Anubandh Bandhanache - 13 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 13

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 13

अनुबंध बंधनाचे.....🍁( भाग १३ )

अंजलीच्या घरी पार्टीची जोरदार तयारी झालेली असते. सर्व पाहुणे, व तिचे मित्र मैत्रिणी जमा झालेले असतात. म्युझिक प्लेअर वर गाणी चालु असतात. संपुर्ण हॉल व्हाईट आणि पिंक कलर च्या बलून ने सजवलेला असतो.🎈 एका टेबलवर मोठा असा छान केक ठेवलेला असतो.🎂 अंजली पण तिच्या मॉम ने तिच्यासाठी खास बनऊन घेतलेला व्हाईट कलर चा फुल ड्रेस घालुन तयार होती. डोक्यावरती छान असा डायमंड चा कियारा घातलेला होता. आज ती खरच एका राजकुमारी सारखी दिसत होती. 👸 केक कापण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. सर्वजण तिला केक कापण्यासाठी आग्रह करत होते, पण तिची नजर दरवाज्याकडे होती. कारण प्रेम अजुन आला नव्हता. तिने घड्याळाकडे एक नजर टाकली. साडे आठ वाजून गेले होते. त्याला तर मी आठ वाजताच बोलवलं होतं. मग अजुन कसा आला नाही हा...?🤔 मनात खुप प्रश्न निर्माण होत होते. पण तिला आतुन कुठेतरी वाटत होतं, येतच असेल तो... तिचे डॅड तिला केक कापण्यासाठी बोलतात. आता ती अजुन थांबु पण शकत नव्हती. ती तिच्या छोट्या बहिणीला समोर घेते. मॉम आणि डॅड बाजूला उभे असतात. छोट्या बहिणीच्या हातात सुरी देऊन ती तिचा हात पकडते. आणि केक जवळ असलेल्या मेणबत्तीला डोळे बंद करून हळुच फुंकर मारते. तेवढ्या काही क्षणांच्या वेळात ती मनात फक्त एवढच बोलते. गॉड काहीतरी मॅजिक कर आणि मी डोळे उघडल्यावर मला प्रेम समोर दिसु दे, हळू हळू ती डोळे उघडते आणि समोर पहाते तर काय... खरच प्रेम तिला समोर उभा असलेला दिसतो. जरी योगायोग असं म्हटलं तरी चालेल पण तिने जेव्हा मेणबत्ती विझवण्यासाठी डोळे मिटले होते, त्याच क्षणी प्रेम तिथे हजर झाला होता.

दोघांची नजरानजर झाली. प्रेमला असं अचानक समोर पाहून ती थोडी दचकली सुद्धा, पण मनातून तिला खुप आनंद झाला होता. कारण त्या क्षणी त्याचं समोर असणं किती महत्वाचं होतं, हे फक्त तिलाच माहीत.

प्रेम तिला पाहून हळुच एका हाताने कानाला हात लाऊन तिला इशाऱ्यनेच सॉरी बोलतो.ती मात्र त्याला पाहून खूपच खुश झालेली असते. 🎂 केक कापला जातो. 🎈 बलून फोडले जातात. म्युझिक प्लेअर वर गाणे चालु असते...🎶🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

बार बार दिन ये आए...बार बार दिल ये गाए...तुम जियो हजारों साल...ये मेरी है आरजू.....🎶

अंजली केक चा एक छोटासा तुकडा कट करून घेते, आणि तिच्या छोट्या बहिणीला भरवते. उरलेला आधी मॉम ला आणि नंतर डॅड ना भरवते. तिचे मॉम डॅड पण तिला केक भरवतात.तिच्या हातात थोडा केकचा भाग उरलेला असतो, तिची मनातुन खुप इच्छा असते, तो प्रेमला भरवावा, म्हणून ती समोर उभा असलेल्या प्रेमकडे बघते. प्रेम तिथूनच ईशाऱ्यानेच तिला राहू दे... असं बोलतो.

तेवढ्यात तिचे सर्व फ्रेंड्स आणि रीलेटिव तिला केक भरवण्यासाठी तिच्या सभोवती गर्दी करतात. प्रेम थोडा मागे होऊन ते सर्व पहात असतो. अंजली एवढ्या गर्दीत पण मधून मधून त्यालाच पहात असते. एवढ्यात अंजलीची मॉम त्याच्याजवळ येते आणि बोलते.

