Ajun hi Barsat aahe.... - 5 in Marathi Love Stories by Dhanashree Pisal books and stories PDF | अजून ही बरसात आहे ..... - भाग 5

Featured Books
Categories
Share

अजून ही बरसात आहे ..... - भाग 5

      कॉफी पिऊन अर्जुन पुन्हा राधा च्या विचारात गुंतःला.... राधा ची गोष्टच काही निराली आहे ....तिची प्रत्येक गोष्टच सुंदर आहे ....प्रेत्येक गोष्ट जीव ओतून करते ती .......म्हणूनच ती मला आवडते .....

         पुढच्याच क्षणी भानावर येत .......राधा मला आवडते ....मी हे  काय बोलतोय् ? राधा एक सुंदर व्यक्तिमहत्व आहे ....आणी चुकून सुद्धा तिच्या विषयी माझ्या मनात घाणेरडा विचार येता कामा नये .... 

          विचार करता करता अर्जुन झोपून गेला .....सकाळी उठला ....स्वतःहच उरकून कबीरच उरकून  ऑफीस ला जायला निघाला ...  जाता जाता पुन्हा त्याची पाऊल राधाच्या घराच्या  दारापुढे थंबकली ......बेल वाजवून बघावे का राधा घरात आहे का ती ?.......नको .....परत  तिच्या घरातील लोकांना जर नाही आवडले तर ....  नकोच ....अस म्हणून अर्जुन ने पाय आवरता घेऊन तो निघाला ....

          गाडीत् बसून तो ऑफिस ला निघून आला ....ऑफिस ला तो आला खरा ...पण त्याचं लक्ष मात्र काही केल्या कामात लागेना .....  थोड्या वेळाने लंच च टाइम झ्हाले ...सगळे जन आपापले डब्बे घेऊन कॅन्टीन मध्ये आले ....अर्जुन ही कॅन्टींग मध्ये आला ....त्याने नेहमी प्रमाणे सँडविच ऑर्डर केले .... इतक्यात त्याचा पडलेला चेहरा पाहून त्याचा मित्र यश म्हणालाच ..... " काय रे .....तुझ्या बायकोला कधीतरी डब्बा दयाला सांग , रोज रोज किती तु बाहेरच खाणार ".... 

      त्याच्या प्रश्नच उत्तर काय द्यावं .....अर्जुन ला कळेनाच ..... अरे ...ती पण जॉब करते ....त्या मुळे तिची पण धावपळ होते .....त्यामुळे तिला नाही जमत मला डब्बा द्याला .......

        असला जॉब काय कामाचा ? जिथे  आपल्या मुलांना आणी नवऱ्याला ....आपण साधं जेवण बनवून खायला घालू शकत नाही .....  आणी तुझ्हा मूड का आज ऑफ आहे ....अर्जुन च्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून विषय बदलत यश ने विचारले ......

               अर्जुन ला काय उत्तर द्यावे ? काही कळेना ....कारण राधा विषयी कोणालाच काही माहित नव्हते .....आणी अर्जुन ला ही तिच्या विषयी कोणाला काही सांगायचे नव्हते .....म्हणून अस उडवाऊदवी ची उत्तर देत तो बोलला ....." असच काही नाही रे ".........काही  मूड वैगेरे ऑफ नाही ......

           अगदीच मुद्याला हात घालायचा म्हणून .....यश ने विचारलेच ......." मिसळ वालीची आठवण तर येत नाही ना ?" 

         यश च बोलण ऐकून .....अर्जुन तावातावणे उठून उभा राहिला .....हे काय बोलतोस तु ?  .......राधा विषयी अस बोलले मी  खपवून घेणार नाही ....

          कूल डाउन  ब्रो........ मिसळ वालीच नाव घेताच एवढं का चिडतोस ?  अर्जुन ला शांत करत यश बोलला ...

          अर्जुन ने ही इकडे तिकडे बघितलं ....कॅन्टीन मधली  माणसे त्याच्याकडेच बघत होती .......मग शांत होत ....तो खुर्ची वर बसला ....आणी पुढ्यातील सॅन्डविच खायला सुरवात केली ...

           अर्जुन शांत झ्हालेला ...पाहताच पुन्हा यश बोलू लागला .....चेहरा आरशात  बघितलंस .....किती पडलाय ? मी तर मस्करीतच मिसळवालि च  नाव घेतलं ....पण तु मात्र फारच सिरिअसली  घेतलंस .......

              छान नाव आहे ....त्या मिसळवालिछ ...राधा .....पुन्हा  चिधवण्याच्या हेतूने यश बोलला ....... पुन्हा अर्जुन ने एक रागाने  कटाक्ष .....यश कडे टाकला .... कान पकडत यशने ....हळूच सॉरी म्हणले ..... 

              पण अर्जुन तु काहीही म्हण .....तु त्या मिसळ वालीचाच विचार करतोस .....तिच्याशी तुझं बोलण होत नाही ....भेटणं होत नाही ....म्हणूनच ....तुझ्हा मूड ऑफ आहे ना ? तु कितीही नाही बोल ....हेच कारण आहे .....पण डोन्ट  वरी ........प्रत्येकाला अशी कोणती तरी मैत्रीण हवीच  असते ......जी आपली बायको नसते .....

              यश बस ....आता ...काहीही बोलू नको ....अस काही नाही ....तु उगाच काहीही विचार करतोस .....

                 तस नसेल तर  तुझं अवघड आहे .....यश बोलला ....

                  काय बोलतोस तु ?  अर्जुन ला काहीही कळलेलं नाही ...अशा सुरात् तो बोलला .....

                   अरे .....शेअरिनग् ,कॅरिंग लागते मैत्रीण .....लग्ना आधी काय तुझ्या मैत्रिणी नव्हत्या .....मग लग्ना नंतर असली एखादी मैत्रीण तर कुठ बिघडलं .....यश च बोलण पूर्ण होत नाही तेच ....जेवणाची सुट्टी संपली ....आणी दोघे ही त्याच्या कामाला निघून गेले .....