Balatkaar - 1 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बलात्कार - भाग 1

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 70

    નિતુ માટે જન્મેલ નવીનનું નાનકડું આકર્ષણ દિવસેને દિવસે પ્રબળ...

  • દાદા ભિષ્મ

    પૌરાણિક દ્રષ્ટાંત કથા –                      પિતામહ ભીષ્મની...

  • અધુરો પ્રેમ

    જિગ્નાસુ ખુબ જ સરળ અને શાંત છોકરી.... પરીવાર મા વડિલ અને નાન...

  • વહુના આંસુ

    સવીતા રસોડામાં રસોઈ કરતી હોય છે,  ત્યાં જ છાંયા બહેન જોરથી ચ...

  • ભાગવત રહસ્ય - 164

    ભાગવત રહસ્ય-૧૬૪   પિતાજી નામદેવને કહે છે- કે “સવારે વહેલા જા...

Categories
Share

बलात्कार - भाग 1

बलात्कार या पुस्तकाविषयी 
          बलात्कार ही समाजजीवनाला लागलेली कीडच. या किडीचा प्रादुर्भाव होवून समाज पोखरत जात असतो. मग सर्वत्र या किडीबद्दल भयावह वातावरण निर्माण होवू शकतं. मग त्या शाळा असो, घर असो वा एखादं सार्वजनीक कार्यालय. तसं पाहिल्यास आज जुई, स्थळी पाताळीही बलात्कार वाढलेले आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. 
         बलात्कार ही माझी नव्यान्नववी पुस्तक. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा विचार बऱ्याच दिवसांपासून होता. परंतु याचं शिर्षक हे थोडं वेगळ्याच अर्थाचं असल्यानं व ते साजेसं वाटत नसल्यानं ही पुस्तक मी काही काळ थांबवली. तसं दुसरं शिर्षक द्यायचा विचार केला. परंतु ते मला बरोबर वाटलं नाही. कारण त्या शिर्षकातून या पुस्तकाचा मूळ गाभाच लोकांना समजला नसता व ती पुस्तक वाचनीय झाली नसती. जशी माझी वेदना पुस्तक. 
          वेदना माझी पहिली कादंबरी. ती कादंबरी वारांगना जीवनावर प्रकाश टाकणारी असून तिचा भावार्थ अगदी दमदार आहे. परंतु तिला शिर्षक वेदना दिल्यानं नेमकं त्या पुस्तकात काय आहे हे सरासरी शिर्षकावरुन वाचकांना समजत नाही. तेच बलात्कार नावाच्या कादंबरीचं होवू नये. हाच त्या कादंबरीचं शिर्षक ठेवण्यावरुन संभ्रम. 
         या कादंबरीचा मुळ विषयच बलात्कार असून याची प्रेरणा कलकत्त्यातील नोमिता प्रकरणावरुन घेतली. पुढं बदलापूरचं प्रकरण घडलं व कादंबरीला एक नवं वळण मिळालं. ज्यातून कादंबरीची कथा साकार झाली. या कथेत सुनीता व रिता अशी दोन पात्र आहेत. त्या सख्ख्या दोन बहिणी आहेत आणि त्यांचा या कादंबरीत संघर्ष दाखवला आहे. आता तो संघर्ष कोणता आहे? कोणता नाही? हे पाहण्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे. 
         महत्वाचं सांगायचं झाल्यास कादंबरीचं शिर्षक जरी बलात्कार असलं तरी यातील लिहिण्याची भाषाशैली ही बलात्कारी स्वरुपाची नाही. तिला साहित्यीक वळण दिलं आहे की त्या पुस्तकाला कोणीही वाचू शकेल. मात्र ती पुस्तक आपणाला कशी काय वाटली. ते सांगण्यासाठी ती पुस्तक वाचल्यावर आपण मला एक फोन करुन कळवावं ही विनंती.

               आपला नम्र 
         अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

बलात्कार (कादंबरी)
            अंकुश शिंगाडे 
    
          सुनिता तिचं नाव होतं. तिचं सौंदर्य मुळात सुर्याला लाजवेल असंच अप्रतिम होतं. ती गावात राहणारी एक मुलगी होती व ती मुलगी गावातील एका अस्पृश्याची मुलगी होती. 
           सुनिता गावातील एका अस्पृश्यांची मुलगी. ती लहानच होती. तिला भेदभाव म्हणजे काय? हेही समजत नव्हतं. बलात्कार तर अजिबातच समजत नव्हता.  
           ते तिचं बालवय. त्या बालवयात तिच्याच नात्यातील एका मुलीवर बलात्कार झाला होता. जी तिचीच बहीण होती. त्यातच तिला त्या गावातीलच नराधमानं मारुन गावातल्याच एका नाल्यात फेकून दिलं होतं. घटना अगदी सुनियोजित पद्धतीनं झाली होती. ज्यात चेहर्‍यावर ॲसिड फवारणी झाली होती. त्यातच तो बलात्कार कोणं केला हेही माहीत झालं नव्हतं. 
            गावातील ती एक मुलगी. जी बलात्कार पिडीता होती. ज्या मुलीवर बलात्कार करुन तिला मारुन नाल्यात टाकलेलं. सुनितानं ती घटना अगदी जवळून पाहिली होती. परंतु बलात्कार म्हणजे काय हे तिलाही समजेनासी अशी गोष्ट होती. 
         ती तिची बहीण. उर्मिला तिचं नाव होतं व ती जास्त वयाची नव्हती. ती चारच वर्षाची होती. तिचे मायबाप गरीब होते. तिचे मायबाप गरीब असल्यानं ते मायबाप गावातील शेतीच्या कामाला जात असत. ज्या शेतात ते रोजमजूरी करीत. 
           उर्मिलाला दोन बहिणीही होत्या. रिता व सुनीता. त्या अल्पशिक्षीत होत्या व त्या घरच्या विश्वकोटीच्या दारिद्र्यानं मायबापासोबत कामाला जात असत. उरत असे उर्मिला. ती मात्र घरी राहात असे. तशी ती शाळेत जात असे. 
           आज उर्मिला शाळेत गेली नव्हती. ती घरीच होती. तिला आज थोडसं बरं नव्हतं. त्यामुळंच ती घरीच होती. तसं तिच्याकडं पुरेसं लक्ष न देता तिचे मायबाप कामावर गेले होते. त्याचं कारण होतं हंगाम. शेतीचा हंगाम सुरु होता व पीक येणाऱ्या पावसानं करपू नये, म्हणून सारेजण शेतावर कामाला जात असत. वाटत असे की दोन पैसे येतील व ते पैसे घरखर्चाच्या कामात येतील. कारण हे शेतीतील कामधंदे दोनचार दिवसच चालत असत. बाकी दिवस सर्वांना सवड मिळायची. कारण कामंच मिळत नसे. बाराही महिने सर्व शेतमजूर वेठबिगार म्हणून बसलेले असत.
            दुपार झाली होती व गावातीलच एका माथेफिरुची वासनेची नजर पाच वर्ष वय असलेल्या उर्मिलावर पडली. त्यानं तिला चॉकलेटची गोडी दाखवली व म्हटलं की तिला तो चॉकलेट देणार. तिनं त्याचं एक महत्वाचं काम करावं. 
          उर्मिला ही अबोध होती. तिला त्याच्या हरामीपणाची कल्पना नव्हती. त्यातच त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उर्मिलानं होकार दिला. तसा तो म्हणाला, 
           "चल, म्या काम सांगतो."
           त्याचं ते बोलणं. तसं त्याच्याही घरी कोणीच नव्हतं. तीच संधी पाहून त्यानं,त्या चार वर्षाच्या बालिकेला घरी नेलं. ती घरात आली. तसा त्यानं घराचा दरवाजा लावला. तशी ती घाबरली. म्हणाली, 
          "दादा, काय करते?"
          "काय नाय. म्या तुले एक काम सांगते."
            "पण दादा, असा दरवाजा लावून?" तिचा तो प्रश्न. तसा तो म्हणाला,
            "होय. हे काम दरवाजा लावूनच करा लागते. मजा येते."
            "सांग दादा मंग लवकर तुह्यं काम. अन् मंग मले चॉकलेट देत." 
            ती अडाणीपणा बोलून गेली. तसं तिला काहीच माहीत नव्हतं की तो काय गुल चारणार आहे. तसा थोड्या वेळाचा अवकाश. त्यानं दरवाजाला कुलूप लावलं. तशी उर्मिला अधिकच घाबरली. तिला आता करून चुकलं की ज्याला ती दादा म्हणत आहे. तो तिच्यासोबत काहीतरी नक्कीच करणार आहे. तशी ती म्हणाली,
           "दादा, हे काय, तू तं ताला लावला दाराले."
           "हो. ते काम कुलूप लावून करा लागते. "
            त्याचं ते बोलणं. तसा तिनं त्याचेवर विश्वास ठेवला व ती चूप बसली. परंतु तो चूप बसला नाही. त्यानं आपले कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली. 
           त्यानं जबरदस्तीनं तिला आपल्या बाहूपाशात घेतले. तशी ती बालवयात असलेली मुलगी घाबरली. तिला आता स्पष्टपणे समजलं की तो आता तिच्यासोबत काहीतरी विपरीत करणार आहे. तोच ती ओरडली.
            तिचा तो ओरडण्याचा आवाज. तसा तो आवाज त्या नराधमानं ऐकला. त्यानं त्यानं तिला पकडलं. तशी ती प्रतिकार करु लागली त्याचा. परंतु तो ऐकेल तेव्हा ना. तशी तिची ताकद त्या नराधमासमोर किती पुरणार. त्यानं तिला घट्ट पकडलं. तसं त्यानं तिचं तोंड दाबलं. तिला ओरडता येवू नये म्हणून. त्यानंतर त्यानं एका पायानं तिचं तोंड दाबलं. तसं ते इथलं जीव पुन्हा त्याचा प्रतिकार करु लागली. तोच त्यानं एका हातानं तिचे दोन्ही हात पकडले व दुसर्‍याच हातानं त्यानं तिला गालावर मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो म्हणाला, 
