Mother Wanted (One Act) in Marathi Women Focused by Balkrishna Rane books and stories PDF | आई पाहिजे (एकांकिका)

Featured Books
Categories
Share

आई पाहिजे (एकांकिका)

पात्र परीचय-1)आई-40 वर्षे च्या वर.
2)पूर्वा-काॅलेज तरूणी
3)सुलभाताई-पूर्वाची आत्या
4)ठाकुर,गोडसे,राऊत काकू महिलामंडळाच्या सदस्या.

(संपन्न घरातला हाॅल,टेबलावर काही पुस्तके व वह्या अस्ताव्यस्त पडल्यात.खुर्चीवर उश्या वाकड्या-तिकड्या दिसताहेत. आई येते व सर्व व्यवस्थित ठेवते. सगळीकडे एकवार नजर फिरवते.)
आई- छे---छे काय हा पसारा.? एक वस्तू जागेवर असेल
तर शप्पथ! रोज सकाळ-संध्याकाळ हा पसारा आवरावा लागतो. अहो एकच मुलगी आहे तर हा एवडा पसारा ;मुलगी कसली सळसळती बिजली आहे ---बिजली ! पण गोड आहे बर का?---पण अजूनही ही झोपली आहे की काय? पूर्वा----ये पूर्वा अग साडेतीन वाजलेत. ऊठ--ऊठ-- तूला मैत्रीणींना भेटायला जायचंय ना?
(पूर्वा डोळे चोळत बाहेर येते.)
पूर्वा- अग हे काय ग मम्मी ,अजून थोड झोपायचं होत
---अं---अं(टेबलाला टेकून पेंगते , तोल जाऊन पडता पडता आई सावरते.)
आई - अग ऐ पूर्वा, पडणार होतीस ना! अग तूझ्या मैत्रिणीचा---अक्षयाचा दुपारनंतर दोन वेळा फोन आला होता. काय आहे आज ? कुठं जाणार आहात तुम्ही?
पूर्वा- अग किती प्रश्न विचारशील ? आज अक्षयाचा बर्थडे आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी गार्डन मध्ये जाणार---नंतर आक्षयाचा बर्थडे साजरा करणार.---मग थोडी मौज मजा ---आई ग! अजून तयारी करायचीय----गिफ्ट खरेदी करायचाय---मम्मा हे काय ग? थोड आधी उठवायच ना!
आई- (हसून) मघापासून आणखी दुसरं काय करत होते.आणि हे बघ संध्याकाळी लवकर घरी ये. हं कोण -कोण आहेत सोबत?
पूर्वा-
मम्मा , मी आता मोठी झालीय. माझी काळजी करू नकोस. काॅलेज मध्ये शिकते. मला बर वाईट कळत.
आई-
अग तस नाही. सध्याच वातावरण बर नाही. ते निर्भया प्रकरण आणि हिंगणघाटच जळित प्रकरण ---ती मुलगी तर प्रोफेसर होती. भिती वाटते ग. आजकाल कुणाचा भरंवसा देता येत नाही. ----आईच काळिज माझ.
पूर्वा-
अग सार्या मैत्रिणी आहेत सोबत--निशा, वैष्णवी,मारिया,शबाना,करूणा---(अचानक हसते---हसत राहते.)
आई---
अग---अग अशी वेड्यासारखं हसतेस काय?
पूर्वा-
- हसू नको तर काय करू!(हसते) अग ती करूणा ना ! तिची गंमतच आहे.सध्या 'करोना ' चा धुमाकूळ चाललाय ना, त्यामुळे करूणाला काॅलेज मध्ये सारे जण 'करूणा व्हायरस ' आला असच म्हणातात. काल तर एका मूलांन क्लासमध्ये बातमी वाचून दाखवली -'करूणामुळे लाखो दगावले. सार्यांनी करूणा पासून सावध राहावे.सारे खदखदून हसत होते.
आई-
-हे तर अती झाल.बिचारी करूणा.,
पूर्वा-
-अग तिने आपल नाव बदलायचं ठरवलंय. 'नकुशा'
... नाव लावणार आहे ती! हाऊ फनी--! ते जाऊंदे. पप्पां कधी येणार आहेत पुण्याहून?
