Praktan - 11 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 11

Featured Books
Categories
Share

प्राक्तन - भाग 11

प्राक्तन -११


आतापर्यंत आपण बघितलं की मयुरेश आणि अनिशा मधले सगळे गैरसमज दूर होतात. आणि हेच सांगायला अनिशा तिच्या ठरलेल्या जागी पहाटे यशला भेटायला जाऊन त्याला हे सगळं सांगते. तोही तिचा झालेला गैरसमज आणि तिच्या मनातली सगळी इनसिक्यूरिटी दूर करतो. पण तेवढ्यात अनिशाला शोधत मयुरेश तिथे येतो. आणि त्या दोघांना एकमेकांसोबत पाहतो. आता पाहुया पुढे काय होते...

आता पुढे.

अनिशा गेल्यानंतर मयुरेश शेजारी ती झोपलीय म्हणून हात टाकतो पण ती जागा मोकळी असते. अनिशा तिथे नाही म्हणून तो जागा होतो. आणि वॉशरूमजवळ जात बघतो तर तो दरवाजा बाहेरून लॉक असतो. मग तो तिला घरात सगळीकडे शोधतो पण ती घरात कुठेच नसते. आता त्याला तिची काळजी वाटत असते. कारण कालही सकाळी उठल्यावर ती घरात नव्हती. त्याच्या मनात वेगवेगळे विचार थैमान घालत होते. क्षणाचाही विचार न करता तो घराबाहेर पडतो. आणि खाली गेटजवळ जात वॉचमनला विचारतो की त्यांनी अनिशाला इथून कोणत्या दिशेने जाताना बघितलं. तेव्हा तो वॉचमन एका दिशेकडे बोट करून सांगतो. पण ते ऐकून मयुरेश नखशिखांत घाबरतो आणि धावतच तिकडे जातो. तर समोर अनिशा पाठमोरी कुणाच्या तरी हाताला बिलगून बसलेली दिसते. आणि तो बोलतो,

" अनिशा तू इथे काय करतेस?" त्याचा आवाज ओळखताच अनिशा घाबरून मागे वळते आणि अचानक त्याला समोर बघून जराशी गोंधळते. ती चिंतेने यशकडे बघते तर तोही उठून उभारलेला असतो. आणि आश्र्चर्य म्हणजे तो स्मितवदनाने उभा असतो. मयुरेशचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते.

" अनिशा हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. " तो पुढे अजून काही बोलणार तितक्यात तीच त्याचं बोलणं तोडत म्हणाली.

" मयुरेश तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी मी तुमच्या दोघांची ओळख करून देते. हा माझा मित्र आहे डॉ._______" ती अडखळत सांगत असते.

" आमची ओळख करून देण्याची काही गरज नाही. हवं तर ओळख मी करून द्यायला हवी होती तुझी त्याच्यासोबत. पण तीही संधी तू मला दिली नाहीस. हे तुझ्याकडून मला अजिबात अपेक्षित नव्हतं अनु.." मयुरेश तिला मध्येच थांबवत यशकडे बघत म्हणाला. तसं तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

" अरे भाई..." तेवढ्यात यश हसत मयुरेशला आलिंगन देत म्हणाला.

" अरे चेष्टा बस कर, ती बघ किती पॅनिक झालीय. " यश हळूच मयुरेशच्या कानाजवळ जात पुटपुटला.

" आणि हे तुझ्याकडूनही अपेक्षित नव्हतं मला डॉक्टर. अरे निदान एकदा साधी कल्पना तरी द्यायची होती तू मला.. " मयुरेश नाराजीने यशकडे बघत म्हणाला.

" हे हे सगळं काय आहे, मला काहीच कळत नाहीये. यश प्लीज तू तरी सांग तुम्ही ओळखता का एकमेकांना? लवकर सांगा नाहीतर मला वेड लागेल आता.." अनिशा तिचं डोकं धरत म्हणाली.

" अगं आम्ही दोघे लंगोटी यार आहोत. आणि तू या नालायकाची बायको आहेस हे मला आज तू त्याचं नाव सांगेपर्यंत माहित नव्हतं. खरं तर चुक याचीच आहे, याने विश्वासाने याआधी कधी माझी साधी ओळखही करून दिली नाही तुला... नाहीतर आपण इथे अनपेक्षितपणे भेटलो आणि बाकी सगळा योगायोग आहे. पण आता हा इथे आजच नेमका कसा टपकला ते तू त्याला विचार.. " यश सगळी हकीकत थोडक्यात सांगत तिला म्हणाला. तसं तिने मयुरेशकडे बघितलं.

" काय राव चोर ते चोर वरून शिरजोर. आणि तू माझ्याकडे अशी काय बघतेस, तू मला न सांगता माझा मित्र चोरलास. " मयुरेश अजूनही मस्ती करत होता. ते बघून यशने एक रट्टा मारला त्याच्या पाठीवर...

" अबे ये मारतो काय थांब सांगतो सगळं... अनु मी मघाशी झोपेतून जागा झालो तेव्हा बाजूला तू तिथे दिसली नाही म्हणून मी तुला शोधत गेटजवळ येऊन वॉचमनला विचारलं तर त्याने इकडे आलीय म्हणून सांगितलं. तसा मी घाबरून इकडे धावत आलो. आय स्वेअर इथे येईपर्यंत माझ्या मनात किती भयानक विचार येत होते. बट थॅन्क गॉड तू सुखरूप आहेस. आणि अनएक्स्पेक्टली मला माझा सर्वात जुना मित्रही इथे भेटेल असं वाटलं नव्हतं. " मयुरेश काळजी आणि हर्षमिश्रित आविर्भावात म्हणाला. आता तिला सगळा प्रकार थोडासा लक्षात आला होता.

" पण तुम्हा दोघांची ओळख कशी आणि कुठे झाली मला कळेल का? आणि तुम्ही या जागी यावेळी इथे भेटताय? यशचं समजू शकतो पण अनु तू इथे?" मयुरेशने विचारलं. कारण ती भयानक जागा आणि तिथे घडलेला यशच्या फॅमिलीबाबतचा अपघात त्याला माहित होता. शिवाय यश इथे येत असतो हेही त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने अनिशाला विचारलं.

" मी सांगतो तुला. पण हो ते सगळं तू काळजावर दगड ठेवून ऐक. " यश गंभीरपणे म्हणाला.

" नाही यश प्लीज..." अनिशा त्याला न सांगण्यासाठी विनवत होती. पण यशने तिला धीर दिला. आणि मागील पाच महिन्यांपूर्वी पासून जे काही घडलं ते सगळं सांगायला सुरुवात केली.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.