वातावरणात अस्वस्थता सर्वांनाच जाणवत होती. तितक्यात सचिन रामला आवाज देतो आणि विचारतो,"त्या वृद्ध संताकडे पोहोचायला आणखी किती वेळ आहे".त्याला बोलत राम म्हणतो की आता जंगलाचा भाग सुरू झाला आहे आणि या जंगलाला पार केले की आपण त्यांच्याकडे पोहोचू त्या दोघांमधील संवाद झाल्यानंतर काहीच वेळाने गाडी अचानक जंगलाच्या वाटेत बंद पडली कुणालाच काही कळत नव्हते की गाडीला नेमकं झालं तरी काय गाडीला काय झालं पाहण्यासाठी सर्वजण खाली उतरतात राम व सचिन गाडीचे इंजन उघडून पाहतात की काय खराबी आली आहे आणि राघव प्रवीण राधा व श्रेया हे आजूबाजूच्या झाडी व जंगल पाहण्यात मग्न असतात . गाडीचे इंजन खुप गरम झाल्यामुळे गाडी बंद पडली असल्यास राम सचिनला म्हणतो , " इंजन थंड करण्यासाठी आपल्याला पाणी लागेल , गाडी मधे पाणी आहे का ते बघ " . रामचे बोलणे ऐकूण सचिन गाडी मध्ये जातो व गाडी मध्ये पाणी आहे का ते बघतो . गाडीत शोधा - शोध केल्यानंतर त्याला कळत की गाडीत पाणी नाही , पण त्याला गाडीत एक पाण्याची बादली सापडते . ते घेऊन तो गाडी बाहेर येतो व प्रविण व राघव ला हाक मारतो . सचिन आवाज ऐकून ते दोघे तिथे पोहोचतात . सचिन त्याना ती पाण्याची बादली देतो व आजू बाजूला कोठे पाणी भेटेल का याच्या शोधावर पाठवतात . सचिन राम जवळ येतो व त्याला सर्व काही कळवतो . आणि तो पण काही वेळासाठी विश्रांती घेतो .
काही वेळानंतर राम सचिनला विचारतो, "बराच वेळ झाला तरी मुलं अजून आली कशी नाही ". त्यावर सचिन बोलतो,"अरे जंगलाचा भाग आहे दाट घनदाट जंगल आहे त्यांना पाणी शोधायला वेळ लागत असेल म्हणून त्यांना उशीर होत असेल".
तेवढ्यात राधा व श्रेया सचिनकडे येतात त्यांना जंगलात काही फळांची झाडे दिसतात तर त्या गोळा करून आणतात आणि राम व सचिनला फळे देतात जंगलात खूप वेळ अडकून राहिल्यामुळे सर्वांनाच खूप भूक लागली होती आणि ते सर्वजण प्रवासासाठी पहाटेच निघाले असता नाश्ता कोणी सुद्धा केला नव्हता सर्वांनाच फळे खाऊन जरा बरे वाटले व राधा ने काही फळे प्रवीण वर राघव साठी बाजूला ठेवली होती. तिकडे प्रवीण व राघव जंगलात पाण्याच्या शोधात होते. जंगलात ते दोघे खूप आत शिरले होते. आणखी काही दूर गेल्यावर त्यांना नदीच्या प्रवाहाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. आवाजाचा पाठलाग करत ते नदीपर्यंत पोहोचले व त्यांनी ती बादली पाण्याने भरून घेतली व पाण्यात उतरले थकवा आणि शीण आल्यामुळे त्यांनी नदीच्या पाण्याने चेहरा व हात पाय धुतले व पुन्हा मागे फिरण्यासाठी निघाले.
ते दोघे नदीवरून काही अंतरावर आले इतक्यातच त्यांना एका पुरुषाची कष्टदायक किंकाळी ऐकू आली व ते दोघेही त्या किंकाळीच्या दिशेने पळाले काही क्षणातच ते तिथे पोहोचले व त्यांना तिथे एक वृद्ध पुरुष खूप घायाळ अवस्थेत मिळाला तो वृद्ध अतिरक्तस्त्रावामुळे बेशुद्ध झाला होता. ते दोघे पळतच त्या व्यक्तीकडे धाव घेतात. तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवरती पडलेला असतो.
राघव आणि प्रवीण त्या वृद्ध व्यक्तीकडे जातात व त्याची काही मदत करतात राघव खिशात न रुमाल काढतो व त्या वृद्ध व्यक्तीच्या जखमेवरती बांधतो ते दोघे त्याला उठविण्याचा प्रयत्न करतात पण अतिरक्तस्त्रामुळे तो अशक्त बेशुद्ध असतो. ते दोघे त्याला उचलतात व गाडीच्या दिशेने चालला असता काहीच वेळात ते दोघे गाडी जवळ येतात व सचिनला आवाज देतात सचिन बाहेर येतो व त्या घायाळ व्यक्तीला पाहून तो थोडा विचारात पडतो व रामला फर्स्ट एड बॉक्स घेऊन बोलावतो. राम फर्स्ट एड बॉक्स घेऊन बाहेर येतो व त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहून चकित होऊन जातो कारण तो व्यक्ती म्हणजेच ते वृद्ध संत असतात. तेव्हा तो कोणालाही काही बोलत नाही सचिन व राम त्या वृद्ध ची मलमपट्टी करतात व त्याला रुग्णालयात घेऊन जातात. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टर त्यांना रक्त चढवतात व 24 तास निगराणी ठेवायला सांगतात तेथे राम सचिनला सांगतो की ही व्यक्ती तेच संत आहे ज्यांच्याकडे आपल्याला जायचे होते सचिनला पण या गोष्टीचा धक्का बसतो आणि बोलतो का आणि कोणी केले असेल अशी परिस्थिती त्यांची. राम म्हणतो जेव्हापासून हे मनी जागृत झाले आहे तेव्हापासून वाईट घटनांचा क्रम सुरू झाला आहे.