आई-
-का ग?
पूर्वा-
उद्या काॅलेज मध्ये फंक्शन आहे. त्यासाठी पालकांना बोलावलंय.
आई--
मग, मी येते ना!
पूर्वा-
- तू !---अं---नको.तू अगदी काकूबाईसारखी वागणार मला आॅकवर्ड वाटेल.
(आई काही क्षण गप्प राहते. मान दुसरीकडे वळवते.)
आई---
ठिक आहे,ते आज रात्री येतील,सांग त्याना त्याबद्दल.
पूर्वा---
अरेच्चा---विसरलेच की पप्पांसोबत त्यांचा मित्रही येणार आहे. जेवण करून ठेवायला सांगितलय---सकाळी फोन आला होता.
आई---
लवकरच सांगितलंस बाई !आता धावपळ होणार. थोड्या वेळाने महिलामंडळाच्या सदस्या येणार आहेत.वार्षिक कार्यक्रमाची रुपरेखा ठरवायला.
पूर्वा-
ओ--गाॅड! त्या गोडसे,राऊत आणि ठाकुर काकू ना?
एक नंबरच्या पकाऊ बायका आहेत.आल्यावर नको नको ते प्रश्न विचारतात. त्या येण्यापूर्वीच पळाल पाहिजे. जाते मी.
(गरकन वळते---आईला धडकते.)
आई--
अग हळू.
पूर्वा-
- हळू----छे! मी एकविसाव्या शतकातील तरूणी आहे.मला तूफानावर स्वार व्हायला आवडते. वादळाशी टक्कर देत हाती बिजलीचा आसुड घेत---बेभान होऊन---मुक्तपणे विहरायचय मला---स्वच्छंदी पक्ष्यांप्रमाणे----
आई---
हो---हो---जरा दमाने घे. लक्षात ठेव परवा आपल्याला महाबळेश्वरला जायचंय.परवा कुठचा प्रोग्राम ठेवू नकोस.
पूर्वा-
तू येणार आहेस ?
आई-
का ग?
पूर्वा-
तू असलीस ना की सगळी मजा किरकिरी होते. हे खरे नकोस ते करू नकोस ----जस मी कुकुल बाळ आहे. ठिक आहे,---मी तयारी करते.
(आत जाते,आई तिच्याकडे पाहत स्तब्ध---उभी राहते.)
आई----
काय म्हणावं आजकालच्या मुलांना!त्यांना आई कालबाह्य वाटते.(उसासा सोडते---एवड्यात दारावर टकटक)आल्या वाटत गोडसे बाई. या--या---दार नुसतच लोटलेल आहे. या!(गोडसे,राऊत आणि ठाकुर वहिनी आत येतात.) बसा .झाली तयारी?
ठाकूर-
कसली तयारी----!अजून कशातच काही नाही.
राऊत-
नाही म्हणजे थोडंफार नियोजन झालय---मी स्वागत करणार---ठाकुर वहिनी प्रास्ताविक करतील.
गोडसे-
मी निवेदन करणार---अन तुम्ही आभार मानायचे ,बर का!
आई-
म्हणजे माझ नेहमीच काम ! सभा गुंडाळण्याच.
राऊत-
पूर्वा कुठे आहे?
आई-
ती बाहेर जाण्याची तयारी करतेय. मी चहा घेवून येतेय.
तोपर्यंत तुम्ही चर्चा करा. (आत जाते.)
गोडसे-
बिचार्या सावंत वहिनी, दिवसभर राबत असतात. पण पूर्वेला त्याच आहे का? भिंगरी सारखी फिरत असते.
ठाकुर-
अहो ,एकुलती एक मुलगी ! बापानं भरपूर कमाऊन ठेवलय तिच्यासाठी. आपलं काय जातंय? आपण उद्याची
प्रॅक्टीस करूया---का?
गोडसे-
होय---होय--- चला मी निवेदन करते. बघा हं--(उभी राहते. हातात माईक असल्याप्रमाणे हात तोंडासमोर धरते. दोघींकडे बघून---) मग सुरू करू--?
