भाग 14
दोन क्षण बाबाराव तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.. आणि बाहेर निघून गेले..
दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच मायराने लांब श्वास घेतला... आणि श्वास नियंत्रणात आणू लागली.
दोन मिनिटांनी ती धडपडत उठली... तिच्या रूम मधल्या ड्रेसिंग टेबल मध्ये खालच्या खणामध्ये कोपऱ्यात वस्तू बाजूला सरकवून पाहू लागली...
पाहिल्यानंतर ती वस्तू तिला सापडली...
हातात घेऊन ती बारकाईने तिच्याकडे बघू लागली तर दरवाजा जवळ पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागला
आणि मग....
ती वस्तू हातात घेऊन पटकन पुन्हा बेडकडे आली आणि अंगावर पांघरून घेऊन शांतपणे झोपली.
तर आता रूम मध्ये लीला आल्या... त्यांनी येऊन बघितलं जवळ मायराच्या .....तर मायरा शांत झोपून दिसली .....त्यांना बरे वाटले निदान शांत झोपून आहे आता....
त्यांनी जवळ येऊन तिचे अंथरूण पांघरून दिले व्यवस्थित.. आणि बाहेर निघून गेल्या.
इकडे मायरा तिने हातातली वस्तू म्हणजे छोटासा कीबोर्ड वाला फोन जुना तो बाहेर काढला. तिच्याजवळ असलेले तिने सिम फील केलं. आणि कॉल लावला...
हळूहळू कॉल वर बोलणे झाल्यावर...
तिने जो प्लॅन फिक्स केला होता ...आता थोडा वेळ त्यावर विचार करू लागली...
मग एक आयडिया सुचली तिला.
....
आंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर मायराने लीला यांना म्हटले.....
"आई ...आई गावाला जाण्या अगोदर शंकर पार्वतीचे देवळात चल ना... दर्शन करून घेऊ... चल... मग निघू."
लीला....
"काय गं मायू.. तू पण ना... असे वेळेवरचं काहीतरी सांगतेस. चल ...आता देवाचे नाव घेतले तर दर्शन घेऊ... ड्रायव्हरला गाडी तयार ठेवायला सांग. आवर लवकर... अर्ध्या तासात दर्शन घेऊन परत येऊ. आणि लगेच गावाला जायचं आहे."
बाबाराव यांनी गावामध्ये त्यांची फोरव्हिलर गेली पाहिजे या उद्देशाने .... त्या भागात काही सोयी करून घेतल्या होत्या तेवढ्या.. मंदिर चा रस्ता बरोबर गाडी जाण्यालाइक बनवलेला होता.
ड्रायव्हरने गाडी काढली..
दोघीही निघाल्या दर्शनासाठी... तेथे पोहोचल्यानंतर त्या मंदिराच्या आसपासची आभा... आज वेगळीच वाटली मायराला... आत्मिक शांतता वाटत होती तिथे...
मंदिरासाठी बराच चढ होता चढण्याचा... तर लीला यांच्याने तेथे चढणे होत नव्हते... त्यांना खात्रीच वाटत नव्हती की आपण तिथपर्यंत जाऊन दर्शन घेऊ शकतो.
लीला खालीच गेट जवळ दोन्ही बाजूला बसण्यासाठी बेंचेस होते तिथे झाडाची सावली पाहून त्या बसल्या.
आरतीची थाळी घेऊन मायरा वरती जाऊ लागली.
वरती जाताना मायरा इकडे तिकडे नजर फिरवत होती.
थोडा वारा जास्त सुटला होता त्यामुळे मंदिरात गेल्यावर तेथे मंजुळ सुरात घंटा नाद सुरू होता. तर मनही त्या अल्हाद वाऱ्यावर दशा मंजुळ आवाजात घंटा ... विंड चाइम्स सारख्या गोड आवाज करत आहेत त्याप्रमाणे तिला आपले मन तरंगतेय असे वाटत होते.
मंदिराला फेरे मारत असताना अचानक कोणीतरी तिला हात ओढून बाजूला तेथेच एक दगडांचे छोटेसे खोली सारखे होते तिथे घेतले..
तिच्यासाठी तिने बोलवल्याच्या अनुसार...
तो तेथे दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच पोहोचला होता.
कारण उशीर झाला तर कोण कोण तिच्यासोबत येतेय
आणि त्यांना दिसलं तर ...??
कुणालाही आपण मंदिरात येतोय हे दिसलं तर...?? आपल्याला मग तिच्यासमोर जाता येणार नाही.....
