Maharathi Vyas of extraordinary imagination power in Marathi Mythological Stories by Balkrishna Rane books and stories PDF | विलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यास

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

विलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यास

व्यासांच्या कल्पना ज्या प्रत्यक्षात साकार झाल्याविलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यासभाग१असं म्हणतात की व्यासाने सगळं जग उष्ट केलय.याचा साधा सरळ अर्थ असा की व्यासाने लिखाण करतानाकुठलाच विषय सोडला नाही. या पुर्वी, आता आणियानंतरही या जगात जे घडलं किंवा घडेल ते सर्व व्यासांच्या लिखाणात कुठे ना कुठे आढळते.पुराणातली वांगी म्हणून सोडून देता येणारा हा विषय नाही किंवा प्राचीन भारत खूप प्रगत होता असं म्हणून छाती फुगवण्यातही अर्थ नाही. विषय लाबंवण्यापेक्षा प्रत्यक्ष काही उदाहरणेच बघूया.   श्रीरामांचा पूर्वज पृथूचा पुत्र सत्यव्रत याने विविध प्रकारे प्रचंड पुण्य कमावले होते.या पुण्याच्या बळावर तो मृत्यूनंतर स्वर्गात जाणार होता यात संशय नव्हता.पण त्याला सदेह स्वर्गात जायचं होते.हे शक्य नाही असं त्याला अनेकांनी समजावलं.पण तो हट्टाला पेटला.त्याने त्यांचे कुलगुरू वसिष्ठ मुनिंना ' मला सदेह स्वर्गात पाठवा असं सांगितलं.पण वसिष्ठ व त्यांच्या मुलाने त्याला ठणकावून सांगितले की हे शक्य नाही व ते निसर्गाच्या विरुद्ध आहे.( त्या काळात सम्राटालाहीहे चूक आहे असं सांगणारे होते) सत्यव्रतला कुणीतरी सांगितले की विश्वामित्र ऋषी प्रचंड ज्ञानी असून ते या बाबतीत मदत करु शकतील.   झाले सत्यव्रत त्वरीत विश्वामित्रांकडे गेला.वशिष्ठ व विश्वामित्र यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य. विश्वामित्र हट्टाला पेटले.वशिष्ठांना हिणवण्यासाठी त्यांनी सत्यव्रतला सदेह स्वर्गात पाठवण्याची जबाबदारी घेतली.त्यांनी एक महायज्ञ केला व जगातला पहिला मानव सदेह अंतराळात प्रक्षेपित केला.( अंतराळ यानातून?) खरी गंमत पुढेच आहे.सत्यव्रत आपली जागा घेईल या भितीने इंद्राने त्याला स्वर्गात न घेता पुन्हा पृथ्वीच्या दिशेने ढकलले.चिढलेल्या विश्वामित्रानेसत्यव्रतला अंतराळातच थांबवलं. सत्यव्रत ना स्वर्गात ना पृथ्वीवर अश्या अवस्थेत आला.आज आपण अश्या अवस्थेला त्रिशंकू अवस्था म्हणतो.गयावया करणार्या सत्यव्रतला विश्वामित्राने  एका विशिष्ट कक्षेत स्थापित केले व तो त्या कक्षेत भ्रमण करत राहिला.महाभारतात व समाजात त्रिशंकू या नावाने अमर झाला.   व्यासाच्या काळात मानव अंतराळात जात होता असं म्हणणं मूर्खपणाचे ठरेल.