A father is a father... in Marathi Biography by Prof. Krishna Gaware books and stories PDF | बाप हा बाप असतो...

Featured Books
Categories
Share

बाप हा बाप असतो...

बाप 

नमस्कार मित्रांनो,

आज कहानी नाही आयुष्यात अचानक आलेल्या एका वादळाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, आणि हे वादळ आले ते माझ्या आयुष्यात...

 ज्याची कल्पना तर सोडाच स्वप्नात सुद्धा कधी विचार आला नसेल...

1 जुलै 2023,

शनिवार नेहमी प्रमाणे सगळ कस सुरळीत चालू होत...

संध्याकाळी अचानक 7.30 ला ताई चा फोन आला, 

आणि मन उदास झालं....तीच वाक्य होत...

अरे कृष्णा... अण्णा सापडत नाही...

मला थोड वेगळं वाटलं...कारण ती अस कधीच म्हणाली नव्हती... 

क्लास चालू होता...त्यामुळे तिला थांब म्हणत ...मी....घराबाहेर आलो आणि पुन्हा विचारलं....हा बोल ताई काय म्हणालीस...

तेव्हा दबक्या आवाजात ती पुन्हा तेच म्हणाली...


अरे अण्णा सकाळी निघालेले माझ्याकडे यायला पण ते आलेच नाही....

मी ही थोडा अस्वस्थ होऊन म्हणालो,

अरे सकाळी निघाले ना...मग आता पर्यंत यायला हवे होते तुझ्याकडे...

13 किलोमीटर अंतर यायला येवढा थोडाच वेळ लागतो.

बघ तिथेच मंदीरात वैगरे थांबलेले असेल....

अस म्हणून मी फोन बंद केला.पुन्हा राहवलं नाही ....

आणि पुन्हा घरी फोन केला ...

अक्का ला विचारलं तेव्हा कुठ कळलं की अण्णा सकाळी ताई कडे जाऊन येतो म्हणून सकाळीच सायकलवर घराबाहेर पडलेले....

मग थोड मन घाबरायला लागले, तसे फोन कॉल वाढायला लागले....

त्याच दिवशी संध्याकाळी ताई शिरसगाव ला पोहचली...

आई ची अवस्था ही बिकट झाली होती...

तसे ताई चे मला सतत फोन चालू होते ...

काय करावं काही कळत नव्हत...

कारण मी ही घरापासून 200 किलोमीटर इथे बसून फक्त कॉल करू शकत होतो.

चुलत भाऊ, भाऊ, दाजी, चुलते, मित्र परिवार यांनी अगोदरच शोध मोहीम चालू केली होती.

शक्य तितके प्रयत्न ते करत होते...

रात्रभर सर्वजण प्रयत्न करत होते.

मला ही जेवढं शक्य होत तेवढे गावातल्या व्यक्तींना msg, कॉल करून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होतो.

रात्र कशी काढली माहिती नाही ....

पण पहाट होण्याची वाट फक्त पाहत होतो,

विचारांच्या काहुरांनी, 3 कधी वाजले समजले नाही...तसा उठून आवरायला लागलो.

3.30 पर्यंत सर्वांचं आवरून आम्ही गाडीत बसलो. थोड अवघड होत पण...

आणखी तीन जणांची जबाबदारी अंगावर होती.

डोक्यात मात्र एकच विचार....

अण्णांनी रात्र कुठे काढली असेल...कारण...

ज्या बापाने आपल्या घरासाठी, बायको,  पोरांसाठी, कधीही घर सोडलं नाही तो बाप आज बेघर होता...का आणि कशासाठी...???

ज्याने कधी स्वतःचा विचार केला नाही, संपूर्ण आयुष्य मातीत कष्ट करत घालवल...

रात्र पाहिली नाही की दिवस... ऊन ,वारा, पाऊस कशाचीही तमा बाळगली नाही. 

फक्त शेती, गाय, शेळी, कुत्रे, पीक ह्याच गोष्टीचा विचार करत जगला आज तो घरापासून दूर कुठ असेल हाच विचार मनात घर करून बसला होता.पांढरा शर्ट, डोक्यात पांढरी टोपी, गळ्यात माळ, पायात रबरी चपला, पांढरा पायजमा...

