Do not argue with God in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | देवावरुन वाद नकोत

Featured Books
  • ભીતરમન - 41

    મેં ખૂબ જ હરખાતા મારા રૂમમાંથી સીધી બહારના ગેટ તરફ દોટ મૂકી...

  • મારા જીવનના અનુભવો - 2

    જય માતાજી હું કંઈક જાણી ગયો છું હું કંઈક જ્ઞાની પુરુષ છું બધ...

  • ખુશી

    “વિહાભાઈ ખુશીની ઉંમર તો નાની કહેવાય. તેની આગળ તો હજુ આખી જિં...

  • હમસફર - (અંતિમ ભાગ)

    બીજી તરફરુચી : ના.... બેસ્ટ ફ્રેન્ડ ક્યારેય ન લડે બંને ની ડ્...

  • ખજાનો - 43

    આપણે જોયું કે ચારેય મિત્રો રાજા સાથે કોટડીમાંથી બહાર નીકળવાન...

Categories
Share

देवावरुन वाद नकोत

देवांच्या अस्तिवावरुन, वस्तूवरुन वाद ; पुरे आता?

           *अलिकडे तर एक गौप्यस्फोट झालाय की तिरुपती बालाजी मंदिरात जो प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. त्यात गाईची चरबी मिसळवली जाते. मंदिरातील लाडवात गाईची चरबी. काल मंदिरातील पाषाणरुपी देवांवरुन वाद व्हायचे. त्यातच मंदिरातील पाषाणावरुन वाद करणं मानवानं सोडलं. आता वाद आणला मंदिरातील लाडवाच्या चरबीवरुन. मानवाला हेही ओळखता येत नाही की लाडवात चरबी आहे शुद्ध गाईचं तूप आहे. जे चरबीसारखं वाटतं. परंतु वादाला कारण हवं, म्हणूनच त्या वादाला चरबी कारणीभूत ठरली आहे. आता हा वाद केव्हापर्यंत चालतो ते माहीत नाही. कोणी म्हणतात की त्यात राजकारण आहे तर कोणी काहीही म्हणत आपले तर्कवितर्क लावत आहेत.*
          आज माणूस प्रगल्भ व प्रगत अवस्थेत आहे. त्याचं कारण म्हणजे माणसानं केलेली प्रगती. माणूस जेव्हा माकडरुपात झाडावर राहात होता. त्यावेळेस त्यानं जीव प्रगती केलेली नव्हती. त्याचं कारण होतं, त्याला त्यावेळेस असलेली अल्प बुद्धी. त्यानंतर तो झाडावरुन खाली आला व माणूस बनून राहू लागला. तेव्हा त्यानं प्रगतीचं पाऊल टाकलं. अन्न मिळविण्यासाठी अवजारे बनवली. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लांब पल्ल्याची अवजारे बनवली. अग्नीचा शोध लावला. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील इतर सर्व वस्तूंचा शोध लावला. ज्यातून मानव प्रगल्भ होत गेला. 
         मानव झाडावरुन खाली येताच त्यानं सर्वात प्रथम दगडाच्या वस्तू बनविण्याचा शोध लावला. त्यातच दगडाचा वापर कसा करायचा हे ज्ञान त्याला गवसलं. ज्यातून त्यानं दगडापासून अवजारे तयार केली. ज्यांचा वापर करुन तो शिकार करु लागला व आपला उदरनिर्वाह करु लागला. त्यानंतर त्याच दगडाचा वापर करुन त्यानं अग्नी निर्माण केला आणि त्या अग्नीचाही वापर करुन त्यानं अन्न तयार केलं नव्हे तर स्वतःचं रक्षणही. त्या काळात केवळ मानवाच्या उत्थानासाठी दगडाचाच वापर होवू लागला. म्हणूनच त्या काळाला अश्मयुग असं म्हटलं जातं. कारण अश्म म्हणजे दगड होय.      