मॉम : अरे... प्रेम... तु कधी आलास...? मी तुला पहिलच नाही. सॉरी हा...😊प्रेम : मॉम... अहो सॉरी काय बोलता तुम्ही... मी केक कापायच्या थोडंसं आधीच आलो.मॉम : बरं झालं तु आलास... आता डिनर करूनच जायचं हा... 😊प्रेम : मॉम... सॉरी पण आज माझा उपवास आहे. त्यामुळे जेवायला घरीच जाईन मी.मॉम : अरे असं कसं... व्हेज पण आहे ना...प्रेम : मॉम.. प्लिज पण ते सर्व एकत्र ठेवले आहे. इच्छा नाही होणार. त्यामुळे सॉरी..🙏मॉम : बरं...ओके... वेफर्स वगैरे घे मग, अंजु ला भेटलास की नाही अजुन...?प्रेम : हो... भेटतो आता...😊मॉम : बरं ओके... तु तिला भेटुन घे... मी जरा आलेच.

* असं बोलुन मॉम तिथून आतमधे निघून जातात. प्रेम गिफ्ट घेऊन अंजलीला द्यायला तिच्याजवळ जातो.*

प्रेम : हाय... प्रिन्सेस... हॅप्पी बर्थडे... वन्स अगेन...🤝 आणि हो... खुप सुंदर दिसतेय आज तु....👌अंजली : थँक्स फॉर युवर स्वीट कॉम्पलिमेंट.😊प्रेम : वेलकम डिअर...😊 हे घे तुझे गिफ्ट.🎁

* असं बोलून हातातील गिफ्ट तिला देतो.*

अंजली : अरे... पण सकाळीच तर दिलेलं ना गिफ्ट. मग हे अजुन कशाला आणलं.😊प्रेम : सकाळी मला कुठे माहीत होतं, एवढं काही होणार होते ते, आणि पुन्हा आपण इथे भेटणार होतो ते...😊अंजली : अच्छा... असं आहे का... मग काय स्पेशल गिफ्ट आणलं आहेस आत्ता माझ्यासाठी...😊प्रेम : नाही ग... अगदी छोटंसच आहे. बघ तुला आवडतं का ते....🎁😊अंजली : प्रेम आज जे गिफ्ट मला तु दिलं आहेस ना, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. 😊प्रेम : एवढं मोठं काही दिलेलं नाही मी...अंजली : अरे... मी या गिफ्ट बद्दल बोलत नाही... पागल... अजुन कसं कळत नाही तुला...😊प्रेम : अच्छा... कळलं... ते...😊अंजली : काय कळलं...😊प्रेम : हे सर्व इथेच बोलणार आहोत का आपण...एवढ्या सर्व लोकांमधे...😊अंजली : एवढं कोणाला ऐकू जाणार आहे. 😊प्रेम : पण सर्वांचं लक्ष आपल्याकडेच आहे.😊अंजली : असु दे... मला नाही फरक पडत. आणि त्यांनाही समजलं पाहिजे ना तु माझा फ्रेंड आहेस ते... नंतर कधी एकत्र पाहिलं तर प्रॉब्लेम नको.😊प्रेम : हो का... बरं ओके. आणि ऐक ना, मी आता निघतोय, तु पार्टी एन्जॉय कर. अंजली : काय...?🙄प्रेम : अरे... हळू बोल... ओरडते काय अशी...😊अंजली : अरे पण लगेच काय निघतोय...🤨 जेवण करून जायचं. आणि मॉम ला भेटलास का...?प्रेम : अंजली... तुला माहित आहे आज माझा उपवास आहे. मी बाहेर उपवास सोडत नाही. आणि मॉम पण भेटल्या मघाशी आणि त्यांना पण मी बोललोय सर्व... ओके....👍🏻अंजली : काय... यार... आजच यायाचा होता माझा बर्थडे...😔प्रेम : अरे... एवढी काय अपसेट होतेय... ते काय ठरवून करता येते का...😊अंजली : बघ ना पण... मलाच वाईट वाटतंय. तु काहीतरी घे ना प्लिज... वेफर्स वगैरे तर चालतील ना...😊प्रेम : हो... घेतो मी वेफर्स... ओके, तु रिलॅक्स हो आता... आणि कीप स्माईल 😊 बर्थ डे गर्ल...😊

* तेवढ्यात तिला कोणीतरी गिफ्ट घेऊन भेटायला येतात... प्रेम हळुच तिथून बाजूला होतो. आणि तिथे असलेल्या एका चेअर वर बसतो. अंजलीच्या मॉम चे लक्ष त्याच्याकडे जातं. त्याच्याजवळ येऊन बोलतात.*

मॉम : अरे... तु अजुन काहीच घेतले नाहीस. लाजतोय का...?😊प्रेम : अहो...तसे काही नाही...घेतो ना मी...😊मॉम : एक काम कर... चल माझ्यासोबत...

