दारावरची बेल वाजली ......राधा नी दार उघडल ........समोर तीस वर्षाचा तरुण हातात .....एक छोटीशी दुधाची बोट्टेल हातात घेऊन उभा होता ....
हे .........मी अर्जुन .....इथे तुमच्या समोरच राहायला आलोय ............जोशी काकूच्या घरात ........घरातील दूध संपलं होत ...... आणी नवीन असल्यामुळे इथे दूध कुठं मिळत मला काही माहित नाही .....तर प्लिज .....थोड माझ्या मुलासाठी दूध मिळेल का ? त्याला खूप भूक लागली आहे ....तो खूप रडतोय .......
राधा नी डोळ्यानेच हो म्हणून् इशारा केला ...... आणी अर्जुन च्या हातातील बॉटल घेऊन ती आतमध्ये गेली ..... राधा नी बनवलेल्या मिसळ च्या वासाने ........अर्जुन च्या तोंडााला पाणी सुटले होते ....गेली कित्येक दिवस असा जेवणाचा सुंदर वास त्याला आला सुुधा नव्हता .......आणी मिसळ म्हणजे त्याचा वीक पॉईंट .........
राधा दुधाची बॉटल घेऊन आली ......आणी तीने अर्जुन च्या हातात दुधाची बॉटल दिली .....पण अर्जुन चा मात्र तिथून पाय निघेना .....त्याची नजर मात्र स्वायंपाक घरात शिजत असलेल्या ....मिसळ च्या वासावर च खिळून होती ......राधा ते समजलं ......तीने एका डब्यात मिसळ त्या सोबत पाव आणी एका डब्ब्यात मिसळ बरोबर बनवलेलं मसाला ताक आणी गुलाबजाम च डब्बा अर्जुन च्या पुढे केला ......
राधानी पुढे केलेल्या डब्ब्याला अर्जुन नाही बोलूच शकला नाही ......ते सगळे डब्बे आणी दूध घेऊन तो घरी आला ..... त्याने त्याच्या एक वर्षाच्या मुलाला ते बाटलीतले दूध पाजले ......त्या लेकराची भूक भागली आणी तो खेळायला लागला .......ते सगळं करण्यात अर्जुन ला नेहमी प्रमाणे उशीर झ्हाला होता .....सगळं आवरून त्याने राधानी दिलेले डब्बे ऑफिस मध्ये खाण्यासाठी घेतले ...... इतक्यात कामवाली बाई आली .....अर्जुन ने मुलाची जबाबदारी तिच्याकडे सोपवून तो ऑफिस मध्ये आला .....
ऑफिस मधली फिल्टर कॉफी घेऊन त्याने कामाला सुरवात केली ..... पण त्याचे लक्ष काही केल्या कामात नव्हते .....त्याच्या नाकात राधाने केलेल्या मिसळ च वास इतका बसला होता .....की कधी जेवणाची वेळ होते ....आणी कधी तो त्यावर तुटून पडतो अस त्याला झ्हालत..........
शेवटी एकदाची जेवणाची वेळ जहाली......डब्बा घेऊन जवळ जवळ तो कॅन्टींग मध्ये पळत च गेला ..... आज त्याने कोणाचीही वाट न बघता डब्बा उघडला ......मिसळ ,गुलाबजाम आणी मसाला ताक .....अहाहा ......मस्त बेत.........
इतक्यात .....अर्जुनचे मित्र तिथे पोहचले ........अर्जुन ला आणी त्याच्या समोरच्या डब्याकडे बघून त्यांना थोड कुतूहल च वाटल .....
हसत हसत ....त्याच्या एका मित्राने त्याला विचारलेच .....की
अर्जुन ......आज चक्क् तुझ्यां बायको ने तुला डब्बा दिला .......
अर्जुन नी हसत हसत बोलला .........माझ्या नशिबात कुठे एवढं मोठ सुख ....... तिला साधा डाळ भात सुद्धा बनवता येत नाही .....ना माझ्याकडे आणी आमच्या मुलाकडे लक्ष देता येते ........बोलता बोलता ....त्याच्या डोळ्यात पाणी तरंगले.....
सोड ना तो विषय ........अर्जुन चा एक मित्र समजवण्यांच्या सुरात बोलला .....
मग सगळ्या मित्रानी हसत हसत ....आपापल्या डब्ब्यावर ताव मारला ..........
***********
रात्र जहाली .....अर्जुन घरी आला .......आज जरा त्याला यायला उशीरच झ्हालता .......घरी येताच ....त्याच्या मुलाने त्याला घट्ट मिठी मारली ..... अर्जुन ने ही मग त्याला जवळ घेतलं ......डोक्यावर किस केल .....कबीर सुुखाव्ल् ....कबीर अर्जुन चा मुलगा .....
अर्जुन येताच .... कामवाली बाई निघून गेली ......अर्जुन फ्रेश होऊन येताच......कामवाली बाई ने बनवलेला ....डाळ भात त्याने कबीर ला खायला दिला ....इतक्यात त्याची बायको .....रिया तिथे आली .... हनी......लव्ह यू.......अस म्हणत ....तीने अर्जुन ला मिठी मारली ........कबीर कडे बघत ....हे काय खातोस ? इव.......... त्या पेक्स्षा .....मी आपल्या सगळ्यांसाठी पिझ्झा आणलाय ? आणी चॉकोलेट ........कबीर समोर चॉकलेेट चा हात करत ती म्हणाली ....