उलट गावातले लोक आपल्या सोबत काय करतील...
हे सांगता येणार नाही...
त्याला नजरेसमोर पाहताच तिला थोडेसे गलबलून आले.
ती त्याच्या मिठीत जाऊन त्याच्या छातीवर कान ठेवून तसेच बिलगून राहीली..
पाच सहा मिनिट...
नंतर सरळ होऊन त्याला गच्च पकडून राहिली..
तिच्या हृदयात काहीतरी घालमेल चालली आहे हे मोहितच्या लक्षात आले होते.. मंदिर असल्यामुळे त्याने तिला थोडं आडोसा होता... तिथे घेतलं.
तरीही तो तिथे बोलू शकत नव्हता कारण निरव शांतता ..त्यात लोकांची ये जा गावात लहान गोष्टीची मोठी गोष्ट व्हायला वेळ लागत नाही... आणि बाबाराव या व्यक्तीचा पगडा जिकडे तिकडे होता... तो ऑरेंज कलरच्या दुपट्ट्याने आपला चेहरा झाकून आलेला होता.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावातल्या कडक शिस्तीचे अनुशासन...
तरीही तो तिने सांगितले म्हणून आला होता लपत छपत.
पण मंदिराच्या आत मध्ये तो गेला नव्हता...
मायरा त्याला हळूच म्हणाली...
"मी आज मामाच्या गावाला जाणार आहे. आपल्याबद्दल माझ्या घरी माहित झालेलं आहे. तुझं म्हणणं बरोबर होतं राम आपला पाठलाग करत होता. मला तिकडे गेल्यानंतर जवळपास महिना भर येऊ देणार नाही आहे. बाबांचा प्लॅन आहे तसा.... आणि इथे ते काहीतरी करणार... तुला किंवा तुझ्या आई वडिलांना.. तर तू तुझ्या मामाच्या गावाकडे शहरात जातोस काय...???
मोहित....
"मायरा... तू मामाच्या गावाला जात आहेस ..
जा काही हरकत नाही..
मी मात्र इथून कुठेही जाणार नाही आहे.. एवढ्या दिवसांनी मी आई आणि बाबांच्या सोबत घरात आहे..
तर त्यांना किती छान वाटत आहे आणि मलाही पण.
आलेल्या गोष्टीला मी तोंड द्यायला तयार आहे...
तू घाबरू नकोस ते एक ना एक दिवस ऐकतील.."
मायरा....
"हे बघ मोहित... तू माझ्या बाबांना ओळखत नाही. मी त्यांना लहानपणापासून ओळखते.
मी आता गेल्यानंतर इलेक्शनच्या जवळपास येणार आहे. बाबा उभे राहणार आहे तर त्यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी..तू ...तुला काही असं तसं वाटलं तर लगेच शहरात निघून जा...गरज पडल्यास फोनचा वापर कर...
बरं ...आता मला निघायला हवं... आई मंदिराच्या बाहेर बसलेली आहे."
असं म्हणून तिने त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन हलकेच त्याच्या ओठावर ठेवले आणि बाहेर आली.
तो तेथे पाच ते सहा मिनिट थांबला आणि आलेल्या रस्त्याने वापस परत फिरला... चेहऱ्यावर ऑरेंज कलर चा दुपट्टा बांधून घेतला आणि निघाला....
....
मायरा मंदिराच्या बाहेर आली आणि स्टेप्स उतरू लागली.
डाव्या बाजूने ती उतरत होती प्रसादाची थाळी घेऊन... तर उजव्या बाजूने खालून वर काही तरुणांच्या ग्रुप आला मंदिरात जाण्यासाठी स्टेप्स चढत होता...
आणि त्या ग्रुपला मायरा दिसली...
त्यातील एक मायरासमोर उभा राहिला...
आणि उजवा हात पुढे करून म्हणाला...
" प्रसाद"
त्याने असं म्हणताच मायराने ही आढेवेढे न घेता प्रसाद हातात दिला...
त्याने घेतल्यावर त्या इसमाने आपल्या सोबतच्या मित्रांना इशारा केला तसे त्यांनीही हात समोर केले तर मायराने तर सर्वांच्या हातात प्रसाद दिला...
मायराला हे सर्वजण थोडे विचित्र वाटले आणि प्रसाद दिल्याबरोबर ती पटापट स्टेप्स उतरू लागली.
सर्वप्रथम प्रसाद घेणारा तो... "सुंदर"
नाव सुंदर पण सुंदरतेचा त्याच्या व्यक्तिमत्वाशी
काहीही जोडतंत्र नव्हते...
