Nikita raje Chitnis - 31 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग ३१

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग ३१

 निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.  सारंग                   काँट्रॅक्टर

  भाग ३१      

भाग ३०  वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर मळेकर

मग काय झालं? बोलला का तुम्ही कार्तिकशी,” मळेकरांनी विचारलं.

“हो. आधी इकडून तिकडून चौकशी केली आणि समाधान कारक वाटल्यावर कार्तिकशी तो एकटा असतांना बोललो.” – मामा.  

“का एकटा असतांना का? निकिता असतांना का नाही?”

“मला अस वाटलं की कदाचित मी विचारलेले काही प्रश्न निकीताला आवडले नसते म्हणून.” – मामा.  

“ओके मग?”

“निकिता ने काहीच सांगितलं नव्हतं पण मी बोलावलं आहे म्हंटल्यांवर कार्तिक ला मी काय बोलणार यांचा अंदाज आलाच होता. मी त्याला सरळच विचारलं. कार्तिक लग्नाबद्दल काय विचार आहे?” – मामा

“मामा, बरं झालं तुम्ही हा विषय काढला ते. मला निकीताशी बोलायला जमलं नसतं. आता मी तुमच्याशी मोकळे पणाने बोलू शकतो.” – कार्तिक.  

“बोल मोकळे पणाने बोल.” - मामा.  

“मामा मला निकिता खूप आवडते.  पण तिच्याशी लग्न करून तिला आयुष्यभर संकटात ढकलणं मला मंजूर नाही. म्हणून मी तिच्याशी लग्न करू शकत नाही.” कार्तिकच्या या अश्या बोलण्याने, मामा मात्र गोंधळून गेले. म्हणाले “जरा स्पष्ट करशील ?”

“मामा मला रिसर्च करायचा आहे. आणि दैवयोगानी ती संधि चालून आली आहे. मला अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली आहे.” – कार्तिक.  

“मग ? ही तर चांगली गोष्ट आहे. तरी तू नाही म्हणतोय ? निकिता तुला साजेशी नाही अस वाटतंय का?” – मामा.

“नाही मामा जिथे काम करायचं आहे, तिथे काम करण्याचे ठराविक तास नाहीयेत. मी जवळ जवळ लॅब मध्येच गुंतून पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे निरनिराळ्या  रोगांवरच्या vaccine वर संशोधन चालतं आणि यात फार धोका असतो. जरा कुठे चूक झाली तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असतो हा एखादे वेळी जीवावर पण बेतू शकतो. म्हणून मी लग्नच  करायचं नाही अस ठरवलं आहे. हे निकीताला सांगणं अवघड आहे.  तुम्हीच समजावून सांगा. पण मी आत्ता जे सांगितलं ते सांगू नका. कारण ती तरीही तयार होईल. तुम्ही सांगा की तुमच्या मापदंडात मी बसत नाही म्हणून.” – कार्तिक.

“अशी सगळी कथा आहे. म्हणून कार्तिकशी तिचं लग्न झालं नाही. निकीताला हे काहीच माहीत नाही.” – मामा.

“नितीनशी  कसं जुळवलं ?”

“निकिता इथल्याच एका कंपनीत इंटरव्ह्यु द्यायला गेली होती. तिथे नितीनने तिला पाहीलं. तिची सगळी चौकशी करून त्यांनीच मागणी घातली. कार्तिक चा चॅप्टर संपला होता. स्थळही चांगलं होतं. निकीताही सावरली होती. नितीनला कार्तिकची सगळी माहिती सांगितली. त्यांची काहीच हरकत नव्हती. मग काय, लग्न झालं.” – मामा.  

“ठीक आहे. तुम्ही दिलेल्या माहिती मुळे निकीताला, तिचा यात काही हात नाही हे सिद्ध करण्यात काही अडचण येणार नाही. चालतो मी.”  

