भाग 10
असं म्हणून त्याने मायराला जवळ घेतले आणि तिच्या ओठ कपाळावर टेकवले. आणि तिचा हात धरून तिला झरझर नेऊ लागला... तर एका क्षणासाठी मायराने त्याला थांबवले..
तिने इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि ओठावर ओठ टेकवले...दोन क्षण होत नाही तर झाडाच्या आडोशाला जे दोन डोळे पाहत होते त्यांना .... असं पाहून त्याला राग आला ... रागाच्या भरात त्याने जवळ असलेली काठी जवळपास आदळली.यासारखे दोघेही भानावर आले आणि विलग झाले.संध्याकाळच्या कातरवेळी मायराचा हात पकडून जात असताना मात्र......
मायराच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले...
"मोहित माझ्याशी लग्न करताना तुला भीती नाही ना वाटणार???"
तिचा प्रश्न ऐकून मोहित आश्चर्यचकित झाला कारण त्याने तिच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती.आणि खरं पाहता तोही नेमका हाच विचार करत होता त्याच्या डोक्यात हेच विचार फेर धरत होते. की आपल्याला मायरासोबत लग्न करण्यासाठी भीती तर नाही ना वाटणार...??
तिला काय उत्तर द्यावे मोहितच्या लक्षात येत नव्हते. तो गोंधळाला होता आता. तर शब्दांचे खेळ खेळू लागला.
"समजा आपल्या लग्नात आमच्याकडून काही अडथळे आले किंवा तुमच्याकडून काही अडथळे आले तर..??"
मोहितच्या अशा बोलण्यावर ती चिडली.
"तुला सांगायचं नाही काय...??"
मोहित म्हणाला...
"जरूर सांगायचं आहे मला.. पण हे इतक्यात सांगता येणार नाही ना...!!! आपल्या दोघांच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचे अंतर आहे त्यामुळे आपण दोघेही दरीच्या.... एक अल्याड आणि दुसरा पल्याड आहोत.एवढी मोठी दरी आहे ना आपल्या दोघांमध्ये.. मग कसं सांगू मी आत्ताच काही...??"
त्याने असं म्हटल्याबरोबर मायराच्या जीवाची लाही लाही झाली... अंधाऱ्या रस्त्यातच तिने मोहितचा हात जो धरून होता तो स्वतःकडे ओढला तसा तो तिच्या अंगावर पडल्यासारखा झाला... तर तिनेच त्याला सावरले. आणि दोन्ही कॉलर त्याचे गच्च पकडले आणि चिडून बोलली...
मायरा....
"हे बघ मोहित... तुला आज... एकदा आणि शेवटचं सांगते... यापुढे मी पुन्हा कधीही सांगणार नाही बोलणार नाही.या विषयावर..... या मायराचं लग्न झालं तर फक्त तुझ्याशी... आणि नाही झालं तर हे लक्षात ठेव मी मरणार तर नाही पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशीच राहील....तू काहीही कर. मला त्याच्याशी घेणे देणे नाही पण लग्न मात्र माझ्याशीच करावं लागेल..."
मायराचा हा पवित्र बघून मोहित थोडा धास्तावला.
त्याला माहित होते की ती त्याच्याशिवाय कुणाशी लग्न करणार नाही... आणि मीही तर तिच्यावर प्रेम करतोय ना... मी तरी राहू शकतो का मायराशिवाय...अंधारात जरी असला तरी मोहितच्या चेहऱ्यावरचे चिंतेच्या छटा मायराने बरोबर ओळखल्या.
तिने दोन्ही हाताने त्याचे गाल पकडले आणि प्रेमाने म्हणाली....
"मोहित.... तू चिंता... चिंता करू नकोस रे. तुला कोणाचे दडपण आहे सांग... सगळ्यांना तर माहित आहे ना तू कुणाचा मुलगा आहेस... आता नाही रे येणार अडथळे."
मोहित म्हणाला ....
"मायरा मला फक्त एकच भीती वाटत आहे. ती म्हणजे तुझ्या बाबांची... त्यांची जातीव्यवस्थेबाबत वेगळं मत आहे गं.... जरी त्यांनी मला घरात आज चांगली वागणूक दिली तुमच्याकडे पण मला असं वाटते की मनातून नसणार... कारण मी कवडू साठे च्या घरी लहानाचा मोठा झालो आहे.. हे ते विसरू शकत नाही.. जेव्हा कवडू साठेलाच स्मशानाच्या बाजूच्या घरामध्ये राहावे लागते आताही ......त्यावरूनच तू अंदाज घे ना मग.."
