Niyati - 7 in Marathi Love Stories by Vaishali Sanjay Kamble books and stories PDF | नियती - भाग 7

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 7





भाग 7

.

.

.


नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.




झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर अडकलेले होते. क्षीण आवाजात अधून मधून रडत होते. तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.


न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली.. पण ती 
पाहून आणखीन थबकली कारण....
त्याच्या एका अंगाला लाल मुंग्या चावत होत्या. तेथून रक्तही येत होते. ते पाहून पार्वतीचा जीव गलबलला.





आणि खाली वाकून त्याला घेण्यास हात पुढे केले.
पुन्हा ती थबकली आणि घाबरली ही.
या बाळाला आपण हात लावावे की लावू नये.. हा विचार तिच्या मनात आला.



अगोदरच गावामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टीला हात लावायला आणि प्रवेश घ्यायला मनाई होती.




असा सगळा विचार मनात चालू होता पार्वतीच्या.
क्षणभर थबकलेले आहात केव्हा पुढे गेले तिचे तिलाही कळले नाही.


दृष्ट लागण्यासारखे ते लहानसे बाळ होते कपड्यात गुंडाळलेले..... गोरे गोरे पान हलणारे हात पाय तेवढेच बाहेर होतं. पण त्यातही पायांना बाहेर असल्यामुळे लाल मुंग्या जाऊन ठिकठिकाणी रक्त येत होते.



मुंग्या त्याच्या चामडीमध्ये रुतून दिसत होत्या.
रडत रडते बाळ वर पाहत होते पण अद्याप त्याला नजर आली नव्हती.



पार्वतीने त्या पोराला भावना वेगाने उचलून घेतले आणि सर्वप्रथम त्याच्या पायावर रुतलेल्या चावऱ्या मुंग्या हाताने एक एक करून पटापट काढल्या.




आणि ते कन्हत क्षीण आवाजात रडत होते तर पटकन तिने छातीशी कवटाळून घेतले आणि उभी राहिली व पटदिशी बाळाला पदरामध्ये लपवून घेतले.





आता तिला वर देवाच्या दारी जावे की घरी जावे हा संभ्रम निर्माण झाला. पण मग मागचा पुढचा विचार न करता वरती न जाता परत फिरली घराकडे आणि डोंगर उतार उतरू लागली.





त्या गोंडस बाळाची मान अजून पर्यंत धरली नव्हती.
पार्वतीने आयुष्यात प्रथमच छोटेसे बाळ जिवंत आपल्या हातात धरले होते.
तर तिला धरावे  कसे ...?? हेही समजत नव्हते.




ते सारखे रडत होते आणि ती पायदळ चालता चालता त्याच्याशी जोरात बोलत त्याला समजावत होती.
समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून ते चूप व्हावे.
पण बाळ चूप होण्याचे ऐवजी आणखीन रडत होते आणि ती तशीच घाई घाईने घराच्या रोखाने धावल्यागंत चालत होती.





थोड्या वेळापूर्वी थकलेली दमलेली पार्वती ती आता तिच्याकडे पाहिले कुणी तर ती अजिबात तशी दिसत नव्हती.



तिचा चेहरा आनंदाने उत्साहाने चमकत होता.
अंगात हत्तीचे बळ आले होते. तिच्या पायात जणू शक्ती एकवटली होती. 





ती झोपडीच्या दारात आली तेव्हा कवडू स्मशानात काहीतरी खणत असलेला तो तिच्याकडे वेड्यासारखा पाहू लागला. कारण ती मागे चोर लागल्यागंत धावत पळत काहीतरी लपवत आणत होती.




तो विचार करत होता.
"ही तर नवस घालायसाठी डोंगरावरच्या शंकर-पार्वतीच्या मंदिरात गेली होती. तेथून काही चोरी करून आणले की काय ??? असे पदरात घेऊन लपवून....."....
असा विचार करून तो तिच्याकडे वेड्यागत पाहत होता.





आणि तेवढ्यात एकाएकी तिच्या पदरातून लहान
बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला.
तसा तो दचकला.



खणत असलेली कुदळ हातात घेऊन तो तिच्याजवळ आला...
आणि म्हणाला....
"पारू ....पदरात काय आहे तुझ्या??? लहान बाळाचा रडण्याचा आवाज का येतोय.???"




पार्वती म्हणाली....
"लवकर या इकडे... पटकन जा आणि कुठूनही थोडसं दूध घेऊन या."





कवडू म्हणाला....
"दूध ....दूध कशापाई..."असा म्हणत तो धावत धावत पार्वती जवळ आला आणि कुदळ बाजूला फेकून दिली. आणि तिचा पदर खोलून पाहिला त्याने....
तसा त्याची पाचावर धारण बसली.




बोबडी वळल्यागत बोलू लागला कवडू......

"अगं ये ....हे काय.. आणलंय...तू...???
कुठून आणलं ...??? कोणाचं आहे.....???"


पार्वती....
"माझ्या शिवपार्वतीने दिले. भूक लागली पोराला. ताबडतोब अगोदर दूध आणा.."





झोपडीत येऊन खाली मांडी घालून बसली आणि पोराला मांडीवर घेतले.
एक मांडी वर खाली  हलवून बाळाला चूप करण्याचा प्रयत्न करू लागली. पण बाळ काही रडणे थांबवत नव्हते.




