Kidnapping in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | अपहरण

Featured Books
Categories
Share

अपहरण

लहान मुलींचे अपहरण त्यातच बलात्कार ; वाढती चिंता

         मौमिता बलात्कार प्रकरण घडलं. त्याचवेळेस बदलापूर प्रकरण. ज्यात अनेक बड्या आसामींचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु बदलापूरच्या प्रकरणाचा संशयीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटर चकमकीत मारल्या गेल्यानं या प्रकरणातील जे मोठे आसामी आहेत. ते कदाचीत सुटतील असा संशय व्यक्त करणे साहजिकच आहे. त्यातच त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीनं फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांचे म्हणणे असेल की पोलिसांनी जाणूनबुजून मोठ्या आसामीला वाचविण्यासाठी माझ्या मुलाची हत्या केली. परंतु नेमकं कारण काय? हा संशय बळावतो आहे.
         पुर्वीही बलात्कार व्हायचे. ते मोठ्यांवर असायचे. पुर्वीही अपहरण व्हायचे. ते मोठ्यांचे असायचे. सुंदर सुंदर वयात आलेल्या मुली पळवल्या जात. काही मुली ह्या वयाच्या उंबरठ्यावर असलेल्या काळात पळवल्या जात. परंतु अलिकडे नवीनच फॅड आलं व या काळात वयाच्या अगदी लहानशा काळात मुली पळवल्या जात आहेत. त्या लहान लहान मुलांवर बलात्कार होत आहेत. कुणाचे अपहरण होत आहे. 
         पुर्वी सुंदर मुली पळवीत असत. त्यांना वेश्यालयात विकलं जात असे व पैसा कमवला जात असे. त्या देहविक्री करीत व पैसा कमवून देत. आज तसं नाही. आजच्या काळात देहविक्रीसाठी मुलींचं अपहरण करण्याचा पाहिजे त्या प्रमाणात कोणी विचार करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण आज कायद्याला न घाबरता स्वतःच बलात्कार करुन आपली वासना तृप्त करण्याचे प्रकार सुरु आहेत व आपली वासना पुर्ण झाली की मी नाही त्या गावचा म्हणत न्यायालयातून क्लीनचीट मिळवतात आहे. ज्यातून क्लीनचीट मिळाली की पुढील गुन्हे करण्यापासून गुन्हेगार मोकळा. 
           बलात्काराची दररोजच प्रकरणं. त्यातील काही प्रकरणं दबतात. काही दाबली जातात, लोकांकडून, नेत्यांकडून तर काही पोलिसांकडूनही. काहींचे मायबाप श्रीमंत असले तर ते न्यायालयात मुकदमे दाखल करुन व चांगले वकील लावून अशी प्रकरणं दाबतात अन् समजा सिद्धही झाली तर शिक्षा म्हणून काय पाच सात वर्ष. परंतु जी बलात्कार पिडीता असते. तिला किती यातना भोगाव्या लागतात याची कल्पनाच करवत नाही. याबाबतीतील एक उत्तम उदाहरण जगासमोर आहे. ते म्हणजे अरुणा शानबागचं प्रकरण. बलात्काराच्या घटनेला त्रेचाळीस वर्ष होवूनही ती कोमातून बाहेर आली नव्हती व कोमातच मरण पावली. 
         बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत बारा वर्षीय मुलीचं अपहरण, मध्यप्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार, नागपूर मधील एका नगरातील आठ वर्षीय मुलीवर चौपन वर्षीय नराधमाचा बलात्कार, दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण, २०१७ चे उन्नाव भागातील बलात्कार प्रकरण, नागपुरातीलच सदर येथील एका शाळेसमोरुन पंधरा वर्षीय विद्यार्थीनीचे झालेले अपहरण. असे कितीतरी बलात्कार आणि कितीतरी अपहरणं. काही देत आहेत तर काही उघडकीस येत आहेत. संविधान असलं आणि कायद्याचा धाक असला तरी कायद्याचा भंग करुन अशी प्रकरणं होत आहेत. ज्यातून अशा प्रकरणातून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्यांना मुली आहेत, त्या प्रत्येक मायबापाला चिंता पडत आहे आपल्या मुलीची. त्यांची मुलगी शिक्षणानिमीत्य वा काही कामानिमित्त बाहेर पडली की ती सुरक्षीत परत येईल काय? 
         हे असं का घडतं? यावर ओबडधोबड विचार करुन आपण एक निर्णय झटकन सांगू. ते म्हणजे कायद्याचा धाक नसणे. कायद्याला आजची जनता अजिबात घाबरत,नाही असं आपण म्हणून मोकळे होवू. परंतु त्या कारणाचा जरा खोलवर विचार केल्यास एक कारण नक्कीच समोर येतं, जे कारण उघड उघड दिसत नाही. परंतु त्या कारणाचा फार खोलवर परिणाम झाला आहे. ते कारण म्हणजे मुलींच्या हत्या. होय, मुलींच्याच हत्या. काल जेव्हा मुलींची आवश्यकता होती, तेव्हा लोकांनी मुलींना समाजात स्थान मिळत नाही, जातीत विवाह करण्याला व हुंडा देतांना भरपूर पैसा लागतो, शिवाय मुलींना बरंच जपावं लागतं जीवापेक्षाही