Niyati - 1 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 1

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 1


भाग १



शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते त्याप्रमाणे हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.



हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.
कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले. 



प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.




हे सर्व कार्यक्रम सुरू असताना टाळ्यांच्या कडकडाटाने अधून मधून हॉल पूर्णपणे भरून जात होता... गुणगौरव समारंभामध्ये सुरुवातीला सुंदरसे नृत्य सादर करण्यात आले.


नृत्य सादर करणारी ती... तिला पाहून तो बेभान झाला होता. अगदी समोरच्या खुर्च्यांच्या आडव्या रांगेमध्ये बसलेला तो... मन लावून डोळ्यांची पापणी बंद न करता अगदी तन्मयतेने नृत्याच्या एक एक छटा निरखून बघत होता.



जणू त्याने दोन डोळे बंद करावे आणि त्याच्याने काहीतरी अनमोल असे पाहणे राहून जावे.. एकतारी नजरेने बघत होता तो.
डान्स करताना तिने तिच्या डोळ्यातील... ते सुंदर भाव दर्शवले असे की त्याच्या मनात झटकन शायरी तयार झाली.. त्याच्या.....

"तुम्हारी कत्थई ,अखियां दिखे यूं मासूमसी,
काजल क्यों भरा उनमें , दिखे यूंही खूबसूरतसी"


तिने परिधान केलेला तो सुंदर सा व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस.... त्यामध्ये... ती एवढी सुंदर दिसत होती.. फिटिंग सुद्धा इतका व्यवस्थित होता त्याचा की....
की एक एक अवयव देहाचा उठून दिसत होता. 


आणि तेवढ्यात डान्स करता करता तिने एक अशी छानशी गिरकी घेतली. गिरकी घेण्यासरशी तिच्या पायातले घुंगरांनी सुद्धा एक वेगळाच वातावरणात झंकार घूमविला..... तिथे स्टेजवर... आणि इकडे याचे हृदय जोरजोराने धडधडू लागले... हृदयाची धडधड एवढी फास्ट झाली की बाहेरपर्यंत त्याची त्यालाच ऐकू येऊ लागली. तर त्याने घाबरून आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघितले... "यांना तर ऐकू जात नाही आहे माझ्या हृदयाची धडधड....
तर त्याला दोन्ही बाजूंचे त्याचे जे कॉलेजचे मित्र होते.


ते त्याचे सर्व मित्र समोर तल्लीनेतेने त्याच्यासारखेच पाहताना दिसले.
हे बघून त्याला किंचितसा राग आला. की तिच्याकडे बघण्याचा माझा अधिकार आहे फक्त.आणखी कोणी का म्हणून एवढं तरी तिचं निरीक्षण करावं...


वैतागलेल्या मनाने पुन्हा तो स्टेजवर बघू लागला. विचार करू लागला हिला तरी कळत नाही का..?? कशाला एवढं सजून स्टेजवर येऊन स्वागत समारंभाचे डान्स करायचे..
आणि हे कॉलेजमध्ये सुद्धा नेमके हिलाच डान्स करायला फोर्स करतात. आणि ही पण ....काही नाही आणि...एका पायावर तयार होते डान्स करायला...


विचार करत करत त्याने पुन्हा स्टेज कडे लक्ष केले. तर त्याला तिचीही नजर त्याच्याकडे असलेली जाणवली.
आता तिच्या नजरेत किंचित याला एक वेगळी भावना जाणवली.....
जणू तिला सांगावे वाटत होते की हा डान्स मी फक्त आणि फक्त तुझ्याकरिता करीत आहे... एक वेगळीच चमक होती तिच्या नजरेत.

आणि आता तिने पुन्हा घुंगरांच्या पायांची एक घुमावदार गिरकी घेतली सुंदरशी..
आणि पुन्हा याची धडधड वाढली इकडे... आपोआप त्याचा उजवा हात हृदयावर हळूच त्याने ठेवला...
आणि मुखातून त्याने हळूच उसासा सोडला.
मन बोलू लागले....

"छम छम करती तेरी पायल मनवा यूं नाचे मोर,
हर एक अदा पर मैं हूं फिदा यह घुंघरू करें कहर"

जशी ती डान्स करताना गिरकी घेत होती तसाच अगदी .....तिचा तो व्हाईट अनारकली ड्रेसचा घेरही .....वळणावर अलवार अशा जुळवून तसाच गिरकी घेत होता .......फुलारलेली वळणदार गिरकी....

स्टेज वरील जेवढे पण मान्यवर मंडळी आणि सर्व प्राध्यापक सुद्धा एकटक नृत्याकडे बघत होते तिच्या.
तर त्याला हे सर्व बघून असे वाटत होते की जवळ जावे आणि तिच्या डोळ्यांतील किनारीची अलगद बोटांनी काजळ घेऊन कानामागे लावावी जेणेकरून एवढ्या गर्दीने बघणाऱ्यांपैकी कोणाचीही नजर तिला लागू नये.

अचानक त्याचे लक्ष गेले की तिच्या अनारकलीचा मागील गळा जास्तच डीप होता.. आणि त्यामुळे त्याला पाठीवर सुंदर असे गोंडे असणारे दोन कसे होते बांधलेले...

ते आकर्षक दोन गोंडे तिच्या खुल्या गळ्याच्या मोकळ्या पाठीवर डान्सच्या तालामध्येच बहरून आनंदाने तेही तिथे नाचत होते.... मुलायम स्पर्श तिचा त्यांना आनंदित करत होता जणू.

