Anubandh Bandhanache - 5 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 5

The Author
Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 5

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५ )

दुसऱ्या दिवशी कॉलेज होते त्यामुळे प्रेम लवकर उठून कॉलेजला गेला. तिथूनच तो ऑफिसला जात असे. 
आज त्याचे कॉलेजमधेच काय, कशातच लक्ष लागत नव्हते. ऑफिसमधे पण कामात लक्ष नव्हते. त्याला सारखा अंजलीचा तो गोड चेहरा डोळ्यासमोर येत होता. 
एक पाचवीत असलेली मुलगी किती मोठ्या मुलीसारखी वागत होती. अजुन पण त्याला तोच प्रश्न पडला होता. 
ऑफिसला आल्यावर लंच टाईम मधे.... तिला कॉल करायचा कि नाही...? याचाच विचार तो करत होता. नाही... हो... नाही... हो करत त्याने ती चिठ्ठी खिशातून बाहेर काढली. त्यावरील नंबर डायल केला. 
दोन बेल वाजल्या तसा त्याने पटकन रिसिवर ठेऊन दिला. नाही नको. आता नको... नंतर बघू... असा विचार करून काम करू लागला. तेवढ्यात ऑफिस मधील फोनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला आणि कानाला लावला. समोरून एक गोड आवाज आला. ' हॅलो कोण बोलत आहात आपण...? अंजलीच्या घरी कॉलर आयडी टेलिफोन असल्यामुळे थोड्या वेळापूर्वी प्रेम ने कॉल केला होता तेव्हा तो नंबर तिकडे डिस्प्ले वर गेला होता. 
तिचा आवाज ऐकुन प्रेम एकदम स्तब्ध झाला. त्याला काहीच सुचत नव्हते. काय बोलावे ते. 
अंजली तिकडून हॅलो हॅलो बोलत होती. शेवटी प्रेम बोलला...
प्रेम : हाय.... मी प्रेम बोलतोय...😊
अंजली : अरे...प्रेम तु.....! 😊 मग मघाशी कॉल का कट केलास. 🤔
प्रेम : काही नाही... ते असाच कट झाला असेल. 😊
अंजली : मला वाटलेच होते हा तुझाच कॉल असणार. मी वाटच बघत होते तुझ्या कॉलची. ☺️
प्रेम : अच्छा... खरच का...?🤔
अंजली : हो... खरच अरे... 😊
प्रेम : बरं... ओके, कशी आहेस...? जेवली का...? 
अंजली : हो... मी जेवले... तु जेवला का ?
प्रेम : हो आत्ताच जेवलो मी पण...😊
अंजली : किती वाजता ऑफिसमधून सुटतो.
प्रेम : रात्री ८ वाजता.
अंजली : का एवढ्या उशिरा...🤔
प्रेम : अरे... मी दुपारी येतो ना ऑफिसला म्हणुन रात्री लेट सोडतात. सकाळी कॉलेज असते ना, कॉलेज सुटले की इकडे येतो.
अंजली : अच्छा.... कोणत्या कॉलेज मधे आहेस. कोणत्या इअर ला...?
प्रेम : अकरावीचे पहिलेच वर्ष आहे माझे, तुझ्या स्कूल च्या थोडे पुढे... एच एम कॉलेज. स्टेशनजवळ...तिथेच...😊
अंजली : काय बोलतोय खरच...!☺️
प्रेम : हो.... का काय झाले...? 🤔
अंजली : अरे मग तिकडे पण भेटता येईल ना आपल्याला...कॉलेज आणि स्कूल सुटल्यावर...😊
प्रेम : नाही... तेवढा वेळ नसतो माझ्याजवळ, कारण मला लगेच निघावे लागते. ऑफिसला यायला...
अंजली : हो... पण कधीतरी भेटू शकतो ना आपण...?
प्रेम : ओके ठिक आहे. ते बघु नंतर... आता तु काय करते...?
अंजली : काही नाही थोडा होमवर्क आहे तो करते.
प्रेम : ओके, ठिक आहे कर... आपण नंतर बोलू...
अंजली : का... बोल ना आता... काम आहे का खुप ऑफिसमधे...?