दोघिही- (एकदम)
हां हां ---सुरू करेंगे---सुरू कर.
गोडसे-
हे हो काय? इथ परेड करायचीय आहे काय? (दोही हसतात) ---हॅलो---हॅलो तर आपल्या 'सखी शेजारणी --या---या--
राऊत-(उठत)
अहो गोडसे वहिनी--सखी शेजारणी नव्हे --' सखी सार्याजणी ' हे मंडळाचे नाव आहे समजल!
गोडसे-
साॅरी--साॅरी तर आपल्या सख्ख्या---
ठाकूर-
अहो; सख्ख्या नव्हे सखी---सखी--!
गोडसे-
होय ;तेच ते---तर आपल्या 'सखी सार्याजाणी 'या महिला मंडळाचा आज वार्षिक----वार्षिक---(माग वळून ) काय हो ते ?
राऊत-
(उठतात---गोडसेंच्या कानाजवळ मोठ्याने) --वर्धापन दिन.
गोडसे-
होय---होय---तेच ते! तर आज वर्धापन दिन आहे. त्या
निमित्ताने आज मास्टर शेफ स्पर्धा आयोजित केली आहे.या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून कुप्रसिध्द अ---
(ठाकुर त्यांचा हात धरून थांबूवतात)
ठाकूर-
कुप्रसिध्द नव्हे ----सुप्रसिद्ध----सुप्रसिद्ध!
राऊत-
त्यांनी आपल्या मंडळाला पाच हजार रूपयांची देणगी
दिलीय हे लक्षात ठेवा---बर का?
गोडसे-
होय ,---होय तेच ते. सुप्रसिद्ध हाॅटेल व्यवसायिक ढमढेरे मॅडम---उपस्थित आहेत.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाकुर वहिनी करत आहेत.(मागे वळून) या हो ;ठाकुर वहिनी---
(ठाकुर वहिनी पर्समधून आरसा काढतात---चेहरा पाहतात --'केस,पदर व्यवस्थित करतात. पूढे येतात----स्टेजवर चढण्याची अॅक्शन करतात.उजवा पाय उचलून आपटतात)
ठाकुर-(दोन्ही हात मोराच्या फूललेल्या पिसार्यासारखा वर करून) तर आजचा दिवस म्हणजे सुवर्णमयी आहे.(पुन्हा उजवा पाय वर उचलून आठवतात.)
राऊत-
अहो,ठाकुर वहिनी सारखा -सारखा पाय उचलून का आपटता ?
ठाकुर-
अहो,मागच्या वेळी मी स्टेजवर बोलत असताना -- मी उभी असलेली स्टजची फळी तुटली व मी सरळ स्टेजखाली गेले----सार्यांना वाटल ही अशी अचानक अदृश्य का झाली?
नशिब माझ ---,खरचटण्यावर भागल! तिथून मी ठरवल ---बोलताना स्टेजचा अंदाज घ्यायचा. (पुन्हा पाय आपटतात ) हो--हो पुन्हा नाक-तोंड एक व्हायला नको. (दोघीही तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसतात.)
तर आपल्याला ह्या अतिमोठ्या ---(जीभ चावत) साॅरी ---ह्या अतिमहनीय अश्या ढमढेरे मॅडम अध्यक्षा म्हणून लाभल्यात---(पुन्हा पाय आपटतात)
गोडसे-
हळू---हळू सावंतवहिनींची टाईल्स फुटेल.
ठाकुर-
तर या ढमढेरे मॅडम बद्दल मी काय बोलू? थांबा मी तूम्हाला वाचूनच दाखवते.
(मागे वळून पर्सजवळ जातात. पर्स मधून कागद काढतात.पुन्हा वर चढण्याची अॅक्शन,पाय्उचलून आपटता त
व कागद वाचायला सुरुवात करतात.) आपल्या अध्यक्षा पूर्वी भाजी विकायच्या पण टाटा-बिर्लांपासून प्रेरणा घेवून
त्यांनी हाॅटेल व्यवसाय सुरू केला.आज शहरात त्यांची चार हाॅटेल्स,पाच वडापाव सेंटर,दोन भेळपुरी स्टाॅल्स सुरू आहेत व त्यांना चार पाय एक शेपटी---दोन शिंगे असून वजन सुमारे शंभर किलो आहे.
