Anubandh Bandhanache - 9 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 9

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 9

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ९ )


प्रेम आणि अंजली तिच्या घराजवळ येऊन पोहोचतात, एका सुसज्ज अशा सोसायटी मधील बिल्डिंग मधे पहिल्या मजल्यावर अंजली रहात होती. 
दरवाज्याजवळ पोहोचताच तिने बेल वाजवली. प्रेम थोडा अस्वस्थ वाटत होता. अंजलीच्या आईला कसं सामोरं जायचं, हेच त्याला कळत नव्हतं. त्यांनी काही विचारले तर काय बोलायचे. हा सर्व विचार मनात चालु असतानाच दरवाजा उघडला गेला. आणि समोर अंजलीची आई ( मॉम ) उभी होती.
तिला पाहून अंजली बोलली....

अंजली : मॉम... बघ कोण आलंय...?😊
मॉम : मला वाटतं की...हा प्रेम आहे, बरोबर ओळखलं ना...😊
अंजली : हो... अगदी बरोबर ओळखल...😊
* असे बोलुन मॉम प्रेमला आत यायला सांगते. प्रेम थोडा घाबरतच आत येतो.
 आत येताच तो सर्वत्र पाहतो, घरातील इंटेरियर पाहुन तो थक्कच होऊन जातो. इतकं सुंदर सजवलेलं घर आजपर्यंत त्याने कधीच पाहिलं नव्हते.
 तो फक्त इकडे तिकडे पहातच रहातो. एंट्री लाच प्रशस्त असा हॉल होता. मध्यभागी छान लटकलेले झुंबर, एका बाजुला छान असा मोठा सोफा, त्यासमोर काचेचे टेबल, समोरच्या भिंतीला मोठे असे शोकेज, त्यामध्ये खुप छान छान अशा सजवलेल्या वस्तु, मधे टीव्ही, त्याच्या बाजुला साऊंड सिस्टीम, वरचे छत छान पीओपी डिजाइन केलेलं. खुपच सुंदर घर होते तिचे, जणु काही एखाद्या पिक्चर मधील घरासारखे वाटत होते.
प्रेम आत येतो, अंजली त्याला बसायला सांगते तसा तो कोच वरती बसतो. मॉम आतुन पाण्याची बॉटल घेऊन येतात, आणि प्रेमला विचारतात...
मॉम : प्रेम तुला थंड पाणी चालेल ना रे...
प्रेम : नको... साधं चालेल...
*मॉम एका ग्लास मधे पाणी भरून त्याला देतात, तो पाण्याचा भरलेला ग्लास पटापट पिऊन टाकतो.*
खरं तर त्याला अजुनही दडपण आले होते, मॉम सोबत बोलायचे. तो ग्लास खाली ठेवणार एवढ्यात मॉम नी त्याला पुन्हा प्रश्न विचारला....
मॉम : कसा आहेस तू ...? 😊
प्रेम : (थोडा अडखळत) हो... मी बरा आहे. तुम्ही कशा आहात...?😊
मॉम : आम्ही पण मजेत आहोत...😊 
*असे बोलुन त्या समोरच कोचवर बसल्या, आणि अंजली पण मॉम च्या बाजूला येऊन बसली, आता खऱ्या गप्पांना सुरुवात होणार होती.
प्रेम इकडेतिकडे नजर फिरवतच बोलला...
प्रेम : तुमचे घर खरच खुप छान आहे.😊
मॉम : अच्छा... आवडलं ना...!😊
प्रेम : हो... ना... खुप छान सजवले आहे.👌🏻
मॉम : थँक्स....(असं बोलून लगेच पुन्हा प्रेमला प्रश्न विचारतात.) तु जॉब करतो असं बोलली अंजु...?
प्रेम : हो... इथेच एका कंपनीत पर्ट टाईम जॉब करतो मी.
मॉम : मग कॉलेज वगैरे....?
प्रेम : कॉलेज पण चालू आहे.😊
मॉम : छान... म्हणजे शिक्षण आणि काम दोन्ही चालु आहे तुझं...👍🏻
प्रेम : हो... (आता अजुन काय काय विचारतील असं मनात चालु होते तोपर्यंत मॉम पुन्हा बोलल्या)
मॉम : अंजु तुझ्याबद्दल खुप बोलत असते. म्हणून मीच तिला बोलले होते, एकदा घरी घेऊन ये म्हणून...😊 आणि मला पण तुला भेटायचं होतं. एवढी तारीफ करते ती तुझी, म्हटलं मग भेटायला हवच.... पण खुप छान वाटलं तुला भेटून....आज पहिल्यांदा आला आहेस तू आमच्या घरी मग जेऊनच जा आता.😊
प्रेम : नाही जेवण वगैरे नको... मला जावं लागेल. मी घरी पण नाही सांगितलं. नंतर कधीतरी नक्की येईन. 😊
 ( असं बोलून प्रेम उठून उभा राहिला.)
मॉम : अरे हो...ओके, पण निदान बस तरी थोडा वेळ अजुन... मग जा...😊
मॉम मग खुप वेळ त्याच्याशी गप्पा मारत होत्या. त्याच्याशी बोलताना जवळ जवळ त्याची सर्व माहिती त्यांनी काढून घेतली. प्रेम च्या स्वभावाची त्यांनी खात्री करून घेतली. 