दोघेही मंद स्पीडने चालत गोष्टी करत होते.. त्यांच्या ध्यानी मनी ही नव्हते की मगाचे झाडामागे दोन डोळे आताही त्यांचा पाठलाग करत आहेत.
एवढे मात्र ठीक होते की दोघेही हळूहळू एकमेकांशी बोलत होते. त्यामुळे त्या मागच्या दोन डोळ्यांना ऐकायला काहीही जात नव्हते.
मायरा म्हणाली (मोहितच्या बोलण्यावर विचार करून)....
"मोहित ....तू म्हणतोयस ते मला पटतंय.. पण अरे... आज पर्यंत माझ्या बाबांनी फक्त माझंच सुख पाहिलं आहे. आणि मला वाटतं आत्ताही ते माझ्या सुखाआड येणार नाहीत.आपण असं करू मोहित... तू तुझ्या घरची काळजी करून त्यांना मनवण्याचा प्रयत्न कर आणि मी माझ्या घरच्यांना मनवण्याचा प्रयत्न करते."
मोहित..
."बरं... ठीक आहे ...करू आपण प्रयत्न."
मोहित बोलला खरा पण त्याचे लक्ष आता काहीतरी सळसळले त्याकडे गेले. आवाज आला म्हणून त्यांनी गडबडून मागे पाहिले.आणि मघापासून जे दोन डोळे त्यांचे पाठलाग करत होता ती आसामी त्यांना दिसली.
मोहित झटका लागल्यागत पाहत राहिला.त्याचे अंग किंचित थरथरू लागले.
त्याला असे पाहून मायराने चमकून विचारले...
"काय झालं मोहित...??"
मोहितने "काही नाही "असे सांगितले.
मायराकडे पाहून झाल्यानंतर पुन्हा त्याने मागे ती आसामी दिसते का म्हणून बघितले. पण ती व्यक्ती आता निसटली होती.भडीमार प्रश्नांचा सुरू होता मायराचा.. काय बघितलेस मागे म्हणून..
नाईलाजाने मग त्याने सांगून टाकले....
"तुझ्या बाबांचा कारभारी राम होता मागे आपल्या. मला वाटते तो पाठलाग करत असावा आपला.. कारण मला थोड्या वेळापासून वाटत होते की आपला सारखा कोणीतरी पाठलाग करत आहे."
मायरा किंचाळल्यागत बोलली..
"राम...??"
मोहितने बोललेल्या सर्व शब्दांपैकी या" राम "एका शब्दाने तिला जबरदस्त धक्का बसला होता.
आता तिला धडकी भरली.. तिच्या वडिलांचा डावा हात म्हणजे राम... सर्व कारभार तोच बघायचा..मायराने आता मोहितचा हात सोडला आणि भराभर घराच्या दिशेने निघाली.तिचे सारे शरीर भीतीने आतून थरथर कापत होते. तिने सर्व धीर एकवटून एक पावले टाकत घराकडे निघाली. तिला आता थोडे खचल्यासारखे वाटत होते...
इतक्यातच हा विषय घरी माहित व्हायला नको होता असे तिचेविचार होते.पण आता ती काय करू शकणार होती..??घडून तर गेले होते.जाता जाता ती घरी गेल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टीला तोंड द्यायचे आहे याचा विचार करत होती..............
मायराच्या घरी...
.रागीट लाल डोळे घेऊन अंगार बरसवत होते राम वर बाबाराव.. आत्ताच त्यांनी रामच्या मुखातून बातमी ऐकली होती. त्यावर काय बोलावे हे बाबाराव यांना समजत नव्हते.. अत्यंत क्रोधित झाल्यामुळे लालसर तांबूस डोळ्यांनी रामवरती आग पाखडत होते.खरं पाहता त्यांना काय बोलावे हे समजत नव्हते. आणि जे ऐकले आपल्या माणसाच्या तोंडून त्यावर विश्वास कसा ठेवावा हा विचार करून त्यांचा मेंदू काम करत नव्हता.
(अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत बोलतात)बाबाराव (मनात).....
