्यावर अन्याय अत्याचार होत गेला तं तो दिवस दूर नाई का हाच अस्पृश्य बांधव पेटून उठन व काल जसा तो राजा होता. उद्याचंबी राज्य त्याईच्याच हाती असन, हे ईसरता कामा नये. कारण ते वीरच हायेत पुर्वीचे अन् उद्याचेबी हे तेवढंच खरं. हेबी ईसरता कामा नये. परंतु ते कालचे वीर जरी असले तरी ते आज मांगं पडलेले हायेत. त्यामुळंच त्याईच्यासाठी डॉ. बाबासाहेबाईनं आरक्षण आणलं व आरक्षणाची ईशेष तरतूद त्याईच्यासाठी करुन ठेवली. आरक्षणाचा लाभ तळागाळातल्या माणसाईले मिळावा म्हणून. कारण हा समाज एवढा मांगं होता का तो कधीच ईकासाच्या टप्प्यात यायसाठी प्रयत्न करत नोयता.          

आरक्षणाचा लाभ तळागाळातल्या माणसाईले मिळणे गरजेचे हाये. आज अनेक जाती हायेत व जातीवरुन वादंबी हायेत. आजच्या तत्सम जाती सोताले कमजोर समजत नाईत. आजच्या काई जाती ह्या अशाबी हायेत का त्या जातीलेबी आरक्षण हवं. सोताच्या समाजातील तळागाळातील लोकाईले वर उचलण्यासाठी तं काई जातीले आरक्षण हवं. दुसऱ्या जातीले आरक्षण मिळते म्हणून. ते मिळाले नाई पाह्यजे म्हणून. ते आरक्षणाची सवलतच नष्ट व्हावी म्हणून. तसं पायल्यास आज प्रत्येकच जातीत तळागाळातील लोकं हायेत का ज्याईले आरक्षण म्हणजे काय? याचा अर्थबी समजत नाई. ते त्याईचा लाभबी घेत नाईत. अज्ञानता असल्यामुळेच. तं ज्याईले आरक्षण मिळालेच नोको असे काई महाभाग आज आरक्षणाचा लाभ घेतांनी दिसत हायेत. हे वास्तविकता हाये. कारण संविधानात आरक्षणाची सवलत हे ईशिष्ट जातीले सरसकट देलेली हाये. ज्यात त्याईच्या श्रीमंताईच्या कसोटीची वर्गवारी वापरलेली नाई. आज परतेक जातीत असेबी काई श्रीमंत लोकं हायेत का ज्याईची वर्षाची आवक करोडो रुपये हाये. परंतु तरीबी ते त्याईच्या जातीले आरक्षण असल्यानं आरक्षणाचा लाभ घेत हायेत.           

आरक्षण असावं. परंतु ते कोणाले? ते तळागाळातील लोकाईले असावं. परंतु आता तळागाळातले लोकं ओळखायचे कसे? त्याचंबी उत्तर अगदी सोपे हाये. ते म्हणजे त्याईचं आधारकार्ड. अलिकडील काळात आधारकार्ड हे आपल्या बँक खात्यासह प्रत्येक गोष्टीशीन जोडलं हाये. ते शेती, प्लॉट, उद्योग शिवाय त्याईनं दिवसभर काय काय केलं? या गोष्टीशीनबी जोडलं हाये. त्यातच त्या व्यक्तीजवळ पैसा किती प्रमाणात उपलब्ध हाये. पैसा उपलब्ध हाये वा नाई? याशीनबी जोडलं हाये. त्यावरुन नक्कीच शोधता येते का आरक्षणाची गरज नेमकी कोणाले हाये?         

कालपरत्वे काई जाती अशाबी होत्या का ज्या जातीतल्या सर्वांईलेच आरक्षणाची गरज होती. कारण कालपर्यंत काई जातीतल्या लोकाईले इतर जातीत मिसळता येत नोयतं. त्या जाती सुधारणेच्या पलिकडे होत्या. शिवाय त्या जातीले सुधारणेच्या कक्षेत आणायचं होतं.          