           "चूप बैस. नायतं म्या तुह्या जीवच घेवून टाकीन."
           त्यानं तिला शुद्ध धमकी दिली होती. ते पाहून तिला वाटलं की त्याच्या धमकी देण्यानुसार तो तिचा जीवच घेईल. शेवटी जीव वाचेल तर सगळं करता येईल. परंतु तिला काय माहीत होते की तो हैवानियत वासनांध व्यक्ती, त्याची हौस पुर्ण होताच तिला मारुनही टाकेल.
           उर्मिला त्याची धमकी ऐकून चूप बसली होती. त्यानंतर त्यानं तिचे दोन्ही हात बांधून टाकले. पायही बांधले. त्यानंतर त्यानं तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावून घेतली. मग काय, त्यानंतर त्यानं काय काय केलं. हे तिलाच माहीत होतं.
           तो नराधम. त्याची वासनांध नजर. ती कुदृष्टी त्या निरागस व लाचार हरणीवर पडताच तिच्या शरीराचा दाह दाह झाला. ती तडपू लागली होती. ओरडू पाहात होती. परंतु तिला ओरडता येणंही शक्य नव्हतं. ती पडू पाहात होती. परंतु तिला पळणंही शक्य नव्हतं. एकतर तिचे पायही बांधलेले होते. व्यतिरीक्त त्यानं दाराला कुलूपही लावलेलं होतं. तसा काही वेळ गेला. 
           ती वेळ तिच्यासाठी कर्दनकाळ बनून आली होती. त्यातच ती काही वेळानंतर बेशुद्ध पडली. परंतु ती बेशुद्ध पडत असतांनाही वासनेनं लिप्त असलेल्या त्या नराधमाला काहीच समजलं नाही. शेवटी ती मरुन गेली. परंतु त्याची वासनातृप्ती झाली नव्हती. त्यानंतर बऱ्याच वेळानं,त्याची वासना तृप्ती झाली. तेव्हा तो शुद्धीवर आला. तेव्हा त्यानं पाहिलं की ज्या उर्मिलेवर त्यानं अत्याचार अर्थात बलात्कार केला होता. ती आता जगात नव्हती. ती तर केव्हाच या जगातून निघून गेली होती. त्यानंतर त्यानं तिचा श्वास तपासला. परंतु ती मरण पावल्यानंतर तिचा श्वास समजेनासा होता. 
           त्या नराधमाला आता जाणवलं की ती मरण पावलेली आहे. तेव्हा तो घाबरला. त्यानंतर त्यानं तिच्या त्या प्रेताची विल्हेवाट कशी लावता येईल याचा तो विचार करु लागला. 
          विचार करता करता त्याला जाणवलं की घराच्या थोड्या दूरच एक नाला असून त्या नाल्यात तिचं ते प्रेत टाकता येवू शकते. तोच विचार करुन त्यानं आपल्याच घराच्या अंगणात असलेल्या कारमध्ये ते प्रेत ठेवलं. त्यानंतर त्यानं कार काढली व तो भरधाव वेगाने आपली कार चालवू लागला. तसा काही वेळानं तो नाला आला. जिथं बेशरमचं झाड होतं. त्या बेशरमच्या झाडात त्यानं तिचं प्रेत टाकून दिलं ज्याला कोणीही पाहिलं नाही. त्यानंतर तो लागलीच परतीची वाट चालून गाडीजवळ आला. एक सुस्कारा सोडला व तो घरी आला.
           ती दुपारची वेळ निघून गेली होती. तशी सायंकाळ झाली होती व सायंकाळ होताच उर्मिलाचेही मायबाप घरी आले होते. त्याचबरोबर तिच्या त्या बहिणीही. तसं त्यांनी पाहिलं की ज्या उर्मिलेला त्यांनी घरी ठेवलं होतं. ती उर्मिला काही घरी नव्हती. त्यातच तिचे मायबाप घाबरले. त्यांनी तिचा गावात शोध घेतला. परंतु कोणीही तिला पाहिलं नसल्याचा निर्वाळा देत होते. त्यानंतर लागलीच कोणीतरी म्हणालं, 
          "आपण राव हिची तक्रार पोलिसात द्यावी."
           लागलीच ती न सापडल्यानं तिची तक्रार पोलिसात दिली व पोलिसांनी तिचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली व त्यानंतर तपास सुरु केला. तपासाअंती तिचं प्रेतही सापडेना होतं. तीच बाब हेरुन गावातीलच कोणीतरी म्हटलं की आपण राव सीबीआय चौकशी करण्याची मागणी करावी. 
         क्षणातच तो एका गावकऱ्यानं सांगीतलेला उपाय. उर्मिलाच्या आईवडीलानं उर्मिलाला शोधण्यासाठी सीबीआय ची मागणी केली. ती मागणी ताबडतोब मान्य झाली व उर्मिलाला न्याय मिळाला. परंतु तिचा जीव गेला त्याचं काय?
          सीबीआय पोलिसांनी श्वानाच्या मार्फत उर्मिलाचं प्रेत शोधून काढलं होतं. ते प्रेत त्या बेशरमच्या झाडाच्या मागं होतं. प्रेतावरचं मांस पुर्णतः कोल्ल्यांनी खावून टाकलं होतं. चेहराही स्पष्ट दिसत नव्हता. फक्त हाडांचा सापळा दिसत होता. 
          तो उर्मिलाच्या हाडाचा सापळा. सुरुवातीला तो सापळा कुणाचा असा संभ्रमच होता. कदाचीत तो उर्मिलाचाच असेल अशी आशंका व्यक्त केली गेली. कोणी म्हणत होते की तो सापळा उर्मिलाचाच आहे तर कोणी म्हणत होते की तो सापळा उर्मिलेचा राहूच शकत नाही. त्यावरुन वाद. शेवटी तिच्या त्या अस्थीपंजर सापळ्याला परीक्षणासाठी पाठवण्यात आलं. ज्यात हाडातील डी एन एक ची तपासणी झाली व समजलं की तो हाडाचा सापळा उर्मिलाचाच आहे. तपासाअंती तिच्यावर बलात्कार झाला व तिला मारुन टाकल्याचं निष्पन्न झालं होतं. 
         उर्मिलाचं गाव जंगलातीलच होतं. त्यातच गावकऱ्यांनी आणखी एक शंका व्यक्त केली होती की कदाचीत गावात एखादा जंगली प्राणी आला असेल व त्यानं उर्मिलाला नेलं असेल. परंतु जेव्हा प्रेत तपासणी झाली. तेव्हा सर्वांना माहीत झालं की उर्मिलावर बलात्कार झाला होता. त्यातच काही लोकांनी उर्मिलाच्या वडीलांची समजूत काढली. त्यानंतर त्या तक्रारीला वेग आला. परंतु कितीही पोलिसांनी तपास केला असला तरी आरोपी न सापडल्यानं केस बंद झाली. त्यानंतर उर्मिलाच्या शवाला न्याय मिळाला नाही. परंतु उर्मिलाची मोठी बहीण फारच हुशार होती. 
         उर्मिलाच्या मोठ्या बहिणीचं नाव रिता होतं. ती परिस्थितीवश शिकली नाही. परंतु तिला विधात्यानं चाणाक्ष बुद्धी दिली होती. ज्या बुद्धीच्या जोरावर ती दहावीपर्यंत शिकली होती. ती दहावीही पास झाली होती. परंतु परिस्थितीवश ती शिकू शकले नाही व तिनं आपलं शिक्षण पुर्ण केलं नाही.
           गावकऱ्यांना वाटत होतं की एखादा जंगलातील प्राणी आला असेल व त्यानं उर्मिलेला उचलून नेलं असेल. परंतु ते मानायला रिता तयार नव्हती. तिला वाटत होतं की हा घात पात आहे व कोणत्यातरी कुसंस्काराच्या मुलानं तिच्यावर बलात्कार करुन तिला मारलं असेल ही शंका नाकारता येत नाही. जे आज तपासाअंती सत्य सिद्ध झालं होतं परंतु आरोपी न सापडल्यानं फाईल बंदही झाली होती. आता शोधावं कसं बलात्कार करणाऱ्याला. पोलीसांनी तर आपली फाईलच बंद केली आहे. असं रिताला वाटत लागलं होतं आणि तसं तिला वाटणंही साहजीकच होतं. 
          रिता विचारच करायची की उर्मिलाचा जीव कोण्या एका नराधमानं घेतला की जो त्या गुन्ह्यापासून अलिप्त आहे. विधात्यानं त्याला सोडून दिलं होतं. परंतु तिला माहीत होतं की चोर चोरी एकदाच करीत नाही तर तो चोरी वेळोवेळी करतोय. तसंच माणसाच्या वस्तीत येणारा वाघ, त्याला माणसाच्या रक्ताची चाहूल लागताच तो वेळोवेळी येतोय. तसाच ज्यानं गुन्हा केला तो पुन्हा गुन्हा करण्यासाठी येईलच हे रिता जाणून होती आणि नेमकं तेच घडलं.
           त्या नराधमाचं नाव गुणवंत होतं. त्याचं नाव मोठं छान होतं. परंतु त्याच्यात कोणतेच चांगले गुण नव्हते. लहानपणापासूनच तो वात्रट स्वभावाचा असून त्याला आज अठराही वर्ष झाले नव्हते. उर्मिला जवळपास पाच वर्षाची होती तर तो नुकताच वयात आला होता अर्थात पंधरा वर्षाचा झाले होता. मात्र त्याच तरुणपणाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या गुणवंताला वासनेची चटक लागली व त्यानं केवळ उर्मिलेलाच छळलं नव्हतं तर तो कितीतरी मुलींना छळत होता.
           रिताला माहीत होतं नव्हे तर शंका होती की तिच्या लहानग्या बहिणीला जंगलातील हिंस्र प्राण्यांनी नेलं नाही तर एखाद्या माणसानंच तिच्यावर अत्याचार केलेला आहे.
            उर्मिलाची फाईल बंद झाल्यानं उर्मिलाचा इतिहास मिटला गेला होता. मात्र गुणवंताची हिंमत वाढली होती. त्याला आता वाटायला लागलं होतं की आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही.
          उर्मिलाची फाईल बंद होताच व गुणवंताला अभय मिळताच तो आता दुसर्‍याच मुलीच्या शोधात होता. अशातच त्याला एक नामी संधी चालून आली. मग तो कशी काय ती संधी सोडणार? 

