Independence? in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | स्वतंत्र्यता?

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

स्वतंत्र्यता?

स्वातंत्र्य आपल्याच लोकांपासून की इतर लोकांपासून?

          *आज आपण पाहतो की प्रत्येकच समाजात तसंच जातीजातीत दोन गट आहेत. ज्यात एक गट दुसऱ्या गटाला निम्न समजतो. त्यांच्या भावभावनांची खिल्ली उडवत. त्यांना निरक्षर समजतो. शिवाय त्याचे तुटपुंजे विचार ऐकून घेत नाहीत व सांगतात आणि मिरवतात की आपण मोठे. पैशानं आणि अकलेनही. जे अकलेचे कांदेच असतात. तीच मंडळी आपल्या विचारानं इतर समाजातील लोकांचे गुलाम समजून वागत असतात नव्हे तर आपल्याही समाजाला दिशा न देता गुलामीसारखे वागवत असतात. त्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा न पोहोचवता त्यांनी लहानशेच व्यवसाय करावेत म्हणून त्यांना बाध्य करतात. खरं तर अशा संधीसाधू लोकांपासून आपण सावधान राहायला हवं. आपला विकास करायला हवा. उच्च शिक्षण शिकायला हवे. उच्च पदावर जायला हवं नव्हे तर आपल्या समाजालाही उच्च पदावर न्यायला हवं. स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगायला हवं. स्वातंत्र्य यांच्यापासूनच हवं की जे आपल्याच समाजातील बांधवांना वाघ न बनवता शेळ्याच ठेवू पाहतात.*
             स्वातंत्र्य आपल्याच लोकांपासून की इतर लोकांपासून. असा प्रश्न आपल्या मनाला विचारल्यावर नक्कीच उत्तर मिळतं की स्वातंत्र्य हे आपल्याच माणसांपासून मिळावं. इतरांपासून स्वातंत्र्य मिळविण्याची गरज नाहीच. त्याचं कारण आहे. इतर माणसांचं आक्रमण. ती माणसं सरासरी आपल्यावर हल्ले करीत नाहीत. आपलाच एखादा विश्वासाचा व्यक्ती असतो की जो आपला विश्वासघात करतो. म्हणूनच आपण फसतोही व त्या फसणातून निघू शकत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास बिभीषणाचं देता येईल. रावण सरासरी मरु शकत नव्हता जर त्याचा सख्खा भाऊ बिभीषण रामाच्या बाजूला गेला नसता तर. मृत्युशय्येवर असतांना रामानं रावणाला एक प्रश्न विचारला. 
         "आपण प्रकांडपंडीत आहात. प्रजेला काय उपदेश देवू शकाल?"
           त्यावर रावण म्हणाला,
           "नात्यातील माणसांपासून जरा जपून राहावं."
          त्यावर राम म्हणाला, 
          "मला काहीच समजलं नाही. जरा खुलवून सांगता काय?"
          त्यावर रावण म्हणाला, 
          "हे बघ, मी प्रकांड पंडीत जरी होतो व शस्रामध्ये पुर्णतः निपुण जरी होतो, तरी माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता. म्हणूनच माझा विनाश झाला.
           रावणाचंही बरोबर होतं. कारण बिभीषण हा केवळ भाऊ होता व त्यालाच रावणाच्या मृत्यूचे कारण माहीत होते. जे त्यानं रामाला सांगीतले व तो मरण पावला. 
         अलिकडील काळात राम रावण हा भागच मानत नाहीत. ते महाभारतही मानत नाहीत. ते थोतांड वाटतं. म्हटलं जातं की राम झाला नाही, अयोध्याही झाली नाही. ते असे फक्त म्हणतात. परंतु रावणाला मानतात. मग रावण कुठून आलाय? तसं पाहिल्यास चौदाव्या शतकापर्यंत म्हणजे बादशाहा अकबराच्या काळापर्यंत राव व रावण कोणाला माहीतही नव्हता. त्या काळानंतर रावण व राम हे पात्र लोकांना माहीत झालं. कारण रामलीलेली कार्यक्रमं गावागावात सुरु झाली होती अकबर बादशाहा सहिष्णू असल्यानं. त्यापूर्वीच्या शासकांनी कित्येक हिंदूंना चिरडून काढले होते व कित्येक हिंदू मुघलांचे विरोधक बनले होते. अकबरानं ओळखलं की आपण त्याच बादशाहासारखे वागलो तर आपल्याला आपला साम्राज्यविस्तार करता येणार नाही. म्हणूनच त्यानं सहिष्णू धोरण अवलंबलं व त्या धोरणानं त्यानं साम्राज्यविस्तारही केला. 
         घरातील, नात्यातील वा जातीतील माणसं ही आपलीच माणसं असतात. ही आपलीच माणसं आपल्याला धोकादायक असतात. हे शिवरायांनी ओळखलं होतं. ते गुप्तहेरांना कडक शासन करीत. त्याचं कारण इतिहास. तो मग राम रावणाचा इतिहास का असेना, राजा दाहिरचा इतिहास का असेना, पृथ्वीराज चव्हाण चा इतिहास का असेना. राजा दाहिरला आपल्याच देशातील एका किल्लेदारानं मोहम्मद बिन कासीमशी हातमिळवणी करुन पकडून दिलं व हत्या करवली. कारण त्याला गादीवर बसायचं होतं. तसंच पृथ्वीराज चव्हाणलाही नातेवाईक व भाऊच असलेल्या जयचंदानं पकडून दिलं आणि हत्या करवली. कारण त्यालाही राजगादीवर बसायचं होतं. परंतु दोन्ही प्रकरणात दोघांनाही राजगादीवर बसवलं गेलं नाही तर त्यांचीही पुढं हत्याच केली गेली. 