          हळूहळू काळ बदलत गेला. दगड काही देव नव्हता. त्या दगडापासून प्रगती झाली. त्याच दगडापासून बनलेली अवजारे ही शिकार करण्यासाठीही वापरली जात. त्याच दगडाचा वापर करुन स्वतःचं पोटंही भरता येत असे. शिवाय त्याच दगडाचा वापर करुन मानवाने प्रगतीचं पाऊल उचललं होतं, नव्हे तर प्रगतीच केलेली होती. कालांतरानं मानवानं विचार केला की जर या दगडाचा वापर एखाद्या मानवाची प्रतिकृती बनवून केला तर....... तो विचारांचा अवकाश. मानवानं लागलीच दगडाची मुर्ती बनवली. त्यात मानवाची जी मुर्ती बनली. ती मुर्ती अतिशय मेहनतीनं बनली. त्यात ती सुबक बनली. जिचा मानवाला काही उपयोग नव्हता. परंतु ती मुर्ती सुंदर दिसत असल्यानं ती त्यानं जतन करुन ठेवली. अशातच जसजसा काळ निघत गेला. तसतशी मानवाची बुद्धी विकसीत होत गेली. त्यात नवे वारे शिरत गेले व कालांतरानं त्या पाषाणी मुर्तीला देव मानलं जावू लागलं. मग ती मुर्ती अमूक करते. ती मुर्ती तमूक करते. असं म्हणत त्यात अंधश्रद्धा पसरत गेली. जी आजतागायत कायम आहे.
          मुर्ती...... ती मुर्ती काय देते. काहीच नाही. कारण ती मुर्ती जर काही देणारी असती तर ती मुर्ती कोणालाच फोडता आली नसती. त्या मुर्तीचं कधी जे नाक कान वा बोटाचा तुकडा तुटून दिसतो. तो तुटला नसता. त्या मुर्तीचं विसर्जनही कधीच झालं नसतं. आज आपण पाहतो की अशा कितीतरी मुर्त्याचे हात, कान, नाक, बोटं वा इतर अवयव त्यात मानही तुटलेली असते. शिवाय त्या मुर्त्या कुठंही लावारीश धुळखात अवस्थेत पडलेल्या दिसतात. साध्या गणटतीचंच उदाहरण द्यायचं झाल्यास लोकं त्याला दहा दिवस मोठ्या उत्साहानं जपतात. ती मुर्ती काहीही खात नसतांनाही त्या मुर्तीला दहा दिवस वेगवेगळ्या स्वरुपाचे जीन्स चारतांना दिसतात. अन् जेव्हा ते दहा दिवस संपतात व विसर्जनाची वेळ येते. तेव्हा त्या मुर्तीचा विचारच केला जात नाही. एखाद्या मुर्द्याचाही आपण यथोचीत सन्मानानं दाहसंस्कार करतो. तशी ही मुर्ती म्हणजे आपल्यासाठी देवच असते. तरीही आपण तिचं विसर्जन करतांना थेट पुलावरुन असं पाण्यात फेकतो की जसा एखादा लावारीश मेलेला कुत्रा आपण फेकून राहलो. त्यावेळेस त्या गणपतीचं नाक कोणीकडे, तोंड कोणीकडे अशी अवस्था असते. बरं झालं की तो पाषाण वा मातीचा असतो. जर तो जीवंत देव असता तर त्यानं शापच दिला असता मानवाला. तशा काही मुर्त्या कचऱ्यावर ठेवून आपण निघून जातो. त्यावेळेस त्या गणपतीच्या मुर्तीजवळ लावारीश कुत्रे येवून चाटत असतात. असं वाटत असतं की त्या गणपतीनं आपल्याकडे दहा दिवस राहून फार मोठं पापच केलं. अशी त्या गणपतीच्या मुर्तीची अवस्था असते. 