बहुतेक भुकेने कासावीस झाले होते ते. रडून रडून दमून गेले होते. घामाने डबडबले होते. आणि या सर्व प्रकारामुळे त्याचे शरीर थंड पडले होते.




थंड शरीराला हात लावला बाळाच्या.. तर त्याच्या अंगातला थंडपणा स्पर्श करून पार्वती घाबरली.
एक तर त्यांच्या घराच्या जवळपास एकही घर नव्हते.
कवडू तर तिने सांगितल्याबरोबर दुधासाठी एक भांडे घेऊन दूध आणायला गेला होता. 






बाळ खूप खूप रडत होते. तर नाईलाज म्हणून तिने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडात पाणी जाताच आणखीन कासावीस होत होते.




तेवढ्यात कवडू आला. तर त्याला न बकरीचे दूध....
...ना गाईचे दूध ....त्याला म्हशीचे दूध मिळाले होते.


काही नाही त्यापेक्षा हे बरे. जे मिळाले ते घेऊन तो धावत आला होता. 

आता आणलेले दूध समोर होते.... बाळही रडत होते...
पण आता दोघांनाही बाळाला दूध कसे पाजावे हा प्रश्न पडला....


बाळाचे केविलवाणी रडणे ऐकून आणि समोर दूध असेलेले पण त्याला पाजता येत नाही हे बघून पार्वती रडकुंडीला आली होती.

काय करावे दोघांनाही काहीच समजत नव्हते.



पार्वती रडत रडत कवडूला म्हणाली....
"काय हो !!! आता कसं करायचं...???"



तेवढ्यात कवडूला थोड्या दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला.
"पारू आपल्याकडे खारीचं पिल्लू भिंतीजवळ पडलं होतं...आठवते....!!!"





"अहो ......बाळाला दूध कसं पाजायचे ते सांगा. ते खारीचं पिल्लू जाऊ द्या.. "




"हो गं... तेच सांगायचा प्रयत्न करत आहे मी... आपण त्यावेळी खारीच्या पिल्लाला कापसाच्या बोळ्याने दुधात भिजवून त्याचे थेंब थेंब तोंडात सोडले होते. तसंच करूया की बाळासाठी या."




"थांब आता मी कापूस घेऊन येतो..
त्याला पाजू दूध मग"


तो गेला तर त्याला कापूस मिळाला नाही. तर मग त्याने मऊ कपड्याचा तुकडा काढून आणला.



  भिजवून दुधाने भरलेला बोळा मुलाच्या तोंडात पिळून थेंब थेंब घालायला त्यांनी सुरुवात केली.




दुधाची चव त्याला लागताच तो हळूच चोखू लागला.
आणि त्याने अचानक रडणे थांबवले जीवात जीव आला.
आणि त्या दिवसापासून ते मुल कवडूच्या घरी राहिले.




थोडसं दूध घेऊन झाल्यानंतर ..
बाळाचे रडणे थांबले मग दोघेही समाधानाने पाहू लागले त्याच्याकडे. बाळाचा लाड करू लागले.



आणि मग.......
कवडू मांगाच्या झोपडीत ते बाळ वाढू लागले. जशी गरज पडेल तशी दोघेही बाळाचे संगोपन करत होते.




खूप लाडाचे झाले होते बाळ दोघांचेही. आणि गावात तो एक महत्त्वाचा विषय होऊन बसला होता.




गावातही सर्वांना त्या दोघांचे कौतुक वाटत होते. आणि त्या अनौवरस असलेल्या बाळालाही आईबाप मिळाले होते.





पण एक दिवस ते मूल कोणाचे आहे हे समजले पार्वतीला.




बाया गावातल्या कूजबूज करत गोष्टी करीत होत्या तेव्हा तिला कळले होते.



गावात जे मारुतीचे मंदिर होते .....त्या मारुतीच्या मंदिराशेजारी राहात असलेल्या घरच्या मूलीचे झालेले बाळ होते ते.




पूर्ण गावाला ते समजले होते. पण आता ते कवडूच्या
हातून कोणीही घेऊ शकत नव्हते.
कारण त्याला आता कवडू आणि पार्वतीचा हात लागला होता.





कवडू आणि पार्वतीने दोघांचीही अवस्था अशी होती की त्यांना माहीत तर होते ते कोणाचे बाळ आहे.
पण त्यांनाही माहित होते आता त्यांच्याकडे असलेल्या बाळाला त्या मूलीकडे कोणीही नेणार नाही...
कारण एवढे दिवस बाळ त्यांच्या जवळ होते.




गावातली जाती व्यवस्था इतकी पक्की आणि निगरगट्ट होती की आता माहीत असूनही त्याला कोणी त्यांच्या घरचे नेणार नव्हते.




पाहता पाहता मोहित सात वर्षाचा झाला. आणि आता अडाणी असलेले कवडू आणि पार्वतीला यांनाही वेगळीच चिंता वाटू लागली की पोरगा इतका गोरापान देखना आहे.


गुटगुटीत दिसतो मस्त.
हे मूल आपल्या घरात शोभत नाही ही भावना दोघांच्याही मनाला सारखी सलत होती.




आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,
तर लोकांकडून खरे समजण्याची भीती होती दोघांना.




एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता  ग्रासंत होत्या..
आपल्या मनात असलेली चिंता ती ....कवडू ....पार्वतीला बोलू लागला...की.....
.
🌹🌹🌹🌹🌹