गोडसे-राऊत-
ठाकुर वहिनी काय वाचताय?
ठाकुर-
अरे देवा खरच की ,काल कामाच्या गडबडीत अर्धवट लिहिलेला कागद टेबलावर ठेवला होता बहुधा आमच्या चिरंजीवांनी त्यावर गाईच्या पाडसाची माहिती लिहिलीय!
राऊत-
त्या ढमढेरेंचा नवरा नगरसेवक आहे अन रागीट आहे.आपल्या मंडळाचे तीनतेरा वाजवेल.
राऊत-
चला आता माझ काम सुरू (हातात गुलाब धरल्याचा अभिनय करत) आजच्या अध्यक्षा सौ.ढमढेरे यांचं स्वागत मी गुलाबपुष्प देवून करत आहे.(फूल देण्याची अॅक्शन) तसेच मंडळाच्या अध्यक्षा सौ.ठाकुर यांचंही मी स्वागत करते(फूल उचलण्याचा अॅक्शन---पटकन हात मागे घेते.)आई---ग---हाय--हाय--'
ठाकुर-
अग काय झाल--?
राऊत-
अहो,गुलाबाचा काटा टोचला ना--!(हसते) हं हे घ्या फूल---टाळ्या---टाळ्या---
गोडसे-
टाळ्या उद्या---आज नाहीत. आज रिहर्सल आहे.
(आई चहा घेवून येतात.)
आई-
चहा घ्या---झाली प्रॅक्टीस?
राऊत-
होय .आमची झाली.तुमची प्रॅक्टीस राहिली.
आई-
मला कशाला पाहिजे प्रॅक्टीस?आभारच तर मानायचेत.
हे असे.(थोड पुढे जाऊन उभी राहते.) आज या कार्यक्रमाला सौ.ढमढेरे मॅडम उपस्थित राहिल्यात तसेच त्यांनी मंडळाला पाच हजार रूपये देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते.या कार्यक्रमाला ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार. ----धन्यवाद!
ठाकुर-
व्वा ---छान---आम्हाला बाई नाही अस जमत.बर उद्या सर्वांनी वेळेत या. (सगळ्याजणी उठतात.तेवढ्यात पूर्वा येते.)
पूर्वा-
हाय ओल्डीज!.बाय---बाय--जाते ग मम्मी.
ठाकुर-
अग, जाते नाही ;येते अस म्हणावं.
गोडसे-
अग ती आपल्याला 'म्हतार्या' म्हणाली.
राऊत-
म्हणेना,---आंम्ही अजून तरूण आहोत.चला उद्याची तयारी करायचीय. (सगळ्याजणी उठतात)
आई-
अग, एक मिनीट , एकूण किती स्पर्धक आहेत? रेसिपी कोणत्या आहेत.
ठाकुर-
आठ स्पर्धक आहेत अन रेसिपींची नाव धमाल आहेत जस,मोमोज, मारी बोंबाज कटलेट---
आई-
पुरे ---पुरे ऐकूनच कान तृप्त झाले. येते मी उद्या.
(सगळ्याजणी जातात. तेवढ्यात सुलभाताई येतात.)
सुलभाताई तूम्ही,-- एवड्या वर्षांनी?
सुलभाताई-
अग भेटावसं वाटल---आले.पूर्वा कुठे आहे?आता कशी दिसते?
आई-
बाहेर गेलीय, येईल. आल्यावर तुम्हीच बघा कशी दिसते ती! बर,तुमचा नितीन काय करतोय?
सुलभाताई-
अग त्यानं लग्न केलय. स्वतःच ठरवलं. मी फक्त आशिर्वाद दिला.आता दोघं पुण्याला राहतात.मी आपली पुन्हा एकटी.हे एकटेपण खायला उठत ; म्हणून आले.बाकी कुणी आपल नसत हेच खर.(दोघीही एकमेकांना बघत काही क्षण गप्प!)चल घर तरी दाखव. नवे काय बदल केलात?