आरक्षण हे त्याच तत्सम जातीले देलं. त्याचं कारण होतं, त्या जातीतल्या तळागाळातील माणसाईले वर आणणं. यात त्याईचा केवळ आर्थिक ईकास होणे एवढंच अपेक्षीत नोयतं तं त्याचबरोबर त्याईचा सर्वांगीण ईकास होणे अभिप्रेत होतं. सर्वांगीण ईकास अर्थात राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, कौटूंबिक अशा सर्वच प्रकारचा ईकास. शैक्षणिक ईकास म्हणजे त्याईले इतर समाजासोबत समानतेनं बसून त्याईच्याचएवढं वा त्याईच्यापेक्षाबी जास्त शिकता यावं. बौद्धिक ईकास म्हणजे त्याईले त्याईची बुद्धी स्वतंत्रपणे वापरता यावी. त्यावर कुणाचंच बंधन नसावं. त्याईले त्याईच्या बुद्धीचा हवा तसा वापर करता यावा. सामाजिक ईकास म्हणजे त्याईले इतर समाजात वावरतांनी मानाचे स्थान मिळावे. कौटूंबिक ईकास म्हणजे इतराईच्या कुटूंबासोबत कोणत्याबी बाबतीत आदान प्रदान करता यावं. मानसिक ईकास म्हणजे त्याईले कोणत्याबी बाबतीतून प्रताडीत करु नये अन् शेवटी राजकिय ईकास म्हणजे राजकारणातबी त्याईले यशस्वीरित्या इतराईच्या बरोबरीनं जाता येईन. हाच ईचार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकराईनं संविधानात ईशिष्ट जाती वर्गाईले आरक्षणाची संधी उपलब्ध करुन देली. त्यानंतर त्यानुसार देशातील अशा ईशिष्ट वर्गातले काई लोकं पुढे आलेत. परंतु त्याईनं केवळ आपलाच ईकास केला. आपल्या नात्यातील इतर लोकाईचा ईचारबी केला नाई व ईकासबी केला नाई. त्याईले वर आणलं नाई. येवूबी देलं नाई. त्याईले तसंच ठेवलं. शिवाय त्याईनं तसंच राहावं, शिक्षण शिकूच नये म्हणून त्याईले पिढीजात धंद्यातच गुंतवून ठेवलं. यासाठी त्याईनं तसंच आपल्याच या बिरादरीतील माणसाईनं तसंच राहावं म्हणून त्याईच्यासाठी सरकारले टपऱ्या मागतल्या. मात्र टपऱ्या मागणे याचा अर्थ ईकास होणे नोयता.        

आरक्षणाच्या माध्यमातून सोताच्या बिरादरीतील सर्वांगीण ईकास करत असतांनी त्याईनं शिक्षण शिकाले लावणं गरजेचं होतं. टपऱ्या मागून त्याईनं उद्योग धंद्यात गुंतवणं नव्हे. तसं पायल्यास लोकाईनं आरक्षण मागून सर्वांगीण ईकास केलाबी. परंतु तो ईकास केवळ आपली आर्थिकता वाढवण्यासाठी केला. शैक्षणिकता, राजकिय प्रगल्भता, बौद्धिकता वाढवण्यासाठी केला नाई. असे म्हणाले काईच हरकत नाई. कारण मोजकेच काई लोकं शिकले. त्याईचाच सर्वांगीण ईकास झाला. इतराईचा ईकास झाला नाई. त्याईले आरक्षण म्हणजे काय? तेबी समजलेले नाई. ते समजाले तयार नाईत. ते आज शिकालेबी तयार नाईत. शिक्षण वाघिणीचं दूध हाये हे त्याईले कळलेलं नाई.           

राजकीय ईकासाचा ईचार केल्यास ज्याईनं आरक्षणाचा फायदा घेऊन सोताचा ईकास केला. त्याच लोकाईनं सोताचे राजकीय पक्ष स्थापन केले. त्यानंतर आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूलेच ठेवला व लढत हायेत आपापसातच. राजकिय हक्कं प्राप्त करण्यासाठी. खरंच या वास्तविकतेतून असाबी ईचार येतेय का डॉ. बाबासाहेबाईले अभिप्रेत असलेल्या आरक्षणाची परिपूर्ती झाली हाये काय? याचं उत्तर नाई असंच येतं. त्याचं कारण असं का आरक्षणाच्या माध्यमातून जे नेते बनले. त्याईनं राजकीय डाव साधला.  सोताचा स्वार्थ साधण्यासाठी. म्हणूनच आरक्षणाची परीपूर्ती झाली नाई.         