अंजली या दोघांच्या गप्पा फक्त ऐकत होती. 
मॉम अंजली कडे पाहून तिला बोलल्या... 
मॉम : अंजु... प्रेम ला तुझा रूम तरी दाखव, मी आलेच...
*असं बोलून मॉम किचन मधे निघून गेल्या. प्रेमला अजुनही अवघडल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात अंजलीने त्याचा हात पकडला आणि त्याला तिच्या रूम मध्ये घेऊन आली.
खूपच सुंदर असा सजवलेला तिचा रूम पाहून प्रेम सर्वत्र पहातच राहिला. अंजलीने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. एक चुटकी वाजवून त्यला भानावर आणले.
अंजली : प्रेम... काय पहातोय एवढं...?🤨
प्रेम : वाऊ... खूपच सुंदर आहे तुझा रूम...खरच खुप छान....😊
अंजली : खरच का...😊
प्रेम : हो ना... 😊

* तेवढ्यात प्रेम ची नजर एका ठिकाणी जाते. भिंतीजवळ एका स्टँड वर काहीतरी झाकून ठेवलेलं. ते काय आहे हे पाहण्याची त्याला इच्छा होते. पण तेवढ्यात मॉम एका डिश मधे केक घेऊन येतात. आणि प्रेम ला देतात. ती डिश हातात घेत प्रेम बोलतो...

प्रेम : अहो... हा खुप जास्त आहे, एवढा नाही संपणार. 😊
मॉम : अरे... संपेल खा तु... जेवायला पण नाही थांबणार बोलतोय मग हा खायलाच लागेल. 😊
* प्रेम डिश हातात घेतो, आणि अंजली कडे पाहून केक खायला सुरुवात करतो.
अंजली मॉम ला बोलते मलाही हवा आहे. तसं मॉम पुन्हा किचन कडे जातात. तेवढ्यात प्रेम तिला बोलतो.
प्रेम : अरे याच्यातलाच घे ना... मला खरच नाही संपणार एवढा सर्व...😊
अंजली : सॉरी... तो सर्व तुला खावाच लागणार आहे... कळलं. 😊
* तेवढ्यात मॉम अजुन एका डिश मधे केक घेऊन येतात, आणि अंजलीला देतात. आणि प्रेम ला विचारतात...
मॉम : प्रेम... तु कोल्ड्रिंक्स घेणार ना...?
* तेवढ्यात पटकन अंजली बोलते...
अंजली : अगं... नाही घेणार तो...कोल्ड्रिंक्स... त्याला चहा आवडतो. तुझ्यासारखा....😊😊😊
मॉम : अच्छा... खरच का... छानच... म्हणजे आता तुझ्यामुळे मलाही मिळेल.😊
अंजली : तुला तर कारणच हवं असते, चहासाठी हो ना मॉम...😊
मॉम : ( प्रेम कडे बघत ) बघितलं कशी बोलते मला... माझी सासु जन्माला आलीय माझ्या पोटी... नुसती नजर ठेऊन असते माझ्यावर...😊 बरं तुम्ही गप्पा मारा...मी चहा ठेवते.

* असं बोलून मॉम परत किचन मधे निघून जातात...

प्रेम ची नजर पुन्हा त्या वस्तू कडे जाते. त्याला राहवत नाही मग तो अंजलीला विचारतो....
प्रेम : तिथे काय आहे... झाकून का ठेवलंय ते...🤔
अंजली : अच्छा... ते, सरप्राइज आहे, ओळख बघु, काय असेल...😊
प्रेम : मला काय माहीत... तुझा रूम आहे, मग तुलाच माहीत असणार... सांग ना काय आहे... 😊
अंजली : अच्छा... मग तूच बघ काय आहे ते...