पण व्यासाने मानवअंतराळात जाईल ही पाच हजार वर्षांपूर्वी केलेली कल्पना सत्यात उतरली हे नक्की. आज अग्णिबाणाद्वारे उपग्रह अवकाशातपाठवून दोन ते तीन टप्प्यांत त्याची कक्षा निश्चित केली जाते .या कक्षेत उपग्रह नंतर भ्रमण करत राहतो.व्यासाने केलेल्या वर्णनाशी हे बर्याच प्रमाणात जुळत . कदाचित हा योगायोग असावा असं आपण समजू.-----*---------*--------*-------*-------*--------*---  महाभारतात ' माधवी ' ची एक विलक्षण कथा येते.खरं म्हणजे हि कथा अनेक अर्थाने विचार करायला लावते.पण आत्ता तो आपला विषय नाहिय.या कथेतही विश्वामित्र आहेच. माधवी ची कथा थोडक्यात अशी आहे.    विश्वामित्राचा गालव नावाचा एक आवडता शिष्यअसतो. हा विश्वामित्रांकडे बारा विद्या शिकून पारंगत होतो.तो विश्वामित्रांकडे मी तुम्हास कोणती गुरुदक्षिणा देऊ असं विचारतो.मला कोणतीच गुरुदक्षिणा नको असं विश्वामित्र सांगतात.पण गालव पुन्हा पुन्हा तेच विचारत राहतो.तेव्हा विश्वामित्र चिडून मला आठशे श्वेतकर्णी घोडे दे असं सांगतात.आता ही अट पूर्ण करणे शक्य नसते.कारण या घोड्यांची किंमत प्रचंड असते.अखेर गरुडाच्या मदतीने तो सम्राट ययातीकडे( ययाती - देवयानीपैकी) येतो. पण ययातीकडे त्यावेळी तेवडे घोडे किंवा पैसे नसतात.(दानधर्म व अन्य उपभोगात धन गमावलेले असते)पण तो गालवा समोर एक जगावेगळा प्रस्ताव ठेवतो.तो म्हणतो.." याचकास  रिक्तहस्ते पाठवणे माझ्यासारख्या चांद्रवंश राजाला शोभा देत नाही.  माझी मुलगी माधवी हिला घेवून जा. तिला दिव्य गर्भाशयाचा वर प्राप्त झाला आहे.चार गुणवान पुत्रांना जन्म देवूनही तिचं कौर्माय अखंडित राहिलं. ती अत्यंत सुंदर, गुणवान व परम आज्ञाकारी आहे.कोणताही राजा तिच्या कडून ( सौंदर्यवर भाळून) पुत्रप्राप्तीसाठी तूला श्वेतकर्णीघोडे  देतील. त्यानंतर तू माधवीला माझ्याकडे घेवून ये."  माधवी सुध्दा कोणताही प्रतिवाद न करता तत्काळ वडीलांची आज्ञा मान्य करते.गरूड व गालव दोघे एकूण चार राजांकडे जातात प्रत्येक राजा एक पुत्र होईपर्यंत माधवीला आपल्याकडे ठेवतो व त्याबद्दलप्रत्येकी दोनशे -दोनशे श्वेतकर्णी घोडे गालवाला देतात.अखेर माधवी पुन्हा आपल्या पित्याकडे येते.ययाती माधवीच स्वयंवर ठेवतो. पण या दरम्यान अनेक अनुभवातून गेलेली माधवी आमूलाग्र बदलेली असते.स्वयंवराला आलेल्या सर्व पुरूषांना , ऋषींना व स्वतःच्या पित्याला ती फैलावर घेते.ती अनेक प्रश्न निर्माण करते  व अखेर विरक्ती येवून ती तिथूनच वनात जाते.यात स्त्री शोषण, समाजातील असमानता, आर्थिक प्रश्न ह्या समस्या आजही आहेत.   माधवीची कथा आणि नव्या युगातील भाडोत्री माताया दोन्ही गोष्टी सारख्याच.  