महत्वाचं सांगायचं झाल्यास आजबी येळ गेली नाई. आतंबी आरक्षणाचा लाभ घेवून वर आलेल्या लोकाईनं सोता आरक्षणाचा लाभ घेण्याऐवजी आपल्याच बिरादरीतील आपल्याच बांधवाईले वर उचलण्यासाठी प्रयत्न करावा. त्याईले आरक्षणाचा अर्थ समजावून सांगावा. त्याईले आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. तवाच आरक्षणाची परीपुर्ती होईन व परतेक तळागाळातील माणूस वर येईन व त्याईचा ईकास होईन यात शंका नाई. मातर ते करण्यासाठी तेवढी हिंमत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकाईमंधी असणे गरजेचे हाये. तसाच आरक्षणाचा लाभ सर्वच तळागाळातील माणसालेबी मिळणं गरजेचं हाये.           

मानव समानता हाये तरी काय? पुर्वीपासूनच मानव समानता समाजात दिसत नाई. हे युगाच्या चार युगाचा इतिहास पडताळून पायला तं दिसून येते. म्हणतेत का पुर्वीच्या काळात म्हणजे कृत, त्रेता अन् द्वापर युगात राक्षस होते अन् तसेच देवंबी होते. म्हणतेत अन् वेद पुराणातबी लिहिलं हाये का देव अन् राक्षसाईची उत्पत्ती एकाच पित्यापासून झाली.        

पुराणातल्या तथ्यांशानुसार प्रजापिता ब्रम्हाचा मुलगा मरुत याचा मुलगा कश्यप. त्या कश्यपाले काई पुराणानुसार नऊ तं काई पुराणानुसार तेरा बायका झाल्या. ज्यात अदिती, दिती, दिनू अन् कद्रू या विशेष. ज्यात अदितीच्या पोटातून देवाईचा जन्म झाला अन् पुढं ईस्तारबी व दितीच्या गर्भातून राक्षस जन्माले आले. दिनूच्या पोटातून दैत्य आणि कद्रूच्या पोटातून नाग. त्यानंतर बरंच काई स्थित्यंतर घडलं.          

म्हणतेत का देव हे बलशाली होते. परंतु ते तेवढे धिप्पाड देहाचे नोयते. त्यातच सुरुवातीले राक्षसाईच्या धिप्पाड देहाची स्थिती पाहून त्याईले सृष्टीच्या रक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. ज्यात राक्षस सुरुवातीले पाणी अन् जमीन याईची सुरक्षा कराले लागले. त्यातच त्याईचं अधिपत्य सृष्टीवर निर्माण झालं. तेच पाह्यलं अदिती पुत्र देवांनं. मंग त्याईलेबी हेवा वाटाले लागला. येथूनच खरा संघर्ष सुरु झाला. तो संघर्ष होता अधिपत्याचा. देवाईले वाटत असन का आम्हालेबी सृष्टीतल्या परतेक कणाईचा वाटा हवा. त्यावर वाद उत्पन्न झाला असन. वादाचं समागम झालं असन अन् राक्षसाईले मुर्ख समजून देवाईची समजूत घालून सांगण्यात आलं असन का तुम्हीच या सृष्टीचे मालक हात अन् ते रक्षणकर्ते अर्थात नोकर हायेत. ज्यात राक्षसकुलातल्या काई हुशार असलेल्या राक्षसाईले हेच गोष्ट पटली नसन. त्यानंतर काईले वाटलं असन का आम्हीच या सृष्टीचे मालक. कारण आम्हालेच पुर्वी सृष्टीचं रक्षण करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यामुळं त्यातील सर्वच गोष्टीचा उपभोग घ्यायचा अधिकार आम्हालेच असावा तं काई राक्षसाईले वाटलं असन का असं बोलून देव आमचा अधिकार हिरावून घेताहेत. तो घ्याले नोको. मंग ईरोध अन् लढाया. कधी देव स्वर्गावर ताबा मिळवायचे तं कधी राक्षस.          

