भाग - २२
त्यावेळेस घरात एकदम भावनात्मक असे माहूल निर्माण झालेला होता. तेवढ्यात सावलीचा फोन वाजू लागला होता. सावलीने बघीतले तर तो नवीन नंबर होता, तो बघून ती समजली नवीन नंबर म्हणजे त्या तीसऱ्या व्यक्तीचा असेल. तर तीने तो फोन घेतला आणि बाहेर येऊन उचलला. ती बाहेर गेटजवळ येऊन बोलू लागली, ती हॅलो म्हटल्यावर सहज इकडे तीकडे बघीतले तर तो मनुष्य तीला तीचा घराचा पासून काही अंतरावर रस्त्याचा
कडेला उभा राहून बोलतांना दिसला. तो बोलू लागला, काय म्हणता मिस्स सावली, सावंत साहेबांनी तुम्हाला सत्य सांगून दिलेच. ते तसे त्यांचा तपासाची एकही गोष्ट आपल्या स्वतःचा घरचा व्यक्तींना सुद्धा सांगत नाहीत. परंतु तुझ्यात काय अशी जादू आहे माहित नाही कि तुझ्या समोर त्यांनी सगळ्या गोष्टी पटापट सांगून दिल्या." तो बोलत असतांना सावली मात्र विचार करू लागली होती, कि याला कसे कळले असेल साहेबांनी मला काय सांगीतले ते. मग सावली तीचा मेंदूवर जोर देऊन वीचार करू लागली कि त्या क्षणी साहेब आणि मी आमचा व्यतीरिक्त कोण उपस्थित होता तेथे तीचा डोक्यात हा विचार सुद्धा आला कि हा व्यक्ती साहेबांचा केबीनमध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टीही अचूक माहित करून घेऊ शकतो. तर नक्कीच याची ओळख म्हणा कि पोहोच पोलीस स्टेशनचा आत पर्यंत आहे आणि एकतर तो पोलीसातील कुणी एक आहे अथवा कुणीतरी पोलीस स्टेशन मधील व्यक्ती याचा सोबत मीळालेला आहे.
परंतु सावलीची लाचारी होती कि ती हे सगळ सावंत साहेबांना सांगू शकत नव्हती. तर ती सगळ्या गोष्टींना बाजूला सारून कोमलचा ऑपरेशनचा बाबत विचार करू लागली होती. ती याचा आधी तीचा स्वतःचा मागे असलेल्या अडचणीतच अडकून बसलेली होती. त्यामुळे तीला कोमलकडे लक्ष पुरवणे बीलकुलच जमत न्हवते. परंतु आता तीने जातीने तीचाकडे आणि तीचा प्रकृतीकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. ती आता स्वतः कोमल सोबत जास्त काळ राहू लागली होती. आधी म्हातारी आई असायची जी बीचारी या वयात लवकरच थकून जायची. त्यामुळे तीचे स्वतःकडे आणि कोमलकडे तेवढे लक्ष नाही रहायचे, तर सावलीने कोमलची काळजी घेण्यासाठी काही दिवसांची रजा घेतलेली होती ऑफिसमधून. एके दिवशी दुपारचा वेळेस सावली घरीच असतांना तीला कोमलचा रुममध्ये कुणाची तरी सावली दिसली. तीने तेव्हा लक्ष दिले नाही, परंतु तीला क्षणातच काय झाले तर ती धावत कोमलचा रूमकडे गेली, तेथे जाऊन बघते तर कोमल तीचा बेडवर झोपलेली होती. मग सावलीला असे वाटू लागले होते कि कोणीतरी होते इथे. तीने विचार केला कि कोमलला उठवून वीचारावे परंतु दुसऱ्या क्षणी तीने विचार केला कि तीची झोपमोड होईल. म्हणून तीने सावलीचा झोपेतून जागण्याची प्रतीक्षा करणे उचीत वाटले. काही तासांनी कोमल झोपेतून जागी झाली तर सावली तीचा जवळ गेली आणि बोलली, "काय छुटकी कशी आहेस, तुला बरे वाटते ना." तेव्हा कोमल म्हणाली, "हो ताई आज मला फारच चांगले वाटत आहे. आज इतकी वेळ मी नीवांतपणे झोपली बीनधास्त कोमलचे ते बोलने ऐकून सावली विचार करू लागली कि, " मला वाटले होते कि कोमल स्वतःचा पायावर उठून उभी झाली असेल. परंतु हि तर म्हणते कि ती गाढ झोपेत होती. तर मग कोण होता आणि कुणाची सावली दिसली मला कोमलचा रुममध्ये आता सावलीला तीची सहावी इंद्री एका नवीन संकटाचे संकेत देत होती. सावलीने ठरवले कि आता तीला अधिक सावधान रहावे लागेल. त्याचबरोबर तीला त्या तीसऱ्या साक्षीदाराचा बद्दल माहिती सुद्धा काढायची होती. म्हणून तीने विचार केला कि घराची आणि बाहेरची सुरक्षा कशी करावी म्हणून तीने घरात ठिकठिकाणी कॅमेरे बसवून घेतले. त्या कॅमेरात घराचा बाहेर कोण येतो कोण
जातो शिवाय घराचा आत सुद्धा कोणी आहे कि नाही आहे याबद्दल क्षणाक्षणाची माहिती तीला मीळणार होती. तर आता सावलीने घरचा काळजीतून मुक्त होऊन आपल्या ध्येयाचा दिशेने पाऊल टाकले.
त्यासाठी सावलीने तीचा एका मीत्राची मदत घेण्याचे ठरवले तो मीत्र होता पियुष, पियुष हा सावलीचा कॉलेज मधील एक जवळचा आणि विश्वासू मीत्र होता. सावलीने निलेशचा केस मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा सोबत पियुषची सुद्धा फार मदत केली होती. त्यामुळेच तो त्याचा मनपसंद क्षेत्रात कुशलतेने कार्य करू शकला होता. त्यासाठी ती त्याचाकडे त्याचा घरी गेली. तीने तेथे जाऊन दार वाजवले. पियुषने दार उघडले आणि सावलीला समोर बघून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, काय संयोग म्हणावे कि योगायोग सावली तू चक्क माझा घरी आलीस. कशी आहेस ग, फार दिवस नाही तर महिन्यांनी होत आहे आपली भेट.” तेव्हा सावली म्हणाली, “हो रे खरच, परंतु
तेव्हा पियुष सुद्धा म्हणाला, "हो ग मला पण फारच आनंद होत आहे. आज भेटून मला फार आनंद होत आहे. सावली आत गेली आणि बसली तोच पियुषने आईला हाक मारली, "आई बाहेर ये कोण आले आहे आपल्या घरी बघ.'आणि म्हणाला चल ये आत मध्ये आईची भेट करून देतो तुला.' आई बाहेर येऊन म्हणाली, "कोण आले आहे रे." तर सावलीला बघताच आईने म्हटले, अय्या सावली बेटा किती दिवसांनी आलीस ग. सावली उत्तरली, " हो काकू फारच दिवस झालेत. मग आई काहीतरी आणण्यास घराचा आत गेली.
शेष पुढील भागात..