Nikita raje Chitnis - 22 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २२

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २२

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.    सारंग                   काँट्रॅक्टर

भाग  22

भाग २१    वरून  पुढे  वाचा .........

शशिकला चिटणीस

निकिता आता तर तू पुरती अडकलीस. आता तरी तुझे प्लॅन्स सांगून टाक. कबुली दिलीस तर शिक्षा थोडी कमी होईल.” – पाटील.

“मी कसलाही प्लॅन केला नाही. कबुली कुठून देणार. तुम्ही मला यात उगाच अडकवण्याचा डाव रचता आहात तो मी सफल होऊ देणार नाही.” – निकिता.

“बरं. मी सांगतो. शशिकलाबाई, तुमच्या सुनेचा प्लॅन असा आहे की नितीन च्या मृत्यू नंतर कार्तिक ला बोलावून घ्यायचं आणि त्याच्या बरोबर लग्न करून सगळी कंपनी हातात घ्यायची. असा प्लॅन आहे. शशी मॅडम सांभाळा, कदाचित आता नितीन च्या नंतर तुमचा पण नंबर लागू शकतो.” – पाटील.

“निकिता तुला पोलिस कोठडी म्हणजे काय असत यांची जाणीव नाही म्हणून तू अस बोलते आहेस. तिथे गेल्यावर भल्या भल्यांच् अवसान गळत. आज मी तुझ्याच घरी शांत पणे विचारतो आहे. तिथे भकास खोली असते, चार चार जण असतात प्रश्नांच्या फैरी झाडल्या जातात आणि बाजूला दणकट स्त्री पोलिस पण असतात. तेंव्हा तूच विचार कर.” पाटील धमकावणीच्या स्वरात बोलले.

या वेळेस निकिता थोडी भांबावल्या सारखी वाटली. थोडी गप्प होती. काय उत्तर द्याव यांचा विचार करत होती. पाटलांचा संयम सुटत चाला होता. ते जमिनीवर काठी आपटत होते. म्हणाले.

“ओके एवढं सांगूनही इथे बोलायचं नसेल आणि तुझी इच्छा तशीच असेल तर आपण लॉकअप मध्येच बोलू. राधाबाई, बाहेरच्या मंडळींना आत  बोलवा.”- पाटील.

दामले आत आले पाठोपाठ देशपांडे पण आले. मला वाटल ते आता निघतो अस सांगायला आले असावेत. मी म्हंटलं “निघाले का ? अहो या सगळ्या प्रकारामुळे तुमची साधी विचारपुस पण करता आली नाही. सॉरी हं माफ करा.”

पाटील मध्येच बोलले. “थांबा जरा. मला तुमच्याशी बोलायच आहे. त्यानंतरच तुम्ही जाऊ शकता. निकिता शी पोलिस स्टेशन मध्येच बोलाव लागेल अस दिसतंय. हं तुम्ही कोण आणि यांच्याशी तुमचा काय संबंध आहे ?”

पाटील साहेबांनी बोलावलं म्हणून दामले आणि देशपांडे  मंडळी आत आली. मी दामल्यांशी बोलतच होते तेवढ्यात पाटील मध्येच बोलले. “थांबा जरा. मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतरच तुम्ही जाऊ शकता. निकिता शी पोलिस स्टेशन मध्येच बोलाव लागेल अस दिसतंय. हं तुम्ही कोण आणि यांच्याशी तुमचा काय संबंध आहे.”

“मी दामले ही माझी पत्नी, हे देशपांडे आणि ह्या त्यांची पत्नी. आम्ही अविनाश रावांचे मित्र आहोत. नितीन गेल्याच कळल्यामुळे आम्ही भेटायला आलो होतो.”

“तुम्ही पुण्यालाच असता ?” – पाटील.

“नाही. आमच गाव मिरज च्या जवळ आहे. मुद्दाम भेटायला आलोत.” – दामले.

“काय करता ? म्हणजे पोटा पाण्याचा काय उद्योग आहे ?” – पाटील.

“अहो या वयात काय करणार ? निवृत्तिचा काळ आहे. आमची घरं जवळ जवळ आहेत. रिटायरमेंट एंजॉय करतो आहोत.” – दामले.

“देशपांडे तुम्ही काय करता ?” – पाटील.

“रिटायर्ड.” – मुकुंदराव देशपांडे.

“कुठून” – पाटील.

