आज नागपंचमी हा सण आपण घरोघरी साजरा करतो प्रत्येकाकडे पद्धत जरी वेगवेगळी असली तरी संस्कृती तीच आहे श्रावण महिन्यातील हा आपला पहिलाच सण या दिवशी नागदेवतेची घरोघरी पूजा करतात किंवा वारुळाकडे जाऊन तिथे सुद्धा पूजा केली जाते जर तिथे नाहीच गेले तर आपापल्या घरी भिंतीवर चुन्याने किंवा खडू नये नागोबाचे घर काढल्या जाते तिथे नऊ नागदेवता चे चित्र काढून त्यांना हरळ आघाडा फुले यांचा हार केला जातो तसेच या दिवशी गव्हाच्या पिठाचे कानोटे म्हणजेच पाण्यात उगवलेली पुरीसारखा चौकोनी पदार्थ गूळ टाकून लाह्या मुरमुरे दूध याचा नैवेद्य दाखवतात .., कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या नदीपात्रातून सुखरूप वर आली ती याच दिवशी
हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासूनच नागांची पूजा करण्यात येते असे म्हटले जातेयाच्या अनेक कथा प्रचलित आहेत जसे की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळणी नागिणीचे तीन पिल्ले मृत्युमुखी पडले व त्यांना नागदेवतेचा कोप झाला असे म्हणतात त्यामुळेच या दिवशी शेतामध्ये नांगरत नाही कुठेही जमीन खणत नाहीत
घरी देखील कोणीही पूजन झाल्याशिवाय कुठल्याही भाज्या चिरायचा नाही काही कुटायचं नाही लोखंडाची कुठलीही वस्तू वापरायची नाही जसे की तवा कढई यावर काही भाजायचं नाही त्यामुळे नागदेवतेची पाठ भाजले जाते असे म्हटले जाते तसेच तळलेले पदार्थही या दिवशी चालत नाही या दिवशी गव्हाची खीर , दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवून शेतकरी सर्पमित्र यांची पूजा करून आम्हाला संरक्षण व अभय दे असे प्रार्थना करतात
पंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो असे म्हणतात या दिवशी हा उपवास केला नाही भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते याविषयी देखील एक कथाप्रचलित आहे ती इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते सतीईश्वरी नावाची देवी तिचा भाऊ सत्येश्वर हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी चतुर्थीला मरण पावला होता
ती खूप दुःख आणि कष्टात होती या दिवशी ती तिच्या सासरी असताना भावाच्या आठवणीत व्याकुळ होत होती तिच्याजवळच असणाऱ्या नागदेवतेला तिची दया आली व तिने तिच्या भावाच्या रूपात तिला दर्शन दिले सत्तेश्वरीला वाटलं आपल्या भाऊ आला म्हणून त्यांना त्याच्यासाठी व्यवस्थित खानपान केलं त्याची पूजा केली1
आणि ती नेहमीच नागदेवतेची पूजा करायची तिचा भाऊ समजायची पाठीराखा म्हणून त्याला दरवर्षी पूजन करायची नागदेवता याच्यावर प्रसन्न होऊन तिला असे वचन दिले की जी बहीण आजच्या दिवशी भावासाठी उपवास धरेल त्याला माझ्यापासून तर अभय असेलच पण त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल हे ऐकून सत्य आहे ती खूप खुश झाली पण त्यानंतर तिने तू नेहमीच माझ्या पाठीशी असतील असे वचन मागितले ते वचन म्हणून नागदेवांनी तिच्या हातावर एक चिन्ह गोंदले ते वचन चिन्हाचे प्रतीक चिन्ह म्हणजेच आज आपण हातावर काढतो ती मेहंदी म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरून महिला मुली सुवासिनी कुमारी का सर्वजणी हातावर मेहंदी काढत असतात.
या दिवशी प्रत्येक सासुरवासणीला माहेरपणाची ओढ असते नागपंचमीच्या दिवशी उंच उंच झाडांना बांधलेल्या झोका घेऊन आपल्या भावासाठी त्या गाणे म्हणतात आता एवढेच कुणाला येत नाही म्हणून निमित्ताने किंवा पाच धोके खेळण्याचा आनंद व्यक्त होण्याचा आजचा दिवस असतो कामाच्या दगदगीत थोडासा वेळ गृहिणीला देखील मिळावा म्हणून आपले सणवार देखील असेच काढले असतील हे पाहून यावर आपलं मत नक्कीच पक्क होतं..
आनंद व्यक्त होऊन गाणी म्हणत आपल्या मनात काय आहे हे एकमेकींना सख्यांना आपल्या मैत्रिणींना सांगून मन हलकं करण्याचं एक काच ठिकाण असावं..
एक ननंद आपल्या वहिनीला कासई म्हणजेच छाप पाडण्याची एक प्रकारची रांगोळी असते ती काढून देण्यासाठी आपल्या वहिनीला आग्रह करत असते पंचमच्या दिवशी ती खूप गडबडीत असते आणि तिला कामामध्ये असताना राग येतो म्हणून ती तिच्या नंदीला सांगत असते की तू तुझे काम करत जा मी कशी करू हे गाण्यातून व्यक्त होत आहे..
वहिनी वहिनी कासही द्या ना
भीतीवर पडली घेऊन जाणा
हात नाही पुरत काढून द्या ना..
झाडून घेते फिरून यांना
वहिनी कासई वहिनी द्याना..
भांडी घासते फिरून यांना..
स्वयंपाक करते फिरून यांना
अशाप्रकारे ती वेगवेगळ्या कामांची पाहणी देत असते आणि नंतर दोघी ननंद भावजय मिळून ते काम पूर्ण करून दोघेही झोके घ्यायला जातात..
मला एवढी गाणी येत नाहीत पण माझी आजी खूप छान ओव्या म्हणायची त्यातील दोन-तीन ओळी लिहिते..
श्रावण महिना सण आला ग पंचमीचा
मला ध्यास लागे माहेराच्या वारुळाचा
पंचमीचा सण नका करू भाज्यांची कापणी
आजचा दिवशी हळदी कुंकवाला मागणी
पंचमीला नको करू तळण भाजन नाग भाऊ राया तुला सुखाच मागणं
नागोबाच्या फनी वर निजले ग नारायणफण उभारून धरती धरी सावरून
नागराजा श्रावणात तुझं पहिलं पाऊल तुझ्या रे येण्याची मला लागली चाहूल
नागोबाच्या नैवेद्याला खीर पानोळे करतेनैवेद्याच्या पुढे रांगोळी नागाची काढते
आशीर्वाद दे रे भाऊ राया तू पाठीशी राहून गणा गोत्याचा सावलीत संस्कृतीला धरून
✍️✍️Archu