         *****************************************

          उर्मिलाचं ते गाव. त्या गावाचं नाव अभ्यंकर होतं. परंतु त्या गावाचं ते नावंही त्याला साजेसं नव्हतं. गावातील लोकं हे अंधश्रद्धेनं ग्रासलेले होतेच. उर्मिलाच्याही अदृश्य होण्यास त्यांनी भूत कल्पनाच मांडली होती. काही लोकं म्हणतात होते की तिला एखाद्या भुतानंच गायब केलेलं असावं. ती गावातील मंडळी तंत्र, मंत्र विद्येत पारंगत होतीच. 
          ते गाव जंगलातच होतं व त्या गावात तशा शाळाही नव्हत्या. त्यामुळंच उच्च शिक्षण शिकायचं झाल्यास त्या गावची मुलं बाहेर गावी वा तालुक्याला जावून शिकावं लागायचं. लगतच्या दुसर्‍या गावाला उच्च शिक्षणाची शाळा होतीच. त्या शाळेत ते शिकायला जात असत. त्यातच कधीकधी हादसे होत. कारण चक्कं काही लोकं गायब होत असत. त्याचं कारण काही लोकं भुताला देत. ते म्हणत असत की अशी मंडळी ही भूतच गायब करीत असावं तर काही मंडळी त्या प्राण्यांना गायब करण्यामागे हिंस्र प्राण्यांचा हात असल्याचे समजायचे. परंतु त्या गोष्टी त्यात घडत नसत तर त्यामागे वेगळंच कारण होतं.
           गुणवंत संधी पाहात होता. तशी एक मुलगी त्याला गवसली. त्याच मुलीचा त्यानं बलात्कार करण्यासाठी उपयोग करुन घेतला. 
          गुणवंत जाणून होता की त्याच्या गावच्या मुली ह्या शेजारच्या गावाला उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. दररोजच त्या समुहाने जातात तर कधीकधी त्या एकट्याही जातात. हेच हेरुन तो त्या मुलींवर बारीक लक्ष ठेवून होता व वाट पाहात होता त्यांच्या विलग होण्याची तशी ती नामी संधी चालून आली व एक मुलगी अचानकच तिला पेपर द्यायला वेळ झाल्यानं ती एकटी पडली. मात्र बाकीच्या मुली ह्या निघून गेल्या होत्या. 
            ते त्यांचं पायी जाणं. त्यातच एकटी पडलेली ती एक मुलगी. त्या मुलीला गुणवंतनं गाठलं. त्यानंतर तो तिच्याशी बोलता झाला. म्हणाला, 
            "अगं आज तू एकटीच कशी का?" 
             त्या मुलीनं गुणवंतला पाहिलं. तसा तो गावातीलच एक मुलगा म्हणून तिनं त्याचेवर विश्वास ठेवला. त्यानंतर ती बोलायला लागली. त्यातच ती म्हणाली, 
         "हो, माह्या पेपर थोडा वेळानं सुटला. म्हणून मले वेळ झाला."
           "अस्सं होय. मले सांग आतं जाणार कशी? जंगलाचा रस्ता हाये म्हणून ईचारलं. नाय म्हणजे कोणी येणार हाये का? भाऊ गी?"
           "नाय, नाय. कोणीच येणार नाय. अन् बरं झालं तू भेटलास. नायतं माई आफतच झाली असती."
           "तू घाबरु नगं. म्या हाये तुह्यासोबत. गाव येईस्तोवर. तू घाबरु नोको. म्या हायेच." 
           गुणवंतानं तिला सहानुभूती दाखवली. तसं तिला काय माहीत होतं की तोच उर्मिलाचा हत्यारा होता. ज्यानं तिच्यावर बलात्कार केला होता. ज्यानं तिला मारुनही टाकलं होतं. शिवाय पत्ताही लागू दिला नव्हता. अख्खा खुन लपवून टाकला होता.
           गुणवंत व ती मुलगी त्या जंगलाच्या दिशेनं चालले होते. ते बोलत बोलत चालले होते. तशा गुणवंताच्या मनात वासनेच्या उकळ्या फुटत होत्या. तसा तो संधीच पाहात होता भयानक रस्ता येण्याची. अशातच त्या जंगलाचा मध्यंतरीचा भाग आला. तसा तो म्हणाला, 
         "अगं, मले लघूशंका लागली. अशी कडेला थांब. घाबरु नगं. मी हा जातो, अन् लगेच येतोही."
            त्यानं लघूशंकेचं नाटक केलं व तो एका झाडाच्या आड लपला. तशी ती तो दिसू नये म्हणून पाठमोरी झाली होती. तोच थोडा वेळ गेला. मात्र ती विचार करु लागली. ' आता मी या विराट जंगलात. अशी एकटी. समजा एखादा प्राणी आला तर...... परंतु तो प्राणी तरी कसा येईल? आजपर्यंत या दहा बारा वर्षात मी कोणत्या प्राण्याला पाहिलं नाही वा कोणाचं एखादं लहानसं कोंबडू बकरु तरी एखाद्या प्राण्याने मारलेलं पाहिलं नाही. मग मला भीती कशाची? अन् तो गुणवंत आहेच सोबतीला. तो येईलच लवकर लघुशंका करुन. अन् लघुशंकेला तरी कोण थांबवणार. बिचारा गुणवंत. तो थोडं ना थांबणार.'
          ती विचारच करीत होती त्याबद्दल. तोच थोड्याच वेळात ती पाठमोरी असतांनाच तो बाहेर आला. त्यानं खिशातून हातात रुमाल काढला. त्या रुमालीवर थोडासा क्लोरोफॉम टाकला. तसा तो तिच्या दिशेनं निघाला. त्यानंतर त्यानं एका हातानं तिला घट्ट मिठीत पकडलं व दुसर्‍याच हातानं तो रुमाल त्यानं तिच्या नाकाजवळ लावला. त्यानंतर त्यानं तिच्या नाकाला बंद सुरु करणं सुरु केलं. तोच ती काही क्षणातच बेशुद्ध पडली. 
            ती बेशुद्ध पडली होती व तो चालताच रस्ता होता. परंतु तसं पाहिल्यास त्या रस्त्यानं जास्त लोकं जात येत नसत. शेवटी ती बेशुद्ध होताच त्याला फार आनंद झाला. परंतु तो रस्ता आहे हे ओळखून त्यानं तिच्या बेशुद्ध शरीराला खांद्यावर उचललं व तो त्या जंगलातील ती वाट चालू लागला. ज्या वाटेवर रहदारी नव्हती. त्यानंतर त्यानं अशी जागा शोधली की ज्या ठिकाणी एक नाला होता. त्यानंतर त्यानं त्याच क्लोरोफॉमनं बेशुद्ध केलेल्या शरीरावर पाशवी बलात्कारच केला. तरीही ती होशमध्ये आली नव्हती. शेवटी त्याची हौस पुर्ण होताच त्यानं तिच्या बेशुद्धावस्थेतच तिच्या मस्तकावर अतिशय जोरात वार केला व तिला मारुन टाकलं. त्यानंतर त्यानं आपला हात तिच्या नागपुड्यावर लावला व ती मरण पावल्याची पुष्टी केली. जेव्हा त्याला माहीत झालं की आता ती जीवंत नाही. तेव्हा त्यानं योजनेनुसार तिच्या चेहर्‍यावर तेलात टाकलं व तिचा चेहरा विद्रूप केला. शेवटी त्यानं तिला त्याच जंगलातील भयाण नाल्यात फेकून दिलं. जो वाहता नाला होता. याही ठिकाणी त्यानं उर्मिलाच्या वेळसारखी अक्कल वापरली जातात पुर्ण पुरावे मिटवले. 
            ती मुलगी संपली होती. शिकणारी होतकरु मुलगी. तिला त्यानं आयुष्यातून उठवलं होतं. आपली वासना पुर्ण करण्यासाठी तिचा जीव घेतला होता. क्षणातच ते प्रेत पाण्यात फेकताच त्या प्रेताला किड्यामुंग्यानं खावून टाकलं. त्यानंतर उर्मिलासारख्याच त्या मुलीच्याही हाडाचा सापळाच त्या विराट जंगलातील नाल्यात उरला होता. जो कोणालाही कधीच सापडणार नव्हता. जी मुलगी आज गुणवंताच्या वासनेची शिकार बनली होती. तिचं नाव हौसा होतं.
           हौसाही उर्मिलासारखीच मरण पावली होती नव्हे तर मारली गेली होती. गुणवंताला मजा आली होती. परंतु त्या दोन्ही मुलीचा विनाकारण जीवच गेला होता. 
            गुणवंतानं आज पुन्हा एक मुलगी मारली होती. जिच्यावर त्यानं पाशवी बलात्कारच केला होता. तसं त्यानं हौसाच्या प्रेताची विल्हेवाट लावली व तो निघाला थेट आपल्याच गावच्या दिशेनं. तसा त्याच्या मनात विचार आला. विचार आला होता त्याच्या गत आयुष्याचा.
            तो लहानच होता. तेव्हा असाच त्याचेवर रिताला छळल्याचा आरोप होता. जो आरोप खोटा होता. साधा एक घाणेरडा शब्द म्हटला आहे अशी ती रिता म्हणत होती. त्यानंतर रितानं त्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली होती. म्हटलं होतं की त्यानं तिचा विनयभंग केला. मग तो लहानच होता की त्या बालवयात त्याला पोलिसांनी पकडलं. त्यानंतर त्याला बालसुधारगृहात नेलं. जिथं त्याचेवर अनन्वीत अत्याचार झालेत. मग त्यानं ठरवलं. आपण रिताला सोडायचं नाही. त्याचं कारण होतं. ते म्हणजे रितामुळं त्याचं शिक्षण सुटलं होतं. त्याला भरपूर शिकायची इच्छा असतांनाही. त्याचवेळेस त्याच्या मनात उठलेली वासना. जिचं रुपांतर तिला घाणेरडा शब्द म्हणण्यात झालेलं. मग ठरवलं की ज्या मुलीमुळं आपलं जीवन उध्वस्त झालं. तिला सोडायचं नाही. आपण तिचा बदला घ्यायला. आपण मुलींना छळायचं परंतु सापडायचं नाही. प्रसंगी त्याला जीव घ्यावा लागला तरी चालेल. त्यानंतर तो योजना बनवू लागला होता व निष्पाप निरागस मुलींना छळू लागला होता. ज्या मुलींचा आता कोणताच गुन्हा राहात नसे. प्रसंगी त्या मुलींना विद्रूप करुन त्यांची हत्याही करु लागला होता. शिवाय पुरावे मिटविण्यासाठी काही मुलींना नाल्यात फेकू लागला होता तर काही मुलींना जंगलात आग लावून त्या आगीच्या स्वाधीनही करु लागला होता. 
            उर्मिला रिताचीच बहिण. गुणवंत संधीच पाहात होता. तोच रिताची बहिण त्याला एकटीच सापडली व त्यानंतर त्यानं रिताचा बदला म्हणून उर्मिलाला चॉकलेटच्या बहाण्याने नेलं. बलात्कार तर केलाच केला. शिवाय मारुनही टाकलं. परंतु हौसा? हौसा ना रिताच्या नात्यातील होती, ना ती रिताची मैत्रीण. तरीही त्यानं तिला संपवलं होतं. कारण त्याच्या आज केवळ रिताच नाही तर रितामुळं संपुर्ण मुलीच त्याला शत्रूसारख्या वाटू लागल्या होत्या. त्या गावातील एक एक मुलगी गायब होवू लागली होती. परंतु त्या मुली कोण गायब करतो? याचा सुगावा अद्याप तरी लागला नव्हता. त्यातच आता गुणवंतानं ठरवलं की आता आपल्या गावातील मुली गायब करु नये. कारण तसं केल्यानं आपण एखाद्या दिवशी नक्कीच पोलिसांच्या हाती सापडू. असा विचार करुन त्यानं आपल्या गावातील मुलींना सोडून परगावातील मुलींवर आपले डोळे टाकले होते. आता तर त्याला रागच मोकळे झाले होते. 
          तो जंगलातील रस्ता. त्या रस्त्यानं पुर्वी भय नसायचंच. ना गावातही भीती होती आतापर्यंत. परंतु आता गावातीलही लोकांना भीती वाढू लागली होती. विशेषतः मुलींच्या वडीलांना त्याचं भय होतं. मुलींचे अपहरण हा चिंतेचा विषय ठरला होता. 
           गुणवंतसाठी तो जंगलातील रस्ता एक वरदान ठरला होता. आता तो त्याच रस्त्यावर दबा धरुन राहात असे व कोणत्याही गावातील मुलगी दिसली रे दिसली की बस तिच्यावर तो ससाण्यासारखी उडी घेत असे व अतिशय योजनाबद्ध रितीनं त्या मुलींचं काम तमाम करीत असे. सुरुवातीला तो त्या मुलींच्या नाकावर क्लोरोफॉम युक्त रुमाल लावत असे. ज्यानं त्या मुली बेशुद्ध होवू शकतील. त्यानंतर तो त्यांना उचलून आपल्या खांद्यावर ठेवत असे व त्यांना जंगलात वाहणाऱ्या नाल्याजवळ घेवून जात असे. तो त्या नाल्याजवळ गेला की तिथं तो त्या मुलींच्या त्यांचे हातपाय बांधत असे. त्यानंतर त्या मुलींच्या तोंडावर चिकटपट्टी. जर बेशुद्धावस्थेतून होश आलाच तर त्यांना पळून जातात येणार नाही व मदतीसाठी ओरडताही येणार नाही. त्यानंतर तो पाशवी बलात्कार करीत असे. त्यानंतर समजा उमेदवार होशात येवो अगर न येवो. त्यांच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार करुन त्याला जीवानिशी मारुन टाकत असे. त्यातच ते प्रेत ओळखू यायला नको म्हणून त्या मुलींच्या चेहर्‍यावर ॲसिडही टाकत असे. त्यानंतर त्या मुलींना नाल्यातील बेशरमच्या झाडात फेकून देत असे. हे त्याचं सत्र सतत सुरु होतं. परंतु तो अजुनही सापडला नव्हता पोलिसांच्या जाळ्यात. तसं पाहिल्यास लोकांमध्ये आता भीतीदायक वातावरण तयार झालं होतं. मुली गायब कोण करतो? ही सांशकता व उत्सुकता मनाला लागून राहिली होती. त्यातच गुणवंताचा समावेश आज सिरीयल किलर म्हध्ये गणल्या जात होता. अद्याप पोलिसांच्या हातात न सापडता.  
           बलात्कार हे शहरातही होवू लागले होते व गुणवंतच्या माध्यमातून आज बलात्कार हे गावातही पोहोचले होते. ज्या गावातील पुर्वी लहान लहान मुली अगदी एकट्या राहात असत. आज त्यांना एकटी राहायची हिंमत होत नव्हती. कोणतेच मायबाप आपल्या मुलींना गावात एकटे ठेवत नसत. ते एकत्र शेतावर कामे करायला नेत असत. नाहीतर शाळेत तरी पाठवत असत. शिवाय आवर्जून सांगत असत की कधी एकटं राहायचं नाही.