पुर्वीपासूनच देव व दानव अशी प्रथा चालत आलीय. देवाईले सुधारणावादी दर्जा मिळाला तं राक्षसाईले वाईटच समजलं गेलं. तसं पायल्यास देव अन् राक्षस हे दोन मानव अन्  दोघाईच्या जरी माया येगयेगळ्या असल्या तरी बाप एकच होता. त्यातच गरोदर असलेल्या दितीच्या गर्भात शिरुन देवाईचा राजा असलेल्या इंद्रानं गर्भाचे एकोनपन्नास तुकडे केले असंबी पुराण सांगते का ज्यात तत्थ्यांश वाटत नाई. परंतु तो आपला भाग नाई. देव दानवाच्या या कथेत आणखी एक म्हणलं जाते का दिती संध्याताम्हणाच्या येळेस कश्यप ऋषीजवळ आली अन् कामवासनेची ईच्छा करु लागली. परंतु त्यावर कश्यप ऋषीनं उत्तर देलं का हा काळ भूत भ्रमणाचा काळ हाये. या काळात समागम प्रक्रिया नोको. कारण यावेळेस समागमातून जे संतती जन्मास येईन. ते संतती हे  काई चांगल्या प्रवृत्तीची जन्मणार नाय. परंतु ते दितीनं ऐकलं नाय. अन् त्याच काळात जबरदस्तीनं समागम करुन घेतलं अन् ते गरोदर रायली. ज्यातून तिच्या गर्भातून राक्षस उत्पन्न झाले.          

ते पुराण अन् तेच पुराणातील तत्थ. आजबी आपण पायतो आई एकच असते. परंतु त्याच आईच्या गर्भातून एक मुलगा चांगला निपजतो तं दुसरा मुलगा वाईट. असं का? तं त्याचं कारण कदाचीत समागमनाचा काळ चूकत असन. शिवाय एखाद्या मुलाले भक्त प्रल्हादासारखं कितीबी शिकवलं का आपून राक्षस हाओत. आपण राक्षसाईसारखं वागाले पायजे. परंतु ते कायपण आयकणार नाई. तो आपल्याच मनाचं करन. भक्त प्रल्हादाबाबत तेच घडलं. त्याईच्या अगदी बालवयात त्याईले राक्षसाईनं शिकवलं का त्याईनं राक्षसासारखं वागावं. परंतु तो आयकला नाई. हेच घडलं विभीषणाच्या बाबतीतबी. तो रावणाचा भाऊ असूनबी चक्कं रामाले जावून मिळाला. जर तो रामाच्या बाजूनं लढला नसता वा लढाले गेला नसता तं चित्र काईसं येगळंच रायलं असतं. आज रामाऐवजी रावणाचीच पुजा होत रायली असती अन् रावणाचा चांगला इतिहास लिहिला जावून त्याच्याच नावानं जयजयकार झाला असता.           

हे झालं पुराण अन् पुराणातल्या समागमनाचं तत्व. पुर्वीपासूनच मानव समान नाईत व मानवताबी समान नाई. परतेक आईले आपला पुत्र आवडते, जरी तो वाईट असन तरीबी. तसं पायल्यास मायबापाले वाईट मुलं कमी आवडतेत व चांगली मुलं जास्त. शिवाय त्या मुलातले गुण वाईटबी असतीनबी, तरी मायबापाले ते गुण चांगलेच वाटतेत व ते त्याईचा ईरोध करीत नाईत.            

हाच राक्षस अन् देवाईचा वाद. त्यातच राक्षसाईले असलेली पाणी रक्षणाची जबाबदारी. त्यात ठरलं का आपून समुंद्राचं मंथन करावं. मंग समुद्रमंथन झालं. त्यातून ज्या ज्या वस्तू निघाल्यात. त्याईचं वाटप करणं सुरु झालं. ज्यात चांगल्या चांगल्या वस्तू अतिशय हुशारीनं देवाईनं ठेवल्या अन् ज्या वस्तू काही कामाच्या नोयत्या, त्या राक्षसाईले देण्यात आल्या. जशी सुरा अर्थात दारु राक्षसाईले भेटली. शेवटी अमृत कलश सापडलं. तेबी देवाईनच ठेवण्याचं ठरवलं. जे माणसाईले अमर करणार होतं. परंतु ते लवकरच लक्षात आल्यानं मंग त्या कलशातल्या अमृताचं वाटप करण्यात आलं. ज्यात दोन रांगा लावण्यात आल्या. एक राक्षसाईची अन् दुसरी देवाईची. ज्यातून एक राक्षस अन् एक देव असं वाटप करण्यात याले पायजे होतं. परंतु तसं वाटपच झालं नाई. देवाईच्या रांगेत आधी वाटप सुरु झालं अन् राक्षसाईच्या रांगेत नंतर वाटप करु असं ठरवण्यात आलं. त्यातच रांग ईशाल होती.          