'दिव्य कोख ' म्हणजेच माधवीच सक्षम गर्भाशय , नाही का? माधवीने फक्तगर्भाशय भाड्याने (दोनशे घोड्यांच्या मोबदल्यात) दिले होते.त्यामुळे ती तात्विक दृष्ट्या अखंड कुमारीकाराहिली. ' सरोगसी मदर ' ही आज अस्तित्वात असलेली गोष्ट पाच हजार वर्षांपूर्वी व्यासाने कल्पिली होती हे नक्की! तसेच व्यास अप्रत्यक्षपणे आय.व्हि.एफ तंत्राची कल्पना मांडतो.( महाभारतावरील अनेक पुस्तके, भाषांतरे, टिका, संशोधने, टिपण्या मी वाचल्या व यातून मला जे जाणवलं ते इथे लिहिले.यापूर्वीही काही अभ्यासकांनी यावर लिहिले आहे. मी माझ्या आकलनातून लिहिले आहे.)(पुढील भागात आणखी काही सत्यात उतरलेल्या व्यासांच्या कल्पना .)विलक्षण कल्पनाशक्तीचा महारथी व्यास भाग - २महाभारतात नल- दमयंतीची सुंदर प्रेमकथा आहे.नल- दमयंतीची कथा सर्वांना माहीतच आहे.द्युतात राज्य गमावल्यावर नल व दमयंती वनवास पत्करून अरण्यात भटकत असतात . आपल्यामुळे दमयंतीला त्रास होतो या भावनेतून नल उदास होतो.एकच वस्त्र पांघरून झोपलेले असताना नल अलगद वस्त्र कापूनदमयंतीला एकटं सोडून निघून जातो.दमयंती कशी बशी आपल्या माहेरी पोहचते.पण नलाचा विरह तिला स्वस्थ बसू देत नाही.पित्याच्या मदतीने ती नलराजाला शोधण्याचा प्रयत्न करते. लवकरच तीला कळते की नल हा ऋतुपर्ण राजाच्या पदरी सारथी म्हणून काम करत आहे.हे समजल्यावर ती आपलं पुन्हा स्वयंवर रचण्याचा बनाव करते .ऋतुपर्ण राजाला असा निरोप देते की तिचे( दमयंतीचे) उद्या सूर्योदयावेळी स्वयंवर असून त्याने त्यासाठी अवश्य यावे.     वेळ फक्त एका दिवसाचा असतो.घोडा किंवा रथ याने कुंडनपुरला पोहोचणे शक्य नव्हते.ऋतुपर्ण राजा निराश होतो.पण नलराजा ऋतुपर्णला सांगतो की मी अश्वविद्येत निष्णात असून मी तूला उद्या सूर्योदयापूर्वी कुंडनपूरला नेईन.रथ सिध्द करून नल व ऋतुपर्ण प्रवास सुरु करतात.रथाचा वेग प्रचंड असतो.मध्येच ऋतुपर्णाचा शेला वार्याने उडतो.ऋतुपर्ण नलाला रथ थांबवायला सांगतो. तेव्हा नल त्याला म्हणतो..." तूझा शेला काही योजने मागे पडलाय.आपण खुप पुढे आलोय."तेव्हा  ऋतुपर्ण चकित होतो.एवड्या कमी वेळात एवढे अंतर कसे पार झाले हे त्याला कळेना.( एक योजन म्हणजे साडेबारा किलोमीटर)ऋतुपर्ण राजाला अक्षविद्या ज्ञात होती.तो नराला सांगतो मी तूला अक्षविद्या देतो तू मला अश्वविद्या शिकव.अक्षविद्येची एक झलक तो नल राजाला दाखवतो. तो समोरच्या झाडाच्या एका फांदीवर किती पाने असतील ते सांगतो.नल खात्री करतो . ऋतुपर्णाने सांगितले तेवढीच पाने फांदीवर होती.     अक्षविद्या द्यूतात फाश्याच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल याचा अंदाज बांधण्यासाठी उपयोगी पडते. अक्षवि्द्या म्हणजे आजचे संभाव्यता शास्त्र.