* ति असं बोलताच प्रेम केक ची डिश टेबल वर ठेऊन उठतो, आणि त्या वस्तू वरील कपडा काढतो... तर समोर स्टँड वर ठेवलेला खुप मोठा कीबोर्ड असतो. ते पाहून तो खूश होतो.
 आता मात्र त्याला राहवत नाही. कधी एकदा त्या किबोर्ड वर त्याची बोटं फिरवता येतील असं त्याला वाटतं... तो अंजली कडे पाहून बोलतो...
प्रेम : वॉव... खुपच छान सरप्राइज आहे. मी वाजवू शकतो का...?
अंजली : का नाही... आपलाच आहे.😊

* असं बोलून ती किबोर्ड चालु करते.
 प्रेम तसा कीबोर्ड शिकला नव्हता पण काही गाणी थोडी थोडी वाजवता येत होती त्याला... पटकन त्याने कीबोर्ड वर आपली बोटे फिरवायला सुरुवात केली... 
आणि त्यातून एका गाण्याचे सुर बाहेर पडू लागले.

🎹🎶 केशवा माधवा...
तुझ्या नामात रे गोडवा...
तुझ्या सारखा तुच देवा...
तुला कुणाचा नाही हेवा...
वेळोवेळी संकटातूनी...
तारीशी मानवा....
केशवा माधवा...
तुझ्या नामात रे गोडवा..🎶

* हे सुर कानी पडताच मॉम किचन मधुन लगेच अंजलीच्या रूम मधे आल्या. त्यांना माहीत होतं, हे गाणं तर अंजली ने कधीच वाजवलं नव्हतं. समोर किबोर्ड वर प्रेम ला पाहून टाळ्या वाजवत त्या बोलल्या...👏🏻

मॉम : अरे व्वा... खूपच छान वाजवतो तु... खुप दिवसांनी ही धुन ऐकली मी. तुला येतं वाजवता, मस्तच...👍
प्रेम : अहो नाही... मी प्रोफेशनली वाजवत नाही, पण काही गाणी वाजवतो असच...😊
मॉम : अरे पण खरच खूप छान वाजवतो तु... मग शिकत का नाहीस. तुला आवड आहे ना...
प्रेम : हो... आवड तर आहेच...पण वेळ नाही मिळत तेवढा... कॉलेज आणि जॉब यामधून...
मॉम : अरे असं काही नसतं... आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्यासाठी वेळ काढायला हवा की नाही... निदान छंद म्हणुन तरी...😊 अंजु ला पण आवडते, म्हणून तिला शिकण्यासाठी आम्ही हा कीबोर्ड घेतला. तिला शिकवायला तिचे सर येतात. तु पण येऊ शकतो तेव्हा. मी सांगेन त्यांना..😊
प्रेम : नाही... नको... मी ते असच थोडा टाईम पास म्हणून वाजवतो.😊
मॉम : अरे... तुला मनापासून आवडतं ना... मग आपल्या आवडी आपणच जोपासायला हव्यात ना...😊
प्रेम : हो... खरं आहे तुमचं म्हणणं... मी नक्की अजुन शिकण्याचा प्रयत्न करेन. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे आहे छोटा कीबोर्ड, त्याच्याकडून नक्की शिकेन.
मॉम : छान... खरच शिक... तुला संगीताची आवड आहे हे पाहून खुप छान वाटलं... मी आलेच चहा घेऊन.

* असं बोलून त्या निघून जातात...

अंजली : अरे व्वा...सॉलिड इम्प्रेशन...👍 मॉम ने माझी कधी एवढी तारीफ केली नाही आजपर्यंत... बघतेच तिला..🤨
प्रेम : अच्छा... खरच का...😊
अंजली : हो ना यार... 😔
प्रेम : इट्स ओके ना... तु शिकतेय ना अजुन... तुझी पण तारीफ होईल नंतर...😊
अंजली : अच्छा... कोण करणार आहे, मॉम की तु...?🤨
प्रेम : 😊 सर्वच करतील... तु छान गाणी वाजवली तर...😊
अंजली : ठिक आहे... मग तयार रहा, माझी तारीफ करण्यासाठी लवकरच..😊

* मॉम चहाचे दोन कप घेऊन येतात. एक प्रेम ला देतात....