शक्यतो गावाकडे हे कपडे घालणारे लोक सत्तर टक्के तरी असतील...

जसा गावाचा रस्ता चालू झाला तसे...

हा पोशाख परिधान करणारा प्रत्येक व्यक्ती मला बापाची जाणीव करून देत होता...

डोळ्यांना अचानक भास होत..तसा गाडीचा वेग कमी होत होता...

राहुरी पासून ओड जरा जास्तच जाणवत होती....

पण आसुसलेले डोळ्यात मात्र काळजी व त्यांची एक झलक पाहण्यात श्रीरामपूर कसे आले समजले नाही,

 निघाल्या पासून ताईचे चार पाच फोन होऊन गेले, सावकाश ये, काळजी करू नको, गाडी नीट चालावं...

अगोदर पोलिस स्टेशन ला गेलो, विचार केला २४ तास झालेत,

अगोदर हरवल्याची तक्रार दाखल करावी जेणे करून पोलिसांची मदत होईल.

पण तिथे ही थोडा वेळ गेला.

फोटो आण...हीच साइज लागेल, फॅक्स करावा लागेल, रविवार असल्यामुळे बहुतांश दुकाने बंद होती.

त्यांना उघडायला वेळ आहे म्हणून...ज्या रस्त्याने अण्णा ताई कडे जातात त्या रस्त्याचा सुगावा घेण्यासाठी आम्ही निघालो.

तिथेच, ताई, चुकत भाऊ, व इतर मंडळी पण भेटले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न....

तुमच्यापैकी कुणाला दिसले का अण्णा...?

पण प्रत्येकजण काही न बोलता आणखी कुठे शोधता येईल का ?

हाच विचार मनात घेऊन पुढे जात होता.

शेवटी चुलत भावाचा फोन आला की फोटो केले मोठे तू पोलीस स्टेशन ला ये म्हणून....

तसच पुन्हा प्रत्येकाने वाट वाटून प्रत्येक दिशेने शोध घेण्यासाठी निघून गेले....

स्टेशन गेलो ....

तोपर्यंत दाजी, चुलत भाऊ, ताई, साडू, सर्वच तिथे येऊन थांबले होते.

ज्याला तक्रार द्यायची त्यानेच आत मध्ये या. बाकी बाहेर थांबा म्हणून मधून साहेबांचा फतवा आला.

म्हणून मी पुढे सरसावलो....

पोलिस मॅडम ने विचारले सांगा काय झालं....तस मी बोलायला सुरुवात केली....

दोन ओळी टाईप केल्यावर जेव्हा पत्ता सांगायला सुरुवात केली तेव्हा कीबोर्ड चालणार हात अचानक थांबला...

मला वाटले माझे काही तरी चुकले की काय...?

तशा मॅडम म्हणाल्या तुम्ही तर पुण्याला राहता मग तुम्ही तक्रार नाही देऊ शकत...

मी थोडासा गोंधळलो...म्हणजे...?

तेव्हा मॅडम म्हणाल्या तुमचा पत्ता पुण्याचा आणि तुम्ही इथे राहत नाही मग तुम्हाला तक्रार देता येणार नाही...

आधीच डोक्याचं दही झालेलं आणि त्यात हे नवीन ऐकून तर डोकंच हललं...

थोडी हुज्जत घातल्यावर मॅडम यांनी आमचा पत्ताच शिरसगाव टाकला....

असो....SP साहेब स्वतःच्या तोंडाने म्हंटले की आम्ही जनतेच्या सेवेसाठी च आहोत...

मग थोडे बरे वाटले...

आणि मी रीतसर तक्रार दाखल केली. (२०२३/८६)तिथून निघून आल्यावर सर्वांचीच शोध मोहीम चालू झाली.

 घरी जाऊन आई ला भेटलो.

थोड शांत बसलो काय काय आणि कस झालं याची विचारपूस केल्यानंतर आम्ही पुन्हा ज्या रस्त्याने आण्णा गेले होते त्या रस्त्यावर पुन्हा आलो....

तो दिवस फक्त आणि फक्त अण्णा...