           ************************************************

           बलात्कार बंद व्हायलाच हवेत? असे सगळेजण म्हणतात. ते तसं पाहिल्यास बरोबरही आहे. परंतु करेल कोण?
           बलात्कार बंद व्हायलाच हवेत. परंतु ते कसे करता येतील. ते बंद होणारच नाहीत. कारण त्याला राजकारण्यांचं अभय आहे. कारण राजकारणात जो बलात्कार करतो. त्यालाही तिकीट मिळतं व आपली जनता एवढी मुर्ख असते की त्याला निवडून आणते. पुर्वीही असंच व्हायचं. बलात्काराला राजाश्रय असायचा. ज्यातून बलात्कार व्हायचे. परंतु बलात्काराच्या वेदनेची शिकार होणाऱ्या महिलेला आयुष्यभर ज्या बलात्काराच्या वेदना सहन कराव्या लागत. त्या वेदना त्यांना आत्महत्या करायला बाध्य करायच्या. तरीही त्या वेदना अशा स्रिया मुकाट्यानं सहन करायच्या. कारण असायचं त्यांची मुलं. पती युद्धामध्ये मरण पावलेला असायचा.
          बलात्कार झाल्यानंतर बदनामी ही बलात्कार करणाऱ्यांची होत नाही. बलात्कार ज्यांच्यावर होतो. त्या बलात्कार पिडीतेची बदनामी होते. तिलाच सगळं भोगावं लागतं, जर ती जीवंत असली तर..... मेल्यावर तर प्रश्नच उद्भवत नाही. मात्र बलात्कार झाल्यानंतर पिडीतेला वेदना भोगण्याचा जो त्रास होतो. तो त्रास अतिशय जीवघेणा असतो. ज्यात चेहर्‍यावर ॲसिड फवारल्यानं चेहरा विद्रूप बनतो. ज्याचं सौंदर्य जीवनभर कितीही प्रमाणात उपचार केले तरी फुलवता येत नाही. अंतर्गत मनात गाठी तयार होतात. ज्या कधीच विसरता येत नाही. समाजाचा त्या कुटूंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो एक इतिहासच बनतो. जो कधीच पुसला जात नाही. शिवाय बलात्कार करणारा व्यक्ती बा इज्जत बरीही होतो. परंतु बलात्कार पिडीता ही बा इज्जत बरी होत नाही वेदनेतून आयुष्यभर. ती तीळ तीळ मरतच असते आयुष्यभर. कधी अरुणा शानबागसारखी आयुष्यभर बेशुद्ध राहते जीवंत प्रेतच बनून. तर कधी दुःख गिळत गिळत जीवंत राहावं लागतं. तसं पाहिल्यास बलात्कार कमी व्हायलाच हवेत. कारण बलात्कार ज्यांच्यावर होतो. तिला सर्व ब्रम्हांड आठवतं. याचा विचार केलेला बरा व त्याच दृष्टीकोनातून पावलंही उचललेली बरी. ज्यात घराची बदनामी होणार नाही व पिडीतेला जीवनभर वेदना भोगाव्या लागणार नाही. तसंच तिला अरुणा शानबागसारखं बेशुद्ध व्हावं लागणार नाही. ना कोणाच्या चेहर्‍यावर ॲसिड पडणार ना कोणाचा चेहरा विद्रूप करुन तिला जीवे मारणार.
           लैंगीक छळ वा बलात्कार. सध्या देशात बलात्काराचे सत्र सुरु आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्तमानपत्रात एक बातमी झळकते. अमूक अमूक ठिकाणी बलात्कार झाला. अमूक अमूक ठिकाणी विनयभंगही झाला.
           विनयभंग झाल्यास कायदे आहेत. कलम ५०९ अंतर्गत विनयभंग झाल्यास गुन्हा नोंदवता येतो. तसे बलात्काराचेही कायदे आहेत.
           बऱ्याचशा देशात बलात्कारावर फाशीची तरतूद आहे आणि ती असायलाच हवी. कारण अलिकडील काळात जे बलात्कार होतात. ते पिशाच्च वृत्तीतून होत असतात. 
          आजच्या काळात स्री ही अजिबातच सुरक्षीत राहिलेली नाही. एखाद्याला जर मुलगी असेल आणि ती मुलगी घरातून काही कामानिमित्त निघत असेल तर त्या मायबापाला ती सुरक्षीत घरी परत येईपर्यंत भीतीच वाटत असते. हे झालं मुलगी बाहेर जातांना. याचा अर्थ असा नाही की समजा ती जर घरात असेल तर ती घरी सुरक्षीत असेलच. घरीही ती सुरक्षीत नसतेच. घरीही तिचा भाऊ, तिचे वडील तिच्यावर बलात्कार करुन तिचं जीवन उध्वस्त करीत असतात. परंतु तिचा भाऊ किंवा तिचे वडील हे तिच्या नात्यातीलच व्यक्तीमत्व असल्यानं त्यांची बदनामी होईल, या धाकानं त्या महिला अगदी चूपचाप बसत असतात. 
         आज जणू बलात्काराचे स्त्री सत्र सुरु झाल्यासारखे वाटत असून स्री सुरक्षीत नाही. शाळा, महाविद्यालय असो वा कार्यालये. त्या सर्वच ठिकाणी स्रियांना छळणारी पुरुष मंडळी आहेत व ही पुरुष मंडळी वासनेनं धृत आहेत. तसं पाहिल्यास त्यांचा स्वभाव हा आधीपासूनच वाईट असून समुद्र मंथनातून निघालेली सुरा अशी वासनांध माणसं ग्रहण करतात. त्यानंतर ती सुरा ज्या राक्षसांना पुर्वीच्या काळी दिली गेली. आजची अशी वासनांध माणसंही ती सुरा ग्रहण करतात. ज्यातून त्यांच्यात असलेली आधीची वासना व वाईट विचार अधिकच वाढत व प्रगल्भ होत जातात. ज्यातून बलात्कारासारखे कृत्य घडवायला वाट मोकळी होत असते. 
         बलात्कार आज जसे होतात. तसेच बलात्कार पुर्वीही होत नव्हते असे नाही. पुर्वीही बलात्कार होत होते व ते लपवले जात असत. कारण त्या काळात संस्कृतीला मानणारे सांस्कृतिक लोकं होते. जे संस्कृतीला धरुन असायचे. ते बदनामीला घाबरायचे. शक्यतोवर विवाहही जातीबाहेर होत नसत. अन् झालाच तर त्याची परियंती त्या प्रेमविरांना मारुन टाकण्यात होत असे. जर असे प्रेमवीर गरीब वा सामान्य असले तर....... परंतु तेच जर प्रेमवीर राजे, रजवाडे वा त्यांचे वंशज असतील तर मात्र त्यांची बदनामी झाकून ठेवली जात असे. शिवाय अशा बलात्कारातून बलात्कार पिडीतेला जी संतती जन्मास यायची. त्या संततीला त्यांचं पाप लपवून त्याला वेगळंच असं नाव देत असत. कोणी त्याला मंत्रोच्चारानं मुलं झाली म्हणत असत तर कोणी त्याला फळ खाल्ल्यानं मुलं झाली म्हणत असत तर कोणी वरानं मुलं झाली म्हणत असत. कोणी देवानं मुलं जन्मास घातली. हा चमत्कार झाला असं म्हटलं जात असे व ते पाप देवावर ढकलून लपवलं जात असे वा देवाच्या नावानं खपवलं जात असे. परंतु हा शुद्ध पाप लपविण्याचा व बलात्कार दाबून टाकण्याचा प्रकार होता, नव्हे तर लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रकार होता. हे सत्य नाकारता येत नाही. कारण याचा वैज्ञानिक दृष्टीनं विचार केल्यास मुलं किंवा एखादा अजाणता कोणताही जीव जन्मास घालायला नर मादी लागतंच. हे सत्य नाकारता येत नाही. जसे, एका ऋषीला बाहेर अंघोळीला गेलेले पाहून त्यांचेच रुप घेवून त्यांच्याच घरात शिरलेला एक व्यक्ती. ज्याला देवाचा दर्जा होता. हा एक बलात्कारच होता. तसंच काही काही पुराणात माणसांच्या जन्माचाच उल्लेख नाही. ना त्यांच्या मायबापाचा पत्ता आहे ना त्यांच्या परीवाराचा. परंतु जन्म झाला व सांगीतलं गेलं आहे. पुराणात लिहिल्यानुसार काहींचा जन्म कानातून, पायातून, मुखातून, हातातून, पोटातून झालेला आहे. आणखी कशाकशातून झालेला आहे, ते लिहिणे गरजेचे नाही. मात्र अशांचेही जन्म हे बलात्कारातूनच झाले असतील ही शक्यता नाकारता येत नाही. 
           हे झालं कृत, त्रेता आणि द्वापर युगातील तत्थ्य. फळ खाणे, मंत्रोच्चार वरप्राप्तीतून मुलं जन्मास येणं. त्याला तत्कालीन समाजानं बदनामी होवू नये म्हणून तसं नाव देणं नव्हे तर तसे जन्म देवांनंच घडवून आणले म्हणून देवांनाही बदनाम करणं. ह्या सर्व गोष्टी घडल्या. 
        मध्यंतरीचा काळही बलात्कारानंच गाजलेला होता. राजे रजवाड्यांच्या जेव्हा लढाया होत. त्यात समजा एखादा राजा जर हारला वा पराभवी ठरला तर जो विजयी राजा असायचा. तो विजयी राजा वा त्याची प्रजा मांडलिक वा पराभवी राज्यातील स्रियांनाच लक्ष करुन त्यांच्यावर बलात्कार करीत असे. ज्यातून कित्येक महिलांचे हाल हाल होत. परंतु सत्ताधारी राजांच्या विरोधात वा त्यांच्या प्रजेच्या विरोधात बोलण्याची कोणत्याही महिलेची हिंमत होत नव्हती. त्यानंतर अरब आले, मुघल काळ आला. ज्या काळात कित्येक हिंदू स्रियांची अब्रू वेशिवरच टांगण्यात आली होती. सतत आणि रोजच्या बलात्कारानं कळसच गाठला असेल हे सत्य त्या काळात नाकारता येत नाही. कारण मुघल वा अरब सुलतानशाहीचा इतिहास हा क्रुरच मानल्या जातो. ते महिलांचेही शुभचिंतक नव्हतेच. हे तेवढंच खरं आहे. 
        मुघलांचा काळ संपला व या देशात इंग्रजांचं आगमण झालं. इंग्रजांनी या देशात बस्तान बसवलं. ज्यात आपण सर्व भारतीयच नाही तर तमाम हिंदूस्थानातील लोकं त्यांचे गुलाम बनलो. ज्यात त्यांनीही महिलांना सोडलं नाहीच. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण तमाम हिंदूस्थानातील पुरुषच मंडळी नाही तर महिला मंडळीही त्यांची गुलामच होती. 
        हिंदूस्थानातील हा झाला विदेशी आक्रमणकारी लोकांच्या बलात्काराचा इतिहास. परंतु याच देशातील काही उच्चभ्रू जातीतील लोकं आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जातीवर बलात्कार करीत. ज्यात त्या कनिष्ठ जातींनाही तो अत्याचार निमुटपणानं सहन करावा लागत असे. तोंडातून ब्र काढायचीही मनाई होती. तो बलात्कारच असायचा. परंतु त्याबद्दल आवाज उठवल्यास बिरादरीतील लोकंच बिरादरीतील महिलेच्या परीवारांनाच वाळीत टाकत असत. एवढंच नाही तर बालविवाह प्रथेत विवाह करणारा एखादा म्हातारा आपल्यापेक्षा कितीतरी प्रमाणात लहान असलेल्या आपल्या पत्नीला सोडून जायचा. अर्थात मरुण जायचा. तेव्हा अल्प वयात विधवा झालेल्या त्या मुलीवर घरातीलच काही माणसं बलात्कार करीत असत. ही वास्तविकता होती. शिवाय काही काही घरात तर मुलींना देवदासी म्हणून सोडून देत असत. ही दासी असलेली कुमारिका. हिला गावातील कोणताही माणूस आपलीच रखेल समजत तिच्यावर पाशवी बलात्कारच करीत असे. ज्या मुलीला आपले पाप लपविण्यासाठी देवदासी म्हटलं जात असे. मानलंही जात असे. उदाहरण द्यायचं झाल्यास बौद्ध भिक्षू बनलेल्या आम्रपालीचं देता येईल. जिला नगरवधू हा दर्जा होता. परंतु तिला त्या काळात राजे रजवाड्यांची एक रखेल म्हणून सोडण्यात आलं होतं. 
         विशेष सांगायचं झाल्यास महिलांवरील बलात्काराची ही वास्तववादी कहाणी. हा बलात्कार केवळ कलियुगातच अस्तित्त्वात नाही तर त्याची पाळंमुळं गत कृत, त्रेता आणि द्वापर युगातही सापडतात. फरक एवढाच की आज त्याला थेट बलात्कार हे नाव दिलं आहे आणि त्या काळात त्यालाच शुद्ध नाव होतं, मत्रोच्चार, वरप्राप्ती किंवा फळप्राप्ती. माणसानं स्रियांवर बलात्कार केलेत व ज्यातून जे जन्म झाले. त्या जन्माला पापमुक्तीसाठी देवाचं नाव दिलं व आपलं पाप लपवलं. परंतु हे जरी खरं असलं तरी त्यावेळचे बलात्कार आजच्यासारखे नसतीलच. कारण आजचा समाज हा त्यापेक्षाही बलात्काराच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे. ते म्हणजे आज रसायनांचा शोध लागल्यानं लोकांचं ॲसिड फवारणं. लोकं आज चेहराच लक्षात येवू नये म्हणून चेहर्‍यावर ॲसिड फवारतात. त्यानंतर मारुनही टाकतात. त्यांनी बलात्कार करणाऱ्यांची ओळख सांगू नये म्हणून किंवा जीभ वा थॉयराईड ग्रंथी कापतात. त्यांना बोलता येवू नये म्हणून. असा हा काळ. जरी आज कायदे असले तरी. कारण आजचे कायदे हे कुचकामी आहेत. बलात्कार करणाऱ्यांना फाशी होत नाही. ना त्याला नपुंसक केलं जात ना चौकाचौकातून त्याची धिंड काढली जात. उलट त्यालाच राजकारणाचं तिकीट दिलं जातं आणि लोकही एवढे मुर्ख असतात की त्यालाच निवडणूकीतून निवडून आणत असतात. मग असं जर घडत असेल तर कसा होईल बलात्कार कमी. ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे. महत्वपुर्ण गोष्ट ही की बलात्कार ही मानवी संस्कृतीला लागलेली कीड असून त्यासाठी कायद्याची कलमं जरी असली जरी असली तरी त्याचा तेवढ्या प्रमाणात उपयोग नाही. जेव्हापर्यंत त्या कायद्याची ठोस प्रमाणात अंमलबजावणी होत नाही. होणार नाही. जेव्हा कायद्याची ठोस अंमलबजावणी होईल व त्या हालचालींना वेग येईल. तेव्हाच बलात्कार कमी होतील यात शंका नाही.
             सुनीता व रिता दोघ्या बहिणी. रिता थोडीशी मोठी होती तर सुनीता तिच्यापेक्षा लहानच. रिता दहावी पास झाली होती तर सुनीता दहावी नापास झाली होती. दोघींनाही त्यांचे मायबाप शेतावर कामाला नेत असत. त्यातच रितानं व सुनीतानंही आपलं शिक्षण सोडलं होतं. तिला वाटत होतं की आपली बहीण उर्मिलाला शिकवू. तिलाच उच्च शिक्षण देवू. परंतु त्यांचं स्वप्न ते स्वप्नच उरलं होतं. कारण आज उर्मिला या जगात नव्हती तिला कोणीतरी मारुन टाकल्यानंतर त्यांचं स्वप्न दुभंगलं होतं. 
          उर्मिला या जगात नव्हती व तिच्यामुळं तिचे मायबाप व्यथीत झाले होते. तसं तिच्या जाण्यानं रिता आणि सुनीताही व्यथीत झाली होती. फार मोठी हानी झाली होती परीवारातील. त्यातच त्या दोन्ही बहिणींना शिक्षण सोडून बरेच दिवस झाले होते. 
          उर्मिलाची फाईल बंद झाली होती. त्यातच व्यथीत सुनीता व रिता. रिताला वाटत होतं की डाळीत काहीतरी काळंपण आहे की ही फाईल बंद झालीय. तसं तिला माहीत होताच तिनं सुनीताला म्हटलं,
        " सुनीता, तू आता शिकायला हवं. उच्च शिक्षण घ्यायला हवं आणि पोलीस बनायला हवं. जर तू पोलीस बनलीच तर उर्मिलाला ज्यानं कोणं गायब केलं असेल, त्याला शोधून काढता येईल."
            रिताचं ते बोलणं. त्यावर विचार करीत सुनीता म्हणाली, 
           "ताई, मी तेवढी हुशार नाही व मी शालान्त परीक्षाही पास झाली नाही. मग मी पोलीस तरी कशी बनेल?"
           सुनीता बोलून गेली खरी. परंतु त्यावर प्रतिक्रिया देत रिता म्हणाली, 
           "हे बघ सुनीता, तुला बनायलाच हवं पोलीस. निदान आपल्या उर्मिलासाठी तरी तू पोलीस बनायला हवं. तशी तू आतापर्यंत शिक्षणातच होती व तुझी सध्या अभ्यासात लिंकही लागलेली आहे. मीच शिकले असते. परंतु मला शिक्षण सोडून निदान तीन चार वर्ष तरी झालेत. आता माझ्याच्यानं तो अभ्यास होणार नाही व तसं माझं वयही राहिलेलं नाही. मी अभ्यास तसं पाहिल्यास करुच शकणार नाही. मात्र मला विश्वास आहे की तू निश्चितच करु शकतेस पोलीस बनण्याची तयारी. अन् तुला करायलाच हवी."
           बहिणीनं म्हटलेले ते शब्द. त्या शब्दात एवढं सामर्थ्य होतं की त्या शब्दानं सुनीता भारावली. ज्यातून तिनं निश्चय केला. निश्चय केला शिक्षण घेण्याचा. कारण तिच्या बहिणीनंच म्हटलं होतं की आता तिनं शिकायला हवं व तिनंच उर्मिलाला शोधून काढायला हवं. तिचं काय झालं तेही पाहायला हवं.
           सुनीता रिताच्या बोलण्यानं भारावली व तिनं सतरा क्रमांकाचा फॉम भरुन ती दहावीच्या परीक्षेला बसली. त्यानंतर तिनं अगदी मन लावून अभ्यास केला व तिनं शालान्त परीक्षा पास केली. त्यानंतर ती शिकतच गेली. शिवाय स्पर्धा परीक्षाही दिली. त्यानंतर ती पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झाली.
         सुनीता पोलीस बनण्यासाठी शिकत होती. तिला शिकायचे होते आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिला शिकवीत होती तिचीच एक बहीण. तिही काबाडकष्ट करुन. तिलाही वाटत होतं की माझी बहीण शिकल्यावर ती उर्मिलाला न्याय मिळवून देईल. परंतु जेव्हा सुनीता शिकली व ती पोलीस बनली. तेव्हा ती विसरुनच गेली होती तिचं ते कर्तव्य आणि त्या उर्मिलेला न्याय मिळवून देणं. ती पोलीस बनताच आपल्याच संसारात रममाण झाली होती. 
         
