Bhet - 3 in Marathi Love Stories by mahendr Kachariya books and stories PDF | भेट - ( भाग - ३ )

Featured Books
Categories
Share

भेट - ( भाग - ३ )

शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलो

स्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर मी phone सायलेंट करून ठेवला होता.

बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय एवढाच आला.

पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला.

Call me एवढीच अक्षरं होती.

कॉल केला.

' आदि ..'

'बोल बाळा..!

' मला कळत नाहीये '

' काय '?

' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते'

'का'?

' मला विचारच करता येत नाहीये.... म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked'

' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस... वेळ जाऊ दे की ... Take your own time'

' पण माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाहीयेत, त्याचं काय '?

' विचार करूच नको ना ..! तुझं daily routine follow कर फक्त'

' नक्की काय होतंय बाळा तुला ...?

'तू इथे का नाहीयेस आत्ता '?

' आणि आलो तर ... पुढे काय '?

मला आत्ताच भेटायचं होतं तुला '...

'*******, तुला पण माहित्ये .. मला आत्ता नाही येता येणार तिकडे'

'हम्मम ...'

' एक गेम खेळूया '?

'आत्ता'?

'हो'

' मी एक शब्द सांगेन तो ऐकल्यावर तुझ्या मनात असलेला शब्द तू सांगायचा .... विचार अजिबात करायचा नाही ... त्या क्षणी येणाराच शब्द असायला हवा'

' चालेल '

'करू सुरू ' ?

'हो'..

'नांदेड'?

'विद्यापीठ महोत्सव '

'गुलाबी' ?

'प्रेम'

'कॉलेज ' ?

' मी एकटीच '

'PJ आणि मनमुराद हसणं ' ?

' आपली पहिली भेट '.....

'तुझा निघायचा दिवस ' ?

'मुड ऑफ'

'****पूर'...?

' आठवणी '

'झोप ' ?

आठवण '

'पुस्तक'..?

'दुसर विश्व'.....

' पाऊस ' ?

'आनंद'....

'प्रेम' ?

'तू'

'प्रेमी' ?

'मी'

काय ....?

' बोल ना '

चल बाय .... मी जेवायला जात्ये ...

' अगं ए .... हॅलो .... हॅलो .....U there ?'

साधारण 4 महिन्यांपूर्वी माझ्या मनात भेट लिहायचा विचार आला होता. सुरवातीचे 3 भाग लगोलग लिहीले सुद्धा पण नंतर जरा थांबावसं वाटलं कारण त्या वेळी लिहीलेली प्रत्येक भेट ही फार भावनिकतेच्या प्रवाहात लिहीली गेली.

आता तिच्याच भेटीबद्दल का ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही नीट नाही सांगता येणार, पण एका मित्राने फार आग्रह केला होता तेव्हा त्याला जे उत्तर दिलं तेच इथे देतो.

'काही माणसं आपल्या आयुष्यात फार कमी वेळासाठी येतात. पण त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपल्याला आयुष्यभरासाठी आपली साथ देतो. ही माणसं आपलं आयुष्य अगदी मुळापासून बदलतात. तिला भेटण्याअगोदरचा मी आणि आत्ताचा मी यातला फरक केवळ मलाच माहित आहे.

यात कुठेही स्वतःविषयीच्या अहं ची दर्पोक्ती नाही तर तिच्यामुळे माझ्यात झालेला सकारात्मक बदल माझ्या अत्यंत जवळच्यांनाही फार जवळून अनुभवायला मिळाला आहे.

2021 ते 2023 पर्यंत माझ्यासोबत असलेली / आणि आता नसलेली ती अशा या आठवणींच्या प्रवासाचं वर्णन मी केवळ अविस्मरणीय या एकाच शब्दात करेन. भविष्यात माझा स्मृतीभ्रंश वगैरे झालाच तर तर इतर काही आठवो न आठवो ... मनाच्या एका कोपऱ्यात तिची जागा मात्र अढळ असेल.

काही जणांना या पोस्ट ला भावनांचा बाजारही वाटला होता / वाटेल, त्यांच्यासाठी एवढंच की

एखादी आठवणं बराच काळ मनात दाबून ठेवल्यावर अचानक तिचा स्फोट होऊन सगळं बेचिराख होण्यापेक्षा हळूहळू बाहेर काढून तिची तिव्रता कमी करावी या विचारांचा मी आहे.

फेसबुकच्या माध्यमातून मला तो मार्ग मिळाला.

त्यामुळे मला जे पटलं, रूचलं तेच मी केलं ज्याबद्दल मला काडीमात्र खेद नाही.