जास्त म्हणत भ्रृणहत्या केली. त्याच भ्रृणहत्येचा परिणाम म्हणून मुलींच्या संख्या कमी आहेत. मुलांच्या संख्या वाढल्या. मुलांना वयात आल्यावर विवाह करतो म्हटल्यास मुली मिळत नाहीत. शिवाय आजच्या काळात मुली भरपूर शिकत आहेत व त्या आपल्याच मतानं विवाहासाठी जोडीदार निवडत आहेत. त्या मुली मायबापाचंही मत विचारात घेत नाहीत. अशावेळेस मुली कमी त्यातही वयात आलेल्या मुलांच्या कामवासना पुर्ण करायलाही कमी पडतात. म्हणूनच अपहरण त्यातच बलात्कार वाढले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय बरेचसे मायबाप हे आपल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत की ज्यात त्या मुलींचे वय वाढल्यास व असे बलात्काराचे संकट निर्माण झाल्यास त्या मुली संरक्षण करु शकतील. त्यामुळं मोठ्या मुलींच्या जास्त कुणी वाट्याला जात नाहीत व लहान मुलींचे अपहरण करुन लागले आहेत. शिवाय बलात्कारही. कारण त्यांना जीवे मारण्याचा दम दिल्यास त्या मुली आपल्यावरील अत्याचार वा बलात्काराची माहिती आईवडीलांनाही सांगणार नाहीच. त्यांना तेवढं डेरींग आलेलं राहात नाही. 
          अलिकडील काळात लहान मुलींवर बलात्कार वा त्यांचं अपहरण ही चिंतेची बाब आहे. जिथं मोठ्याच मुली बलात्कार सहन करु शकत नाहीत, तिथं लहान मुली त्या अमानवी कृत्य कशा सहन करतील? हा एक प्रश्न आहे व जो सतावत आहे. ज्या प्रश्नाची प्रत्येक मायबापाला चिंता लागून असते. आज शाळेतही विद्यार्थीनीवर बलात्कार होतात वा लैंगीक अत्याचार होतात. अन् आरोपीचं एन्काऊंटर केल्यास मायबाप ओरडतात. केस टाकतात. शिवाय एन्काऊंटर करुन पुरावे नष्ट केल्यास बडे आसामी असलेले काही आरोपी त्यातून सुटतात. हेच चित्र जर सुरु असेल देशात तर समाजातील काही समाजकंटक मोठ्या मुलींवर वा लहान मुलींवर बलात्कार करायला कसे घाबरतील? त्यांच्यात विकृत मानसिकता तयार होईलच. 
          गुन्हे ते गुन्हेच. मग तो बलात्कार असो की अपहरण. त्या गुन्ह्यातून स्वतःची सोडवणूक करीत असतांना जरी कोणी न्यायालयातून सुटण्यासाठी मातब्बर वकील लावत असला आणि सुटत असला तरी वरतीही एक न्यायालय आहे. तो असा न्याय करतो की आपली अवस्था न घर का न घाट का अशी होते. परंतु ती वेळ यायला वेळ लागतोच. त्यामुळं विशेष सांगायचं झाल्यास अशी मानसिकता कोणीही आपल्या मनात तयार करु नये. आपण काही राक्षसांची मुले नाही. आपण साधारण मानव आहोत. कारण लैंगीकता ही क्षणभर असते. याबाबतीत एक उदाहरण देतो. उदाहरण चांगलं आहे. ज्या महाभारताला आपण मनापासून मानतो. त्या महाभारतातील एक प्रसंग. भीष्म चाललेले असतात. अशावेळेस त्यांच्या रस्त्यात एक साप आडवा येतो. जो साप मधात आल्याचं त्याचे शिपाही त्याच्या लक्षात आणून देतात. त्या सापाला तो बाजूला करायला सांगतो. परंतु शिपाही त्याला फेकून देतात व तो अशा ठिकाणी पडतो. जिथं काटेच काटे असतात. वेळ जातो आणि जेव्हा महाभारताचं युद्ध होतं. त्यावेळेस भीष्माला एवढे बाण अर्जुन मारतो की ते काटेच असतात सापाला रुतलेले.  
          प्रसंग लहानसा आहे. परंतु त्या प्रसंगातून बोध घेण्यासारखे आहे. त्यामुळंच कोणीही बलात्कार वा अपहरण करु नयेत वा बलात्कार वा अपहरणाचा विचार मनात आणू नये. कारण बलात्कार वा अपहरण हा गुन्हा आहे. आपण जे पेरु तेच उगवणार. या वृत्तीप्रमाणे काल आपण ज्या मुलींवर बलात्कार केला. भविष्यात आपल्याच पिढीवर बलात्कार होईल. तेव्हा आपल्याला विचार येईल. आपण तर सुटू कदाचीत वकीलाच्या सामर्थ्यानं वा आपल्या पैशाच्या जोरानं. परंतु नियती हे सगळं पाहात असते. ती केव्हा आपल्याला धडा शिकवेल. ते काही सांगता येत नाही. म्हणून सावधान असलेलं बरं. शिवाय लहान मुलं ही देवाघरची फुलंच असतात. त्यांच्यावर बलात्कार करणं वा त्यांचं अपहरण करणं म्हणजे प्रत्यक्षात देवाच्याच लेकरावर आघात करणं होय. यात शंका नाही. कदाचीत त्याला घाबरुन तेवढी तरी शरम बाळगावी व तशा प्रकारचे अपराध टाळावेत म्हणजे मिळवलं. अन् समजा असे एखाद्या व्यक्तीनं वा आपल्याच मुलानं कृत्य केल्यास त्याला त्या मायबापानं वा समाजानं समर्थन देवू नये. ज्यातून इतर लोकांची हिंमत वाढेल व त्यांनाही अपराध करण्याचे पाठबळ मिळेल. कारण गुन्हा हा गुन्हाच असतो. 

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०