           *****************************

           रिता व सुनीताचा मध्यंतरीचा काळ फारच दुःखदायक गेला होता. घरची तशी परिस्थिती बेताचीच होती. त्यांचे वडील हे भुमीहीन शेतमजूर होते. ते शेतीत राबायचे. बदल्यात त्यांना मजूरी मिळायची. जी मजूरी सुनीताच्या शिक्षणाला पुरायची नाही. परंतु रिताची जिद्द होती. जिद्द होती की ती तिला शिकवणारच व पोलीस बनवणारच. 
          रिताची जिद्द व मायबापाची कमाई. त्या जोरावर सुनीता पोलीस बनलीच होती. हे खरं असलं तरी रिताचं शिक्षण सुटलेलं होतं याची खंत सुनीताला होती व सुनीता पोलीस बनल्यावर तिला वाटत होतं की ज्या बहिणीने आपल्याला शिकवलं. तिचे उपकार झालेत आपल्यावर. आपण शिकू शकत नव्हतो तरीही तिनं छातीची माती करुन आपल्या हौसा मौजा पुरवल्यात व आपल्यात ताकद भरली. तेव्हा तिच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण रिताला शिकवावं. तिलाही काहीतरी बनवावं की जेणेकरुन तिच्याही ज्ञानाचा उपयोग उर्मिलाला न्याय मिळवून देण्यासाठी होईल. 
         सुनीता शिकली होती व आता ती पोलीस बनून पगार कमवू लागली होती. या दरम्यान ती संधी शोधत होती आपल्या बहिणीशी वार्तालाप करायची. तसं पाहिल्यास आजपर्यंत तिला कधी वेळच मिळाला नव्हता अभ्यासामुळं आपल्या बहिणीशी बोलायला. मात्र आज तिनं थोडी सवड काढली होती व आपल्या बहिणीच्या घरी येण्याची ती वाटच पाहात होती.
             रिता कामावर जात होती. तशी ती सायंकाळी घरी येत होती कामावरुन. तशी ती घरी येताच व तिला थोडीशी सवड मिळताच तिची प्रतिक्षा करीत असलेली सुनीता तिला म्हणाली, 
          "ताई, तू मला पोलीस बनवलं. माझी इच्छा नसतांनाही तू मला शिकवलं. तेव्हा तुझ्या जिद्दीला सलाम. परंतु तुझे माझ्यावर फार उपकार झाले आहेत हे तू विसरलीय."
          "म्हणजे? ते तर माझं कर्तव्य होतं. ते माझे उपकार कसले? अन् हे लक्षात घे. आता तुला उर्मिलाला गायब करणारा चोर पकडायचा आहे. मग तो एखादा प्राणी का असेना."
           "होय पकडणारच. नक्कीच पकडणार. परंतु त्याआधी तुझ्या उपकाराची परतफेड करणार. त्याशिवाय मलाही बरं वाटणार नाही. तुझे ते उपकारच. परंतु त्या उपकाराची परतफेड मी केल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि आता मी सरकारी नोकरीवर लागलेय. आता तुम्हाला काम करण्याची गरज नाही."
           "म्हणजे? तू शिकणं व मी शिकवणं हे काय उपकार झाले की काय? अन् तू असं जर बोलत असशील तर मला हे बिलकुल आवडणार नाही."
           "ठीक आहे तुझं म्हणणं. परंतु मला तुझीही मदत हवी ना शोधकार्यात?"
            "कशाला हवी माझी मदत तुझ्या शोधकार्यात? अन् मी काय एवढी शिकली आहे की तुला तुझ्या शोधकार्यात मदत करणार."
           "हं, तेच मला म्हणायचंय."
           "म्हणजे?"
            "ताई, तुलाही शिकायला हवं. ते मला शिकवलं ना. आता,तूही शिकायलाच हवं. मीच तुला शिकवणार आहे. आता जबरदस्तीतून म्हण की काहीही म्हण. मी तुझा फॉम भरुन आलो आहे सतरा क्रमांकाचा. आता,तुला शाळेतही जायची गरज नाही. फक्त घरीच बसून अभ्यास करायचा आहे."
            सुनीतानं आपली भावना रिताला बोलून दाखवली. मात्र रिता काही ऐकत नव्हती. तेव्हा सुनीता तिला म्हणाली, 
          "हे बघ ताई, तू जर माझं ऐकत नसशील तर मिही उर्मिलाचा तपास करणार नाही. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव." सुनीता बोलली व स्वयंपाक करायला निघून गेली. 
          सुनीता बोलून गेली. सुनीता बोलून गेली खरी, परंतु तिच्या बोलण्यात दम होता. सुनीताचं बोलून गेल्यानंतर रिता विचार करु लागली. 
          'सुनीता तशी हेकडच. मी जर तिचं ऐकलं नाही तर ती उर्मिलाचा तपासच करणार नाही. तसं पाहिल्यास ती काही वाईट बोलत नाही. ती माझ्या फायद्याचीच गोष्ट बोलत आहे. ज्याचा मलाच फायदा होईल. परंतु आता शिकायचं कसं? आता तर माझा अभ्यास सुटून कितीतरी दिवस झालेत. बराच काळही गेला. परंतु करावं लागेल. घरीच तर अभ्यास करायचा आहे. त्यात काय एवढं?'
          रितानं विचार केला. तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला. तशी ती तयार झाली व तिही स्वयंपाक घरात गेली. जिथं सुनीता स्वयंपाक करु लागली होती. तशी ती तिला म्हणाली, 
         "सुनीता तू म्हणतेय ते अगदी खरं आहे. परंतु आता एवढे दिवस झाल्यावर व अभ्यास सुटल्यावर माझ्याच्यानं शिकणं होईल?"
          "का नाही होणार? अगं एखाद्या व्यक्तीत एखादा गुण जर असला आणि त्यानं बरेच वर्ष जरी काम केलं नाही तर त्याला ते काम करता येत नाही काय? शिवाय वाघ जरी म्हातारा झाला तरी त्याला शिकार करता येते नं व्हं."
         "होय, तुझंही म्हणणं बरोबरच."
          "मग आता माझं ऐक. तुही अभ्यासाला लाग. चांगला अभ्यास कर. मी आहेच पाठीमागं उभी. काल आपल्याजवळ पैसा नव्हता. म्हणूनच आपल्याला शिकायचा विचार होता. आज आपल्याजवळ पैसा आहे. मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. फक्त अभ्यास तुलाच करावं लागेल."
         सुनीता भाजीत मीठ टाकल्यागत बोलली. तसं रितानं ऐकताच रिता म्हणाली  
           "तर मग ठीक आहे. आपण उर्मिलाची लढाई लढूच. दोघ्याही मिळून लढूच. मी शिकेल भरपूर आणि उर्मिलाला न्याय मिळवून देवूच. "
           रिताचा तो निर्धार. तसा रितानं होकार दिला व ती शिकायला तयार झाली. आता ती रात्रंदिवस अभ्यास करु लागली होती आणि सुनीताही तिच्या शिक्षणाला पैसा लावतच होती.
         रिता सुनीतापेक्षा अगदी हुशारच होती. ती एक एक पाऊल टाकत पासही होत होती. नुकतीच तिनं बारावीची परीक्षा दिली होती. ती केवळ पासच झाली नव्हती तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरही आली होती. अशातच तिनं डॉक्टरकीचा नंबर लावला व आज ती डॉक्टर बनून एका खाजगी रुग्णालयात लागली होती.
        रिता डॉक्टर बनली होती. ते रितामुळं शक्य झालं होतं. अशातच रिताची बदली तिच्या राहत्या गावाकडं झाली. आता तिला रान मोकळे झालं होतं उर्मिलाचा तपास करायला. त्यातच तिनं गावाकडं बदली होताच गावाकडील अपहरत मुलींची फाईल उघडली. ज्यात उर्मिला, हौसा आणि इतरही बर्‍याच मुली होत्या. काही आसपासच्याही मुली होत्या. ज्यांचा शोध न लागल्यानं त्या फायली बंद झाल्या होत्या. त्याच फायली सुनीतानं उघडल्या व ती त्यावर अभ्यास करु लागली. रात्रंदिवस ती त्याच फाईलच्या मागं लागली होती.
         सुनीता विचार करीत होती. तो विचार होता, स्री पुरुष समानतेचा. लोकं म्हणत होते की स्री पुरुष समान आहेत. मग स्री पुरुष जर समान आहेत तर हा बलात्कार का? हा बलात्कार स्रिला कमजोर समजूनच केली जाणारी कृती होय. असं तिला वाटत होतं. तसं पाहिल्यास तिचं ते बरोबरच होतं. कारण समाज स्री पुरुष समानतेच्या गोष्टी तर करीत होता. परंतु प्रत्यक्षात स्रिला वागणूक देतांना समानतेची वागणूक देत नव्हता. तिला तो प्रत्यक्षात कनिष्ठच लेखत होता, घरादारात आणा जीवनात वागवतांना आणि स्रिही त्याची कळसुत्री बाहुले असल्यागत समानतेनं वागत नव्हतीच. स्री पुरुष समानता, समानता आहे तरी काय? असा सुनीताचा प्रश्न. 
         आज देशात स्री पुरुष समानता आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांइतकीच कामं करीत असतात. मग ते कोणतंही काम का असेना. त्यावरुन दिसतं की स्री पुरुष समानता आहे. 
         स्री पुरुष समानता ही जळी, स्थळी, पाताळी सारखीच दिसते. अर्थात सरकारी कार्यालयात, खाजगी कार्यालयात, शिक्षणक्षेत्रात, मुलं शिकत असतांना ही पातळी दिसते. परंतु हे जरी खरं असलं तरी ती पातळी सारख्या प्रमाणात दिसून येत नाही. त्याचं कारण आहे, स्री आणि पुरुषांची संख्या. आज सरकारी क्षेत्रात महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तशीच महिलांची संख्या खाजगी क्षेत्रातही जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे मुली अतिशय इमानदारीनं काम करीत असतात असं कार्यालयातील कंपनी मालकांचं म्हणणं. यावरुन सरकारी क्षेत्रामध्ये महिलांची संख्या अतिशय जास्त दिसते. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आज स्री पुरुष समानता दिसत नाही. त्याचं कारण आहे स्री जातीवर होणारा अत्याचार. 
