आपली पोळी भाजून नये म्हणजे झालं?
हा तमाम हिंदुस्थान व या हिंदुस्थानात त्या काळात गुण्यागोविंदाने राहात असलेली प्रजा. गावात कोणताच विटाळ नव्हता. सर्व मंडळी कोणत्याही प्रकारची कुरकूर न करता अगदी एकोप्याने राहात असत. परंतु त्या गावाला कोणाची तरी दृष्ट नजर लागली व गावातील अखंडता आणि एकता तुटली. जेव्हा अखंड हिंदुस्थानात असलेल्या इतर राजेरजवाड्यावर विदेशी आक्रमण काऱ्यांनी आक्रमणं केलीत तर राजासह इतर समाजाला गुलाम बनवलं.
तत्कालीन काळात अखंड हिंदुस्थानात बारा बलुतेदार पद्धती होती. ज्यात बरीचशी मंडळी गावातील कामं गावातच उरकवीत असत. त्यातच गावात असलेली ही मंडळी गावाचा राज्यकारभार करीत असे. ज्यात राजा वा गावप्रमुख कोणत्याही जातीच्या शुरवीर व्यक्तीला बनवलं जात असे. जो गावाचे रक्षण करु शकत असे.
गावात जशा कुणबी, तेली वा इतर जाती होत्या. तशाच चांभार, मांग, खाटीक, मेहतर व गोड गोवारी याही जाती होत्या. गावातील बारा बलुतेदारांपैकी कुणबी हे अन्न पिकविण्याचं काम करीत. अर्थातच गहू व तांदूळ पिकवीत असत. माळी भाजीपाला पिकवीत असत. ते तेवढे शुरवीर नव्हतेच. बाकीच्या तत्सम जाती गावात इतर कामं करीत नव्हते नमस्कार तेही शुरवीर नव्हतेच. परंतु चांभार, मांग, मेहतर व खाटीक तसेच गोंड गोवारी या शुरवीर जाती होत्या. त्या गावाचं रक्षण करीत. तसेच गावप्रमुखही याच जातीमधून बनायचे वा राजेही याच जातीमधून कोणी एक बनायचे. जे गावाचं रक्षण करायचे. तसं पाहिल्यास संगीताची निर्मीती झाल्यापासून मांग लोकं संगीत वाजवून हिंस्र प्राण्यांपासून गावाचं रक्षण करीत.
त्यावेळेस गावाला लगतच भरपूर जंगल होतं व त्या जंगलात हिंस्र प्राणी राहात. ते कधीकधी गावात येत व गावातील गुरं ढोरे नेत. जे नेवून नये म्हणून सातत्यानं महार, मांग, चांभार खाटीक, गोड गोवारी हे सक्त पहारा देत व त्यांना हुसकावून लावत. पुढं लोकसंख्या वाढली व गावाची शहरं झाली. तसं राज्यही. ज्या राज्याचा राजा हा कधी चांभार तर कधी इतर समाजातील असायचा. ज्याला आज आपण अस्पृश्य वा आदिवासी संबोधतो.
राजपद हे अतिशय जबाबदारीचं पद असायचं. ते पद मुख्यतः चांभार ही जात स्विकारायची. त्यानंतर इतर साऱ्या सुरक्षेच्या व्यवस्था या महार, मांग, खाटीक व मेहतरांकडे असायच्या. जसे किल्लेदार पद. कोतवाल पद. राज्यात जेव्हा यज्ञ व्हायचे. त्यात पशुबळी खाटीक समाज द्यायचा.