“स्टेट बँकेतून. जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो.” – मुकुंदराव.

“यांच्या बद्दल काय माहिती आहे ?” – पाटील.

“आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. चांगली माणसं आहेत. अविनाश माझा शाळे पासूनचा मित्र. त्यामुळे या सगळ्यांना आम्ही चांगलं ओळखतो. तुम्ही म्हणता तसलं काही यांच्या हातून घडूच शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.” मुकुंदराव म्हणाले.  

“ठीक आहे. आम्ही आता जातोय त्यामुळे तुम्ही थांबलात तरी मला काही हरकत नाही. निकिता आम्ही पुन्हा येऊच पण त्या वेळेस तुला घेऊनच जाऊ. अजून वेळ गेलेली नाही. विचार कर. बबन आमच्या कस्टडीत आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करून उपयोग नाही. चला परब.” – पाटील.  

दामले समोर झाले आणि म्हणाले

“पाटील साहेब एक मिनिट, थोड विचारायचं होत.”

पाटिलांच्या कपाळावर आठ्या. चेहरा त्रासिक.  “काय ?” त्यानी विचारलं.

“नुसत्या संशयावर, म्हणजे काहीही सपोर्टिंग नसतांना एका प्रतिष्ठित घरच्या महिलेला, जिच्यावर आधीचा कुठलाही डाग नाहीये, आशा स्त्रीला तुम्ही लॉक अप मध्ये अडकवू शकता ?” – दामले.

“हे बघा आम्ही कोणालाही अडकवू शकतो. तुम्ही विचारणारे कोण ? तुमची इच्छा असेल तर तुम्हाला पण अनुभव देऊ, बोला.” पाटील आता रागात बोलले.  

“साहेब, अनुभवावरून माणूस शिकतो असं म्हणतात पण तुमच्या बाबतीत तसं  झालेलं दिसत नाही.” – दामले.  

“काय तुमचं नाव, हं दामले. हे बघ तू आत्ता जे काय बोललास ना ते तुझं वय पाहून मी सोडून देतो. पोलीसी इंगा काय असतो हे बघायचं आहे का ? भारी पडेल.” – पाटील.

मला कळत नव्हत की दामले असं का वागताहेत. उगाच शब्दाने शब्द वाढतो आणि मग कठीण होऊन बसत. बरं दामल्यांची आणि आमची इतकी ओळख पण नव्हती की त्यांनी आमच्यासाठी पोलीसांबरोबर वाद घालावा, दामल्यांना मी खाणा खुणा करून थांबायला सुचवत होते पण त्यांचा मूड वेगळाच दिसत होता, ते थांबायच्या मूड मध्ये दिसत नव्हते. मी निकिता कडे पाहील ती पण विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याच कडे बघत होती. तिने  माझ्याकडे पाहील आणि, काय करणार या अर्थानी खांदे उडवले.

दामले पाटिलांच्या जवळ गेले आणि म्हणाले  “मला फक्त एवढंच म्हणायचं होत की एखाद्या केस च्या चौकशी साठी भुरट्या चोरांना आणि हिस्ट्री शीटर बदमाशांना राऊंडअप करून, लॉक अप मध्ये घालणं वेगळं आणि एका प्रतिष्ठित महिलेला पुरावा नसतांना लॉकअप ची धमकी देणं वेगळं.”

“परब म्हातार्‍याची जीभ जास्तच वळ वळ करते आहे. घाला याला गाडीत. जरा आपला पाहुणचार देऊ.” आता पाटील साहेब संतापले होते.

“परब एक मिनिट थांबा. मी काय म्हणतो ते ऐका आणि मग मला आत टाका आणि पाहुणचार द्या माझं काही म्हणणं नाही.” दामले आता सुरू झाले.