त्याला त्या गोंड्यांचा खूप खूप हेवा वाटला आता...
मनात विचार करू लागला....
"तसे तर ते तिच्या पाठीवर खूप आकर्षक दिसत आहेत.
नाही ...नाही... तिच्या गोऱ्या पाठीमुळे ते गोंडे सुंदर दिसत आहे...."

सुंदर चार ओळीही मनावर तरंगल्या.....

"मुलायम तुझा स्पर्श इतका,
स्वप्नातही मला वेडावतो असा,
तू नाजूक गुलाब पाकळ्यां इतकी,
सुगंधाने तुझ्या मी बेधुंद जसा."


स्टेज वरील तिचा डान्स आता शेवटच्या टप्प्यात आला होता. बासरीची धून सुरू होती तशी तिने डान्स करताना अलगद बासरी धरली जणू तीनेच त्यातून धून छेडले असावी....
आहाहा!!!  तृप्त झाले होते कान आणि डोळे त्याचे... 
ती सुंदर धुन ऐकून .....तेही नयनमनोहरी त्या तिच्या डान्स सोबत...
अंग अंग रोमांचित झालं त्याचं... शहारा आला अंगावर अगदी...


आता त्याला आठवलं की...... त्याने जवळ घेतल्यावर नेहमी ती म्हणत असते की... "जेव्हा जेव्हा तू जवळ घेतोस मला तेव्हा तेव्हा माझ्या पोटात फुलपाखरू उडायला लागतात खूप खूप."

आता त्याला तिच्या म्हणण्याचा प्रत्यय येत होता.
आणि त्याला जाणवले ...खरंच पोटात फुलपाखरे उडणे काय असते ते....??
आणि त्याचे गाल कधी नव्हे ते ब्लश करायला लागले...


तशी त्याने एक नजर तिच्याकडे बघून मग खाली बघून एकदा पुन्हा तिच्याकडे नजर फिरवली.....
ओठांवरच्या दाट त्या रावडी मिशी मध्ये तो मंद स्मित करत बघत होता आता स्टेजकडे.

आणि तिचे नृत्य तिने एक गिरकी घेऊन थांबवले.
सर्वांना समोर कंबरेतून वाकून तिने अभिवादन केले. आणि अगदी समोर असलेल्या त्याच्या नजरेत आपली खट्याळ नजर फेकली.....

तिची ही अशी डायरेक्ट खट्याळ नजर त्याच्याकडे जाताच
तो कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला ...भासवत होता की तो मित्रांबरोबर बोलतोय..

मंद स्मित करत ती स्टेजवरून मागच्या भागाने पडद्याआड निघून गेली.
आणि आता संचालन करणाऱ्या त्या दोन्ही विद्यार्थिनींनी गुणवंत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

या कौतुक सोहळ्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्स ची नावे होती.
नुकताच बीएससी च्या एग्रीकल्चर शाखेच्या फायनल इयर्स चा रिझल्ट लागलेला होता.
इतरही शाखेचे रिझल्ट्स आलेले होते. पण गुणवंत विद्यार्थी सोहळा एकाच वेळी... सर्व शाखांचा घ्यायचा असल्यामुळे ....आतापर्यंत एकही शाखांचा हा सोहळा झालेला नव्हता कारण सर्वात शेवटी बीएससी एग्रीकल्चर चा रिझल्ट आलेला होता.

एका एका विद्यार्थ्यांचे जे अव्वल आलेले होते त्यांच्या कौतुक समारंभ सुरू होता ...शाल श्रीफळ डिग्री देणे सुरू होते.

परंतु सर्वात अधिक कौतुक झालेले असेल आज तर ते एकाच विद्यार्थ्याचे.
अगदी सर्वांना 440 वोल्टचा धक्का बसला..
हो हो अगदी बरोबर.... धक्काच बसला सर्व विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण कॉलेज ला.
ही ही चार्जिंग बॅटरी... एवढे यश संपादन करतो यावर अद्यापही कोणाचा विश्वास बसत नव्हता.
"काहीतरी नक्कीच झोलमाल आहे राव...!!!"
साशंक नजरेने सर्व त्याच्याकडे पाहून विचार करत होते.

जसे त्याचे नाव घेतले स्टेजवर तसे तो स्टेजवर जाण्यास उभा झाला.


"मोहित कवडू साठे"
गोल्ड मेडलिस्ट ऑफ बीएससी एग्रीकल्चर इन नागपूर युनिव्हर्सिटी 

सर्वसाधारण दिसायला आणि अंगकाठीने असा तो.
मात्र खेडेगावातला असल्यामुळे रांगडेपणा होता अंगी.
त्याच्या चेहऱ्यावर मीशा अगदी पिळदार असायच्या.
रांगडेपणा होता अंगी पण तो फक्त त्याच्या गाव खेड्यात.
शहरात मात्र अगदी त्याला बुजरेपण यायचे...

मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.

अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात आणि  हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.



सर्वांग घामाने डबडबले त्याचे...
फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.
कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.
शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...
उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.


तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले...
"तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..
सो... मिस्टर मोहित....!!!"
आणि हे ऐकूनच त्याचे पाय... 
त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...😨🙀
आणि...... 

.......
🌷🌷🌷🌷🌷