         गणपतीच्या मुर्तीची दहा दिवस झाल्यावर जशी अवस्था आपण करतो. तशीच अवस्था आपण इतरही मुर्त्यांची करीत असतो. त्यातच त्यावेळेस आपण त्या मुर्त्यातील देव विसरत असतो. विसर्जन करतांना मुर्त्यांचे हात कान नाक वा एखादा अवयव तुटत असेल तरीही. विसरत असतो त्या मुर्तीतील जीवंतपणा. तेव्हा आपल्यातील भाविकताही मरुन गेलेली असते. ती भाविकता तेव्हा जागृत होते. जेव्हा समाजातील एखाद्या माणसानं त्या मुर्तीचा एखादा अवयव तोडला तर....... मग आपल्यासाठी आंदोलन करायला रानच मोकळं झालेलं असतं. ज्यात कोणी चक्काजाम करतात कोणी सरकारी कार्य्लयावर हल्ले करतात. देशातील मालमत्तेला ठेच पोहोचवतात. ज्यात आपल्याच देशाचं नुकसान होत असतं. 
         महत्वपूर्ण बाब ही की आमची धार्मिकता कट्टर आहे. आहे किंवा नाही ते मुर्ती विसर्जनावरुन कळतंच. लाखो रुपये खर्च करुन चौकाचौकात मांडलेल्या मुर्त्यांचं जेव्हा शेवटच्या दिवशी विसर्जन बरोबर होत नाही. त्यावरुन तसा विचार येणं साहजीकच आहे. परंतु जर ती धार्मिकता कट्टर आहे तर असं मुर्तीचं विसर्जन का होतं? त्याचं कारण आहे, प्रत्येकाची डोळस वृत्ती. त्यांना माहीत असतं की मुर्तीत देव नाही. ती मुर्ती पाषाण आहे. जिच्याच जीव नसल्यानं ती देव होवूच शकत नाही. ही अंधश्रद्धा आहे. कोणीतरी मुर्ख बनवून मुर्तीत देव असल्याचा बनाव करीत आहे. म्हणूनच आपण मुर्त्या मांडतो व दहा दिवस घरी मुलांना अभ्यास न करु देता मुर्तीजवळ आरत्या, भजन, किर्तन करायला लावतो. ज्यात आपल्या पाल्यांच्या आयुष्याचे दहा दिवसच नाही तर संबंध मुर्त्या बसण्याचा काळ बरबाद करीत असतो. 
         आपल्याला माहीत आहे की आपली प्रगती झाली, ती केवळ शिक्षणानं. आपण अभ्यास केला. त्यानंतर वैज्ञानिक ज्ञान प्राप्त केलं. त्यावर निरीक्षण केलं. पुढं संशोधन केलं. त्यातून झाली. मुर्त्या बसवून नाही वा मुर्तीजवळ आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवत भजन किर्तन वा पुजन केल्यानं नाही. तरीही आपण पाषाणाची मुर्ती पुजतो. आपल्याला माहीत आहे की मुर्ती काहीही खात नाही तरी तिला आपण वेगवेगळे नैवेद्य चारतो आणि आपल्याला हेही माहीत आहे की मुर्ती मांस खात नाही तरीही आपण त्याच मुर्तीजवळ लहान लहान मुलांची नरबळी देतो. नवश म्हणून कोंबडा, बकरा चढवतो. या गोष्टी बरोबर नाहीत. शिवाय आपल्याला हेही माहीत आहे की आजकाल मंदिरातच बलात्कार होतात.
          वाद कधी कधी मंदिरातच चोऱ्या होतात. बलात्कार होतात. तसे पुर्वीही बलात्कार व्हायचेच. देवदासी म्हणून लोकं मंदिरात आपली पहिली मुलगी दान देत असत. ज्या मुलीवर रोजच देवदासी म्हणून बलात्कार करायचे. शिवाय एक गोष्ट आपल्याला माहीत नसेल की पृथ्वीराज चव्हाणाच्या समाधीवर चप्पल मारली जात असे. या गोष्टीवरुन वाद होत नाहीत. वाद झालेही नाहीत. या सर्व गोष्टी देव जर पाषाणात आहे तर कशा घडत होत्या? याचं उत्तर आपल्याकडं नाही. कारण देव पाषाणात नाहीच. मग देव