आज निवडणूकांच्या निकालाचे अंदाज बांधण्यासाठी, सर्वेसाठी, क्रिकेटमध्ये धावांचा अंदाज बांधण्यासाठी व अनेक शाखांमध्ये वापरला जाते. पाच हजार वर्षांपूर्वी व्यासाला संभाव्यता (probability) हे शास्त्र माहीत होते की भविष्यातील शास्त्रांचा त्याला अंदाज आला होता.  नलाचा रथाचा वेग हा आजच्या मोटरकारपेक्षा खूपच जास्त होता.या वेगाची कल्पना व्यासांनी कशी केली.त्यांना भविष्यातील वाहनांच्या वेगाची कल्पना आली होती का?नलाची अश्वविद्या म्हणजे सर्वोत्तम वाहनचालक असल्याचे प्रमाणपत्र होत का?त्याने रथाला एखाद यंत्र जोडले होते का? असे प्रश्न मनात निर्माण होतात.आज आपण अफाट वेगाने धावणारी वाहने पाहतो.व्यासांनी आपल्या दिव्य चक्षुंनी या सार्याची कल्पना केली होती.नलाने ऋतुपर्णाला अश्वविद्या शिकवली म्हणजे वाहन चालवायला शिकवलं की यंत्र तयार करायला शिकवलं? ऋतुपर्णाने नलाला अक्षविद्या म्हणजे संभाव्यता शिकवली ज्याचा उपयोग करू नलाने आपलं गेलेले राज्य परत मिळवले.महाभारतात आणखी एक विलक्षण कहाणी आहे.कुकुदमा नावाचा राजा आपल्या रेवती नामक कन्येला घेवून ब्रम्हलोकात गेल्याचा उल्लेख आहे.पृथ्वीवर आपल्या मुलीसाठी योग्य वर कोणता आहे हे ब्रमहदेवाला विचारण्यासाठी  तो गेला होता.त्याने सर्वोत्तम वेग असलेल्या विमानातून  प्रवास केला.त्याच्या हिशोबाने त्याला जायला एक दिवस लागला होता.ब्रम्हलोकात तो फक्त काही क्षण थांबला होता. ब्रम्हदेव त्याला म्हणाला " तू इथे येईपर्यंतपृथ्वीवर कित्येक पिढ्या होऊन गेल्यात .तू इथून जाईपर्यंत आणखी कित्येक पिढ्या होऊन जातील.तूझ्या वेळचा कोणीही आता जीवंत नाही. पण तू पृथ्वीवर पोहचेपर्यंत श्रीकृष्ण व बलराम हे दोन भाऊ असतील त्यापैकी बलराम हा योग्य वर तिच्यासाठी असेल." त्यावेळी तो आश्चर्यचकित झाला.त्यावेळी ब्रम्हदेवाने त्याला पृथ्वी व ब्रम्हलोकातल्या दिवसातला फरक सांगितला.  या कथेत प्रत्येक ग्रहावर वेगवेगळ्या कालावधीचे दिवस व  वर्षं असतात. अंतराळात व्यक्तीवर काळाचा परिणाम होत नाही. अश्या विलक्षण कल्पना व्यास यांनी केल्या होत्या.ज्या खरोखरच आज सत्य असल्याचे कळते.पाच हजार वर्षांपूर्वी अशी कल्पना सुचनेही विलक्षण आश्चर्यकारक आहे.जगभरातील मानव प्रगतीच्या पहिल्या पायरीवरही नव्हता तेव्हा भारतीय लोक कोणते विचार करत होते ते यातून कळते. पण आपण भारतीय नाक मुरडत सारं हसण्यावारी नेतो.. चेष्टा करतो.  विलक्षण कल्पनाशक्तीचा महारथी व्यास ३महाभारताचे लिखाण करताना व्यासांना अश्या एका लेखणीकाची गरज होती की जो वेगाने लेखन करेल. कारण व्यासांची बुद्धी प्रगल्भ असल्याने ते जलदपणे श्लोक सांगत जाणार होते व तेवढ्याच तत्परतेने ते लिहून घेणे आवश्यक होते.