(दोघीही आत जातात.त्यानंतर पूर्वा येते.)
पूर्वा-(खुर्चीवर बसत)
दमले ग बाई. पण आज मजा आली.मम्मा---ग मम्मा जरा पाणी दे.(आई पाणी आणते.)
आई-
पूर्वा एक विचारू?
पूर्वा- काय ग?
आई -आता तूला सोडायला आलेला तरूण कोण होता?
पूर्वा- हे---बघ उगाच संशय घेवू नकोस. बर वाईट कळत मला!
आई- तस नव्हे, सहज चौकशी केली.
पूर्वा- हे बघ तो माझा चांगला मित्र आहे.पण तू माझ्या कामात नाक नको खुपसू.
आई- अग हे तरूण आपल्या जाळ्यात ओडतात--फसवतात.आई म्हणून सांगते, सावध रहा.
पूर्वा- आई?कोण आई?काय केलंस तू माझ्यासाठी?जगातल्या सर्व आया करतात तेच ना! हे बघ माझ मी बघून घेईन.
(एवड्यात सुलभाताई येतात)
सुलभाताई- व्वा---छान! पूर्वा तू खर मोठी झालीस! कुण्या कवीने म्हतलय ' आई वृध्द होत नाही कधी फक्त मुल मोठी होतात एवढंच.' खरच तू मोठी झालीस.
पूर्वा- तूम्ही---तूम्ही कोण? मम्मा या आपल्या घरात काय करताहेत?
आई- अग या----(सुलभाताई खुणा करून थांबवत.)
सुलभाताई- थांब ग.मीच सांगते तिला. तिच व माझ नात काय ते.पण--पण त्या पूर्वी तिला तूझं व तिच नात काय ते कळायला हव.
आई- जाऊ दे ना ताई.अजून समज नाहिय तिला.
सुलभाताई- समज नाही?ती तर म्हणतेय 'मी मोठी झाली म्हणून.
पूर्वा- हे---हे-बघा तुम्ही खुप बोलताय.
सुलभाताई- बोलाव लागेल मला---काय म्हणालीस आईने काय केल तूझ्यासाठी. अग हिनं तूझ्यासाठी काय केल हे कळल तर ---तर पश्चात्ताप होइल तूला तूझ्या बोलण्याचा.
पूर्वा- काय----काय वेगळे केल हिनं माझ्यासाठी?ऐकू दे मला!
सुलभाताई- एखादी आई आपल्या पोटच्या मुलासाठी करणार नाही एवड केलय हिनं तूझ्या साठी.
पूर्वा- (दचकून) पोटच्या --मुलासाठी?म्हणजे---मी--मी--
आई- ताई---ताई--थांबा ना! तिला नको हे कळायला--- उध्वस्त होईल ती.(घपकन खुर्चीवर बसते.)
सुलभाताई- (सुस्कारा सोडत)चुकून तोंडातून बाहेर पडल.पण आज त्यावरचा पडदा उठू दे.एकोणीस वर्षे जपलेल गुपित कळू दे तिला.गुपित---'गुपित' ठेवण्याचा शब्द तू दिला होतास ,मी नाही!
पूर्वा- कसल गुपित ?
सुलभाताई-- हि---हि तूझी सख्खी आई नाही. पण सख्या आईने हिच्या पायाच तिर्थ घ्याव अस तिन तूला वाढवलय---जपलय.
(काही क्षण तिघी गप्प---स्तब्ध उभ्या. )
पूर्वा- (रडत) नाही--नाही हे सर्व खोट आहे. (आईजवळ जाते.तिचे खांदे पकडून) सांग ना मम्मा हे सर्व खोट आहे म्हणून!
सुलभाताई- अग ती बोलणार नाही. तिनं तूझ्या बापाला तसा शब्द दिलाय.मी सांगते-हिच्यामुळे 'आई ' या शब्दाला अर्थ आलाय! आई शब्दाचा अथांगपणा म्हणजे मूर्तीमंत ही.
पूर्वा- (डोक गच्च पकडत) मला--मला काहीच कळत नाहिय.