प्रेम : हो... खरच खुप काम पेंडींग आहे. नाही झाले तर बॉस ओरडेल.😊
अंजली : बरं ठिक आहे... मग कधी होईल काम...? मी कॉल करू का नंतर...?
प्रेम : नको... तु आजिबात कॉल करायचा नाही ऑफिस मधे...मला वेळ असेल तेव्हा मी करेन. ओके....
अंजली : (थोडी नाराज होऊन) हो.... नाही करणार कॉल... बस...😔
प्रेम : अरे... राग आला का...? 😊
अंजली : मला कशाला राग येईल...?😔
प्रेम : ओके... सॉरी... पण ऑफिस मधे बॉस असतात. कधीही येतात ते, म्हणुन बोललो.
अंजली : हो कळलं... सॉरी नको बोलू पण...😊
प्रेम : बरं ठिक आहे... आता ठेऊ का फोन...?
अंजली : नको....😊
प्रेम : अरे....😊
अंजली : ठिक आहे... ठेव... बाय... टेक केअर.
प्रेम : हो... बाय...😊

असे बोलुन प्रेम कॉल कट करतो. आणि पुन्हा त्याच विचारात गुंग होतो. पुन्हा त्याला वाटतं आपण कॉल करून काही चुकीचे तर नाही केले ना...? 
पण तिच्याशी बोलुन किती छान वाटतं. ती वयाने खुप लहान आहे ते ठिक आहे, पण फ्रेंडशिप करायला काय हरकत आहे. त्यासाठी वयाचे बंधन नसते ना... 
( प्रेम स्वतःच स्वतःची समजुत काढत होता. )
पुढील काही दिवस हे असच चालु होते. प्रेमला जेव्हा दुपारी वेळ मिळायचा तेव्हा तो अंजलीसोबत बोलायचा. 
तिच्या बोलण्यातुन कधी असं जाणवतच नव्हते की ती एवढी लहान आहे. अगदी मोठ्या मुलींसारखे बोलत होती. हळु हळु त्या दोघांच्या बोलण्याचा वेळही वाढु लागला होता. 
एकमेकांशी बोलल्याशिवाय दोघांनाही चैन पडत नसे. हे आता रोजचेच झाले होते. महिन्याच्या शेवटी दिवाळी होती. अंजलीने प्रेमला भेटायला बोलवले होते.
 त्या दिवशी गुरुवार होता. कॉलेजला तर सुट्टीच होती. ऑफिस मधून पण पाच दिवस सुट्टी मिळाली होती. प्रेम संध्याकाळी मंदिरात जाऊन तिथुनच अंजलीला भेटायला गेला. आठ वाजता ठरलेल्या ठिकाणी अंजली त्याला भेटणार होती. 
तो तिथे यायच्या आधीच अंजली तिथे येऊन प्रेमची वाट बघत होती. त्याने लांबूनच तिला पाहिले. आज तिने स्काय ब्लू कलरचा छान असा ड्रेस घातला होता. त्यावर हलकासा मेकअप केला होता. 
आज ती खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या डॉल सारखी. प्रेम तिच्यासमोर आला आणि डोळेभरून तिला पाहु लागला होता. ती पण गोड हसत त्याच्याकडे पहात होती. अंजलीने त्याच्या डोळ्यांसमोर हात फिरवत त्याला बोलली....
अंजली : हॅलो.... काय बघतोय...? वेगळी दिसतेय का मी...?🤔
प्रेम : (भानावर येत) अरे... काही नाही...😊
अंजली : म्हणजे... चांगला दिसत नाही का ड्रेस...? आवडला नाही का तुला...?🤨
प्रेम : अरे तसे काही नाही...😊
अंजली : मग कसे...?🤔
प्रेम : अगं... वेडी... खुप सुंदर दिसत आहेस तु... गोड बाहुलीसारखी...☺️
अंजली : अच्छा... म्हणजे मी बाहुली वाटते का तुला...😔
प्रेम : अरे... म्हणजे... खुप छान दिसतेस. असे बोलायचे होते मला.😊
अंजली : हो... का...?😊
प्रेम : हो... रे... खरच खुप गोड दिसतेस.😊
(असे बोलुन प्रेम हळूच तिचे गाल ओढतो.)