हे फक्त चौसष्ट कलांचा अधिपती गणेशच करु शकत होता. व्यासांनी एक अट घातली ते श्लोकांची पुनरावृत्ती करणार नाहीत. गणपतीने सुध्दा एक अट घातली की ते लिखाण करताना मध्ये थांबणार नाहीत. त्यावर व्यास म्हणाले की अर्थ कळल्यावरच गणपतीने लिहावे.  हे सगळं वाचताना माझ्या डोक्यात स्पीच टू टेक्स्ट हे गुगल ॲप आले.बोलता-बोलता त्याच रूपांतर लिखाणात होत.व्यासांनी अश्याप्रकारे लिखाण करता  येईल अशी कल्पना महाभारत रचताना केली.वर्गात शिक्षक सांगत असताना ते कागदावर लिहून घेताना विध्यार्थ्थांची कशी तारांबळ उडते हे सर्वांनाच माहीत आहे.मग व्यास झपाझप श्लोक(मनोवेगाने) रचत होते व सांगत होते ते लिहून घेताना गणपतीने नेमकं कोणतं तंत्र वापरले असेल ते फक्त बुध्दीची देवता गणपतीच जाणो.       पांडवांची इंद्रप्रस्थमधील मयसभा ही मयासूर(रावणाचा सासरा ?) या असूराने बांधली होती.त्यासाठी लागणारे स्फटिक दगड हे थेट कैलासाच्या परीसरातून आणल्याचा उल्लेख आहे. या मयसभेत जमीनीवर पाणी असल्याचा आभास ,जिथे जमीन आहे असं वाटतं होतं तिथे प्रत्यक्षात पाणी असते. दरवाजा समजून आत जाण्याचा प्रयत्न केल्यास तिथे भिंत असणे.असे चमत्कारिक भास मयासूराने निर्माण केले होते.या मयसभेत फसगत झाल्याने द्रौपदी दुर्योधनाला हसलीहोती.त्यातूनच महाभारत युध्दाची ठिणगी पडली होती. आज विविध आरसे तसेच प्रकाशाचे परावर्तन  , अपवर्तन किंवा पूर्ण आंतरीक परावर्तन यांचा उपयोग करून हे भास सहज निर्माण करता येतात.आज आलिशान हाॅटेलमध्ये किंवा घरात अश्या रचना आढळतात.मयसभा काल्पनिक मानली तरी त्यातल्या कल्पना आज प्रत्यक्षात दिसतात हे सत्य आहे.     जनमेजयाला सर्पयज्ञ करण्यासाठी प्रेरणा देणारा  उंतक हा तरुण ऋषी कर्णफुले घेऊन येत असताना तक्षक हा साप (परीक्षिताच्या मृत्यूस कारण ठरलेला)उंतकाला फसवून ती कर्णफुले पळवतो व खोल अश्या आपल्या बिळात पाताळलोकात जातो.उंतक काठीने बिळ खोदण्याचा प्रयत्न करतो. पण बिळ खूपच खोल असल्याने त्याला ते शक्य होत नाही.तेव्हा तो इंद्राची प्रार्थना करतो तेव्हा इंद्र त्या खाडीत वज्राची ताकद देतो.ती काठी खडक फोडत...पोखरत बीळ मोठं करत जाते.त्यावेळी वीजेच्या लखलखाटासारख्या ठिणग्या पडतात.हे वर्णन वाचल्यावर कुणालाही आजची खडक फोडणारी ड्रिलमशीन आठवेल.त्या वेळी अशी मशीन असणे शक्य नाही.पण आज भलेमोठे खडक सहज फोडले जातात.   ( व्यास महाभारताची रचना केल्यावर ब्रम्हदेवाला सांगतो की मी हे काव्य माझ्या कल्पनेने रचले असून यात वेद व उपनिषद यातील ज्ञान असून ते काल ,आज व उद्या उपयोगी पडेल. )