रिया चा ह्या महिन्याचा पिरियड चुकला होता ....तिला जरा दमल्या सारखं ही वाटत होत ...म्हणून ती ने मेडिकल मध्ये जाऊन प्रेगॅन्सी किट आणलं .... किट आणताच तीने बाथरूम मध्ये जाऊन चेक केल .....टेस्ट पॉसिटिव्ह निघाली ... खरतर ह्या गोष्टीचा आनंद करावा ..की दुख कराव तिला काही कळतच नव्हतं ....
तिच्या घरची प्रस्तिथी कशी आहे ...हे तर तिला चान्गलच माहित होत ......वडील अंथरुणाला खिळालेले त्यांना लास्ट स्टेज चा कॅन्सर होता ....आई ला घुढग्यामुळे चालता येत नव्हते ......बहीण कोणाला सांगत नव्हती ...पण तिच्या सावळ्या रंगामुळे तिच लग्न ठरत नव्हतं ..ह्या सगळ्याचा तिचा त्रास होत होता .....भावाचं शिक्षनासथि खुश पैसेलगणार होते .....आणी ह्या सगळयातुन् घराला सुरक्षित बाहेर काढायचे असेल तर .....हे बाळा ला जन्म दयाचा आणी त्याच्या आई वडिलांच्या तब्यात दयाचे ....आणी आपले पैसे घायचे .......
हो ......त्याच्या आईवडिलांच्या तब्यात ....कारण ..रिया त्या बाळाची सरोगेट मदर होणार होती .....
रियाच्या आई ने आवाज देताच ...रिया ची तांद्री तुटली ..... आणी ती प्रेग्नन्सी किट लपवतच बाहेर आली .... नाश्ता करून ती कॉलेज जाते सांगून ...ती बाहेर पडली ....
बाहेर पडताच तीने ...विश्वासरावांना फोन केला होता .....ते तिचे हॉस्पिटल मध्ये वाट बघत होते ..... ती तिथे पोहताच ...विश्वास राव सरळ तिला "डॉक्टर रेवती" च्या केबिन मध्ये घेऊन गेले ......
डॉक्टर रेवती ने तिला चेक केले ....आणी ती प्रेग्न्ट असल्याची बातमी दिली .....तिच्या आणखी काही टेस्ट करायच्या म्हणून तिला नर्स बरोबर लॅब मध्ये पाठवून् दिले ....
विश्वास रावांना केबिन मध्ये बोलवून ...डॉक्टर रेवती म्हणाल्या ..... हे बघा विश्वास राव .....मला माहीत आहे ....हे मूल जन्मानंतर रिया कडे राहणार नाही ....रिया ह्या बाळाची सरोगेट आई आहे .....पण रियाची खूप काळजी घ्यावी लागेल .........कारण तिच्या प्रेग्नन्सी मध्ये कॉम्बिलिकेशन दाखवतात .....
डॉक्टर ....पण प्रेग्नन्सी च्या आधी तुम्ही तिच्या काही टेस्ट केल्या होत्या ....तिची बॉडी ह्या बाळाला जन्म देण्यासाठी योग्य आहे ..अस तुम्हीच सांगितलं म्हणून च आपण इतर मुलीं मधून आपण रिया ला ह्या बाळाला जन्म देण्यासाठी निवडलं ....
हो .....बरोबर आहे ...विश्वासराव तुमचं ....पण काही गोष्टी प्रेग्नन्सी आधीच्या टेस्ट मध्ये नाही कळत .... ...माझ्या अनुभवा नुसार रिया ने जर व्यवस्तिथ काळजी नाही घेतली ...तर बाळा तर काही होणार नाही ...पण रिया च्या जीवाला मात्र धोखा असू शकतो ...कारण रियाच्या पोटात एक नाही तर दोन बाळ आहेत ....खर काय ते ? तर पुढ्याछ्य रिपॉट आणी सोनोग्राफी मध्ये कळेलच ....
डॉक्टर ...तुम्ही हे काय सांगताय ? मला हे मॅडम च्या कानावर घालव लागेल......पण हे मूल् कोणाचं आहे ?म्हणजे ह्याचे खरे आई बाबा कोण असणार ? हे रिया ला कळता कामा नये ....मडम ची तशी ऑर्डर आहे .....
हो .....मला माहीत आहे ...आणी तस ही अहमी सरोगसी मध्ये .... अहमी ही सगळी माहिती गोपनीयच ठेवतो .....सो .....चिंता नसावी ..... एवढं बोलून डॉक्टर आणी विश्वासराव थांबले ....
थोडयावेळाने ....विश्वासरवनि रिया च्या पुढे काही कागदपत्रे पुढे केली ......आणी त्याच्यावर सह्या करायला सांगितल्या ....रिया नी सगळं वाचून ...सहया केल्या ....विश्वास रावणी पैशाची बॅग तिच्या पुढे केली ...रिया नी ही जड अंतःकरणी घेतले ...तिला गरज होती त्या पैशाची ...... विश्वास रावणी तिला काही सूचना देऊन ...नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हयला सांगितलं ....तिथे राहून च तिला प्रेग्ननसाय ची काही महिने काढावी लागतील अस सांगितलं .....रिया ने मान डोलावुन् होकार दिला ....
विश्वास रावणी रिया ला रिक्शा जवळ सोडले ....रिक्षा पकडून रिया घरी निघाली ....