आहे का की नाही? असा प्रश्न आपल्यासमोर नक्कीच उपस्थीत होवू शकतो. त्याचं उत्तर आहे की देव आहे, जर तो आपण मानला तर आणि देव नाही जर आपण मानला नाही तर. कारण जसे आस्तिक असणारी मंडळी देवाची पुजा करुन जे मिळवतात, त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात नास्तिक असणारी मंडळी कमवतात. काही मंडळी पापीच असतात. ते पाप करुन पैसा कमवतात व तो पैसा मंदिराला दान करतात. त्यांना वाटते की मंदिरात दान दिल्यानं माझं सर्व पापकर्म धुतलं जाईल. परंतु तसं घडत नाही. मंदिरात गेल्यानं वा कितीही पैसा दान दिल्यानं पापकर्म खंडन होत नाही. असं जर झालं असतं तर सर्वांनी दान दिलं असतं अन् ज्यांनी दान दिलं असतं त्या कुणालाच आजच्या काळात कोणत्याही आजारानं शिवलं नसतं. कोणीच मरणही पावलं नसतं. तेच घडलं असतं मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या बाबतीत. 
         विशेष सांगायचं म्हणजे देव आहे की नाही हा संभ्रम आहे. देव पाषाणात नाहीच हेही विज्ञानानं सिद्ध केलंय. त्यातच यात सांगीतलेल्या अशाही काही गोष्टी की ज्यातून आपल्याला देव दिसत नाही. देव पाषाणात तर नाहीच. मग असं जरी असलं तरी देव आहे का? असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. त्याचं उत्तर आहे, देव आहे. तो कणाकणात आहे. तो भेटू शकतो, जर मानवानं प्राणीमात्राची सेवा केली, त्यांचा बळी घेतला नाही, त्यानं आपले विचार चांगले ठेवले, त्यानं आपले कर्म चांगले केले, म्हाताऱ्या माणसांची सेवा केली, आईवडीलांची सेवा केली, अपंगांना आधार दिला, गरजूंना मदत केली, गरीबांना सन्मान दिला तर. परंतु आपण त्या गोष्टी लक्षातच घेत नाही. आईवडीलांना त्रास देवून वृद्धाश्रमात टाकतो. गरिबांचा पैसा लुबाडून वा त्यांची फसवणूक करुन छळतो. प्राणीमांत्रांना कापून खातो. अपंगांना त्रास देतो. आपले विचार चांगले ठेवत नाही. कर्मही चांगले करीत नाही आणि पुजा करीत बसतो एका पाषाण मुर्तीची. ज्यात देव नाही हे आपल्याला माहीत असतं तरीही. जी काहीही देत नाही हेही आपल्याला माहीत असते. आपल्याला आज हेही माहीत आहे की आज विज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी या सृष्टीचं जे संचालन होतं, ते देवच घडवून आणतो. देव मंदिरात नाही, मुर्तीत नाही, याचाच अर्थ असा की निर्जीव घटकात नाही. देव आहे, प्रत्येक सृष्टीतील जीवंत असलेल्या सजीव घटकात आहे. मग ते एखादं झाड असो वा एखादा लहानशा विषाणू. मात्र तो आपल्याला ओळखता यायला हवा. हे तेवढंच खरं. त्यामुळं महत्वाचं सांगायचं झाल्यास देव पाषाणात आहे, या संकल्पनेवरुन कोणीही वाद करु नये व आपले तसेच समाजाचे वा देशाचे कोणत्याच प्रकारचे नुकसान करु नये म्हणजे मिळवलं. 

                अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०