हाच मुळचा शुरवीर असलेला समाज. ज्याला आज अस्पृश्य म्हटलं जातं. तो अस्पृश्य झालाच कसा व त्यांना अस्पृश्य का ठरवलं गेलं? हा एक संभ्रमाचा प्रश्न आहे. लोकं त्याला वेगवेगळी कारणं सांगतात. परंतु त्याचं एक वेगळच आणि महत्वपुर्ण कारण आहे. ते म्हणजे त्यांच्यात असलेलं शौर्य. तत्कालीन काळात हिंदुस्थानात आलेल्या विदेशी आक्रमणकाऱ्यांनी येथील राजांवर आक्रमण केलं. त्यात ते जिंकले व विजय मिळवताच त्यांच्या सेनेवरही विजय मिळवला व त्यांना गुलाम केले. ज्यात राजासोबतच लढणाऱ्या सैनिकांनाही गुलाम केलं. ज्या सैनिकात मातंग, महार, चांभार व खाटिक या अनुसूचीत जाती व आदिवासीसारख्या अनुसूचीत जमातीही होत्या. अशा विदेशी आक्रमणकाऱ्यांनी शुरवीर असलेल्या या जातीतील सैनिकांना व येथील राजांना गुलाम बनवताच त्यांच्या कर्तबगारीनुसार सैन्यात मानाच्या जागा दिल्या नाहीत. कारण या अस्पृश्य जाती ह्या जशा शुरवीर होत्या. तशाच त्या अतिशय इमानदारही. त्या इमानदार असल्यानं त्यांनी विदेशी आक्रमणकारी राजाचं मांडलिकत्व पत्करलं नाही. काहींनी मरण पत्करलं. त्यानंतर विदेशी आक्रमणकारी अशा लोकांवर अत्याचार करीत असत. त्यांना जबरदस्तीनं कोणत्याही जनावरांचं मांस चारत असत. शिवाय घरातील कोणतीही हलक्या दर्जाची कामं करायला लावत असत. हा अत्याचारच होता. जे मांस काही लोकांना आवडत नसे. तशीच ती हलक्या दर्जाची कामंही काही लोकांना आवडत नसत. ज्यातून काही लोकं पळून जंगलात गेले. ते अज्ञात स्वरुपात राहिले. त्यांनी आपली ओळख दाखवली नाही. तेच आदिवासी आहेत की जे मुळचे शुरवीर होते. तसंच काही लोकांनी जंगलात पळून जाणं पत्करलं नाही तर त्यांनी ती हिन दर्जाची कामं करणं पत्करलीत. मग मांगांनी तागापासून दोरखंड बनवणं, झाडू बनवणं नव्हे तर बाळंतपणं करणं पत्करलं. बाळंतपणात विटाळ माणणाऱ्या आणि मरणातही विटाळ माणणाऱ्या लोकांच्या सोबत राहून वाजा वाजवणं. त्यांच्या विटाळलेल्या वस्तू स्विकारणं. शिवाय सूर्यग्रहण व चंद्रग्रहणात त्यांची सावली अन्नावर पडल्यानं अन्न विषारी झालं असे समजणारा समाज वा कपड्यावर त्याचा परिणाम झाला असे समजणारा समाज मांगांना अन्न, व कपड्याचं दान देत असे. तेही त्यांनी स्विकारणं सुरु केलं. कारण त्या विदेशी आक्रमणकारांच्या गुलामीत ना अन्न मिळायचं, ना कपडे. मग ते स्विकारणारच.
चांभारांनी चामड्यांचं काम करणं सुरु केलं. ते चपला शिवायचे. शिवाय विदेशी आकामणकर्त्या लोकांच्या घरची गाय मरण पावल्यास ती गाय ओढत नेवून फेकण्याचेही काम चांभार करीत असे. जो एक प्रकारचा शुरवीर समाज होता. तसा खाटीक समाज हा पुर्वी यज्ञात पशुबळी द्यायचा. ते हिन दर्जाचं काम नव्हतं पुर्वी. परंतु विदेशी आक्रमणकारांच्या गुलामीच्या काळात या समाजानं मांस कापण्याचा व्यवसाय पत्करला. तेही हिन दर्जाचं काम म्हणून गणल्या गेलं. तर मेहतर नावाच्या शुरवीर जातीनं त्या विदेशी आक्रमणकारांच्या राज्यातील मैला साफ करण्याचे काम करणे सुरु केले. त्यानंतर उरलेला महार समाज, जो एक प्रकारचा शुरवीरच होता. त्या समाजाला जाणूनबुजून हिन समजून आपली इतर प्रकारची कामं करुन घेतली. जी सेवेचीच होती. त्या सेवा करवून घेत असतांना विटाळ होत नसे. परंतु हिन दर्जाची कामं करतांना शरम नव्हती तथाकथीत समाजाला तर त्यात एक स्वाभीमान होता.
आज तोच कालचा स्वाभीमानी आणि इमानदार असलेला व राजा किंवा राजपदं भोगलेला समाज. त्या समाजानं काल विदेशी आक्रमणकारी लोकांच्या काळात गुलाम होवून यातना भोगल्यात. परंतु धीर सोडला नाही. त्याचं कारण होतं त्या बिरादरीतील लोकांचं विचार करणं. वाटत होतं की आपल्याही पिढीसाठी स्वातंत्र्याचा काळ येईल व त्यांनाही सन्मानानं जगता येईल.