         आज राजकारणाचा विचार केल्यास आणि महिलांची संख्या मोजल्यास पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कमीच आहे. असे का? तर महिलांना राजकीय क्षेत्र आवडत नाही. असं पुरुषांचं म्हणणं. गावखेड्यातील एखाद्या महिलेला आरक्षण असल्यामुळंच निवडणुकीत उभं ठेवावं लागतं. जर ते आरक्षण नसतं तर तिला कोणी काळ्या कुत्र्यानंही विचारलं नसतं. अशी महिला राजकारणात निवडणुकीत निवडून आलीच तर तिच्या नावानं ती निर्णय घ्यायला सक्षम असूनही तिच्या नावानं राज्यकारभार तिचा पुरुष असलेला पतीच करीत असतो. तिला राज्यकारभारच करु देत नाही. यात कुठं आली महिला समानता? शिवाय बऱ्याचशा अशा जाती आणि असे धर्म आहेत की त्या धर्मात वा जातीत महिलांना शिकण्याची परवानगी नसते. एकतर त्या महिलांचा विवाह करुन दिला जातो किंवा तिचं शिक्षण ती कितीही हुशार असली तरी दहावी शिकविल्यानंतर बंद केलं जातं. आजही बऱ्याचशा घरात मुलीचं जर एखाद्या मुलासोबत प्रेम असेल आणि ते प्रेम तिच्या आईवडीलाला माहीत झालं तर तिला पुढील शिक्षण शिकविलंच जात नाही. तिला शिक्षण शिकविणं बंद करुन तिचा विवाह करण्याची वाट पाहिली जाते. याला का स्री समानता म्हणता येईल काय? काय, प्रेम करणं गुन्हा आहे काय? नाही ना. मग असं का घडतं बऱ्याचशा कुटूंबात? 
            कोणी म्हणतात की युगाचे चार प्रकार आहेत. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. कोणी हे युग मानायला तयार नाहीत. परंतु ते जर युग मानले आणि स्री पुरुष समानता पडताळून पाहिली तर तीनही युगात पुरुष आणि स्री समानता दिसते. कृत, त्रेता व द्वापरयुगात स्रियांचे विवाह होतांना स्वयंवराचे आयोजन केलं जात असे. ज्यातून विवाहयोग्य पती निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना बहाल केलं होतं. परंतु ज्यावेळेस कलियुग आला. त्यानंतर स्री पुरुष समानता संपली व स्रिला गुलाम बनवलं गेलं. तिच्यावर साऱ्याच स्वरुपाची बंधनं लादली गेली. म्हटलं जातं की कृतयुगात या धरणीवर विष्णूचे चार अवतार झालेत. त्यानं माणसाच्या रुपात जन्म घेतला नाही तर तो प्राण्यांच्या रुपात जन्म घेतला. ज्यात मत्स, कुर्म, वराह व नरसिंह असे अवतार झालेत. याठिकाणी चार्ल्स डार्विनचा सिद्धांत लागू होतो. डार्विनच्या सिद्धांतानुसार माणूस कुर्म अर्थात माकड होता. तो मानव नव्हता. त्यानंतर दुसरे युग, त्रेतायुग. या त्रेतायुगात विष्णूनं पहिल्यांदा मानव म्हणून जन्म घेतला. ज्यात वामन, परशुराम व राम अवतार झाले. ज्यात वामन अवतार अर्थात निशस्र माणूस, परशुराम अवतार अर्थात शस्त्रधारी माणूस आणि रामअवतार अर्थात कंदमुळ खाणारा माणूस. हेच डार्विनच्या सिद्धांतानुसार सांगायचं झाल्यास माकड झाडावरुन खाली आलं. तेव्हा तो साधारण वामन अवतारासारखा माणूस होता. त्यानंतर त्यानं परशुराम अवतारासारखी शस्र बनवली. त्यानंतर त्या शस्राच्या सहाय्यानं त्यानं रामअवतारासारखी त्यानं कंदमुळं खाल्ली. त्यानंतर द्वापर युग आलं व त्या युगात विष्णूचा क्रिष्ण अवतार झाला. ज्यानं पशुपालनाला महत्व दिलं. अर्थात क्रिष्णाला यादव म्हटलं आहे व त्यानंतर झालेल्या बुद्ध अवतारानं कृषीला प्राधान्य दिलं. अर्थात शेती केली. याचाच अर्थ डार्वीनच्या सिद्धांतानुसार पुर्वी माकड अवस्थेत असलेला माणूस आता क्रिष्ण अवतारासारखा पशूपालन करायला लागला व बुद्ध अवतारासारखा शेती करायला लागला. त्यानंतर आला कलीयुग. ज्या युगात विविध प्रकारच्या कला माणसानं अवगत केल्या होत्या. हेच डार्वीनच्या सिद्धांतानुसार सांगायचं झाल्यास माणूस जेव्हा शेती करायला लागला. त्यानंतर तो साऱ्याच कला शिकला. ज्याला हिंदू शास्त्रानुसार कलियुग व डार्वीनच्या सिद्धांतानुसार माकडाच्या उत्क्रांतीचा इतिहास हे नाव आहे.
         हिंदू धर्मशास्रात विष्णूने घेतलेले जे जे अवतार आहेत. ते ते अवतार का घेतले? याची कारणमिमांसा आहे. जसं म्हटलं जातं की पृथ्वीवर अन्याय व अत्याचार अति प्रमाणात माजल्यामुळं हे सर्व अवतार घेतले गेले. याचाच अर्थ असा की हिंदू धर्म जिथं जिथं अस्तित्वात होता, तिथं तिथं अन्याय, अत्याचार माजला होता व स्रीला एक उपभोग्य वस्तू मानल्या जात होते. जसे. त्रेतायुगातील सीतेचं कृतयुगात नाव वेदवती होतं व तिला विष्णू आवडत असल्यानं तिनं त्याला मिळविण्यासाठी तपश्चर्या केली. त्रेतायुगात स्री पुरुष समानता ही कैकेयीच्या शब्दावरुन दिसून येते. तिच्या शब्दांना मान दिल्या गेला. कारण तिच्याच शब्दावरुन सीता व राम वनवासात गेले. द्वापर युगातही स्री पुरुष समानता होती. तिला दुय्यम समजलं जात नव्हतं. हे द्रौपदीवरुन दिसून येते. तिनं म्हटलं की मी कर्णाशी विवाह करणार नाही व ती कर्णाची पत्नी बनली नाही. मात्र कलियुगात हे सर्व दिसलं नाही. आज विवाहाच्या बाबतीत थोडीशी निर्णय घेण्याची स्री पुरुष समानता दिसत असली तरी आजही स्री पुरुष समानता नाही. कारण हिंदू धर्मशास्रातील कालच्या तीनही युगात स्रियांची समानता जरी दिसत असली तरी ती वरवर होती. आतून स्रियांना आजच्याचसारखी असमानतेची वागणूक मिळत असे. रावणानं स्रिला दुय्यम समजत वेदवतीला छळणं. त्यानंतर तिची अग्नीकुंडात उडी घेणं. रावणाचं आपल्या पत्नीचं न ऐकणं. हीच स्री पुरुष असमानता. त्रेतायुगात सीतेला भुमीत स्वतःला गाडून घ्यायला बाध्य होणं. ही देखील स्री पुरुष असमानता, तसंच द्वापरयुगात द्रौपदीची परवानगी न घेता तिला जुव्याच्या दावावर लावणं त्यातच तिला दुर्योधनाने दुःशासनाकरवी भर दरबारात ओढत नेणं ही कृती देखील स्री पुरुष असमानता दर्शवते. याचाच अर्थ असा की काल तर स्रिला काही बोलायचीच परवानगी नव्हती. अन् ज्यावेळेस कलीयुग प्रारंभ झाला, तेव्हा त्या कलियुगात तिला बुरखा परीधान करणं. तिच्या शिक्षणाच्या संधी नाकारणं. तिचं सती जाणं, केशवेपण, बालविवाह, विधवा पुनर्विवाह बंदी, एक पत्नी असतांना अनेक पत्नी करणे अर्थात पहिल्या पत्नीची इच्छा नसतांनाही पुरुषानं सवती आणणे या साऱ्या गोष्टी काल स्रिच्या वाट्याला आल्या. याही गोष्टी स्री पुरुष असमानताच दर्शवितात. शिवाय कालच्या कलियुगाच्या प्रारंभ अवस्थेत स्रियांना दुय्यम स्थान असलं तरी आजतरी स्रियांना प्रथम स्थान आहे का? जरी भारत स्वतंत्र्य झाला असला तरी आणि संविधान बनून त्यानुसार आरक्षण दिलं गेलं तरी. याचाच अर्थ आजच्या काळानुसार असाच आहे की आजही समाजात स्री पुरुष असमानताच आहे. मोजक्या दोनचार स्रिया सुधारल्या व त्या स्रिया सुधारणेतून पुढे गेल्या. म्हणजे स्री पुरुष समानता आली असा त्याचा अर्थ नाही.
          ही झाली हिंदू धर्मशास्रानुसार स्री पुरुषांची असमानता. इतर धर्मातही तशीच असमानता दिसून येते. जसं स्रिला बुरख्यात वावरायला भाग पाडणे. तिच्या उच्च शिक्षणावर बंदी घालणे, तिला उपभोग्य वस्तू समजत दोन लेकरांपेक्षा अनेक लेकरांना जन्म देण्यास लावणे, तिला पत्नी म्हणून नेणे. परंतु पत्नीचा दर्जा न देणे, तिला मारणे, झोडणे बलात्कार करणे, एवढंच नाही तर तिच्यावरच बलात्कार करुन ती ओळखू येवू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप करणे, तिच्यावर तिचा गुन्हा नसतांना ॲसिड फेकणे या साऱ्याच गोष्टी स्री पुरुष असमानताच दर्शवितात. ही स्री पुरुष असमानता विविध धर्मातील धर्मांड लोकं दर्शवितात. त्यासाठी धर्मातील सुत्राचे प्रमाण देतात. परंतु ही स्री पुरुष असमानता डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दर्शवीत नाही. 
           महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं पुर्वी अवतार झाले की नाही हे पाहिलेले नाही व आताही कल्की अवतार आहे की नाही हेही सांगता येणे शक्य नाही. परंतु माणूसकी सर्वांनी पाहिलेली आहे. त्यातच सर्वच लोकं मानव हा माकडांपासूनच कसा वृद्धिंगत होत गेला हे शिकलेली आहेत. तेव्हा जगातील प्रत्येक माणूस जसा डार्वीनच्या स्री पुरुष समानतेनं चालतो. तसंच आपल्याही देशातील सर्वच माणसानं चालण्याची गरज आहे. स्री पुरुष समानतेबाबत हिनता न बाळगता. कारण जी स्री पुरुष असमानताच भेदभावाच्या विषाचं बीज पेरतं. हे तेवढंच सत्य आहे. याबाबतीत जास्त खोलवर विचार केल्यास असं दिसेल की संविधान आहे व आरक्षण आहे. म्हणूनच स्रिला सर्वच गोष्टीत संधी आहे. नाही तर शास्राच्या त्या स्री पुरुष असमानतेच्या हत्यारानं केव्हाच कालच्या स्रियांसारखी आजच्या स्रियांचीही हत्या केली असती यात शंका नाही.
           सुनीताला वाटत होतं की स्री ही लक्ष्मीच आहे. तिची सुरक्षा व्हायलाच हवी. परंतु लोकं तिला वरवर लक्ष्मी म्हणत असत आणि तिच्याशी गोडगोड बोलून तिच्यावर लपून छपून वार करीत असत. सतत कुटूंबात तिची नेहमीच हेळसांड केली जात असे. तशी पतीपत्नीची जेव्हा भांडणं तिच्यासमोर सोडवायला येत. तेव्हा तिला स्री पुरुष समानतेचा प्रत्यय यायचा. समानता आहे किंवा नाही आणि बलात्कार का होत असावेत. 
          बलात्कार हे वासना भडकली की व्हायचे. वासना ही कधीकधी पत्नी जर ऐनवेळेस पतीपत्नीच्या भांडणातून सोडून गेल्यास सवय पडल्यानं भडकलेली राहायची. ज्यातून बलात्कार व्हायचे. तर काही बलात्कार ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणारी मुलं करीत असत. ज्याला कायदा हा नाबालीग समजायचा व त्या मुलाला सुधारगृहात पाठवायचा. परंतु गुन्हा तो गुन्हाच. मग तो मुलगा नाबालीग जरी असला तरी असं सुनीताला वाटायचं. त्यालाही शिक्षा द्याविशी वाटायची. परंतु ती आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानं तिची हात कायद्याने बांधून टाकले होते.
         