         सध्याच्या काळातही तसंच घडत आहे. उद्देश राहतो भलतीकडेच. केवळ स्वार्थासाठी लोकं आपले विचार पेरत असलेले दिसतात. ते सत्य असत्य काय आहे? हे तपासूनच पाहात नाहीत. ज्या गोष्टी सत्य असतात. त्याला चूक म्हणतात व ज्या गोष्टी असत्य असतात. त्याला बरोबर म्हणतात. अलिकडील काळात येत असलेल्या काही माहित्यांचं तुष्टीकरण करतात.
            सर्वच धर्मात कमीजास्तपणा हा असतोच. जसं हिंदूत स्पृश्य अस्पृश्य, मुस्लीम मध्ये शिया व सुन्नी, आता नवीनच एक पंथ तयार झाला. तो पंथ म्हणजे काफिर. बौद्ध धम्मातही महायान व हिनयान, जैन धर्मातही श्वेतांबर व दिगंबर. त्यानुसार प्रत्येकाचं रहनसहन वेगवेगळं आहेच. तेवढाच भेदभावही आणि अंधश्रद्धा व काही अनैतिक प्रथाही.
           महत्वाचं सांगायचं म्हणजे समाजात असेच दोन वेगवेगळे घटक असतात. ते एकमेकांवर अत्याचार करीत असतातच. हा इतिहास आहे. इतिहासात एक वाघ आहे तर दुसरा शेळी आहे. हे समजून घ्यायला पाहिजे व आपसातील विचारांचे मतभेद विसरुन एकत्र राहायला पाहिजे. कधी झुंडीनं राहणाऱ्या शेळ्यांचीही ताकद एका वाघावर भारी पडू शकते. परंतु आपण शेळीसारखे वागत असू व एकत्र राहातही नसू तर वाघरुपी इतर लोकं आपल्याला समाप्त करतील. ना आपला धर्म वाचेल ना आपली जात. जर आपण वाचू तर आपल्याला माझी जात अमूक अमूक आहे असं सांगता येईल. माझा धर्मही अमूक अमूक आहे असं सांगता येईल. कारण सिर सलामत तो पगडी हजार. मग धर्म कोणताही वा जात का असेना. आजपर्यंत असंच होत आलं आहे. ही चांभार जात कालची वाघच. परंतु स्पृश्यांनी त्यावेळेस त्या शेळ्या असतांनाही केवळ बुद्धी लावून आपली शिकार केली. आज ते वाघ बनले व आपल्याला शेळी बनवलं. हे आपण ओळखायला हवं. आपली ताकद आपण ओळखायला हवी व त्यानुसार आपण वागायला हवं. जेणेकरुन आपल्याला आपल्यातील शेळीचा वाघ बनता येईल व आपल्याला आपले हक्क मागता येतील व ते अबाधीत ठेवता येतील हे तेवढंच खरं. परंतु समाजात अशीही काही माणसं आहेत की जे स्वतःही वाघ बनत नाहीत. इतरांनाही वाघ बनूच देत नाहीत. ते त्यांचे पाय खेचतात. अशानंच समाज मागे राहतो यात शंका नाही. 
           आज देश जरी स्वतंत्र्य असला तरी देशातील अंतर्गत भागात स्वातंत्र्य नाही. आपल्याच जातीतील वा बिरादरीतील लोकं आपल्याच माणसांसोबत भांडतांना दिसतात. कधी जातीवर तर कधी धर्मावर. कधी विचारांवर तर कधी स्वार्थावर. कधी मालमत्तेसाठी तर कधी आपल्या अस्मितेसाठी. हेच पाहतात विदेशी लोकं आणि सरळ सरळ आपल्यातील काही लोकांकडून कुरघोडी करवून घेतात व आपल्यातीलच एखाद्याला एकटं पाडून त्याची शेळीसारखी हत्या करवून घेतात. ही सत्य बाब आहे. जी मनाला कधीच पटत नाही.
         विशेष म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय? हे आपण समजून घ्यायला हवं. स्वातंत्र्य विदेशी लोकांपासून हवे नाही तर आपल्याच माणसांपासून हवे आहे. जी माणसं आपल्याच जातीतील इतर आपल्याच जातीतील लोकांना गुलाम समजतात. त्यांना स्वतंत्र्यपणे बोलू देत नाही. वावरु देत नाही. त्यांना निरक्षर समजून त्यांची अवहेलना करतात. त्यांच्यासाठी टपऱ्या मागतात. शिक्षण शिकण्यापासून वंचीत करतात आणि मी समाजासाठी फार मोठं कार्य करीत आहो असा कांगावा करतात. महत्वपुर्ण बाब ही की करायचंच आहे तर त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. त्यांना उच्च शिक्षण कसं मिळेल यासाठी प्रोत्साहन द्यावं. त्यांना समाजातून एखादा फंड आर्थिक रुपात देवून शिक्षण शिकता यावं यासाठी मदत करावी. हवं तर त्यांना दत्तक घ्यावं. व्यतिरीक्त इतर जातीनं जर कुणावर अत्याचार केल्यास एकजुटीनं तुटून पडावं. जेणेकरुन इतर समाजाची आपल्या समाजाकडे ब्र म्हणायचं सोडा, साधं वाकडं पाहायचीही हिंमत होणार नाही. तेव्हाच समाज सुरक्षीतता अनुभवेल. तसंच समाजाला खऱ्या रुपानं स्वातंत्र्य मिळाल्याचं समाधान वाटेल. यात शंका नाही.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०