अमृत....... त्या अमृतात अमर होण्याचं तत्व. ते अमृत देवांच्या रांगेले आधी वाटप करायचं ठरवलं गेलं व वाटप सुरु झालं. तसं त्यातील अमृत आपल्याले मिळन का नाई अशी शंका देवाईच्या रांगेतल्या काई राक्षसाईले लागली व त्यातल्या राहू नावाचा राक्षस हा देवाईच्या रांगेत जावून बसला व त्यानं अमृत प्राशन केलं. ज्याबद्दल त्याची मानच कापली गेली. ज्याच्या मानेले आज राहू म्हणतेत व धडाले केतू. हेच तात्कालिक कारण घडलं, चांगली प्रवृत्ती व वाईट प्रवृत्ती पुरातन काळापासून निर्माण होण्यास कारणीभूत असलेली. आज त्याच वाईट प्रवृत्तीतून मानव असमानता निर्माण झाली. असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाई. खरं तं या धरणीवर मानव असमानतेची बीजं पुर्वीच्या काळापासूनच निर्माण झाली नव्हे तं केली गेली. जे तत्व आजबी लागू पडते. याबाबत एक उदाहरण हाये.            

एका वर्गात अनेक मुली होत्या. त्या वर्गात एका शिक्षकानं ईचारलं, ईचारलं का तुमच्या घरी तुमचे आईवडील तुम्हाले वस्तू देतांनी भेदभाव करतेत का नाई करत. त्या प्रश्नावर नक्कीच वर्गातल्या अर्ध्या मुलीनं सांगतलं का आमच्या वर्गात आमचे आईवडील आमच्या भावाले निश्चीतच आमच्या हिस्यातला वाटा जास्त देतेत. आम्हाले कमी देतेत. या ठिकाणी प्रत्येक मायबापाले मुलं मुली समान असाले पायजेत. परंतु काई घरात मुलगा मुलगी असा निश्चीतच भेदभाव केला जाते. ज्यातून स्री पुरुष असमानता दिसून येते. एक घर तं असं पायलं का त्या घरी मुलगी अतिशय हुशार असूनबी तिले फक्त दहावीपर्यंतच शिकवलं. शिकण्याची ईच्छा असूनबी अन् तिच्याच भावाले कितीतरी जास्त. मुलगा वंशाचा दिवा हाये असं म्हणू म्हणू.            

मानवी व्यवहाराची अशी असमानता. त्यातच राक्षस अन् देव असा वाद. राक्षस अन् देव. दोन सावत्र भाऊ. सृष्टीवरील अधिपत्यासाठी भांडत गेले. दोघाईनबी एकमेकांवर ताशेरे ओढले. ज्यात देवाईचं जेव्हा राजकिय अधिपत्य निर्माण झालं. त्याईनं आपला इतिहास चांगलाच लिहिला व राक्षसांचा इतिहास वाईट. ज्यातून आजबी राक्षसाईले वाईट व देवाईले चांगलं समजलं जाते.            

मानवी असमानता. तो काळ व ते युग. धर्मशास्र व पुराणानुसार हे देव राक्षस प्रवृत्ती वर्तमानकाळ अर्थात कलीयुग येईपर्यंत सुरुच होती व आजबी सुरुच हाये. काल याच देव व राक्षसाईच्या वर्गीकरणातून पुढं ब्राह्मण क्षत्रीय वैश्य शुद्र आले. त्यानंतर सुरु झाला भेदभावाचा तो इतिहास. ज्या इतिहासाले काळा इतिहास असं म्हणता येईन.          