         *****************************

           बलात्कार नेहमीच होत असत. दररोजच वर्तमानपत्रात बलात्काराच्या बातम्या येत. त्यातच बलात्कार केल्यानंतर अशा अशा पद्धतीनं प्रेताची विल्हेवाट लावली गेली असंही वर्तमानपत्रात छापून येत असे. तेव्हा सुनीताला वाटत असायचं की अशा संशयीत बलात्कार करणाऱ्या नराधमासमोर जावं व त्याला गोळीने ठारच करुन टाकावं. परंतु ती तशी करु शकत नव्हती. त्यावर ती कधीकधी विचार करायची. 
           बलात्कार...... अलिकडील काळात बलात्कार म्हटलं की सामान्य बाब समजली जात असल्याचं चित्र दिसत आहे. लोकं गंभीर नाहीत आणि सरकारही गंभीर नसल्याचं जाणीवतं. मात्र बलात्काराच्या घटना या सामान्य नसून आजपर्यंत अशा भरपूर घटना झाल्यात. काही उजेडात आल्यात तर काही लपल्या गेल्यात. काही लपवल्या गेल्यात. त्या घटना लपवल्या जातात. त्यामागं पाश्वभुमी असते राजकारणाची. बलात्कार करणारा व्यक्ती हा कोणत्यातरी राजकीय पक्ष्याचा हितचिंतक असतो. मग ती पार्टी त्याचं पाप लपवते व त्याला अभय देते. त्यानंतर वेळीच तो गुन्हा लपला की लोकं जनआंदोलन करतात. शेवटी जनक्षोभ वाढला की तात्पुरते केवळ दिखावा वा प्रदर्शन म्हणून आरोपीला अटक केली जाते. त्यानंतर वकील केले जातात. शेवटी आरोपीला जामीन मिळतं व आरोपी बा इज्जत मोकळा होतो. त्यानंतर खटला चालत असतो बरेच दिवस. या दरम्यान पुरावे मिटवले जातात. कधी आपली बदनामी होवू नये म्हणून बलात्कार पिडीता तो खटला मागे घेते. कधी आपला विवाह व्हावा म्हणूनही बलात्कार पिडीता तो खटला मागं घेते. त्यानंतर निकाल येतो. निकाल येतो की सदर आरोपीचा गुन्हा नाही हे पुरावे तपासले असता दिसलं. बलात्काराबाबत ठोस असा पुरावाच सापडला नाही. त्यानंतर आरोपी बा इज्जत बरी होतो. हीच वास्तविकता देशातील बरेच जण अनुभवतात. ज्यातून त्यांना बोध मिळतो की बलात्कार केल्यावर फक्त गुन्हा दाखल होतो. तारखावर तारखा चालतात. होत काहीच नाही. इथंच वासना जागृत होते. मग काय आपली वासना परीपुर्ण करण्यासाठी तोही योजना आखतो व बलात्कार करतो. कारण त्याला माहीत असतं की आपण बलात्कार जरी केला तरी सुटणारच आहो. ज्यात आपण केलेला वकील सदर घटनेचा पुरावा लावेल व आपल्याला सुटता येईल. शिवाय आपण आपल्या राजकीय सत्तेचा दबावही आणू. 
          गुन्हा हा गुन्हाच आणि गुन्हेगार तो गुन्हेगारच. जरी बलात्कार करणारा आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधीत असेल तरी तो गुन्हेगार असतो. तो अधिकारी असेल वा कितीही मोठ्या पदावर असला वा कोणत्याही धर्माचा असला तरी तो गुन्हेगारच असतो. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म वा पंथ नसतात. हे आपण वेळोवेळी बोलतो. परंतु तरीही आपण गुन्हेगाराचा संबंध एखाद्या राजकीय पक्षाशी लावतो. एखाद्या जातीशी लावतो व एखाद्या धर्माशी लावतो. बलात्कारातही तेच घडते व बचाव पक्षाकडून तो अमूक अमूक जातीचा, अमूक अमूक धर्माचा वा अमूक अमूक पक्षाचा म्हणून सोडून दिला जातो. 
          बलात्काराची प्रकरणे कितीतली प्रमाणात आज दाखल असली तरी बऱ्याच प्रकरणात बलात्कार होऊनही न्याय हा कोणालाच मिळालेला नाही. काही जण आजपर्यंत तरी मोकाटंच सुटलेले आहेत. काहीजण अल्पवयीन असल्याचा हवाला देवून सुटलेले आहे. आजचा काळ तसाच आहे. 
          कालचं अरुणा शानबागचं प्रकरण जुनं झालं. बिचारीवर अगदी तरुण वयात बलात्कार झाला व ती त्यानंतर कोमात गेली. ती बयाच्या पासष्टव्या वर्षी मरण पावली. परंतु ती कोमातून बाहेर आलीच नाही एवढ्या वर्षानंतरही. ज्यात आरोपीला फक्त सात वर्षाची शिक्षा झाली. कारण बलात्काराची शिक्षा ही सातच वर्षाची आहे. तशी अरुणा शानबाग बलात्कार प्रकरणात आरोपी सुटला. त्यानं विवाह केला. त्याला दोन मुलं झाली. तो संसारात रममाण. परंतु अरुणाला न्याय मिळाला का? ती बलात्कारानंतर कोमातून बाहेर आली का? तिला संसार करता आला का? तिला आनंददायी जीवन जगता आले का? असे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं सापडत नाहीत. दुसरं खैरलांजी प्रकरण. अतिशय क्रूर घटना घडली. बलात्कार झाला व शरीरावर असंख्य वार केले गेलेत. ज्यात न्याय हा नाहीच नाही. काही आरोपी, त्यांनी जणू गुन्हा केलाच नाही अशाप्रकारे सुटले. त्यानंतर दिल्लीतील निर्भया प्रकरण. ज्यात एक गुन्हेगार अल्पवयीन असल्याचा ठपका ठेवत सुटला. परंतु त्यानं बलात्कार केला ना. ते करतांना तो अल्पवयीन नव्हता काय? शिवाय आज कलकत्ता प्रकरण, बदलापूर प्रकरण. नागपूरची एक घटना. बलात्काराची घटना घडता घडता सुदैवानं टळली. परंतु नागपूरच्या घटनेत सदर मुलीनं समजदारी दाखवत विचार केला की ज्या ऑटोवाल्यानं तिला कलकत्ता करुन टाकीन म्हटलं. त्याला चार मुली असून त्या आपल्यासारख्याच आहेत. त्यांच्या वडीलांची तक्रार पोलिसांना केली व पोलिसांनी त्याला उचलून नेल्यावर त्या मुलींच्या मनावर काय बेतेल? याच मानसिकतेनं तिनं विचार करुन त्याला सोडून दिलं. 
          आज अशा बर्‍याच बलात्काराच्या घटना आहेत की कित्येक मुली आपली बदनामी होवू नये म्हणून बलात्कार होवूनही पोलिसात तक्रार करायला जात नाहीत. काही काही मुली तक्रार करतात. ज्या घटना पोलीस स्टेशनमधूनच निपटवल्या जातात. काही मुलींच्या बाबतीत त्या घटना न्यायालयात जावून बदनामीदाखल मिटतात. काही विवाहाखातरही मिटतात. 
          अलिकडं तर बलात्काराच्या अशा घटना घडत आहेत की ज्या घटनेत आरोपी हा बलात्कार पिडीता ओळखूच येवू नये व आपण सापडू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप करतो व जीवही घेतो. तसंच ती बोलून आपलं नाव सांगू नये म्हणून तिची थॉयराईड ग्रंथी कापतो. काही घटनेत जीवही घेतो. अतिशय लाजीरवाणी घटना घडते. काही घटनेत तर गुप्त भागाला अतिशय वेदना केल्या जातात. ज्यातून होणारा रक्तस्राव थांबल्या थांबत नाही. मग कमशक्तीनं जीव जातो. 
        आज बऱ्याच अशा बलात्काराच्या घटना. बलात्कारानंतर बलात्कारपिडीतेला फेकलं टाकलं जातं लावारीश जागेत लावारीश प्रेत म्हणून. काही ठिकाणी लहान लहान तुकडे करुन फेकलं जातं. पुर्ण पुरावे नष्ट करण्यासाठी. एखादी घटना उजेडात येते तेव्हा मेणबत्ती आंदोलन होतं. ज्यातून मेणबत्तीची विक्री होते व मेणबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला चांगले दिवस येतात. परंतु त्यानं बलात्कारपिडीतेला न्याय मिळत नाही. 
          बलात्कारपिडीतेलाही न्या मिळू शकतो. तो तेव्हाच न्याय मिळू शकतो. जसं त्यानं तिच्यासोबत केलं. तेच त्याच्यासोबतही घडावं. जशास तसे यानुसार. अर्थात त्यानं जशा तिला ज्या ज्या ठिकाणी वेदना देत जे जे कृत्य केलं. तेच कृत्य त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या शरीरासोबत करावे. जसे त्याच्या पाश्वभागात तिखट भरावं. जेणेकरुन अंगार होईल व त्यालाही जाणीव होईल की बलात्कार केल्यानं काय काय होवू शकतं. त्यालाही जखमा कराव्यात. ज्या जखमा त्यानं बलात्कारपिडीतेच्या शरीरावर केल्या. असं करतांना तेही उघड्यावर करावं सर्वांच्या समोर. शिवाय त्याचे सरकारनंच व्हिडिओ काढून व्हायरल करावेत व ठणकावून सांगावं की जर यानंतर कोणीही बलात्कार केलाच तर त्याचेही हाल असेच करण्यात येईल. तेव्हाच बलात्कारपिडीतेला न्याय मिळेल व त्यानंतर कोणताच आरोपी बलात्कार करायची हिंमत करणार नाही. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे आज स्री सुखी तर जग सुखी राहील. कारण स्री ही अशी एकमेव निसर्गाची निर्मिती आहे की ती जर सुरक्षीत असेल तर ती संपूर्ण संसार सुरळीत व सुरक्षीत करु शकते. तिला हिंदू धर्मात लक्ष्मी मानलं आहे. तिला लक्ष्मीच समजावं. जर तिला लक्ष्मी समजून व्यवहार केला तर संपूर्ण जग सुखी होवू शकेल आणि तिच्यावर आपण हैवानासारखं बलात्कार करीत गेलो. तिची सुरक्षा केली नाही व त्या घटना उघड्या डोळ्यानंच पाहात राहिलो तर कदाचीत ही सृष्टी एखाद्या दिवशी नष्ट होईल हे तेवढंच खरं. त्यासाठी आपण आजच सावधानता बाळगलेली बरी. 
         बलात्काराच्या त्या घटना. त्या घटना जेव्हा पोलीस स्टेशनला यायच्या. तेव्हा सुनीताचं रक्त उसळून जात असे. तिचं पित्त खवळत असे. वाटत असे की त्यांना चार चौघात दयामाया न दाखवता फाशी द्यावी. परंतु लागलीच ती शांत व्हायची, आपल्या पेशाचा विचार करुन. त्यानंतर ती लोकांना समजंवायची. अशातच आज एक प्रकरण पोलीस स्टेशनला आलं होतं. बलात्कार पिडीतेच्या आईनं आपली आपबीती सांगीतली होती व म्हटलं होतं की मॅडम, आपल्याला काय आहे. आपण असं काय गमावलं बलात्कारातून. मी तर आपली मुलगी गमावलीय. 
          सुनीता त्या बोलण्यावर विचार करायला लागली. विचार करीत होती की तिनं आपली कोणीच गमावलं जरी नसेल बलात्कारातून. परंतु तिनं आपली बहीण, जी लहान होती ती गमावलेली आहे. तसं त्या पिडीतेच्या आईचं बोलणं. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, 
          "माहीत आहे, मी माझी बहीण गमावली आहे बलात्कारातून. ती जेव्हा चार वर्षाची होती. तेव्हाच तिच्यावर बलात्कार झाला होता व तिला त्या नराधमानं मारुनही टाकलं होतं परंतु तो बलात्कार करणारा कोण? हे त्यावेळेस पोलिसांना माहीत न झाल्यानं फाईल बंद झाली होती. आजही तो गुन्हेगार मोकळाच फिरत असेल. परंतु सापडला नाही."
          सुनीतानं आपली खंत व्यक्त केली. तशी ती महिला म्हणाली,
          "माफ करा. म्या भावनेनं बोलले अन् का बोलू नये. माह्यं पोटचं लेकरु हाये ते."
           सुनीतानं त्या महिलेची गोष्ट समजून घेतली. शेवटी ती करणार तरी काय होती. 
          पोलीस स्टेशनचे खटले. ते खटले तपासता तपासता व त्या खटल्यातील आरोपींचा सुगावा लावता लावता सुनीताला वेळ मिळत नव्हता. तरीही ती वेळात वेळ काढून आपल्या बहिणीच्या फाईलवर लक्ष देत असे. तासन्‌तास बसत असे कधीकधी विचार करीत. विचार असायचा की आपल्या बहिणीचा आरोपी केव्हा केव्हा सापडेल अन् केव्हा केव्हा नाही.
          गुणवंता आज फार मोठा गुन्हेगार बनला होता. परंतु अद्यापही त्यानं काही पुरावे सोडले नव्हते. पुरावा सापडू नये म्हणून तो त्या प्रेताची विल्हेवाट त्या प्रेताच्या चेहर्‍यावर ॲसिड शिंपडून करीत असे.
               गुणवंत आज वयानं मोठा झाला होता व आज त्याला बलात्काराची सवय,पडली होती. त्यातच तो काळजी घेत होता. तशा बऱ्याच घटना छापून येत वर्तमानपत्रात. परंतु सुगावा काही लागत नव्हता. गुणवंत बलात्कार केल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट बरोबर लावत असे.
          गुणवंताला रिताचा फार राग येत असे. त्यातच तिनं घेतलेला बदला आजही त्याच्या लक्षात होता. तो गुन्हेगार बनला होता तिच्याचपासून. हेही त्याला आठवत होतं. शिवाय आजही तो रिताच्याच मागावर होता.