“पाटील साहेब तुमच्या त्या चिकट पट्टीच्या थिअरी वर शेंबड्या पोराचा तरी विश्वास बसेल  का ? अहो ब्लड प्रेशर नावाची काही चीज असते की नाही ? अहो प्रेशर असत म्हणून रक्त बाहेर येत. बाहेर ची गोष्ट आत कशी जाईल ? उघड्या जखमे मुळे इन्फेक्शन होऊ शकत पण इन्फेक्शन मुळे माणूस दोन मिनिटांत मरत नाही. काही लक्षात येतंय का ? तो अनुभवी माणूस तुम्हाला त्याची कल्पना सांगतो आणि सगळा तपास तुम्ही त्याच दिशेने करता आणि हातात काहीच लागत नाही. बरं लिखित मध्ये तो माणूस काहीच द्यायला तयार नाही. म्हणजे मग तुमच्या हातात काहीच नाही. खरं कारण वेगळंच असणार पण ते तुम्ही शोधायला हवं. त्याच्या साठी कष्ट घ्यावे लागतात. ते तुम्ही करत नाही आणि नुसत्याच धमक्या देता? कदाचित हे धमकी प्रकरण तुमच्या अंगलट येण्याची शक्यता असू शकते. पाटील, शेणवी साळुंके गावाची केस जरा आठवा, आणि मगच धमकी द्या. 

पाटिलांचा नूरच एकदम बदलून गेला. दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.

“साहेब काय बोलताहात, तुम्हाला काय माहिती आहे ?” – पाटील.

आता पर्यन्त अरे तुरे करणारे पाटील, दामल्यांना साहेब म्हणाले.

“इथेच बोलायचं का ? की बाहेर ?” दामले म्हणाले.

दोघेही अंगणात गेले तिथे काय बोलणं चालल होत ते काही कळलं नाही. पण

पाटील साहेब चार चारदा हात जोडून विनवणी केल्यासारखे बोलत होते. थोड्या वेळाने गाडीत बसून निघून गेले. दामले हसत हसत आत आले. म्हणाले. “आता तुम्हाला पाटील त्रास देणार नाहीत. चिंता करू नका.”  

“अस काय सांगितलं हो तुम्ही की पाटील साहेब चार चारदा हात जोडत होते?” मी विचारलं.

“ते जाऊ द्या हो. ते महत्त्वाच नाहीये, पण आता ते तुम्हाला विनाकारण त्रास देणार नाहीत अस मला वाटतंय. बबनला पण आता सोडून देतील. त्यानी कसलाही कबुली जबाब दिलेला नाहीये. पाटील निकीताला घाबरवण्यासाठी तस बोलले. तुम्ही काळजी करू नका. हां त्याला मार हाण झाली आहे, त्याला तुम्ही थोडी सहानुभूति दाखवा. त्याची काळजी घ्या. बस. आता तुम्ही पुढे काय करायच यांची निवांत आंखणी करू शकाल. बरं आता आम्ही निघू ? बराच वेळ झाला आहे तुमची पण सर्व काम राहिली असतील. चला मुकुंदराव. अरे हो वाहिनी काही अडचण आली तर कुठलाही संकोच न बाळगता फोन करा. माझा आणि मुकुंदाचा फोन नंबर आहेच तुमच्याकडे.” – दामले म्हणाले.

“मकुंद भाऊजी तुम्ही तरी काही बोला.”

“अहो काही नाही दामले पण पोलिस होते. अमरावती च्या कमिश्नर ऑफिस मध्ये होते. तिथूनच रिटायर झाले. अजून काही नाही. पण आता बराच उशीर झाला आहे, चला आता येतो आम्ही.” – मुकुंदराव.  निकीताच पुढे आली आणि म्हणाली “जेवणाची वेळ आहे. तुम्ही लोक न जेवता गेलात तर आम्हाला बरं  वाटणार नाही. तेंव्हा जेवूनच जा”

जेवताना मुकुंद भाऊजी म्हणाले “वहिनी आता सर्व वाईट विचार मानातून  काढून टाका. अनंतानी पाटलांना चांगलाच डोस दिला आहे. चिंता करू नका. अहो किती  झालं तरी पोलिस कमिशनर म्हणून रिटायर झाले आहेत. अहो पोलिसांची पावलं पोलीसच ओळखणार न.”

हा आम्हाला एक आश्चर्याचा धक्काच होता. पण त्या दिवसा नंतर आम्हाला कसलाच त्रास झाला नाही. हळू हळू गाडी रुळावर येत होती. निकिता पण बरीच सावरली होती. आम्ही दोघींनी ऑफिस आणि फॅक्टरी मध्ये जायला सुरवात केली. पूर्वीचंच रुटीन पुन्हा सुरू झाल. रात्री जेवणाच्या टेबलवर चर्चा पण व्हायला लागल्या. काळ हे सर्वोत्तम औषध असत अस म्हणतात त्याची प्रचिती येत होती.

 

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.