आज तो काळ आला आहे. परंतु चांभार, मांग, मेहतर नव्हे तर खाटीक यासारख्या तत्सम अस्पृश्य जातींना सन्मानानं जगता येत आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. शिवाय कालच्या विदेशी आक्रमणकारी समाजानं काल जरी अत्याचार केला असला या मुळ स्वरुपात राजपद भोगलेल्या व आज गणल्या जाणाऱ्या अस्पृश्य समाजावर. परंतु तो समाज आज सुधारला आहे. तो या समाजावर अत्याचार करीत नाही. मग अत्याचार कोण करतो? अत्याचार तो समाज करीत आहे. ज्या समाजाला काल विदेशी आक्रमण कर्त्या राज्यांच्या राजेशाहीत काही घेणं देणं नव्हतं. जो समाज फक्त त्यांच्या हो ला हो मिरवीत होता. जो त्या लोकांशी गोडगोड बोलत होता. म्हणत होता की आपण राज्य करा. आम्हाला काही घेणं देणं नाही. हं, आम्ही जेही कमवतो. ते काल येथे राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना देत होतो. आज तुम्हाला देणार. फक्त तुम्ही आमचं रक्षण करा म्हणजे झालं. याचाच अर्थ असा की आज जो समाज अस्पृश्य, आदिवासी यांच्यावर अत्याचार करतो. त्याच समाजानं काल विदेशी आक्रमणकारी राजेशाहीला पोषलं. त्यांना इथं राहण्यास खतपाणी घातलं. नव्हे तर आपली पोळी भाजून घेतली. ज्याला अतिशय मतलबी लोकं म्हणता येईल. त्यांना गतकाळातील ज्याही राजांनी त्यांचं हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण केलं. त्याबाबत काही घेणं देणं नव्हतं. त्यानंतर विदेशी आक्रमणकारी लोकांच्या हस्ते ते गुलाम झाले व त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार झाले. त्याचंही त्यांना काही घेणंदेणं नव्हतं. अन् आजही त्यांना काही घेणंदेणं नाही. ते काल जसे वागले. तसेच आज वागायला पाहात आहेत. शिवाय आजच्या काळात ह्याच आदिवासी लोकांना वा अस्पृश्यांना वर येण्यासाठी ज्या लाभाच्या आरक्षणरुपी सवलती मिळत आहेत. त्या सवलतीचा ते विरोध करीत आहेत. थोडासाही त्यांना विचार नाही की काल याच आदिवासी बांधवानं व अस्पृश्य बांधवानं आपल्या बिरादरीतील लोकांचं हिंस्र श्वापदापासून रक्षण केलं व तसंच रक्षण करता करता विदेशी आक्रमण झालं. ज्यात ते गुलाम झाले व त्यांच्यावर अत्याचार झाला. ते आमचेच बांधव आहेत की ज्यांनी अनन्वीत यातना भोगल्या. आज त्यांना जे मिळत आहे. त्याबद्दल आपल्याला आनंद व्हायला हवा. परंतु आज तसं चित्रच दिसत नाही. केवळ त्यावरही जळफळाट होत आहे.
महत्वपुर्ण बाब ही की काल गावात जे बलुतेदार व अनुतेदार तयार झालेत. ते गावाच्या भल्यासाठीच होते. त्यापैकी काही जाती या गावाचे संरक्षण करीत होत्या सर्व प्रकारच्या गोष्टींपासून. मग त्यात विदेशी आक्रमणाचाही समावेश आहे. आता आपण निर्माण केलेल्या त्याच बांधवांना विदेशी आक्रमणकारी लोकांनी गुलाम केलं. यात मुळच्या गोंड, गोवारी, चांभार, मांग, खाटीक, मेहतर वा इतर तत्सम जातींची चूक नव्हती. त्याचा विरोध करणं ही आपली चूक होती. तरीही त्यांना मदत न करता तथाकथीत लोकांनी विदेशी व इथे स्थिरावलेल्या लोकांना मदत केली. हा स्वार्थ होता. तरीही गुलाम झालेल्या इतर समाजानं त्यांच्या वागण्यावरही त्यांना काहीही म्हटलं नाही. कोणतेच ताशेरे ओढले नाही. मात्र आज म्हणण्याची गरज आहे. कारण आज समाज स्वतंत्र झाला असून कोणत्याही विदेशी शक्तीचा आज तै गुलाम राहिलेला नाही. तेव्हा काल अस्पृश्य व आदिवासी समजणाऱ्या आजच्या या लोकांना स्वतःचे उत्थान करण्यासाठी ज्याही सोयीसवलती मिळत आहेत. त्यावर कुरकूर करण्याची गरज नसावी. अन् कुरकूर करुही नये. शिवाय त्यांना मदतच करावी. जसं गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्याच बिरादरीनं काल निर्माण केलं व अनुतेदारात आणि बलुतेदारात त्या जातींचा समावेश केला. तसं आज आपला देश स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण अनुतेदार व बलुतेदार यांच्यातीलच या जातीच्या सामाजिक उत्थानासाठी सर्वतोपरी मदत करावी. बळ द्यावं. कुरकूर करु नये. तसंच आपली पोळी भाजू नये. कारण आज आपण विदेशी आक्रमणकारी लोकांचे गुलाम नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०