मॉम : अरे... तो केक तसाच आहे डिश मधे... खाल्ला नाहीस, आवडला नाही का...? मी घरीच बनवला आहे. 😊
प्रेम : अहो...तसे काही नाही, केक खरच खुप टेस्टी झाला आहे. पण तो खुप होता. मी खाल्ला थोडा...😊
मॉम : बरं ओके... तु चहा घे...☕
प्रेम : अंजली नाही चहा पीत का...?🤔
मॉम : नाही... तिला आवडत नाही चहा...😊
अंजली : हो... मला नाही आवडत चहा 😏

* असं बोलून अंजली किचन मधे गेली, आणि कोल्ड्रिंक्स घेऊन आली आणि त्यांच्यासोबत पित बसली. खुप वेळ तिघांच्याही गप्पा रंगल्या. मुळात मॉम ला प्रेम चा स्वभाव आवडला, हे पाहून अंजलीला खुप छान वाटलं होतं. थोडा वेळ गप्पा मारून प्रेम जायला निघाला.
प्रेम : बरं मी निघतो आता... खुप छान वाटलं तुम्हाला भेटून...( असं बोलून मॉम च्या पाया पडतो)
मॉम : अरे... काय करतोय... राहू दे. 😊
मला पण खुप छान वाटलं. येत जा असच कधीतरी वेळ मिळेल तेव्हा... थोडा वेळ थांबला असता तर अंजूच्या वडिलांना पण भेटला असता. 
प्रेम : नाही... आज नको... असही खुप उशीर झालाय, नंतर आलो की नक्की भेटेन. 
मॉम : बरं ओके... पण नक्की ये... पुढच्या वेळी जेवल्याशिवाय जायचं नाही, आधीच घरी सांगून ये...😊
प्रेम : हो नक्की... बरं निघतो मी बाय...
मॉम : निघतो नाही रे... येतो मी बोलायचं 😊 काळजी घे... सावकाश जा..👍🏻
प्रेम : हो... बाय...
अंजली : मॉम... मी प्रेमला बाहेरपर्यंत सोडून येते...

* असं बोलून दोघे घरातून निघतात. बाहेर आल्यावर प्रेम थोडा रिलॅक्स होतो. अंजली त्याच्याकडे पाहून बोलते.

अंजली : थँक्स... प्रेम...😊 आज खुप छान वाटलं. मॉम खुप दिवसांनी असं कोणाशी तरी मनमोकळे बोलली. तु खरच खूप छान आहेस...😊
प्रेम : अच्छा...😊 पण खरच तू लकी आहेस तुला इतकी छान आई मिळाली आहे. 
अंजली : हो... खरच ती तर माझ्यासाठी जगातली सर्वात ग्रेट मॉम आहे.😊
प्रेम : बरं.. आता निघू का मी...?
अंजली : अच्छा... जातोय का खरच...,?
प्रेम : अरे... किती वाजलेत बघ जरा, घरी ताई वाट पहात असेल... मी निघतो. बाय...
अंजली : एक मिनिट (अस बोलुन पटकन एक हलकीशी मिठी मारते) ओके...आता परत कधी भेटणार आहोत आपण...😊
प्रेम : माहीत नाही पण लवकरच...😊
चल बाय... काळजी घे...

* असं बोलुन प्रेम तिथून निघतो... अंजलीने त्याचा हात हातात पकडून ठेवलेला असतो... तिला तो सोडावा वाटत नाही... पण प्रेम तिच्या डोळ्यात पहात हळू हळू हात सोडवून घेतो आणि पुन्हा बाय बोलुन निघतो...
प्रेम त्या काळोखात दिसेनासा होईपर्यंत अंजली त्याला पहात तिथेच उभी असते, तो दिसेनासा झाल्यावर मग ती घरी जाते.
 घरी आल्यावर ती पुन्हा तिच्या रूम मधे जाते. केक ची डिश तिथेच असते. एक अर्धवट खाल्लेला तुकडा उचलते आणि खाते... याची चव काहीतरी वेगळीच लागत होती तिला...😋
 चहाचा कप उचलून पहाते तर त्यामधे एक घोट शिल्लक असतो. खरं तर ती कधीच चहा पित नव्हती, पण आज तो थंड झालेला उस्टा चहाचा घोट प्यावासा वाटत होता. आणि शेवटी तो एक घोट ती प्यायली...😋

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️