यानंतर भेट चे केवळ दोनच भाग पोस्ट होणार आहेत. शेवटच्या काही आठवणी सखोल लिहीण्याचा प्रयत्न करेन आणि लेखणीला पुर्णविराम देईन.

त्या दिवशी दुपारी कॉलेजमधून लवकरच बाहेर पडलो होतो. बाकी काहीच कामं नसल्यामुळे सरळ घरीच निघालो होतो. वाटेत तिचा मेसेज आला, महत्वाचं बोलायचं आहे त्यामुळे फ्री झालास की कॉल कर.

घरी आलो आणि तिला कॉल केला. सुरवातीचं बोलणं फार नॉर्मल होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूहळू मुख्य विषयाला सुरवात झाली.

"आदित्य, मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घेशील का?"

'हो... बोल की !

"प्लीज, रागावू नकोस आणि चुकीचा अर्थ काढू नकोस."

"तू सांगितल्याशिवाय मी कुठलाही अर्थ कसा काढणार ?'

"बरं '

"सांगून टाक ' ....

"मी आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या बोलण्यावर नीट विचार 

केला. सुरवातीला मला हे फार भारी वाटतं होतं. कारण असं समोरून डायरेक्ट प्रपोज मी पहिल्यांदा अनुभवलं आहे. हा अनुभव फार गोड आहे पण

आपल्यात काही बेसिक फरक आहेत जे मला खटकतात किंवा असं म्हण की निर्णय घेण्यात फार अडसर आणतात. एक तर आपल्यात असलेलं अंतर, तू माझ्यापासून 850 किमी. अंतरावर रहातोस त्यामुळे Be practical आपली भेट झालीच तर फारच कमी वेळेला होऊ शकेल. दुसरं म्हणजे आपले विचार ... तू फारच जहाल विचारांचा आहेस आणि मी पूर्णपणे त्या उलट. त्यामुळे मला नाही वाटत आपलं फार काळ टिकू शकेल त्यामुळे मला असं वाटतं की काही सुरु होण्यापूर्वीच आपण थांबलेलं बरं

पुढचा पाऊण तास मी शांतपणे (?) ते सगळं बोलणं ऐकत होतो; ना कोणती ऑरग्युमेंट्स केली ना ही तिला मधेच अडवून माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

"....... त्यामुळे आपण एकमेकांचे चांगले Friends राहूया,"

"थांब.."

"आं?"

मी म्हटलं आता थांब जरा.... मगाचपासून मी तुझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं एकही प्रश्न न विचारता किंवा तुला मधेच न थांबवता ... आता तू ऐक ...

तुझ्या सुरवातीच्या काही गोष्टी मला पटल्या पण पचल्या नाहीत. आपल्यालातल्या भौगोलिक अंतरा ऐवजी आपल्या मनातल्या अंतराचा विचार तू केला असतास तर जास्त बरं झालं असतं. काय गरज आहे एकत्र येण्यासाठी दर वेळी विचार सारखेच असायला हवेत एकमेकांच्या विचारांना योग्य वेळी योग्य तो आदर देऊनही एकत्र येता येऊ शकतंच की .... आणि सगळ्यात महत्वाचं.. ते Friends रहाण्याबाबत ....

मी तुला नुसती मैत्रीण म्हणून कधी पाहिलंच नव्हतं वा तुझ्याबद्दल त्या दृष्टीने विचार केला. माझ्यासाठी तु तेव्हाही Life partner च होतीस, आत्ता आहेस आणि यापुढेही राहशील so मैत्रीचा प्रश्नच येत नाही कारण मी तुला नुसती मैत्रिण म्हणून कधी पाहूच शकणार नाही आणि पाहिलं तर तो मैत्री या नात्याचा अपमान असेल असं मला वाटतं '...

मैत्री करायची म्हटली तर मग आपण पुन्हा Friends

होणार, आपल्यात बोलणं होणार, मला परत तुझ्याबद्दल

त्याच भावना येणार, मी तुला परत प्रपोज करणार, तू मला

परत तेच सांगणार, मी सॉरी म्हणून पुन्हा आधीसारखं नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न करणार, पण मग पुन्हा काही दिवसांनी...... हे सगळं असंच चालू राहील so its better way की आपण विषयच संपवून टाकू. कधी काही काम असेल तर बिनधास्त फोन कर मला. आदित्य नावाच्या कोणा एकाला ओळखतेस तू म्हणून ....

पण आता ही मैत्री वगैरेची चिकटपट्टी नको.... असो .... झालं माझं बोलून ... तुला अजून काही सांगायचं आहे का?"

"मला काय बोलू तेच कळत नाहीये.. आपण please नंतर बोलूया या विषयावर?"

"ठीक आहे"

"काळजी घे .... बाय."

" हो ... तु सुद्धा..."

क्रमशः