चारच दिवसांनी प्रिन्सिपल चा फोन आला की रेकॉर्डस तयार आहेत. पोष्टाने पाठवू का ? पत्ता सांगा. मी त्यांना म्हंटलं की माणूस पाठवतो त्याला द्या. आमच्या एका शिपायाला पाठवून रेकॉर्डस मागवून घेतले. आणि फॉरेन्सिक लॅब ला पाठवून दिले.

चार दिवसांनी फॉरेन्सिक लॅब मधून रीपोर्ट आला की ज्या केमिकल्स ची  लिस्ट पाठवली होती त्यातून अविनाश चा मृत्यू ज्यामुळे झाला त्या प्रकारचे विष बनवणं शक्य नाही. म्हणजे कार्तिक आणि निकिता संशयाच्या लिस्ट मधून बाहेर निघाले. आता गवळींची वाट. ते काय माहिती आणतात त्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

आठवड्याने  गवळी आलेत. त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता.

“बोला गवळी काय बातमी आणलीत.”

“साहेब, तिथे गेल्यावर मामाला शोधण्यात बराच वेळ गेला.” गवळी तपशीलवार सांगत होते. “ते लोक गाव सोडून दुसरीकडे गेले होते. ती माहिती मिळवून मग तिकडे गेलो. मामा तर आता या जगात नाहीये, पण त्याचा मुलगा भेटला. प्रथम दोन तीन दिवस काही बोलायलाच तयार नव्हता. पण मी त्याला सांगितलं की राधाबाईंच्या मुलाला अविनाशराव मृत्यू पावल्यामुळे बरीच इस्टेट मिळणार आहे. म्हणून त्याचा शोध घ्यायला मी आलो आहे. तेंव्हा तो बोलायला तयार झाला. तो म्हणाला की राधाबाईंच्या बाळंतपणाच्या वेळी कराडहून एक जोडप आलं होत. त्यांच्या बरोबरच ती रायगड गेली. मुलगा झाल्यावर, त्यांच्या बरोबरच कराडला निघून गेली. पण आता तो कुठे आहे हे त्याला माहीत नव्हत. मग त्याला घेऊन मी दारू प्यायला गेलो. दोन पेग पोटात गेल्यावर बोलायला लागला. राधाबाईंनी मामाकडे जालीम विषाची मागणी केली होती. मामांनी ते गोळा करून ठेवलं होतं. पण राधाबाईंना जरूर पडली नाही. मग केंव्हातरी बऱ्याच वर्षांनी पुण्याहून कोणी तरी आलं आणि ते घेऊन गेलं. मी त्याला बबन चा आपल्या फायलीतला जुना फोटो दाखवला, आणि त्यानी तो ओळखला.”

“My god, केवढं जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं. पण बबन अस का करेल ? गवळी, तुम्हाला जर कोणी विषाची बाटली आणायला सांगितली तर तुम्ही आणाल ?”

“अर्थातच नाही. एक अजून साहेब, बबन हाच राधाबाईंचा मुलगा असावा असा मला दाट संशय आहे. कराडला जायला पाहिजे. कोण जोडप होतं, ते शोधून काढायला पाहिजे. आणि  साहेब, बबन जर राधाबाईंचा मुलगा असेल तर त्याचा नितीनच्या मृत्यू मध्ये हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तोच फक्त तिथे होता. पण motive काय असू शकतो ? त्याचा काय फायदा असू शकतो?” – गवळी.

“गवळी तुम्ही म्हणता तो ही मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. पण सध्या दोघीही  भारत भ्रमणाला गेल्या आहेत. त्यांना आल्यावर बोलावून घेऊ. पोलिस interrogation मध्ये खरं काय ते बाहेर येईलच. पण सध्या तुम्ही कराडला जा. बबनची सगळी कुंडली आपल्याला पाहिजे. या संगळ्यांमद्धे तोच कच्चा दुवा आहे. तोच माहिती देवू शकेल. त्याला बोलतं करायला पाहिजे.”

