Ekapeksha - 12 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 12

Featured Books
Categories
Share

एकापेक्षा - 12

नमकार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सगळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आज मी पुन्हा तुम्हाला माझा बालपणाचा काळात घेऊन जातो, तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे आमचा पाटिल काकांचा. मित्रांनो, आज ते पाटिल काका या जगात नाही आहेत कारण की हा प्रसंग घडला तेव्हा ते काका जवळ जवळ ५० वर्षांचे असतील आणि मी तेंव्हा अवधा १२ वर्षाचा होतो. मी आधीच सांगितले आहे की आम्ही शासकीय क्वार्टर मध्ये रहात होतो. तर त्या वसाहतीत काकांच कोळशाचे दुकान होते त्यांचाकड़े गाई आणि म्हशी सुद्धा होत्या आणि ते दूध आणि दही विकण्याचे सुद्धा काम करायचे. त्यांचा बरोबर ते कोळसा सुद्धा विकायचे. त्यांची दुकान आणि घर हे एकच होते म्हणजे आमचा वसाहतीचा बाहेर जेथे आम्हा मुलांचा खेळण्यासाठी मोठे पटांगण होते त्याचा शेजारी त्यांची झोपड़ी आणि दूकान होती त्याला कोळशाचे टाल म्हणायचे. तर आमचापेक्षा वयाने मोठी असणारी मूल त्यांना आम्ही दादा भाऊ म्हणायचो ते त्या पटांगणात क्रिकेट खेळायचे, खेळतांना त्यांचा चेंडू काकांचा टाल मध्ये गेला तर ते तो चेंडू परत करायचे नाही. असेच कित्येक चेंडू काकांचा टालमध्ये गेलेत आणि परत आलेच नाही. त्यामुळे त्या मोठ्या मुलांनी ठरवले होते की एकेदिवशी या थेरड्याला धडा शिकवायचा म्हणून.
तर मित्रांनो, तो दिवस होता उन्हाळ्याचा आणि विशेष म्हणजे धूलिवंदनाचा. सगळीकड़े रंग खेड़ण्याचा कार्यक्रम सुरु होता जो बघावे तो आपल्यात गुँग होता. सकाळचे ११ वाजले होते सूर्य हा डोक्यावर जवळ जवळ आलेला होता. उन्हाचे चटके हे शरीराला झोंबत होते आणि
तेवढ्यात आम्ही बघीतले तर आमचे पाटिल काका शिव्या देत चालत येत होते आता ही गोष्ट आमचासाठी त्या काकांचा घरचा लोकांचासाठी काहीं नवीन न्हवती. कारण की ते काका रात्रीचे दारू घ्यायचे आणि शिवीगाड़ी करायचे, परन्तु त्यावेळेसची गोष्ट ही थोड़ी भिन्न आणि विचित्र होती. यावेळेस पाटिल काका हे घरातूत नव्हे तर लाब उजाड़ अशा मैदानातून शिवीगाड़ी करत चालत येत होते. त्या गोष्टीवर मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटले फक्त आम्हालाच नव्हे तर पाटिल काकू आणि त्यांचा मुलांना सुद्धा वाटले. तर ते काका शिव्या देत त्यांचा झोपडीचा जवळ पोहोचले तेव्हा काकू म्हणाल्या, " हे कुट्न येऊन राहीले तुम्ही, तुम्ही तर आपल्या आंगणात झोपले होते रात्रीला. मग तीकडून कसे येऊन राहिले काय रात्री झोपेत चालणे सुरु तर नाही केले. मग पाटिल काकू यांनी इकडे तीकडे नजर फिरवली आणि मग त्या पुन्हा बोलल्या, " अव आपली खाट कुटे आहे, तुम्ही तर त्या खाटेवर झोपले होते ना मग काका चीढून उत्तरले, गेली त खाट ...... मला सांग मी तिकडे स्मशानात गेलो कसा." (NOTE येथे ...... म्हणजे घाण शिव्या).