* असे बोलून मॉम त्याच्या हाताला पकडून त्यांच्या रूम मधे घेऊन जातात. आणि बसायला सांगतात. प्रेम रूम मधे इकडे तिकडे पहात असतो. समोरच्या भिंतीवर दोन मोठे फोटो असतात. एक सरस्वती आणि बाजुला लता मंगेशकर. यांचा... दुसरीकडे एका बाजूला हार्मोनियम ठेवलेले दिसते. एका कोपऱ्यात देवारा दिसतो. त्यात आतमधे दिवा पेटलेला असतो, त्याला बाहेरून पडदा लावलेला होता.ते सर्व पाहून तो थोडा विचारात पडतो. नंतर त्याला मॉम नी सांगितलेली स्टोरी आठवते. मॉम खरं तर एका मराठी कुटुंबातल्या होत्या. म्हणून हे सर्व..... तेवढ्यात मॉम एका डिश मधे वेफर्स घेऊन येतात. आणि सोबत एक पिशवी त्याला देतात, आणि बोलतात...

मॉम : हे वेफर्स खाऊन घे, आणि यात केक आहे, नॉन व्हेज आहे त्यामुळे उद्या खाशील ना, उद्या तर संडे आहे. चालतो ना तुला संडे ला...😊प्रेम : अहो... मॉम... कशाला हे सर्व...😊मॉम : अरे... मलाच कसतरी वाटत आहे, तु असं न जेवता जातोय त्याचं....😔प्रेम : ठिक आहे ना...मॉम... त्यात काय एवढं.😊मॉम : बरं... ते वेफर्स खा... मी आलेच.

* असं बोलून त्या बाहेर निघुन जातात. प्रेम वेफर्स खात बसलेला असतो. बाहेर हॉल मधे गाण्यांचा आवाज वाढलेला असतो... ड्रिंक वगैरे 🍺🍻🥃🍸🍹 चालु असते. काही जण नाचायला लागलेले असतात. 💃🏻🕺🏻प्रेम एकटाच तिथे बसलेला असतो, थोड्या वेळात अंजली तिथे येते, आणि त्याला बोलते. *

अंजली : तु.... इथे आहेस...? मी तुला बाहेर शोधतेय कधीपासून... मला वाटलं तु गेला घरी... मग मॉम ला विचारलं तेव्हा ती बोलली तु इथे आहेस ते...😔प्रेम : अरे असं कसं जाईन तुला न सांगता...😊अंजली : अरे पण तुला एक गंमत सांगु....😊प्रेम : कसली गम्मत....काय...?🤔अंजली : तु खरच स्पेशल आहेस ते आत्ता कळलं मला...😊प्रेम : म्हणजे... नक्की काय...?🤔अंजली : अरे ही मॉम ची स्पेशल रूम आहे. इथे ती बाहेरच्या कोणालाही येऊन देत नाही. कधी कधी आम्हालाही नाही. आणि आज पहिल्यांदा मी या रूममधे तिने कोणाला तरी यायला परमिशन दिलीय. म्हणून बोलले मी.प्रेम : अच्छा... असं आहे का...😊

* प्रेमला ते ऐकुन खुप छान वाटतं. *

अंजली : खरच आहे अरे... तु खुप वेगळा आहेस. म्हणून सर्वांना आवडतोस. अगदी मॉम ला पण...😊प्रेम : अच्छा... तारीफ करून झाली असेल तर तुम्ही बाहेर जाल का... सर्व वाट पहात असतील तुमची बर्थडे गर्ल...😊अंजली : हो...हो... पण मी ज्याची वाट पहाते तो तर इथेच आहे. मग बाहेर जाऊन काय करू. 😊प्रेम : अच्छा... डायलॉग...😊अंजली : नाही... खरं तेच बोलतेय...😊प्रेम : बरं ओके... पण जा आता बाहेर...कोणीतरी येईल इथे...आणि आपण दोघेच आहोत इथे....😊अंजली : रिलॅक्स... मॉम सोडून दुसरं कोणी इथे येत नाही... सांगितलं ना...तुला.😊प्रेम : अरे आता मी पण निघतोय... चल आपण सोबत जाऊ बाहेर...😊अंजली : ओय... खरच चाललास...? मला विश न करता...?😔प्रेम : अरे... मघाशी केलं ना विश...😊अंजली : अच्छा... असं लांबूनच... फक्त हात मिळवला की झाले का...?😔प्रेम : मग... असच करतात ना...🤔😊अंजली : मला तसं नको आहे...?😔प्रेम : मग....?🤔अंजली : सर्व सांगावं लागतं का तुला...?😔प्रेम : अरे पण बोल ना काय करू...🤔अंजली : ओह गॉड... मला हग नाही करणार...😔प्रेम : काय... वेडी आहेस का... इथे...?🤔अंजली : मग काय झालं... फक्त हग करायला बोलतेय... अजुन काही नाही. आणि ते तर नॉर्मल आहे. सर्वच फ्रेंड्स करतात. 😊प्रेम : अरे पण... बाहेर एवढे लोक आहेत. आणि तु इथे...मला काही कळत नाही.अंजली : बरं राहू दे... तु अनकन्फर्ट असशील तर... चल जावू बाहेर.😊