चार दिवसांनी गवळी आले. या दोन दिवसांत मी पुनः पुन्हा सर्व फाईल वाचत होतो. पुढची दिशा ठरवण्याचा प्रयत्न करत होतो.

“साहेब, सर्व माहिती मिळाली. सोमनाथने पण काम चोख केलंय. साटोरे नावाचं जोडप होत. त्यांनीच मुलाला वाढवलं. सगळीकडे बबन हा त्यांचाच मुलगा आहे अशी नोंद आहे. राधाबाईंचं नाव कुठेच नाहीये. हे  साटोरे  पती पत्नी  फार पूर्वी अविनाशच्या कंपनीत काम करायचे. राधाबाईंसाठी जेंव्हा त्यांना जगदलपूरला पाठवलं त्यांच्या आधी थोडे दिवस त्यांना राजीनामा द्यायला लावला. कारण अस दाखवलं की त्यांच्या गावी धुळ्याला त्यांना workshop टाकायचं होतं. ते काही दिवस धुळ्याला राहिले पण होते. नंतर रायगड ला बाळंतपण उरकल्यावर ते काही दिवस कराडला होते. आणि मग धुळ्याला जावून वर्कशॉप टाकलं. बबन मोठा झाल्यावर अविनाश ने त्याला बोलावून आपल्या कडे ठेवून घेतला. इतरांच्या प्रमाणेच त्याला पगार मिळायचा पण अविनाश त्याला दरमहा ३० हजार कॅश मध्ये द्यायचे. हा व्यवहार ऑफिस मध्ये फक्त दोघांनाच माहीत होता. एक चोरघडे आणि दूसरा, बबन चा फास्ट फ्रेंड एक दूसरा चपराशी आहे तो. हे पैसे साटोरे कुटुंबाने केलेल्या उपकाराची परतफेड होती. बबन लागायच्या आधी साटोरे स्वत: येऊन पैसे घेऊन जायचा. हे राधाबाई आणि शशिकलाबाई दोघींना माहीत असाव कदाचित. पण नक्की काय ते कळलं नाही. आणखी एक गोष्ट कळली साहेब. राधाबाईंच्या जवळ कंपनी चे ५ टक्के शेअर्स आहेत.”

“म्हणजे गवळी आपल्याकडे जी पक्की माहिती आहे ती अशी.

१. राधाबाईंनि विषाची बाटली मागवली आणि ती त्यांना मिळाली.       

२.  अविनाश चा मृत्यू विषाच इंजेक्शन दिल्यामुळे झाला.                   ३. बबन ने बस्तर ला जावून विषाची बाटली आणली.                            ४. बबन राधाबाईंचा मुलगा आहे. आणि हे अविनाशला माहीत होतं

ज्यांच्या बद्दल खात्री नाही त्या गोष्टी अश्या

१. अविनाश ला इंजेक्शन कोणी दिलं, आणि काय कारण होतं. ?

२. नितीनला कोणी मारलं, कसं मारलं, आणि काय हेतु होता  ?”

“साहेब या प्रश्नांची उत्तरं आपल्याला interrogation मध्येच मिळू शकतील. त्यांना ताबडतोब बोलावून घायचं का?” – गवळी.

“नाही गवळी त्यांना आता बोलावलं तर त्या यायला थोडा वेळ घेतील आणि त्यांना

तयारीला वेळ मिळेल. त्यांना बेसावधच घेरायला पाहिजे. त्यांना कळू न देता ते कधी वापस येताहेत त्यांची माहिती काढा. त्यांच्या आणि दामल्यांच्या घरावर लक्ष ठेवा. मग बघू.”

संध्याकाळी गवळी आले आणि म्हणाले की

“साहेब, ट्रॅवल कंपनी मध्ये चौकशी केली त्यांचा टूर परवा संध्याकाळी संपतोय.”

“म्हणजे १३ तारखेला. अस करा १४ ला सकाळी आधी राधाबाईंना बोलावून घ्या. शशिकला बाईंना नंतर बघू.”