         सुनीता तशी उर्मिलाची नित्यनेमानं फाईल उघडून पाहात असे काही पुरावा मिळतो का म्हणून. परंतु अद्यापही पुरावा हातात सापडला नव्हता. परंतु रिताला वाटत होतं की ती उर्मिलाचं प्रकरण विसरली असेल. म्हणूनच ती चूप बसली असेल. तशी तिला आठवण करुन देण्यासाठी रिता एक दिवस सुनीताला म्हणाली, 
           "सुनीता, तू उर्मिलाला विसरली की काय? तिचा शोध घेणं बंद केलं की काय?"
           रिताचं ते बोलणं त्यावर सुनीतानं तिला सांगीतलं की तिनं उर्मिलाची फाईल बंद केलेली नसून आरोपी अद्यापही तिला सापडलेला नाही आहे. तो शातीर आहे व तो त्या खटल्यातून बराच दूर निघून गेलेला आहे. कदाचीत तो मरण पावलेलाही असू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही.
               गुणवंत रिता आणि सुनीताच्या गावातील मुलगा. त्यानंच उर्मिलावर बलात्कार केला होता व तिलाही मारुन नाल्यात टाकलं होतं. तसंच त्यानंच हौसावरही बलात्कार करुन तिलाही मारुन नाल्यात टाकलं होतं. तसं त्यानं बऱ्याच मुलींवर बलात्कार केला होता व त्यांनाही मारुन टाकलं होतं. तसं पाहिल्यास रिता व सुनीता ह्या उर्मिलाच्या बहिणी होत्या. 
           गुणवंतनं जेही बलात्कार केले होते. त्याचा सुगावा लागू दिला नव्हता व अजुनही त्या फायली सुनीतानं उघडल्या तरी पुरावे नसल्यानं सुनीतानं गुणवंतावर गुन्हेगारीचा ठपका लावला नव्हता. परंतु गुणवंतला माहीत झालं होतं की उर्मिलाची एक बहीण शिकली व ती पोलीस बनली. यदाकदाचित ती एक ना एक दिवस आपल्याला बलात्कारी म्हणून पकडेल व आपल्याला तुरुंगाची हवा चारेल. तेव्हा त्याआधी तिचाच बंदोबस्त लावण्याचा विचार तो करीत होता. तशी त्यानं बरीच प्रकरणं घडवून आणली होतीच. 
           सुनीता कधीही एकटी राहात नसे. ती घरी दारी वावरतांना कोणीतरी तिच्या सोबतच असायचं. परंतु तिला काय माहीत होतं की शत्रू तिच्या मागावरच असून एक ना एक दिवस तिला पकडेल व तिच्यावरच बलात्कार करुन तिलाही मारुन टाकेल. शेवटी तशीच गोष्ट झाली. एक दिवस गुणवंतला तशी नामी संधी चालूनच आली. ती घरुन दिवटीवर जाण्यासाठी एकटीच निघाली. वाटेत ती एकटीच होती. अशातच ती जंगलातील वाट लागली. 
          सुनीता काहीतरी कामानिमित्त शहराकडे निघाली होती. तशी ती पोलीस असल्यानं कराट्यांचं प्रशिक्षणही तिचं झालं होतं. तशी ती हिंमतवानच होती व धिप्पाड देहाचीही होती. परंतु बलात्कार करणारा गुणवंतही काही कमजोर नव्हता. तोही दमदारच होता. शिवाय शिताफीनं बलात्कार करण्याच्या व पळून जाण्याच्या अनेक योजना त्याचेजवळ होत्या. अशातच त्या जंगलाच्या वाटेवरुन एकटी जात असतांना त्यानं अडवलं. 
          गुणवंतानं तिला अडवलं. तसा तो तिच्याकडे हवसेची मागणी करु लागला. परंतु त्यानं तशी मागणी करताच सुनीता चिडली. त्यातच बाचाबाची झाली व याच बाचाबाची दरम्यान त्यानं सावधगिरीनं खिशातील रुमाल काढला. ज्या रुमालीला क्लोरोफॉम लावलेला होता. मग काय, त्यानं त्या धिप्पाड देहाच्या सुनीताच्या नाकाजवळ अति ताकदीनं तो रुमाल धरला व धिप्पाड देहाची कराटे शिकलेली सुनीताची मुर्ती त्या क्लोरोफॉमयुक्त रुमालीच्या आधारे बेशुद्ध पडली. 
           सुनीता बेशुद्ध पडली होती. तसं परीसरात कुणीच नव्हतं. त्यातच त्यानं तिला खांद्यावर उचललं. त्यानंतर त्यानं तिला जंगलातील त्याच नाल्याजवळ नेलं. जिथं त्यानं हौसावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्यानं विचार केला की आपण आधी बलात्कार करुन घ्यावा सुनीतावर. ती काही लवकर होशात येणार नाही. त्यानंतर तिच्या मस्तकावर वार करुन तिला मारुन टाकावं व नंतर तिच्या चेहर्‍यावर तेलात टाकून तिचा चेहरा ओळखू येवू नये असा करावा. त्यानंतर तिला हौसा नमस्कार उर्मिलासारखं नाल्यात ‍फेकून द्यावं. 
          त्यानं तसा विचार केला व त्यानं त्याच बेशुद्धावस्थेतच तिच्यावर पाशवी बलात्कारच केला. परंतु नियतीला ते काही मंजूर नव्हतं. ज्यावेळेस त्याचा बलात्कार सुरु होता. त्याचवेळेस ती हळूहळू होशात येत होती. तसं पाहता जणू क्लोरोफॉमची मात्रा कमी झाली होती व लवकरच तिची गुंगी उतरली. मग काय, तिनं पाहिलं की गुणवंत तिच्या अंगावर आहे व तो नशेत धृत आहे. बाजूला एक हातोडा आहे व एक बाटलही बाजूला ठेवलेली आहे व तिचं तोंड उघडं आहे. 
          ते तिचं होशात येताच निरीक्षण. त्यातच तिला त्या गोष्टी समजायला वेळ लागला नाही. त्यानं जे सामान्य आणलं होतं. त्यावरुन त्यानं तिला मारण्याचीच तयारी केली होती आणि आता त्यानं तिच्यावरच बलात्कार सुरु केला होता. 
          सुनीतानं होशात येताच जशा त्या गोष्टी पाहिल्या. तशी ती क्षीण झाली होतीच. परंतु ती वेळ कमकुवतपणा भोगण्याची नव्हती. तर हिंमतीनं व संयमानं काम करण्याची होती. तिनं लागलीच वेळ न दवडता त्याला आपल्या अंगावरुन अति ताकद लावून दूर केलं. तोच त्यानं आपल्या हातात तेजाबची उघडी बाटल घेतली. ज्यात खवळतं तेजाब होतं. 
           सुनीतानं जसं त्याला आपल्या उरावरुन बाजूला केलं. तोच त्यानं घेतलेली तेजाबची बाटल त्यानं तिच्या चेहर्‍यावर फेकली. ज्यातून तिच्या चेहऱ्यावर तेजाब उडताच त्याची लाहीलाही झाली. परंतु तिनं ते सगळं सहन करुन जवळच असलेला हातोडा हातात घेतला व जशी बंधूकीतून गोळी मारतात. तसा तो हातोडा तिक्ष्ण वेगानं त्याच्या दिशेनं जोरात फेकला. ज्या हातोड्याच्या वारानं तो जागेवरच पडला आणि बेशुद्ध झाला. 
          गुणवंत हातोड्याच्या वारानं बेशुद्ध झाला होता आणि ती होशात आली होती. तिला आता कमजोरी वाटत होती. त्याचं कारणही तसंच होतं. ती बेशुद्धावस्थेतच असतांना त्यानं तिच्यावर पाशवी बलात्कार केला होता. ज्यानं ती कमजोर झाली होती. त्यातच त्यानं तिला बेशुद्ध केलं होतं. त्यानंही ती जास्त कमजोर झाली होती. शिवाय तिच्यावर बलात्कार झाल्यानंतर तिच्या खाजगी भागावर दुखत होतं. याव्यतिरिक्त तिच्या चेहर्‍यावरही तेजाब पडल्यानं महाभयंकर वेदना होत होत्या. ज्या सहन होत नव्हत्या. तरीही ते सगळं सहन करीत तिनं वाकीटाकी शोधला. तो सापडेनासा होता. तोच त्याला तिनं कसंतरी आपल्या गाडीजवळ फरफडत आणलं. त्यानंतर त्याला आपल्या गाडीत चढवलं. त्यानंतर कशीतरी गाडी सुरु करुन ती गाडी तिनं कशीतरी हिंमतीनं पोलीस स्टेशनला आणली. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला पोहोचताच बेशुद्ध पडली. 
          पोलीस स्टेशनला आलेली ती पोलीसांची गाडी. त्या गाडीत बेशुद्धावस्थेतच असलेला गुणवंत. त्यातच ड्रायव्हर सीटवर बेशुद्धावस्थेतच पडून असलेली सुनीता. पोलिसांनी तिची परिस्थिती पाहिली व क्षणातच वेळ न दवडता तिला रुग्णालयात दाखल केलं व त्यालाही रुग्णालयात दाखल केलं. कारण तोही बेशुद्धावस्थेतच होता.
            तब्बल तीन दिवस झाले होते. आज गुणवंताला होश आला होता. परंतु ती मात्र होशात यायची होती. तसा तो होशात येताच त्यानं पाहिलं की त्याच्या आजुबाजूला पोलीस उभे आहेत. दोन डॉक्टरही आहेत व एक परीचारीकाही. तसं पोलिसांना त्यानं पाहताच तो घाबरला. म्हणाला, 
           " मी इथं कसा व मला इथं कोणं आणलंय?"
            ते त्याचे शब्द. तसा एक पोलीस म्हणाला, 
           "सगळंच माहीत होईल. जरा धिरानं घे." त्यानं त्या पोलिसांचे शब्द ऐकले व तो चूप बसला.
           पुरते आठ दिवस झाले होते व गुणवंत आता ठणठणीत बरा झाला होता. आता त्याची रवानगी पोलिसांनी तुरुंगात केली होती. मात्र त्याला तिथं का आणलं? का नाही? याचा अद्यापही पत्ता लागला नव्हता. कारण सुनीता अजुनही होशात आली नव्हती. ती अजुनही त्या रुग्णालयातील अंथरुणावरच अखेरचा श्वास घेत असल्याची चिन्हं दिसत होती. तशी तिची डॉक्टर असलेली बहीण तिची फारच काळजी घेत होती.
           आज पंधरा दिवस झाले होते. रितानं आपल्या बहिणीच्या डोळ्याचं निरीक्षण केलं होतं. त्यावेळेस तिला दिसलं की तिच्या बहिणीनं डोळ्याची हालचाल केलेली आहे. तशी ती ओरडली. म्हणाली, "सुनीतानं डोळ्याची उघडझाप केलेली आहे. आता ती होशात येणारच."
            सुनीतानं फिरवलेले डोळे. त्यातच रिताला झालेला आनंद. तो आनंद गगनात मावेना असाच होता. परंतु आज तब्बल तीन महिने झाले होते. परंतु तरीही सुनीता होशात आली नव्हती. त्यामुळंच रिता स्वतः डॉक्टर असूनही चिंतीत होती. तिला असा सदमा पोहोचला होता की ती अजुनही होशात आली नव्हती.
           आज तीन महिने झाले होते. तसे चेहर्‍यावरचे तेजाबचे घावही बरेचसे सुकले होते. कारण रिता तिची जास्त काळजी घेत होती. ती स्वतःच तिचं शरीर पुसून द्यायची. त्यानंतर तिच्या जखमा व्यवस्थीत स्वच्छ करायची व त्या जखमावर औषधीही लावून देत असे आणि मनोमन प्रार्थना करीत असे की ती लवकर होशात यावी.
          आज तीन महिने झाले होते. चेहऱ्यावरचे घावंही सुकले होते व आता तिच्या गुप्त भागाची तपासणीही झाली होती. ज्यात तपासाअंती माहिती पडलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला आहे. परंतु तो बलात्कार कोणं केलेला आहे. हे अद्यापही माहीत पडलं नव्हतं. त्यामुळं तो गुन्हा कबूल करीत नव्हता. 
            गुणवंत आज तुरुंगातच होता. शिवाय त्याचेवर खटला सुरु झाला होता. सुनीताच्या उत्तरीय तपासणीनंतर करून चुकलं होतं की गुणवंतानंच तिच्यावर बलात्कार केला. परंतु ते अजुनही सिद्ध झालं नव्हतं. कारण ती अजुनही होशात आली नाही. तिनं आपला कबुलीजबाब दिला नाही. असं गुणवंताचं म्हणणं होतं.
            सहा महिने होत आले होते. न्यायालयात गुणवंताचं प्रकरण सुरु होतं. त्यातच अजुनही सुनीता होशात आली नव्हती. त्यातच गुणवंतानं वकील लावला होता. ज्या वकीलानं न्यायालयात गुणवंताची बाजू उचलून धरली होती. त्यांचंही म्हणणं होतं की सुनीतावर बलात्कार कोणं केला याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. कारण प्रत्यक्ष पुरावा असल्याशिवाय कोणीही कोणाला गुन्हेगार ठरवू शकत नाही. तशी सुनीता होशात नाही. कदाचीत गुन्हेगार दुसराच असेल. तसेच तो आरोपी निसटून गेला असेल. त्यातच माझे अशिल तिच्या हातात सापडले असेल. तो बेशुद्धावस्थेतच असेल. त्याला मदत करण्याच्या हेतूनंही तिनं पोलीस स्टेशनला टाकून आणलं असेल. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळंच त्याला पकडून आणलं असेल. शिवाय जी मुलगी गाडी चालवत पोलीसस्टेशनला आली. जिनं माझ्या अशिलाला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यावरुन माझ्या अशिलाचा यात कोणताच दोष सिद्ध होत नाही. ती स्वतःच बेशुद्ध पडली. ज्याचं कारण ती कशाला तरी घाबरलेली दिसते. ती माझ्या अशिलाला घाबरलेली नाही. कदाचीत चुकीच्या व्यक्तीला पकडून आणल्याबद्दल तिला वेदना झालेल्या दिसत असून त्यानंच ती बेशुद्ध पडलेली दिसत आहे.