* प्रेमला काही सुचत नाही काय करावं, तरीही तो धाडस करून उठतो. तिचा एक हात पकडतो, आणि चेहऱ्याजवळ घेतो आणि हलकस बोटांना किस करत तिला जवळ ओढून घेत तिला अलगद मिठीत घेतो. अंजली पण दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारते. प्रेम तिला हळुच कानात बोलतो.

प्रेम :  हॅप्पी बर्थडे मेरी जान.... आय लव्ह यू...सो मच...💖

आणि तिच्या गालावर हलकासा किस 😘 करत तिला बाजूला करतो. अंजली पुन्हा त्याला जवळ करत बोलते. अंजली : आय लव्ह यू टू.... माय जानु...💗 मला आयुष्यभर या मिठीत राहायचं आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... बस्.... एवढीच माझी विश आहे.😊

* दोघानाही काही वेळ तसच रहावं असं वाटत होते, पण बाहेर पार्टीचा आवाज चालू असतों. तो कानावर येत असतो. कोणीतरी तिला शोधत इथे यायला नको म्हणून प्रेम तिला थोडंसं बाजूला करतो.*

प्रेम : आता ओके...😊अंजली : ( थोडी लाजतच ) हा...ओके. 😊प्रेम : बरं... निघायचं का आता... बाहेर सर्व तुला शोधत असतील आणि घरी ताई मला शोधत असेल. 😊

* ते दोघेही तिथून बाहेर येतात. तिला पाहताच तिचे फ्रेंड तिला डान्स करायला घेऊन जातात. प्रेम थोडा बाजुला उभा राहुन तिला नाचताना पहात असतो.💃 अंजलीचे लक्ष पण अधून मधून त्याच्यावर जात असतं. आज ती खरच खूप खुश होऊन नाचत होती. सर्व लोक डान्स पार्टी एन्जॉय करत होते. प्रेमला घरी जायला उशीर होत असतो. थोडा वेळ थांबून तो अंजलीला लांबुनच मी जातोय असा इशारा करतो. तेवढ्यात ती पुन्हा त्याच्याजवळ येते.*

अंजली : खरच निघतोय....तु...😔प्रेम : नाही खोटं...😊 पागल, चल बाय...एन्जॉय कर पार्टी...,👍अंजली : अच्छा ओके... बाय... नीट जा. आणि उद्या कॉल करशील ना...?प्रेम : उद्या संडे आहे.... मंडे ला तु कर ऑफिस मधे...😊अंजली : म्हणजे उद्या नाही करणार...कॉल.😔प्रेम : नाही... एकच दिवस तर आहे ना मधे...अंजली : एक दिवस....😊प्रेम : जास्त विचार नको करू... तु जा आता तिकडे तुझे फ्रेंड्स वाट बघत आहेत.😊अंजली : हो... जाते... बाय...😊

ती पुन्हा तिच्या फ्रेंड्स सोबत जाते. प्रेम लांबुनच तिच्याकडे पाहून स्माईल करतो. 😊 आणि घरी जायला निघतो. जाताना तो मॉम ला भेटतो. त्यांना सांगून तो तिच्या घरातून बाहेर पडतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात. आता घरी जाऊन ताईंचा ओरडा खावा लागणार हे त्याला माहीत होते. तिथून ऑटो पकडून तो घरी येतो. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे ताईची बडबड ऐकून घेतो. 😊मित्राच्या वाढदिवसाला गेलो होतो म्हणून उशीर झाला असं तिला सांगतो, तो केक चा डबा तिला फ्रिज मधे ठेवायला देतो. फ्रेश होऊन उपवास सोडतो. नंतर थोडा वेळ टीव्ही पहात बसतो. रोजची झोपायची वेळ झालेली असते. म्हणून टीव्ही बंद करून झोपतो. म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करतो. 😊

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️