"आपली एकुलती एक लाडाची पोरगी..... इतक्या खालच्या थराला जाईल हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. मुलींनी शिकलं पाहिजे हे आपलं मत आहे... म्हणून ही सुद्धा शिकावी म्हणून हिला शहरात पाठवलं. तर. ही अभ्यासाबरोबर भरपूर काही शिकून आलेली दिसते.......स्वप्नांतही विचार करू शकत नाही की माझी पोरगी अशा नाजायज पोरासोबत अशी इकडे तिकडे फिरत आहे. आज पर्यंत मी समजत होतो की माझी लेक माझे विचार मानते.. पण हिच्या डोक्यात तर खूळ भरलेले दिसते प्रेमाचं..."
मायराची आई लिला...."अहो ...माझा तर याच्यावर विश्वास बसत नाही. आपली पोरगी अशी नाहीच... राम ...काय रे तू स्वतः पाहिलेस काय..???"
एवढे बोलून त्या राम कडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत होत्या.
राम म्हणाला..."हो ...मी तिथूनच तर आलो."
राम याची वाक्य ऐकून लीला यांची बाबाराव पेक्षाही चमत्कारिक अवस्था झाली होती.तिच्या सर्व अपेक्षा आकांक्षा एका वाक्यात धुळीला मिळाल्या.हातापायाची सारी शक्ती क्षीण होऊन त्याखालीच बसल्या. तसेच बाबाराव हे सुद्धा थिजल्यासारखे गप्प बसलेबाबाराव रामवर अविश्वास दाखवत नव्हते कारण त्यांना माहिती येते राम हा अगदी विश्वासू आहे. तो कधीच खात्री पडल्याशिवाय किंवा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय बोलत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर बाबाराव यांचा विश्वास बसला.
राम म्हणाला..."साहेब ...मी पंधरा दिवसापासून बाहेरून ऐकत आहे ह्या गोष्टी. गावात चर्चा केव्हाचीच सुरू झाली या गोष्टीवर आणि त्या गोष्टी माझ्या कानावर आल्या म्हणून मी यात लक्ष घातलं. आणि खात्री झाल्यावरच मी तुमच्याशी बोलतो आहे या विषयावर."
राम सांगत होता आणि बाबाराव गप्प ऐकत होते.
राम....
"मी त्यांच्या मागावर होतो पण कदाचित आज मोहितला माहिती झाले की मी त्यांना पाहिलं."
आता बाबाराव यांच्या ने अजून राम जे बोलतोय ते ऐकवत नव्हते. मी कठोर आवाजात राम ला जायला सांगितले तसा राम तेथून बाहेर पडला.. तोही घाबरला होता. बाहेर निघाल्यावर चालताना याचा परिणाम नेमका काय होईल याचा तो विचार करत होता. आपण सांगण्यात चुकी तर नाही केली ना हेही एक वेळा त्याच्चच्या मनात आले होते. पण सांगणे आपले अपरिहार्य आहे हेही त्याच्या नोकरीचा भाग होता एक. तो त्याच्या नोकरीशी इमानदार होता.गावामधलं आपलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व .. घराण्याची अब्रू चव्हाट्यावर पडणं हे बाबाराव यांना सहन होणार नव्हतं.
लीला..
."पोरीला काय अवदसा आठवली हो..!! तेच पोरगं पाहायचं होतं हिला... त्या घरात लहानपणापासून मोठा झाला.. कातडी कमावण्याच्या घरात त्या अवतीभवती चामडी असणाऱ्या दुर्गंधी वातावरणात शिक्षण घेतले ना त्याने. हिला काही कळू नये काय...?? कुठे मैत्री करावी??? कुठे जीव लावावा ???कोणती दुर्बुद्धी सुचली या पोरीला कोण जाणे..???"
पण बाबाराव मात्र अगदी शांत होते पाहाडासारखे.त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली होती.
ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट करून दिसत होती. नेहमी ओठातून शब्द बाहेर पडणारे बंद झाले होते. आणि शांत डोळे असणारे खळबळ माजवू लागले होते.डोळे त्यांचे अंतकरणातील वेदना व्यक्त करत होते..
लीला या अजूनही बडबड करत होत्या तर त्यावर थंड स्वरात डोळ्यांत .....
तांबडा अंगार घेऊन बाबाराव म्हणाले...
🌹🌹🌹🌹🌹