भेदभाव व जातीभेद हा पुर्वीपासूनच अस्तित्वात होता. ज्यात राक्षस समजली जाणारी माणसं आपल्यावर भारी पडू नये म्हणून त्याईले जेरीस आणण्यासाठी देवातल्या काई हुशार लोकाईनं नियम बनवले. ते नियम होते, जो देवादिकांचं आयकन, त्याले अभय द्यावं किंवा त्याले पाताळात गाडून त्याईचा उदोउदो करावा. जसं बळीचं करण्यात आलं. बळी हा चांगल्या स्वभावाचा दानी राजा असूनबी त्याले पाताळात गाडण्यात आलं. कारण तो राक्षसकुळातला होता.          

हाच भेदभाव व अत्याचार आजबी सुरु हाये. आजच्या कलियुगात याच राक्षसाईले गरीब, आदिवासी व अस्पृश्य ठरवलं गेलं हाये. त्यानंतर ज्याप्रमाणे कृत, त्रेता व द्वापर युगामध्ये राक्षसाईवर अत्याचार होत होता. तसाच अत्याचार हा कलियुगात मानवावर होवू लागला हाये. जे अस्पृश्य हायेत, आदिवासी हायेत व गरीब हायेत. हाच भेदभाव आज चरणसीमेले पोहोचलेला हाये. तो एवढा चरणसीमेले पोहोचला हाये का लोकाईचं जगणं कठीण करुन टाकलं हाये त्या भेदभावानं. आरक्षण हाये म्हणून त्याईचं थोडं बरं हाये. आरक्षण नसतं तं आज याच समाजाले उच्च जातीसमोर भीक मांगावी लागली असती वा हात पसरावे लागले असते.            

महत्वपुर्ण बाब हे का आपला हक्कं मागणाऱ्या याच गटाले काल राक्षस समजलं गेलं अन् आज आपला हक्कं मागणाऱ्या या गटाले आदिवासी, अस्पृश्य अन् गरीब समजलं जातं. याईचा अन्वयार्थ काल राक्षसाईले जगण्याचा अधिकार नोयता. तीच गत आज गरीब आदिवासी व अस्पृश्य, याईची असून त्याईनंबी सुखानं जगू नये अशीच हाये. तवा हे गंभीर बाब असून आजतरी समाजानं बदलून अस्पृश्य, आदिवासी वा गरीब याईलेबी सन्मानानं जगवावं. जगू द्यावं. कारण त्याईलेबी जगण्याचा अधिकार हाये. हे ईसरुन चालत नाई. त्यामुळंच त्याईले  कोणीबी अस्पृश्य, आदिवासी वा गरीब समजू नये. हिणवू नये. कारण तेबी आधारस्तंभ आहेत सृष्टीचे. काल जसे देव व राक्षस एकाच वडीलांची मुलं होती. तसेच आज कलियुगातही अस्पृश्य, आदिवासी व गरीब लोकं एकाच वडीलांची मुलं असतीलच. हेबी ईसरता कामा नये. महत्वाची गोष्ट म्हणजे मानव समानता ही महत्वाची. ती असावीच. त्यात देव राक्षस वा स्पृश्य, अस्पृश्य, आदिवासी गैरआदिवासी, गरीब श्रीमंत असा भेदभाव नोकोच. हे तेवढंच खरं.         

शिवरामले तेच वाटत होतं आज. कारण आज शिवराम शिकला होता बराचसा.  त्याचबरोबर त्याचा मित्र संप्याबी. दोघालेबी वाटत होतं का बाबासाहेब अकाली मरण पावले. स्वातंत्र्य मिळताबरोबर. त्याईले तं स्वातंत्र्याचा उपभोगबी घेता आला नाई. त्याईनं इंग्रजाईच्या मदतीनं समाजसुधारणा केली. परंतु पुऱ्या स्वरुपात झाली नाई. बाबासाहेबाईचं सुधारणेचं कार्य अपुरं रायलं. ते आपण करावं. समाजसुधारणा व्हावी नव्हे तं ते समाजसुधारणा आपणच करावी. यादृष्टीनं ते कामाले लागले होते. त्यातच त्याईनं समाजसुधारणेसाठी आपआपल्या जाती निवडल्या होत्या. ते इतर जातीतल्याबी आपल्या मित्राईले सोबत घेवून ते समाजाचे ईचार बदलवू पाहात होते. ज्यात त्याईले त्याईच्याच एक उच्च जातीतला मित्र शंकरचीबी मदत होवू लागली होती.  

************************************************