अंजली : आई... ग... काय करतोय...?😋
प्रेम : काही नाही... बघितलं तुच आहेस का... बाहुली...☺️
अंजली : अच्छा... दुखले ना गाल...😊
प्रेम : सॉरी... कंट्रोल नाही झाले. ☺️
अंजली : ओके... ठिक आहे, मला पण आवडतं असं... पण माझ्या जवळच्या कोणी केलं तरच....😊
प्रेम : म्हणजे... आता नाही आवडलं का...?
अंजली : मी असे बोलले का...? नाही आवडलं म्हणून...☺️
प्रेम : बरं ऐक ना... आपल्याला इथे कोणी बोलताना पाहिले तर प्रॉब्लेम होईल ना...?
अंजली : कसला प्रॉब्लेम... आपण फ्रेंड्स आहोत ना... मग बोलू शकत नाही का असे.🤔
प्रेम : अरे... तसे नाही, असे रोडवर बोलणं बरे नाही वाटत ना.😊
अंजली : मग घरी चल ना... घरी जाऊन बोलू.😊
प्रेम : काय......? घरी.... वेडी आहेस का ? नको घरी नको.😊
अंजली : का नको...? चल ना मॉम डॅड पण आहेत घरी, मी ओळख करून देते तुझी त्यांच्याशी.
प्रेम : अरे.... आत्ता नको, नंतर कधीतरी येईन.😊
अंजली : चल ना आत्ताच, काय प्रॉब्लेम आहे आत्ता यायला.🤔
प्रेम : अरे... असा हट्ट नको करू, मी बोललो ना... नंतर येईन म्हणुन... आता मला घरी पण जायचं आहे. घरी पूजा असते ना, मग उशीर होईल जायला. ताई रागवेल मला.
अंजली : हो... पण आत्ताच तर आलास ना, लगेच जाणार...?🤔
प्रेम : अरे... अर्धा तास झाला मला येऊन.
अंजली : खरच...का... तुझ्यासोबत बोलताना वेळ कधी जातो ना ते कळतच नाही. 🙂
प्रेम : बरं... आता निघुया... असे जास्त वेळ रोडवर बोलणं बरे नाही वाटत. तु पण जा घरी, दिवाळी एन्जॉय कर छान....👍🏻
अंजली : प्रेम.... थांब ना अजुन थोडा वेळ.
प्रेम : अरे... आत्ता नको, मी कॉल करेन, मग तेव्हा बोलू...ओके.
अंजली : (हात पुढे करत) प्रॉमिस... नक्की कॉल करशील...?😊
प्रेम : (तिला हात मिळवत) हो...प्रॉमिस, नक्की करेन उद्या. आता आपण जाऊया. ओके... बाय. ✋🏻
अंजली : ओके... पण फक्त बाय नाही बोलायचं... सी यू... बोलायचं.😊
प्रेम : अच्छा... असे का...?😊
अंजली : मॉम नी सांगितले, आपल्या लोकांचा निरोप घेताना. बाय...सी यू... बोलायचं.😊
प्रेम : ओके... मॅडम, लक्षात राहील इथून पुढे ही गोष्ट. ओके...आता निघायचं का...? उशीर होतोय ना... 😊
अंजली : ओके... खुप छान वाटलं पुन्हा तुला भेटुन, असाच भेटायला येशील ना... कधी कधी...😊
प्रेम : हो मला पण खुप छान वाटलं. मी येईन नक्की भेटायला तुला.... पण नेहमी नाही पण कधीतरी....ओके.😊
अंजली : ठिक आहे... नीट जा, बाय..सी..यु...✋🏻
प्रेम : हो... तु पण जा घरी आता. बाय.. सी.. यू... ☺️✋🏻
असे बोलुन प्रेम जायला निघतो. अंजलीचा हात अजुनही त्याच्या हातात असतो. ती सोडत नसते पण, प्रेम स्वतःहून तो सोडवून घेतो. आणि जायला निघतो. प्रेम पुढे जाईपर्यंत अंजली तिथेच त्याला पहात उभी असते. जाताना प्रेम मागे वळुन पाहतो आणि तिला घरी जाण्यासाठी हातानेच ईशारा करून सांगतो. मग ती पण त्याला हात दाखवून घरी निघुन जाते.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️