सुलभाताई- ऐक---एकोणीस वर्षांपूर्वी तूझ्याजन्मावेळी तूझी आई हे जग सोडून गेली.तू सारखी रडत होतीस.आम्ही सारे सैरभैर झालो होतो.काय करावे--काही कळत नव्हते. तूझे पप्पा कोल्हापुरात राहयचे.मी त्याची मावसबहिण मी ही तिथेच राहायचे.तूझ्या पप्पांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली---'आई पाहिजे ' म्हणून-
पूर्वा- काय? 'आई पाहिजे '
सुलभाताई- होय, आई पाहिजे. आजही हिच्याकडे (आईकडे बोट दाखवून) जपून ठेवलेली असेल ती जाहिरात!अशी जाहिरात देवून ' आई 'मिळते ? पण ही ती जाहिरात बघून आली.जगाला कंटाळलेली---त्रासलेला ही म्हणाली मी या मुलीला संभाळीन तिने तूला उचलून घेतले---आणि आश्चर्य तू ओरडायची थांबलीस.जणू तिच तूझी आई आहे ! तूझ्या बापानं हिच्याशी लग्न करायच ठरवलं.पण त्याने दोन अटी घातल्या.
आई- ताई ---बस्स---पुढे नको ---ना
पूर्वा- अटी? कसल्या अटी?
सुलभाताई- हिने(आईकडे बोट दाखवून) कसलिही अपेक्षा ठेवायची नाही व स्वतःला मूल होवू द्यायच नाही.
पूर्वा-(धक्का बसून) काय?
सुलभाताई-होय!ही म्हणाली 'पूर्वा च' माझी मुलगी आहे.आणखी मूल कशाला पाहिजे. ती तूझी कायदेशीर आई झाली . ---तूझ्यात रंगून गेली. मी सार पाहत होते. तू धडपडत पहिल्यांदा उभी राहिलीस तेव्हा ती आनंदाने वेडापिशी झाली.तूला बोट घरून चालवायला तिनेच शिकवलं. तूझ्या सोबत ती स्वतः लहान व्हायची.तू बोबड्या आवाजात 'आई ' म्हणून पहिल्यांदा हाक मारलिस तेव्हा ती आनंदाने नाचली.मला म्हणाली 'ताई माझ्या जगण्याला आज अर्थ आला----मी खरच आज आई झाले.
पूर्वा- हे---हे सार खर आहे?
सुलभाताई- खर?तूच म्हणालीस ना आई म्हणून काय केलंस?एकदा तूझ्या हाताला चटका लागला ---फोड आला.तेव्हा ही रात्रभर रडत बसली होती. तळहाताच्या फोडासारख जपली तिन तूला.नंतर तुम्ही कोकणात शिफ्ट झालात . माझा संपर्क तुटला.(आई जवळ जाते--तिला उठवत) चल माझ्या सोबत---मी एकटीच आहे ---सोबत होईल. पूर्वा मोठी झाली --- राहिल आपल्या पप्पां सोबत.
पूर्वा- थांबा--(आईजवळ जाते---मांडीवर डोक ठेवते) आई--!
आई-काय म्हणालीस ? 'आई'----
पूर्वा- होय. आई---आई---आई.(रडते)
आई- गप्प---माझ बाळ ते. शांत हो---
पूर्वा- आई अन् आत्या तुम्ही कुठंही जावू नका. हिच माझी जन्मदाती आई--.आई ती अंगाई म्हण ना---जी तू मला झोपविण्यासाठी म्हणायचीस.
आई- (मृदूपणे) आली बघ गाई-गाई
शेजारच्या अंगणात
फूललासे निशीगंध
घोटाळली ताटव्यात
सुलभाताई- (प्रेक्षकांना) कुण्या रशियन कवीने लिहिलय-
आई या शब्दाला आरंभ नाही
व अंताची त्याला भिती नाही
आपण फक्त एवढंच करू शकतो
. की उठून उभ राहून तिला
'वंदना' देवू शकतो.
(पडदा---)


बाळकृष्ण सखाराम राणे

सावंतवाडी