"सुंदर"
गावातलीच दुसरी पार्टी जी बाबाराव यांच्याशी चॅलेंज करण्यायोग्य तयार होती आहे.. असे बाबाराव यांचं मत होतं.
नानाजी शेलार म्हणजे.. बाबाराव एवढं रग्गड श्रीमंत नाही... पण थोडीफार श्रीमंती होती त्यांच्याकडे..
एकंदरीत सांगायचं म्हणजे खाऊन संपणार नाही एवढं होतं त्यांच्याकडे धन आणि धान्य.
अशा या नानाजींचा हा तालेवार मूलगा...
....... "सुंदर."
बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा सुंदर हा मात्र त्याच्या नावाप्रमाणे सुंदर नव्हता किंवा रामा सारखा सत्यवचनीही नव्हता.
शाळेतले शिक्षण त्याचे बेताचं पण .....कोणत्याही गोष्टीवर, विषयावर बाता मारण्याची गड्याला भारी हाऊस दांडगी. शरीराने ही गोठ्यातल्या रेड्यासारखा मस्तवाल.
ही अंगातली मस्ती गावातील गरिबांची दुःख हलकी करण्याच्या कधीही कामी न आणता तरुण पोरींची छेडछाड काढत बसायचे..... असा नानाजीच्या आडदांड पोराचा... सुंदरचा उद्योग होता.
भोवताली चांडाळ-चौकडी गोळा करून सुंदर तरुण पोरींची चर्चा करत बसायचे..
मायराने प्रसाद देऊन स्टेप्स उतरल्या आणि लीला कुठे बसून आहे ते शोधू लागली..
लीला पण तिथेच वाट पाहत होत्या.....
ती आल्यानंतर लीला आणि मायरा दोघेही कारमध्ये बसल्या आणि निघाल्या...
...
...
....
आज कवडूला हे समजत नव्हतं की त्याला बाबाराव यांनी त्याच्यासारख्या व्यक्तीला भेटण्यासाठी का बोलवले असावे??
त्यांनी आपल्या माणसाला निरोप घेऊन पाठवलेले आहे... असे कित्येक वर्ष निघून गेले पण आजपर्यंत बाबाराव यांनी कधीही कवडू ला बोलावले कुठल्याही गोष्टीसाठी.... असे झाले नव्हते.
आणि आज तर माणसाच्या निरोप होता त्यांच्या ...
अगदी तातडीने बोलवण्याचा...
हे ऐकून कवडू गांगरून गेला होता...
कवडू....
"एवढी मोठी आसामी... आम्ही स्मशानाच्या दारात राहणारे... मंदिरात आम्हाला प्रवेश नाही.... एखाद्या राजाप्रमाणे दरारा आहे.... आजपर्यंत निव्वळ पाहिले आहे दुरून दुरून त्यांना..... गावातून कधीकधी घोडेस्वारी करून जातात तेव्हा एक अजब ऐट दिसते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात.... लोकं आपसूक वाकून नमस्कार करतात. त्यांच्या बंगल्यातून मला का बोलावले असावे...??.. मी तर काहीही केलेले नाही... आजपर्यंत माझा त्यांचा संपर्क आला नाही. मग आता का...??"
कवडू विचार करत होता....
अचानक त्याचे ...समोर ... खाटेवर लोळत असलेला मोहित याच्याकडे लक्ष गेले..
मनात शंका निर्माण झाली त्यांच्या....
"बाबाराव आपल्याला बोलवत आहेत याच्याशी मोहितचा तर संबंध नाही...."
हा मनात विचार येताच कवडू तर्क जोडू लागला...
तर त्याच्या लक्षात आले की मोहित शहरातून आलेला आहे. शिक्षण पूर्ण करून .....तसेच बाबाराव यांची मुलगी पण आलेली आहे शहरातून शिक्षण पूर्ण करून ....हे त्याने बाजारात गेलेला तेव्हा ऐकले होते....
आणि त्याला थोडासा मोहितबद्दल... आपल्या मुलाचे वागणे हेही थोडे ...त्याला शंकाग्रस्त वाटत होते...
मोहित आल्यापासून कवडूला थोडे वाटत होते की आपला मुलगा प्रेमात पडला आहे कोणाच्यातरी...
हा विचार येताच... कवडूच्या अंगावर भीतीचे शहारे उमटले..
धडधडते अंतकरण घेऊन कवडू.... बाबाराव यांच्या बंगल्याच्या गेट जवळ आला....
आणि....
🌹🌹🌹🌹🌹