आता मात्र हे प्रकरण गंभीर वळण घेऊ लागल होत. या प्रकरणाची गंभीरता आता सगळ्यांना अधिक चुरशीची वाटू लागली होती. ते काका सांगू लागले की, मला उन्हाचे चटके लागले म्हणून माझी झोपमोड़ झाली आणि मी उठून बसलो. आता काय बघतो तर मी स्मशानात जेथे पार्थीव शरीराला विसावा देण्यासाठी काही वेळ ठेवल्या जाते त्या चबूतऱ्यावर मी झोपून आहे. मग मी लगबगीने उठलो आणि घरी परत आलो. काकांचा गोष्टी ऐकून खरतर हसू यायला हवे होते पर्यन्तु स्मशानाचे नाव येताच घाबरायला होत होते. या गोष्टीची चर्चा ही संपूर्ण एक आठवडा चालली परन्तु हे घडले कसे कुणालाच माहित नाही झाले. शिवाय काकांचा खाटेचे रहस्य सुद्धा तसेच राहिले शेवटी ती खाट गेली कुठे. तर त्या मागील गंमत आठ दिवसांचा नंतर आमचा कानावर आली ती तुम्हाला सवीस्तर सांगतो. तर झाले असे होते की ती रात्र होती होलीकादहनाची. त्या दिवशी सगळीकडे होलिकादहन सुरु होते. तुम्हाला आवर्जुन सांगू इच्छितो की आजचा प्रमाणात होलीकादहन आणि धूलीवंदन हे त्यावेळेस इतक्या जास्ती प्रमाणात साजरे करायचे. तर तेव्हा होलीकादहन झाल्यानंतर होलीकेचा जवळ रात्रीला जागणारे युवक हे होलीकेला रात्रभर जळते ठेवण्यासाठी कुठून काहीही भेटेल ते आणून होलीकेत टाकायचे. त्या अनुशंगाने कुणाचा कुंपनाचे लाकडी गेट, कुणाचा घराचा बाहेर पड़लेले लाकुड किवा चक्क झोपण्याची खाट. अहो मी थट्टा नाही करत आहे काकांचा बाबतीत तेच घडले होते. घड़ले असे की रात्री जागणाऱ्या युवकांत ते युवक होते जे काकांपासून त्रासून गेले होते. ते रात्री होलीकेत टाकण्यासाठी लाकुड शोधत काकांचा टालजवळ आलेत. तेव्हा तेथे काका अंगणात खाटेवर झोपलेले त्यांना अढळले. तेव्हा त्यांनी काकांना धडा शिकवण्याचे ठरवले होते. काका रात्रीचा वेळेस दारू पीऊन टून्न असतात त्यांना माहित होते म्हणून त्या सगळ्यांनी काकांना अलगद खाटेसोबत उचलले आणि होलीकेचा दिशेने जाऊ लागले. मग क्षणात त्यांनी त्यांचा वीचार बदलला आणि त्यांचा आगवळ्या वेगळ्या प्लानला अमलात आणले. ते सगळे काकांना त्यांचा
खाटेसोबतच गुपचुप स्मशानात घेऊन गेले, तेथे त्यांना चबूतऱ्यावर ठेवून त्यांची खाट घेऊन आले आणि होलीकेत टाकुन दिली.
ही सगळी गोष्ट लोकांना कळल्यानंतर त्या लोकांचा बरोबर काकांची सबंध दिनचर्या आणि त्यांची वागणूक या बाबींमुळे काही जणांना या गोष्टीवर खरतर हसू आले. परन्तु ही बाब सुद्धा लक्षात घेण्यासारखी होती आणि ती म्हणजे थट्टा आणि मस्करी ही आपल्या ठिकाणी. अशा प्रकारे
केलेली मस्करी ही कुणाचा ही जीवनाला घातक ठरू शकते सर्वथा. तर मित्रांनो, हा माझ्या जीवनातील एक प्रसंग ज्या प्रसंगाचा तत्काळ साक्षीदार मी नव्हतो परन्तु माझा डोळ्यांचा समोर घडलेला होता. तर मित्रांनो, माझ्या जीवनातील आगळ्या वेगळ्या प्रसंगांचा क्रमवारीत आता मी पुन्हा तुम्हाला माझ्या शालेय नाही तर कॉलेज मधील जीवनात घेऊन जातो. तेव्हा मी बारवीत होतो, मी आधीच सांगीतल्याप्रमाणे दहावीत थोड़े चांगले गुण मीळाल्यामुळे मीत्रांचा सोबतीने मी इंग्रजी माध्यमचा वर्गात प्रवेश घेतला होता. त्यानंतर दहावीचा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर
मीत्रांचा सोबतीने मी सुद्धा विज्ञानचा क्षेत्रात म्हणा की विज्ञानाचा अभ्यासक्रम यात दाखला घेतला होता. त्यासाठी आम्हाला ट्यूशन लावावे लागले होते, तर त्या टयूशन क्लास येथील हा प्रसंग आहे जो मी तुमचा सोबत शेयर करणार आहे. आमचा वसाहती मध्ये खिस्ती धर्माचा एका चर्च जवळ आमचे क्यूशन क्लास असायचे. तेथे वेगवेगळे शिक्षक यायचे शिकवायला त्यात एक शिक्षक होते नागपुरे सर, तर नागपुरे सर आम्हाला गणित शिकवायचे तर हा प्रसंग त्यांचाशी निगडीत आहे.

शेष पुढील भागात.......